विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गारूलिया- बंगालच्या बराकपूर पोट जिल्ह्यांतील एक शहर. लोकसंख्या (१९११) ११,५८०. येथे ताग व कापूस यांच्या गिरण्या आहेत. शामनगर नांवाच्या खेड्याचा समावेश या शहरांतच झाला आहे. १८९६ मध्यें याला स्थानिक स्वराज्याचे अधिकार स्वतंत्रपणे मिळालें. १८९६ पर्यंत याचा समावेश नॉर्थ बराकपूर म्युनिसिपालिटीतच होत असें.