प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
    
गया जिल्हा- बिहार- ओरिसा. पाटणा विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ४७१२ चौ.मै.लो.सं. (१९२१) २१५२९३० जिल्ह्याचा दक्षिण भाग उंच आहे. या भागांत टेंकडयांच्या बऱ्याच रांगा आहेत. दुर्वास, महाबर वगैरे टेंकडया मुख्य असून जास्तींत जास्त उंची २२०२ फूट इतकी आहे. जेठवण टेंकडया बुद्धगयेजवळ आहेत. उत्तरभागाला उंची कमी होत जाते व म्हणून बहुतेक नद्या उत्तरवाहीनी आहेत. धनराजी, तिलया, फल्गु, यमुना पुनः पुना ह्या मुख्य नद्या आहेत. यांपैकी दोन गंगेला मिळतात. बाकिच्यांचें पाणी शेतीच्या उपयोगाकडे लाविलें जातें. फल्गु व पुनःपुना या नद्या तीर्थें म्हणून मानल्या असून बुद्धगयेचीं यात्रा यांचें स्नान केल्याशिवाय पूर्ण होत नाहीं. शोण नदी मोठी व विशाल आहे. पण ती उन्हाळ्यांत कोरडी व पावसाळ्यांत फार ओढीची म्हणून वहातुकीच्या फारशी कामीं येत नाही. बरून व देहरी हीं दोन गांवें दगडी फरशीनें जोडलीं असून फरशीच्या थोडें वर शोणकालव्याकरितां बांधलेलें धरण आहे व खालच्या बाजूस जगांतील अत्यंत लांब पुलांपैकीं एक रेल्वेचा पूल शोण नदीवर बांधिला आहे. यास १०० फूट रुंदीच्या ९८ कमानी आहेत. पूल बहुतेक लोखंडी असून खालीं आधाराला दगडी बांधकाम आहे.

उत्तरेकडील भागांत तांदूळाच्या शेतांत आढळणारी गवतें आढळतात. खेडयांच्या आसपास आंब्याची व इतरहि बरींच उपयुक्त झाडें असतात. येथें सरकारी राखीव जंगल नाहीं. तरी पण दक्षिण भागांत अत्यंत घनदाट अरण्यें आहेत. सर्पण विपुल आहे. लाखेच्या उद्योगापासून जमीनदारांनां बरेंच उत्पन्न आहे. मुख्य झाडें पिंपळ, निंब, वड, मोह, जांभूळ, शिसवी, चिंच, साग वगैरे आहेत. पावसाळ्यानंतर चित्रविचित्र फुलझाडें उगवतात व एक प्रकारच्या रानमनुका आणि इतर फळझाडें उगवतात व कित्येक गरीब लोकांचा त्यांवरच निर्वाह होतो.

वाघ, अस्वल, रानडुक्कर वगैरे प्राणी बरेच आहेत. सांबर, हरणांच्या कांहीं जाती, काळवीट वगैरेहि दिसतात. लांडगे अगदींच कमी आहेत. नीलगाई तुरळक आहेत. बदकांच्या बऱ्याच जाती आहेत.

समुद्रापासून दूर अंतरावर असल्यामुळें येथें ॠतुमान फार कडक असतें. मेमध्यें १५० पर्यंत उष्णता जाते, व या महिन्यांत साधारण उष्णमान ९३ चे असतें. उन्हाळ्यांत हवेची आर्द्रता ५१ असते. पावसाचें मान ४२ इंच आहे. टेंकडयांतून वगैरे पाऊस फार झाल्यानें नद्यांनां पूर येतात, कालवे फुटतात, व नद्यांच्या बाजूच्या खेडयांना धोका येतो. १८९६ मध्यें साकरी व १९०१ मध्यें शोण नद्यांनीं असेंच नुकसान केलें.

पाटणा व शहाबाद जिल्ह्यांतील कांही भाग व हा जिल्हा पूर्वी मगधांच्या राज्यांत होता. मुसुलमानांच्या वेळीं बिहार सुभ्यांत याचा समावेश झाला होता व १७६५ सालीं तो इंग्रजांच्या हातांत आला व पाटणा हें मुख्य ठिकाण झालें. १८६५ सालीं पाटणापासून गया जिल्हा स्वतंत्र करण्यांत आला. सर्व जिल्हाभर जुने अवशेष सांपडतात. विशेषतः बौद्ध धर्मीयांचे त्यांत फार आहेत. ठिकठिकाणीं बुद्धाच्या सुंदर मूर्ती व गुहा असून बुद्धधर्मकालीन मोठीं व महत्वाचीं अशीं ठिकाणें या भागांत आहेत. जेठवन खेडें हें पूर्वीचें यष्टिवन व धांगरा टेंकडया म्हणजे प्राक्बोधीपर्वत होय. याच पर्वतांतील गुहेंत गयेला जाण्यापूर्वी बुद्धानें विश्रांति घेतली होती. वरार टेंकडयांवर कोवाडोल येथे पूर्वीचा शिलाभद्र मठ असावा. इतरहि बऱ्याच ठिकाणीं कांही मोडकीं तोडकीं व कांही शाबूत बुद्धाचीं देवळें आहेत व कांहीं ठिकाणीं जैन आणि हिंदु देवळांचे अवशेष सांपडतात. गुणेरी येथें श्री गुणाचरित मठ होता. पुनावत (पुण्यवती)पासून दोन मैलांवर असलेला हसरा डोंगर हाच पूर्वीचा कुकुट पादगिरी असावा असें म्हणतात.

गया हें मुख्य ठिकाण असून तेथें तेकारी आणि दाऊदनगर येथें म्यु. कमेटया आहेत. औरंगाबाद नवाडा व जहानाबाद हीं मोठीं शहरें आहेत. मुख्य भाषा मागधी आहे. मुसुलमान लोक अयोध्येकडील हिंदी भाषा बोलतात. शेंकडा ६५ लोक शेती, १४ उद्योगधंदे, ०.६ व्यापार व १.९ इतर बौद्धिक धंद्यांवर रहातात.

उत्तरभागांतील जमीन सपाट असून ती बहुतेक लागवडीखाली आहे. दक्षिणेकडे टेंकडया व जंगलें यामुळें शेती जोगी जमीन कमी आहे पण रेल्वे व दळणवळणाचीं इतर साधनें यांच्या वाढीबरोबर तिकडेहि जमीन सुधारणा व वाढ होण्याचीं चिन्हें दिसत आहेत. ४७१२ चौ. मै. पैकीं प्रत्यक्ष लागवडीखाली २७१५ चौ. मै. आहे व २००० चौ. मै. लागवडींत येण्याजोगी आहे. एकंदर लागवडीच्या जमीनींपैकी १/४ इतकी सरकारी व खासगी कालवे पाट वगैरे साधनांनीं भिजत असून त्यांतील ८५ मैल सरकारी कालव्यांनीं भिजते. मुख्य उत्पन्न तांदूळ असून त्याखालीं अर्ध्याहून अधिक जमीन येते. येथें दुष्काळाची सहसा बाधा होत नाहीं. याचें कारण येथें कालवे, पाट वगैरे बरेच असून जमीनीची मशागत करण्यांत येथील लोक फारच श्रम घेतात.

येथील जनावरें आकारानें लहान पण मजबूत आहेत. दक्षिणेकडे वनचराईची जमीन पुष्कळ आहे. पण इतर ठिकाणीं बहुधा कडवा वगैरेचे तोडून घालतात. गरेह जातीचे लोक मेंढया पाळतात. व त्यांच्या लोंकरीपासून गालीचे व घोंगडया होतात. गया हें यात्रेचें ठिकाण असल्यानें तेथें व इतर ठिकाणीं गुरें बाजारांत येतात. गया येथें गुरांचा दवाखाना आहे.

सरकारी शोणभद्र कालव्याच्या पाटणा व मोंगीर कालवा अशा दोन शाखा आहेत. पश्चिमेकडेहि दोन शाखा आहेत. याशिवाय या ठिकाणीं हंगामी तलाव आहेत व त्यांतूनहि पाण्याचा बराच पुरवठा होतो. या पद्धतीला 'जेनराबंदी' म्हणतात. व त्याचाहि बराच उपयोग करतात.

खनिज पदार्थांत मुख्य अभ्रक आहे. याच्या बऱ्याच खाणी आहेत. एक जातीचा काळा दगड गयेचा म्हणून प्रसिद्ध आहे. तो कोरीव कामाला चांगला असून त्याच्या मूर्ती, भांडी, दागिने वगैरे करतात. मातकामाची माती व चुन्याचा दगड हीं बऱ्याच ठिकाणीं सांपडतात व सोरा जहानाबादमध्यें तयार करतात. येथें लाख, साखर, कपडा, पितळी भांडी व लोंकरी घोंगडया वगैरेंचे कारखानें आहेत. अरवल येथें पूर्वी चांगला व पुष्कळ कागद तयार होत असे. आतां तो धंदा अगदीं नाहींसा झाला आहे व शुद्ध साखरेचा धंदाहि उतरत्या प्रमाणानेंच चालत आहे. मानापूर येथें रेशमी कपडा होतो. पूर्वी येथें खोदकाम उत्कृष्ट दर्जाचें होत असे व त्याचे नमुने जुन्या कामावरून दिसतात. पण आतां हें काम जाणणारे लोक अगदीं थोडे उरले आहेत. येथें दरसाल ५०००० मण लाख तयार होते व कलकत्याला जाते. निर्यात मालांत धान्यें, मिरीं, भांडीं, गूळ, तंबाखू, विडयाची पानें वगैरे मुख्य असून मीठ, कोळसा, कापूस, लांकूड, कपडा, फळें, राकेल, कागद वगैरे जिन्नस आयात मालांत मुख्य आहेत. सर्व व्यापार कलकत्याशीं चालतो. पण गूळ मात्र मध्यप्रांत, वऱ्हाड, राजपुताना व मध्यहिंदुस्थान येथें फार जातो. नवे नवे रस्ते बनत आहेत व व्यापाराचा ओघ रेल्वेरस्त्याकडे साहजिकच येत आहे. अंतर्भागांत सपाटीवर गाडयांतून व टेंकडयांतून बैलांवरून व्यापार चालतो. रेल्वेच्या ६ लहान शाखा आहेत. बैलगाडीचे व पायरस्तेहि बरेच व चांगले आहेत. २०२ मैल पक्की सडक असून ७१५ मैल कच्ची सडक व ६२८ मैल साधा रस्ता आहे. पाटणा कालव्यांतून एक बोट दर आठवडयास जाते. ठिकठिकाणीं द्यांवर पुलांची योजना नसेल तेथें होडयांची योजना केलेली आहे. गया जिल्ह्याचे ५ तालुके पाडले आहेत. तीन म्यु. कमिटया असून डिस्ट्रिक्ट व तालुकबोर्डे हीं आहेत. गया जिल्हा शिक्षणाच्या बाबतींत मागासलेला आहे. शेंकडा ३-६ (७.२ पुरुष व ०.२ स्त्रिया) वाचणारांचें प्रमाण पडतें.

ता लु का.- गया जिल्ह्यांतील मुख्य तालुका क्षेत्रफळ ४२५ चौ. मै. लोकसंख्या इसवी सन (१९११) १९,१,४८४.

श ह र.- गया जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. उ. अ. २४ ४९’ व पू. रे. ८५ १’. हें फल्गु नदीच्या काठीं वसलें आहे. नदीच्या एका काठांवर विष्णुपद अथवा जुनी गया आहे व तीर्थक्षेत्राचा हाच भाग होय. येथें गयावळ लोकांची वस्ती आहे. हे वतनदार उपाध्ये आहेत. यांच्या आशीर्वचनाशिवाय यात्रा पुरी होत नाहीं व यामुळें यांनां पुष्कळ वेळा बरीच प्राप्ति करून घेतां येतें. विष्णुपद हें मुख्य देऊळ अष्टकोनी आहे. जवळच एक अहिल्याबाईनें बांधलेला सभामंडप आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर नवी गया अथवा साहेबगंज आहे. येथें सरकारी कचेऱ्या वगैरे आहेत. बाजार, शाळा, लायब्ररी व दवाखाने वगैरे सर्व या नव्या वस्तींत आहेत. नवी वस्ती जुन्या वस्तीपेक्षां अर्थातच् रुंद, खुली व एैसपैस आहे. येथील तुरुंगांत बरेच जिन्नस तयार होतात. लोकवस्ती (१९२१) ६७५६२.

इतिहासः- गया हें फार प्राचीन कालापासून प्रसिद्ध क्षेत्रांचें ठिकाण असून त्यास विष्णुगया अथवा पितृगया असेंहि म्हणतात. या क्षेत्राच्या उत्पत्तीसंबंधीं इतिहास हरिवंशपर्व अध्याय १० मध्यें दिला आहे. सुद्युम्न किंवा इल याच्या गय नामक पुत्राला पूर्वेकडील देशाचें राज्य मिळालें. वर्तमान श्वेतवाराहकल्पांत या गय राजर्षीनें आपली राजधानी गयानगरी ही वसविली व शेजारच्या गयपर्वतावर उग्र तपश्चर्या केली, व तेथें ब्रह्मसरनामक पवित्र तीर्थ निर्माण केलें (महाभारत वनपर्व).हा गय राजर्षि इक्ष्वाकूचा समकालीन मानितात. या कथेवरून गया नगरीचें प्राचीनत्व ध्यानांत येईल. गयाप्रदेश व उत्कलप्रदेश यांस पूर्वी धर्मारण्य असें म्हणत असत. या धर्मारण्याच्या उत्पत्तीसंबंधीं स्कंदपुराणांत ब्रह्मखंडाचा पोटभाग धर्मारण्य खंड म्हणून ४० अध्यायांचा खंड आहे त्यांत बरीच विस्तृत माहिती आहे. वायुपुराण (अ. १०८-७३) मध्यें गयानगरी, राजगृह, च्यवनाश्रम, पुनः पुना नदी वगैरे पुण्यकारक स्थानें कीकट देशांत आहेत असें म्हटलें आहे.

वायुपुराणांत गयेची गोष्ट अशी आहेः- गय नांवाचा एक राक्षस होता. तपाचरणों तो पवित्र झाला. तो लोकांनां पावन करी व त्यामुळें यमाचा दरबार रिता पडला. यमानें तक्रार केल्यावरून युक्ती लढवण्यांत आली. यज्ञाकरितां गयाचा वध करण्यांत आला. व त्याच्या डोक्यावर धर्मशिला ठेवण्यांत आली व ती जागा 'गया क्षेत्र म्हणून पवित्र राहील, तेथें देव वस्ती करतील व तेथें जाणारे इसम पूर्वजांसुद्धा ब्रह्मलोकीं जातील' असें वचन श्री विष्णूंनीं त्याला दिलें व तेव्हां पासून गया क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आलें.

आर्यावर्तांतील गया, काशी व प्रयाग या त्रिस्थळी यात्रेचें महत्व फार मोठें मानितात. गयाक्षेत्रीं फल्गुनदीतीरावर श्राद्ध करून श्री विष्णुपदीं पिंडदान केल्यानें मनुष्य पितृॠणांतून मुक्त होतो अशी दृढ समजूत फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

द्वापारयुगात श्रीरामचंद्रांनीं आपल्या पितरांच्या प्रीत्यर्थ गयाक्षेत्रांत तिलोदक, पिंडदान वगैरे अर्पण करून तेथील गयावळांस रुप्याचे व सुवर्णाचे चिरकाल टिकणारे दोन पर्वत व मधुपेयाच्या दोन नद्या अर्पण केल्या. परंतु तेथील द्रव्यलोभी ब्राह्मणांनीं मिथ्याचार केल्यामुळें पुढें ते पर्वत पाषाणाचे झाले व नद्या गुप्तोदकानें वाहूं लागल्या. मधु नदीच्या उगम स्थानाला हल्लीं मधुस्त्रावतीर्थ असें म्हणतात. वर सांगितलेल्या पर्वतांना हल्लीं प्रेतपर्वत व रामपर्वत अशीं नांवें आहेत व फक्त त्यांवरच रौप्य सुवर्णाचें रेषाचिन्ह आहे. वायुपुराणाच्या अखेरीस (अध्याय १५०-११२) नारदाच्या विनंतीवरून सनत्कुमारांनीं गयामाहात्म्य व गयासुराचा वृत्तांत कथन केला आहे. ललितविस्तरांत गयेचा उल्लेख आहे. राजगृहाहून उरुविल्वेला जातांना गौतम येथें प्रथम उतरला. येथें गौतमानें ६ वर्षे घोर तपाचरण केलें व बोधिप्राप्ति करून घेतली हें जर खरें असेल तर इ. स. पू. ५ व्या शतकांत गया हें एक मोठें बौद्ध धर्मस्थान असलें पाहिजे. इ. स. ५ व्या शतकांत फाहियानला हें अरण्यवत आढळून आलें; पण दोन शतकांनीं जेव्हां ह्युएनत्संग येथें आला तेव्हां त्याला हें शहर मजबूत नसलेलें पण थोडया वस्तीचें असें दिसलें. पण त्यावेळी सुमारें १०० ब्राह्मणांचीं घरें यांत असून हे ब्राह्मण अर्वाचीन गया-जवळांचे पूर्वज असावेत. यावरून गया हें प्रथम हिंदुक्षेत्र, नंतर बौद्धक्षेत्र व पुन्हां इ. स. ५ व्या ते ७ व्या शतकाच्या दरम्यान हिंदुक्षेत्र बनलें असावें असें दिसतें. बुद्धगयेची माहिती स्वतंत्र येईल. बौद्ध धर्मीयांवरील विजयाचें हें क्षेत्र केवळ एक चिरस्थाई स्मारक आहे असें कित्यकांचें म्हणणें आहे. या भागांत बुद्धानुयायांचें साम्राज्य चांगलेंच जमलें होतें. व म्हणूनच विजयी हिंदुधर्मीयांनीं ही जागा शोधून काढली असावी असें वरील लोकांचें म्हणणें आहे.

येथें एक शिलालेख आहे. त्याचा काल ६३८ चा असावा. कामदेवसिंहाचा मुलगा व जयत्तुंगसिंहाचा नातू पुरुषोतम सिंह याचा हा लेख असून त्यांत सपादलक्षाचा राजा अशोकवल्लभ याचा उल्लेख आहे.

पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहापासून स. १७५४ च्या सुमारास गया व कुरुक्षेत्र हीं दोन्हीं क्षेत्रें सोडवून आपल्या ताब्यांत घेतलीं व त्यांची कमाव्रीस दामोधर महादेव हिंगणे यास सांगितली होती. [माबेल; डफ; राजवाडे खंड ६; महाभारत; पुराणे; राजेंद्रलाल मित्र-बुद्ध गया, कलकत्ता १८७८; मॅलेगॅझेटीयर ऑफ गया].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .