प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
       
गुरूत्वाकर्षण- कोणतेहि जड पदार्थ एकमेकांस एकमेकांकडे ओढतात. या आकर्षणास गुरूत्वाकर्षण असें म्हणतात. दोन पदार्थांमधील अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रम प्रमाणांत हें आकर्षण असतें आणि तसेंच हे आकर्षण त्या दोन पदार्थांमधील जडांशाच्या गुणाकाराच्या प्रमाणांत असतें. हा नियम प्रथमतः न्यूटननें शोधून काढला आहे. तरी पदार्थांमध्ये आकर्षण घडत असावें अशा प्रकारचा तर्क न्यूटनच्या पूर्वी कित्येकांनी केला होता. जॉन केप्लरनें आपले तीन नियम प्रसिध्द केले, हे नियम बसविले त्यावेळेस सूर्याकडून कसलें तरी आकर्षण घडून येत असावें व त्यायोगानें ग्रह सूर्यासभोंवार प्रदक्षिणा करीत असावेत अशी त्याची समजूत होती. परंतु न्यूटनप्रमाणें पायाशुध्द अशा रीतीनें या नियमाचें प्रतिपादन कोणीच केलें नाही. न्यूटनच्या समकालीन असलेले सी. हायगॅझ आणि आर.हूक यांनी असें दाखवून दिलें की, केप्लरच्या तिस-या नियमाचें वर्तन अंतराच्या वर्गाच्या व्युत्कमप्रमाणास अनुसरून आहे; परंतु हा व्युत्क्रम्रप्रमाणाचा नियम सार्वत्रिक लागू होण्यास केप्लरच्या तिन्ही नियमांचे वर्तन व्युत्क्रमप्रमाणास अनुसरून झालें पाहिजे; परंतु केप्लरच्या सा-या नियमांस व्युत्क्रमाच्या नियमाची व्युत्पत्ति वसवितां न आल्यामुळें हा प्रयत्न त्यावेळी तितकाच राहिला. वरील शास्त्रज्ञ-द्वयांनी असेंहि दाखविण्याचा प्रयत्न केला की, ज्या नियमाच्या योगानें सूर्याचें ग्रहांवर आकर्षण घडतें त्याच नियमाच्या योगानें पृथ्वीचें चंद्रावर आकर्षण घडतें. परंतु ह्या प्रयत्नास त्यांना म्हणावे तितकें यश प्राप्त झालें नाही; या कामी न्यूटननें प्रथमतः यश संपादन केले.

या सृष्टीतील सर्व नियमांत गुरूत्वाकर्षणाचा नियम अगदी अपवादरहित असा आहे. दोन पदार्थांतील आकर्षण त्याच्या जडांशाच्या गुणाकाराच्या प्रमाणांत आणि त्यांच्या अंतराच्या व्युत्क्रमप्रमाणांत असतें, असा जो गुरूत्वाकर्षणाचा नियम आहे त्याला अद्याप पावेतें एकहि अपवाद सांपडला नाही. दुस-या सर्व प्रकारच्या आकर्षणांत परिस्थितीप्रमाणें फेर पडतो. उदाहरणार्थ, दोन पदार्थ विद्युत्संचारित झाले असतां त्यांचें आकर्षण घडतें, परंतु ज्या दोन पदार्थांत आकर्षण घडलें त्यांस सापेक्ष किंवा निरपेक्ष गति असल्यास त्यांच्यामधील आकर्षणांत फरक पडतो. जड द्रव्याची स्थिति बदलली किंवा दुस-या कोणत्याहि प्रकारच्या परिस्थितीत जड द्रव्यास ठेऊन दिलें तरी गुरूत्वाकर्षणाच्या नियमांत रतीभरही फरक पडत नाही. सूर्यमालेंतील ग्रहांपैकी कित्येकांस अत्यंत वेगानें गति आहे. परंतु त्यांच्या ह्या वेगामुळें गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत यत्किंचितही फरक पडलेला आजपर्यंत दिसून आला नाही अशी आतापर्यंत समजूत होती. परंतु सर्व नियमांप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा नियमहि सापेक्ष आहे असें आइन्स्टीन यानें सिध्द केलें आहे व याचा प्रत्यय ग्रहांच्या गतीवरून विशेषतः सूर्यग्रहणप्रसंगी घेतां येतो. आणखी एक असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, गुरूत्वाकर्षण एका निमिषमात्रांत सर्वत्र ताबा बसवितें किंवा प्रकाशाप्रमाणें त्याला जाण्यास वेळ लागतो; परंतु आतापर्यंत ग्रहादिकांच्या विषयी जें अवलोकन करण्यांत आले आहे त्यावरून असें दिसून आलें आहे की, गुरूत्वाकर्षणाचा निमिषमात्रांत सर्वत्र प्रसार होतो. एकमेकांस आकर्षण करणा-या दोन जड द्रव्यांच्या वस्तूंच्या दरम्यान तिसरी जडवस्तू किंवा पडदा आल्यास त्यांमधील आकर्षणास बाध येत नाही किंवा त्यांमधील आकर्षणाच्या नियमबध्द प्रमाणांत फरक पडत नाही. उदाहरणार्थ पुण्यांत एक धातूचा गोळा आहे. आणि पाताळ लोकांतील (अमेरिकेंतील) पेरू देशांत दुसरा एक गोळा आहे तर दरम्यान पृथ्वी असतानाहि त्या दोन गोळ्यांचें परस्परावर गुरुत्वाकर्षणाच्या नियमास अनुसरून आकर्षण घडतें व दरम्यान पृथ्वी नसताना ज्या प्रकारचे आकर्षण घडलें असतें त्याच प्रकारचें आकर्षण दरम्यान पृथ्वी असतांनहि घडतें.

यावरून हे उघड होतें की, आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व सृष्टिनियमांत गुरूत्वाकर्षणाचा नियम जास्त सर्वव्यापी आणि मूलभूत असा आहे. अर्थात् आइनस्टीन यांनें यास अपवाद दाखविला आहे. दोन पदार्थांमधील आकर्षण अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रमप्रमाणांत असते हा जो गुरूत्वाकर्षणाचा नियम आहे तो प्रत्यक्ष प्रयोगानें अद्याप पावेतों सिध्द झाला नाही. खगोलशास्त्रवेत्यांच्या या द्दष्टीनें झालेल्या अवलोकनावरून कांहीच अनुमान बांधता येत नाही. असल्याप्रकारचें अनुमान बांधता येण्यास कित्येक शतकें किंवा सहस्त्र वर्षेपर्यंत खस्थ ज्योतीचें वेध घेऊन अनुमान बांधलें पाहिजे. असें जरी आहे तरी बुधाची गति चमत्कारिक आहे व या चमत्कारिक गतीचा उलगडा होण्यास पुढीलप्रमाणें गुरूत्वाकर्षणाच्या नियमांत किंचित् दुरूस्ति करावी लागते. त्याकरिता असें समजावे लागतें की, ग्रह जो जों सूर्याच्या सन्निध असतो तो तो ग्रह आणि सूर्य यांच्या दरम्यानचें आकर्षण वर्गाच्या व्युत्क्रमप्रमाणांत न होता त्यापेक्षा कमी कमी प्रमाणांत होतें. बुधाच्या बाबतीत २ (द्विघात म्हणजे वर्ग) हें प्रमाण न रहाता २.००००००१६१२ घात या प्रमाणांत होतें.

परंतु हें लक्षात ठेवलें पाहिजे की, नुसत्या बुधाच्या उदाहरणावरून असे म्हणता येत नाही की, पदार्थाचें अंतर कमी झालें असतां आकर्षण कमी होते; कारण याप्रमाणें दुस-या ग्रहांच्या बाबतीत हेंच घडून आलें पाहिजे. पृथ्वी आणि चंद्र यांचे वेध घेऊन शास्त्रज्ञांनी हें सिध्द केले आहे की, चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यानचें अंतर बुध आणि सूर्य यांच्यामधील अंतरापेक्षा पुष्कळच कमी झालें असतांहि त्याच्या दरम्यानचें आकर्षण सूर्य आणि बुध यांच्या दरम्यानच्या आकर्षणापेक्षा कमी झालेले दिसत नाही. यावरून शास्त्रज्ञानी असे ठरविलें आहे की बुधाच्या बाबतींत दुस-या कांही कारणानें आकर्षणाच्या विषयी फरक पडलेला दिसतो आणि दोहोंच्या अंतराच्या वर्गाचा नियम अबाधित असावा. पृथ्वीचें घनत्व आणि गुरूत्वाकर्षणाचें स्थिर (कान्स्टंट) परिणाम पुढे दिल्याप्रमाणें-

गुरूत्वाकर्षणाच्या नियमांत असें सांगितलें आहे की, ज, आणि ज हे दोन जडपदार्थ एकमोंपासून ड अंतरावर असेल तर त्यांच्यामधील आकर्षण होते तें-

आकर्षण  =  ग x ज x ज /ड

या प्रमाणांत असतें, वरील सूत्रात्मक समीकरणांत ''ज'' आणि ''ज'' हे त्या दोन वस्तूंचे जडांश आहेत. ''ग'' हें गुरूत्वाकर्षणाचें स्थिरपरिमाण आहे, व ''ड'' हें अंतर आहे. ''ज'' कडे ''ज'' ह्याची गति (वर्धमानता = ऑक्सिलरेशन)- ज x ग /ड  ह्या प्रमाणांत असतें. निरनिराळ्या ग्रहांचे सूर्याकडे जें आकर्षण होतें त्या आकर्षणासंबंधानें ज्यौतिर्विदांनी जे वेध घेतले आहेत, त्यावरून वर्धमान परिमाणाचा नियम सिद्ध होतो; या योगाने गुरूत्वाकर्षणाचा नियमहि सिध्द होतो. सूर्य आणि निरनिराळे ग्रह यांच्या दरम्यान जें आकर्षण होतें किंवा उपग्रह आणि ग्रह यांच्या दरम्यान जें आकर्षण होतें त्याच्या योगानें जें आकर्षणाचें प्रमाण येतें त्या योगानें पृथ्वीच्या जडांशाच्या किती पटीनें सूर्यमालेंतील ग्रहांचे आणि उपग्रहांचे जडांश आहेत हे काढता येतें; परंतु पृथ्वीच्या ठिकाणी किती जडांश आहे हे व्यावहारिक प्रमाणांत निघूं शकत नाही, त्याकरिता पुढील प्रकारचे प्रयोग करण्यांत आले आहेत; या प्रयोगांचे दोन प्रकार आहेत; पहिल्या प्रकारच्या प्रयोगांत क्षितिजाशी लंबरेषेत असणा-या ओळंब्याच्या (प्लंबलाइन) रेषेशी शेजारच्या पर्वताच्या किंवा दुस-या एखाद्या वजनदार पदार्थाचा किती परिणाम होतो हें पाहतात; नंतर त्या पर्वताचें किंवा त्या पदार्थाचें वजन काढून त्या योगानें पृथ्वीचें वजन काढतात. पृथ्वीचे वजन याप्रमाणें काढल्यावर गणितानें पृथ्वीच्या आकारमानावरून तिचें सरासरी घनत्व काढता येतें. दुस-या प्रकारांत दोन जडवस्तूंवर परस्पराचें किती आकर्षण हें ते हें काढून त्या योगानें शास्त्रीय परिमाणांत पृथ्वीचे कोणत्या प्रमाणांत त्या पदार्थावर आकर्षण होते हें काढतात. त्या योगानें पृथ्वीचें वजन निघतें व या वजनाच्या योगानें पृथ्वीचें घनत्व काढता येते.

पहिल्या प्रकारचा प्रयोग प्रथमतः बोगर यानें केला. हा प्रयोग प्रथमतः म्हणण्यासारखा यशस्वी झाला नाही. बोगर यानें हा प्रयोग इ.स. १७४० साली केला. या शास्त्रज्ञाच्या मागून मास्केलीन (१७७४), फ्रान्सेस्को कार्लिनी (१८२१), सर. जी. बी. एअरी (१८५६). इ. इ. शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला आहे. या तर्‍हेच्या प्रयोगाची सामान्य दिशा संक्षेपतः सांगून दुस-या प्रकारच्या प्रयोगाकडे वळूं. या पूर्वपश्चिम असलेल्या एखाद्या पर्वताच्या रांगेच्या दक्षिणोत्तर बाजूला एक एक लंबक टांगून ठेवतात. हे लंबक एकाच याम्योत्तर वर्तुलांत असले पहिजेत. कोणता तरी एक ठळक तारा घेऊन तो याम्योत्तर वृत्तांतून जात असतांना ओळंबाच्या लंबरेषेशी कोणता कोन करतो हें दोन्ही ठिकाणी वेध घेऊन ठरवून त्यानें डोंगरानें किती आकर्षण घडवून आणलें हें काढता येतें. नंतर त्या डोंगराची अतिशय काळजीपूर्वक पहाणी करून त्या डोंगराचें वजन काढतात व या वजनाच्या योगानें पृथ्वीचें वजन काय आहें हे काढता येते.

दुसरी पध्दत अशी की एक दांडी समतोल राहील अशा रीतीने तिच्या मध्यबिंदूपासून टांगून ठेवतात. टांगण्याकरितां उत्तम स्थितिस्थापक तार घेतात. नंतर तिच्या दोन्ही टोंकास असलेल्या दोन गोलकांच्या समीप दोन शिशाचे गोळे ठेवतात. या गोळ्यांच्या योगाने दांडीच्या टोकावरील गोलकांवर आकर्षण घडून दांडी किंचित हलते. याप्रमाणें हलण्याचा कोन अतिशय सूक्ष्म असतो. हा कोन सुलभ रीतीनें मापता यावा म्हणून या दांडीच्या मध्यभागी एक आरसा बसविला असतो. या आरशावर प्रकाशबिंदू पाडून त्यायोगानें जो कवडासा उत्पन्न होतो त्या कवडाशाचें अतिसूक्ष्म कोनाच्या योगानें सुद्धा जास्त चलन होतें. याप्रमाणें कवडाशाच्या योगानें हा अति सूक्ष्म कोन मोजतात. नंतर ते शिशाचे दोन गोळे दांडीच्या टोकांपासून जरा दूर अंतरावर ठेवतात. या स्थित्यंतरामुळे दांडीच्या टोंकाचें गोळे विरूध्द दिशेनें आकर्षिले जाऊन कवडासा विरूध्द दिशेने हलतो. याप्रमाणें टोंकाच्या गोळ्यांवर शिशाच्या गोळ्यांचें होणारें आकर्षण मोजून काढतात. या आकर्षणाच्या योगानें पृथ्वीचें घनत्व काढतात.

तिस-या पध्दतींत वरील दोन पध्दतीशिवाय आणखी एक पध्दत उपयोगांत आणली आहे. या पध्दतीला तुलापद्वति असें नाव आहे. हीत एक तराजू केलेली असतें. या तराजूस जी नेहमीची पारडी असतात त्या पारड्यांच्या खालीच दुसरी दोन पारडी जोडलेली असतात. वरची पारडी आणि तराजूची दांडी यांच्या दरम्यान अगदी थोडें अंतर ठेवलेलें असतें व वरची पारडी आणि खालची पारडी यांच्या दरम्यान शक्य तितकें जास्त अंतर ठेवलेले असतें. अगदी सारख्या आकाराचे भरीव शिशाचे गोळे वरील पारड्यांत ठेवून तराजू समतोल करतात. नंतर एका पारड्यांतील वजन खालच्या पारड्यांत ठेवतात व दुस-या पारड्यांतील वजन हलवीत नाही. असें केले असता पृथ्वी आणि हे दोन गोळे यांच्या दरम्यानचें पूर्वीचे समान अंतर नाहीसें होऊन त्याच्या ऐवजी तें अंतर कमी जास्त होतें. त्यामुळें पृथ्वीचें त्या गोळ्यांवर कमीजास्त प्रमाणांत आकर्षण घडून एक पारडें जड होतें. हें किती जड होतें तें काढतात. दोन पारड्यांतील अंतर मोजून त्या योगानें गुरूत्वाकर्षणाचें स्थिरपरिमाण काढतां येतें. याप्रकारचे प्रयोग प्रथमतः व्हान जेली यांने केले. परंतु जेलीच्या प्रयोगांनी पृथ्वीचे घनत्व काढतां आले नाही. जेली नंतर रिचार्झ, क्रिगार-मॅझेल, पायंटिग इ.शास्त्रज्ञांनी तुलापध्दतीने प्रयोग करून पाहिले आहेत. या पध्दतीनें पृथ्वीचें घनत्व ५.४९३ इतकें आले आहे. सारांश वरील तिन्ही पध्दतीनें पृथ्वीचें जें घनत्व येतें त्याच्या दरम्यान थोडा थोडा फरक येतो. असा फरक कोणकोणत्या कारणांनी येतो याचें शास्त्रज्ञांनी सांगोपांग विवेचन केले आहे. खाली दिलेले आकडे सध्याच्या शास्त्रीय मंडळांत प्रचारांत आहेत. तें असें-

       पृथ्वीचें सरासरीचें घनत्व    -५,५२७
गुरूत्वाकर्षणाचें स्थिरपरिमाण =  ६.६५८
                                              ____
                                               १०

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .