विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
       
गुदलूर, तालुका- मद्रास. निलगिरी जिल्हा. जिल्ह्यातील इतर भागापेक्षा हा बराच सखल आहे. येथील वस्ती दिवसेंदिवस कमी होत आहे कारण येथील सोनें, अभ्रकाच्या खाणी व कॉफीचे कित्येक मळे बंद झाले आहेत. अद्यापहि नेल्लाकोट्टा व आक्टरलोनी खोरें येथें कांही मळे जीव धरून राहिले आहेत. क्षेत्रफळ २८० चौ.मैल. एकंदर लो.सं.(१९२१) २२०७९. तालुक्याचा वसूल ५५ हजार आहे.