प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे          
 
गोत्रें- ही सध्यां भारतीयांतली चालू संस्था होय. संध्यां अशी समजूत आहे कीं, एका गोत्रांतलें लोक म्हणजे एका वंशांतले लोक. गोत्रांचा उच्चार धार्मिक विधींत ब्राह्यणांकडून व्यक्तिनिर्देश करतांनां होतो, आणि सगोत्रीं विवाह आज रूढ नाहीं, कांकीं सगोत्री लग्न विहित नाहीं अशी समजूत आहे. आणि सगोत्री लग्न करावयाचेंच झालें तर मुलीला दुस-या कोणाच्या मांडीवर देऊन करण्यांत येतें. प्राचीन इतिहास पहातां एका गोत्रांतील सर्व मंडळी एकाच वंशातली आहेत ही गोष्ट पूर्णपणें खरी नाहीं. तशीच सगोत्रविवाह केव्हांच रूढ नव्हते हीहि गोष्ट खरी नाहीं. एवढेंच नव्हे तर गोत्रसंस्थाहि ब्राह्यणांत फारशी जुनी दिसत नाहीं. भारतीय ब्राह्यणांच्या गोत्रसंस्थेशी प्रवरसंस्था संयुक्त झाली आणि प्रवरांचे ॠषी ते गोत्रसंस्थापकांचेहि पूर्वज असावेत अशी समजूत होऊन लग्न करतांनां गोत्रांबरोबर प्रवरहि टाळूं लागले.

गोत्रसंस्थेचा इतिहास द्यावयाचा म्हणजे अनेक प्रकारचें विवेचन उत्पन्न होतें. एकतर (१) गोत्र, देवक वगैरे नांवांनीं जे बहिर्विवाह- युक्त समुच्चय सर्व जगभर दृष्टीस पडतात त्यांची कारणमीमांसा करावयाची, आणि नंतर (२) गोत्र शब्दाच्या उपयोगाचा इतिहास देऊन ब्राह्यणी गोत्रप्रवरयुक्त जी परंपरा स्थापित झाली तिचा इतिहास द्यावयाचा.

गोत्रें स्थापित होणें ही आडनांवें स्थापन होण्याप्रमाणेंच स्वाभाविक क्रिया आहे. आणि 'अपत्य पौत्रप्रभृति गोत्रं' असा पाणिनीनें जो नियम दिला आहे तो कुलनामनिर्देशांच्या स्पष्टीकरणास योग्य आहे. कुलांनां नांवें कशीं पडलीं येवढें स्पष्ट करावयाचें असेल तर पाणिनीचा हा नियम तें स्पष्ट करील. तथापि आपणास स्पष्ट करावयाची गोष्ट आडनांवस्वरूपी उत्पन्न कशीं झाली आणि तिचा गोत्रांशीं संबंध कसा जडला आणि गोत्रांचा प्रवरांशीं संबंध कसा जोडला गेला इत्यादि प्रश्न आपणांस विचारणीय आहेत.

ब हि र्वि वा हा ची मी मां सा.- बालहत्येच्या प्रघातावरून गोत्रांतरविवाहाची चाल अस्तित्वांत आली असें मॅलेननचें मत आहे. या प्रघातामुळें स्त्रिया दुर्मिळ होऊं लागल्या, व ज्ञातीपुरती बहुभर्तृत्वाची चाल रूढ झाली. व ज्ञातिबाह्य स्त्रिया धरून आणण्याचीहि चाल पडली. रानटी लोकांत, लहान मुलींनां ठार मारण्याची चाल आहे. व त्याचीं कारणेंहि उघड आहेत. समाज-घटनेच्या प्राथमिक अवस्थेंत असणा-या जातींत स्त्रीजातीच्या नैसर्गिक कमकुवतपणामुळें, 'मुली म्हणजे आपल्या मार्गांतील कांटेच होत, ' अशी समजूत होती. त्यांनां पोसावें लागे, आणि शिकार करून क्षुधा शमविण्याच्या कामीं त्यांचा उपयोग होत नसे. मुली असल्या कीं, शेजा-यास मोहहि उत्पन्न होत असे. हें मॅकलेननचें स्पष्टीकरण पटत नाहीं; कांकीं तो म्हणतो तितक्या जास्त प्रमाणांत बालहत्या रूढ होती हें सिद्ध झालेलें नाहीं. बलात्कारानें धरून आणलेल्या स्त्रीलाच ज्या प्राथमिक समाजपद्धतींत पत्‍नीत्व प्राप्त होत असे त्याच सामाजिक पद्धतींत गोत्रांतरविवाहाच्या चालीचा उद्भव झाला असावा हीच गोष्ट जास्त संभवनीय दिसते. मानवी समाजाच्या प्रथमावस्थेंत मुलांचे फक्त आईशींच नातें असे, व एखाद्या जातींतील स्त्रीवर्ग समाईक मिळकत अथवा धन म्हणून मानला जात असे. पुरुषास कोणत्याहि स्त्रीला पूर्णपणें बळकावितां येत नसे, किंवा तिच्यावर स्वामित्वहि त्याला गाजवितां येत नसे. परंतु अन्य जातींच्या स्त्रियांसंबंधीं मात्र निराळी गोष्ट होती. जो पुरुष अन्य जातींतील स्त्री बलात्कारानें पकडून आणील त्याला त्या स्त्रीवर स्वामित्व गाजवितां येत असे व त्याचा हक्कहि अबाधित राहत असे. बालहत्या, स्त्रीवर ताबा असावा म्हणून पुरुषांस होणारी नैसर्गिक इच्छा, आणि कुटुंब करून रहावें असा एक प्रकारचा नैसर्गिक कल, अशा अनेक कारणामुळें गोत्रांतरविवाह जास्त रूढ होऊं लागले व स्वज्ञातींत विवाह कमी होऊं लागले. अगदीं थोडक्या पिढींमध्यें, निसर्गसहज स्फुरणाचें रूढी अथवा कायदा यांमध्यें रूपांतर होतें, व नंतर त्यांचा अतिक्रम करणें पाप मानलें जातें तसें झालें वाढत्या सुधारणेबरोबर व ज्ञातींच्या दळणवळणामुळें, बलात्काराची आवश्यकता नष्ट होऊं लागली आणि राक्षसविवाह हा स्त्रीपुरुषांच्या वैयक्तिक व कायमच्या संबंधाचा एक द्योतक होऊन बसला, अशीहि एक मीमांसा करण्यांत आली आहे. ऑस्ट्रेलियांतील लोकांत एकच आडनांवाच्या दोन कुटुंबांत विवाह होत नाहींत. पूर्व आफ्रिकेंतहि वरील चाल असल्याचें समजतें. हिंदुस्थानांतील खासीया, वराली, ओराओन व इतर अनेक वन्य जातींतहि गोत्रांतरविवाहच रूढ आहे. कालमक, सरकॅसिअन, सैबेरियांतील याकुत व अमेरिकेंतील इंडियन यांच्यामध्यें गोत्रांतरविवाह चालू आहे. ब्रिटिश कोलंबियांतील सिमशियन इंडियन लोकांत देवमासा, बेडूक, गरुड व लांडगा इत्यादि देवकें आहेत व त्यांच्यांत सदेवकविवाह होत नाहींत.

आतां भारतीय गोत्रसंस्थेकडे वळूं. गोत्र हा शब्द ॠग्वेदामध्यें इन्द्राचा पराक्रमांच्या वर्णनांत अनेक वेळां येतो. या शब्दाचा अर्थ रॉथ ''गोठा'' असा करतो तर गोल्डनेर गाईंचा कळप असा करतो. मॅकडोनेलच्या मतें वरील दुस-या अर्थावरून पुढें या शब्दास उत्तरकालीन वाङ्मयात जो कुटुंब किंवा गोत असा अर्थ आला आहे त्याची उपपत्ति लावणें सोपें होतें. छांदोग्य उपनिषदांत [४. ४, १] कुटुंब या अर्थी गोत्र हा शब्द आलेला आहे.

गोत्र ही संस्था प्राचीन काळीं काय असावी हें निश्चयानें सांगतां येत नाहीं. गो म्हणजे भूमि आणि त्र म्हणजे संरक्षक; यावरून गोत्र म्हणजे भूमिसंरक्षक वर्ग असा गोत्र या शब्दाचा अर्थ करून गोत्र हा शासनविषयक विभाग असावा अशीहि कल्पना व्यक्त झाली आहे; आणि दुस-याच्या गोत्रांतील मुलगी पळविणें हें मर्दाचें काम, यामुळें गोत्राबाहेर लग्न करण्याची रीत उत्पन्न झालीं असावी, असें गोत्राबाहेर लग्न लावण्याचें स्पष्टीकरण करण्यांत आलें आहे. वैदिक लोकांबद्दल हें स्पष्टीकरण लागूं पडत नाहीं. या प्रकारच्या स्पष्टीकरणाच्या ग्रहणास अडचण येते ती ही कीं, गोत्र आणि विवाह या संस्थांचा संबंध वैदिकांत प्राचीनकाळीं नव्हता. हा संबंध केव्हां उत्पन्न झाला आणि कोणत्या प्रयोजनामुळें झाला हा ब-याच उत्तरकालीन इतिहासाचा प्रश्न आहे. सूतसंस्कृतींत गो म्हणजे जमीन आणि त्र म्हणजे संरक्षक असा अर्थ असणें शक्य आहेः आणि त्यामुळें गोत्र ही एक राजकीय संस्था असावी हेंहि शक्य आहे. परंतु ती तशी होतीच हेंहि आज निश्चयानें सांगतां येत नाहीं.

'दुस-याच्या टोळींतील मुलगी चोरून आणावयाची आणि स्वतःच्या टोळींतील मुलगी करणें म्हणजे नामर्दपणा होय' या तर्‍हेच्या कल्पनेचा मात्रसंस्कृतीच्या लोकांतील बहिर्विवाह स्पष्ट करण्यास उपयोग होत नाहीं; कां कीं, मनुष्यसंघ म्हणून गोत्र शब्द वेदांत नाहीं तर सगोत्रविवाह दूषणीय आहेत असा आधार कसा सांपडणार. बौधायनासारख्या जुन्या स्मृतींतहि त्यास आडकाठी नाहीं, आणि वसिष्ठाच्या धर्मसूत्रांत देखील सगोत्रविवाह करण्यास जरी आडकाठी घातली आहे, तरी बापाच्या बाजूनें पांच पिढ्या सोडून लग्न करावें असें सांगितलें आहे. गोत्रमर्यादा जर जुनी असती तर बापाच्याकडील पांच पिढ्या टाकाव्या या नियमाचें प्रयोजनच नव्हतें. ज्या कांहीं स्मृतींमधून सगोत्र किंवा सप्रवर विवाहांचा निषेध केला असतो त्याबरोबरच बापाकडच्या सात पिढ्या टाकाव्या व आईकडच्या पांच पिढ्या टाकाव्या असाहि उल्लेख करण्यांत येतो. गोत्रसंस्था जर प्राचीन नव्हे तर आपणांपुढें प्रश्न एवढाच उरतो कीं, ही समाजांत शिरली असेल तरी केव्हां ? आणि वर धर्मशास्त्रकारांनीं दिलेले दोन नियम भिन्नकाळीं उपस्थित होऊन पुढें ते दोन्ही एकत्र मांडले गेले असें तर नसेलना? सात पिढ्यांपर्यंत अगोदरच नातेवाईकांचा हिशेब ज्यांस माहीत आहे अशा व्यक्ती विरळ्या. पांच पिढ्या आईकडच्या टाकाव्या हा नियम तर ब-याच जातींनीं धाब्यावर बसविला आहे. दक्षिणेकडे अनेक जातींमध्यें मामाची मुलगी तर लग्नांत अधिक पसंत केली जाते. बापाकडून सात पिढ्या टाकाव्या हा नियम घेतला तर तो अनवश्यक ठरतो; कारण गोत्राबाहेर जर लग्न करावयाचें तर सात तर काय पण त्यामुळें शेकडों पिढ्या वगळल्या जातात. वसिष्ठासारख्या जुन्या स्मृतिकारांनीं हे दोन्हीं नियम एकसमयावच्छेदेंकरून मांडले असूनहि त्यांत दिसून येणारीं परस्परविरुद्धता ओळखून मनुस्मृतीनें फक्त गोत्रांचाच नियम ठेविला आहे व बापाकडील सात पिढ्यांचा वगळला आहे. मनुस्मृतीचा ''असपिंडाच या मातुः असपिंडाच या पितुः'' हा पाठ घेतला तर सपिडांबाहेरचे सगोत्री विवाह्य ठरतील. विवाहविषयक नियम देणारे धर्मसूत्रकारांच्या पूर्वींचे ग्रंथकार म्हणजे गृह्यसूत्रकार हे होत. ब-याचशा गृह्यसूत्रकारांनीं तर गोत्रांचा मुळींच आग्रह धरिला नाहीं. असेंहि शक्य आहे कीं ज्यावेळेस ''गोत्र'' याचा अर्थ गोठा असा मात्रसंकृतीच्या लोकांत होता त्यावेळेस ''भूरक्षवर्ग'' हा अर्थ सूतसंस्कृतीच्या लोकांत असावा. आणि सूतसंस्कृतीच्या लोकांत भूरक्षक वर्ग गोत्रांतरविवाही असेल.

मेनार्ट हा सगोत्रविवाहाची निषिद्धता व सवर्णविवाहाची प्रशस्तता मूल गृहकालापर्यंत नेतो. परंतु असगोत्रविवाहाची चाल इण्डोयूरोपीय कालापासून अस्तित्वांत असावी असें समजण्यास साधन जें भरतीयातील गोत्रप्राचीनता तेंच खरें दिसत नाहीं. शतपथ ब्राह्यणांत (१. ८, ३. ६) दोन्हीं बाजूंनीं तिस-या किंवा चवथ्या पिढीच्या आंतच विवाह करणें संमत असल्याचा उल्लेख आहे. गोत्रें ही संस्था फार प्राचीन नाहीं ही गोष्ट गोत्रें व श्रौतधर्म याचा संबंध लक्षांत घेतला असतां दिसून येईल. असें मात्र शक्य आहे कीं, सूतसंस्कृतीच्या आर्यन् लोकांत गोत्रांचें म्हणजे बहिर्विवाहाचें देवकरूपानें अस्तित्व असेल. रोमन लोकांत 'जेन्' नांवाच्या समुच्चयाबाहेर लग्न करण्याची पद्धत होती. जरी इंडोयूरोपीय काळांत बहिर्विवाह होत असला तरी मधल्या मांत्रसंस्कृतीच्या लोकांत तो तात्पुरता नष्ट झाला असला पाहिजे असें वाटतें. जेव्हां त्यात गोत्रसंस्था निर्माण झाला तेव्हां त्यांचा प्रवरांशीं संबंध जोडला गेला, आणि वेदविरुद्ध पण वैदिक परंपरेवर अशी समाजव्यवस्था प्रचलित झाली.

गोत्रांचें अस्तित्व पहाण्यासाठीं ॠग्वेद चाळून पाहिला तर त्यांत ''गोत्र'' या शब्दाचें ''कुल'' या अर्थानें अस्तित्व दिसत नाहीं आणि बहिर्विवाहनियमबद्ध समुच्चय तर मुळींच दिसत नाहींत. तर आपणांस ऐतिहासिक प्रश्न उत्पन्न होतात ते पुढील प्रमाणेः- (१) बहिर्विवाह ज्या समुच्चयांत नव्हते त्यांत उत्पन्न कसे झाले, (२) त्या समुच्चयांस एक किंवा अनेक प्रवरांनीं युक्त अशी परंपरा कशी उत्पन्न झाली; (३) आणि त्या परंपरेस धार्मिक महत्व कोणत्या क्रमानें उत्पन्न झालें.

ब्राह्यणी गोत्रें म्हणून आज जीं प्रचलींत आहेत तीं ॠषींचीं नांवें आहेत. त्या नांवांपैकीं कांहीं नांवें इतकीं जुनी आहेत कीं तीं वेदांतील मंत्रद्रष्टे म्हणून दृष्टीस पडतात व त्यापैंकीं कांहीं ॠग्मंत्रांतच आलीं आहेत तर कांहीं नांवें सर्वानुक्रमणीकारांनीं उल्लेखिलीं आहेत. या दोन्ही प्रकारचीं नांवें तिस-या विभागांत ब्राह्यण्याच्या इतिहासांत दिली आहेत. अगस्त्य, अघमर्षण, अत्रि इत्यादि गोत्रनांमें आहेत, मंत्रद्रष्टे आहेत व ॠग्मंत्रांत उल्लेखित आहेत, तर उपमन्यु दवेल आणि मधुच्छंद हीं गोत्रनामें आहेत व त्यांस सूक्तकर्तृत्व सर्वानुक्रमणीकारांनीं दिलें आहे पण त्यांचा प्रत्यक्ष उल्लेख ॠग्मंत्रांत नाहीं. अत्यंत प्राचीन ॠषींचे वंशसंबंध सर्वानुक्रमणीकारांनीं दिले आहेत. त्यांपैकीं कांहींस मंत्रांत प्रत्यक्ष आधार आहे व कांहींस नाहीं. त्या वशसंबंधाचें विवेचन पुढें ब्राह्यणाच्या इतिहासांतच (विभाग ३) दिलें आहे. त्यावरून एवढें दिसतें कीं जीं सात प्रवरसंस्थापक ॠषींचीं कुलें झालीं व अनेक गोत्रें त्या प्रवरपरंपरेंत समाविष्ट करण्यांत आलीं त्यास एक कुलस्थापनपर आधार फार थोडा आहे पण अगदींच नाहीं असें नाहीं.

गो त्रें व श्रौ त सं स्था.- पशुयागांतर्गत वपायागापूर्वीं जे प्रयाज व्हावयाचे असतात त्यांत कोणतीं आप्रीसूक्तें म्हणावयाचीं, आणि कोणत्या देवतांनां आहुती द्यावयाची हें यजमानाच्या गोत्रप्रवरांवरून ठरवावें इतकाच काय तो गोत्रांचा आणि श्रौत धर्माचा संबंध आहे, आणि तो देखील वेदोक्त नसून सूत्रोक्त आहे. मंत्रकालीं गोत्रें नव्हतीं व गोत्रांनुसार आप्रीसूक्त किंवा देवता यांचें भिन्नत्व स्थापित झालें नव्हतें. मंत्रद्रष्ट्या ॠषींच्या संबंधानें आपणांस असें दिसतें कीं, प्रत्यक्ष ॠग्मंत्रांत कुलकल्पनेव्यतिरिक्त गोत्रकल्पनाच नसल्यामुळें अमुक ॠषी अमुक गोत्रांचे हें सांपडणें शक्य नाहीं. परुं जे थोडेसे पितृविषयक उल्लेख सांपडतात त्यांचा उपयोग त्यांस विशिष्ट गोत्रप्रवरांत बांधण्याकडे सर्वानुक्रमणीकारांनीं केला ब्राह्यणग्रंथांत आप्रीसूक्तविषयक विवचेन करितांना प्रवरणार्ह ॠषित्रयाची कल्पना आली आहे. तथापि तेवढ्यावरून मंत्रवक्त्या ॠषींच्या ठायीं गोत्रकल्पना होती असें सिद्ध होणार नाहीं. ब्राह्यण ग्रंथांचा काल म्हणजे बृहद्यज्ञाचा काल आणि बृहद्यज्ञांचा काल म्हणजे देश्यांच्या वर मांत्रसंस्कृतीच्या संस्था दडपण्याचा काल. या कालांत देश्यांची विद्या स्वीकारणें किंवा आपली विद्या देश्यांस देणें या गोष्टी होते, अध्वर्यू व हे उद्गाते करीत होते. केवळ ते विद्याच घेत होते असें नाहीं तर ते देश्यांच्या चालीरीती देखील स्वीकारीत होते. जर देश्यामध्यें गोत्रें असलीं तर त्या गोत्रांचा यज्ञसंस्थेशीं संबंध जोडण्याचें काम देखील अवश्य होतें. तर असें असणें शक्य आहे कीं देश्यांमध्यें गोत्रें आहेत असें पाहून त्यांची गोत्रसंस्था मांत्रसंस्कृतीच्या लोकांनीं घेतली असावी. त्या गोत्रांचा उपयोग काय करावयाचा याविषयीं मात्र त्यांचा निश्चय तात्कालीक झालेला दिसत नाहीं. ॠग्मंत्रांत जशी गोत्रकल्पना नाहीं तशी प्रवरकल्पनाहि नाहीं. तसेंच ज्या सत्रकल्पनेच्या आश्रयानें श्रौतसूत्रकारांनीं गोत्रप्रवरकल्पनेची मांडणी केली आहे त्या सत्रांचाहि उल्लेख ॠग्मंत्रांत नाही. जे सत्रविषयक उल्लेख आलेले आहेत त्यांचा अर्थ अनेक व्यक्तींची एकत्र स्थिति यापलीकडे पोहोंचू शकत नाहीं. ॠग्वेदांतच सत्रें नाहींत व यजुर्वेदाच्या अनेक शाखांतहि सत्रें नाहींत तर सत्रें होतीं तरी केव्हां ? सत्रांच्या भरभराटीचा काल असा वैदिकवाङ्मय वाचल्यास कोणताच दिसत नाहीं. हौत्राच्या ॠचांत सत्र शब्द ऐकू येत नाहीं आणि ब्राह्यणांमध्यें जर सत्रें पुसटलेलीं दिसतात तर सत्रें वैदिक परंपरेंत मूळचीं नव्हतीं पण वेदबाह्य परंपरेंतून निघून वैदिकांनीं तीं मान्य केलीं असावीं असें म्हणण्यास काय हरकत आहे? म्हणजे देश्यांच्या उपासनापद्धतींत सत्रें असावींत आणि गोत्रेंहि त्यांच्या आश्रयानें धर्मविधींत प्रचलित असावींत आणि त्या दोहोंचाहि स्वीकार मांत्र संस्कृतीच्या लोकांनीं केला असावा.

गो त्रां ची उ त्प त्ती मां त्र कीं दे श्य सं स्कृ तीं त ?- गोत्रें म्हणजे ज्या समुच्चयांतील लोकांनीं आपाआपसांत विवाहसंबंध करतां कामा नये असे पुंज, अशी लोकांत आज कल्पना रूढ आहे. असले समुच्चय मांत्रसंस्कृतीच्या लोकांत होते असें मंत्रामधून तर मुळींच सिद्ध होत नाहीं. आणि प्रवरहि मंत्रांत नाहींत तर ही गोत्रप्रवरात्मक सृष्टि आली कोठून ? ही उत्तरकालीं त्याच संस्कृतींतून विकास पावली असेंहि म्हणतां यावयाचें नाहीं. कां कीं मांत्रसंस्कृतीच्या लोकांचें वाङ्मयरूपीं साहित्य आपणांजवळ भरपूर आहे. जर गोत्रसंस्था मांत्रांस परकी नसली म्हणजे मांत्रांच्या गोत्रविहीन समाजापासून गोत्रसंस्था तयार होत गेली असती तर या विकासाच्या मधल्या पाय-या दाखविणारें वाङ्मयरूपी किंवा शब्दरूपी उल्लेख आपणांस खास सांपडले असते. परंतु तसे उल्लेख आपणांस आरण्यकान्त वाङ्मयांत कोठेंच सांपडत नाहींत. ज्या समुच्चयाबाहेर लग्न केलें पाहिजे असें समुच्चय काश्मीरपासून द्रविडपर्यंत अनेक जातींत सांपडतात, एवढेंच नव्हे तर रशियापासून आस्ट्रेलियापर्यंत देखील सांपडतात. कांहीं समुच्चयांत बहिर्विवाहाची सक्ति जास्त असते व कांहींत कमी असते एवढेंच. या तर्‍हेचा बहिर्विवाह समाजांत उत्पन्न झाला तो कां याविषयीं मानववंशशास्त्रज्ञांनीं बरींच कारणें पुढें मांडलीं आहेत. त्यांतील एक कारण असें कीं समुच्चयासमुच्चयांतच लग्न करणें 'नामर्दपणाचें आहे; खरे मर्दाचें' काम म्हणजे शत्रूच्या गोटांतील मुलगी पळवून आणावयाची ही कल्पना समाजांत अत्यंत बाल्यावस्थेंत कदाचित खरीहि असेल. पण या कल्पनेच्या साहाय्यानें भारतीय ब्राह्यणांमध्यें बहिर्विवाह कां उत्पन्न व्हावा याचें स्पष्टीकरण होणार नाहीं. कां कीं, परसमुच्चयांतून मुलगी पळवून आणण्याचें महत्व किंवा त्या क्रियेस अनुकूल परिस्थिति ही जो देश वसलेला आहे व ज्या देशांत राजसंस्था स्थापित झाली आहे. अशा देशांत नसते. आणि परमुच्चयांतून मुलगी पळवून आणण्याचें महत्व हौत्रांत किंवा औद्गात्रांत तयार झालेल्या भिक्षुकांत कोठून उत्पन्न होणार? अर्थात बहिर्विवाहाचीं स्वाभाविक कारणें उत्पन्न होऊन बहिर्विवाह मांत्रसंस्कृतीच्या लोकांत स्थापित झाला हें शक्य नाहीं. जर स्वाभाविक कारणामुळें उत्पन्न झाला नसेल तर त्याच्या अस्तित्वाची उपपत्ति अनुकरणाशिवाय दुसरी कशांत सांपडणार? याचा थोडक्यांत अर्थ असा कीं ब्राह्यणांनीं ब्राह्यणेतरांचें किंवा मांत्रांनीं देश्याचें अनुकरण केलें. पण तुझ्यावर माझी कडी पाहिजे असा प्रकार मात्र केल्याशिवाय ते राहिले नाहींत. त्यांनीं लौकिक गोत्र व अध्यात्मिक गोत्र असा निराळा भेद उत्पन्न करून आपलीं गोत्रें ब्राह्यणेतरांवर लादलीं आणि पुष्कळ प्रसंगीं आपल्या शिष्यांस (उदाहरणार्थ रजपुतांस) अशी शिकवण दिली कीं, लौकिक गोत्रांचें विवाहादि प्रसंगांत अध्यात्मिक गोत्रांपेक्षां महत्व कमी [''देवक'' पहा].

प्रवरांशीं गोत्रांचा संबंध सूत्रकालीन होय. सूत्रकारांनीं प्रवरॠषी हे व्यक्तीचे गोत्रसंस्थापकापूर्वींचे पूर्वज बनविले आहेत. पण त्या विधानास वेदांतप्रमाण नाहीं.

वेदांत प्रवरासारखा उल्लेख कायतो एकच आहे. तो आर्षेयवरणविष्ज्ञयक होय. (तै. सं. २. ५, ८). म्हणजे अशी कल्पना होते कीं, श्रौती मंडळींचे आठ संप्रदाय स्थापन झाले आणि त्यावेळचें आचार्य किंवा विद्याभासी या आठांपैकीं कोणत्याना कोणत्या संप्रदायांत समाविष्ट होत. वरण या शब्दाचा अर्थच निवड, स्वीकारणें असा आहे. म्हणजे त्यावेळचा शालंकायन किंवा बौधायन हा अगस्त्य किंवा वसिष्ठ इत्यादि कोणत्या तरी ॠषीपासून जे संप्रदाय स्थापन झाले त्यांपैकीं एकाचा स्वीकार करी. म्हणजे ते त्याचे प्रवर झाले.

गोत्रमंडळामुळें ज्या संप्रदायांचें अस्तित्व कळून येतं ते संप्रदाय म्हटले म्हणजे गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्रि, भारद्वाज, वशिष्ठ. जे ॠषी कोणत्याच मंडळांत किंवा संप्रदायांत नाहींत असे मंत्रद्रष्टे पहिल्या, आठव्या व दहाव्या मंडळांत घातले आहेत. प्रवरसंस्थापक ॠषी म्हटले म्हणजे कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गोतम, जमदग्नि, वसिष्ठ व आठवा अगस्ति असे धरले जातात. अनेक ॠषींच्या नांवांचीं गोत्रें आहेत तीं सर्व वरील ॠषींच्या नांवावर स्थापन झालेल्या प्रवारांशीं जोडलीं जातात. या प्रवरसंस्थापकांमध्यें आंगिरसाचें नांव दिलेलें नाहीं. आंगिरस हा तर अत्यंत प्राचीन काल्पनिक पुरुष अगर प्रत्यक्ष अग्नि होय. असें शक्य आहे कीं जे ॠषी कोणत्याच पुरुषास आपला संप्रदायप्रवर्तक म्हणून मान्य करीत नसतील ते आंगिरसवरण करीत असावेत. या अनेक संप्रदायांची तोंडमिळवणी करून सर्वसामान्य श्रौतधर्म तयार करण्याची खटपट चालू असे. त्या खटपटींचीं अंगें अनेक होतीं. एक अंग म्हटलें म्हणजे अनेक संप्रदायांतील विध्यंश घेऊन कर्मकल्पना करणें, दुसरें अंग म्हटलें म्हणजे कर्मामध्यें कांहीं संप्रदायांचें वैशिष्टय रहावें म्हणून ऐच्छिक क्रिया ठेवणें, या दोन्ही क्रियांचें परिणाम यज्ञसंस्थेवर झाले आहेत.

कांही संप्रदायांमध्यें विशिष्ट कर्में रूढ होतीं. उदाहरणार्थ, अंगिरसामध्यें द्विरात्र, गर्गांत त्रिरात्र, अत्रींत चतुरात्र. जमदग्नीमध्येंहि एक तर्‍हेचा चतूरात्र होताच. उद्दालक पुत्र कुसुरविंद याच्या नांवावर सप्तरात्र इत्यादि संस्था व्यक्तीच्या किंवा संप्रदायाच्या दिसतात. सोगयागसंस्था पूर्ण होऊन यजुर्वेद व ब्राह्यणें तयार होण्यापूर्वींच्या या संस्था ज्या क्रियेनें सामान्य एक क्रतु झाला त्याच क्रियेनें या इतर संस्था झाल्या असाव्यात. जेव्हां अनेक संप्रदायांचें एकीकरण झालें व अनेक गोत्रांमधून ज्याप्रमाणें हौत्र तयार झालें त्याप्रमाणें सामान्य यज्ञघटना बनवितांना प्रत्येक वरील संप्रदायापाशीं देवघेव करून यज्ञाची मांडणी सर्वमान्य करण्यांत आली असावी. अध्वर्युवर्गानें संस्थांचें एकीकरण केलें तर होत्यांनीं अनेक सुक्तवान कुळांचें एकीकरण केलें. त्या क्रियेंत विशिष्ट ॠषींस प्राधान्य मिळालें. आणि ते प्रवरांचे ॠषी होण्यास मदत झाली.

गोत्रमंडळामुळें प्राधान्य पावलेल्या ॠषींचें संप्रदायांच्या इतिहासांत स्थान येणेंप्रमाणें दर्शवितां येईल. गोत्रमंडळांत दृष्ट होणारे संप्रदाय व तैत्तिरीय शाखेंत वर्णिलेले संस्था स्थापक हे समकालीन होत. या दोहोंचा उपयोग पुढील सप्तसंस्थकारांनीं केला. प्रवरांचे ॠषी आणि गोत्रमंडळांचे ॠषी यांत कांहीं ॠषी एक दिसतात. प्रवरांचा उल्लेख सत्रप्रकरणांत व सत्रांतील आप्री संर्वांच्या सारख्या असाव्यात या हेतूनें आला आहे. आप्री गोत्रांवरून आंखलेल्या आहेत. पण गोत्रें हजारों. त्यांचा थोडक्या आप्रीसाठीं उल्लेखिलेल्या गोत्रांशीं संबंध जोडण्यासाठीं कांहीं तरी योजना हवी होती म्हणून सर्व गोत्रांचा विशिष्ट आप्रीशीं संबंध जोडण्याकरितां प्रवरांची यादी तयार होणें अवश्य होतें. ॠग्वेदांतील अनेक ॠषी कांहीं विशिष्ट कुलांत घालण्याचा प्रयत्‍न झाला गोत्रांस प्रवरान्वयी बनवावें ही योजना भिक्षुकी स्वरूपाची आहे. म्हणजे भिक्षुकी कारणाकरतां काल्पनिक इतिहास तयार होण्याचा संभव येथें आहे. म्हणजे ब-याचशा लोकांस गोत्रप्रवरासंबंधानें एका कुलांत दडपण्याची खटपट यांत दिसते. तथापि कांहीं मूळची परंपरा असल्याशिवाय आणि ती सर्वमान्य असल्याशिवाय नवीनांस त्यांत दडपतां येणार नाहीं. यावरून असें असणें शक्य आहे कीं कांहीं आर्षेययुक्त गोत्रें व त्यामुळें कांहीं प्रवरसंबंध मूळचेच निश्चित झाले असावेंत. प्रवर म्हणून जी आर्षेयपरंपरा प्रत्येक उपासक बाळगी ती श्रौतसंस्था प्रचारकांनीं व इतर समाजांतहि पसरविली असावी.

गोत्रांचा म्हणजे ॠषींच्या घराण्यांचा विकास मंत्रकालांत व ब्राह्यणकालांत झाला असेल पण तोपर्यंत त्यास कांहीं संप्रदायवैशिष्ट्य नव्हते. अमुक गोत्राचा अमुक वेद किंवा शाखा असें कांही नव्हतें, व ही गोष्ट 'गोत्र आणि वेदाध्याय' या परिच्छेदाखालीं ब्राह्यणाच्या इतिहासांत दाखविली आहे. म्हणजे कुलाचा श्रौतसंस्थांशीं संबंध अगदीं आगंतुक व उत्तरकालीन आहे असें दिसून येईल.

पूर्वोक्त विवचेनाचा सारांश येणें प्रमाणें:-

(१) मांत्रसंस्कृतींत गोत्रें नव्हतीं, व सत्रेंहि नव्हतीं.

(२) सूतसंस्कृतींत गोत्रें होतीं व सत्रें होतीं.

(३) सूतसंस्कृति व मांत्रसंस्कृति यांच्या एकीकरणाचा काल म्हणजे ब्राह्यणरचनाकाल होय. या कालांत सत्रें श्रौतसंस्थांत शिरलीं; पण गोत्रप्रवर त्याच वेळीं शिरले नसावेत.

(४) सूतसंस्कृतींत गोत्रें कशीं उत्पन्न झालीं हें वैदिक साहित्याच्या साह्यानें सांगणें शक्य नाहीं. ज्या अर्थीं तीं इतर इंडो यूरोपीय लोकांत होतीं, त्याअर्थी त्यांचा उगम वेदपूर्व हजारों वर्षांपूर्वींच्या काळांत लपला आहे. व एकंदर वन्य लोकांतील संस्थांचें अवलोकन करून गोत्रांतरविवाहाची मीमांसा तयार झाल आहे. ती प्राचीन इंडोयूरोपीय गोत्रांचेंहि स्पष्टीकरण करूं शकेल.

(५) सूतसंस्कृतींतील गोत्रपद्धति पाहून तिला कांहीं तरी धार्मिक अर्थ उत्पन्न करण्याची क्रिया मांत्रांनीं केली. म्हणजे देवताग्रहण व पशुयागांग प्रयाजांत आप्रीसूक्तग्रहण हीं कांहीं अशीं गोत्रप्रवरांवर अवलंबून ठेऊन त्यांस श्रौतसंस्थांत स्थान दिलें.

(६) देश्यांमध्यें गोत्रसंस्था होती पण गोत्रें अनेक होतीं. ती गोत्रप्रवरपरंपरा तयार होऊन श्रौतसंस्थांशीं संबद्ध झाली.

(७) प्रवर हे संप्रदाय होते. त्या संप्रदायांच संबंध ॠग्वेदमंडळाशीं किंवा आकाशांतील सप्तर्षिकल्पनेशीं असल्यामुळें ते महत्व पावले; आणि मांत्रसंस्कृतींतील पुरोहितवर्ग त्यांशीं संबद्ध असावा किंवा संबंध जोडूं लागला असावा. त्यामुळें देश्य लोकांचीं कुलें त्या सात अगर नऊ प्रवरांत घालणें सोपें झालें.

(८) देश्य आणि मांत्र या दोघांसहि गोत्रें आहेत व प्रवर आहे अशी परिस्थिति उत्पन्न झाल्यानंतर देश्यांचा गोत्रांतर विवाहाचा नियम मांत्रांसहि चिकटला गेला असला पाहिजे.

[संदर्भग्रंथ.- ज्ञानकोश भाग ३ ब्राह्यण्याचा इतिहास].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .