प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे     

गंधक- (परमाणु भारांक ३२.०७) एक अधातुरूप रासायनिक मूलद्रव्य. हें लोकांनां पुष्कळ दिवसांपासून माहीत असून याच्या ज्वालाग्राही गुणामुळें किमयागार लोक याला ज्वलनतत्व असें समजत असत. हें मूल द्रव्य स्वतंत्र व संयुक्त स्थितींत निसर्गांत पुष्कळ ठिकाणीं आढळतें. स्वतंत्र किंवा नैसर्गिक गंधक ज्वालामुखीजवळ सांपडतें.

सर्व जगांतील गंधकाच्या खाणींपैकीं सिसिली बेटांतील खाणी महत्वाच्या आहेत. यूरोपांत मायोसीन नांवाची चिकणमाती व चुनखडी ह्यांत कापूर, शिलाजित व इतर कांही खनिज पदार्थांबरोबर गंधक आढळतो. रशियांत विशेषतः दाघेस्तानमध्यें गंधकाच्या मोठमोठाल्या खाणी आहेत. जपान, चिली, पेरू व युनायटेडस्टेट्स वगैरे देशांतहि गंधक पुष्कळ सांपडतो.

संयुक्त स्थितींत हें मूल द्रव्य मुख्यतः गंधकिदें व गंधकितें ह्या रूपांत आढळतें. पैकी गंधकिदें हीं व्यापारी दृष्टया फार महत्वाचीं आहेत. कारण त्यांपासून तांबें, शिसें, जस्त, पारा वगैरे धातू निघतात. गंधकितांपैकीं कर्पूर, शिलाजित, भारायितें व मग्नगंधकितें हीं सांगण्यासारखीं आहेत. गंधक ह्याम्लजिद व गंधकीकृतउज्जन हे वायुरूप पदार्थ ज्वालामुखींतून व खनिज पाण्यांतून निघतात. प्राणिज व वनस्पतिज सृष्टींतहि गंधक आढळतो. केंस व लोंकर आणि प्राण्यांची बलकयुक्त शरीरें व लसूण आणि मोहरी यांच्या तेलासारखीं इतर कांहीं तेलें यांत गंधक असतो.

खा णीं तू न का ढ णें.- खाणींतून काढलेल्या नैसर्गिक गंधकाबरोबर चुनखडी, कर्पूर, शिलाजित, माती वगैरे इतर पदार्थ असतात; त्यांपासून गंधक निराळा करणें फार कठिण नसतें. कारण त्या सर्वांनां उष्णता लाविली असतां गंधक वितळून वाहूं लागतो व इतर पदार्थ मागें रहातात.

गु ण ध र्म.- गंधकाचीं कित्येक रूपें आहेत. परंतु त्यांसंबंधीं पद्धतशीर विचार करण्यापूर्वी नेहमींच्या गंधकाच्या गुणधर्माचें विवेचन करणें बरें. बाजारी गंधकाचे पिवळे स्फटीक असून ते ११३ शतांश उष्णमानाला वितळतात. नेहमीच्या दाबाखालीं ४४४.५३ ला उकळूं लागतात. उकळूं लागल्यानंतर वाफेचा रंग प्रथम नारिंगी असतो; परंतु जास्त तापविल्यानंतर तो काळसर होत होत ५०० ला तांबडा लाल होतो. उष्णमान आणखी वाढविल्यास रंग फिका होत जाऊन ६५० ला गवतासारखा होतो. रंग बदलण्याचें कारण अणूंचें विघटन घटन होतें हें होय. घनरूप गंधकाचें विशिष्टगुरुत्व २.०६२ ते २.०७० असतें. तें उष्णता व विद्युद्वाहक नाहीं व घर्षणानें त्यावर ॠण विद्युत् उत्पन्न होते. तें हवेंत ३६३ ला व प्राणवायूंत २७५ ते २८९ पर्यंत पेट घेतें. त्याच्या ज्योतीचा रंग विशिष्ट तऱ्हेचा निळा असतो व ज्वलनापासून तीक्ष्ण वासाचें गंधकद्विप्राणिद तयार होतें. त्याच वेळीं थोडेंबहुत त्रिपाणिदहि तयार होतें. गंधक बहुतेक दुसऱ्या सर्व मूलद्रव्यांबरोबर संयोग पांवतें व त्यायोगें गंधकिदें बनातात.

उ प यो ग.- कलाकौशल्यांत जे गंधकाचे उपयोग होतात, ते अत्यंत महत्वाचे आहेत. मिठापासून पापडखार करणें, कपडे वगैरे रंगविणें व शुभ्र करणें, कांतडी कमाविणें, दारू करणें, गंधकाच्या काडया करणें या व अनेक कामांस गंधक व त्याचे संयुक्त पदार्थ यांचा उपयोग होतो. गंधक जलद पेटतो म्हणून आगकाडयांची टोकें वितळलेल्या गंधकांत प्रथमतः बुडवितात. असें केलें नाही तर फास्फरस फार जलद जळून जात असल्यानें काडी पेटली नसती. याच धर्मामुळें दारू करण्यासहि गंधक घेतात. गंधकामुळेंच दारू यत्किंचित् ठिणगीनें पेट घेते. जळत्या गंधकापासून जी वाफ निघते, तिनें फुलें व रेशीम शुभ्र होतात. जहाजांत व कोंदट जागीं उंदीर व वाईट कृमी फार जमले तर त्यांचा नाश करण्यासहि गंधक जाळतात. विपाकक्रिया बंद करण्याचाहि गंधकाच्या अंगीं धर्म आहे. दारू ठेवण्यास पिंपास आंतून गंधकाची धुरी दिली म्हणजे त्यांतील बिअर वगैरे दारू विपाक पावत नाहीं. कपडयांतील जंतू व घाण घालविण्यासाठीं त्यांस गंधकाची धुरी दोत व त्याचा प्रमाणें घरातील खोल्यांतहि गंधक जाळून तेथील हवा स्वच्छ करतात. पदकें, नाणीं व दुसऱ्या पदार्थांचे ढाळ घेण्यास द्रवस्थितींत गंधकाचा उपयोग होतो. गंधकाच्या फुलांचा औषधांत उपयोग होतो. सल्फ्युरिक अँसिड हा जाळणारा व खाणारा असा विषारी द्रव आहे, आणि तो दुसऱ्या पदार्थांबरोबर भट्टयांत गंधक जाळूनच करितात.

गं ध का चीं दु स री रू पें- स्फटिकाकार, पिठूळ व कदाचित प्रतिस्फटिकाकार अशा रूपांत गंधक आढळतो. ऐतिहासिक दृष्टया समभुज चतुर्भुजात्मक व (ग) एकवलनात्मक (मॉनॉक्लिनिक) (ग)प्रकार महत्वाचे आहेत. कर्बद्विगंधकिदांत गंधकाचें द्रावण करून त्याचें स्फटिकीभवन होऊं दिल्यास अथवा गंधकीकृत उज्जानें संपृक्त असें पायरिडाइन हवेंत ठेवून त्याचें प्राणिदीकरण होऊं दिल्यास समभुज चतुर्भुजात्मक गंधक मिळतो. तो पाण्यांत विरघळत नाहीं. पण कर्बद्विप्राणिद, गंधकहरिद व टरपेंटाईन ह्यांत द्रवतो. गंधकाचा रस अंशतः थंड करून व त्यावर बनलेली कवची फोडून आंतील रस ओतून टाकिला असतां भांडयाच्या आंतल्या बाजूला सुईसारखे स्फटिक तयार झालेले आढळतात. हे स्फटिक एकवलनात्मक गंधकाचे होत ग प्रमाणें हा कर्बद्विगंधकिदांत विरघळतो. या गंधकाचे आणखी तीन प्रकार सांपडलेले आहेत.

पिठूळ गंधक किंवा गइ हा दोन रूपांत आढळतो; पैकीं एक कर्बद्विगंधकिदांत विद्राव्य व दुसरा अविद्राव्य आहे. अम्लानें बहुगंधकिदाचें विघटन केलें असतां गंधकाचें दूध मिळतें. त्यांत हे दोन्ही प्रकारचें गंधक असतात. गंधक हरिदाचें पाण्यानें विघटन केल्यानेंहि अद्रावणीय गंधक मिळतो. त्याचें हळू हळू समभुजचर्तुभुज गंधकांत रूपांतर होतें. जलमिश्रित गंधकीकृत उज्ज व गंधकद्विप्राणित यांच्या अंतःक्रियेपासून प्रतिस्फटिक गंधक (ग) मिळतो.

गं ध का चा र स.- द्रवण बिंदूच्यावर गंधक तापविला असतां कित्येक चमत्कार आढळून येतात. रस प्रथम फिकट पिंवळ्या रंगाचा असतो, तो जास्त तापविल्यानंतर काळसर व चिकट होत होत १८० उष्णमानाला काळसर तांबडया रंगाचा व अत्यंत चिकट होतो. आणखी तापवीत राहिल्यास चिकटपणा कमी होतो. परंतु रंग कायम रहातो. चिकट प्रकारचा गंधक एकदम थंड केल्यास अथवा जास्त तापविलेला गंधक एकदम पाण्यांत टाकल्यास लवचीक गंधक मिळतो. हा पदार्थहि कांही वेळ ठेवल्यानंतर ठिसूळ होतो.

गं ध का चे सं यु क्त प दा र्थ, गंधकीकृत उज्ज (उग):- उज्जच्या प्रवाहांत गंधक तापविल्यास २०० व ३५८ यांच्या दरम्यान त्यांचा संयोग होऊन हा वायू तयार होतो. निरनिराळ्या धातुरूप गंधकिदांवरील अम्लांच्या क्रियेनें(बहुधा लोहस गंधकिद व पातळ गंधकिकाम्ल यांचा उपयोग करितात) हि गंधकीकृत उज्ज तयार करतां येतो. गंधक युक्त सेंद्रिय पदार्थ कुजत असतां हा वायू उत्पन्न होतो.

हा वायु रंगहीन असून त्याला अतिशय वाईट घाण येते. तो फार विषारी आहे. त्याच्या ज्वलनापासून गंधकद्विप्राणिद व पाणी हे पदार्थ तयार होतात. तो पाण्यांत अल्प प्रमाणांत द्रवतो व द्रावणाची प्रतिक्रिया अम्लासारखी असते. नैलादि उपधातू व निविष्ठ गंधकिकाम्ल यांच्या योगानें त्याचें विघटन होतें. तो पुष्कळ धातूंशीं संयोग पावून गंधकिदें तयार होतात. तो धातव लवणांचेंहि विघटन करतो; या गुणामुळें रासायनिक पृथक्करणांत त्याचा फार उपयोग होतो. संस्कारक (रिडयूसिंग एजंट)म्हणूनहि याचा वारंवार उपयोग केला जातो. प्राणिदीकारकांचा यावर ताबडतोब परिणाम होऊन पाणी व गंधक हे पदार्थ मिळतात.

याची गंधकद्विप्राणिद (ग, अ), गंधकत्रिप्राणिद (ग अ) इत्यादि प्राणिदें होतात. द्विप्राणिद पुष्कळ दिवसांपासून माहीत असून ज्वालामुखींतून निघणाऱ्या वायुरूप पदार्थांत सांपडतें. हवेंत किंवा प्राणवायूंत गंधक जाळला असतां किंवा कित्येक धातवप्राणिदें भाजलीं असतां हा वायु तयार होतो. तो रंगहीन असून त्याच्या योगानें मनुष्य गुदमरून जातो. तो स्वतः जळत नाहीं. व इतर पदार्थांच्या ज्वलनक्रियेला मदत करीत नाहीं. तो पाण्यांत व मद्यार्कांत (अल्कहलमध्यें) द्रवतो. द्रावणाची प्रतिक्रिया अम्लासारखी असते. प्रखर प्रकाशानें किंवा उष्णतेनें त्याचें विघटन होतें. पाण्याबरोबर याचा कित्येक वेळां विरंजक (ब्लीचिंग एजंट) निर्वर्णक म्हणून उपयोग करितात. व पुष्कळ वेळां (अम्लाबरोबर) त्याची क्रिया संस्कारकासारखी असते. उदाहरणार्थ याच्या योगानें परमंगलिताचें (परमँगनेट) संस्करण होऊन मग्नसक्षार तयार होतात.

गंधकाम्लाकरितां, हाग्रींवच्या पद्धतीनें सिंधुगंधकित तयार करण्याकरितां व विरंजक, कृमिघ्न आणि नासूं न देणारा पदार्थ म्हणून उपयोगांत आणण्याकरितां हा वायू औद्योगिक प्रमाणावर तयार केला जातो. पदार्थ नासूं नयेत म्हणून थंड करण्याकरितां व हा अदाह्य असून ज्वलनक्रियेला मदत करीत नाहीं म्हणून आग विझविण्याकरितां दाबलेल्या वायूचा उपयोग करितात. ह्या वायूच्या पाण्यांतील द्रावणाला गंधकसाम्ल म्हणतात. त्याच्या अंगी संस्कारक गुण आहेत. व हवेंत त्याचें हळू हळू प्राणिदिकरण होऊन गंधकाम्ल बनतें. याचे पुष्कळ क्षार माहीत आहेत.

त्रिप्राणिदः- (गउ) सधुमगंधकाम्ल किंवा निविष्टगंधकाम्ल यांचें स्फुरपंचप्राणिदांसह ऊर्ध्वपातन केल्यास अथव प्लातिनयुक्त असबस्टासारख्या एखाद्या सान्निध्यविकारी पदार्थाच्या सानिध्यांत, गंधकद्विप्राणिद व प्राण यांचा संयोग झाला असतां गंधकत्रिप्राणिद तयार होतें. पाण्याशीं त्याचा फार जलद संयोग होऊन गंधकाम्ल बनतें. त्यावेळीं उष्णता बरीच उत्पन्न होते. त्याचा गंधकाम्लाशीं प्रत्यक्ष संयोग होऊन तिग्मगंधकाम्ल तयार होतें. सेंद्रिय संयुक्त पदार्थांवर त्याची क्रिया फार जोरानें होऊन त्यांतील पाणी निघून जातें. पुष्कळ मूलद्रव्यांशीं आणि संयुक्त पदार्थांशीं त्याचा प्रत्यक्ष संयोग होतो; व कित्येक वेळा त्याची क्रिया बलवान अम्लजनीकारकाप्रमाणें असते. रंगाच्या कारखान्यांत याचा उपयोग होतो.

गंधकयुक्त गंधकाम्लः- (उ) हें अम्ल स्वतंत्र स्वरूपांत करतां येत नाहीं. कारण त्याचें विघटन होतें. परंतु त्याचे क्षार स्थिर असून विशेषतः सिंधु क्षारांचा प्रकाशलेखनाकडे (फोटोग्राफीकरितां) फार उपयोग होतो. गंधकाच्या फुलांचें सिंधुगंधकायिताबरोबर पचन केलें असतां किंवा चुन्याच्या निवळीबरोबर गंधक उकळला असतां हा क्षार मिळतो. खनिज अम्लांच्या योगानें याचें ताबडतोब विघटन होऊन गंधकद्विप्राणिद निघून जातो व गंधक सांक्याच्या रूपानें खालीं पडतो. त्यांपासून पुष्कळ क्षार तयार होतात; व लोहिकहरिदाच्या द्रावणाबरोबर मिश्रण केल्यास त्यांचा रंग जांभळा होतो. मिश्रण कांही वेळ तसेंच ठेवल्यावर गंधकाचा सांका पडून रंग नाहींसा होतो.

नैसर्गिक गंधक व धातव गंधकिदें यांचा निरनिराळीं औषधें करण्याकडे उपयोग होतो. त्वग्रोगांवर गंधकाचा बाह्यतः उपयोग होतो. गंधकाच्या नुसत्या पुडीचा कांतडीवर कांहीच परिणाम होत नाहीं; परंतु मलमांत औषधी गुण पुष्कळ आहेत. खरजेवर यापासून फार गुण येतो. पोटांत घेतल्यास गंधक हें सौम्य रेचक आहे. यकृताचा संकुचितपणा, संधिवात व मुतखडा (किंवा सिकता) यांवर गंधकयुक्त पाण्याचा चांगला उपयोग होतो. धाकटया श्वासनलिकेसंबंधीं फार दिवसांच्या जुन्या विकारावरहि गंधक उपयोगी आहे. फार दिवसांच्या संधिवातावर गंधकाचें पाणी पोटांत घेतल्यास किंवा अंघोळीकरितां वापरल्यास चांगला परिणाम होतो. हवेंत किंवा अम्लजनांत गंधक जाळला असतां उत्पन्न हेणारें गंधक ह्याम्लजिद, बलवान, कृमिघ्न आहे. याकरितां संसर्गजन्य रोगाच्या माणसांनीं वापरलेल्या खोलींत गंधकाचा धूर करतात.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .