प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
      
गॉथ लोक- गॉथ हे टयूटन वंशाचे लोक होत. ख्रिस्ती शतकाच्या पहिल्या शतकामध्यें व्हिश्चुला नदीच्या तीरावरील प्रदेशाच्या मध्यभागांत त्यांची वस्ती होती. टयूटन वंशाच्या लोकांपैकीं, गॉथ हे अगदीं पूर्वेकडील प्रदेशांत रहाणारे लोक होते असें म्हणावयास हरकत नाहीं. बेरिग राजाच्या नेतृत्वाखालीं हे स्वीडनहून सरकत सरकत गॉथिस्कॅन्डिझा येथें आले असें जोर्डेन्स यानें म्हटलें आहे. यांचा सहावा राजा फिलिमर याच्या कारकीर्दीत सिथियाच्या प्रदेशांत यांनी आपली वस्ति केली. यापूर्वी त्यांनीं उल-मेरुगी व व्हँडाल या लोकांनां जिंकून त्यांवर आपला अंमल बसविला. वर दिलेल्या गॉथ लोकांच्या स्थानांतराची हकीकत ही प्रमाण मानतां येत नाहीं असें पुष्कळांचें मत आहे व अद्यापीहि विद्वानांत यासंबंधीं चर्चा सुरू आहे. तथापि एक गोष्ट खरी दिसते कीं ख्रिस्ती शतकाच्या आरंभी ते मारोबुडुस या मारकोमॅन्निक राजाच्या सत्तेखालीं होते. तिसऱ्या शतकांत त्यांचा रोमन लोकांशीं संबंध आला. या काळांत त्यांनीं डान्यूब नदीपर्यंतच्या सर्व टापूवर आपला दरारा बसविला होता. रोमन लोकांवर देखील त्यांनीं स्वाऱ्या करण्यास कमी केलें नाहीं. आस्ट्रोगॉथा व नीवा या राजांच्या कारकीर्दीत गॉथ लोकांनीं रोमन लोकांचा पुष्कळ ठिकाणीं पराजय केला होता. असें जोर्डेन्सनें म्हटलें आहे. रोमचा बादशहा गॅलस हा गॉथला खंडणी देत असे. डान्यूब नदीच्या कांठच्या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर, गॉथ लोकांनीं काळ्या समुद्राकडे आपला मोर्चा वळविला, व १५।२० वर्षाच्या अवधींत आशिया मायनर व ग्रीसच्या समुद्रकांठच्या प्रदेशाला त्यांनीं शह देण्यास सुरुवात केली. कॉन्स्टंटाईन दि ग्रेटच्या अमदानींत गॉथ लोकांनीं ग्रेस आणि मोडाशिया हे प्रांत लुटले. पण कॉन्स्टंटाईननें त्यांचा पराभव करून इ. स. ३३६ मध्यें त्यांनां तह करण्यास भाग पाडलें.

पण अशा रीतीनें गॉथ लोक दक्षिणेकडे व पूर्वेकडे नवीन मुलुखांवर स्वाऱ्या करून ते प्रांत आपल्या घशाखालीं घालीत होते तरी त्यांनीं व्हिश्चुला नदीच्या कांठच्या प्रदेश सोडला होता असें दिसत नाहीं. कारण कान्स्टंटाईनं राजाच्या कारकीर्दीच्या शेवटीं शेवटीं ऑस्ट्रोगॉथा यानें जेपीडेचा राजा फॅस्टिडा याजवर गेबेरिक यानें व्हँडलांचा राजा विसिमर याजवर मोठे विजय मिळविले असें जोर्डेन्स यानें म्हटले आहे. गेबेरिकच्या मागूनचा हर्मनरिक हा गॉथ लोकांचा प्रसिद्ध राजा होय. यानें रशियाच्या दक्षिण भागांतील, हरूली, ईस्टी, व्हेनेडी इत्यादि जाती जिंकल्या. पश्चिमेस होलस्टीनपर्यंत याची सत्ता प्रस्थापित झाली होती. असें अ‍ॅग्लो सॅक्सन लोकांच्या इतिहासावरून समजते. इ. स. ३७० मध्यें हूण लोकांनीं याच्या मुलुखावर स्वारी केल्यामुळें यानें आत्महत्या करून घेतली असें म्हणतात. आस्ट्रोगॉथ या नांवानें प्रसिद्ध असलेल्या गॉथ लोकांच्या राज्याचा बराच भाग हूण लोकांनीं आपल्या ताब्यांत घेतला. व्हिसीगॉथ लोकांना डान्यूब नदीच्या पलीकडे मोडाशिया प्रांतांत वसाहत करण्याला परवानगी देण्यांत आली. गॉथ लोकांपैकीं पुष्कळ लोकांनीं ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पण रोमन सुभेदारांनीं गॉथ लोकांवर जुलूम करण्यास सुरुवात केल्यामुळें सन ३७८ मध्यें अ‍ॅड्रियानोपल येथें व्हॅलेन्सचा पराजय होऊन त्यांतच त्याचा अंत झाला.

इ. स. ३७० च्या सुमारासच गॉथ लोकांचे पूर्वगॉथ व पश्चिमगॉथ असे दोन भाग झाले. पूर्वगॉथ लोक डान्यूबच्या उत्तरेकडील प्रदेशांत रहात असून त्यांच्यावर हूणांचें राज्य होतें. पश्चिम गॉथ लोकांनीं डान्यूब नदी ओलांडून रोमन प्रांतांत वास्तव्य केलें होतें. व रोमच्या इतिहासांत आपलें नांव पुष्कळ वेळां गाजविलें.

प श्चि म गॉ थ.- रोमनलोकांनीं या पश्चिमगॉथ लोकांना फार त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळें, रोमन लोकांत व या पश्चिमगॉथ लोकांत वारंवार खटके उडू लागले. याचें पर्यव- सान युद्धांत होऊन सन ३७८ मध्यें गॉथ लोकांनीं अ‍ॅड्रियानोपल येथें रोमन सरदार व्हॅलेन्स याचा पूर्ण पराभव केला. पुढें व्हॅलन्सनंतर थीओडोशिअस यानें यांच्याशीं तह करून त्यांनां शांत केलें व पुष्कळशा गॉथ लोकांनां आपल्या पदरीं नोकऱ्या दिल्या.

पण सन ३९५ मध्यें थीओडोशियस वारल्यानंतर रोमन साम्राज्यांत व पश्चिमगॉथ लोकांत पुन्हां बेबनाव उत्पन्न झाला, तेव्हां या गॉथ लोकांनीं रोमन साम्राज्याशीं असलेलें मांडलिकत्वाचें नातें झुगारून देऊन आपली स्वतंत्र सत्ता स्थापित केली व अ‍ॅलॉरिक यास आपला राजा निवडलें, अ‍ॅलॅरिक हा मोठा कर्तृत्ववान माणूस होता. याच्या कारकीर्दीत  पश्चिम गॉथ लोकांनीं स्वातंत्र्य मिळविलें. रोमन लोकांनीं अ‍ॅलॅरिक व त्याचे अनुयायी यांनां पुष्कळ आमिषें दाखविलीं. बहुमानाच्या पदव्या व जागा देऊं केल्या व अ‍ॅलॉरिकनें प्रसंग विशेषीं त्या स्वीकारल्याहि. तथापि त्यानें आपलें स्वातंत्र्य जाऊं दिलें नाहीं. आपलें कायमचें राज्य कोणत्या तरी भागांत स्थापन करण्याची कल्पना अ‍ॅलॅरिक यास फार मागाहून सुचली. आफ्रिकाखंडांत आपलें राज्य स्थापण्याची त्याची इच्छा होती असें दिसतें.

३९५-९६ मध्यें अ‍ॅलॅरिकनें ग्रीसवर स्वाऱ्या करण्यास सुरूवात केली. तसेंच त्यानें ४०२-३त इटलीवर स्वाऱ्या केल्या व इटलीची दुर्दशा करून टाकिली. अ‍ॅलॅरिक हा ४१० त मरण पावला.

अ‍ॅलॅरिकच्या मरणानंतर आटाल्फस हा गादीवर आला; व त्यानें आपल्या पराक्रमानें पश्चिम यूरोपमध्यें गॉथ लोकांचें राज्य स्थापन केलें. आटाल्फस हा महत्वाकांक्षी असल्यानें त्यानें रोमनसाम्राज्य आपल्या घशाखालीं घालण्याचा बेत केला होता. पण रोमन लोकांची संस्कृति उच्च दर्जाची  असल्याचें त्याला आढळून असल्यामुळें त्यानें रोमनराज्य जिंकण्याचा बेत सोडून दिला व रोमन लोकांशीं मैत्री संपादन करून रोमन लोकांनां रानटी लोकांच्या स्वारीचा जो त्रास होत असे त्यापासून त्यांची मुक्तता केली. या त्याच्या उपकाराबद्दल रोमन बादशहांनीं त्याला स्पेन व गॉलमधील पुष्कळ प्रदेश दिला. पश्चिमगॉथ लोकांच्या थिओडॉरिक राजानें रोमन लोकांच्या वतीनें हूण लोकांशीं लढाई केली पण त्यांत तो स्वतः मरण पावला. पुढें युरिकच्या कारकीर्दीत पश्चिमगॉथ लोकांची सत्ता स्पेनभर पसरली. याच सुमारास फ्रँक लोकांनीं कॅथालिक धर्माची दीक्षा घेतल्यामुळें त्यांनी कॅथॉलिक धर्माचा प्रसार करण्यासाठीं पश्चिमगॉथ लोकांवर स्वारी केली व त्यांचा पाडाव केला. यामुळें पश्चिम-गॉथ लोकांची सत्ता डळमळली व स्पेनमधून व गॉलमधून पश्चिमगॉथ लोकांच्या सत्तेचें उच्चाटण होतें कीं काय अशी भीति उत्पन्न झाली पण पुढें उल्लेख केलेल्या पूर्वगॉथ लोकांच्या थीओडॉरिक राजानें पश्चिमगॉथ लोकांचें स्पेनमधील अस्तित्व कायम राखिलें.

पू र्व गॉ थ लो क.- याच सुमारास पूर्वगॉथ लोकांनीं रडगैससच्या आधिपत्याखालीं इटलीवर स्वारी केली होती. हे लोक जरी आपल्याला हूण लोकांचे मांडलिक म्हणवीत असले तरी वस्तुतः ते स्वतंत्रच होते. हूणसत्तेचें ज्यावेळीं उच्चाटण झालें त्यावेळीं हे लोक स्वतंत्र झाले. पांचव्या शतकाच्या उत्तरार्धांत या पूर्वगॉथ लोकांनीं आपली सत्ता वाढवण्याचा उद्योग आरंभला होता व अमाली घराण्यांतील राजांच्या नेतृत्वाखालीं त्यांनी तत्कालीन राजकारणांत महत्वाचा भाग घेतला होता असें दिसतें. या घराण्यांतील इतिहासप्रसिद्ध राजा थिओडॉरिक दि ग्रेट हा होय. हा पहिल्या प्रतीचा मुत्सद्दी होता. तो वरपांगी रोमन लोकांशी सख्य दाखवीत असे व त्यांचें सहाय्य घेत असे. ४८८ सालीं त्यानें झेनो बादशहाच्या आज्ञेवरून ओडोएरूर राजापासून इटली जिंकून घेण्याकरितां स्वारी केली. या स्वारींत पश्चिम गॉथ लोकांनीहि त्याला मदत केली होती असें दिसतें. या लढाईंत थीओडॉरिक हा विजयी झाला व त्याची सत्ता इटली, सिसली, डालमेझिया इत्यादि देशांवर पसरली. पुढें पश्चिमगॉथ लोकांची सत्ता संपुष्टांत आल्यावर स्पेनबार व गॉलच्या बऱ्याच भागावर यानें आपली सत्ता प्रस्थापित केली.

थिओडॉरिक राजानें पूर्वगॉथ लोकांच्या सत्तेखालीं स्पेनप्रमाणेंच पुष्कळ मुलुख आणलेला होता व आपल्या बुद्धिमत्तेनें त्यांनें आपल्या हयातींत उत्तम प्रकारें राज्य केलें, पण त्याच्या मरणानंतर पूर्वगॉथ व पश्चिमगॉथ हे पुन्हां अलग आहे. थिओडॉरिक राजाच्या मागून आलेल्या राजांत थिओडॉरिकची तडफ नव्हती. त्यामुळें पूर्वगॉथ लोकांच्या सत्तेला पुन्हां उतरती कळा लागली. जस्टिनियन बादशहानें पूर्वगॉथ लोकांपासून इटली परत बळकावून घेतला. त्यामुळें पूर्वगॉथ लोकांची सत्ता जवळ जवळ नष्टच झाली. पण पश्चिमगॉथ लोकांनीं मात्र आपली सत्ता कांहीं कालपर्यंत नष्ट होऊं दिली नाहीं. पश्चिमगॉथ लोकांची सत्ता अद्यापि गॉल व स्पेनवर होती. आसपासच्या मुलुखांत मात्र कॅथोलिकपंथी गॉल लोकांचें वर्चस्व होतें. या लोकांनीं हलके हलके पश्चिमगॉथ लोकांची सत्ता नष्ट करून रोमन राम्राज्याचा विस्तार करण्याचा खटाटोप सुरू केला. तरी पण स्पेनमध्यें पश्चिमगॉथ लोकांची सत्ता पुष्कळ काळपर्यंत चालू होती. लियोव्हिजील्ड (५६८-५८६) च्या करकीर्दीत पुन्हां पश्चिमगॉथ लोकांनीं आपल्या सत्तेचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्याचा मुलगा रिकेर्ड याच्या कारकीर्दीत गॉथ व रोमन लोकांमध्यें ऐक्य करण्याचा प्रयत्न झाला. पुष्कळ गॉथ लोकांनीं  कॅथोलिक पंथ स्वीकारला. गॉथभाषेपेक्षां रोमन भाषेला प्राधान्य देण्यांत आलें. तरी पण गॉथलोकांमध्यें व रोमन लोकांमध्यें संस्कृतिभेद व वर्णभेद हा कायमच राहिला. गॉथ सरदारांनीं अद्यापि रोमन आचारविचारांचा अवलंब केला नव्हता. त्यामुळें गॉथ लोकांचें वैशिष्टय कायमच राहिलें. स्पेनमध्यें गॉथ लोकांचाच राजा राज्य करीत असे. पुढें मुसुलमानी सत्तेशीं स्पेननें जो झगडा कित्येक शतकें चालू ठेवला त्यांत या गॉथ लोकांचें पुष्कळच साहाय्य झालें. हल्लींच्या स्पॅनिश लोकांतहि गॉथ लोकांचें रक्त अद्यापि खेळत असल्याचें दृष्टीस पडतें. अशा रीतीनें इटलीमधून जरी गॉथलोकांचें पूर्ण उच्चाटन झालें तरी स्पेनमध्यें गॉथलोकांचें अद्यापहि अस्तित्व दिसून येतें.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .