प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
    
गालिचे- वाफेच्या यंत्रानी गालिचे विणण्याची कला जरी सर्वस्वी पाश्चात्य आहे तरी फार प्राचीन काळापासून पौरस्य देशांतून हातानें विणलेले सुंदर गालीचे तयार होत. आपल्याकडील रिवाजाप्रमाणें प्राचीन ईजिप्तमध्येहि राजवाड्यांतून व देवळांतून जमीनीवर व आसनावरून हातरण्याकरिता हात-या असत. अशा गालिचांत सुयांनी बारीक नक्षीकाम करीत. इ.स.च्या ३-या किंवा ४ थ्या शतकांतील ईजिप्तोरोमन गालिचे साउथ केन्सिग्टन म्युझियममध्यें ठेविले आहेत.

फूलगालिचे- तुरेदार किवा फुलाचे गालिचे करण्यांत इराण, तुर्कस्तान या पौरस्त्य देशांची बरीच ख्याती आहे. सूत, ताग, लोकर किंवा रेशीम यांची उभी वीण घालून त्यांत रंगीत लोकर, बकरी किंवा उंट यांचे केस किंवा रेशीम यांचे चित्र आखून त्याप्रमाणे धागे भरतात व उभ्या विणीवर आडवे सूत घेतात. नंतर पुन्हा याप्रमाणेंच रंगीबेरंगी लोकरीची आणखी एक ओळ भरून पुन्हां एक आडवा दोरा घालतात. अश रितीनें फूल गालिचे विणतात. या गालिच्यांत दोन पुरातन गाठीचा उपयोग केला जातो, एकीला तुर्की किंवा घिओडेंस (या नावांचे ब्रुसाजवळ एक प्राचीन शहर आहे.) गांठ व दुसरीला पर्शियन किंवा सेहना गांठ म्हणतात. सेहना, किर्मात आणि ताब्रिझ येथे होणा-या पर्शियन गालिच्यांत ताणा रेशमाचा असल्यानें फूल फार उठावदार दिसतें. पूर्वेकडे असे गालिचे कधीपासून करण्यांत येऊं लागले यांचा अंदाज लागत नाही. मखमलीसारखे हे कापड असल्यानें अगोदर कोणतें व मागाहून कोणतें तयार होऊ लागलें हें समजत नाही. सतरंज्यासारखे गालिचे फूल गालिच्याच्या फार आधीचे यांत शंका नाही.

पौरस्त्य गालिच्यांतील नक्षीकामाचे रहस्य- व्यापक द्दष्टि योजिल्यास पौरस्त्य गालिच्यांच्या नमुन्यांत दोन प्रकार द्दष्टीस पडतील. एक सुनी पंथी व दुसरा शिया पंथी. पहिल्यांत रूक्ष भूमितीच्या व कोन साधलेल्या आकृती असून शिवाय गुंतागुंतीची नक्षी, गूढ चिन्हे वगैरे असतात. त्यांत सुनीची संन्यस्त वृत्ति दिसून येते. उलट दुस-या प्रकारांत शिया किंवा सुधारक पंथाचे स्वतंत्र विचार दृष्टीस पडतात. शिया प्रकारांत मोठ्या कल्पकतेने काढलेली फुले व बेलबुट्टया, वनस्पती व प्राणी यांचे आकार, कुफी लेखाभोवती बसविलेली महिरप वगैरे कामें केलेली असतात. अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बुखारा, हिंदुस्थानचा वायव्य सरहद्द प्रांत यांतून सुनी तर्‍हेचे व इराणांत शिया तर्‍हेचे गालिचे होतात.

हिंदुस्थानी गालिचे.- इराण, तुर्कस्तान व हिंदुस्थानचा वायव्यसरहद्दप्रांत यांच्या खालोखाल फूलगालिचे होणारा, ऐतिहासिक महत्वाचा देश म्हणजे हिंदुस्थान होय. हिंदुस्थानात चौदाव्या शतकांच्या उत्तरभागांत, फुलांचे गालिचे विणण्याची कला प्रथम मुसुलमान लोकांनी आणिली. परंतु मोंगल वंशाच्या स्थापनेच्या कालापर्यंत ह्मा कलेस म्हणण्यासारखें महत्व मिळालें नव्हते. मोंगल वंशाची स्थापना झाल्यावर बाबरानें १६ व्या शतकाच्या आरंभी या कलेस नांवारूपास आणिले. त्याकाळी हिंदुस्थानांत तयार झालेल्या गालिचावरील नक्षीकाम इराणी गालिचांच्या धर्तीवर केलेले असे. तथापि मूलप्रतिमेसारखें सौदर्य हिंदुस्थानांत तयार झालेल्या गालिच्यांच्या ठायी क्वचितच दिसे. गालिचे तयार होणारे हिंदुस्थानांतील ऐतिहासिक द्दष्टया प्रमुख्य प्रांत म्हटले म्हणजे काश्मीर, पंजाब व सिंध हे होत. आग्रा, मिर्झापूर, जबलपूर, वरंगळ, मलबार आणि मच्छलीपट्टण ही गालिचें होण्याची मुख्य स्थळे आहेत. बनारस आणि मुर्शिदाबाद या ठिकाणी सोनेरी व रूपेरी कलाबतूचें नक्षीकाम केलेले गालिचे होतात. हे गालिचे फक्त उत्सवप्रसंगीच वापरावयाचे असतात. तंजावर आणि तालेम या ठिकाणी रेशमानें विणलेले फूलगालिचे तयार होतात. हिंदुस्थानांतील सर्वोकृष्ट असे लोकरी गालिचे हे हिंदुस्थांनातील राजेरजवाडे, मोठमोठे अमीउमराव, धनिक लोक यांनी मुद्दाम गालिचे करण्यांत वाकबगार अशा कारागिरांना पदरी ठेवून त्यांच्याकडून तयार करून घेतलेले आहेत. हे गालिचे राजवाड्यांतून शोभेकरता हांतरण्याचा प्रघात असे. वरील प्रकारच्या कुशल कारागिरांचा धन्याच्या खासगी आश्रितांत समावेश होत असून त्यांना ठराविक वेतन मिळत असे. दुस-या एखाद्या गिर्‍हाईकाचे काम करण्याचीहि त्यांना मुभा असे. एकोणिसाव्या शतकांत सरकारी तुरुंगातू गालिचे बनविण्यांत येऊ लागले. तुंरूगातील गालिचे कारखान्यांत तयार झालेल्या गालिच्यापेक्षा कमी सुबक व मृदू असतात. कारण तुंरूगात ते मोठ्या प्रमाणावर काढावे लागतात. फुलगालिच्यापेक्षाहि अतिशय प्राचील काळापासून सतरंजीवजा पातळ सुती गालिचे हिंदुस्थानांत तयार होत असत. हे गालिचे निळ्या व पांढ-या अथवा निळ्या व तांबड्या पट्ट्यांनी विणलेले असून त्यांची वीण अगदी साधी व सोपी असे. यांना दारी अथवा सतरंजी म्हणतात. बनारस (काशी) शहरी व उत्तर हिंदुस्थानांत मुख्यत्वेंकरून सतरंज्या तयार होतात. दक्षिणेमध्येंहि सतरंज्या होतात. विशेषतः निलगिरी पर्वतांतील तोडा लोकांसारखे मूळ रहिवासी या कामांत प्रवीण आहेत.

यूरोपमधील गालिचे- कॅस्टाईलची राणी एलेनॉर हिनें तेराव्या शतकाच्या उत्तररार्धात इंग्लंडमध्ये प्रथमच गालिचे उपयोगात आणिले असे म्हणतात. हे गालिचे स्पेनमधून आणविलेले असत. कारण, त्यावेळी स्पेनच्या दक्षिणभागांत सॅरॅसीन किंवा मूर लोक गालिचे तयार करीत. उलटपक्षी सॅव्हमनेरी येथील पीअर दुपॉन्ट नामक गालिचे करणारा कारागीर (इ.स.१६६२) म्हणतो की, फ्रान्समधील गालिचे तयार करण्याच्या कृतीचे ज्ञान हें इ.स.७२६ त चार्लस माटेंल याने केलेल्या सॅरॅसेन लोकांच्या पराभवाचे फळ होय. कारण फ्रेंच लोकांनी सॅरॅसेन लोकांपासून गालिचे करण्याची कला उचलली. १३ व्या शतकांत व्हेनिस शहरी सुंदर नक्षीकाम करणारे असे कुशल विणकर गालिचे तयार कर-याच्या कामी वेतन देऊन नेमिले होते. त्याकाळी व्हेनिस हें गालिचे वगैरे सामानाच्या निर्गतीचें मुख्य ठिकाण होते. येथूनच पश्चिम युरोपभर गालिच्यांचा प्रसार होत असे.

स्पॅनिश गालिचे- आता सॅरॅसेनिक व इराणी गालिच्यांहून भिन्न अशा प्रकारच्या स्पेनमध्यें तयार झालेल्या गालिच्यांचा उल्लेख केला पाहिजे. सुमारे पंधराव्या शतकाच्या शेवटी अगर सोळाव्या शतकाच्या आरंभी स्पेनमध्ये गालिचे करण्याची कृति प्रचलित असावी. अगदी अलीकडच्या काळांतच या प्राचीन गालिचांचे नमुने सापडले आहेत. स्पेनमध्ये हे गालिचे करण्याचे कारखाने कोठून आले याविषयी नक्की माहिती उपलब्ध नाही. या फूलगालिच्याचा एक प्रेक्षणीय नमुना व्हिक्टोरिया आणि आलवर्ट म्यूझियममध्ये पहावयास सांपडतो. या गालिचाच्या मध्यभागांतील नक्षीकाम मूर लोकांनी विणलेल्या गालिचांच्या धर्तीवर असून गालिच्याच्या कडांवर सर्पाकृति प्राण्याप्रमाणे नक्षी काम केलेले आहे. फूल गालिचाशिवाय १७ व्या व १८ व्या शतकांत स्पेनमध्ये तयार झालेल्या सतरंजीवजा गालिचावर स्पॅनिश नावें व कोरीव लेख आढळून येतात.

पोलिश गालिचे- उत्कृष्ट फूल गालिचांचा आणखी एक चमत्कृतिजन्य वर्ग म्हटला पोलिश गालिचांचा होय. या प्रकारचे गालिचे आधुनिक काळामध्येच ज्ञात झाले आहेत. हे गालिचे बहुश: रेशमाने विणलेले असून अतिशय मृदु असतात. जमिनीवर हांतरण्याकरता केलेले गालिचे सोनेरी व रूपेरी कलाबतूनें विणलेले असून सतराव्या शतकांतील ब्रुसफॅब्रिक्सच्या धर्तीवर बनविलेले आहेत. पुष्कळ प्रकारच्या शोधावरून हे पोलिश गालिचे, कॉन्स्टन्टिनोपल व दमास्क्स या दोन शहरांपैकी कोणत्यातरी एका शहरी प्राचीनकाळी तयार होत असावें असे सिध्द होते.

फ्रान्समधील गालिचे- १६६७त फ्रान्समध्यें लूव्हर येथें चौथ्या हेनरीनें या कलेस उत्तेजन देण्याकरतां म्हणून राजकीय कलाभवनें स्थापिली. कलाभवनांतून निरनिराळ्या प्रकारची कलाकुसरीची कामे केली जात असत. याच ठिकाणी स.१६०४ मध्यें पौरस्त्य (ओरिएन्टल) गालिचे तयार करण्याकरता एक उद्योगशाळा स्थापन झाली. पुढे सुमारे दहापंधरा वर्षोनी पीअरडुपॉन्ट आणि सायमन लोडेंट या दोघां गृहस्थांनी चिल्लॉट (पॅरिस) येथें फूलगालिचे करण्याचा धंदा सुरू केला. लूव्हर येथील गालिचे बनविणारे कारागीर इ.स.१६६१ मध्यें चिल्लॉट येथे बदलले जाऊन सदर ठिकाणी गालिचे तयार करण्याचा धंदा प्रत्यक्ष फ्रान्सच्या राजाच्या हुकमतीखाली व राजाश्रयाने पुढें कैक वर्षे चालू होता.

इंग्लंडमधील- १७ व्या शतकाच्या अखेरच्या काळांत तुर्की फूल गालिचे करणारे फ्लेमिश कारागीर इंग्लंडमध्ये येऊन निरनिराळ्या ठिकाणी गालिचे तयार करण्याचा उद्योग करू लागले. या गोष्टीला खात्रीलायक पुरावा असल्यामुळें याबद्दल कांही वाद नाही. ऍक्समिन्स्टर आणि विल्टन या येथील गालिचे विणणारांनी १७०१ साली तिस-या विल्यम कडून संरक्षक सनद (प्रोटेक्टिव्ह चार्ट) मिळाली. १८ व्या शतकाच्या आरंभी हेनरी, अर्ल ऑफ पेम्ब्रोक नामक गृहस्थाने विल्टन येथील गालिच्यांच्या व्यापारांत मन घालून फ्रान्समधून कांही कुशल कारागीर आणविले व त्यांना विल्टन येथे नेमिले. त्यामुळे फूलगालिचांच्या व्यापारांत क्रान्ति होऊन इंग्लंडमध्ये सर्वोगसुंदर फूलगालिचांची निपज होऊ लागली. १७५१ साली फुलहॅम शहरी पॅरिसॉट नामक एका तज्ज्ञाने फूल गालिचे विणण्याचा कारखाना काढला. पुढे १७५५ साली हा कारखाना विकला गेला. नंतर एक्झीटर येथे दुसरा एक कारखाना काढण्याचा त्याचा विचार होता. पण तो तडीस गेला नाही. विल्टन येथील गालिचांच्या कारखान्यांची उत्तरोत्तर भरभराट झाली. तेथे तयार होणारे गालिचे व फूल गालिचे सर्व लोकांच्या आवडीस पात्र होतीलसे आहेत. १८ व्या शतकाच्या अखेरीस ऍक्समिन्स्टर येथील कारखाने मात्र ठार बुडाले. सॅव्हॉनेरी प्रमाणेच ऍक्समिन्स्टर हे नांव गालिचांच्या प्रसिध्दीकरताच निव्वळ शिल्लक राहिलें आहे.

अर्वाचीन यंत्रानें विणलेले गालिचे- वाफेच्या यंत्रांनी गालिचे विणण्याची कला इंग्लंडमध्ये अस्तिवांत येण्यापूर्वी गालिचे विणणार लोक फ्रेंच लोकांनी घालून दिलेल्या उदाहरणाचें अनुकरण करीत; म्हणजे गालिचे विणण्याच्या कामी जेक्कार्डच्या यंत्राचा (ऍपरेटसचा) मुख्यतः उपयोग करीत. एकोणीसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत व पुढे काही काळ ही स्थिती होती. परंतु पुढें लवकरच इंग्लंडमध्यें थोड्या वेळांत पुष्कळ गालिचे तयार होऊ लागल्यामुळे इंग्लंडमध्ये गालिचे करण्याच्या कामाची गति अतिशय वाढली. त्यामुळे बेल्जममधील टूर्ने व फ्रान्समधील नाईम्स, ऍबेव्हिले, ब्यूव्हेस, टॉरकोईग आणि लॅनॉय इत्यादी शहरातील गालिचे करणा-या कारखानदारास जबर धक्का  बसला. अमेरिकेमधील इरॅस्टम. बी.बिगलौ व इंग्लंडमधील विल्यम वुड नामक दोन गृहस्थांनी जॅक्कॅर्डच्या गालिचे विणण्याच्या वाफेच्या मागांत (लूम) सुधारणा करण्याच्या कामी बरेंच परिश्रम केले होते. त्यांनी सुधारलेल्या यंत्रांत इंग्लंडमधील शोधकांकडून आणखी सुधारणा घडवून आणून गालिचे काढण्याच्या कामांत झपाट्याची प्रगति केली. त्यामुळे इंग्लंडशी स्पर्धा करणें सर्व यूरोपियन देशांनां अवघड झालें. पुढें १८८० सालापासून फ्रान्स देशांतील फूलगालिचे करणारे कारागीर इंग्लंडमधून वरील प्रकारची वाफेनें चालणारी यंत्रे आणून त्यांच्या साहाय्याने गालिचे विणूं लागले आहेत.

अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांत गालिचे विणण्याचे अनेक कारखाने असून ते फार महत्वाचे आहेत. ऑस्ट्रियामध्यें सर्वांत सुंदर फूलगलिचे तयार होतात. ह्मा गालिचांवरील नक्षीकाम ऑबुसन गालिच्यावरील नक्षीकामाच्या धर्तीवर आहे. जर्मनी, हॉलंड आणि बेल्जम या देशांतहि वाफेनें चालणा-या यंत्रांवर गालिचे तयार होतात.

अर्वाचीन हातानें विणलेले गालिचे- विल्यम मॉरिस नामक एका इंग्लिशानें हातानें गालिचे विणण्याच्या कामी फार श्रमपूर्वक प्रयत्न केलें. त्याच्या प्रयत्नामुळें हातानें विणलेल्या फुलगालिच्यांत बरीच सुधारणा घडून आली. उत्तम नक्षीकाम केलेले, हातानें विणलेले काही फुलगालिचे अर्वाचीन काळीहि तयार झालेले सापडतात. अशा गालिचापैकी कांही खुद्द इंग्लंडमध्ये तयार झालेले आहेत. १८५० सालापूर्वी व तदनंतर कांही काळ, रग व गालिचे यांवर रंगीबंरंगी दो-यानें जनावरांच्या व वनस्पतीच्या ओबडधोबड आकृति काढीत. अशा आकृती काढलेले गालिचे अद्यापहि कोठे कोठे आढळतात. ग्लासगो, मँचेस्टर व वार्मिगहॅम येथील कलाविद्यालयांतून (स्कूल ऑफ आर्ट) गालिचावर अप्रतिम व रेखीव चित्रें काढण्याचें काम अद्याप मोठ्या कुशलतेनं केले जाते. सबंध युरोप व अमेरिकेंत चित्रे काढण्याच्या कलेंत बरीच प्रगति झाली आहे असें म्हणण्यास हरकत नाही. फ्रान्समध्यें ऑवुसन आणि सॅव्हॉनेरी येथील हातानें विणलेले गालिचे पौरस्त्य गालिचाहून निराळ्या धर्तीवर विणलेले असून विशेष व सुंदर नक्षीदार असतात. युरोपमधील प्रसिध्द पदार्थसंग्रहालयांतून अनेक प्रकारचे पौरस्त्य गालिचे ठेविले आहेत.

[संदर्भग्रंथ-बि्रटिश मॅन्युफॅक्चरिग, इंडस्ट्रीज (लंडन १८७६). व्हिन्सेंट जे रॉबिन्सन-ईस्टर्न कार्पेट्स; हर्बर्ट कॉक्सॉन-ओरिएटंल कार्पेट्स; आस्ट्रेलियन कमर्शिअल म्यूझियमनें प्रसिध्द केलेले पौरस्त्य गालिचांवरचे पुस्तक; रिपोर्ट ऑन कार्पेट्स ऍट दि पॅरिस एक्झिबिशन, १९००; जॉन किबलें मुंफोर्ड-ओरिएंटल रग्स; जर्नल ऑफ इंडियन आर्ट ऍंड इंडस्ट्री इंडियन कार्पेट्स ऍंड रग्स (भाग ८७ ते ९४) लंडन १९०५ व १९०६; मार्टिन-ए हिस्टरी ऑफ ओरिएंटल कार्पेट्स बिफोर १८००.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .