प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
   
गहाणाचा कायदा भा र त व र्षी य.- प्राचीन संकृत ग्रंथांत गहाणाला आधि हें पारिभाषिक नांव आहे. आधि याची व्याख्या नारदस्मृतींत 'अधिक्रियेत इत्याधिः' अशी केली आहे. नारदानें आधी दोन प्रकारच्या सांगितल्या आहेत. (१) कृतकालापनेय आणि (२) यावद्देयोद्यत यावद्देयोधताचे गोप्य व भोग्य असे दोन प्रकार नारदानें सांगितले आहेत. याज्ञवल्क्य स्मृतींत,कालकृत व फलभोग्य असे आधीचे दोन प्रकार वर्णन केले आहेत. नारदानें सांगितलेला कालापनेय आधि व याज्ञ वल्क्याचा कालकृत् आधि हे एकच आहेत. गहाणदारानें एखादी वस्तु सावकाराजवळ कांहीं ठराविक मुदतींत कर्ज फेडण्याच्या शर्तीवर गहाण ठेवली व ठराविक मुदतीत त्यानें आपलें कर्ज फेडलें तर गहाणदाराला त्याची वस्तु परत मिळते व गहाणांतून गहाणदार मोकळा होतो.अशा प्रकारच्या गहाणास कालकृत् गहाण असें म्हणतात.यावद्देयोद्यत गहाणाचा अर्थ गहाणदार कर्ज फेडीपावेतों गहाण वस्तु सावकाराकडे राहाणें व ती त्यानें संरक्षण करणें अगर तिचा उपभोग घेणें होय. जेव्हां गहाण वस्तु नुसती संरक्षण करून ठेवावयाची त्यावेळीं त्या गहाणाच्या प्रकाराला गोप्य यावद्देयोद्यत असें म्हणतात, व गहाण टाकलेल्या वस्तूचा ज्यावेळीं सावकार हा उपभोग घेतो त्यावेळीं त्याला फलभोग्य गहाण असें म्हणतात.

याज्ञवल्क्यस्मृतीप्रमाणें ज्यावेळीं गहाणदाराच्या कर्जाची दामदुप्पट होते तरी देखील गहाणदार आपलें कर्ज फेडीत नाहीं त्यावेळेस गहाण नष्ट होऊन सावकार त्या गहाण वस्तूचा मालक होतो. 'कालकृत्' गहाणांत विशिष्ट मुदतीच्या आंत गहाणदारानें कर्ज न फेडल्यास तें गहाण नष्ट होतें.पण फलभोग्य 'गहाणांत' मात्र गहाण कधींच नष्ट होत नाहीं.फलभोग्य 'गहाणांत' मुदलावर व्याज चालू रहात नाहीं. सावकाराजवळ असलेली गहाणवस्तु जर दैववशात किंवा युध्दादि राजव्यापार या कारणांशिवाय अन्य कारणानें म्हणजे स्वतःच्या हलगर्जीपणानें अगर दुरुपयोगामुळे अर्धवट अगर पूर्णपणें नष्ट झाली तर सावकारानें ती वस्तु गहाणदाराला भरून दिली पाहिजे असें याज्ञवल्क्य म्हणतो. गहाणवस्तु सावकारानें स्वीकारीपावेतों गहाण पूर्ण झालें असें म्हणतां येत नाहीं. गहाणवस्तु जर फलभोग्य नसेल म्हणजे त्या वस्तू पासून सावकाराला कांहीच फायदा होत नसेल तर गहाण दारानें दुसरी वस्तु गहाण ठेवली पाहिजे, अगर एक वर्षाच्या व्याजासहित मुद्दल तरी देऊन टाकलें पाहिजे, अगर एक वर्षाच्या व्याजासहित मुद्दल तरी देऊन टाकलें पाहिजे असें याज्ञवल्क्य म्हणतो (या. स्मृ. व्यवहाराध्याय प्रकारण ३, श्लोक ६०)जेव्हां स्वतःच्या जबाबदारीवर म्हणजे स्वतःचे चरित्र गहाण टाकून गहाणदार सावकाराकडून कर्ज घेतो त्यावेळीं गहाण दारानें, मूळ मुद्दल व्याजासह सावकाराला दिलें पाहिजे.
गहाणदारानें रक्कम परत केल्यास गहाणवस्तु सावकारानें गहाणदाराला परत केली पाहिजे, नाहींतर तो स्तेन म्हणजे परकीय वस्तु अपहार करणारा ठरतो व शिक्षेस पात्र होतो असें याज्ञवल्क्य म्हणतो. सावकार हा गहाणदारानें कर्ज फेडण्यापूर्वी मरण पावला असेल तर गहाणदारानें त्याच्या वारसाजवळ आपलें कर्ज देऊन टाकून त्याच्या पासून गहाणवस्तु घ्यावी पण सावकार जर परगांवी गेला असेल तर गहाणदारानें व्याजासहित आपल्या कर्जाच्या रकमेचें मूल्य ठरवून ती सर्व रक्कम सावकाराच्या वारसाजवळ द्यावी व सावकार गांवीं आल्यावर गहाणवस्तु अगर वस्तूची किंमत सावकारापासून घ्यावी अशी चाल असे.स्वतः कर्जदारच जर जाग्यावर नसेल अगर त्याचे वंशज जर सांपडत नसतील तर सावकारानें कांही लोकांनां साक्षी ठेवून गहाणवस्तु विकून त्यांतून आपली रक्कम फेडून घेण्याची वहिवाट असे. ज्यावेळीं गहाणदारानें कर्जाच्या दुप्पट रकमेइतका फायदा उपभोगण्याची शर्त पुरी होईतों गहाणवस्तु ठेवण्याचें कबूल केलें असेल त्यावेळीं तितक्या रकमेच्या इतका फलभोग होताच सावकारानें ती वस्तु गहाणदाराला परत केली पाहिजे असें याज्ञवल्क्यानें म्हटले आहे.

याज्ञवल्क्य स्मृतीच्या पूर्वी होऊन गेलेल्या स्मृतींपैकीं पुष्कळ स्मृतींत गहाणासंबंधीं सांगोपांग विचार केलेला आढळत नाहीं. मनु अगर कौटिल्य यांच्या ग्रंथांतहि गहाणा संबंधी फारसा उल्लेख आढळत नाहीं. खुद्द याज्ञवल्क्य स्मृतींत गहाणासंबंधीं पूर्ण विवेचन आढळत नाहीं. तथापि तत्कालीन परदेशीय कायद्यांपेक्षां याज्ञवक्ल्याच्या वेळीं हिंदुस्थानात गहणासंबंधीं आधिक विचार झाला होता असें आपणाला म्हणतां येतें.

ब्रिटिश हिंदुस्थानांतील गहाणाचा कायदा.– ब्रिटिश हिंदुस्थानांतील गहाणाच्या कायद्यांत इंग्लंडमधील गहाणाच्या कायद्याची तत्वें दृष्टीस पडतात; व असें होणेंहि अपरिहार्य आहे. ब्रिटिशांचें येथे राज्य सुरू झाल्यावर इकडे जे यूरोपिय अगर इंग्रज न्यायाधीश आले त्यांनां इंग्लिश कायद्यांची पूर्ण माहिती असे व त्या कायद्यांतील तत्वांशीं त्यांचा परिचय असल्यामुळें न्याय देतांना ते हिंदुस्थानांतील पूर्वकायद्यांकडे फारसें लक्ष न देतां आंग्ल कायद्यांतील तत्वांच्या व कायद्यांच्या आधारें न्यायनिवाडा करीत. त्यामुळें हल्लीचा गहाणाचा कायदा हा हिंदू व इंग्लिश 'गहाणासंबंधीच्या' कायद्याची भेसळ आहे असें आपल्यास म्हणतां येईल.

हल्लीच्या गहाणाच्या कायद्याप्रमाणें गहाणाचे मुख्यतः पांच प्रकार आहेत, ते असे. साधें गहाण (सिंपल मॉर्टगेज शर्तीचें खरेदीखत (मॉर्टगेज बाय कंडिशनल सेल) मोगवट अगर वहिवाटगहाण, अगर कब्जा गहाण (युसुफ्रक्टयुअरी मॉर्टगेज); इंग्लिश पद्धतीचें गहाण इंग्लिशमॉर्टगेज); व इंक्किटेबल मॉर्टगेज.

साधें गहाण अगर सिंपल मॉर्टगेजमध्यें, गहाणदार स्वतःच्या अंगावर आपली जिंदगी सावकाराला गहाण टाकतो. या प्रकारांत जिंदगीचा कबजा सावकाराकडे जात नाहीं ठराविक मुदतींत जर गहाणदारानें कर्जाची रक्कम परत केली नाहीं तर कोर्टाच्यामार्फत या जिंदगीची विक्री करून त्यांतून आपली रक्कम सावकाराला फेडून घेतां येतें अगर त्याच्या मनांत असल्यास गहाणदारावरच खुद्द फिर्याद करून त्याला अडकवून ठेवतां येतें. तशी स्थिति शर्तीचें खरेदीखत अगर (मॉर्टगेज बाय कंडिशनल सेल). मध्यें होत नाहीं.या खरेदीखताच्या प्रकारांत गहाणदार हा सावकाराला गहावट वस्तु तात्पुरती विकतो; पण ठराविक मुदतींत कर्ज फेडल्यास गहाणदाराला वस्तु परत मिळतें. तसें न झाल्यास मात्र सावकार हा त्या वस्तूचा कायमचा मालक बनतो. कबजागहाणांत सावकाराच्या ताब्यांत गहाणवट वस्तु जाते व कर्ज फिटेंपावेतों तो तिचा उपभोग घेतो. कबजा गहाणांत कर्जावर बहुधा व्याज चढत नाहीं. कर्जफेड झाल्यावर सावकाराकडून ती वस्तु गहाणदार परत घेतो. इंग्लिश पद्धतीच्या गहाणाविषयीं व इक्किटेबल मॉर्टगेजविषयीं खालीं विवेचन आलेंच आहे. ‘इक्किटेबल मॉर्टगेज’ हें कराची,मूलमिन, रंगून, वसई व अक्याव, मुंबई, मद्रास, कलकत्ता इत्यादि ठिकाणी प्रचारांत आहे.

ग हा ण दा रा चे ह क्क- गहाणदाराला हक्कांमध्यें प्रमुख हक्क म्हणजे वेळेवर रक्कम फेडून गहाण सोडविणें हा होय.गहाणवट वस्तु ही सावकाराच्या कबजांत असेल तर गहाण दाराला ती कर्जफेडीनंतर परत मागण्याचा हक्क आहे. दोन वस्तु निरनिराळया कर्जासाठीं गहाणदारानें गहाण टाकल्यास यापैकीं कोणतीहि एक वस्तु त्या वस्तुवरील कर्ज फेडून टाकून सोडविण्याचा त्याचा हक्क आहे. दोन्ही वस्तु एकसमयावच्छेदें करूनच सोडविल्या पाहिजेत असा सावकाराला आग्रह धरतां येणार नाहीं. गहाणाच्या मुदतींत जर गहाणवट वस्तूची वाढ झाली असेल व ती विभाज्य नसेल तर त्या वाढीचा मोबदला घेऊन वाढीसकट ती वस्तू सावकारानें गहाणदाराला दिली पाहिजे. पण जर वाढ विभाज्य असेल तर ती सावकाराला आपल्याकडे ठेवतां येते गहाण वस्तु सोडविण्याच्या बाबतींत अतिशय जाचक अटी घालणें हें बेकायदेशीर आहे. गहाणवट वस्तु ऐन जिनसी सोडविली पाहिजे. खंडश: रकमेची फेड करून त्या त्या प्रमाणांत गहाणवट वस्तूवरील बोजा गहाणदाराला कमी करतां येत नाहीं. १०० रुपये किंमतीहून अधिक किंमत असलेलें गहाणखत नोंदविलेंच पाहिजे असा नियम आहे.

ग हा ण दा रा ची जो खी म- गहाणदारानें जी वस्तु गहाण टाकली असते ती त्याच्या मालकीची असली पाहिजे.ती जर तशी नसेल तर सावकाराला आपली रक्कम नुकसान भरपाईसकट भरून घेण्याचा हक्क पोहोंचतो. गहाण वस्तूची मालकी सिध्द करण्याकरितां लागणारा सर्व खर्च गहाणदारानें सोसला पाहिजे. गहाण वस्तूवर सरकाराला सारा, कर वगैरे द्यावयाचा उरला असेल तर तोहि गहाणदाराला द्यावा लागतो. गहाण वस्तु तत्पूर्वी दुसऱ्या सावकाराला गहाण टाकली असेल तर त्या वस्तूवरील व्याज वगैरे वेळेवर देणें हे गहाणदाराचें कर्तव्य आहे.

सा व का रा चे ह क्क व क र्त व्यें.- मुदत टाळल्यानंतर गहाण वस्तूची विक्री करण्याचा अगर शर्तीत ठरल्याप्रमाणें आपल्याकडे ठेवण्याचा सावकाराला हक्क असतो. कर्जाबद्दल फिर्याद करण्याचा, कोर्टाच्या परवानगीशिवाय कांही बाबतींत गहाण वस्तूची विक्री करण्याचाहि सावकाराला हक्क आहे.गहाण वस्तु जपून वापरणें, त्याच्यावरील सरकारी कर देणें,गहाणाचा चोख हिशेब ठेवणें व कर्जफेडीनंतर गहाण वस्तू ज्याची त्याला परत देणें ही सावकाराची कर्तव्यें आहेत.

इं ग्लि श ग हा णा चा का य दा.- गहाण म्हणजे जिंदगीच्या तारणार अशा रीतीनें कर्ज काढणें कीं ठरलेल्या मुदतींत कर्जदारांनी कर्ज न फेडलें तर गहाण सोडविण्याचा हक्क रद्द करण्याचा किंवा जिंदगी विकून आपलें कर्ज फेडून घेण्याचा हक्क साकारास प्राप्त होतो. इंग्रजी कायद्यांत गहाणाचें कार्य शर्तीच्या खरेदीनें करण्याची योजना आहे. म्हणजे मूळचा व्यवहार खरेदीचा धरून ठरलेल्या मुदतींत कर्ज परत केलें तरच गहाणासारख्या खरेदींतून जिनगी मुक्त करून घेण्याचा हक्क ठरलेला असतो. परंतु गहाण ठेवण्याचा व खरेदी देण्याचा यापैकीं मूळचा हेतू कोणता याविषयीं लबाडी करण्यास जागा राहूं नये म्हणून कायद्यानें या बाबतींत पुष्कळसे निर्बंध घातले आहेत.

या विषयावरील रोमन लोकांच्या कायद्यांत तीन अवस्था स्पष्टपणें दिसून येतात. पहिल्या अवस्थेंत,कर्ज फेडल्यावर जिनगी फिरून मूळ मालकाच्या नांवावर चढवून देईन या अटीवर खरेदीचा व्यवहार होत होता. दुसऱ्या अवस्थेंत, जिंदगी सावकाराकडे जात नसे. फक्त ताबा मात्र त्याजकडे जाऊन वेळवर कर्ज न फिटलें तर जिंदगी विकण्याचा वगैरे हक्क सावकारास प्राप्त होत असत. तिसऱ्या अवस्थेत जिंदगीचा ताबाहि सावकाराकडे न जातां मुदतींत कर्ज न फिटलें तर जिंदगी कोणाच्याहि ताब्यांत असली तरी तिला विकावयास काढण्याचा सावकारास हक्क प्राप्त होत असे.

गहाणाचा इंग्रजी कायदा हा दोन परस्पर भिन्न कायद्यांतून निघाला आहे. त्याचें मूळ व स्वरूप हें सामान्य कायद्यांतून घेतलें आहे. गहाण टाकलेली जिंदगी ही कर्जाबद्दल तारण होय अशाविषयीं घातलेले निर्बंध न्यायबुध्दीच्या (इक्किटी) कायद्यांतून घेतलेले आहेत. सामान्य कायद्या (कॉमनलॉ) च्या दृष्टीनें गहाण टाकलेल्या जिंदगीचा सावकार हा मालक असतो.न्यायबुध्दीच्या कायद्यानें गहाणदार हा मालक राहून सावकाराचा फक्त जिंदगीवर बोजा असतो. गहाणखताच्या शर्तीप्रमाणें रद्द झालेला गहाण सोडविण्याचा हक्क यास “न्यायबुध्दीच्या कोर्टानें दिलेली गहाण सोडविण्याची सवलत” असें म्हणतात. आपआपसांत केलेला कसलाहि करार या गहाण सोडविण्याच्या कोर्टाच्या सवलतीच्या आड किंवा गहाणदाराच्या अशी सवलत मिळविण्याच्या आड येऊं शकत नाहीं. ही न्यायबुद्धीच्या कोर्टानें दिलेली सवलत जरी पहिल्यानें गहाणदारास मिळत असें तरी ती पुढें गहाणदाराच्या वारसांसहि मिळूं लागली. गहाणखतांत कसलीहि भाषा वापरली असली तरी गाणदार हाच मूळ जमिनीचा मालक रहातो व सावकार यास त्यानें दिलेल्या कर्जामुळें कांहीं हक्क प्राप्त होतात. व्यवहार खरेदीचा होता कीं गहाणाचा होता असा प्रश्न उपस्थित झाला तर कोर्टानें व्यवहाराच्या एकंदर सर्व गोष्टी ध्यानांत घेऊन जर त्यास जिंदगी ही कर्जाबद्दल तारण म्हणून लावून दिलेली होती असें आढळून आलें तर तो व्यवहार गहाणाचा होता असा निकाल द्यावा. याप्रमाणें जर१)मिळकतीची किंमत व दिलेली रक्कम यांत कांहींच मेळ नसेल (२) पैसे देणारास एकदम ताबा देण्यांत आला नसेल (३) कर्जावरील व्याजायेवढी रक्कम बाद करून जर जिंदगीच्या उत्पन्नाचा हिशेब देण्यांत येत असेल (४) खतपत्राचा खर्च जर जिनगी देणारानें सोसला असेल तर तो व्यवहार खरेदीचा दिसत असला तरी गहाणाचा असला पाहिजे असें धरण्यास जागा आहे. आणि "एक वेळ गहाण तें कायमचेंच गहाण" या तत्त्वास बाध येत नाहीं.ठरलेल्या मुदतींत कर्ज न फिटलें तर, अमुक एका मुदतींत व्याज व खर्चवेंच यांसह कर्ज परत न केलें तर गहाण सोडविण्याची सवलत रद्द होईल अशा तऱ्हेची मागणी सावकारानें करावी. याउपर दिलेल्या मुदतींत कर्ज न फिटलें तर त्यायोंगे सावकार जिंदगीचा मालक होईल; परंतु गहाण सोडविण्याची सवलत रद्द करण्याच्या फिर्यादींत कोर्टानें कोणत्याहि एका पक्षाच्या विनंतीला अनुसरून जिंदगीचा लिलाव करण्याविषयीं हुकूम करावा. अशा रीतीनें जिंदगीची विक्री झाल्यावर जी किंमत वसूल होईल तिच्यांतून मुद्दल, व्याज व खर्च सावकाराच्या पदरांत टाकून उरलेली रक्कम अर्थात गहाणदाराची असते. खतांत नमूद केलेल्या वेळेच्या आंत सावकारास कर्ज परत घेण्यास भाग पाडतां येत नाहीं. व ठरलेल्या वेळीं जर कर्ज परत केलें नाहीं तर कर्ज परत करण्याचा आपला विचार असल्याबद्दल सावकारास सहा महिन्यांची अगाऊ नोटिस द्यावी लागते. त्यायोगानें सावकारास आपली रक्कम कोठें व्याजी लावावी याची योजना ठरवून ठेवितां येते.

जेव्हां एकच जमीन निरनिराळ्या वेळीं निरनिराळ्या सावकारांकडे गहाण टाकलेली असेल त्यावेळीं त्यांचे हक्क त्यांच्या व्यवहारांच्या कालक्रमाप्रमाणें अस्तित्वांत येतात.परंतु गहाणाच्या कायद्यांत जी न्यायबुद्धीच्या कायद्याचीं तत्वें प्रविष्ट होतात त्यायोगानें वरील नियमांत महत्वाचा बदल झाला आहे. जेव्हां एकामागून एक अशा अनेक सावकारांचे बोजे एखाद्या जिंदगीवर चढतात तेव्हां आद्य सावकाराचा बोजा तेवढा कायदेशीर असतो. त्याचप्रमाणें जेव्हां दोन सावकारांचे हक्क इतर बाबतींत अगदीं तंतोतंत असतील तेव्हांहि न्यायबुद्धीच्या कायद्याच्या तत्वाला अनुसरून कालगणनेनें पहिल्या सावकाराचा हक्कच तेवढा शाबीत धरला जातो. जसें:- कर्ज देतांना नं. २ च्या गहाणदाराच्या गहाणाच्या अस्तित्वाबद्दल जर नं. ३ च्या गहाणदारास नोटीस नसेल तर दोघांचे हक्क सारखेच समजण्यांत येतात व दुसरी एखादी गोष्ट आड येत नसेल तर कालगणनेनें ज्याचा व्यवहार आधींचा त्याच्या तर्फे निकाल देण्यांत येतो. परंतु जर नं. ३ च्या गहाणदारानें नं. १ च्या गहाणदाराचा हक्क बेचन करून घेतला असेल तर त्याला आपल्या व्यवहाराचा संबंध पहिल्याशीं चिकटवून नं. २. च्या गहाणदारावर नंबर पटकावितां येतो आणी जर नंबर एकचागहाणदार नं. २ च्या गहाणदाराच्या गहाणाची माहिती नसतां अगोदर दिलेल्या कर्जापेक्षां अधिक कर्ज देईल तर नं. २ च्या गहाणदाराच्या आधीं त्याच्या सर्व बोजाचा हक्क धरण्यांत येतो.

अशाच तऱ्हेचा परिणाम जेव्हां निरनिराळीं तारणें एकत्रित करतात तेव्हांहि दिसून येतो. उदाहरणार्थ एकाच गहाणदारानें एकाच सावकाराकडे निरनिराळ्या वेळीं निरनिराळ्या कर्जांकरितां दोन स्वतंत्र जिंदग्या गहाण टाकल्या तर त्या दोन्ही जिदग्यांच्या गट केला जातो. (कन्सॉलिडेटेड) म्हणजे एकंदर कर्जाबद्दल दोन्ही जिंदग्या मिळून तारण होतात व दोन्हीं कर्जे फेडीपर्यंत गहाणदारास कोणतीच जिंदगी सोडवितां येत नाहीं. जर गहाणदारानें एखाद्या जिंदगीवर तिच्या किंमतीपेक्षां अधिक कर्ज काढलें असेल तर अपुरें तारण असलेल्या सावकारानें नं. १ च्या गहाणाचें बेचन घेऊन ते आपल्या व्यवहाराशीं सांधून टाकावें आणि अशा रीतीनें नं. २ च्या गहाणदारावर मात करावी

मालकीहक्काच्या कागदपत्रांच्या ठेवीवर कर्ज काढलें तर त्यास 'न्यायबुद्धीस मान्य असलेलें गहाण' (एक्किटेबल मॉर्टगज) असें म्हणतात.कायद्याप्रमाणें तर गहाणाच्या व्यवहाराबद्दल लेखी खत केलेंच पाहिजे असा निर्बंध आहे, तर मग केवह कागदपत्रांच्या ठेवीवर हें गहाण कसें मान्य झालें? सामान्य कायद्याच्या कोर्टांत अशा तऱ्हेनें तारण म्हणून ठेवलेले मालकीहक्कदर्शक कागदपत्र परत मिळविण्यास मार्ग नसे; त्याकरितां न्यायबुद्धीच्या कोर्टांत मात्र मार्ग मोकळा होता व तेथें फिर्याद केली असतां कर्ज परत केलें तर कागदपत्र परत मिळतील असा निकाल देण्यांत येई. अशा तऱ्हेनें कागदपत्र ठेवीस ठेवून कर्ज काढलें आहे असें माहीत असून जर एखाद्या सावकारानें एखादी जिंदगी खत करून गहाण ठेवली तर अशा कायदेशीर सावकारापेक्षां कागदपत्रांच्या ठेवीवर कर्ज देणा-या सावकारास हक्क अधिक धरला जातो.कायदेशीर गहाणदारानें जरी कागदपत्रांचा तपास केला नसला तरी जर तपासाअंतीं त्यास ते कागदपत्र कोठें ठेव म्हणून ठेवले आहेत हें माहींत होण्यासारखें होतें म्हणून तसलें ज्ञान कोर्ट त्याच्या माथी मारतें.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .