प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

गुहिलोट- हे घराणें मेवाडचें असून त्याचे वंशज आपल्यास सूर्यवंशी क्षत्रीय म्हणवितात. राजपुतान्यांत यांना हिंदूचें सूर्य अशी बहुमानाची पदवी लावितात. टॉडच्या मते रजपुतांच्या ३६ घराण्यांत हें श्रेष्ठ घराणें होय. या घराण्याच्या कुळाचें नांव गुहिलोट अथवा घेलोट असून तें गुहिलपुत्र या संस्कृत नांवाचा अपभ्रंश आहे. चितोडच्या (सं.१३३५) एका शिलालेंखात मेवाडच्या एका प्राचीन सिव्ह नांवाच्या राजास गुहिलपुत्र म्हटलेले आहे. दुस-या एका शिलालेखांत गोभिलपुत्र असाहि उल्लेख आढळतो. हंसीच्या शिलालेखांत गुहिलोट असें प्राकृत रूप येतें. सारांश गुहिल नावावरून हिं वंशाचें नाव बनले. व्यक्तीवरून कुळाचे नाव ठेवण्याची चाल राजपुतान्यांत सर्वत्र आढळते. या घराण्याच्या उत्पतीबद्दल टॉडनें पुढील दंतकथा दिल्या आहेत. सूर्यवंशी शेवटचा राजा सुमित्र याच्या वंशातील हा गुहिल होता. तसेंच वलभीवंशातील शेवटचा राजा शिलादित्य याच्याशी या गुहिलांचा संबंध येतो. मुसलमान तबारिखकार या घराण्याचा संबंध सस्सन राजांशी लावितात व कोणी येझ्देगर्द या इराणी राजाच्या मुलीशी यांचा संबंध जोडतात; परंतु या तर्कांनी सबळ पुरावा मुळींच नाही. हा वंश निःसंशय सूर्यवंशीय क्षत्रिय होय असें पं.गौरीशंकर ओझा व रा.चिंतामणराव वैद्य यांचे मत आहे.

रा. देवदत्त भांडारकर यांनी अचलेश्वरच्या शिलालेंखात (संवत १३४२) बाप्पा या गुहिलोट घराण्याच्या मूळ पुरूषाचें जें वर्णन आलें आहे, त्यावरून या घराण्यास व बाप्पास नागर ब्राह्मण ठरविलें आहे. चितोडचा शिलालेख (सं.१३३१), मम्मदेवप्रशस्ति, रसिकप्रिया, एकलिंगमहात्म्य, शक्तिकुमाराच्या वेळचा एक शिलालेख (सन ९७७), तवारीखमाळवा इत्यादी लेख व बखरीवरून हें घराणे मुळचें नागर ब्राह्मण होतें व पुढें क्षत्रिय बनलें असें रा. देवदत्त भांडारकरांचे म्हणणें आहे. त्यांच्या मतें ह्या घराण्याचा मूळपुरुष आनंदपुरचा म्हणजे हल्लीच्या वडनगरचा रहाणारा होता. कुमारपालाच्या वेळच्या एका शिलालेखांत या आनंदपुरचा उल्लेख येतो. वैद्यांच्या मतें आनंदपुर म्हणजे आटपुरा होय वडनगर नव्हे.

रा.देवदत्त भांडारकर म्हणतात की, ''आनंदपुरास नागर ब्राह्मणांची फार वस्ती होती व बाप्पा हा जातीनें नागर ब्राह्मणच होतां. त्याचें गोत्र वैजबाप होतें'' गीतगोंविदावर कुम्भराण्यानें रसिकप्रिया नांवाची टीका लिहिली आहे. तीत हें गोत्राचें नांव आले आहे. या गोत्राचें प्रवर तीन असून या घराण्याचा वेद यजुर्वेद होय, अशी माहिती भाटांच्या वंशावळावरून समजते. परंतु भाटांच्या या वंशावळीवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. वैजवाप गोत्रप्रवर-निम्बध कदम्बम् या ग्रंथात त्याच्या आत्रेय, गविष्ठिर व पौर्वातिथ या तीन प्रवरांसह आलेले आहे. या गोत्रप्रवरांचा उल्लेख कात्यायन व लौगाक्षी या सूत्रकरांनीहि केलेला आहे. सध्याच्या नागरब्राह्मणांतहि हे वैजबाप गोत्र आहे. हे घराणें मूळचें नागरब्राह्मण असून क्षत्रिय कसें बनलें याबद्दल रा.भांडारकर म्हणतात की, ''याचें कारण खात्रीनें सांगता येत नाही; परंतु (घराण्याचा मूळ पुरुष) गुहदत्त हा नागरब्राम्हण असून वडनगरचा रहिवाशी व मूळचा (मित्र प्रत्ययान्त नागरब्राह्मणांच्या नांवावरून) मिहिर किंवा मेर जातीचा होता. वलभी राजांनी वडनगर किंवा आनंदपूरच्या अनेक नागरब्राह्मणांना दानें दिलेल्या ताम्रपटांत त्या त्या ब्राह्मणांच्या नांवाच्या शेवटी मित्र शब्द येतो; यावरून नागरब्राह्मणांनांच मित्र शब्द लावीत असे अनुमान निघतें. वलभीराजांनाहि मैत्रक म्हणत. तेव्हां मित्र किंवा मैत्रक हे मूळचें मेर किंवा मेहर होत. मेर ही जात आर्य नसून परकीय, एक विशिष्ट विदेशी असून तिनें हुणांबरोबरच सहाव्या शतकांत हिंदुस्थानांत प्रवेश केला होता. त्याकाळी हे परकी लोक हिंदुस्थानांत वस्तीस राहिल्यानंतर येथील चातुर्वर्ण्य उचलीत. त्यामुळे या मेरांतहि ब्राह्मण व क्षत्रिय वर्ण बनले. तेव्हा गुहिलोट घराणें मूळचें नागरब्राह्मण म्हणजे मेर असल्यानें विदेशीय ठरतें. बाप्पा ब्राह्मण असला तरी तो नागरब्राह्मण म्हणजे विदेशीयच होय. पुढे त्यानें ब्राह्मणधर्म सोडून क्षात्रधर्म स्वीकारल्यानें तो क्षत्रिय बनला असावा.'' [जर्नल. ए. सो. बंगाल. पु. ५अं.६.] परंतु गौरिशंकर ओझा व चिंतामणराव वैद्य यांच्या मतें बाप्पा हा ब्राह्मण नसून सूर्यवंशी क्षत्रिय होता. वैद्य म्हणतात की, नरवाहनाच्या शिलालेखांतील 'रघुवंश कीर्तिपिशुना:’ या विशेषणावरून हा वंश क्षत्रियच होय. देवदत्त भांडारकर यांनी हे विशेषण आपल्या लेखांत गाळलें आहे. नुक्तेच बाप्पाचें एक सोन्याचें नाणें सांपडले असून त्यावरील लेखांवरूनहि ओझा यांनी बाप्पा क्षत्रिय असल्याचें ठरविलें आहे. चितोड व अबू येथील लेखांत महिदेव व विप्र असे जे शब्द बाप्पास लावण्यांत आलेले आहेत व ज्यावरून देवदत्त भांडारकर त्याला ब्राह्मण म्हणतात, तें शब्द लेखकाच्या चुकीनें खोदले गेले असेहि ओझा म्हणतात. वैद्य म्हणतात की, अलीकडील भांटांना क्षत्रियांची ब्राह्मण गोत्रें कशी, यांचें गूढ पडून तें उकलण्यासाठी त्यांनी रजपूतकुलांची उत्पत्ती नवीन कल्पून त्या त्या गोत्रर्षीच्या ब्राह्मणांपासून ही कुलें उत्पन्न झाली अशा कथा रचिल्या असाव्यात.

तसेंच गुहिलोत (मैत्रक-मिहिर-मेर) घराणें हें मूळचें हिंदू नसून बाह्म, परकीय, हूण वगैरे जातीचे होतें असें देवदत्त भांडारकराचें म्हणणेंहि वैद्य यांना कबून नाही. त्यांचें म्हणणे की, मित्रप्रत्ययान्त नांवावरून केलेला वरील तर्क साफ चुकीचा आहे. मित्र व मिहिर यांचा कांहीच संबंध नाही. अर्थात् गुहिलोत हे बाह्मपरकीय नसून अस्सल सूर्यवंशी क्षत्रीय होते. देवदत्त यांनी ज्या शिलालेखावरून हा तर्क केला आहे, त्यांतील श्लोकांचा अर्थच त्यांना कळला नाही व नरवाहन लेंखांत बाप्पांस स्पष्टपणें 'गुहिलगोत्र नरेंन्द्रचन्द्र' असें म्हटलें आहे त्यावरूनहि त्याचें क्षत्रियत्वच सिध्द होतें, असें वैद्य यांचें मत आहे.

बाप्पा रावळ- या घराण्यांतील बाप्पापासून समरसिंहापर्यतची हकीकत येथें देतो. त्यापुढील हकीकत ज्ञा.को. च्या नवव्या विभागांत उदेपूर नांवाखाली आली आहे. बाप्पारावळाच्या जन्मशकाचा, तसेंच तो चितोडच्या गादीवर केव्हां अधिरूढ झाला व त्यानें राज्यपदाचा केव्हां त्याग केला याचा दन्तकथादिकांवरून विचार करतां (संवत ८२०) इ.स.७६३ हा त्याच्या अधिकारत्यागाचा शक ठरतो व तो चितोडच्या मानमोरी लेखाशी बराच जमतो. त्याच लेखावरून बाप्पाची कारकीर्द ७१३ पासून ७६३ पर्यंत केव्हा तरी सुरू झाली असावी असें रा. चि.वि वैद्याचें मत आहे. व त्यांच्या अंदाजें त्याच्या राज्यारोहणाचा काल स.७३० असावा. मेवाड येथील दंतकथाप्रमाणें हा काल स.७२८ असा टॉडनें दिला आहे. अरब लोकांनी ७१२ साली सिंध प्रांत काबीज केला हें निश्चित आहे व ह्यानंतरच त्यांनी राजपुतांन्यावर स्वा-या केल्या. सारांश बाप्पाच्या राज्यारोहणाचा काळ सन ७३० धरला असतां सरासरी ३३ वर्षे त्यानें राज्य केलें असावें. राज्यारोहणाच्या वेळी त्याचें वय काय असावें हें ठरविणें कठीण आहे. अगदी किमान पक्षी ३० वर्षांचें धरल्यास त्याचा जन्मशक इ.स. ७०० येतो. जुन्या दंतकथावरून व मेवाडच्या गुहिलोतांच्या द्दढ समजुतीवरून बाप्पाचा जन्म संवत १९१ मानतात. टॉडनेंहि याच समजुतीचा अनुवाद केला आहे. चिंतामणराव वैद्य म्हणतात की, भट्टार्कानें स ५०९ मध्यें वलभी राज्य स्थापलें, तेव्हापासून हा संवत धरावा (५०९ + १९१ = ७००) म्हणजे स. ७०० हा (७३० च्या जवळचा) शक येऊन ही तोंडमिळवणी होते. रा.वैद्यांच्या मते बाप्पा हें एका व्यक्तीचेंच नांव आहे. बाप्पा शब्दांचा 'बाबा, साधुपुरुष व पिता' असाहि अर्थ संभवतो; व ह्या अर्थावरूनहि बाप्पा हा गुहिलोत घराण्याचा मूळ पुरुष असावा. नेपाळ वगैरे ठिकाणी कोरीव लेखांत मूळ पुरुष या अर्थी बाप्पा शब्दांचा उपयोग केलेला आढळतो. (उदा.बाप्पपादानुष्यात). त्यावरून बाप्पा ह्या शब्दाचा व्यक्तिवाचक उपयोग पूर्वकाळी प्रचलित होता. उदाहरणार्थ बप्पभट्टी हें तत्कालीन एक जैन आचार्याचें नांव प्रसिध्द आहे व 'बप्पार्य' अशा नावांचा उल्लेख तत्कालीन कोरीव लेखांतहि सांपडतो. हें नाव क्षत्रियवाचक देखील आहे. असें इ.स.६५५ च्या बगुम्रा ताम्रपटावरूनहि दिसतें.

बाप्पानें स्थापन केलेलें चितोडचे गुहिलोटं राजघराणें बाप्पाच्या काळापासून (७३०) आजतागायत म्हणजे सुमारें १२०० वर्षे अव्याहत चालू आहे. व त्या घराण्याचें ठिकाणहि जवळ जवळ पूर्वीचेंच आहे. सध्यां त्या घराण्याची राजधानी चितोड नसून उदेपूर आहे. पण चितोडहि अजून त्यांच्याच ताब्यांत आहे व या घराण्यांतील अनेक राजपुरुष वीर्यशाली, स्वातंत्र्यप्रिय व स्वधर्मरत होते.

या घराण्याच्या निरनिराळ्या व परस्परांशी विसंगत अशा ब-याच वंशावळी उपलब्ध आहेत. त्यामुळें बाप्पाच्या वंशजाचा अनुक्रम ठरविणें कठीण झालें आहे. त्यांतून नुकत्याच सांपडलेल्या आटपुरालेखांत (इं.ऍं. पुं.३९) या वंशाचा बराच भिन्न असा क्रम आढळतो. टॉडला हा शिलालेख माहीत होता, पण या लेखांतील यादी टॉडनें दिलेल्या यादीहून बरीच भिन्न आहे. पूर्वीच्या लेखांत उल्लेखिलेल्या राजांची संख्या समरसिंहापावेतों तीस आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक राजाची कारकीर्द १५ वर्षांची (१२००-७३०=४७०) ठरते. परंतु आटपुरालेखांत बाप्पापासून फक्त शक्तिकुमाराच्या स.९७७ सालच्या एका लेखांत उल्लेख मिळतो. म्हणजे प्रत्येक राजाची कारकीर्द सुमारें ११ वर्षोची पडतें. त्या काळी अरब लोकांनी सिंध प्रांत काबीज केला असून त्यांच्या स्वार्‍यांचा सपाटा सारखा चालू होता; व देशांत धामधूम व अशांतता होती म्हणून वरील ११ वर्षांची सरासरी पडत असावी. टॉडनें आपल्या यादीबद्दल असें म्हटलें आहे की, त्या यादीतील राजांचा अनुक्रमवारी नामनिर्देश एकाच शाखेचा नसून गुहिलवृक्षाच्या अनेक शाखांच्या समकालीन राजांचा संकलित क्रम आहें. आतां गुहिल घराण्याच्या ब-याच शाखा होत्यां हें आपणास चितोडगड लेखावरूनहि समजते. एकंदरीने आज बाप्पांच्या वंशजाचा क्रम व कारकीर्द निश्चयेकरून ठरवितां येत नाही. तरी पण चितोडगड व अचलेश्वर येथील लेंखास अनुसरूनच हा क्रम साधारण ठरविता येतो.

बाप्पानंतर मेवाडच्या गादीवर गुहिल राजा आला. त्याची सर्व कारकीर्द शत्रूंशी लढण्यांत गेली. मध्ययुगांतील सर्वच राजांना आरबांशी तोंड द्यावें लागें व ह्या काळी अरबांच्या स्वार्‍यांचा व रजपुतांच्या उलट हल्ल्यांचा इतका कहर उडाला की, त्या प्रदेशभर सर्वत्र मांस व रक्त यांचा संडा शिंपला गेला व त्या देशास 'मेदपाट' (प्राकृत मेवाड) असें अन्वर्थक नांव प्राप्त झाले. त्यावरून अरब व रजपूत यांमध्ये किती घनघोर युध्द चाललें होतें तें उघड होते. गुहिलानें आपल्या पुढील वंशजांना आपलें नांव चालू केलें व ही शाखा गूहिलोट नावांनें प्रसिध्द झाली [गुहिलोत = संस्कृत गुहिलपुत्रः ओत (पत्त) हा प्रत्यय वंशज या अर्थी राजपुतन्यांत प्रसिध्द आहे.]

गुहिलानंतर भोजराजा गादीवर बसला व भोजानंतर शीलास राज्यपद मिळालें. ह्या दोघांसहि अरबांशी तीव्र संग्राम करावा लागला, पण त्यांच्या मागून गादीवर आलेलया कालभोजास तर अरबांशी फारच दारूण युध्द करावें लागलें. कालभोजानंतर त्याचा पुत्र भर्तृपट्ट यास राज्यपद मिळाले व भूर्तपट्टानंतर सिंहराजा राज्य करू लागला. त्या सर्वांची कारकीर्द शत्रूंशी लढण्यांतच गेली व हे सर्वहि सारखेच रणगाजी निघालें. सिंहानंतर त्याचा मुलगा महायक गादीवर बसला व महायकानंतर खोम्माणाच्या पराक्रमांची विशेष वर्णनें आढळतात. आटपुरालेखांत आणखी दोन खोम्मणांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक कालभोजाचा मुलगा असावा व दुसरा सिंहराजाचा मुलगा असावा. टॉडनें ''खोम्मणरासा'' नांवाच्या एका काव्याचा आधार घेऊन खोम्माण व अरब यांच्यातील एका युध्दप्रसंगी चितोडगडच्या बाजूनें कोणकोणत्या देशाचें राजे लढलें यांची याद दिली आहे व त्याचप्रमाणे मुसुलमानांच्या निरनिराळ्या स्वार्‍यांचाहि अहवाल दिला आहे. तो विचांरात घेतां ती स्वारी ९ व्या शतकाच्या प्रारंभीच झाली असावी असें वाटतें. बाप्पापासून (स.७६४) ह्या स्वारीच्या कालाची (स.८२५) गणना केली तर सरासरी ६१ वर्षांचा काल येतो. एवढ्या कालांत पांच राजे होऊन जाणें स्वाभाविक आहे. अचलेश्वरादि लेखांत बाप्पा तें महायकपावेतो जी नावें आहेत त्यांहून अधिक नावे आटपुरा लेखांत सांपडतात. लेखाप्रमाणें पाहता ८२५ च्या सुमारास कालभोजाचा पुत्र खोम्माण राजा होता व त्यानेंच अरबांशी घनघोर संग्राम केला असें सिध्द होतें. तथापि खोम्मणरासांतील यादीवरून फक्त तिच्या कर्त्याच्या काली त्याला ज्ञात जाती अमूक होत्या एवढेंच ऐतिहासिक सत्य निघेल.

तिस-या खोम्माणानंतर अल्लट नांवाचा अत्यंत पराक्रमी पुरुष गादीवर बसला. त्याच्या आईचें नांव महालक्ष्मी असून ती मूळची राष्ट्रकूट घरांण्यांतील होती. अल्लटच्या मागून त्याचा पुत्र नरबाहन हा गादीवर बसला. नदबाहनाचा एक स्वतंत्र लेख मिळतो. नरबाहनानंतर शक्तिकुमार राज्य करू लागला. परंतु आटपुरा लेखांत नरबाहन व शक्तिकुमार यांच्या दरम्यान शालिवाहनाची कारकीर्द झाली असा उल्लेख आहे. या शक्तिकुमाराच्याच वेळेचा 'आटपुरा' लेख होय. व त्याचा शक विक्रम संवत् १०३४ (स.९७७) असा आहे. शक्तिकुमारानंतर शुचिवर्म्याची कारकीर्द झाली ह्या शुचिवर्माच्या १०३८ वि.सं. मधील शिलालेख उपलब्ध आहे. चितोडच्या लेखांत नरवाहनापर्यंतची नांवे दिली आहे. अचलेश्वर लेखात मात्र समरसिंहपर्यंत (वि.सं.१३३८) सर्व राजांची वंशावळ दिली आहे. समरसिंहच्या नंतरचा इतिहास उदेपूरसंस्थान या नांवाखाली ज्ञानकोशाच्या नवव्या विभागांत आला आहे तेथे तो पहावा.

निरनिराळ्या लेखांतून वर्णिलेल्या गुहिलोट घराण्याची वंशावळ पुढीलप्रमाणें आहेः-

वंशावळ
आटपुरालेख अचलगडलेख बाणुपुरालेख
(सं.१०३४) (सं.१३४२) (सं.१४०९)
गुहादित्य बाप्पा-राज
(संन्यास सं.८२०)
बाप्पा
 १ गुहिल  गुहिल  गुहिल
 २ भोज  भोज  भोज
 ३ महेंद्र  ०  ०
४ नाग
५ शील शील शील
६ अपराजित
७ महेंद्र (२ रा)
८ कालभोज कालभोज कालभोज
९ खोम्माण
१० महायक
११ भर्तृभट्ट
१२ सिंह सिंह सिंह
१३ खोम्माण (२रा)
१४ महायक महायक महायक
१५ खोम्माण(३ रा) खोम्माण खोम्माण
१६ भर्तृभट्ट (२ रा) - -
१७ अल्लट अल्लट अल्लट
१८ नरवाहन (सं.१०२८) नरवाहन नरवाहन
१९ शालिवाहन
२० शक्तिकुमार(सं.१०३४) शक्तिकुमार शक्तिकुमार
२१ शुचिवर्मा (सं.१०३८)


[मध्ययुगीन भारत, भा.२; राजस्थान. टॉड इंडियन अन्टिक्वरी पु.३९; बॉम्बे ग्याझे. पु.९; जर्नल ए.सो. बंगाल. पु.५ अं.६.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .