प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
    
गायकवाड- या गायकवाडांचें मूळ गांव पुणें जिल्ह्यांत धावडी हें होय. या घराण्याचा पूर्वज दमाजी हा खंडेराव दाभाड्याच्या सैन्यांतील एक सरदार होता. इ.स. १७२० मध्यें बाळापूर येथें निजामाशीं झालेल्या लढांईत दमाजीनें विशेष नांवलौकिक मिळविल्यामुळें खंडेरावाच्या शिफारसीवरून शाहू महाराजांनीं त्याला समशेर बहाद्दर असा किताब देऊन त्याची सेनापतीच्या मुतालिकीच्या जागीं नेमणूक केली. दमाजी हा १७२० त मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या (जनकोजीचा पुत्र) पिलाजी याची नेमणूक झाली (१७२१). पिलाजी हा खानदेशांत नवापूर येथें प्रथम रहात होता. परंतु पोवारांनीं हरकत घेतल्यामुळें त्यानें सोनगड येथें किल्ला बांधून तेथें आपलें ठाणें दिलें. हें ठिकाण बरेच दिवस गायकवाडांची राजधानी होतें. पिलाजीनें राजपिंपळ्याच्या राजाच्या मदतीनें १७२० त प्रथम सुरत प्रांतावर स्वारी केली व चौथ मिळविली व अहमदाबाद येथें आपला गुमास्ता ठेवला.

इ. स. १७२४ मध्यें पिलाजीनें गुजराथचा नायब सुभेदार हमीदखान यास सरबुलंदखानाच्या (नवीन सुभेदार) विरूध्द मदत करून, त्याच्याकडून मही नदीच्या पूर्वेकडील मुलखांत चौथ बसविण्याचा हक्क मिळविला. पुढें १७२५ सालीं पिलाजीनें पुन्हां हमीदखानास मदत करून अहमदाबादेजवळ अदालेदजी येथें सरबुलंदचा पराभव केला. तेव्हां पिलाजीशीं सख्य ठेवण्याकरितां सरबुलंदानेंहि गुजराथेंत चौथ बसविण्याचा अधिकार त्यास दिला. कंठाजीकदम बांडे यानेंहि हमीदखानास मदत केली होती. त्यामुळें चौथाईबद्दल त्यालाहि कांही हक्क मिळाले होते. त्या संबंधांत पिलाजी व कंठाजी या दोघांत तंटे माजले. त्याचा निकाल हमीदनें लावला. कंठाजीनें महीच्या पश्चिमेकडील व पिलाजीनें पूर्वेकडील प्रांतांची चौथ गोळा करावी असें ठरलें. नंतर पिलाजी सोनगडास गेला. पुढें सरबुलंद यानें गुजराथची सरदेशमुखी व चौथाई थोरले बाजीरावासच दिली (१७३१). बाजीराव व दाभाडे यांच्यांत डभई येथें युध्द झालें, त्यांत पिलाजी दाभाड्यांकडून लढत होता. या युद्धांत बाजीरावाचा सरदार आवजी कवडे याचा पिलाजीचा मुलगा दमाजी यानें पराभव केला. डभईच्या लढाईंत पिलाजीचा एक मुलगा मारला गेला व पिलाजीहि जखमी झाला. पुढें यशवंतराव दाभाड्यास सेनापतीचीं वस्त्रें मिळालीं, तेव्हां पिलाजीस त्याच्या मुतालकीच्या जागीं कायम करण्यांत येऊन 'समशेरबहाद्दर' या किताबाशिवाय सेनाखासखेल हा नवीन किताब त्यास देण्यांत आला. डभईच्या लढाईच्या वेळीं डभई व बडोदें हीं दोन्हीहि शहरें पिलाजीच्या ताब्यांत होतीं. सरबुलंदखानानें मराठ्यांस चौथाई सरदेशमुखीच्या सनदा करून दिल्यामुळें बादशहाची त्याच्यावर खप्पामर्जी होऊन त्याच्या जागीं जोधपूरचा राजा अभयसिंग याला गुजराथच्या सुभेदारीचें काम देण्यांत आलें. अभयसिंगानें थोड्याच दिवसांत बडोद्याचा किल्ला मराठ्यांकडून काबीज केला. परंतु पिलाजीनें इतरत्र बरेच जय मिळवून कित्येक मुख्य मुख्य ठाणीं बळकाविली होती, म्हणून अभयसिंगानें पिलाजीशीं कायमचे करारमदार करून टाकण्यासाठीं त्याच्याकडे आपले वकील पाठविले व त्यांच्याकरवीं डाकोर येथें त्याचा एके दिवशीं विश्वासघातानें खून केला (१७३२).

पिलाजीच्या मृत्यूमुळें अभयसिंगास कांहीच फायदा झाला नाहीं. कारण पिलाजीचा दोस्त पाद्य्राचा (बडोद्याजवळील एक गांव) देसाई दिल्ला याच्या चिथावणीवरून सर्व देशभर कोळी व भील लोकांनीं बंड केलें. अभयसिंगाचें सैन्य त्यांचें बंड मोडण्यांत गुंतलें आहे असें पाहून पिलाजीचा भाऊ महादजी (हा जंबूसर बळकाऊन बसला होता) यानें बडोद्यावर स्वारी करून तें घेतलें (१७३२). येथपासून बडोदें ही गायकवाडांची राजधानी झाली. पिलाजीचा वडील मुलगा जो दमाजी त्यानेंहि याच सुमारास सोनगडाहून निघून गुजराथेंतील पश्चिमेकडचे बरेच मुख्य मुख्य जिल्हे पादाक्रांत केले. त्याच्या स्वा-या जोधपूरपावेतों जेव्हां जाऊं लागल्या तेव्हां आपल्या दुय्यम अधिका-याच्या स्वाधीन अहमदाबाद करून अभयसिंग हा जोधपूरच्या रक्षणार्थ तिकडे निघून गेला (१७३२).

पुढें दमाजीनें कंठाजी कदम वांडे यास गुजराथेंतून हांकून लावलें (१७३४); म्हणून कंठाजीनें पुढच्या सालीं मल्हारराव होळकरासह गुजराथेंत अकस्मात स्वारी करून बनास नदीपावेतों खंडण्या वसूल केल्या व ईदर, पालनपूर वगैरे कित्येक शहरें लुटलीं. या स्वारीनंतर लवकरच गुजराथच्या सुभेदारीचें काम अभयसिंगाकडून काढून नजीब उद्दौला मोमीनखान याच्याकडे देण्यांत आलें. पण अभयसिंगाच्या वतीनें गुजराथचा कारभार पहाणारा नायब सुभेदार हा अहमदाबाद सोडण्यास तयार नव्हता. तेव्हां मोमीनखानानें त्याला हांकून लावण्याकरितां दमाजीची मदत घेतली (१७३५). व ते दोघे पगडीभाई झाले. याप्रमाणें अहमदाबाद हस्तगत झाल्यावर तेथील सत्ता व वसूल या दोघांनीं वांटून घेतली (१७३७). बाजीराव उत्तरेस गेला आहे असें पाहून दमाजीनें माळव्यांत स्वारी केली (१७४२).

मोमीनखान हा १७४३ त (फेब्रुवारी) मेला. तो जिवंत होता तोपर्यंत दमाजीनें गुजराथेंतील व काठेवाडांतील आपले सर्व हक्क बिनहरकत वसूल केले. मोमीनच्या मरणानंतर अबदुल अझीझ याची नेमणूक झाली; पण तो औरंगाबादेहून गुजराथेंत येत असतां, मार्गांतच दमाजीनें अंकलेश्वर येथें त्यावर हल्ला करून त्याची सर्व फौज कापून काढली. यानंतर फकीरूद्दौला यास दिल्लीहून गुजराथेंत पाठविण्यांत आलें (१७४४). यावेळीं दमाजी साता-यास गेला होता; तथापि त्याचा सरदार रंगाजी यानें फकीरूद्दौल्यास विरोध करून गुजराथचा कारभार आपल्या हातीं घेऊं दिला नाहीं. दमाजीस खंडेराव नांवाचा एक भाऊ होता. दमाजी गुजराथेंत नसल्यामुळें त्याला कारभारांत ढवळाढवळ करण्यास संधि मिळाली. त्यानें रंगाजीस अहमदाबादेहून काढून तेथें दुस-या माणसाची नेमणूक करून फकीरूद्दौला यासहि कांहीं मदत दिली. परंतु रंगाजीस ही बातमी लागतांच तो लागलीच परत आला; व त्यानें खंडेराव व फकीरूद्दौला यांचा संबंध तोडून खंडेरावास संतुष्ट राखण्यासाठीं, त्यास बुरसत (बोरसादचा) किल्ला व नडियाद जिल्हा दिला व बडोदें येथें त्याला आपला प्रतिनिधि म्हणून नेमलें. १७४४ त दमाजी गायकवाड सात-यास आला होता. या वर्षी रघूजी भोंसलें व बाळाजी बाजीराव यांच्यामध्यें शाहूच्या मध्यस्थीनें जी तडजोड झाली, तींत असें ठरलें होतें कीं, दमाजीनें माळव्यांतून कांहीं दिवसांपूर्वी जी खंडणीची रक्कम वसूल केली, तिचा हिशोब त्यानें पेशव्यांस द्यावा. शाहूनें आपल्या मरणापूर्वी दमाजी गायकवाडास साता-यास हजर होण्याविषयीं हुकूम पाठविला होता; परंतु त्यावेळीं तो गेला नाहीं. (१७४८).

दमाजी हा ताराबाईस पेशव्यांच्याविरूध्द मदत करण्याकरितां १५००० सैन्य घेऊन साता-याकडे आला व त्यानें पेशव्यांच्या पक्षाच्या मंडळीचा नींब येथें पराभव केला (१७५१). परंतु ही बातमी नानासाहेबांनां लागतांच ते मोठमोठ्या मजला करीत दक्षिणेकडून साता-यास आले. पेशव्यांशीं बोलणें लावून तडजोड करून घेण्यासाठीं दमाजीनें खटपट चालविली पण ती सफळ झाली नाहीं. अखेर दमाजीवर पेशव्यांनीं अचानक हल्ला करून त्यास पकडून बंदोबस्तानें पुण्यास आणून ठेविलें व त्याच्या कुटुंबास कैदेंत ठेविलें.

भडोचच्या वसुलचा व जकातीचा हिस्सा गायकवाडास नक्की केंव्हा प्राप्त झाला हें कळत नाहीं. इ. स. १७४७  सालीं सुरतच्या अधिकारासंबंधीं मुसुलमानी निरनिराळ्या पक्षांत तंटे उपस्थित होऊन त्यांपैकीं सय्यद अचीनखानानें दमाजीचा चुलतभाऊ केदारजी यास आपल्या मदतीस बोलावले. याबद्दल तीन लक्ष रूपये केदारजीस देण्याचें ठरलें. परंतु केदारजीच्या मदतीवांचूनच अचीनखानाचें कार्य झाल्यानें तो ती रक्कम देण्यास टाळाटाळ करूं लागला. त्यावर केदारजीनें सुरतच्या आसपास लुटालूट करण्यास आरंभ केला. तेव्हां अचीननें नाइलाज होऊन त्या रकमेची फेड होईपर्यंत सुरतच्या वसुलाचा एकतृतीयांश हिस्सा केदारजीनें घ्यावा असें ठरविलें व तें केदारजीनेंहि दमाजीच्या सल्ल्यानें मान्य केलें. दमाजी पुण्यास पेशव्यांच्या कैदेंत होता त्यावेळीं (इ. स. १७५२-१७५४). पुनः सुरत येथें बरीच बेबंदशाही माजली होती. तिचा फायदा घेतां यावा म्हणून पुढें दिल्याप्रमाणें दमाजीनें पेशव्यांशीं करार करून आपली सुटका करून घेतली (१७५४). यावेळीं असें ठरलें कीं दमाजीनें १५ लक्ष रूपये देऊन मागील बाकीचा फडशा करावा; गायकवाडाकडे गुजराथेंत जो मुलूख आहे त्याचा अर्धा वांटा पेशव्यांस मिळावा व पुढेंहि त्यांनीं नवीन मुलूख जिंकल्यास त्याचाहि अर्धा हिस्सा पेशव्यांस मिळावा. अतःपर स्वार्‍यां-मध्यें जो कांही पैसा मिळेल त्यांतून स्वारीचा खर्च वजा जातां बाकी राहिेलेल्या रकमेचा अर्धा हिस्सा पेशव्यांस देत जावा. दहा हजार फौज चाकरीस ठेवून गरज पडेल तेव्हां पेशव्यांस मदत करावी, दाभाडे सेनापतीचे मुतालिक या नात्यानें गुजराथ प्रांताच्या वसुलांतून दरसाल सवापांच लक्ष रूपये सरकारांत द्यावे आणि छत्रपतींच्या इतमामासाठीं दरवर्षी कांहीं रक्कम पाठवीत जावी वगैरे. कैदेंतून सुटण्यासाठीं दरबारखर्च म्हणून दमाजीनें दहापंधरा लक्ष रूपये खर्च केले. सुटका झाल्यानंतर (१७५४) पावसाळ्याच्या अखेर राघोबादादांच्या गुजराथच्या स्वारींत दमाजी त्यांस येऊन मिळाला व ते दोघे खंडण्या गोळा करीत अहमदाबाद शहरीं  (१७५५) आले. त्यांनीं शहरास वेढा देऊन तें हस्तगत केलें. येथील अधिकारी जवानमर्दखान बाबी याची नेमणूक मोमीनखान यांच्या भावानें केली होती. त्यानें कित्येक दिवसपर्यंत शहराचें रक्षण केलें, परंतु शेवटीं पट्टण, बंडनगर, राधनपूर, विजापूर आणि साबरमती व बनास या नद्यांमधील अहमदाबादच्या उत्तरेकडचे गुजराथेंतील कांही जिल्हे स्वतःस जहागीर घेऊन (एप्रिल महिन्यांत) त्यानें तें शहर मराठ्यांच्या स्वाधीन केले. अहमदाबाद हस्तगत झाल्यावर त्याचा वसूल गायकवाड व पेशवे यांनीं अर्धा अर्धा वांटून घ्यावा असें ठरलें. वरील बाबीच्या जहागिरीपैकीं बराचसा मुलूख पुढें १० वर्षांनीं दमाजीनें परत मिळविला.

इ. स. १७६० मध्यें भाऊसाहेब हिंदुस्थानांत जावयास निघाले तेव्हां चंबळेच्या अलीकडेच पेशव्यांच्या आज्ञेवरून दमाजी त्यांस जाऊन मिळाला. पानिपतच्या अखरेच्या घनघोर लढाईंत दमाजी व इब्राहिमखान हे दोघेहि बरोबरच रोहिल्यांशीं लढत होते. नंतर मल्हारराव होळकरानें रणभूमीवरून पाय काढल्यावर दमाजीनेंहि त्याचेंच अनुकरण केलें. पुढें (१७६३) निजामाशीं झालेल्या तांदुळज्याच्या लढाईंत (पेशव्यांतर्फे) दमाजी हजर होता. नंतर (स. १७६८) दमाजीनें आपला मुलगा गोविंदराव याजबरोबर फौज देऊन त्याला थोरले माधवराव यांच्याविरूध्द राघोबादादास मदत करण्यास पाठविलें. इ. स. १७६८ च्या सुमारास दमाजी मरण पावला. त्याला सयाजी, गोविंदराव, मानाजी व फत्तेसिंग असे चार मुलगे होते. यांपैकीं सयाजी सर्वांत वडील होता पण तो पहिल्या बायकोचा नव्हता. गोविंदराव पहिल्या बायकोचा होता पण धाकटा होता. दमाजी मेला तेव्हां गोविंदराव हा राघोबादादास मदत केल्यामुळें पुण्यास अटकेंत होता. त्यानें सुटकेसाठीं भूर्दंड व नजर मिळून ५०॥ लक्षांवर रूपये देऊन, ७ लक्ष ७९ हजार रूपये दरसाल खंडणी देण्याचें आणि पुण्यास नेहमीं ३ हजार फौज व लढाईच्या वेळीं ४ हजार फौज ठेवयाचें कबूल करून सेनाखासखेल हें पद मिळविलें. सयाजी स्वतः वेडा होता पण फत्तेसिंगानें त्याचा हक्क पुढें मांडून पेशव्यांकडूनच (१७७१) आपल्या भावासाठीं सेनाखासखेल ही पदवी मिळविली व आपण त्याचा मुतालिक झाला. यामुळें गोविंदराव व फत्तेसिंग यांच्यामध्यें वैमनस्य आलें. तेव्हां गोविंदरावानें बंड केल्यास गुजराथेंत शांताता राखता यावी म्हणून फत्तेसिंगानें पेशव्यांनां दरसाल ६॥ लक्ष खंडणीचा करार करून आपलें सैन्य पुण्याहून काढलें. पुढें दादासाहेबांस पेशवाई मिळाल्यावर त्यांनी गोविंदरावांस पुन्हां 'सेनाखासखेल' केलें. तेव्हां गोविंदरावानें लागलीच गुजराथेंत स्वारी केली. पुढें दादासाहेब हे त्याची मदत घेण्याकरितां बडोद्यास आले (३ जाने. १७७५). तेव्हां त्यानें फत्तेसिंगास (बडोदे येथें) वेढा दिला होता. यावेळीं गोविंदरावाचा चुलता व नडियादचा जहागीरदार खंडेराव हा गोविंदरावाच्या मदतीस आला. परंतु पुण्याच्या कारभार्‍यांनी त्याला आपल्या बाजूस वळवून घेतलें. हरीपंत फडके दादांच्या पाठोपाठ आले. तेव्हां गोविंदराव बडोद्याचा वेढा उठवून दादाबरोबर नदीच्या पलीकडे गेला. तेथें महितीरी वासद खेड्याजवळ हे छावणी देऊन राहिले असतां फत्तेसिंग व हरीपंत यांनी नदी उतरून यांच्यावर अचानक हल्ला केला व यांचा पराभव केला (१७ फेब्रु.) तेव्हां दादा हे इंग्रजांकडे खंबायतेस गेले व गोविंदराव पालनपुराकडे गेला.

पुढें (१९ एप्रिल) राघोबादादा हे कीटिंगसह गोविंदरावाच्या सैन्यास खंबायतच्या ईशान्येस ११ मैलांवर दरमज येथें येऊन मिळाले. गोविंदरावांच्या विनंतीवरून इंग्रजांनीं बडोदें घेण्याचे ठरविलें. तेव्हां फत्तेसिंग इंग्रजांशीं तह करण्यास कबूल झाला. या तहानें इंग्रजांनीं दादासाहेबांमार्फत गोविंदराव व फत्तेसिंग यांचा समेट करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढें गोविंदरावांनें हा तह पाळला नाहीं. फत्तेसिंगानें ३००० स्वारांनिशीं दादांच्या चाकरीस रहावें; थोरले माधवराव पेशवे यांच्याशीं केलेल्या कराराप्रमाणें, गोविंदरावासाठीं गुजराथेंत ३ लक्षांची जहागीर आतां त्यानें राखून ठेवू नये; कारण दादा हे दक्षिणेंत १० लक्षांची जहागीर गोविंदरावास देण्यास कबूल होते. फत्तेसिंगाने दादांनां २६ लक्ष रूपये द्यावे व त्यानें भडोचच्या वसूलावरील आपले हक्क व दुसरी कित्येक खेडीं इंग्रजांस द्यावी असें या तहान्वयें ठरलें. या तहानें इंग्रजांचा पुष्कळ फायदा झाला. पुरंदरच्या तहांत (१७७६) असें एक कलम होतें कीं, पेशव्यांच्या संमतीशिवाय गायकवाडास आपला मुलुख दुस-यास तोडून देतां येत नाहीं; तसें सिध्द झाल्यास, इंग्रजांनीं फत्तेसिंगाचा मुलुख त्यास परत द्यावा.

आपण पेशव्यांचे अंकित आहोंत हें फत्तेसिंग कबूल करी, परंतु त्यांच्या संमतीवांचून आपणांस आपला मुलुख दुस-यास देतां येत नाहीं हें मात्र त्यास मान्य नव्हतें. आपण मुलूख परत द्यावा हें त्याचें देखील इंग्रजांपाशी मागणे होतें. परंतु याचें कारण तो असें सांगे कीं, ज्याकरितां हा मुलूख इंग्रजांस दिला तें कार्य राघोबादादा हे साध्य करूं शकले नाहींत. म्हणून तो प्रांत इंग्रजांनां देण्याचें आतां कांही प्रयोजनच राहिलें नाहीं. पुढें (१७७८) त्यानें पेशव्यांनां मागील सर्व बाकी, साडे दहा लक्ष रूपये खंडणी व ५ लक्ष रूपये नजर देऊन सेनाखासखेलीचीं वस्त्रें मिळविलीं. त्यामुळें गोविंदरावाचा हक्क कायमचा नष्ट झाला.

फत्तेसिंगानें गॉडर्ड याशीं तह करून, पेशव्यांशीं चाललेल्या तत्कालीन युद्धांत त्याच्या मदतीस ३००० फौज देण्याचें कबूल (२६ जाने. १७८०) केलें. तथापि युध्द चाललें असतांहि गायकवाडानें आपली शिरस्त्याची खंडणी

Insert Image

पेशव्यांस देण्याचें बंद करूं नये अशीहि एक अट होती. यावेळीं इंग्रजानें त्याला महीच्या उत्तरेकडील प्रांत देण्याचें कबूल केलें व त्याबद्दल त्यानें इंग्रजांनां सुरत व भडोच प्रांत दिले; आणि वर सांगितल्याप्रमाणें फत्तेसिंग हा इंग्रजांचा हस्तक बनला. पुढें इंग्रजांनीं पेशव्यांशीं तह केला (१७८१), त्यांत फत्तेसिंगाजवळ असलेला मुलुख तसाच असावा, त्यानें पेशव्यांनां नेहमींप्रमाणें खंडणी द्यावी असें ठरलें. यापुढें मरेपर्यंत फत्तेसिंगानें राज्य सुरळीतपणें चालविलें.

शेवटीं (१७८९ डिसेंबर २१) फत्तेसिंग आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरून खाली पडून मरण पावला. मरेपर्यंत फत्तेसिंग हा सायजीचा मुतालिकच होता. त्याच्या मरणाच्या वेळीं त्याचा धाकटा भाऊ मानाजी हा बडोद्यासच होता. त्यानें लागलीच सयाजीस आपल्या ताब्यांत घेऊन जहागिरीचा अधिकार बळकाविला. या वेळीं गोविंदराव हा पुण्याजवळ अज्ञातवासांत रहात होता. त्यानें संस्थानचा अधिकार आपणांस मिळावा अशी नाना फडणविसास विनंति केली. परंतु मानाजीनें पुणें दरबारास ३३,१३,००१ रूपये नजर करून व फत्तेसिंग गायकवाडाकडे राहिलेल्या ३६ लाखांची मागील बाकीची भरपाई करण्याचें अभिवचन देऊन आपला अधिकार कायम करविला. हें पाहून महादजी शिंद्यांनीं गोविंदरावाची बाजू घेऊन मानाजीची नेमणूक पेशव्यांकडून रद्द करविली. तेव्हां मानाजी इंग्रजांकडे गेला व गॉडर्ड व फत्तेसिंग यांच्या तहाच्या आधारावर त्यांनीं आपणांस मदत करावी असें म्हणूं लागला; परंतु सालबाईच्या तहानें मागचा तह रद्द झाला असें सांगून इंग्रजांनीं ह्या वादांत पडण्याचें नाकारलें. नान फडणवीस तडजोड करण्यास तयार होते; पण गोविंदरावाच्या हट्टामुळें तडजोड झाली नाहीं. इतक्यांत एकाएकीं (१ ऑगष्ट १७९३) मानाजीचें देहावसान झालें. मानाजी मेला तरी गोविंदरावास बडोद्यास जाण्याची परवानगी मिळाली नाहीं. पुण्यांतील कारभारीमंडळ गोविंदरावास म्हणूं लागले कीं तुम्ही पूर्वीच्या सर्व अटी कबूल करून शिवाय सन १७८० सालीं इंग्रजांनां देऊं केलेला तापीचा दक्षिणेकडील स्वतःचा प्रदेश व सुरतच्या वसूलांतील आपला वांटा सरकारांत द्या. इंग्रजांनीं यावर हरकत घेतली कीं, सालबाईच्या तहान्वयें गायकवाडाचें कोणतेंहि काम न केल्यामुळें त्यांचा मुलूख घेण्याचा पेशव्यांस अधिकार नाहीं. पुढें गोविंदराव बडोद्यास गेला. तेथें त्याला खंडेरावाचा मुलगा मल्हारराव याच्याशीं लढाई करावी लागली; तींत मल्हारराव पराभव पावला व गोविंदराव सयाजीचा मुतालिक म्हणून राज्यकारभार पाहूं लागला.

आबा शेलूकर नांवाचा इसम गुजराथेंत पेशव्यांतर्फे सुभेदार होता. तो दौलतराव शिंद्याकडे गेला असता तेथें त्यास कैद करण्यांत आलें. हें कृत्य रावबाजीच्या सांगण्यावरून झालें. त्यांत गोविंदरावाचा हात होता. परंतु शेलूकरानें दहा लाख रूपये देण्याचा दौलतरावाशीं करार करून आपली सुटका करून घेतली व परत येऊन तो अहमदाबादचा कारभार पाहूं लागला. शेलूकर हा नाना फडनाविसाच्या पक्षाचा असल्यामुळें बाजीरावानें गुप्तपणें गोविंदरावास त्याच्या विरूध्द पुन्हां उठविलें. याच सुमारास शिंद्यानेंहि रकमेच्या भरपाईचा तगादा लावल्यामुळें शेलूकरानें गायकवाडाच्या कांही गांवांपासून पैसा उकळला. त्यामुळें दोघांमध्यें पुन्हां भांडणें सुरू झाली. इ. स. १७९९ सालीं सुरतचा नबाब मरण पावला. तेव्हां सुरतेच्या चौथाईचा गायकवाडाचा हिस्सा प्राप्त करून घ्यावा असा इंग्रजांनीं मनसबा ठरविला व त्याप्रमाणें त्यांनीं गोविंदरावास विनंति करून तो हक्क तर मिळविलाच; परंतु त्याबरोबर चौ-याशी जिल्हाहि आणखी पदरांत पाडला. वास्तविक १७९३ सालीं पेशव्यांनां जशी या सुरतेच्या हक्काबद्दल इंग्रजानीं हरकत घेतली तशी या वेळेस पेशव्यांनांहि घेतां आली असती. पण पेशवे सध्या निर्बळ झाले होते. या देणगीबद्दल इंग्रजांनां गोविंदरावानें शेलुकराविरूध्द मदत मागितली पण इंग्रजांनीं त्याबद्दल टाळाटाळच केली. तथापि थोडक्याच दिवसांनीं अहमदाबाद गायकवाडच्या हातीं आलें, आबा शेलूकर कैद झाला व पेशव्यांनीं गायकवाडास आपला गुजराथेंतील हिस्सा वार्षिक पांच लाख रूपयांवर पांच वर्षांकरितां इजा-यानें दिला (१८०० ऑक्टोबर). इकडे गोविंदराव सप्टेंबरांतच मरण पावला. त्याच्या मागून त्याचा मुलगा कान्होजी हा मुतालकीचा कारभार पाहूं लागला. परंतु त्याच्या उद्दाम वागणुकीनें थोड्याच दिवसांत आरबसैन्यानें त्याला पदच्युत करून आनंदराव (त्याचा भाऊ) यास कारभारी केलें. त्यामुळें आनंदराव व त्याचा चुलता मल्हारराव यांत वैर माजलें. तेव्हां आनंदरावाचा दिवाण रावजी आप्पाजी यानें इंग्रजांकडे मदत मागितली व ती त्यांनीं दिली. यावेळीं सर्व सत्ता आरबांच्या हाती गेली होती. इंग्रजांच्या मदतीनें आनंदरावानें मल्हाररावाचा पराभव करून त्याला नडियादकडे (कडी प्रांतांत) कांही जहागीर दिली. या सुमारासच गणपतराव व मुरारराव गायकवाड यांनीं बंडाळी माजविली होती. त्यांचा पराभव होऊन ते धार येथें पळून गेले. या दोन तीन प्रसंगी केलेल्या मदतीबद्दल इंग्रजांनीं आपली तैनातीफौज गायकवाडावर रावजीआप्पाजीच्या तर्फे लादली; व तिच्या खर्चासाठीं बराचसा प्रांत घेतला; तसेंच स्वारीखर्चाबद्दलहि भरपूर पैसा मिळविला. लागलीच डंकन (गव्हर्नर) यानें रावजीशीं त्यानें केलेल्या या गोष्टींबद्दल गुप्त तह करून त्याचें व त्याच्या वंशजांचें रक्षण करण्याचें वचन दिलें. पुढें. (१८०२). गायकवाडांचें आरबसैन्य काढून टाकण्याबद्दल इंग्रजांनीं आनंदरावास लकडा लाविला. परंतु आपली बाकी दिल्याशिवाय आरब जाईनात. उलट त्यांनी आनंदरावास कैद केलें. तेव्हां इंग्रजांनीं त्याची सुटका करून आरबांची रक्कम देऊन टाकून टाकून त्यांनां काढून लाविलें. यानंतर कान्होजीनें बंड उभारलें पण तें इंग्रजांनीं मोडलें व तो उज्जनीकडे पळून गेला. इतक्यांत मल्हाररावानें पुन्हां उचल केली. पण विठ्ठलराव नांवाच्या सरदारानें त्याला कैद करून त्याचें बंड मोडलें. रावजी आप्पाजीनें गायकवाडीराज्याची सर्व सत्ता इंग्रजांच्या ताब्यांत दिल्यानें, प्रजा त्याला घरभेद्या म्हणूं लागली. परंतु इंग्रज म्हणतात कीं त्यानें दूरवर दृष्टी देऊन योग्य मार्ग स्वीकारला. यापुढें काठेवाड आपल्या ताब्यांत असावा अशी हांव इंग्राजांस उत्पन्न होऊन त्यांनीं गायकवाडाशीं १८०५ त तशा प्रकारचाएक तहहि केला.

वास्तविक सर्व काठेवाडावर गायकवाडाचा हक्क होता. रावजी मेल्यानंतर दिवाणपदाच्या बाबतींत त्याचा भाऊ बाबाजी व पुत्र सीताराम यांत भांडणतंटे सुरू झाले. (इ. स. १८०७). बाबजीस इंग्रजांची मदत होती. यानंतर आबा शेलूकरास सोडून देऊन मेजर वॉकर यानें काठेवाड आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं तिकडे स्वारी केली. बाह्यतः काठेवाडांतील गायकवाडांच्या मांडलिक संस्थानिकांनीं त्यांना द्यावयाच्या खंडणीची सुव्यवस्था लावण्यासाठीं ही स्वारी आहे असें सांगण्यात आलें. त्याप्रमाणें झालवाड, मुचकुंद, हलर, बरडा, गोहिलवाड वगैरे संस्थानिकांच्या खंडणीची कायमची व्यवस्था त्यानें लाविली. यानंतर आनंदरावानें उखामंडळांतील बंडाळी मोडली. या सुमारास सीतारामानें इंग्रज व रावजी आप्पाजी यांच्या गुप्त तहाच्या आधारावर आपल्याला दिवाणगिरी मिळविण्याबद्दल खटपट केली; परंतु वॉकरनें तहाचें भाषांतर चुकले आहे असें कारण दाखवून सीतारामाचा दावा काढून टाकला. कान्होजी हा यावेळीं बडोद्यास आला, तेव्हां त्याला कांहीं नेमणूक ठरवून पाद्गा येथें ठेविलें (सन १८०८). त्याचप्रमाणें मुकंदराव (गोविंदरावाचा दासीपुत्र) व मुरारराव (गोविंदरावाचा औरस पुत्र) यांनांहि नेमणूका ठरवून दिल्या. वॉकरनें सन १८१८ तील आपल्या खलित्यांत स्पष्ट म्हटले होतें कीं, आपण कधीं कधीं गायकवाडांच्या खासगी गोष्टींतहि हात घातलेला होता. नवानगरच्या जामनें इंग्रजांविरूध्द राजकारण केल्यानें इंग्रजांनी गायकवाडाची मदत घेऊन त्याच्यावर स्वारी केली (सन १८१२) व पोरबंदर आणि उखामंडळ यांतील बंडाळीहि मोडली. या सुमारास सीताराम यास पगाराबद्दल फौजेनें अडविलें असतां ती रक्कम इंग्रजांनीं देऊन त्याची मुक्तता केली. आणि या उपकाराची फेड सीतारामानें आनंदराव व इंग्रज यांच्यांत झालेल्या पूर्वीच्या सर्व तहाचे अस्सल कागद इंग्रजांना परत देऊन केली. कान्होजीनें पुन्हां उचल केल्यावरून त्यास पकडून मद्रासेस पाठविलें. या वेळच्या रेसिडेंटच्या खलित्यावरून इंग्रजांचें गायकवाडाकडे असलेलें कर्ज फिटल्याचें समजतें; परंतु गायकवाडींतून इंग्रज अधिकारी काढून घेण्याचा प्रसंग आला तेव्हां त्यास रेसिडंटानें कंपनींस कळविलें कीं, सन १८१६ पर्यंत कर्ज फिटणार नाहीं. या वेळींच गंगाधरशास्त्री पटवर्धन हा दिवाण होता. त्याची या रेसिडेंटानें फार तारीफ केली आहे. पुढें पालनपूर, राघनपूर, ध्रांगध्रा, जुरिया येथील संस्थानिकांनी गायकवाडाशीं नवीन तह केले. यानंतर पेशवे व गायकवाड यांच्यांत तेढ आली. गुजराथच्या इजा-याचा करार संपल्यानें तो पुन्हां करून घेण्यास गंगाधरशास्त्री पुण्यास गेला. पेशवे व गायकवाड या प्रत्येकांनीं परस्परावर (१ कोटी) कर्ज काढलें. अहमदाबाद गायकवाडास पुन्हां देण्याची पेशव्यांची इच्छा नव्हती म्हणून प्रकरण चिघळत चाललें व शेवटी गंगाधरशास्त्री यांचा खून झाला. सीतारामाचें व शास्त्र्यांचें फार वांकडे होतें त्यामुळें कांहीं लोकांचे म्हणणें असें कीं, सीतारामाच्या पक्षाकडून शास्त्र्यांचा खून झाला असावा. यावेळीं सीतारामानें धार येथें सैन्याची जमवाजमवहि केली होती. पेशव्यांनां शास्त्र्याचा खून करण्यांत मुळींच फायदा नव्हता. कारण यामुळें गुजराथ हातची जाण्याचा संभव होता. उलट त्यास बक्षीस देऊन आपलासा करण्यांत फायदा होता असें कर्नल वॉलिस म्हणतो. सीतारामास लागलीच इंग्रज शिपायांच्या देखरेखीखालीं ठेवण्यांत आल्यावरून वरील म्हणण्यास पुष्टी मिळते. इंग्रजांचें कर्ज या सुमारास फिटल्यानें कंपनीनें आपाल संबंध कमी करण्याबद्दल कार्नाक यास कळविलें, पण तें त्यानें जुमानलें नाहीं. गंगाधरशास्त्र्याचा दाब फत्तेसिंगावर फार होता; आतां फत्तेसिंग स्वतंत्रपणें वागूं लागला व त्यास आपल्यावरील इंग्रजांची सत्ता खपेना. त्यानें पसंत केलला दिवाण न नेमतां कार्नाकनें आपण ठरवलेला प्रधान त्याच्यावर लादला, त्यामुळें फत्तेसिंगाचें मन फार खट्टू झालें. पुन्हां उखामंडळांत बंड उद्भवलें, तेव्हां गायकवाडास त्या प्रांतांत सतत शांतता ठेवतां येत नाहीं या सबबीवर इंग्रजांनीं (द्वारकेशिवाय सर्व) उखामंडळ स्वतः खालसा केलें. व काठेवाडांतील सर्व संस्थानिकांच्या खंडणीवसूलाच्या कामांहि त्यांनीं आपला अधिकार यापुढें गाजविण्यास प्रारंभ केला. पुन्हां (सन १८१७) गायकवाडाशी तह करून इंग्रजांनी त्यांच्याकडून तैनाती फौजेच्या वाढीबद्दल बराचसा मुलूख हस्तगत केला. याचवेळी गायकवाडी फौजेनें इंग्रजांस पेंढार्‍यांविरूध्द सैन्याची मदत केली. पुढें (सन १८१८) फत्तेसिंग व आनंदराव (सन १८१९) दोघेहि मरण पावले. नंतर सायजीराव वारस ठरून तो गादीवर बसला. फत्तेसिंग हा शेवटपर्यंत कारभारीच होता. सयाजी हुषार होता. यानें इंग्रजांकडे आपलें सैन्य, त्यांनी माळव्याच्या लढायांत वापरल्याबद्दल रकमेची मागणी केली. तेव्हां इंग्रजांनीं उत्तर केलें कीं तुमच्या सैन्यानें आम्ही देशांत शांतता राखली, यांत तुमचाच फायदा झाला असल्यानें मोबदला कसला मागता? उलट आपलें सैन्य आम्हापाशीं माळव्यांत ठेवावें, कारण तुम्हाला त्यावरील खर्च कोठेंहि करावाच लागणार. मध्यंतरी आनंदरावाच्या राणीनें व सयाजीच्या दोन सावत्र आयांनीं आपापल्या मुलांबद्दल खटपट चालविली होती. पेशव्यांनीं इंग्रजांकडे काठेवाडांतील जमाबंदीवसुली दिली होती. त्याचा फायदा घेऊन गायकवाडांचा तो हक्क इंग्रजांनीं एकीकडे ठेवला. एवढेंच नाहीं तर खास गायकवाडांची जी मांडलिक संस्थानें होतीं त्यांतहि त्यांनी ढवळाढवळ सुरू केली. राजपिंपळा संस्थानांत वारसाच्या तंट्याचा फायदा घेऊन इंग्रजांनीं तेथची सारी व्यवस्था आपल्या तांब्यांत घेतली व फक्त दरसालची खंडणी गायकवाडांनीं घ्यावी असें ठरविलें. तसेंच गायकवाडास या संस्थानांच्या बाबतींत कठीण प्रसंगीं मदत न देतां इंग्रजांनीं आपला मात्र फायदा साधून घेण्याचा क्रम आरंभिला. पुढें एलफिन्स्टनची व सयाजीची जी भेट झाली (१८२०-२१) त्यावेळीं त्यानें सयाजीस (१) कर्जफेड करणें, (२) इंग्रजांशीं खुला व्यापार व व्यवहार ठेवणें; आणि (३) परराष्ट्रांशीं इंग्रजांच्या संमत्तीशिवाय व्यवहार न करणें, या तीन अटी सांगितल्या व या पाळल्यास गायकवाडींतील अंतर्गत कारभारांत आपण हात घालणार नाहीं असें सांगितलें. सयाजीनें हें सर्व कबूल केलें. दौलतीस यावेळीं जवळ जवळ एक कोटींचे कर्ज होतें. या सुमारास सीतारामानें पुन्हां दिवाणगिरीची खटपट इंग्रजांजवळ चालविली. परंतु ती त्यांनीं फेंटाळून लाविली. महिकांठ्यामधील गायकवाडाची जमाबंदी वसूल करण्याचें काम इंग्रजांनीं काठेवाडाप्रमाणेंच सयाजीची पर्वा न करतां आपल्या हातीं घेतलें. एवढेंच नव्हें तर महिकांठ्यांमध्यें असलेलें गायकवाडी सैन्य काढून टाकण्याचा तगादा त्यांनीं त्याच्या मागें लावला. काठेवाडालगत व महिकांठ्यांशेजारी आपली हद्द असल्यानें व तुमच्या प्रांतांत नेहमीं बंडें उत्पन्न होतात त्यामुळें ही व्यवस्था करणें आम्हास भाग आहे असें इंग्रज म्हणत. या वेळीं फत्तेसिंगाच्या बायकोनें आपल्या दत्तक पुत्राबद्दल खटपट चालविली, परंतु ती इंग्रजांनीं हाणून पाडिली. या सुमारास बडोद्याच्या रेसिडेंटास जो वरीष्ठ सरकाराचा हुकूम आला होता त्यांत सयाजीवर नजर ठेवावी व त्यानें दिलेल्या सर्व वचनांवर लक्ष्य ठेवावें, मात्र आपलें वर्चस्व उघडपणें दाखवूं नये असा मजकूर होता. पुढें (१८२१) एलफिन्स्टननें गायकवाडावर पुन्हां वीस लाखांचें कर्ज काढलें. खंबायतच्या नबाबानें वार्षिक पंचवीस हजारांची खंडणी द्यावी असें गायकवाड म्हणत व तो नाकारीत असे; शेवटीं इंग्रजांनीं मध्यस्थी करून ही रक्कम साडेचार हजार ठरविली. पुढें सायाजीरावाचें व बडोद्याच्या रेसिडेंटाचें भांडण झाले. दौलतीला जें कर्ज होतें त्या कर्जाबद्दल सावकारांनां इंग्रज हे जिम्मेदार राहिले होते. कर्ज फिटेना म्हणून रेसिडेंटानें तें सयाजीरावानें आपल्या खानगींतून द्यावें अगर सावकारांनां राज्यांतील महाल सात वर्षांच्या मक्त्यानें कर्जफेडीस लावून द्यावे असें ठरविलें. याबद्दल सयाजीनें थेट वरपर्यंत भांडण नेलें, परंतु त्याचा कांही उपयोग झाला नाहीं. उलट ही व्यवस्था अंमलांत न आणल्यास आम्हाला सर्व राज्याचा वसूल करण्याचें काम जबरदस्तीनें हातांत घ्यावें लागेल असा एलफिन्स्टननें सयाजीस दम भरला. पुढें इंग्रजांनीच नऊ महाल (पांच वर्षांपुरतें) आपल्या ताब्यांत घेऊन ही कर्जाची खटपट वारली (१८२८). ह्याशिवाय (१८२९ त) तैनाती फौजेच्या खर्चाकरितां आणखीहि कांही महाल इंग्रजांनीं आपल्या ताब्यांत घेतले. इंग्रजांचें व सयाजीरावांचें जास्त फाटत चालल्यानें खुद्द बडोद्यास सयाजीराव यांनां पदच्युत करून त्याचा मुलगा गणपतराव यास गादीवर बसविण्याचा एक कट झाला (१८३१) होता. परंतु तो उघडकीस येऊन त्याचा बीमोड करण्यांत आला. याच सुमारास मालकम हा जाऊन त्याच्या जागेवर लॉर्ड क्लेअर हा गव्हर्नर होऊन आला व त्यानें पूर्वीचें धोरण सोडून नवें सलोख्याचें धोरण स्वीकारलें. त्यावर लागलीच सयाजीरावानेंहि तडजोड करून व आपल्या खानगींतून २५ लाखांची भरती घालून कर्जदारांची फेड केली. त्यामुळें क्लेअर यानें नऊ परगणे (जे पूर्वी कर्जफेडीकरितां तारण घेतले होते) गायकवाडास परत दिले (१८३२ एप्रील). पोलिटिकल कमीशनर याच्या मनांत पांच वर्षांची मुदत भरली तरीहि ते परगणे आणीच पांच वर्षे ठेवण्याची इच्छा होतीच; पण क्लेअरनें तें ऐकलें नाहीं. तैनाती फौजेच्या खर्चाबद्दल सयाजीरावांनीं दहा लाख रू. इंग्रजांच्या स्वाधीन अगाऊच करून ठेवले (१८३३) होते. या वेळीं पुन्हां इंग्रज व सयाजीराव यांच्यांत खटके उडावयास लागले. वल्लभदास नांवाच्या अफुविक्याचा पक्ष घेऊन मुंबईचा गव्हर्नर ग्रांट यानें सयाजीरावांनां कांही जबरीच्या मागण्या केल्या होत्या. इंग्रजांच्या जिम्मेदारी माणसांनां त्रास दिल्याच्या आरोपावरून गायकवाडाच्या अंतर्गत कारभारांत ग्रांट हा वाटेल तसा हात घालूं लागला व सयाजीरावासहि नाइलाजानें त्याचें म्हणणें ऐकावें लागलें. पुढें कार्नाक हा गव्हर्नर झाला. त्यानें हिंदुस्थान सरकारच्या संमतीनें सयाजीरावांना कळविलें कीं, तुम्ही आमच्या हक्कांस व मागण्यास नाकबूल झाल्यास तुम्हांस पदच्युत करून तुमच्या मुलास गादीवर बसवूं. असें सांगूनहि इंग्रजांनीं गायकवाडाचा पेटलाद प्रांत आपल्या कबजांत घेतला (१८३८). आणि तैनाती फौजेपैकीं गुजराथ घोडदळ (सयाजीराव यांस शिक्षा म्हणून) वाढविण्यांत येऊन त्याचा सालीना तीन लाखांचा बोजा गायकवाडावर लादला (१८३९). याबद्दल सयाजीरावांनीं पुष्कळ तक्रार केली पण इंग्रजांनीं ती ऐकिली नाहीं. सयाजीरावांनीं १८४० त सतीची चाल बंद करून पुढें गुलाम विकण्याची पध्दत बंद केली (१८४७). इंग्रजांनीं अखेरीस (१८४०-४१) आपल्या अठ्ठावीस मागण्या गायकवाडांकडून कबूल करविल्या व ही बहांदारी (इंग्रजांनीं गायकवाडी प्रजेपैकीं कांहीची घेतलेली जिम्मेदारी) पध्दत एकदाची बंद केली. (१८४५ सुमार). या पध्दतीमुळें इंग्रजांनां अनायासें व वाटेल तसा आपला हात संस्थानी कारभारांत शिरकवितां येत असे. या वेळीं तत्कालीन इंग्रज अधिकारी लांच घेत. यामुळें गुजराथेंत असें लोकमत झालें होतें की, प्रत्येक इंग्रज लांचखाऊ असतो (रूलर्स ऑफ बडोदा. पृ. २२७). या लांबलुचपतीस त्यावेळीं 'खटपट' असें दरबारी नांव मिळालें होते. हा प्रकार सर जे. औटरम यास बंद करण्यास फार त्रास पडला. त्याच्या आड त्याचेच मित्र व वरिष्ठ अधिकारीहि आले होते (कित्ता). यानंतर थोड्याच दिवसांत सयाजीराव मरण पावले (दिसेंबर १८४७).

वंशावळ Insert


सयाजीराव हे नांवाजण्यासारखे राजे होते. प्रजेचे ते आवडते होते. इंग्रजांच्या पकडींतून सुटण्याचा त्यांनीं फार प्रयत्न केला. तत्कालीन इंग्रजांच्या अधाशीपणामुळें त्यांचा स्वभाव हट्टी बनला असें रूलर्स ऑफ बडोदा या पुस्तकाच्या कर्त्याचें मत आहे (पृ. २३२). इंग्रजांनीं निरनिराळ्या सबबींवर जप्त केलेला सर्व मुलूख त्यांनीं पुन्हां सोडविला. त्यांनी आपले बेत बहुतेक पार पाडले. लष्कर, सरदार, सावकार, मुत्सद्दी व प्रजा या सर्वांवर त्यांचें वजन होतें आणि शेवटीं त्यांनीं इग्रजांच्या, आपल्या संस्थानांत ढवळाढवळ करण्याच्या कृत्यास बांध घातला. त्यांनां पांच औरस पुत्र होते. पैकीं वडील गणपतराव हे गादीवर आले. हे स्वभावानें गरीब व नाकर्ते असून फारसे शिकलेले नव्हते. राज्यकारभार बहुधा दिवाणाच्या सल्ल्यानेंच चालत असे. यांनीं प्रवास बराच केला होता. यांच्यावेळीं गुजराथेंत आगगाडी सुरू झाली. गणपतरावांनीं प्रजेच्या जमीनीची नुकसानभरपाई व संस्थानाचा मार्गावरील जकातीचा तोटा हे भरून मिळण्याच्या अटीवर आपल्या राज्यांतील जमीन आगगाडीस देऊं केली (१८५६). यांचें व यांचा भाऊ खंडेराव यांचें चांगलेसें सूत नव्हतें. तांबवेकर नांवाच्या दिवाणावरून गणपतराव व रेसिडेंट औटरम यांचेंहि बिनसलें होतें. हे भांडण गव्हर्नर जनरलपर्यंत गेलें होतें (१८५४). त्यापुढें विशेष कांही न घडतां गणपतराव हे १९ नोव्हेंबर १८५६ त मरण पावले. त्यांनां पुत्र नसल्यानें त्यांच्या पश्चात त्यांचे धाकटे भाऊ खंडेराव हे गादीवर बसले (खंडेराव गायकवाड यांचें चरित्र मागें येऊन गेलें आहे तें पहा). त्यांच्या नंतर मल्हारराव हे त्यांचे भाऊ गादीवर बसले (त्यांचे चरित्र पुढें मल्हारराव पहा) आणि त्यांच्या पश्चात विद्यमान सयाजीराव महाराज हे गादीवर बसले.

याप्रमाणें या बडोद्याच्या गायकवाड घराण्याची साधारण माहिती आहे. याशिवय ग्वाल्हेर, अंतापुर, सनखेडा, कडी, खानदेश वगैरे ठिकाणीं या गायकवाड घराण्याच्या शाखा आहेत. अशा शाखांपैकीं एका खानदेशच्या शाखेंतील पिलाजीच्या प्रतापराव नांवाच्या मुलाच्या वंशांतीलच प्रस्तुतचे सयाजीराव महाराज हे दत्तक घेतलेले आहेत.

[कर्नल वॉलेस- गायकवाड ऍन्ड हिज रिलेशन्स विथ दि इंग्लिश गव्हर्नमेंन्ट, दि रूलर्स ऑफ बडोदा १८७९; ग्रँट डफ, तिन्ही भाग.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .