विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गढी इक्तीआरखान- पंजाबमध्यें भावलपूर संस्थानांत खानपूर तालुक्यांतील शहर. उ. अ. २८० ४०’ व पू. रे. ७०० ३९’. भावलपूरपासून ८४ मैलांवर वायव्येच्या बाजूंस हें आहे. लोकसंख्या (१९०१) ४९३९. पूर्वी येथें हत्यारांचे कारखाने असत. येथें खजुराचा मोठा व्यापार चालतो. येथील म्युनिसिपालिटीचें बहुतेक उत्पन्न जकातीचें आहे.