विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे      

गरवा- बिहार- ओरिसा. पालामाऊ जिल्ह्यांतील दानरो नदीवरील शहर. येथें वस्ती सुमारें चार हजार आहे. जिल्ह्यांतील व सुरगुजा संस्थानांतील बाहेर जाणाऱ्या मालाचा व्यापार येथूनच चालतो. निर्यात मालामध्यें लाख, चामडीं, तूप, कापूस, लोखंड वगैरे असून आयात मालांत मुख्यतः धान्य, पितळी भांडी, कपडे, ब्लँकेटें, मीठ, तंबाखू, मसाला वगैरे येतात. उन्हाळ्यांत दानरो नदीच्या वाळवंटांत बाजार भरतो.