प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
       
गोंड- मध्यप्रदेश व मध्यहिंदुस्थान यांत असलेल्या एका पट्टयाला गोंडवण नांव आहे. येथे वस्तीस असलेल्या लोकांना गोंड हें नांव पडलें आहे. यांनां गोंड हें नांव कसें मिळालें तें समजत नाहीं. गोंड हे गौड मधील लोक असावेत व गौडाचा अपभ्रंश गोंड झाला असावा. गोंड स्वतः आपणाला गोंड न म्हणवितां कोइडूर म्हणवितात. गौड हा शब्द शालिवाहन शकाच्या ४ थ्या किंवा ५ व्या शतकांतील शिलालेखांत दिसून येतो.

१९११ च्या खानेसुमारींत यांची संख्या ३ लाखापर्यंत गेली. पैकीं सुमारें दोन लाख तेहेतीस हजार गोंड मध्यप्रांतात होते. द्रविड जातीपैकीं गोंड ही प्रसिद्ध व ऐतिहासिक महत्वाची शाखा आहे. कारण या शाखेनें पुष्कळ काळपर्यंत विशेषतः १३ ते १७ या शतकांत बहुतेक मध्यप्रांत आपल्या ताब्यांत ठेवला होता. त्यांचा अंमल शांततेचा व भरभरटीचा झाला. त्यावेळीं मांडलाचा वसून १० लाखावर होत असे. १५६४ मध्यें येथें अकबरास अगणित लूट मिळाली. चांद्याचें राज्यहि त्यावेळीं अतिशय भरभराटींत असून तेथें शिल्पशास्त्रहि अगदीं उत्कृष्ट स्थितीला पोंचलें होतें.

आठराव्या शतकांत यांनां उतरती कळा लागली व नवीनच उदयास आलेल्या मराठी सत्तेच्या विस्तांरात गोंड सत्ता अंतर्धान पावली. यानंतर गोंड लोक ब-याच निकृष्ट स्थितीस पोंचले व त्यांच्या स्वातंत्र्यांतील मर्दुमकीचें रानटी शौर्यांत रुपांतर झालें. पुढें इंग्रजी अंमलाखालीं तर त्यांचा शौर्यमद पूर्णपणें नाहींसा होऊन ते अगदीं भित्रे व गोगलगाईपेक्षां निरुपद्रवी प्राणी बनलें.

गोंड लोकांच्या संख्याबाहुल्यामुळें व विस्तारामुळें त्यांच्यांत जाती उपजातीहि ब-याच पडल्या आहेत व त्यांत प्रत्यक्ष गौंड नाहीत अशा लोकांचाहि भरणा झालेला आहे. उच्च दर्जाच्या गोंड लोकांचा या खालच्या लोकांशीं रोटीबेटी व्यवहार होत नाहीं. या लोकांत कांहीं धंद्यामुळेंहि जाती पडल्या आहेत. उच्च वर्गांत मुख्य दोन वर्ग आहेत. व राजगौंड हे वरिष्ठ व सत्ताधारी आणि धूरगोंड हे प्रजाजन अथवा सामान्य लोक होत.

राजगोंड हे जमीनदार गोंडाचें वंशज आहेत. यांनां हिंदु म्हटलें जातें. ब्राह्यण यांच्या हातचें पाणी घेतात व क्वचित् रजपूतांबरोबर त्यांचा शरीरसंबधहि घडल्याचीं उदाहरणें आहेत. ब्राह्यणांप्रमाणें हे जानवें घालतात व यांची सोवळ्याची कल्पनाहि विचित्र आहे. स्वयंपाकाकरितां हे सर्पणहि धुवून घेतात. चारपांच वर्षांनीं यांनां 'बूरा' देवाच्या दर्शनाला जावें लागतें व तेथें मांसभक्षणाची नक्कल करावी लागते. म्हणजे कपड्यांत मास गुंडाळून ते तोंडापर्यंत नेतात. हा विधि न केल्यास भूतबाधा होईल असें ते मानतात. उत्तरेकडे खटौला गोंड म्हणून वरच्या दर्जाचे थोडेसे लोक आहेत. ते पूर्वींच्या बुंदेलखंडी 'खतोला' राज्यांतले असावेत.

ल ग्न री ती.- गोंडाच्या प्रत्येक पोटजातींत निरनिराळीं गोत्रें आहेत व प्रत्येक गोत्रास एक निराळें नांव असतें, तें त्या गोत्रांतील सर्व माणसांस सारखेंच लागू असतें. निरनिराळ्या गोत्रांत निरनिराळ्या देवांच्या पूजा करितात. (१) चार देवांची पूजा करणारे, (२)पांच देवांची पूजा करणारे (३) सहा देवांची पूजा करणारे व (४) सात देवांची पूजा करणारें अशीं ह्या गोंडांचीं गोत्रें आहेत. ज्यांचें गोत्र एक, अशा स्त्रीपुरुषांचा एकमेकांशीं विवाह होत नाहीं. त्यांच्यात राक्षसविवाहपद्धति अद्यपि अस्तित्वांत आहे. एखाद्या पुरुषास लग्न करावें अशी इच्छा झाल्यास तो शेजारच्या खेड्यांत बायको करण्याजोगी कोणती मुलगी आहे, ह्याविषयी माहिती मिळवितो. नंतर जेथें ती आपल्या सोबतिणीबरोबर काम करीत असेल तेथें तो आपल्या मित्रांस बरोबर घेऊन जातो. ती मुलगी आपल्या मंडळींत मिळून आपल्या गांवात पळून जावयाच्या पूर्वीं जर हा तिच्या हातांस स्पर्श करुं शकेल, तरच त्याचें मित्र त्याच्या मदतीस जातात. एखाद्या वेळेस त्या मुलीच्या सोबतिणींबरोबर ह्याची व ह्याच्या मित्रांची मारामारीहि होते व ती कित्येक वेळीं वराच्या हस्तस्पर्शानंतरहि होते. तथापि, एकदां हस्तस्पर्श झाला आणि मग जरी त्या बायकांच्या मदतीस त्यांच्या गांवातले पुरुष आले तरी त्याचें काही एक चालत नाहीं. मग त्या स्त्रीपुरुषाचा विवाह झालाच पाहिजे अशी यांच्यांत चाल आहे.

रा ह णी व आ चा रः- गोंडांची राहणी साधी आहे. नवराबायको एके ठिकाणीच मजुरीनें काम करतात. ज्या ठिकाणीं चांगली ओळख झाली आहे अशा ठिकाणीं नवरा-बायको मजूरीनें निरनिराळ्या जागीं काम करतात. पण ज्या ठिकाणीं ओळख नाहीं अशांच्या घरीं अगर शेतींत काम करण्याचा प्रसंग आला तर ती कधींहि एकेकटे राहून पुष्कळ मजुरी मिळाली तरी काम करीत नाहींत. थोडी मजुरी घेऊन दोघें मिळून एके जागींच काम करतात. पण यांत आळशी बरेच सांपडतात. जर घरांत एक दिवसापुरतें खाण्यास असलें तर ते कामावर जात नाहींत. आतांशा कांहींना कळूं लागल्यानें शिलज्क ठेवण्याची प्रगति थोडी थोडी दिसूं लागली आहे. यांचे सर्व आचार अलीकडे हिंदु लोकांप्रमाणेंच झाले आहेत व होत आहेत. हे लोक रानडुक्करें खातात, म्हणून त्यांचा इतर हिंदु, मराठे व कुणबी वगैरे लोकांबरोबर रोटीव्यवहार व बेटीव्यवहार होऊं शकत नाहीं. यांची मुख्य देवता देवी आहे.

स ण.- ह्यांच्यात शिमग्याच्या सणाचें महत्व फार आहे. दरसाल शिमगा फाल्गुन पौर्णिमेस येतो त्या दिवशीं सण न करतां अगोदर गांवचा पाटील अगर एखादा मुख्य इसम सर्व गावंकरी लोकांनां एकत्र जमवितो आणि सर्वांना विचारतो कीं, शिमग्याचा सण केव्हां करावयाचा ? कोणच्याहि अडचणी नाहींत असा एक दिवस सर्वांच्या विद्यमानें ठरवितात. त्या दिवशीं तो शिमग्याचा सण सर्वजण मिळून करतात. मात्र गावांतील कोणीहि इसम त्या दिवशीं गैरहजर राहिला तर त्यास जातीचा दंड द्यावा लागतो. म्हणून कोणीहि परगांवीं गेला असला तर त्या दिवशीं तो हरतर्‍हेनें परत येतो. सर्व गांव एक होऊन आनंद करतात. हा सण चैत्रमासापलीकडे सुद्धां लांबतो. प्रत्येक निराळ्या गांवच्या सोयी पाहून ह्या सणाचा दिवस ठरवितात. तो दिवस सर्वजण दारु पिऊन घालवितात. स्त्रिया फेर धरुन रात्रीं, दिवसा गाणीं म्हणतात. मलखांब रोवून त्यास एंरडेल तेल लावितात. मग त्या मलखांबाभोंवतीं स्त्रिया फेर धरुन गाणीं म्हणतात. गांवांतील प्रमुख वृद्ध लोक एके ठिकाणीं बसून तरुण मुलांसाठीं शर्यती लावितात. जो कोणी बायकांच्या फेर्‍यांतून मलखांबावर खांबाच्या टोंकांपर्यंत जाईल त्याला वर ठेवलेले दोन, तीन, चार, पाच रुपयांचें इनाम घेण्याचा अधिकार असतो. बायकांच्या हातीं हिरवे फोक असतात, ते मलखांबावर चढणा-या इसमावर सपासप मारतात. त्यांच्या सपाट्यांतून जो बक्षीस मिळवितो त्याचे सर्वजण धन्यवाद गातात.

गोंड वन्यधर्मीय आहेत. वाघाचीहि ते पूजा करतात. देवीच्या रोगांकरितां मातादेवी, दांतांकरितां दंतेश्वरी यांच्या सारख्या देवतांची उपासना होते. दुल्हादेव ही सामान्य गृहदेवता होय. कांहीं पुढारलेले गोंड शिवकालीचीहि भक्ति करतात व बुढादेव हा शिवस्वरुप आहे असें समजतात. गोंड गारगोट्यांच्या रुपांत पूर्वजांची पूजा करतात.

गोंड लोकांतला अंत्यविधीहि चमत्कारिक आहे. दक्षिणेकडे पाय करुन ते प्रेतें पुरतात. राजगोंड व सर्व वृद्ध यांस जाळतात. पूर्वीं मृताला घरांतच पुरीत असत. ही वहिवाट आंता बंद पडली आहे. पांचव्या दिवशीं नदीच्या कांठीं जाऊन हे लोक मृताच्या आत्म्याला हांक मारतात व एखादा जिंवत मासा पकडून नेऊन तो खातात. अशाकरितां कीं, त्याच्या बरोबर आलेला आत्मा आमच्याच घरांत पुन्हां जन्माला यावा. गोंड लोक हे सामान्यतः शेतकीवर रहातात बहुतेक शेतकामावर नोकर अथवा मजूर असतात. कांहीं पोलिस व चपराशी आहेत. मोहपाणी येथील कोळशाच्या खाणींतले मजूर गोंडच आहेत. हे लोक काम चांगलें करतात. पण अल्पसंतुष्ट व आळशी असून दूरदर्शी मुळींच नाहींत. त्यांचा बांधा खुजट, कृष्णवर्णाचा पण बांधेसूद असतो. दिसण्यांत हे मोठेसे चांगले नसून वाटोळ्या डोळ्याचें व जाड ओठांचे असतात. केंस काळे व राठं असून दाढीमिशा कमी असतात. मध्यप्रांतांतील कांहीं लोक अर्धवट हिंदी बोलतात. बाकीचे मूळ द्रविड भाषा बोलतात. तिला गोंडी म्हणतात. तमिळ व तेलगू यांचीच ही बहीण आहे. पण त्यांच्यांत तेलगूशीं तिचा संबंध थोडा जवळचा दिसतो बाकी साम्य विशेष नाहीं.

गों डी भा षा- गोंडी भाषा म्हणजे ''गोंड'' किंवा ''कोयतोर'' लोक जी बोलतात ती होय. हल्लीं ज्या प्रदेशात गोंड लोकांची वस्ती आहे. त्या प्रदेशास नकाशांत ''गोंडवन'' हे नांव दिलें आहे.

जरी गोंडी भाषा ही तामीळ, तेलंगी वगैरे चांगल्या सुधारलेल्या व प्रौढ दशेप्रत पावलेल्या दक्षिण हिंदुस्थानांतील अस्सल भाषांचीच सख्खी बहीण असावी असें दिसतें तरी हल्लीं अगदीं रानटी स्थितींत आहे. तिला ''लिपी'' हा शब्द मुळींच ठाऊक नाहीं. गोंडीची कानडी व तेलंगी भाषेशीं तुलना पुढें दिली आहेः-

गोंडी तेलंगी कानडी मराठी
आंद आदा अवळूं ती
अव आंवरु अवरु त्या
कडक कंडळौ कण्णु डोळा
कवी कवळू किवी कान
कई चेई कै हात
काल काळू काल पाय
आका आकळू येले पान
कलतन ..... कक्कतन चोरी
गोहक गोधमळू गोधि गहूं
तंमू तमो तम्म भाऊ
तोल डोळू तोगलू कातडें
रंड रोंडु थेरडु दोन
पद पदी हत्तु दहा
इंगा ... इगलू आतां

                        
या शब्दसाम्यावरुन गोंडी, तेलंगी व कानडी या भाषांचें परस्पर साद्दश्य बरेंच आहे असें दिसतें. कोणत्याहि भाषेंतील सर्वनामें व अंके हीं दोन जर बरीच सद्दश दिसतात तर त्या भाषांचा परस्पर निकट संबध असून त्यांतील जंगली स्थितींत राहिलेली त्या सर्व सुधारलेल्या व पक्व झालेल्या भाषांचें मूळ असावी असें अनुमान साहजिक ओघास येतें. यावरून गोंडी भाषेपासून तेलंगी व कानडी निघाल्या असाव्यात.

गोंडी भाषेंत गणितविद्येचें माहात्म्य फारसें नाहीं. पांचपावेतों गोंडी अंकलिपी तेलंगी व कानडी यांच्या अंकलिपीशीं बरीच चांगली मिळते; पुढें दहा पावेतों सरासरीनें मिळते व अकरा बारा यांचा मेळ मुळांच बसत नाहीं. शंभरांचा तेलंगीशीं बराच मिलाफ आहे. हा जो गणितविद्येचा अगदीं अभाव याचें कारण उघड आहे. हे लोक अगदीं जंगली व रानटी तेव्हां यांस संख्येची व मिळवणीची गरज काय पडणार? पुढें प्रसंग आलाच तर मराठी अथवा हिंदी या भाषेंत काम चालून निर्वाह होत असे. तेव्हां अर्थात् गोंडी भाषा या प्रमाणें गणितलिपींत पाठीमागें पडली.

कोणत्याहि भाषेंत गायनकला अगदीं नाहीं असें होत नाहीं. तेव्हां गोंडी भाषेंत वेडींवांकडीं तरी कांहीं गीतें असावीं असें साहजिक अनुमान होतें व हें अनुमान खरेंहि आहे. शोधाअंतीं गोंडी भाषेंतील गीतें फारशीं वर्णनीय, टुमदार, अनेक अलंकारादिकांनीं युक्त अशीं नाहींत असें समजतें. पण सर्व गीतांत यमक व प्रास यांचा थोडाबहुत भरणा नाहीं असें क्वचित् होतें.

गोंड लोकांत प्रधान म्हणून एक भेद आहे. हे गोंड लोक आपल्यांत मोठे ज्यांना म्हणतात त्यांच्या पदरीं असतात. राजपुतान्यांत जशी भाट लोकांची कीर्ति आहे, तशीच गोंडवनांत या प्रधान लोकांची आहे. यांच्या गीतांचे कांहीं मासले पुढील प्रमाणें:-

अडकाते अडका कोसाता अडका.
(मडक्यांतलें मडकें मशीचें मडकें.)
नाडीमन्नो मडमी आता नाक जावा दासे.
(परवां लग्न झालें मला पेज वाढ.)

भावार्थः- अत्यंत कृष्णवर्ण असून जिचें लग्न नुकतेंच मोठ्या कष्ठानें झालें ती आतां मोठा नखरा करून माझ्या भोजनादिकांकडे लक्ष देत नाहीं म्हणून मी तीस लावून बोलत आहे व भोजन मागत आहे.

काडीना कड पिडता काडी बाडी बाता.
(आंधळीचा डोळा फुटला आंधळी कां आली.)
डेहानूर मांदीतून काडी इचके किता.
(दीडशें पंक्तीचा आंधळीनें विचका केला.)

भावार्थः- जिचा डोळा फुटला असली एक विरूप आंधळी दीडशें मनुष्यांच्या पंक्तीत आल्यामुळें तिनें सर्व पंक्तीस अगदीं विरस करून टाकिलें.

झिमुट झिमुट पिर वायता ढोड्डा उसा वायता.
(झिम पाऊस येतो नदीला पूर येतो.)
तरा सागा झिणका बोट डपता लाता.
(आण वहिनी गांवी लहान मासे पळूं लागले.)

भावार्थः- बारीक बारीक पाऊस पडत आहे, नदीला पूर येत आहे, तर वहिनी गांवी लौकर आणून दे. मासळ्या पळून जाऊं लागल्या आहेत.

चैक मैक मैजाधार बगाई योड अगाधार.
(चक पक नखरेबाज जवानपठ्ठ्यापुढें धावतात.)
विहुना आता पेडगी इगाडा चटरी पेकिंग.
(अश हल्लीं मुली आतांच्या छिचोर पोरी.)

भावार्थः- चक पक व्हावें, नखरा करावा, जवानपठ्ठ्या पुरुषापुढें धांवून जावें, अशीं लक्षणें हल्लींच्या मुलींचीं झालीं आहेत. आतांशा पोरी, फार छिचोर झाल्या आहेत.

[वि. विस्तार पु. ८, व ४३. कूक, थस्टर्न, रसेल व हिरालाल. बोस-छत्तिसगड (जे. ए. एस्. बी. ५९). चिनॉयसेन्सस रिपोर्ट, बेरार; ग्रँट-गॅझेटीयर ऑफ सेंट्रल प्राव्हिन्सेस; ग्रीयर्सन- लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .