प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
      
गुरू- या विषयावर विवेचन करतांना शिल्पी वर्गाचें शिक्षण देणा-या वर्गाचे विवेचन वगळलें आहे, आणि ब्राह्मण व क्षत्रिय या वर्गाचें शिक्षण देणारा वर्गच अनुलक्षिला आहे. या शिक्षक वर्गाचें ऐतिहासिक विवेचन करतांना मंत्रकालाकडे प्रथम लक्ष जातें. मंत्रकालांत गुरू ही कल्पना फारशी विकसित झालेली दिसत नाही, कां की, मंत्र स्वयंस्फूर्तीने तयार होत किंवा अनुकरणानें होत. परंतु त्याच्या वाढीसाठी पध्दतशीर शिक्षण देणा-या वर्गाचे आस्तित्व शक्य दिसत नाही. बृहतयज्ञसंस्थेचा म्हणजे संहितीकरणाचा काल आला तेव्हा मोठ्या वाड्.मयसंग्रहाचें अध्ययन, पठण, अभ्यास व विनियोग यांचे शिक्षण देणा-या वर्गाची अवश्यकता उत्पन्न झाली. कारण यज्ञांची घटना अशी होऊं लागली की, तींत पुष्कळ दिवस परिश्रमपूर्वक शिकविणारा वर्ग असल्याशिवाय त्या विद्येंत प्रावीण्य शक्य नव्हतें. यामुळे विशिष्ट आचार्याच्या अस्तित्वास अवश्यक अशी परिस्थिति उत्पन्न झाली. यावेळच्या संहितीकरणकालीन अनेक आचार्यांची नांवे आज उपलब्ध आहेत आणि त्यापैकी ज्यांच्या नावांवर विशिष्ट याग किंवा कोणते तरी प्रचलित कर्म रूढ झालें त्यांची नावें वेदविद्या विभागांत २१० व्या पृष्टांत दिली आहेत. त्यांत अंगिरस, गर्ग, अत्रि, कुसुरूबिंदु, बृहस्पति, नाचिकेता, वशिष्ट इत्यादी नांवे प्रामुख्यानें सांगता येतील. या आचार्यवर्गामध्ये होत्याच्या किंवा अध्वर्यूच्या किंवा सामकाच्या कर्माच्या शिक्षणाचा उपक्रम असावा. अथर्व्याची गुरूपरंपरा इतरांच्या गुरूपरंपरेइतकी बलवान दिसत नाही. ज्यावेळी यज्ञसंस्था जोरानें चालू होती त्यावेळेतच वादाचे अनेक प्रसंग येत व शिक्षणहि अधिक कारणमीमांसापूर्वक देणे अवश्य होई. त्यामुळै त्रैविद्यांच्या आचार्यपरंपेंतूनच शिक्षादि सहा वेदांगे निर्माण झाली आणि त्या वर्गातूनच पुढें भारतीय शास्त्रीय शिक्षण देणारांचा वर्ग निघाला  व तो आजपर्यंत चालत आला आहे आणि कदाचित् आजचाच वर्ग हा परंपरेचा शेवट म्हणता येईल.

श्रौतकर्माविषयी अनास्था किंवा जुगुप्सा ज्या वर्गात उत्पन्न झाली तो वर्ग म्हटला म्हणजे आरण्यकांचा होय. या वर्गमध्ये अध्यात्म विषयाची जोपसना होऊं लागली आणि अध्यात्मविषय परंपरेने सांगणारे शिक्षक उत्पन्न होऊं लागलें. या शिक्षकांमध्ये जनक, याज्ञवल्क्य, यांची नावें मुख्यत्वें देता येतील. अध्यात्म ज्ञानासंबंधीच्या अशा प्रकारच्या गुरुशिष्य परंपरा ब्राह्मणकालांतहि होत्या हें शतपथ ब्राह्मण, जैमि. उ. ब्राह्मण यांतील मुरूशिष्यपरंपरांवरून दिसून येतें. या परंपरांची माहिती बुध्दपूर्व जग (विभाग ३ पृष्ठ ४३७) या भागांत दिली. या वर्गानेच पूर्वमीमांसेखेरीज इतर दर्शनांची जोपासना केली. व त्यामुळे विशिष्ट दर्शनाचें आचार्य उत्पन्न झाले. श्रौताचा आचार्यवर्ग आणि आरण्यकाचा आचार्यवर्ग हे एकमेकांपासून अगदी पृथक् नव्हते. उदाहरणार्थ याज्ञवल्क्य जैमिनी यांची नांवे दोहीकडेहि येतात. आणि त्याचा परिणाम ज्ञानविकासावर झालाच आहे. तो इतका की, मीमांसा हे शास्त्र जरी श्रौत्यांच्या परंपरेतील आहे तरी तें आरण्यकीयांच्या दर्शनपरंपरेंत योजिलें गेलें. आणि जेव्हा श्रौतसंस्था बंद पडल्या तेव्हां वेदांगे व दर्शने मिळून होणारा शास्त्रसमुच्चय हा एका सामान्य वर्गास अभ्यासविषय झाला आणि श्रौती व पाठ म्हणणारे वैदिक एवढ्यांच्याच हाती श्रौतज्ञानाची परंपरा राहिली. या स्थितीत हे दोन्ही अद्याप चालूं आहेत.

आतां पुराणद्दष्ट गुरूपरंपराविषयी विचार करूं. मात्र संस्कृतीपासून निराळी असलेली जी सूतसंस्कृति त्या संस्कृतींतील वाड्.मयाचें मात्रसंस्कृतीचा स्पर्श होऊन जें रूपांतर झाले ते आज आपणास इतिहासपुराणवाड्.मय म्हणून उपलब्ध आहे. या वाड्.मयाकडे लक्ष्य देतां आपणास दोन, तीन प्रकारच्या गुरूपरंपराची कल्पना येते. सूतवर्ग आपला व्यवसाय गुरूपरंपरेने चालवीत असे याविषयी संशय नाही. परंतु दैत्यगुरू व देवगुरू यांची वर्णनें जी येतात त्यावरून तें गुरूत्व कोणत्या प्रकारचें असावें याविषयी कल्पना करतां येत नाही. ते आध्यात्मिक गुरू असतील असें म्हणवत नाही. आणि असल्यास हे अध्यात्मशिक्षण कोणत्याप्रकारें देत असावेत याची कल्पना होत नाही. दैत्यासुरांच्या अध्यात्मिक परंपरेची ओळख आपणांस इतिहासपुराणें करून देत नाहीत. आणि देवांचीहि जवळ जवळ तीच कथा आहे. देवगुरू जो बृहस्पति म्हटला आहे त्याचें नांव जर एखाद्या विचारपरंपरेशी संयुक्त असेल तर तें लोकायताशी म्हणजे नास्तिक्याशी होय. महाभारतामध्ये गुरूगृहाच्या संघटनेविषयी बरेंच विवेचन आहे. म्हणजे अनेक वर्षे विद्यार्थी गुरूकडे अभ्यास करतो, त्याच्या घरची अनेक कामें करतो आणि विद्यार्जन करून गुरूदक्षिणा देऊन निघून जातो हें चित्र आपणांस धर्मसूत्र कालानेंच दिसतें व यावरून हे सूतसंस्कृतीतील गुरूपरंपरेचें चित्र नसून श्रौतोत्तरकालाचें आहे व श्रौतत्तरकालीन ब्राह्मणांकडून इतिहासवाड्.मयांवर जो संस्कार झाला त्याचें हे द्योतक होय. शिवाय महाभारतांत हजारो शिष्य बाळगणा-या कुलपतीचा उल्लेख आहे. म्हणजे महाभारतांत गुरूकुलघटनेविषयी बरेंच विवेचन दिले आहे. पण शिक्षणक्रमाविषयी विवेचन फारसें नाही. पण असें समजण्यास हरकत नाही की, शिक्षणविषयक जी माहिती सूत्रग्रंथ देतात तोच शिक्षणक्रम महाभारताच्या संपादकांस अभिप्रेत असावा.

षड्दर्शनाचें सूत्रग्रंथ तयार झाले आणि त्यानंतर देशांत विशिष्ट मार्गाने मोक्ष मिळविण्यास साधक असे संप्रदाय तयार झाले. कोणी योगमार्गी तर कोणी भक्तिमार्गी. हे संप्रदाय मुसुलमानी स्वा-यानंतर हिंदुसंस्कृतीचा उच्छेद झाल्यामुळें तर फारच बळावले. कारण हिंदु विद्या शिकावयाची तरी कशाला; तिच्या योगानें राजाश्रय मिळत नाही; असा स्थितीत हिंदु विद्या पारमार्थिक मार्गांचीच उपशाखा बनली व सर्व तर्‍हेचे ज्ञान हें मोक्षसाधन मार्ग या नात्यानेंच जिंवत राहूं लागलें. या परिस्थितींत गुरूचें महत्व तर फारच बळावलें. शास्त्रीय ज्ञान देणारा गुरूवर्ग मोक्ष साधन करून देण्याचा बाणा बाळगूं लागला. परंपरेंनें जी बादरायण सूत्रें आली, त्यांवर भाष्यें होऊन निरनिराळे पारमार्थिक संप्रदाय त्यांच्याशी संबध्द होऊं लागले. जे संस्कृत ग्रंथ देशी भाषांत होऊं लागले त्यांतूनहि गुरूचें महत्व सांगणारे क्षेप येऊ लागले. उदाहरणार्थ, ब्रह्मोत्तरखंड घ्या. याचाच अनुवाद श्रीधरानें शिवलीलामृत म्हणून केला आहे. ब्रह्मोत्तरखंडांत गुरूचें प्राबल्य नाही पण शिवलीलामृतांत गुरूमुखाशिवाय गति नाही वगैरे वाक्यें उच्चारली गेली आहेत. मोक्षसाधनास विद्वतेची जरूर लागत नाही. आणि व्यक्तीचें मोक्षसाधन हें ध्येय झालें व विद्वत्ता हें ध्येय राहिलें नाही. त्यामुळें लफंग्या लोकांस गुरूपद मिळविण्याची आकांक्षा उत्पन्न झाली. शिष्य विद्वान व सदाचारी असला तरी त्यानें एखादा गुरू हा केलाच पाहिजे, आणि तो गुरू दुराचारी असला तरी हरकत नाही. असलेंहि वाक्यें उद्रीर्ण झालेली दिसतात. लिंगायतांसारख्या व जैनांसारख्या अपसृष्ट संप्रदायांमध्यें तर गुरूचे स्तोम फारच होते. सांप्रदायिक कालामध्यें गुरूचें वाढलेलें महत्व समाजाच्या शैक्षणिक अधोगतीचे दर्शक आहे. सांप्रदायिक गुरुंपैकी फारच थोड्यांस उच्च विचार किंवा ज्ञान यांच्या इतिहासांत स्थान देतां येईल.

गुरू व आचार्य या उपद्दष्ट्यांशिवाय पुरोहित हाहि एक वर्ग अस्तित्वांत होता व याच्याकडे कुलगुरूत्व असे. रामायणकाली वसिष्ठ हा रामचंद्राचा कुलगुरू होता व धनुर्वेद शिकविणारा गुरू विश्वमित्र होता.

गुरू शब्दाचा वैदिक वाड्.मयात सूत्रांपासून उल्लेख आढळतो. पारस्कर गह्मसूत्रांत शिष्यानें गुरूच्या सन्निध उपाकर्म, उत्सर्जनादि कर्मे करावी. व गुरूच्या आज्ञेने समावर्तन करावें वगैरे उल्लेख येतात. बौधायन गृह्यसूत्रांतहि अशाच प्रकारचे उल्लेख येतात. आश्वलायन गृह्मसूत्रांत र्औध्वदेहिकप्रकरणी गुरूचा उल्लेख आहे. पारस्कर गृह्म सूत्रांतील उल्लेखावरून गृह्मसूत्रकाली गुरूगृही अध्ययन करीत असलेली गुरूकुलें बरीच होती असें दिसतें. अध्यापकास गुरू शब्दापूर्वी आचार्य शब्द असावा असें दिसतें. देशोपनिषदापैकी नारायणोपनिषद यामध्यें शिष्यानें गुरूजवळ कसें वागावें व कोणते नियम पाळावें याचा उल्लेख आहे. गुरू कसा असावा याबद्दल मनु, याज्ञवस्क्य या स्मृतींत बरेंच विवेचन आढळतें. पूर्वी उपनयन संस्कार गुरूच करीत असावा. परंतु पुढें गुरूच्या अभावीं पित्यानें तो संस्कार करण्याची चाल रूढ झाली. अध्ययन समाप्तीनंतर गुरूदक्षिणा देण्याबद्दल सूत्रांत उल्लेख येतो. गुरूदक्षिणेच्या पौराणिक गोष्टी उत्तंक, कृष्ण-बलराम वगैरेंच्या प्रसिध्दच आहेत. गुरूच्या शिष्यांवरील अधिकारांसंबधानें विवेचन फारसे स्पष्टपणें करता येत नाही. शिष्याचें गुरूसंबंधी कर्तव्य अमर्यादित दाखविण्याचा प्रयत्न दिसतो. पण त्याचबरोबर शिष्यासंबधी गुरूचें कर्तव्यहि व्यापक दाखविलें आहे. प्राचीन शिक्षणविषयक माहितीसाठी ''शिक्षण'' पहा.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .