विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गलगनाथ- मुंबई इलाखा. धारवाड जिल्हा. करजगीच्या ईशान्येस सुमारें २० मैलांवर तुंगभद्रेच्या वामतीरावर हा गांव आहे. येथें गर्गेश्वर आणि हनुमान यांचीं देवळें आहेत. गर्गेश्वर देऊन वर्धा नदी व तुंगभद्रा नदी यांच्या पवित्र संगमावर बांधले असून देवळांत इ. स. १०८० आणि ११४७ सालचे दोन शिलालेख आहेत. हनुमानाच्या देवळांत इ. स. १०११ सालचा एक वरिक्कल आहे.