प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
      
गुलाम घराणें (१२०६-१२८८)- तेराव्या शतकाच्या सुरवातीपासूनच बाबरनें हिंदुस्थानावर स्वारी केली. तोपर्यंतच्या काळामध्ये दिल्लीच्या तक्तावर एकंदर चौतीस मुसुलमानी राजे बसले. त्यापैकी मदंमद घोरीचा बजीर ऐबक हा पहिला होय. हे चौतीस राजे पांच निरनिराळ्या घराण्यांपैकी होते. त्यांपैकी गुलाम घराण्यानें दिल्ली येथें राज्य केले. इ.स. १२०६ पासून १२८८ पर्यंत या घराण्यांत एकंदर दहा सुलतान होऊन गेले. त्यापैकी कुतुबद्दीन ऐबक, अल्तमश व बल्बन हे विशेष प्रसिध्द आहेत.

ऐबक.- कुतुबद्दिन हा गुलाम घराण्याचा संस्थापक होय. याचें चरित्र ज्ञानकोशाच्या अकराव्या भागांत (पृ.५४७) आलें आहे तेथे तें पहावें. त्याच्या हाताचें बोट तुटलेले असल्यामुळें त्याला ऐबक म्हणजे हातानें अधू असें नाव पडलें. कुतुबद्दीन न्यायी असला तरी हिंदुवर त्याची वक्रदृष्टीच होती. हिंदूची देवळें पाडून तेथील दगडांनी त्यानें मशीदी बांधिल्या होत्या.

अल्तमश.- ऐबकानंतर पावल्यावर त्याचा आराम नांवाचा पुत्र गादीवर बसला. परंतु राज्यकारभार करण्यास तो नालायक असल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता व गोंधळ उडून गेला. कुवाचा नांवाच्या सरदारानें सिंधू व मुलतान आणि वखत्यार खिलजीनें बंगाल व बहार हे प्रांत बळकाविले व एल्डोज सरदाराचा डोळा लाहोरावर होता. अशा स्थितीत कुतुबद्दीनचा जावई अल्तमश यांने दरबारी मंडळीच्या साहाय्यानें आरामाचा पराभव करून तख्त बळकाविले. अल्तमश हाहि गुलाम होता. परंतु त्याच्या धन्यानें त्यास उत्तम शिक्षण देऊन कुतुबद्दीनला विकलें होते. हळूहळू तो कुतू-बुद्दीनला इतका प्रिय झाला होता की, त्यानें यास आपली मुलगी दिली होती. अल्तमशनें सिंधवर स्वारी करून कुवावचा पराभव करून त्याचा मुलुख पादांक्रात केला. इ.स.१२२६ त त्यानें माळवा प्रातांवर स्वारी करून १२३१ त ग्वालेरचा किल्ला व उज्जनी घेऊन तेथील देवालयांचा नाश करून बहुतेक उत्तरहिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणिलें. नंतर त्यानें बगदादच्या खलीफाकडून स्वतःसाठी बादशाही वस्त्रें मिळवली. पुढे तो १२३६ त मरण पावला. अल्तमश हा मूळ थोर घराण्यांतील होता; तो हुशार, देखणा व बुध्दिमान असल्यामुळें द्वेषबुद्धीनें त्याच्या भावांनी त्यास गुलाम म्हणून विकलें होते अल्तमशनेंच प्रथमतः अरबी नाणी हिंदुस्थांनात सुरू केली. व टंका (रूपयाच्या तोडीचे एक नाणें) हें चांदीचें नाणें पाडिलें. या नाण्याचें वजन १७५ ग्रेन होतें.

रझिया- अल्तमशचे पुत्र दुर्बल व व्यसनी असल्यामुळे त्याच्यानंतर दहावर्षे राज्यांत सर्वत्र दंगेधोपे चालू होते. अल्तमशचा वडील पुत्र रूक्न उद्दीन यानें तख्त बळकाविलें, परंतु तो अत्यंत व्यसनी असल्यामुळें दरबारचे लोक त्याचा कंटाळा करू लागले. त्याची बहीण रझिया हिला राज्यकारभार देण्याचें ठरवून रूक्न उद्दीन यास त्यांनी कैदेंत टाकिले. रझिया इनें सुलतान रझिया-तुद्दीन (धर्मभक्त) असा स्वतःस किताब धारण केला. ती पराक्रमी असून आपल्या बापाची लाडकी होती. बापाच्या गैरहजीरीत ती सर्व कारभार पाहत असे. राज्यकारभार करण्यास लागणारें बहुतेक सर्व गुण तिच्या अंगी होते. तिलाच गादी मिळावी अशी अल्मतशचीहि इच्छा होती. प्रत्येक काम ती स्वतः पाही. पूर्वीच्या वाईट चाली बंद करून तिनें कायद्यांची दुरूस्ती केली. परंतु स्त्रीने राज्य करावें ही कल्पनाच त्यावेळी पसंत नसल्यामुळें लोकांचें समाधान झालें नाही. निझामउल्मुल्क जुनैदी या वजीरानें तिचा अधिकार मान्य केला नाही. मलिक जानी, कोची, कबीरखान वगैरे सरदारांच्या मदतीनें त्याने रझियाच्या विरूध्द बंड केले. परंतु तें रझियानें मोडून टाकिलें. अमीर जमलुद्दीन याकूत नांवाच्या हबशी गुलामावर तिचें प्रेम बसून त्याला तिनें आपला मुख्य कारभारी नेमिले होतें. परंतु या कृत्यानें व ती नेहमी पुरुषवेष धारण करी यामुळें तुर्क सरदारांची मनें तिच्या विरुद्ध कलुषित झाली. त्यामुळें लाहोरच्या सुभेदारानें बंड केलें. परंतु तिनें तें तत्काळ मोडलें. इतक्यांत पुन्हा (१२४०) तबरहिंदचा सुभेदार मलिक अल्तुनिया यानेंहि बंड केलें व त्याला अनेक सरदारांनी मदत केली. हें बंड मोडण्यासाठी ती स्वतः गेली असतां तुर्क सरदारांनी तिच्यावर हल्ला करून अमीर याकूत या हवशाला ठार केलें व रझियाला पकडून कैदंत टाकिलें. कांही दिवसांनी या आल्तुनियाशीचं तिनें लग्न लाविलें. तेव्हा या दोघांविरूध्द इतर सरदाराशी लढाई करून त्यांना ठार मारिलें. राज्यकारभार करण्याचें चातुर्य तिच्या अंगी होतें, परंतु स्त्रीनें राज्य करावें ही कल्पनाच तुर्क लोकांस आवडली नाही. आजपर्यंत फक्त तीन स्त्रियांनी मुसुलमानी अमदानीत राज्य केले. एक ही रझिया, दुसरी ईजिप्तची राणी  शजारूद्दर व तिसरी इराणची राणी आबिश. रझियाचा भाऊ मोइझ्र-उद्दीन बहराम हा तिजविरूध्द लढत होता. पुढें त्यासच राज्यपद मिळालें.

मोइझ- उद्दीन बहाराम (१२३९-४१)- बहराम राज्यकारभार करण्यास अगदी नालायक होता. कित्येक लोकांस त्यानें कपटानें ठार केल्यामुळें त्याजविरूध्द दरबरांत कट झाले. १२४१ त मोंगलानी लाहोरावर स्वारी केली असतां बहरामनें यखत्यार-उद्दीन नांवाच्या दिवाणास त्यांच्यावर पाठविलें. मोगलाचें पारिपत्य करून दिल्लीस परत आल्यावर यखत्यारउद्दीन यानें बहराम यास पकडून ठार मारिलें. बहराम हा क्रूर व हलकट असून त्याच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत जिकडे तिकडे खून, मारामा-या वगैरे गोष्टी चालू होता.

अल्ला-उद्दीन-मसा-ऊद(१२४२-४६).- बहरामनंतर त्याचा पुतणा मसा-ऊद हा गादीवर आला. याच्या वेळीहि दंगेधोपे चालूच होतें. तो क्रूर व चैनी असल्यामुळें राज्यकारभाराकडे त्याचे लक्ष नसे. दरबारच्या लोकांनी त्यास कैद करून त्याचा चुलता नासिरूद्दीन यास राज्यपद दिलें. मसा-ऊद कैदेंतच मरण पावला. याच्यावेळी मोंगलानी हिंदुस्थानावर दोन स्वा-या केल्या, परंतु दोन्ही वेळा त्यांस माघार घ्यावी लागली.

नासिरूद्दीन महंमूद (१२४६-१२६६)- नासिरूद्दीन महंमूद हा अल्मतशचा तिसरा पुत्र होय. याच्या कारकीर्दीत सर्वत्र शांतता नांदत होती. याच्या सावत्र आईनें यास लहानपणी बंदीत टाकिलें होतें. पुढे मसाऊदेंने याची मुक्तता करून ह्यास बैराकची सुभेदारी दिली. तें काम त्यानें उत्तम रीतीनें केले. बंदीत असतां कुराण लिहून तो आपला उदरनिर्वाह करी. तोच धंदा राज्यावर आला असतांहि त्यानें चालविला. त्याची राहणी साधी होती, तो एकपत्नी होता. घरची सर्व कामे त्याच्या बायकोस स्वतः करावी लागत. तो स्वतःस राज्याचा मालक न समजता रक्षक समजे. स्वतःच्या खर्चाचा भार राज्यावर लादणें योग्य नव्हें अशा समजुतीनें स्वतः श्रम करून तो आपला खर्च चालवी. त्यानें राज्यांत चांगला बंदोबस्त ठेविला; मोंगलाचा बंदोबस्त केला, शेजारची लहान लहान स्वतंत्र राज्यें जिंकून आपल्या राज्यास जोडिली. उलुघखान उर्फ ग्यासुद्दीन बल्वन यास त्यानें आपला वजीर नेमलें. नासिरूद्दीन इ.स.१२६६ त मरण पावला. तो स्वभावानें शांत होता. परंतु राज्यकारभाराच्या कामी इतका साधा मनुष्य नालायक असतो.

वल्बन (१२६६-१२८६)- बल्बन हा एका तुर्क सरदाराचा मुलगा होता. परंतु लहानपणीच व मोंगलानी त्यास पळवून हिंदुस्थानांत गुलाम म्हणून विकलें. अल्तमशनें त्यास विकत घेतलें. प्रथम नाईक, मग शिकारी, नंतर सेनापति व मुत्सद्दी व सरते शेवटी सुलतान अशा रीतीनें केवल स्वपराक्रमानें व चातुर्यानें तो चढत गेला. रूक्नुद्दीनच्या कारकीर्दीत त्याला कारागृहवासहि भोगावा लागला होता. बहरमाच्या वेळी याला एक लहानशी जाहागीर मिळाली, बहरामच्या विरूध्द झालेल्या बंडांत याचें अंग असल्यामुळें ते बंड यशस्वी झाल्यावर हंसीचा राज्यकारभार याच्याकडे आला. १२४३त याच्याच पराक्रमानें मोंगलाचा पराभव झाला. नासिरूद्दीन गादीवर बसल्यावर खरी सत्ता बल्वनकडेच आली. नासिरूद्दीन निपुत्रीक असल्यामुळें त्याच्या पश्चात् बल्बन यासच राज्य मिळालें. राजा झाल्यावर त्यानें बराच कडकपणा गाजविला. हिंदू लोकांवर त्याची वक्रदृष्टि होती. त्यांना मोठमोठ्या जागा त्यानें दिल्या नाहीत. मुसुलमानी विद्येस त्यानें चांगले उत्तेजन दिले. मद्यपान न करण्याबद्दल त्यानें नियम केले व ती मोडणारास कडक शिक्षा दिल्या. तो डामडौलाचा भोक्ता होता. अल्तमशनंतर झालेले सुलतान कर्तृत्वशून्य निघाल्यामुळें हिंदू लोकांनी चळवळ सुरू केली होती. परंतु ती बल्बननें दडपून टाकिली. हा हिंदूंचा फार द्देष्टा होता. नासिरूद्दीनच्या वेळी प्रत्येक वर्षी तो हिंदू लोकांवर स्वा-या करी. दरबारी मंडळीच्या चुगल्यावरून एकदां नासिरूद्दीननें त्याला हद्दपार केलें होते (१२५३). बल्बन हद्दपार झाल्यावर त्याची जागा रिहन (एक वाट्या हिंदु) यास मिळाली होती, परंतु त्याचा जुलूम लोकांस सहन न होऊन सर्वत्र असंतोष पसरला. तेव्हां दरबार्‍यांनी पुन्हा बल्बन यास परत आणवून त्यास पूर्वीचा अधिकार दिला (१२५४). यापुढें त्यानें वीस वर्षे पर्यंत मोंगल लोकाचें हल्ले परतविणें व हिंदू लोकांची बंडें मोडणें या दोन महत्वाच्या गोष्टी केल्या. या दोन गोष्टी करतांना त्यानें पुष्कळ क्रूरपणाची कृत्यें केली. यावेळी त्यानें अग्नि व तलवार यांचा प्रलय सुरू केला होता.

बंगाल्यांत तुघ्रलखानाचें बंड.- बंगाल शिरजोर झाल्यामुळें तिकडे बल्बननें तुघ्रखानास त्याच्या कारभारावर पाठविलें होतें. त्यानें तेथील बंदोबस्त उत्तम केला. परंतु त्यानें स्वतंत्र होण्याचा उद्योग चालविल्यामुळें बल्बननें त्याच्यावर फौज पाठविली; तुघ्रलनें त्या फौजेचा पराभव केल्यामुळें बल्बन स्वत: बंगाल्यात गेला व त्यानें तुघ्रलखानाचा पराभव करून त्याच्या लोकांची कत्तल केली. या स्वारीस एकंदर तीन वर्षे लागलीं (१२८०-८३).

एकंदरीत बल्बनचें आयुष्य धामधुमीत व युध्दप्रसंगांत गेले. हा अत्यंत क्रूर व मनुष्यसंहारक होता. दिल्लीच्या आसपास नेहमी बंडें मोडण्यासाठी त्यानें एकंदर एक लाख लोक ठार मारिले. त्यामुळे जिकडे तिकडे रक्ताच्या नद्या वाहूं लागल्या. प्रत्येक गांवाजवळ प्रेताचें प्रचंड ढीग जमा झाले. आणि त्याच्या दुर्गंधीनें सर्व प्रदेश व्यापून गेला (सरदेसाई). बंगालच्या स्वारीहून परत आल्यावर, मुलतानावर मोंगलांनी हल्ला केला होता, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यानें आपला मुलगा महंमूद यास रवाना केलें. महंमूदनें मोंगलांचा मोड करून सर्व मुलूख परत घेतला. परंतु देपाळपूर येथे झालेल्या निकराच्या लढाईत महंमूद मारला गेला. (१२८५). या बातमीनें बल्बन आजारी पडून लवकरच मरण पावला (१२८६). बल्बन भपकेबाज दरबार भरवून व थाट करून लोकांवर छाप बसवी. लहानपणी त्यास मद्यप्राशनाचा नाद होता. पण राज्यकारभार हाती येताच त्यानें आपले सर्व छंद टाकून दिलें. त्यानें शेतीची सुधारणा केली. अनेक देशाचे विद्वान गृहस्थ त्याच्या दरबारी होते.

कैकुबाद(१२८६-१२८८)- आपला नातु कैखुखु (महंमदचा पुत्र) यानें आपल्या पश्चात गादीवर बसावें असें बल्बननें ठरविलें होतें. परंतु ते न जुमानता त्याचा दुसरा मुलगा बोगराखान (बंगालचा सुभेदार) याच्या कैकुबाद नांवाच्या मुलासच दरबारी लोकांनी गादीवर बसविलें. तो प्रथम सौम्य होता. परंतु हातांत अधिकार आल्याबरोबर तो विलासी बनून आपला वेळ चैनीत घालंवू लागला. त्यानें निजामउद्दीन नांवाच्या सरदारास वजीर नेमून सर्व सत्ता त्याच्या हाती दिली. स्वतःच राज्य बळकावावें अशी निजामाची इच्छा होती. कैखुखुनें राज्य घेण्याची खटपट चालविली असतां त्याचा पराभव करून निजामानें त्यास ठार मारिलें व सर्व जुन्या कामगांरास काढून टाकिलें, बोगराखाननें स्वतः आपल्या मुलास (कैगुबादास) उपदेशपर पत्रें पाठवून निजामनें राज्याभार काय काय संकटें आणली आहेत; त्यांची जाणीव करून दिली. शेवटी बोगराखान स्वतः दिल्लीस आल्यामुळें निजामाचें कपट बाहेर आलें; यामुळें निजामानें आत्महत्या केली. पुढें कैकुबाद व्यसनाधीन झाल्यामुळें आजारी पडला. त्यावेळी खिलजी व मोंगल असे दोन पक्ष दरबारांत प्रबळ झालें. या दोन पक्षांचे तंटे विकोपास जाऊन जलालुद्दीन खिलजीनें कैकुबादचा व त्याच्या मुलाचा खून करून दिल्लीचें राज्य स्वतः बळकाविले अशा प्रकारें गुलामवंशाचा शेवट झाला (इ.सन १२८८.) आज गुलाम या शब्दास वाईट स्वरूप आलें आहे; परंतु त्यावेळी तें तसे नव्हतें. लढाईत पकडून आणलेल्या लोकांचा भरणा या गुलामांत होत असे. मुसुलामानी धर्म व राज्य यांच्या प्रसारास या गुलामांचा विशेष उपयोग झाला. तुर्क व अफगांणच्या वेळी गुलामांची ही संस्था नांवलौकिक मिळविण्याची एक शाळाच बनली होती. कित्येक सुलतानांचें प्रेम या गुलामांवर विशेष असे. महंमद घोरी व कुतुबद्दीन हे स्वत:च्या मुलांपेक्षाहि आपल्या गुलांमावर अधिक प्रेम करीत. त्यावेळी गुलामगिरी म्हणजे पराक्रमाची शाळा असे. येथून निभावून बाहेर येण्यास अंगी योग्यताच लागे. महंमद घोरीचें एल्डोझ, कुबाचा, बखत्यार खिलजी व कुत्बुद्दीन हे चार मुख्य सरदार मूळचें गुलामच होते. गुलामगिरीचा जो निंद्य अर्थ पाश्चात्य लोकांत आहे तो तत्कालीन पूर्वेकडच्या मुसुलमानी अमदानीत नव्हता. (सरदेसाई). [लेनपूल कृत मिडिव्हल इंडिया; विल्यम जॅक्सन-महॉमेडन पीरियड पु.५; सरदेसाई-मुसुलमानी रियासत.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .