प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
 
ख्रैस्त्य.- ख्रैस्त्य म्हणजे ख्रिस्ताचा संप्रदाय. याचा इतिहास द्यावयाचा म्हणजे ख्रिस्ताच्या उपदेशाचेहि अर्थ कसकसे निघत गेले, त्याच्या अनुयायांनीं आपल्या आवडीच्या कोणत्या गोष्टी घातल्या, अनुयायी मंडळींतील मुख्य कार्यकर्त्या अधिकार्‍यांनीं चर्चची रचना कशी केली, आणि सत्ता मिळविण्याचा आणि वाढविण्याचा प्रयत्न कसा केला, संप्रदायाचा प्रसार जगभर कसा केला इत्यादि गोष्टींचा इतिहास द्यावा लागेल. हा देण्यासाठीं या लेखाचे कांही भाग केली पाहिजेत ते असेः-

(१) चर्चचा इतिहास (२) प्रसाराचा इतिहास (३) मतांचा इतिहास. या सर्व गोष्टींवर क्रमवार विवेचन करूं आणि नंतर भारतीय ख्रिस्ती वर्गाकडे विशेष लक्ष देऊं.

चर्चचा इतिहास.- ख्रिस्ती संप्रदायाची व त्याच्या शासनसंस्थेची समग्र हकीकत सांगावयाची असल्यास तिचे सोईसाठी तीन विभाग पाडतां येतील. (१) पुरातन चर्चपासून तों ग्रेगरी दि ग्रेट पोपच्या कारकीर्दीपर्यंत (२) मध्ययुगीन चर्च आणि (३) आधुनिक चर्च.

पूर्वकालीन चर्च, उत्पत्ति आणि वाढः- येशू ख्रिस्ताला सुळावर चढविल्यामुळें त्याच्या अनुयायांमध्यें फाटाफूट झाली. परंतु थोडक्याच काळांत तो थडग्यांतून उठला आहे अशी त्यांची खात्री होऊन तो 'मेसाया'चें राज्य स्थापण्यासाठीं व अशा रीतीनें मेसायचें अर्धवट उरलेलें काम तडीस नेण्यासाठी लवकरच या जगांत अवतीर्ण होणार असा त्यांनां विश्वास वाटूं लागला. अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या मनांत उद्भूत झाल्यामुळें ख्रिस्त हाच मेसाया होय अशी लोकांनां खात्री पटवून देण्याची व आपल्या शुद्धचरणानें व पश्चात्तापानें लवकरच अस्तित्वांत येणा-या   मेसायाच्या राज्यस्थापनेची तयारी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. यामुळें यहुदी संस्कृतीचें राजकीय व धार्मिक केंद्र जें यरुशलेम त्याच ठिकाणीं हे ख्रिस्तानुयायी पुन्हां जमा झाले. ही नवीन चळवळ ज्या अर्थी यरुशलेम येथेंच सुरू झालीं त्याअर्थीं तेथील चर्च हें ख्रिस्ती जगाचें आद्य चर्च या नात्यानें प्रसिद्ध आहे हें योग्यच आहे. उपलब्ध माहितीवरून यहुदी ख्रिस्त्यांचा जीवितक्रम त्यांच्या इतर बांधवांप्रमाणेंच होता असें निश्चयेकरून सांगतां येतें. ते यहुदी उपासनामंदिरांत जाऊनच ईश्वरोपासना करीत असत. आपला नवा पंथ काढण्याचा किंवा इस्त्राएलच्या कुटुंबांतून विभक्त होण्याचा विचार त्यांच्या मनांत आला नव्हता. धार्मिक व नैतिक बाबतींत देखील त्यांच्यामध्यें व त्यांच्या इतर विचारी देशबांधवांमध्यें कांही भेद होता असें मानण्याला कांहींहि आधार नाहीं. येशू हाच मेसाया असून तो लवकरच मेसायाचें राज्य स्थापणार ही जी त्यांची श्रद्धा होती तेवढयाच बाबतींत या दोघांत मतभेद होता. ख्रिस्त हाच मेसाया आहे हे सिद्ध करणें त्यांनां भाग होतें व या आपल्या मताचें मंडन त्यांनीं पुनर्जन्माच्या आधारावर केलें. मेसायाचें भविष्य पिकविण्याची व यहुदी बायबल हेंच ख्रिस्ती बायबल असें लोकांनां पटविण्याची त्यांच्यावर जबाबदारी पडली. मेसायाचें राज्य लवकर येण्यासाठीं पश्चात्तापाचा व नीतिशुद्ध आचरणाचा पुरस्कार केला पाहिजे असें ते प्रतिपादन करूं लागले. उपलब्ध माहितीवरून येशूची जी शिकवणूक कीं ईश्वर सर्वांचा बाप आहे व आपण एकमेक बंधू आहोंत तीं पूर्वींच्या काळीं लोकांनां पटली नव्हती असें दिसतें.

मध्यंतरीं हीच चळवळ पॅलेस्टाइनच्या बाहेर पसरली व पुष्कळ यहुदी व यहुदी नसलेलें या चळवळींत सामील झाले. यहुदी राष्ट्राबाहेरील लोकांमध्यें चळवळ पसरविण्याच्या कामी पॉलनें अतिशय खटपट कली. पॉलचा संप्रदायप्रवेश ही गोष्ट प्राचीन चर्चच्या इतिहासांत अत्यंत महत्वाची आहे. यानें ख्रिस्ती संप्रदायास नवीन स्वरूप देऊन सर्व अगाला जुळतील असे त्यांत फेरफार केलें व त्याचें संकुचित स्वरूप काढून टाकून त्यास व्यापक स्वरूप दिलें. म्हणजे यहुदी लोकांची राष्ट्रीय महत्वाकांक्षा साधणारा संप्रदाय न बनवितां केवळ विशिष्ट आचारविचार पसरविणारा संप्रदाय बनविण्याची त्यानें खटपट केली. जुन्या मताप्रमाणें येशू हा यहुदी लोकांचा मेसाया होता व त्याचें राज्य स्थापणें हे मुख्य ध्येय होतें.पण ख्रिस्त हा ईश्वर आहे व तो पापी लोकांचा उद्धार करण्यासाठीं जगामध्यें आला होता असें तो प्रतिपादन करूं लागला. ख्रिस्ती संप्रदाय हा अमक्याचा नसून तो सर्वांचा आहे असें त्यानें सांगितलें. पूर्वींचे यहुदीलोक जें मेसायाचे राज्य स्थापन होणार असें म्हणत तें एखादें प्रत्यक्ष स्वराज्य नसून शुद्ध आचरणाचें, शांततेचें व आत्मानंदाचें स्वराज्य होय, असें पॉलचें मत होतें. शिवाय स्वतःच्या आत्मिक अनुभवानें व मोक्षतत्वाच्या आधारें त्यानें कोणत्याहि ख्रिस्त्याला यहुदी लोकांचे कायदे पाळण्याची जरूरी नाहीं असें प्रतिपादन केलें. उदाहरणार्थ, मोठया वयांत लोक ख्रिस्ती होणार त्यांनां सुंतेची दुखापत सहन होणार नाहीं म्हणून त्यानें भौतिक सुंतेच्या ऐवजीं ''आध्यात्मिक सुंता'' उपदेशिली. अशा रीतीनें त्यानें यहुदी व यहुदी नसलेल्या लोकांमधील मुख्य भेद नाहींसा करून टाकला. ख्रिस्ती भक्ताला साक्षात्कार झाला असतां त्याला प्रीति, आनंद  व शांति ह्यांचाच अनुभव येतो, या मुद्यावर बराच मतभेद व खटका उडाला होता. व दुसरींहि पॉलचीं तत्वें मान्य झालीं नाहींत.

ख्रिस्ती संप्रदायाचा रोम साम्राज्यांत प्रवेश.- ख्रिस्ती संप्रदायाच्या नव्या व्यापक स्वरूपामुळें त्यानें अनेक विजय मिळविले, व रोमन जगामध्यें त्याची कायमची स्थापना झाली. यावेळीं लोकांची धार्मिक, सामाजिक, नैतिक वगैरे सर्व बाबतींत सुधारणा करण्याकडे मनोवृत्ति होती व या सर्व बाबींमध्यें ख्रिस्ती धर्मभावनांनीं त्यांची जी इच्छा होती ती तृप्त करून त्यांनां भासत असलेली उणीव भरून काढली. पूर्वींच्या शतकांत ही धार्मिक चळवळ केवळ मध्यम व हलक्या स्थितींतील लोकांच्या बाबतींतच चालू होती, पण ख्रिस्ती संप्रदायाची नैतिक उच्चता पाहून सरदार व वरिष्ठ दर्जाचे लोकहि या संप्रदायाच्या बाबतींत मन घालूं लागले, व अशा रीतीनें ही चळवळ व्यापक स्वरूपाची झाली.

पण ही यशस्विता मिळविण्यासाठीं ख्रिस्ती संप्रदायाला फार झगडावें लागलें. परंपरागत धार्मिक समजुतींमुळें, मत्सरामुळें, गैरसमजामुळें व इतर कारणांमुळें या संप्रदायावर अनेक संकटें आलीं व कांहीं वेळ तर खुद्द सरकारकडून हा संप्रदाय चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या धर्माला चिरडून टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न डीशिअसच्या कारकीर्दीत (२५०-५१) झाला, व हेंच धोरण पुढें डायोक्लीशिअननेंहि (३०३ पासून पुढें) स्वीकारिलें. तथापि या विरोधाला न जुमानतां चर्चची सत्ता हळू हळू वाढत गेली. ३११ सालीं गालेरिअस बादशहानें आपल्या मृत्यूसमयीं या संप्रदायाला अंशतः स्वातंत्र्य दिलें व त्याचा होत असलेला छळ बंद केला. ३१३ सालीं कॉन्स्टंटाईननें व लिसीनीयसनें ख्रिश्चन संप्रदायाला पूर्ण स्वातंत्र्य दिलें, व त्या अर्थाचा मिलान येथें एक शिलालेख कोरला. हा संप्रदायेतिहासांतील फारच महत्वाचा लेख होय. कॉन्स्टंटाईननें या संप्रदायाची वाढती भरभराट पाहून त्याला आपला पूर्ण आश्रय दिला, व मृत्युशय्येवर (३३७) असतांना त्यानें स्वतःहि ख्रिस्ती संप्रदायाची दिक्षा घेतली. अशाच प्रकारचा वाढता आश्रय फक्त जूलिअनखेरिज करून त्याच्या मागून गादीवर येणा-या सर्व राजांकडून मिळाला. यामुळें ज्यूलिअनला ख्रिस्ती लेखकांनीं अनेक शिव्याशाप दिले आहेत. थीओडिशिअसच्या कारकीर्दींत या संप्रदायास राजदरबारीं मान्यता मिळाली, ख्रिस्तेतर लोकांवर बहिष्कार पडूं लागला. जेव्हां रोमन साम्राज्याचे तुकडे झाले तेव्हां या चर्चेचेहि तुकडे होऊन पूर्वेकडील भागांत ग्रीक कॅथोलिक व पश्चिम भागांत रोमन कॅथोलिक असे भेद पडले व त्यांनीं स्वतंत्र रीतीनें संप्रदायप्रसार करण्यास सुरुवात केली.

अशा रीतीनें ख्रिस्ती संप्रदायास राजदरबारीं मान्यता मिळाली तरी साम्राज्यांतील लोकांचा पैतृक धर्म नामशेष न होतां पुष्कळ भागांत तो प्रचलित राहिला. व कांहीं ठिकाणीं तर त्याचे अनुयायी ख्रिस्ती लोकांपेक्षांहि अधिक होते. तथापि नांवानें कां होईना ख्रिस्ती संप्रदाय हा सर्व राज्याचा संप्रदाय म्हणून गणला गेला. मध्यंतरीच्या काळांत तिस-या शतकाच्या आरंभापूर्वीं ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार आशियामध्यें झाला होता; व त्याचा पुढें एकसारखा प्रसार होत जाऊन तो चार पांच शंतकांत आर्मेनिया, इराण, अरबस्तान व याच्याहि पुढें पूर्वेकडील प्रदेशांत पसरत गेला. चवथ्या शतकांच्या सुरुवातीस गॉथ हे ख्रिस्ती झाले होते व इतर जातीचे रानटी लोकहि क्रमाक्रमानें ख्रिस्तीसंप्रदायांत शिरूं लागले. व ज्या वेळेस पाश्चात्य देशांचें पुढारीपण या रानटी लोकांकडे आलें त्यावेळींसुध्दां ही चर्चची सत्ता अबाधीतच राहिली तेव्हांपासून कित्येक शतकेंपर्यंत पाश्चात्य राष्ट्रांमध्यें चर्च हें केवळ पारमार्थिक साधन नव्हे तर सुधारणेची व संस्कृतीची एक शक्तीच होऊन बसली होती.

ख्रिस्ती लोकांचा जीवनक्रमः- प्राचनी ख्रिस्ती लोकांची अशी पक्की समजूत होती कीं आपण दैवी प्रसादाचे अधिकारी आहोंत. त्यांच्या मतें चर्च ही मानवांनीं स्थापलेली संस्था नसून ती ईश्वरनियंत्रित आहे. हें जग नश्वर आहे व यांत आपलें कल्याण नाहीं असें त्यांनां वाटत असल्यानें त्यांनीं जगांतील व्यवहार सोडून एक प्रकारें संन्यासधर्मच पत्करला होता. प्रथमतः पुष्कळांची ख्रिस्त हा पुन्हां या जगांत येणार अशी खात्री होती. पण ही आशा पुढें लवकरच त्यांनीं सोडून दिली. पवित्र आत्म्याचें अस्तित्व निरनिराळया अद्भुत मार्गांनीं व्यक्त होतें अशी या लोकांची प्रथम कल्पना होती. पॉललाहि ही गोष्ट मान्य होती पण त्यानें ख्रिस्ती मनुष्याच्या प्रत्येक व्यवहारांत या आत्म्याचें अस्तित्व व्यक्त होतें अशी त्या कल्पनेंस पुस्ती जोडली, व त्यामुळें ख्रिस्ती लोकांनां एक प्रकारची स्फूर्ति मिळाल्यासारखें झालें. पुढें कालांतरानें ही स्फूर्ति व उत्साह नाहींसा होत जाऊन प्रत्येक गोष्टींतील आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलची त्यांची श्रद्धा कमी कमी होत चालली; व नास्तिकमतवाद्यांशीं झालेल्या झगडयांमध्यें चर्च हे स्वंतत्र न राहतां अधिकार्‍यांच्या ताब्यांत गेलें. माँटेनिझम या नांवानें प्रसिद्ध असलेली दुस-या   शतकाच्या अखेरीस झालेली चळवळ चर्चची ही परवशता नाहीशीं करून पूर्वींप्रमाणें त्यास ईश्वरनियंत्रित करण्यासाठी झालेली होती. पण ती यशस्वी न होतां चर्चची परवशता उत्तरोत्तर वाढतच गेली. या जगांतील चालीरीतींनां अनुसरून चर्चनें आपली पूनर्घटना केली व अशा रीतीनें स्वतःला पुष्कळ काळ टिकविण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ चर्च ही अतिमानुषी संस्था  नाहीं असें याच्या अभिमान्यांनां वाटत होतें असा नसून हा अतिमानुषीपणा चर्चनें निराळया रीतीनें व्यक्त केला एवढेंच कायतें. चर्चच्या या नूतन परिस्थितींत देखील प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला असेंच वाटत असे कीं, परमेश्वरी कृपा संपादन केल्याशिवाय मोक्ष मिळणें शक्य नाहीं; तसेंच या जगांतील आपल्या आयुष्यक्रमांत व पुढील स्वर्गांतील आयुष्यक्रमांत फार अंतर आहे. व ज्या मानानें चर्च ही संस्था लौकिक होऊं लागली त्या मानानें ही श्रद्धा 'संन्यास' रूपानें व्यक्त होऊं लागली. ही मठसंस्था म्हणजे परलोकीचें सुख अधिक सुलभ करण्याचा व अशा रीतीनें स्वतःला मोक्ष सुलभरीतीनें साध्य करण्याकरितां केलेला एक प्रयत्न होय. हें साध्य साधून घेण्यासाठीं प्रत्येकानें आपलें आचरण शुद्ध ठेवलें पाहिजे अशी प्रवृत्ति सुरू झालीं. परंतु जगांतील या चर्चमध्यें राहून स्वतःला मोक्ष प्राप्त करून घेण्याचें ज्यांनां अवघड वाटूं लागलें त्यांनीं समाजापासून दूर जाऊन एकान्तवासांत राहून तें मिळविण्याचा क्रम चालू ठेवला. तिस-या शतकामध्येंहि ख्रिस्ती भिक्षू झाले होते, पण चवथ्या शतकाच्या अखेरीस मात्र सर्व यूरोपभर ही भिक्षुसंस्था पूर्णपणें प्रस्थापित झाली. भिक्षूंस व भिक्षुणींस समाजांत फार मान मिळूं लागला व त्यामुळें धर्मगुरुंनांहि होतां होईल तो भिक्षू होणें भाग पडत असे. या भिक्षुसंस्थेनें लोकांपुढें एक उच्च नैतिक ध्येय ठेविलें होतें. ज्यांनां भिक्षू होतां येईना असे लोक सुध्दां आपापल्या परी आपल्या जिविताच्या मोक्षासाठीं खटपट करूं लागले. याचा परिणाम असा झाला कीं ब्रह्मचर्याचा बराच प्रसार झाला; व स्वतःची शुद्धि करून घेण्यासाठीं उपवास करणें, दानधर्म करणें, अशाप्रकारचें प्रकार अस्तित्वांत आले. येशू ख्रिस्तानें सांगितलेलें प्रेमाचें तत्व जास्त व्यापक करून सर्वं ख्रिस्ती बांधवांबद्दलचें प्रेम असा त्याचा अर्थ मानण्यांत येऊ लागला; अनाथांस मदत, अतिथिसत्कार वगैरे उदार तत्वें आचरणांत येऊं लागलीं; व स्वतःच्या धर्मबांधवांनां मदत करणें हें तर एक अत्यावश्यक कर्तव्यच होऊन बसलें.

उपासना.- परमात्मा हा आपल्या सान्निध्यांत असतो ही जी प्राचीन श्रद्धा होती तिचा परिणाम चर्चमधील उपासनेवर झाल्याशिवाय राहिला नाहीं. उपासना हा खेळच होऊन बसला. प्रत्येकानें मनास वाटेल त्याप्रमाणें उपासना करावी व मी हें ईश्वराच्या प्रेरणेनेंच करीत आहे असे म्हणावें अशी स्थिति अस्तित्वांत आली. यामुळें वारंवार घोटाळा होऊं लागला व अंदाधुंदी माजली तेव्हां उपासनेसंबंधीं कांहीं नियम करण्यांत येऊन कांहीं विशिष्ट व्यक्तींच्या हातांतच उपासनेचा अधिकार देण्यांत आला. या बाबतींत कसकशी वाढ होत गेली ते सविस्तर सांगणें शक्य नाहीं; परंतु उपासना जास्त कठिण, गुंतागुंतीची व अवडंबरयुक्त करण्याची एकीकडे प्रवृत्ति वाढत होती, तर दुसरीकडे उपासना जास्त गंभीर व गूढ करून पापी माणसाला त्या गूढोपासनेंत न घेण्याची मनोवृत्ति वाढत होती. असे गूढ प्रकार म्हणजे दीक्षाविधि व प्रभुभोजन हे होत. व यांना वाटेल त्या इसमास हजर राहतां येत नव्हतें. प्रार्थना म्हणण्याचेहि अशाच रितीनें दोन भाग पडले. एक सार्वजनिक व सर्वांनां खुला असा भाग व दुसरा गूढ भाग. यांपैकीं सार्वजनिक प्रार्थना दिवसेंदिवस जास्तच गुंतागुंतीची व अवडंबरयुक्त होत चालली.

चर्च व प्रभुभोजनादि संस्कार.- पॉलच्या मतें मनुष्य हा मांसादि वस्तूंचा गोळा असल्यानें तो नश्वर आहे. जेव्हां तो ख्रिस्ताशीं एकरूप होईल व अशा रीतीनें दैवी जीव होईल तेव्हां तो मुक्त होईल. तसेंच ख्रिस्ती चर्च हें शरीर असून ख्रिस्त हा त्याचा आत्मा आहे असेंहि कांही सूक्तांतून म्हटलें आहे. या दोनहि कल्पना एकत्र करून इग्नेशिअसनें असें प्रतिपादिलें कीं चर्चचा सभासद झाल्याशिवाय कोणत्याहि ख्रिस्ती मनुष्याला मुक्ति मिळणार नाहीं. हीच स्थिति संस्कारांची झाली. दुस-या शतकाच्या सुमारास दीक्षाविधी हा एक महत्वाचा विधि गणला जात होता. दीक्षा घेतली असतां त्या मनुष्याला दुसरा ईश्वरी जीव प्राप्त होतो असें सर्वांनां वाटत असे, व प्रभुभोजन केलें असतां अमरत्व प्राप्त होतें असेंहि तत्व प्रसृत झालें होतें. पूर्वकालीं चर्च म्हणजे साधु लोकांची संस्था होती, व त्याचे सभासद पवित्र आहेत अशी भावना होती. अपवित्र लोकांनां चर्चमध्यें घेण्यांतच येत नसे. नंतर प्रत्येक व्यक्तीला तिची पूर्वींची पातकें नाहींशीं करण्यासाठीं दीक्षा द्यावी असें मत प्रचारांत आलें व यामुळें वाटेल त्या व्यक्तीला दीक्षा घेतल्यानंतर चर्चचा सभासद होतां येऊं लागलें. या संस्काराप्रमाणेंच धर्मगुरुबद्दलचे कांहीं विधीहि नवीन अस्तित्वांत आले. इग्नेशिअसनें धर्मगुरूच्या परवानगीशिवाय प्रभुभोजन करतां येत नाहीं असें प्रतिपादन केलें होते. आणि हेंच तत्व दीक्षेच्या बाबतींतहि अंमलांत आलें.

ख्रिस्ती संप्रदायाची शिकवणूक.- पूर्वींच्या चर्चच्या विचारांत दोन भावना दृग्गोचर होत होत्या. ख्रिस्ती संप्रदाय हा मनुष्याच्या जीवितावर ताबा चालवून मोक्ष भावना प्राप्त करून देतो अशी एक भावना होती; व दुसरी हा संप्रदाय पापी मनुष्याला त्याचें पाप नाहींसें करून एक दैवी तनु प्राप्त करून देणारें साधन आहे अशी भावना होती. ही पहिली भावना नव्या करारांत व दुस-या शतकांतींल 'अ‍ॅपॉलोजिस्ट' लोकांत दृष्टीस पडते. दुसरी भावना पॉल, इग्नेशिअस इत्यादिकांचे लेख व शुभवर्तमान वगैरेंमध्यें दृष्टीस पडते. या दोन भावना परस्परावलंबी नव्हत्या असें मात्र नव्हे. पण प्रत्येक लेखांत अगर विचारांत यांपैकीं एक विशिष्ट भावना प्रामुख्यानें दृष्टीस पडत असे एवढेंच. दुस-या शतकाच्या अखेरीस इरेनिअसनें या दोन्ही भावनांचें एकीकरण केलें. त्याच्या मतें मोक्ष म्हणजे सैतानापासून आपली सुटका करून घेणें व ईश्वराच्या कृपाप्रसादानें नवी तनु धारण करणें होय. ही त्याची कल्पना पुढील शतकांत चर्चमध्यें प्रसृत झाली. या दोनहि भावनांच्या दृष्टीनें ख्रिस्ती संप्रदाय हा अतिमानुष संप्रदाय आहे व त्याच्या मदतीशिवाय मोक्ष प्राप्त होणें अशक्य आहे.

या दोन्ही भावनांचा ख्रिस्तासंबंधीं भावनेवर परिणाम झाल्याविना राहिला नाहीं. ख्रिस्ताबद्दलची पहिली कल्पना म्हणजे साक्षात्कार करून देणारा हा देवदूत असून परमेश्वर व जग यांमधील हा दुवा आहे. परंतु वरील दोन भावनांचा परिणाम असा झाला कीं, ख्रिस्त व परमेश्वर हे एकच आहेत व ख्रिस्तरूपानें परमेश्वर जगांत अवतरत असून या अवतारानें तो मानवांची उन्नति करतो असें मत ख्रिस्ताविषयीं प्रचलित झालें. ही कल्पना तिस-या शतकाच्या अखेरीस प्रसृत झाली. पण त्या वेळी मूर्तिपूजा कोणीहि करीत नसत. तथापि शेवटीं चवथ्या शतकांत या प्रश्नावर रण माजून ३२५ सालीं नायसीआच्या कौन्सिलनें ख्रिस्ताच्या मूर्तीला पूर्णपणें परवानगी दिली व कांही काळानंतर तिचा जिकडे तिकडे प्रसारहि झाला. पुत्र या देवतेमध्यें परमात्मा, पिता व पुत्र हे तिन्ही अंतर्भूत असतात अशी समजूत होती व हेंच ट्रिनिटीचें (त्रैत्र) तत्व नाय सिआच्या तत्वज्ञानांत दिसत होतें.

ख्रिस्त हा या पुत्राचा मूर्तिमंत अवतार आहे या समजुतीमुळें चवथ्या व पुढील कांही शतकांत असा वादग्रस्त प्रश्न निघाला कीं ख्रिस्तामध्यें असलेल्या मानवी अंशाचा व दैवी अंशाचा परस्पर संबंध काय आहे. सन ४५१ सालीं भरलेल्या खाल्सीडॉनच्या परिषदेंत असें ठरलें कीं ख्रिस्तामध्ये दोन्ही अंश असून त्यांचा संयोग झाल्यावर सुध्दां त्यांचे गुणधर्म अबाधित रहातात. सन ६८० सालीं भरलेल्या कान्स्टांटिनोपल येथील मंडळानें ख्रिस्तामध्यें मानवी इच्छा व दैवी इच्छा या दोन्ही असतात असें ठरवून वरील मतास दुजोरा दिला. अशा रीतीनें ख्रिस्ताबद्दलचें त्रिमूर्तित्व पूर्णपणें प्रस्थापित झालें. मध्यंतरी पश्चिमयूरोपांतील चर्चमध्यें पाप व प्रसाद यांसंबंधीं व मनुष्याला मोक्ष कसा मिळतो याबद्दलचा वाद होऊन ५२९ मध्यें ऑरेंज येथील दुस-या बैठकींत असें ठरलें कीं, मनुष्य हा मूळचा पतित असून त्याला दीक्षेमध्यें दिल्या जाणा-या प्रसादामुळें तो मोक्ष प्राप्तीचा अधिकारी बनतो व अशीच परमेश्वरी कृपा, चर्च मध्यें राहून मिळविल्याशिवाय त्याला मोक्षप्राप्ति होत नाहीं. दुसरा बोनिफेस या पोपनें याच निकालास पुष्टि दिली. मध्ययुगांत पश्चिमयूरोपमध्यें हें तत्त्व प्रचलित होतें. सारांश हिब्रू, ख्रिस्ती, पौर्वात्य, ग्रीक, रोमन इत्यादि धर्मांतून चर्चनें आपली तत्वें घेतलीं व तीं तत्वें ज्या स्वरूपांत प्रगत झालीं ते स्वरूप ग्रीक तत्वज्ञानापासून घेतलें.

संघटना:- चर्चमधील संघटनेची उत्पत्ति किंवा वाढ कोणत्या प्रकारें झाली हें समजण्याला साधन नाहीं; कारण हें ज्ञान करून देणारी साधनसामुग्री अगदींच तुटपुंजी असून ती सुध्दां इकडे तिकडे विखुरलेली आहे. अगदीं प्राचीन काळी चर्च ही अध्यात्मिक संस्था होती व प्रत्यक्ष परमेश्वराचाच तिच्यावर ताबा होता. त्या वेळची अशी समजूत होती कीं, परमेश्वर हा निरनिराळया भक्तांनां निरनिराळया विशिष्ट देणग्या देतो व त्यांचा भत्तचनें लोकहितासाठीं उपयोग करावयाचा असतो. त्यांपैकीं प्रमुख देणगी म्हणजे उपदेशकाची होय व या उपदेशकांनां अपॉसल म्हणजे आद्य ख्रिस्तसंप्रदायप्रचारक अशी संज्ञा असे. हे लोक परमेश्वरी इच्छेचें व स्वरूपाचें ज्ञान देणारे मिशनरी लोक असत व असे संप्रदायप्रसारक पूर्वींच्या चर्चमध्यें पुष्कळ होते. तथापि ही संज्ञा फक्त पॉल व आणखी १२ जण यांनाच लावण्यांत आली. या लोकांनां चर्चमध्यें कांही अधिकाराची जागा मिळत असे असें नाहीं. तरी पण त्यांनां फार मान मिळत असे यांत शंका नाहीं. शिवाय त्यांच्या शिष्यांनीं त्यांनां एकदां अपॉसल म्हणण्यास सुरुवात केली म्हणजे तेंच नांव रूढ होत असे. या योगानें अर्थातच कांहीं ढोंगीं व खोटे अपॉसल या वेळीं निर्माण झाले. अशा खोटया लोकांचा निर्देश पॉलनेंच केला आहे. या अपॉसलांविषयीं डायाडोचीमध्यें एक सुंदर उतारा आहे. 'प्रत्येक अपॉसल हा तुमच्याकडे आला असतां त्याला तुम्हीं देवाप्रमाणें भजा पण तो जर एक दिवसापेक्षां जास्त दिवस एके ठिकाणीं वास करील तर तो खोटा आहे असें समजा. '

बिशपांचा उदय:- अपॉसल म्हणजे आद्य संप्रदायप्रचारक, वक्ते व उपदेशक यांमध्यें फारसा भेद दाखवितां येत नाहीं. तथापि हे तीन वर्ग चर्चमध्यें होते. फार प्राचनी काळापासूनच पुष्कळ चर्चमध्यें कांही कामगार लोक नेमीत असत व दुस-या शतकामध्यें आशियामायनरमध्यें बिशप म्हणजे धर्माध्यक्ष, प्रेसबिटेर व डांकर अशा तीन कायमच्या जागा अस्तित्वांत होत्या व यांचें काम अनुक्रमें चर्चच्या दानधर्माची व्यवस्था पहाणें, धार्मिक कृत्यांमध्यें अव्यवस्था असल्यास ती काढून टाकणें व पतित लोकांनां शिस्त लावणें हें होतें. अर्थातच हीं कामें ताब्यांत घेण्यासाठीं चर्चला धर्मप्रसारक, धर्मोंपदेशक व धर्मशिक्षक यांची जरूरी भासली. पण हे लोक नेहमींच मिळत नसल्याकारणानें त्यांची जागा रिकामी पडल्यास दुस-याला देण्यांत येत असे व अशा रीतीनें कायमचे कामगार नेमण्यांत येऊं लागले व क्रमाक्रमाने या कामगारांच्या ताब्यांत चर्चच्या सर्व चळवळी येऊं लागल्या. अर्थात या चर्चच्या कामगार मंडळाच्या ताब्यांतच सर्व सत्ता आली व या कामगारांवर पैशाची, शिस्तीची, व धर्माची व्यवस्था लावण्याची सर्व जबाबदारी येऊन पडली व नोकरशाही संप्रदायांच्या शासनसंस्थेंत पूर्णपणें प्रस्थापित झाली.

या चर्चचा सर्व अधिकार एकाच्या ताब्यांत होता कीं पुष्कळांच्या ताब्यांत होता हें नक्की सांगतां येत नाही. तरी पण जी कांहीं माहिती उपलब्ध आहे तीवरून दुसरेंच मत खरें असावें असें दिसतें. तरी पण ही पद्धत सार्वत्रिकच होती असें मात्र नाहीं. इग्नेशिअसच्या सूक्तामध्यें एकाच कामगाराच्या ताब्यांत चर्चची व्यवस्था असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे व त्याच्या हाताखालीं अनेक असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हीच व्यवस्था दुस-या शतकाच्या अखेरीस सर्वत्र पसरली. ज्या चर्चमध्यें एक बिशप व पुष्कळ प्रेसबिटर व पाद्री असतील त्यावेळीं ते धर्मोपाध्याय धर्माध्यक्षाचें मंडळ असे व या धर्मोपाध्यायाच्या हाताखालीं पाद्री असत.

पण ज्ञेयवादाचा उदय व वाढ झाल्यावर दुस-या शतकामध्यें चर्चची फार बिकट परिस्थिति झाली व चर्चमधील संघटनेवर त्याचा फार बिकट परिस्थिति झाली व चर्चमधील संघटनेवर त्याचा फार परिणाम झाला. या ज्ञेयवाद्यांची मतें ख्रिस्ती लोकांतील पुष्कळांनां गॉस्पेलवर घाला आणणारी वाटलीं. हे ज्ञेयवादी लोक इतरांप्रमाणेंच आपल्याला ख्रिश्चन म्हणवून घेत त्यामुळें त्यांनां आपल्यांतून कोणत्या रीतीनें वगळता येईल याचा विचार करतां करतां कॅथोलिक चर्चची स्थापना करण्याची पहिली पायरी म्हणजे पॉल आणि त्याचे बारा अ‍ॅपासल्स यांची शिकवणूक मान्य करणें ही होय व हें जो मान्य करील तोच ख्रिश्चन होय असें ठरेंल. याचा परिणाम नवा करार व दुसरे धर्मग्रंथ तयार करण्यांत झाला. ज्ञेयवादी आपल्याला देखील धर्मप्रसाराचा व उपदेशाचा पूर्ण हक्क आहे असें सांगत असत. त्याविरूद्ध धर्मप्रसारकत्वाचा खरेपणा ठरविण्यासाठीं दोन अटी घालण्यांत आल्या तरी पण या दोन अटी अपु-या पडल्या व त्यांच्यानें कार्यभाग झाला नाहीं. यासाठीं असें सांगण्यांत येऊं लागलें कीं अ‍ॅपासलनीं आपला सर्व हक्क धर्माध्यक्षाच्या ताब्यांत दिला असून धर्माध्यक्ष हेच त्यांची शिकवणूक स्पष्ट व खरी सांगण्याला पात्र आहेत. हा वाद 'धर्मप्रसारकांच्या गादीच्या हक्काचा वाद' या नांवानें प्रसिद्ध आहे. अशा रीतीनें चर्च हें या अपॉसलच्या तत्वाच्या ताब्यांत जाऊन शिवाय त्या तत्वांचा प्रसार करण्यास नेमलेल्या कामगारांच्या ताब्यांत गेलें. ही कल्पना आणि संस्काराची कल्पना या दोन्ही कल्पना एकत्र केल्या म्हणजे कॅथोलिक चर्चची पुरी कल्पना होते. चर्चच्या अस्तित्वाला बिशप कारणीभूत असून त्याच्या शिवाय अपॉसलचें तत्वसमजत नाहीं व त्यामुळें मोक्ष मिळणार नाहीं अशी या चर्चची रूपरेषा होऊन बसली.

प्रत्येक लहान अगर मोठया चर्चला बिशप हा असेच. व याचा निर्देश इग्नेशिअस व सायप्रियन यांनीं कला आहे. हीच पद्धति कित्येक वर्षें अमलांत होती. परंतु तिस-या शतकाच्या मध्यास चर्चची सत्ता जास्त वाढत जाऊन व त्या मानानें बिशपाची ही सत्ता एका चर्चवर न राहतां अनेक चर्चांवर पसरल्यामुळें पूर्वींची बिशपची जागा धर्मोपाध्यायाकडे आली व बिशपची सर्व व्यवस्था यांच्याकडे आली. तरी पण बिशप याच्याप्रमाणें पूर्ण स्वातंत्र्य या धर्मोपाध्यायाला मिळालें नाहीं. फक्त तो बिशपाचा प्रतिनिधि या नात्यानें काम करीत असे; दीक्षा देण्याचा हक्क याला मिळाला नाहीं. अशा रीतीनें बिशपची सत्ता अनेक चर्चांवर चालू लागल्यामुळें त्याच्या हाताखालील चर्चमध्यें ऐक्य उत्पन्न होऊं लागलें व या एकीची कल्पना जास्तच वाढत जाऊन सर्व ख्रिस्ती जगांतील चर्चें एकत्र होऊन एक चर्च निर्माण झालें व चर्चला ख्रिस्ताचें शरीर असें मानण्यांत आलें व या चर्चमधील सर्व लोक परमेश्वराचे पुत्र आहेत असें मानण्यांत आलें. या ऐक्याचा अतोनात फायदा झाला. चर्चमधील आपापसांतील संघट्टण वाढत गेलें; एका चर्चमधील माणसें दुस-या गांवीं गेली असतां तेथील चर्चकडून त्यांनां चांगली सहानुभूति मिळूं लागलीः धर्मपुस्तकांचा झपाटयानें प्रसार सुरू झाला व निरनिराळया भागांतील चर्चमधील वाढ एकाच पद्धतीनें होऊं लागली. दुस-या शतकाच्या समाप्तीपूर्वीं आशियामायनरमध्यें स्थानिक सभा भरत असत. तिस-या शतकामध्यें प्रांतिक सभा भरूं लागल्या व निकेयाच्या मंडळानें त्या दोन वर्षांच्या अंतराने भरत जाव्या असें ठरवलें. याहिपेक्षां मोठया सभा व सर्व पश्चिम यूरोपमधील धर्मसभा ही चवथ्या शतकांत अर्लसमध्यें भरली. ३२५ सालीं निकेया येथें अखिल ख्रिस्ती जगांतील चर्चनें धाडलेल्या प्रतिनिधींची सभा भरली या व अशाच इतर सभा सर्व बादशहाकडून बोलावल्या जात असत व त्यांत जे नियम ठरतील ते तो अमलांत आणीत असे. अशा रीतीनें चर्च ही राजाश्रित संस्था आहे अशी जी जुनी कल्पना तिचा येथेंहि प्रवेश झाला.

बिशप हे अपॉसलचे प्रतिनिधी असून त्यांनांच काय तो धर्माचीं गूढ तत्वें सांगण्याचा हक्क आहे असें जें वर सांगण्यांत आलें त्यावरून हें उघडच सिद्ध होतें की सर्व बिशपांच्या मतांत एकी होती; पण हा समज चुकीचा आहे. त्यांच्यामध्यें पुष्कळ मतभेद होत असे व यांच्यामधील वाद मिटविण्यासाठीं एक सार्वत्रिक धर्ममंडळ अस्तित्वांत आलें व त्यांनीं अपॉसलचीं तत्वें अगदी सत्य आहेत, त्यांत ढवळाढवळ करण्याचा कोणासहि बिलकुल अधिकार नाहीं असें जाहीर केलें.

या अखिल चर्चमधील ऐक्याचा परिणाम नगरपद्धतीच्या स्थापनेंत झाला. एका प्रांतांतील सर्व चर्चे एका बिशपाच्या ताब्यांत असून तो राजधानीमधील चर्चचा धर्माध्यक्ष असे व या पद्धतींत चर्चनें राजकीय विभागणीच्या पद्धतीचाच अवलंब केला. ही पद्धत पूर्वयूरोपमध्यें पूर्वींच अस्तित्वांत होती. पश्चिम यूरोपमध्यें मात्र ही पद्धत हळूहळू अमलांत आली. याच नगरपद्धतीचा विकास होऊन एकमेकालगत असणा-या पुष्कळ प्रांतांतील चर्चचा संघ बनून त्या सर्व प्रांतांतील सर्वांत मोठया राजधानीच्या शहरांच्या धर्माध्यक्षाच्या तांब्यांत बाकी सर्व चर्चें असावयाचीं अशी पद्धत निर्माण झाली. निकेयाच्या मंडळामध्यें अलेक्झांड्रियाच्या रोमच्या व अँटिओकच्या धर्माध्यक्षांची सत्ता पुष्कळ प्रांतांवर मानली गेली व दर बैठकींत आणखी कांहीं मुख्य मुख्य धर्माध्यक्षांनां सत्ता देण्यांत आली.

बिशपांत रोमच्या बिशपास प्रामुख्य:- पण या अवधींत रोमन धर्माध्यक्षांची सत्ता वाढत हाऊन तिचें पोपच्या सत्तेंत रूपांतर झालें. रोमच्या बिशपाला अधिकाधिक अधिकार मिळत गेले याचें कारण रोमन बादशहा आपला सर्व धर्मविषयक पत्रव्यवहार रोमच्या बिशपांमार्फत करीत असत. यामुळें म्हणजे बादशाही अधिकाराच्या अंतेवासित्वामुळें रोमच्या बिशपला इतर बिशपांवर अधिकार मिळाला व सर्व ख्रिश्चन चर्चांवर त्यांनीं आपली सत्ता बजावण्याचा हक्क सांगण्यास सुरूवात केली व ५ व्या शंतकांत पश्चिम यूरोपावर ती गाजवण्यास सुरूवात केली. ही चळवळ आगस्टाइननें नेटानें चालविली व चर्च ही सर्वांत वरिष्ठ सत्ता आहे असें प्रतिपादन केलें. हें आगस्टिनचें तत्व पश्चिम यूरोपमध्यें मान्य झालें, व मध्ययुगांत चर्च हें निवळ मोक्षाच्या बाबतींतच नव्हे तर सर्व राजकीय व सामाजिक बाबतींत सत्ता गाजवूं लागलें. याच तत्वावर ऑगस्टिनच्या नंतर पोपची सत्ता स्थापित करण्यांत आली. देवाच्या खालोखाल रोमच्या धर्माध्यक्षाची सत्ता मानण्यांत येऊं लागली.

पूर्वकालीन चर्च हें रोमन साम्राज्याचें चर्च होतें. चवथ्या शतकापासून रोमन साम्राज्य सर्व बाजूंनीं पसरूं लागलें. तरी पण इराण अगर अ‍ॅबिसीनियामधील जीं चर्चें उदयाला आलीं ती रोमन साम्राज्यामध्यें सामील झालीं नाहींत. यास्तव आपण त्यांचा विचार न करतां केवळ रोमन साम्राज्यांत मध्ययुगीन चर्चची स्थिति काय होती त्याचें ऐतिहासिक दृष्टीनें निरीक्षण करूं.

ज्याला आपण मध्ययुग म्हणतों त्यावेळी लोंबार्ड, पश्चिमगॉथ, फ्रँक व अँग्लोसेक्शन या लोकांनीं अनुक्रमें इटली, स्पेन, फ्रान्स व ग्रेटब्रिटन येथें आपलीं राज्यें स्थापन केलीं होतीं. ज्या आशियाखंडांतील व आफ्रिकेंतील प्रांतांवरील सत्ता पूर्वीं अलेक्झांडरच्या हातांत होती ती नष्ट होऊन महंमदी सत्ता त्या प्रांतांवर या युगांत पसरलेली होती. तेव्हां अशा अनेक प्रचंड घडामोडीच्या युगांमध्यें चर्चची काय परिस्थिति होती हें पहाणें फार मनोरंजक होईल. या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वीं आपणाला हें लक्ष्यांत ठेवणें जरूर आहे कीं, सर्व रोमन साम्राज्यान्तर्गत चर्चचा विचार यापुढें न करतां पूर्वयूरोपीय व पश्चिमयूरोपीय चर्चची स्वतंत्र रीतीनें परिस्थिति अवलोकन करणें अत्यावश्यक आहे. कारण या दोन्ही चर्चची वाढ अगदीं स्वतंत्र रीतीनें व विषमतेनें झाली.

पूर्वेकडील चर्चची स्थिति, (अ) पुराणमतवादी चर्च.- पश्चिमेप्रमाणें पूर्वेंकडे पूर्व, प्राचीन व मध्ययुगांतील चर्चच्या परिस्थितींत फारसा बदल झाला नाहीं. कारण पूर्वेकडे रोमन साम्राज्य अजून अस्तित्वांत होतेंच. पूर्वकालीन चर्चमधील व्यवस्थाच हल्लीच्या चर्चमध्येंहि होती. बादशहाची सत्ता चर्चवर या युगांतहि होती हें त्याचें कारण नव्हें तर बादशहाची स्थिरता कायम होती व पुढें मुसुलमानी राज्य झालें हें होय. चर्चचा धर्माध्यक्ष हा स्वतंत्र नसून तो बादशहाच्या ताब्यांत होता.

कॉन्स्टंटाईनच्या कालानंतर झालेल्या चर्चच्या विकासाचें फळ म्हणजे पूर्वयूरोपीय चर्चचें पुराणमतवादित्व होय. मताबद्दलच्या झगडयांत ग्रीक लोकांचें ज्ञानविषक तत्व थोडें फार पटूं लागलें होतें व ज्ञानावरील विश्वास पूर्वयूरोपीय चर्चमधून अगदींच उडाला नव्हता. मध्ययुगाच्या सुरवातीस ग्रीक लोकांमध्यें इतर राष्ट्रांपेक्षां ईश्वरविषयक ज्ञानाचा व इतर ज्ञानाचा फार प्रसार झाला होता व या कालीं पश्चिमयूरोपमध्यें असा एकहि मनुष्य नव्हता कीं जो ज्ञानाच्या व कलाप्रावीण्याच्या बाबतींत फोटियसबरोबर स्पर्धा करूं शकला असता; परंतु ७ व्या शतकाच्या अखेरीस हा मताविरुद्ध चाललेला लढा शेवटास गेला. या वादविवादानंतर क्रीड व तत्वें निश्चित झालीं व तीं कायम ठेवणें हें आतां जरूरीचें होते; ईश्वरविषयक ज्ञानाच्या शास्त्राचें काम पूर्वींच्या प्रमाणग्रंथाचें एकीकरण करून पुनः तें स्पष्ट लोकांपुढें मांडणें एवढेंच काय तें शिल्लक राहिलें. जॉन ऑफ डमॅस्कसनें इ. स. ६९९-७५३ मध्यें अशा प्रकारचा प्रयत्न केला. त्यानंतर यूयेमिअस वगैरेनीं अशाच धर्तीवर थोडे फार प्रयत्न केले व अशा प्रकारच्या प्रमाणभूत ग्रंथाच्या आधारें बनविलेल्या तत्वांना मानहि मिळूं लागला. तरी पण याच्यापेक्षांहि धार्मिक वृत्तीचे लोक देवाच्या पूजेच्या प्रकारांना जास्त मान देऊं लागले व अशा प्रकारच्या पूजेमुळें आपल्याला ईश्वराची प्राप्ति लवकर होते अशी कल्पना त्यांच्या मनांत येण्याबरोबर त्यांनीं सर्व उत्साह या कामाकडे लावला; व ग्रीकमधील मोठमोठया विद्वानांचीं मनें या मूर्तिपूजेवरील वादविवादाकडे आकर्षिली गेलीं. हा वाद एक शतकपर्यंत चालून शेवटी मूर्तिपूजेचें तत्व पूर्णपणें मान्य झालें. मूर्ति ही केवळ साधन अगर दृश्य चिन्ह नसून प्रत्यक्ष परमेश्वरच सगुणरूपानें या मूर्तीत अवतरला आहे अशी त्यावेळची भावना होती. ख्रिस्ताची मूर्ति केल्याशिवाय ख्रिस्ताचें दृश्य स्वरूपांत आपल्याला दर्शन मिळावयाचें नाहीं अशी त्यांची श्रद्धा होती. यामुळें मूर्तिपूजा अधिकच भरभराटीस आली. अशा प्रकारच्या कल्पना पसरल्यामुळें अर्थातच परमार्थविद्येचें मुख्य कार्य म्हणजे या मंत्रतंत्राचा पूर्ण परिचय करून देणें हें झालें. पाचव्या शतकामध्यें एका ख्रिस्ती मनुष्यानें या कामाला सुरवात केली; त्यानंतर मॅक्सीमस कनफेसर (मृत्यु ६६२). सीमियन (मृत्यू १०४०) व निकोलस कॅबे सिलॉस (मृत्यू १३६१) वगैरे विद्वान या मांत्रिकतांत्रिक पद्धतीचे प्रतिनिधी होते. त्यांची महत्वाकांक्षा साक्षात्कार करून घेण्याची होती.

ही साक्षात्काराची तळमळ या मध्ययुगीन वैराग्य वृत्तीमधील एक विशेष होय. ५-६ व्या शतकामध्यें ईजिप्शियन पॅलेस्टॉईन हें साधू व मठ यांचें आश्रयस्थान होतें. परंतु अरब स्वारीमुळें ख्रिस्ती जगाचा व याचा जेव्हां संबंध तुटला तेव्हां अर्थातच ही वैराग्यवृत्ति लोपली. मध्ययुगांत कॉन्सांटिनोपल व माउंट एथॉस यांनां बरेंच महत्व प्राप्त झालें. ग्रीसमध्यें ईश्वराला शरण जाणें व विरक्ति प्राप्त करून घेणें ही दोन्हीं निश्रेयसाला अवश्य आहेत, असें मानलें गेलें व अशा रीतीनें या वैराग्यवृत्तीला एकप्रकारचें गूढत्वाचें वळण लागलें. सिमिऑनचीं जी तत्वें 'दिन्यूथिऑलॅजियन' ग्रथित केलीं होती तीं या मठांमध्ये प्रसृत झालीं व हेसिचॅस्टसनें १४ व्या शतकांत या सिमिऑनच्या तत्वावरून साक्षात्काराबद्दलचे एक सिध्दांतरूप मत प्रतिपादन केलें; व पुष्कळ वादविवादानंतर ईस्टर्न  चर्चने त्याचा अंगिकार केला. सारांश या पूर्वेकडील चर्चनें मध्ययुगांमध्यें पूर्वींचेंच रूप कायम ठेवलें. पश्चिमेकडील चर्चप्रमाणें या चर्चमध्यें कोणताहि फरक घडून आला नाहीं. फक्त पूर्वींचींच मतें त्यांनीं निराळया स्वरूपांत पुढें ठेवून त्यांचा प्रसार केला. व अशा रीतीनें सर्व दिशेनें या मतांचा विकास झाला. यावरूनच हें पूर्वेकडील चर्च जिवंत होतें असें सहज कळून येईल. या चर्चचा विस्तार सारखा होऊं लागला. या मध्ययुगाच्या सुरवातीला रशियन या सामान्य जातिनामाखाली येणारीं बल्गेरिअन, सर्व्हिअन वगैरे अनेक लोकांची राष्ट्रें उदयाला आलेली होती व पूर्वेकडील चर्चला प्रयत्‍नांतीं हे सर्व लोक मिळाले; ग्रीकांच्या नंतर येणा-या लोकांत व या रशियन लोकांत कोणतेंहि साम्य नव्हतें. तरी पण त्यांच्यामध्यें ग्रीक धर्म व त्यांच्या भावना या अजूनहि दृष्टीस पडत होत्या. यावरून ग्रीक लोकांमध्यें परकीय तत्वें देखील आपल्यामध्यें शोषून घेऊन जिरवून टाकण्याची किती शक्ति होती हें दिसून येतें. याचा एक परिणाम असा झाला कीं, पूर्वेकडील चर्चचा पश्चिमेकडील चर्चशीं मिलाप घडून आलाच नाहीं. दोघांनांहि हा वियोग इष्ट नव्हता पण पर्वेकडील व पश्चिमेकडील चर्चची वाढ भिन्नभिन्न मार्गानें होत असल्याकारणानें त्याला इलाजच उरला नाहीं. कॉन्स्टांटिनोपल पडल्यापासून मात्र पूर्वेकडील चर्चमधील जो जिवंतपण होता त्याला थोडा धक्का बसला.

(आ) नेस्टोरियन व एकप्रकृति वादाचा पुरस्कार करणारीं चर्चें:- जेव्हां पूर्व सीरियामधील चर्चनें सीरीयन वेदांत्यांनीं सांगितेल्या- अर्थांत नेस्टोरियनच्या शिक्षणपद्धतीला व तत्वाला चिकटून रहाण्याचें ठरवलें त्याच वेळेस पश्चिम सीरिया, ग्रीक व लॅटिन देशांत चर्चशीं त्याचा विरोध येऊन तें निराळें झालें, तरी पण त्याची सत्ता कमी झाली नाहीं. उलट त्यानें आपला मोर्चा पर्शियन चर्चकडे वळविली. पर्शियन चर्चनें कांहीं एक विरोध केला नाहीं व बाबीयसच्या (४९८-५०३) कारकीर्दीपासून पर्शियन चर्च हें नेस्टोरियन बनलें. तसेचं अरबी ख्रिश्चन लोक व मध्यआशियातील लोक यांनीं देखील नेस्टोरियन चर्चशीं सबंधं ठेवला. नेस्टोरियन तत्वज्ञांनीं व वैद्यांनीं मध्य युगांमध्यें पुढें जे तत्वज्ञ उदयाला आले त्यांनां शिकविलें व मध्ययुगीन तत्वज्ञांनीं ग्रीक तत्वांचा सीरियन भाषेंतील भाषांतरावरून अभ्यास केला.

मध्ययुगामधील राजकीय परिस्थितीमुळें नेस्टोरियन चर्चला अनुकूल परिस्थिति येऊन, अरब लोकांनीं ईजिप्त, पॅलेस्टाईन, सीरिया हे प्रदेश जिंकल्यामुळें तेथील ख्रिस्ती चर्चवर नेस्टोरियन चर्चनें आपलें वर्चस्व स्थापन केलें. याहींपेक्षां महत्वाचा फायदा हा झाला कीं, यामुळें मध्यआशिया व आत्यंतिक पूर्वेकडील देश यांच्यामध्यें दळणवळण वाढूं लागून नेस्टोरियन लोकांनां चीनमध्यें जावयास मार्ग मिळाला. सि गाँ फं (इ. स. ७८१) च्या शिलालेखावरून या देशांत नेस्टोरियन चर्चनें खिस्ती विचाराचा केवढा प्रसार केला होता हें दिसून येतें. तसेंच दक्षिण सायबेरियामध्यें व मंगोलियामध्येंहि यांचा प्रवेश झाला होता. या प्रत्येक देशांत ख्रिस्ती धर्माला पुष्कळच अनुयायीं मिळाले. तेराव्या शतकाच्या आरंभीं मंगोलियन साम्राज्य प्रस्थापित झाल्यानें नेस्टोरियन चर्चच्या सत्तेला कांहीं अडथळा आला नाहीं. परंतु मंगोलियन साम्राज्यास उतरती कळा लागून इस्लामी सत्ता उदयाला येत असतां इस्लाम धर्मानें सर्व सत्ता बळकावली. परंतु नेस्टोरियन चर्चपेक्षां देखील एकप्रकृतिकवादाचा पुरस्कार करणा-या चर्चला या मध्ययुगामध्यें फार वाईट दिवस आले. ईजिप्तमध्यें हा धर्म जास्त प्रचलित होता व सीरियामध्यें देखील थोडा फार पसरलेला होता. एडेसाच्या जाकोबमुळें ह्या धर्माचा रोमनचर्चपासून बचाव झाला व एवढयाचसाठीं त्या धर्माच्या अनुयायांनीं आपल्याला जाकोबाइट्स असें म्हणून घेतलें. या रोमन चर्चच्या जुलुमापासून अरब सत्तेनें ६३५ नंतर सुटका केली व हें चर्च तसेंच जिवंत राहिलें. पुढें त्याची फारशी भरभराट झाली नाहीं. ईजिप्तमधीलं या धर्माच्या चर्चची अशीच स्थिति झाली. ६४१ मध्यें या ठिकाणीं देखील या धर्माची रोम चर्चच्या जुलुमापासून अरब सत्तेने सुटका केली पण या चर्चची देखील व्हावी तशी वाढ झाली नाहीं व या धर्माचे अनुयायी कॉप्टिक लोक यांची उत्तरोत्तर कमी संख्या होऊं लागली. १५१७ मध्यें टर्कीसत्तेचा उदय झाल्यावर या धर्माचे अनुयायी फारच कमी झाले होते व १८२० सालीं या अनुयायांची संख्या केवळ ६०,००,००० च होती. अ‍ॅबिसीनियामध्यें मात्र या कॉप्टिक चर्चनें आपला धर्म जिवंत ठेविला.

पश्चिमेकडील चर्च (अ) मध्ययुगाचा आरंभ कालः- पूर्वेकडील चर्चनें जरी मध्ययुगांत पूर्वींच्याच धर्मतत्वांनां चिकटूनच कांही कांहीं सुधारणा केल्या तरी पण पश्चिमचर्चला मात्र एक अतिशय भयंकर क्रांतीशीं झगडावें लागलें. ६ व्या शतकाच्या अखेरीस ख्रिस्ती जगाचे निरनिराळे प्रांत अलग होऊन त्यांनीं आपली स्वतंत्र राज्यें स्थापिलीं होतीं व त्यांमध्यें जर्मनवंशींय लोकांची सत्ता बलाढ्य होती व त्यांत जर्मन रक्ताचींच राष्ट्रें पुष्कळ होतीं. फक्त रोमच्या ताब्यांत असलेला जर्मनीचा भाग व इंग्लंड यांमध्यें मात्र टयूटन शाखेचें साम्राज्य होतें. इतर राज्यांमध्यें मात्र रोमन सत्तनें या जर्मनवंशीय सत्तेला व्यापून आत्मसात् केलें. लोंबार्ड, पश्चिमगॉथ, स्वाबियन, फ्रँक वगैरे जातींचे लोक हे रोमन संस्कृतीचे पूर्ण अभिमानी बनलेले होते. तरी पण या ख्रिश्चन चर्चला थोडाफार धक्का बसला यांत शंका नाही. जर्मन स्वा-यामुळें यूरोपच्या इतिहासाच्या प्रवाहाला जरी अडथळा आला तरी पण त्यायोगानें ख्रिस्ती चर्चच्या प्रसाराला अडथळा आला नाहीं. फक्त ब्रिटनमध्यें मात्र ख्रिस्ती धर्माला अगदीं पश्चिमभागांत जावें लागलें व र्‍हाईन व डान्यूब या नद्यांच्या प्रदेशांत कांहीं चर्चें बुडालीं. तरी पण याचें फारसें महत्व नाहीं. कारण पुनः चर्चनें गमावलेला प्रांत काबीज करण्याचा निश्चय केला. मध्ययुगाच्या आरंभीच्या व मागील युगाच्या शेवटच्या काळाच्या सरहद्दीवर चमकणारी व्यक्ति ग्रेगरी ही होय. यानें ऑगस्टिन नांवाच्या साधूला इंग्लंडला पाठविलें व तेथील अँग्लो सॅक्सन लोकांचीं मनें ख्रिस्ती धर्माकडे वळविण्यास सांगितलें; व त्याच्या  परिश्रमानें इंग्लंडमध्यें अँग्लो-सॅक्सन चर्चची स्थापना होऊन ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊं लागला. यूरोपमध्यें इतर ठिकाणीहि फ्रेंचांची सत्ता वाढल्यामुळें ख्रिस्ती धर्म हा अधिकाधिक प्रसृत होऊं लागला. पूर्वींच्या सर्व लुप्तप्राय झालेल्या चर्चची पुनःस्थापना होऊन बिशप नेमण्यांत आले इतकेंच नव्हे पण फ्रान्सनें मेन नदीच्या दोहों बाजूला आपल्या वसाहती केल्यामुळें ख्रिस्तीधर्म खुद्द जर्मनीच्या मुलुखांत पसरला नाहीं. सरते शेवटीं स्वेबियन व बव्हेरियन लोक ताब्यांत आल्यावर फ्रेंचांनीं त्याहि मुलुखांतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. या कामांत सेल्टिक मिशनर्‍यांनींहि फ्रेंचांनां मदत केली. इंग्लंडमध्यें जुनीं ब्रिटिश व नवी अँग्लो सॅक्सन चर्चें यांची दोस्ती जमली नाहीं. तरी पण सेल्ट लोकांनीं ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठीं जिवापाड श्रम केले व त्याबद्दल सर्व यूरोपखंडानें त्यांचें ॠणी राहिलें पाहिजे. सारांश मध्ययुगाच्या आरंभींचें पहिलें शतक संपण्याच्या पूर्वीं ख्रिस्ती चर्चनें आपला पूर्वींचा सर्व प्रदेश मिळविला एवढेंच नव्हे तर आणखी दुसराहि मिळविण्यास सुरवात केली होती. तरी पण हें करतांना ख्रिस्ती धर्मानें आपलें जुनेंपण कायम ठेवून त्यांत थोडेफार फेरफार केले होते. चर्चचें क्रीड (तत्वें, उद्देश) व मतें हीं पूर्वींप्रमाणेंच कायम होतीं. पुराणकालीन चर्चनें जीं धोरणें आंखलेली होतीं व जीं मतें प्रतिपादलीं होतीं तीं पूर्ण असून त्यांत फेरफार करण्याचें कांहींच कारण नाहीं असें ठरलें. उपासनेचा प्रकार देखील अबाधितच राहिला. लॅटिनभाषा लोकांनां कळत नव्हती तरी देखील मंत्रतंत्रांमध्यें व प्रार्थनेमध्यें तीच भाषा ठेवली. चर्चची संघटना देखील पूर्ववतच होती व चर्चचें उत्पन्न व त्याचा दर्जा हीं देखील पूर्वींप्रमाणेंच राहून ख्रिस्ती मनुष्यानें आपलें जीवित पूर्ण करण्यास वैराग्य वृत्ति धारण केली पाहिजे हें पूर्वींचे तत्वहि जसेंच्या तसेंच राहिलें. तथापि जे कांहीं नवीन बदल करण्यांत आले त्यांचा चर्चवर बराच परिणाम झाल्याशिवाय राहिला नाहीं.

रोमीचर्चच्या एकत्वास विघातक परिस्थितींची अंगें:- अँग्लो सक्सन व सेल्ट प्रचारकांतील द्वैत मागें सांगितलेंच आहे. लोंबार्ड, गॉथ, अँग्लो-सॅक्सन चर्च ही आपल्याला कॅथालिक म्हणवून घेत असत. परंतु कॅथोलिक चर्चची स्थिति फार बदललेली होती. तिच्यामध्यें संघटनेचा अभावच होता व त्यामुळें सार्वजनिक स्वरूप लयाला जाऊन त्याचें स्थानिक चर्चांत रूपांतर झालें होतें व सार्वत्रिक चर्चच्या बैठकीहि होत नव्हत्या. रोमच्या धर्माध्यक्षाला प्रत्येक चर्च जरी मान देत असे, तरी रोमच्या धर्माध्यक्षाचा इतर स्थानिक चर्चवर कोणताहि कायदेशीर हक्क राहिला नव्हता.

आर्थिक अधिकार आणि तात्विक अधिकर:- मतांवर आर्थिक स्थितीचा परिणाम व्हावयाचाच. ज्याचा पैसा त्याचें मत परिणामकारी व्हावयाचें हें सहज आहे. राजाचा अधिकार प्रत्यक्ष चर्चच्या तत्वावर जरी चालत नसला तरी एकंदर अंतर्बाह्य व्यवस्थेवर चालत होता. राजाच्या संमतीशिवाय कोणत्याही बिशपची निवड होत नसे. स्थानिक धर्माध्यक्षांच्या एकत्र सभा होत असत व या सभा राजाच्या संमतीनें बोलावण्यांत येत होत्या व त्यांनीं केलेले ठराव राजा अंमलात आणीत असे.

अशा स्थितींत धर्मसभेच्या अधिकारांत राजाचा अंश असल्यामुळें त्यांत जर्मन परिस्थितीचा परिणाम कसा झाला हें सहज दिसून येईल. ख्रिस्ती जगांमध्यें सर्व चर्चें व त्यांची मालमत्ता ही धर्माध्यक्षांच्या ताब्यांत असे. पण जर्मन देशांत मात्र त्या त्या गांवचे सरदार हे त्या त्या गांवांतील चर्चचे मालक म्हणून समजण्यांत येऊं लागले. याचा परिणाम असा झाला कीं, ते सरदार लोक उपाध्याय नेमण्याबद्दलचा आपला हक्क सांगू लागले व त्या चर्चवरील उत्पन्नावरची मालकी दाखवूं लागले. कांहीं कांहीं चर्चचा हक्क त्यांनां मिळाला व ज्यांना तो हक्क  मिळाला त्यांनीं आपापले धर्माध्यक्ष निवडले. हा जो फेरफार जुन्या चर्चच्या संघटनेंत झाला तो ख्रिस्ती चर्चमध्यें जें जर्मन वर्चस्व झालें त्याचा पहिला महत्वाचा परिणाम होय व तोच आजवर चालूं असलेला दृष्टीस पडतो.

इंग्लंडचा ख्रिस्ती इतिहासांत कामगिरी- मध्ययुगाच्या चर्चमध्यें सुधारणा करण्याचें काम प्रथमतः इंग्लंडांत सुरू झालें. मध्ययुगांतील ख्रिस्ती वाङ्मयाचें व तत्वज्ञानाचें माहेरघर इंग्लंड होतें. अ‍ॅलडेल्म (मृत्यु ७०९) व बीड (मृत्यु ७३५) हे या युगांतील पहिले विद्वान होते. विन फ्रिड बोनीफॅटियस (मृत्यु ७५७) हा इंग्लंडमध्येंच जन्मला. तो मुख्यतः मिशनरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु मध्यजर्मनींतील लोकांनां ख्रिस्ती बनवणें हें जें काम त्यानें केलें तें त्याचें अगदीच कमी महत्वाचें काम आहे. याहीपेक्षां त्याची कामगिरी म्हणजे त्यानें केलेलीं बव्हेरियाच्या व फ्रान्सच्या चर्चांची पुनर्घटना ही होय. तसेंच इंग्लंडमधील धार्मिक वाङ्मयहि त्यानेंच प्रथमतः जर्मनीमध्यें नेलें.

फ्रान्सची कामगिरीः- अशा रीतीनें विनफ्रिडनें तयार केलेल्या पायावर पिप्पीन आणि शार्लमेन यांनीं आपली इमारत बांधली. शार्लमेनचें महत्व त्यानें चर्चची सत्ता इतर प्रदेशावर वाढवली यांत नसून त्यानें फ्रेंच चर्चाला धर्मप्रसाराचें काम व जबाबदारी ओळखावयास लावून तें करावयास लावलें यांत आहे. धर्मासंबंधीचे जे नियम त्यानें अमलांत आणले त्यांचा हेतू हाच होता. उपाध्यायांनां त्यानें लोकांनां मनापासून शिकवण्यास व धर्मज्ञान देण्यास सांगितलें व धर्माध्यक्षांनां धर्मगुरूंवर चांगल्या प्रकारें देखरेख करण्यास सांगितलें. तसेंच उत्तम प्रकारचें धार्मिक वाङ्मय उत्पन्न करून चर्चची कामगिरी करण्याचेंहि काम वृध्दिंगत होऊं लागलें.

या कल्पना तडीस नेण्यासाठी शार्लमेननें आपल्या पदरीं अनेक विद्वान लोकांचा संग्रह केला. सर्वांत अ‍ॅलसुइन (मृ. ८०४) हा अँग्लोसॅक्सन विद्वान त्याचा विशेष सहकारी होता. पण त्याशिवाय जोसेफरस्कॉट्स व डंगल हे सेल्टिक विद्वान, पॉलीनास व पॉलस डायाकोनस हे लॉबार्डियन विद्वान व इतर फ्रेंच विद्वान हे देखील त्याचे सहकारी होते व यांच्या देखरेखीखालीं तत्वज्ञानाची भरभराट झाली. त्यांत विशेष नावीन्य होतेंच असा भाग नाहीं. परंतु नवीन स्वरूपांत मात्र पूर्वींचेंच वाङ्मय लोकांपुढें मांडण्यांत आलें. तसेंच पूर्वेकडील चर्चमध्यें व या चर्चमध्यें मूर्तिपूजेवर जो वादविवाद झाला त्यावरून ह्या लोकांनां आपलें तत्वज्ञान ग्रीकाइतकेंच उच्च दर्जाचें आहे असें वाटत असावेसें दिसतें व हें खरेंहि होतें.

ख्रिस्ती संप्रदायाची प्राचीन जर्मन पांडित्याकडून सेवा.- या फ्रेंच विद्वांनानंतरच्या दुस-या   पिढीनेंहि आपली कामगिरी योग्य तर्‍हेनें बजावली. रॅबॅनस हा विद्वतेमध्यें अ‍ॅलसुईनपेक्षां देखील श्रेष्ठ होता. जर्मनीचा हा पहिलाच तत्वज्ञ होता. स्टॅबो नांवाच्या त्याच्या शिष्यानें 'ग्लासा ऑर्डिनेरिया' नांवाचा ग्रंथ लिहिला व तो बायबल वरील एक प्रमाणग्रंथच या मध्ययुगामध्यें झाला.

फ्रान्समध्यें तर पुष्कळच विद्वान झाले. त्यांपैकीं मुख्य मुख्य असे हिंकमार (मृत्यु. ८८२), प्रुडेन्शस (मृत्यु. ८६१), सर्हेंटसलपस (मृत्यु. ८६२), व आणखी कांहीं होत. या सर्व लोकांची प्रवृत्ति बायबलमधील विचारांची पुनरावृत्ति करण्याकडे दिसून येत असे. तरी पण त्या शकामध्यें हिंकमार व गॉट सचॉक यांमध्यें पुनर्जन्मासंबंधीं जो वादविवाद झाला त्यावरूनं त्या काळांत देखील बरेच बुध्दिमत्तादर्शक वादविवाद होत असत असें म्हणण्यास हरकत नाहीं.

रोमच्या धर्माध्यक्षांच्या मदतीनें धर्मासंबंधीं नियम ठरविण्यांत शार्लमेननें आपल्या बापाचा कित्ता गिरवला यांत शंका नाहीं. त्यानें पिप्पिनची देणगी पुनः सुरू केली. ऑड्रियन पोपपासून 'डॉयोनिसो डॅड्रियाना' नांवाचें धर्म नियमावरील ग्रंथभांडार मिळविलें. परंतु ८०० नंतर रोमवर देखील फ्रेंच साम्राज्य प्रस्थापित झाल्यावर सुध्दां फ्रेंच धर्मनियमांमधील ल्युटॉनिक वृत्तीची छटा अद्याप नष्ट झाली नव्हती. शार्लमेननें साम्राज्य स्थापन केल्यामुळें रोमच्या धर्माध्याक्षाला फ्रेंचांच्या राजधानींत रहावें लागे.

याला विरोधी अशा थोडयाफार चळवळी चालूं होत्या, हें ९ व्या शककांत धर्मनियमांचा भंग केल्याबद्दल जे कांहीं खटले झाले त्यावरून दिसून येतें. परंतु ही चळवळ यशस्वी झाली नाही. परंतु याहूनहि महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे, पूर्वस्थितीची व पूर्वकालीन हक्काची रोमला जाणीव होऊं लागली ही होय. लिओ, गेलॉशिअस, ग्रेगरी यांच्या कल्पनांचा विकास करून निकोलस (८५८-६७) यानें रोमच्या धर्माध्यक्षाचा ईश्वरदत्त हक्क व अमर्यादित सत्ता यांचें सुंदर चित्र रंगविले व त्यासाठीं खटपट केली पण अद्याप पोपच्या सार्वत्रिक सत्तेचा काळ यावयाचा होता. कारण जरी शार्लमेनची सत्ता हळूहळू लयाला जाण्याच्या मार्गाला लागली होती तरी पण रोमच्या पक्षमेदांत धर्माध्यक्ष्ज्ञ गुंतल्यामुळें धर्मसत्तेला एकप्रकारचें नादान स्वरूप प्राप्त होऊन ही सत्ता लयाला जाते की काय अशी भीति वाटू लागली.

(आ) मध्ययुगांतील मध्यकाल व रोमन धार्मिक सत्तेचा कळस, राजनियुक्त धर्माध्यक्षः- सेंक्सनीचें घराणें राज्यारूढ झाल्यावर स्थानिक धर्माध्यक्ष नेमण्याची चर्चची पद्धति जोरानें अमलांत आली. ९६३ त जर्मन राजाशीं ऑटोचा जो सलोखा जडला त्यामुळें रोममधील पद्धतीशीं जर्मन स्थानिक पद्धतीचा संसर्ग होऊं लागला. पण त्यायोगानें एकमेकांमध्यें केव्हांना केव्हां तरी खटका उडणार हें उघडच दिसूं लागलें; व हा विरोध धर्माध्यक्षाच्या जागेच्या निवडणुकीच्या बाबतींत दिसूं लागला. रोममध्यें धर्मनियमाप्रमाणें धर्माध्यक्ष निवडण्याची पद्धत होती. तर जर्मनींत राजानें धर्माध्यक्ष निवडण्याची पद्धत होती. धर्माध्यक्ष हा निवडलाच जात असे. परंतु राजा जो धर्माध्यक्ष निवडून येईल त्याला एक आंगठी व दंड हे देत असे व अशा रीतीनें आपली संमति दाखवीत असे व यांत वास्तविक गैर कांहींच नव्हतें.

जर्मनींत अमलांत असलेली ही पद्धत रोमध्येंहि अमलांत आली. अकराव्या शतकांतील रोमच्या धर्मसत्तेची फार विलक्षण पेंचाची स्थिति होऊन तिस-या हेनरीला त्यामध्यें आपलें लक्ष घालावें लागलें. ज्यावेळीं धर्माध्यक्षाच्या जागेसाठीं तिघांनां उमेदरवारांमध्यें तंटे सुरू झाले त्यावेळीं हेनरीनें या तिघांनां ही धर्माध्यक्षाची जागा न देतां सुइडगर नांवाच्या बँबर्गच्या धर्मगुरूला धर्माध्यक्ष नेमलें व तें जर्मनीमधील पद्धतीला अनुसरून नेमलें, व हाच नियम पुढें प्रस्थापित झाला. हेनरीनें धर्माध्यक्ष निवडण्याची सत्ता आपल्या ताब्यांत घेतली व दुस-या क्लेमंट नंतरच्या धर्माध्यक्षांनां त्यानें नेमलें. अशारीतीनें तो मध्यें पडल्यामुळें रोमची धर्मसत्ता संकटांतून बचावली. कारण त्यानें नेमलेल्या धर्माध्यक्षांमध्यें लिओ(नववा) सारखे चांगले सदाचरणी व उदार लोक होते व पूर्व धर्माध्यक्षांप्रमाणें त्यांनीं वाटेल तसा अधिकार न गाजवितां मोठया विचारानें आपला हक्क बजावलिा. अशी जरी स्थिति होती तरी पण हेनरीनें ही जी पद्धत अमलांत आणली ती फार वेळ टिकणेंच शक्य नव्हतें.

धर्माध्यक्षावरील राजकीय सत्तेचा संकोचः- पुढें लवकरच जी सुधारणेची चळवळ सुरूं झालीं तिचीं मुळें फार मागील काळांत रुजलेलीं होती. मागें सांगितलेंच आहे कीं शार्लमेंननें आपल्या पदरी निरनिराळया विद्वान साधूंनां आणून ठेवलें हा त्याचा प्रयत्न स्तुत्य होता पण यांमध्यें साधूंचें व भिक्षूंचे जें वैराग्याचें ध्येय तें यामुळें कमी होत चाललें. पुष्कळ काळपर्यंत या शार्लमेनच्या पद्धतीविरुद्ध चळवळ झाली नाहीं. पण ८०१ मध्यें बेनिडिक्टनें पूर्वींची भिक्षूंची ध्येयें शिकवून अमलांत आणण्याचा प्रयत्‍न केला. तदनंतरच्या शतकांत क्लनी येथील बर्गंडियन मठांमध्यें ही चळवळ फार फैलावली. व या मठामध्यें जी कर्तृत्ववान भिक्षूंची परंपरा निर्माण झाली तीमुळें ही चळवळ फ्रेंच मठांमध्येंहि पसरूं लागली अशा रीतीनें पुनः पूर्वींचीं ध्येयें स्थापित झालीं. क्लनीच्या मठाला अनेक मठ जोडले गेले व यामुळें त्यांनीं पूर्वींच्या धर्माध्यक्षाच्या सत्तेला झुगारून दिलें. अशा रीतीनें क्लनीच्या मठाचें महत्व वाढूं लागलें असतांना अशाच प्रकारच्या सुधारणेच्या चळवळी दुसरीकडेहि होऊं लागल्या व थोडक्याच काळांत या क्लनीच्या मठाची सत्ता इटलीमध्यें जाणवूं लागली. या मताचा प्रतिपादक जर्मनीमध्यें पाप्पो (मृत्यु. १०४८) हा होता. व इंग्लंडमध्यें डन्स्टन हा होता. प्रथमतः या चळवळीचें लक्ष धार्मिक बाबतींत जी कारस्थानें चाललीं असतात तिकडे लागलें नव्हतें, पण धर्माचे कायदे धाब्यावर ठेवून जे अनाचार पाद्र्यांडून केले जात ते कळून आल्यावर त्यांनीं तिकडे लक्ष्य देण्यास सुरुवात केली. ‘धर्मच्या नियमाप्रमाणे वागा' असा जिकडे तिकडे ध्वनि ऐकू येऊं लागला. सारांश या सुधारणेच्या चळवळीमुळें राजाच्या अधिकारापासून चर्चची सुटका, चर्चच्या मालमत्तेचें पुनश्च संपादन व धर्माध्यक्षांची पूर्ववत सत्ता हे तीन महत्वाचे परिणाम घडून आले.

परंतु या नवीन चळवळीचा पुराणमतवाद्यांशीं विरोध आला. परंतु प्रत्यक्ष नववा लिओ हा सुधारणेला अनुकूल असल्यामुळें, हिलेब्रँट हंबर्ट वगैरेंच्या सहाय्यानें त्यांचीं तत्वें रोममध्यें प्रस्थापित झालीं. परंतु या सुधारणा अंमलात आल्यावर लगेच तंटया बखेडयास सुरुवात झाली व पहिला तंटा आज्ञापत्राच्या विक्रीसंबंधानें झाला.

आरंभीं सायमनी याचा अर्थ आज्ञापत्राची विक्री एवढाच होता. नवव्या शतकामध्यें कोणतीहि धर्मसंबंधीची वस्तु असा विस्तृत अर्थ करण्यांत आला. जमीनीच्या मालकांनीं चर्चेस अथवा त्यांतील अधिकार्‍यांच्या जागा विकल्या अगर राजांनीं धर्माध्यक्षांच्या जागा अगर मठ यांची विक्री केली तरी कांहीं लोकांनां ही एक सायमनीच वाटूं लागली. यासाठीं अकराव्या शतकांत यांहि पेक्षां अधिक विस्तृत अशी व्याख्या करण्यांत आली व राजानें धर्मखात्यांतील जागा मनास वाटेल त्यास देणें अगर एखाद्या बडया इनामदारानें याबाबत पैसे घेणें ही एक प्रकारची सायमनीच मानण्यांत आली. प्रथमतः चर्चनें या बडया इनामदारांकडे लक्ष दिलें नाही तर वाटेल त्याला बिशप अगर धर्माध्यक्ष करण्याचा जो राजाला हक्क होता, त्याच्यावरच प्रथम हल्ला करण्यास प्रारंभ केला. १०५९ त नव्या तत्वाप्रमाणें दुस-या निकोलसचीं, सुधारणेला अनुकूल अशा पोपला निवडण्याचीं लक्षणें दिसत होतीं. १०७८ त सातव्या ग्रेगरीनें अशा प्रकारच्या पोपच्या निवडणुकीला हरकत केली. यानंतर जे बखेडे झाले त्यांत ग्रेग्ररीचा उद्देश थोडा फार उच्च प्रकारचा होता. त्याची इच्छा म्हणजे पोपच्या हातांत सर्व धार्मिक सत्ता देऊन परमेश्वरी सत्तेच्या खालोखाल जगावर पोपची सत्ता चालविण्याची होती. हीच इच्छा आगस्टिनचीहि होती परंतु ती साध्य झालेली पहाण्याचें ग्रेगरीच्या नशीबीं नव्हते. ११११ त या बखेडयाचा निकाल लागला व त्या निकालान्वयें त्याच्या सत्तेचे ऐहिक व धार्मिक असे दोन भाग केले. परंतु हें तत्व व्यवहारांत आणणें कठिण होतें व यांच्यावर अनेक वादविवाद व भांडणें होऊन शेवटीं १११२ त 'कंकार्डाट ऑफ वर्म्स' नें या प्रश्नाचा निकाल समेटानें झाला. त्याचा सारांश असा कीं राजानें बिशपची धर्माच्या नियमाप्रमाणें निवडणूक व्हावी या म्हणण्याला संमति दिली व बिशपला अधिकारदर्शक अंगठी देण्याचा नागरिकांनां हक्क दिला. तसेंच चर्चनें बिशपची ऐहिक सत्ता राजाकडून स्पर्श करवून घेण्याला रुकार दिला. इंग्लंडमध्यें, जर्मनीमध्यें व फ्रान्समध्यें देखील वरील निकाल सर्वांना मान्य झाला व अशा रीतीनें राजानें धर्माध्यक्षाला निवडण्याचें जर्मन तत्व पार लयाला गेलें.

चर्च आणि जर्मन कामगिरीः- शार्लमेन राजाच्या काळापासून जर्मनांचें प्रस्थ पश्चिमेकडे फार माजलें होतें. ९ व्या शतकापासून तों १२ व्या शतकापर्यंत ख्रिश्चन धर्माची प्रगति करण्याचें सर्व श्रेय या टयूटन राष्ट्राकडे आहे. जर्मन पाद्री व धर्माध्यक्ष यांनीं ख्रिस्ती धर्माचा हंगेरींत पोल लोकांत प्रसार करण्यासाठीं अतोनात मेहनत केली. व स्वतःसाठीं व धर्मासाठीं एल्बे व ओडर या नद्यांमधील मुलूख मिळविला. तसेंच स्कँडिनेव्हियन देशांतील लोकांचें धर्मांतर करविणारे लोक जर्मनच होते व पुढें हें काम इंग्लिश पाद्य्रांनीं केलें.

चर्च आणि लॅटिन जातींची कामगिरीः- पंरतु अशा रीतीनें टयूटन शाखेच्या लोकांनीं धर्मप्रसारार्थ जरी पुष्कळ मेहनत केली तरी पण लॅटिन शाखेच्या लोकांत देखील अशा प्रकारची जागृति उत्पन्न होऊ लागली होती. जर्मनांची संप्रदायसेवा, संप्रदायावर लौकिक सत्तेचा अधिकार वाढविणें आणि औत्सुक्यानें प्रसार करणें ही होती, तर लॅटिन राष्ट्रांची संप्रदायसेवा संप्रदायशुध्दीकरण, ज्ञानरचना, आणि लौकिक सत्तेचा अधिकार कमी करणें व संन्यासधर्मविकास या बाबतींत दृग्गोचर होतें. मठामध्यें सुधारणा करण्याची चळवळ या लोकांनींच उत्पन्न केली; व त्यापेक्षांहि महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक नवीन 'स्कूलमेन' च्या संप्रदायाची स्थापना झाली ती प्रथमतः या लॅटिन देशांतच उत्पन्न झाली.

परमार्थ, श्रद्धा आणि विचारशक्ति:- आरिस्टॉलची तर्कविद्या शाळेंतून शिकविण्यांत येत असे; व वेदान्तविषयक ज्ञानाला तर्क व श्रद्धा हीं दोन्हीहि अत्यंत आवश्यक आहेत असें त्यावेळपर्यंत मानण्यांत येत असे. नवव्या व दहाव्या शतकांत देखील हीच पद्धत अंमलात होती. तदनंतर बरेंगर (मृत्यु १०८८) यानें तर्क व श्रद्धा या दोहोंची जरुरी नसून, सत्याचें ज्ञान होण्याला फक्त तर्काचीच आवश्यकता आहे असें प्रतिपादन केलें. यामुळें तर्क कीं श्रद्धा असा प्रश्न उपस्थित झाला. लोंबार्ड अनसेल्म यानें (मृत्यु ११०९) प्रथम या विषयाचें विवेचन केलें. त्यानें रूढीपरंपरागत श्रद्धा हीच वेदान्तज्ञानाला कारणीभूत होते अशी सुरुवात केली. पण पुढें त्याची अशी खात्री पटली कीं, श्रध्देमधील तत्वांचा अनुभव असल्याशिवाय तीं तत्वें मुमुक्षूला समजावयाचीं नाहींत. या पद्धतीप्रमाणें त्यांनें ईश्वरविषयक ज्ञानाचा मार्ग विशिष्ट तत्त्वें युक्तिवादानें पटवून देणें हा ठरविला. अशा प्रकारचीं कल्पना अंधश्रद्धामूलक मध्ययुगामध्यें पचणें अवघड होतें व त्यामुळें अ‍ॅनसेल्मची पद्धति त्या वेळेस प्रमुख म्हणून गणली गेली नाहीं. स्कोलॅस्टिक पद्धतीचा जनक वास्तवीक हा नसून अ‍ॅबेलार्ड (मृत्यु ११४२) हा फ्रेंच विद्वान होता. त्यानें देखील प्रथम परंपरेवर भिस्त ठेवली पण परंपरागत तत्वांवरील श्रध्देंतील दोष युक्तिवादांत काढून टाकून दोहोंचा मेळ बसविण्याचें काम त्यानें केलें, व अश मतप्रतिपादनामुळें १२ व्या व १३ व्या शतकांतील स्कूलमेनच्या संप्रदायाचा पाया व सामुग्री तयार केली. पीटर लोंबार्ड (मृत्यु ११९७), अलेक्झांडर ऑफ हेल्स (मृत्यु १२४५) अ‍ॅलबर्ट्स मॅग्नस (मृत्यु १२८०) व थॉमस अ‍ॅक्किनास (मृत्यु १२७५) हे या दोन शतकांतील नामांकित विद्वान होत. त्यांनीं ख्रिस्ती धर्माचीं तत्वें तर्कपद्धतीच्या कसोटीला लावून पाहिलीं व अशा रीतीनें त्यांनीं धर्ममतांची वाढ केली. संस्काराबद्दलचें कॅथोलिक लोकांचे जें तत्व तें यांनीच प्रथमतः प्रस्थापित केलें.

मीमांसा व सूत्रें यांचा अन्योन्याश्रय:- मीमांसेसारखें तत्वज्ञान आणि सूत्रकाल यांचा ख्रिस्ती वाङ्मयविकासांत दिसून येणारा संबंध अन्यत्र सदृश वाङ्मयांचें पौर्वापर्य जुळवितांना विचार करण्याजोगा आहे. धर्मसूत्रें हीं स्कूलमेनच्या तत्वांची जुळी बहीण होय. ज्या वेळेस पीटर लोंबार्ड हा बायबलमधील वाक्यें नीटनेटकीं लावण्यांत गुंतला होता, त्याच वेळेस ग्रेशियन हा सूत्रांचा नवा संग्रह करीत होता. त्यानें जी महत्वाची गोष्ट केली ती धर्मसूत्रांमध्यें जो परस्पर विरोधीपणा दिसू येतो तो आपण तर्कानें मिटविणें जरूर आहे असें प्रतिपादिलें व अशा रीतीनें धर्मसूत्रशास्त्राचा ग्रेशिअन हा जनक म्हणून प्रसिध्दीस आला.

सन्यासधर्माचा विकास.- नवीन वेदांतसंप्रदाय व नवीन धर्मसूत्रशास्त्राप्रमाणेंच या लॅटिन देशांत भिक्षुपंथाची स्थापना झाली. जे नवीन पंथ निर्माण झाले त्यांपैकीं पहिला पंथ सिस्टर्शिअनचा होता व त्यामध्यें पूर्वींचींच तत्वें अस्तित्वांत होतीं. ११२० मध्यें नॉरबर्ट यानें स्थापलेल्या प्रीमॉन्स्ट्रेटोन्शिअन पंथानें नवीनच तत्वें स्थापित केलीं. भिक्षूचें काम निवळ स्वतः मोक्ष मिळविण्याचेंच नसून, दुसर्‍यांनां ज्ञान देऊन त्यांची आत्मशुध्दि करणें हेंहि त्याचें काम होंतें हीच कल्पना डॉमिनीकनें काढलेल्या (१२१८) पंथांत प्रामुख्यानें होती. तसेंच १२१० मधील फ्रान्सिस्कन पंथांतहि हीच कल्पना होती. कारण हा पंथ फिरत्या भिक्षूंचा स्थापन झालेला होता; व फ्रँन्सिस्कनइतकी दुसर्‍यांसाठी झीज सोसण्याच्या आवश्यकतेची खात्री कोणालाच पटली नव्हती. दुसर्‍यांची आत्मशुध्दि करणें हेंच त्याचें ध्येय होतें. याच कल्पनेबरोबर प्रत्येक भिक्षूनें नम्रपणा व दारिद्य्रहि पत्करिलें पाहिजे ही कल्पना त्यानें आणली. पूर्वींपासूनच स्वतःची मालमत्ता भिक्षूनें टाकनू देण्याची वहिवाट अस्तित्वांत होती. पण फ्रँन्सिस्कनची एवढयावरच तृप्ति झाली नाही. त्याला भिक्षूला कोणत्याहि प्रकारची म्हणजे चर्चमधील देखील मालमत्ता असूं नये असें वाटत असे व या योगेंच ख्रिस्ताचा उपदेश पाळण्यासारखें होईल असें तो म्हणत असे. याचा परिणाम इतका प्रचंड झाला कीं, डॉमीनिकन पंथानें लगेच या पंथाचीं तत्वें स्वीकारिलीं.

यावरूनी लॅटिन देशांमध्यें धर्माचें मूळ किती खोलवर रुजलेलें होतें हे कळून येईल. याचा आरंभ अकराव्या शतकांत झाला व १२ शतकांत या नवीन भूतदयामूलक चळवळीचा बर्नार्ड हा प्रमुख पुरस्कर्ता झाला. त्यानें लोकांनां ख्रिस्ताला भजण्यामुळें देव मिळतो असें शिकविलें. त्याच्या समकालीन ह्यू व रिचर्ड यांनी दयामूर्ति असा जो ख्रिस्त त्याला शरण जाण्यास व परमेश्वरांशीं अशा रीतीनें तादात्म्य पावण्यास शिकवलें. अशा रीतीनें या भूतदयेचें तत्व फक्त चर्चमध्येंच पसरलें असें नाही तर त्याबाहेर देखील त्याचा फार प्रसार झाला.

भूतदयेचें तत्व चर्चच्या नियमाविरुद्ध अगर उपाध्या यांच्या धर्माविरुद्धहि नव्हतें. अथवा साधुपूजा संन्यास अगर इतर तत्वांनांहि त्यानें झिडकारलें नाहीं. हे तत्व व्यवहारोपयोगी होतें. ह्या तत्वानेंच ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी अनेक युध्दें घडवून आणलीं. अकराव्या आणि बाराव्या शतकामध्यें, स्पेन व दक्षिण फ्रान्सनें मूर लोकांशीं 'धर्म-युद्ध' केलें. इ. स. १०९६ मध्यें फ्रान्स, इंग्लंड इटलीमधील सरदार लोकांनीं नास्तिक लोकांनां हाकलून लावण्याच्या इच्छेनें लढाया केल्या व एका शताकपर्यंत अथवा अधिक, ख्रिस्तमय जग करण्याचा ध्वनी जिकडे तिकडे ऐकूं येऊं लागला होता.

पोपच्या सत्तेचा अधिक विकास- या सर्वाचा अर्थ असा कीं, धर्मसत्ता या वेळीं इतकी प्रबळ झाली होती कीं, याइतकी पूर्वीं कधींहि धर्मसत्ता शक्त झाली नव्हती. चर्चचें महत्व फार वाढलें. अर्थांतच पोपच्या सत्तेवर याचा परिणाम झाल्यावांचून राहिला नाहीं. फ्रडरिक (पहिला) व त्याचा मुलगा सहावा हेनरी या जर्मन बादशहानीं, जर्मन साम्राज्याची सत्ता पोपवर देखील चालवण्याचा व पोपची सत्ता राजसत्तेहून खालच्या दर्जाची करण्याचा प्रयत्न केला. पण कर्मधर्मसंयोगानें फ्रेडरिकला अपयश येऊन ११७७ च्या व्हेनिसच्या तहानें पोपची सत्ता त्याला कबूल करावी लागली. अशा रीतीनें पोपची सत्ता, विरोधाचा नाश झाल्यावर वाढूं लागली व तिस-या इनोसेंटच्या कारकिर्दीत (११९८-१२०२) पोपच्या सत्तेचा कळंस झाला. इनोसेंट हा आपल्यास ख्रिस्ताचा प्रतिनिधी असें समजत असे व म्हणून ऐहिक पारमार्थिक सत्ता आपल्या ताब्यांत आहे असेंहि तो समजे; व यासाठीं त्यानें राजा राज्यपदावर आरूढ होण्याच्या वेळेस, त्यांस राजपदाचा अधिकार धर्मगुरूकडून मिळण्याची पद्धत अमलांत आणली. व जुने कायदे रद्द करण्याची व नवे करण्याची देखील सत्ता पोपला आहे असें त्यानें ठरवलें व वेळप्रसंगीं राजांनां पदच्युत करण्याचाहि पोपचा अधिकार आहे असें त्यानें प्रतिपादन केलें. या नवीन तर्‍हेच्या पोपच्या सत्तेला जुळतें घेण्यासाठीं कॅथोलिक धर्मपंथानें आपल्या धार्मिक कायद्यांत थोडाफार फरक केला. ११२३ पासून पुढें पोपनें साधारण सभा बोलावण्याची पद्धत सुरू केली व तिनें केलेले ठराव स्वतः संमति देऊन कायम करण्याची वहिवाट पाडली. धर्माध्यक्षाची सांप्रदायिक नियमांनीं निवडणूक न होतां धर्मोपदेश मंडळीकडून त्याची निवड होऊं लागली. पुढें कलांतरनें पोपच्या हातांत फौजदारी सत्ता देखील आली.

अशा रीतीनें चर्चवर पोपची सत्ता पूर्णपणे स्थापित झाली. पण पोपची ऐहिक सत्ता कायम ठेवणें कठिण जाऊं लागलें. फ्रेडरिक (दुसरा) याच्याशीं नववा ग्रेगरी व चवथा इनोसेंट यांनीं केलेल्या लढायांत ग्रेगरीला व इनोसेंटला यश आलें नाही; व राजाच्या सत्तेंत ढवळाढवळ करण्याचा पोपला मुळींच अधिकार नाहीं असें ठरलें व पुढें बोनीफेस (आठवा) व चवथा फिलिप यांच्यांत राजसत्तेबद्दल भांडण सुरू झालें त्यावेळेस बोनीफेसला राजसत्तेचें उच्चाटण करणें अशक्य आहे असें स्पष्ट रीतीनें आढळून आलें.

मध्ययुगाचा शेवट व फाटाफूटः- अशा रीतीनें पश्चिम चर्चच्या सत्तेचा कळस झाला असतांना ज्या ऐहिक व पारमार्थिक सत्तेच्या ऐक्यामुळें पश्चिमेकडील चर्चचें जीवित चाललें होतें त्यामध्यें बिघाड होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. व्यावहारिक राजसत्ता आपला योग्य तो हक्क मागूं लागली. साम्राज्यसत्ता यावेळीं मोडकळीस आली होती. तरी पण यामुळें छोटीं छोटीं राज्यें (विशेषतः इंग्ल-व फ्रान्स) स्थापन होऊन ती भराभर वाढूं लागलीं. पूर्वेकडे व्यापारामुळें अगर धर्मयुद्धामुळें दळणवळण वाढल्यानें बौध्दिक कल्पना वाढूं लागल्या; प्राचनी तत्वज्ञान व वाङ्मयाचा अभ्यास पुनः जोरानें सुरू झाला आर्थिक अडचण चर्चच्या पुढें उभी राहिल्यामुळें चर्चवर याचा परिणाम झाला; व तो पोपच्या 'जगावरील सत्ते' वरहि होण्याचा रंग अधिकाधिक दिसूं लागला. तात्विक दृष्टया ही सत्ता अद्यापि अढळ होती. किंबहुना थोडी फार जास्तच संमत झाली. पण आठव्या बोनिफेसनंतर येणा-या धर्मगुरूंनी ही सत्ता व्यवहारांत आणण्याबद्दल विशेष खटपट केली नाहीं व एका दृष्टीनें तशी सत्ता व्यवहारांत आणणें अशक्यच झालें होतें. कारण फ्रेंच साम्राज्यावर पोपला अवलंबून रहाणें भाग पडत असे. तरी पण आतां तत्वाला देखील हळू हळू विरोध होऊं लागला. फ्रान्समध्यें चवथ्या फिलिपच्या कायदे पंडितांनीं ऐहिक सत्तेचा पारमार्थिक सत्तेशीं कांहींच संबंध नाहीं असें जाहीर केलें. इटलीमध्यें डांटेनें राजसत्तेची कड घेतली. जर्मनींत चवथ्या लुईचे स्नेही मारसिग्लियो व जीन यांनींहि शास्त्रीय रीत्या राजसत्तेचें वर्चस्व प्रतिपादन केलें व फॅन्सिस्कन विल्यमनें प्रसंग पडल्यास राजकीय सत्तनें पारमार्थिक सत्तेंत हात घालावा असें म्हणण्यापर्यंत मजल मारली.

अशा रीतीचे विद्वान मंडळींचे विचार सुरू असतां या चर्चच्या सत्तेला विरोधी असणारा पक्ष बळावतच होता. व याला कारणेंहि बरींच होतीं. एक तर पोपची जमाबंदीची पद्धत फार वाईट होती, शिवाय धर्मसत्तेच्या संरक्षणादि हक्कांचा दुरुपयोग होऊं लागला होता. धर्माच्या नांवाखालीं वाटेल त्या अन्यायाच्या गोष्टी होऊं लागल्या होत्या. तरी पण पोपवर सत्ता गाजवण्याला कोणताहि उपाय नव्हता. पण १३७८ मध्यें पोपच्या धर्मसत्तेंतच दुफळी होऊं लागली; व या पोपच्या जागेसाठीं धडपडणा-या प्रतिस्पर्ध्यावरहि ताबा चालविणारी सत्ता असली पाहिजे अशी जरूर भांसू लागली. आणि पोपवर देखील एक अधिकार मंडळ असावें अशी तजवीज करण्याचें ठरलें. या मंडळाच्या हातांत सत्ता देण्यांत यावी, अशा प्रकारची तजवीज सुचविणारे कानराड (मृत्यु १३९०), हाइनरिक (मृत्यु १३९७) हे जर्मन, व पिरे व जीन हे फ्रेंच विद्वान होते. या करितां पिसा येथें बोलावलेल्या सभेचा कांहीं उपयोग झाला नाहीं. १४१४ मध्यें भरलेल्या सभेनें हें भांडण मिटवलें. परंतु या सभेनें ठरवलेल्या सुधारणा यशस्वी झाल्या नाहींत. सारंश पोपची सत्ता पूर्वींप्रमाणेंच अबाधित राहिली. अशा रीतीनें कौन्सिलच्या योगानें चर्च सुधारण्याचा प्रयत्‍न फसला. परंतु या अपयशामुळेंच हें चर्च सुधारण्याचा प्रयत्न फसला. परंतु या अपयशामुळेंच हें चर्च सुधारण्याची फार जरूरी भासूं लागली. तसेंच अनेक प्रसंगांमुळें ती चळवळ जिवंत राहिली असें म्हणतां येतें. पोप यूजेनियस (१४३१-४७) नें बॅसेलच्या कौन्सिलवर जय मिळवला. पण कौन्सिलनें मंजूर केलेले ठराव व फ्रान्सनें व जर्मनीनें मुळीच सोडले नाहींत. अशा रीतीनें पोपची सत्ता थोडया तरी अंशानें अमान्य केली गेली.

पोपची सत्ता अमान्य करणा-या थोडया फार चळवळी पूर्वींपासूनच झाल्या होत्या. पण पोपची सत्ता त्या वेळेला फार बलाढय असल्यानें या चळवळी जवळ जवळ नामशेषच झाल्या होत्या. उलट पक्षीं फ्रान्समध्यें, जर्मनींत व सर्वत्र थोडया फार चळवळी पोपच्या ऐहिक सत्तेच्या विरुद्ध अद्यापि होत्या असें म्हटलें तरी हरकत नाहींत. इंग्लंडमध्यें ल्यूथरच्या पूर्वीं पहिला विरोधक जॉन विक्लिफ यानें प्रथमतः उपाध्यायांवर व पोपच्या सत्तेवर कडकडीत टीका केली. पोपचें चर्च ही धार्मिक व मोक्षाचें ज्ञान देणारी संस्था राहिली नसून एक राजकीय संस्था झाली आहे असें त्यानें प्रथम सांगितले. या विक्लिफच्या कल्पना यूरोपमध्यें प्रसार पावतांच बोहेमियामध्यें एक प्रकारची खळबळ उडून गेली. कौन्सिल ऑफ कॉन्स्टन्सनें विक्लिपची शिकवणूक चुकीची आहे असे असें प्रतिपादून व हासचा शेवट करून ही चळवळ हाणून पाडण्याचे यत्‍न केला. पण याच्या योगानें कार्यभाग न होतां उलट त्या चळवळील जोरच आला.

ही चळवळ अगदीं उघड उघड होती. पण याहीपेक्षां दुसरी एक चळवळ अस्तित्वांत होती तिनें कधी उघडपणें विरोध केला नव्हता. ही चळवळ १४ व्या शतकांत इटलीमध्यें जन्मास आली. या चळवळीच्या पुरस्कर्त्यांचा उद्देश चर्चच्या सत्तेपासून आपले जगांतील व्यवहार सोडविण्याचा होता. त्यांनां ऐहिक शिक्षण मिळवून जगांत चैन करावी व जगाचा पूर्ण उपभोग घ्यावा अशी इच्छा होती. व अशा रीतीनें पोपच्या व यांच्या मतामध्यें पुष्कळसा विरोध होता. ह्या 'रेनायन्सस' च्या चळवळीचें इटलीमधील स्वरूप उत्तरेकडच्या देशांतील या चळवळीच्या स्वरूपासारखें नव्हतें तरी पण या दोन्ही चळवळी पोपच्या सत्तेला नामशेष करण्याचा प्रयत्न करीत होत्या यांत शंका नाहीं.

डन्स स्कॉट्स (मृ. १३०८) च्या वेळेपासून ईश्वरविषयक शास्त्रावरील विद्वानांनां आरिस्टॉटलच्या तत्वज्ञानामध्यें व धर्ममतांमध्यें व्यंग आढळून आलें होतें. तर्कपद्धतीवरील श्रद्धा अशा रीतीनें उडूं लागली.व 'फिलासफिक नॉमिनॉलिझम' नावाचा एक सिध्दांत गृहीत धरणा-या पद्धतीनें या तर्कपद्धतीचें उच्चाटन केलें. या पंथाचा मुख्य पुरस्कर्ता वुइल्यम ऑफ ओकॅम हा होता. पण हा सिध्दांत नवीन ईश्वरविषयक ज्ञानाची स्फूर्ति देणारा नव्हता.

याशिवाय गूढविद्या वगैरेसारख्या विद्याहि पूर्वींची पोपची सत्ता पुनः मिळवून देण्याला असमर्थच होत्या. १५ वें शतक निरनिराळया धार्मिक विषयांवर खल करण्यांतच गेलें; व अंतस्थ विसावा कांहीं मिळाला नाहीं.

कौन्सिलचे नियम पोपनें मोडून आपली सत्ता त्याच्यावर लादून आपलें स्वतःचें एक कौन्सिल त्यानें बोलावलें. त्याचें पहिलें कौन्सिल फेरारा येथें जमलें व दुसरें फ्लारेन्स येथें जमलें. फ्लारेन्सच्या कौन्सिलमध्यें त्याला पुष्कळच यश आलें. अकराव्या शतकामध्यें पूर्व व पश्चिम चर्चमध्यें भांडणें झाल्यामुळें रोम व कॉन्स्टांटिनोपलमधील धार्मिक बंधनें पार तुटली होतीं; व ही स्थिति १०५४ पर्यंत होती. पण फ्लारेन्समध्यें त्या दोन्ही चर्चची एकी झाली. इ. स. १५१२ मध्यें दुस-या ज्यूलियसनें एक सार्वजनिक सभा बोलावून पोपची सत्ता ख्रिस्ती जगावर जाहीर केली.

परंतु या धर्मसत्तेचे या वेळचे प्रयत्न व पूर्वींच्या वेळचे प्रयत्न निराळे होते. आठवा इनोसेंट, दुसरा ज्युलियस ह्या जरी प्रसिद्ध व्यक्ती होत्या तरी पण त्यांनीं ख्रिस्ती संप्रदाय तत्वांकडे थोंडे फार दुर्लक्षच केलें. १४९८ मध्यें फ्लारेन्समध्यें सॅव्होनॅरोलचा खून त्यांच्या चिथावणींमुळें झाला व ही अतिशय निंद्य गोष्ट पुढें फार भोंवली.

सॅव्होनॅरोलच्या मरणानंर वीस वर्षांनी मार्टिन ल्यूथरनें ‘इंडल्जन्सेस’ विरुद्ध लेख लिहिले. इंडल्जन्स याचा अर्थ चर्चला पैसा देऊन पातकें करण्यास मोकळीक मिळविणें असा होता. अशा रीतीनें 'सुधारणेची' चळवळ सुरू झाली. ही चळवळ एक तर्‍हेनें पोपच्या धर्मसत्तेला फायदेशीरच झाली. कारण त्या योगें तरी पोपच्या धर्मसत्तेला आपलीं खरीं कर्तव्ये ओळखणें भाग पडलें व ट्रेंटच्या कौन्सिलनें प्रॉटेस्टंट धर्मावरून अर्वाचीन कॅथोलिक धर्माची मध्ययुगीन मतांच्या पायावर स्थापन केली.

अर्वाचीन चर्च.- ट्रेंट येथील कौन्सिलमध्यें म्हणजे १५६४ मध्यें जी तत्वें निश्चित झालीं त्यांमुळें ख्रिश्चन चर्चच्या इतिहासाला एक नवीनच पण निश्चित असें धोरण लागलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्या वेळेपर्यंत पूर्वदेशीय चर्चमध्यें व पश्चिमदेशीय चर्चमध्यें जरी पुष्कळ भांडणें झालीं तरी सुध्दां चर्चच्या मूलभूत तत्वांची अगर संटनेच्या दृष्टीनें सनातनत्वाची कल्पना दोघांनांहि पूर्णपणें होती. धर्मसुधारकांनां देखील कॅथोलिक धर्मांतील मध्ययुगीन व्यंगें काढून टाकण्याचीच इच्छा असल्याकारणानें त्यांनी दुसरा धर्म व दुसरीं चर्चें प्रस्थापित करण्याची इच्छा नव्हती. पश्चिम यूरोपमध्यें जी चर्चमध्यें फाटाफूट झाली ती या सुधारणेच्या चळवळीमुळें झाली नसून राजकीय गोष्टीमुळें झाली होती. ज्यावेळेस प्रत्यक्ष तत्वांमध्यें कांहीं फेरबदल करण्याचा रोमन चर्चकडून रंग दिसेना, त्यावेळीं सुधारकांनीं राजे लोकांकडे धांव घेतली, व छोटया छोटया संस्थानच्या राजांनीं आपल्या देशकालपरिस्थितीला जुळेल त्या मानानें धर्माचा स्वीकार केला. अशा रीतीनें सर्व यूरोपभर कॅथोलिक चर्चचे लहान लहान स्वतंत्र व स्थानिक तुकडे होऊन चर्चे निराळे घटक होऊं लागले व जसजसे राष्ट्राराष्ट्रांमध्यें खटके उडत गेले त्या त्या मानानें त्या त्या राष्ट्रामधील चर्चांचा संबंध कमी कमी होऊं लागला. इ. स. १६४८ मधील वेस्ट फालिआच्या तहानें ही चर्चची स्थानिक घटना दृढमूल झाली. ही पद्धत इंग्लंड व स्कॉटलंडमध्यें पूर्वींच स्थापित झाली होती. दक्षिण जर्मनीमध्यें, बोहेमियामध्यें व पोलंडमध्यें सुधारणेच्या चळवळीविरुद्ध मिशनरी लोकांनीं चळवळ चालू ठेवल्यानें ती पद्धत तेथें विजयी झाली नाहीं. तरी पण या पद्धतील ट्रेंटच्या कौन्सिलनें ठरविलेल्या तत्वामुळें दुजोरा व चलन मिळालें. परंतु ट्रिडेन्टाइर्न येथें ठरलेल्या निकालामुळें नवीन व जुन्या धर्मामध्यें समेट होण्याची आशा राहिली नाहीं. रोमन चर्चनें या सुधारकांचा संप्रदायतत्वांत फेर करण्याचा हट्ट चालूं दिला नाहीं व स्कूलमेनचीं जी कलमें होती तीच चर्चचीं तत्वें म्हणून अंगिकारण्यात आलीं. रोमन 'मध्यवर्ती संघटने' चें तत्व स्वीकारून व चांगलें काम करून सर्व पश्चिम यूरोपभर ज्या लॅटिन चर्चनें आतांपर्यंत ताबा चालविला होता त्याचा सर्व वाङ्मय, शास्त्रें व कला या बाबतींत वाढत जाणा-या संस्कृतीशीं विरोध वाढत चालला, व पुढें पुढें १८४४ मध्यें तर पोपनें त्या चर्चवरहि बहिष्कार घातला. जगाच्या व्यापक स्वरूपाच्या दृष्टीनें पहातां प्रॉटेस्टंट चर्चप्रमाणेंच पण फार मोठें वजन असलेलें असें रोमन चर्च आहे असें म्हटलें असतां वावगें होणार नाहीं. व जगांतील प्रचंड चळवळींच्या घडामोडींत अर्वाचीन चर्च पूर्ववत भाग घेत नाहीं असें म्हटलें तरी चालेल. अशी जेथें रोमन चर्चची स्थिति तेथें सुधारणेच्या चळवळीमुळें जे कांहीं किरकोळ पंथ अस्तित्वांत आले होते त्यांची काय स्थिति सांगावी? या पंथांतील अँग्लिकन चर्च कॅथोलिक संघटनेला चिकटून राहिलें व आपण कॅथोलिक चर्चच्या तीन शाखांपैकीं एका शाखेचे आहोंत असें त्यांनीं प्रतिपादन केलें पण रोमनचर्चनें तें मान्य केलें नाही. यूरोपभर पसरलेलीं दुसरीं काही प्रॉटेस्टंट चर्चें होतीं; त्यांनी तसा कांही आपला हक्क सांगितला नाहीं. पण त्यांचीं तत्वें जवळ जवळ रोमन चर्चच्या तत्वांसारखींच होती. त्यांनां बायबल काय तो प्रमाणभूत ग्रंथ होता व त्यांची संघटना, ही राजाच्या अंमलाखालीं होती; थोडक्यांत म्हणजे तीं स्थानिक चर्चें होतीं. याच्याहि पुढची ताजी वाढ म्हणजे 'स्वतंत्र चर्चांची' स्थापना होय. ह्या नवीन कल्पनेचा गंध देखील पूर्वींच्या सुधारकांनां नव्हता म्हटलें तरी चालेल. या नवीन चर्चच्या मतें कॅथोलिक चर्च हें एका विशिष्ट पंथाचेंच नसून जगामध्यें जितक्या प्रकारचे 'श्रद्धावान धार्मिक लोक' आहेत त्यांचें आहे. कोणताहि मनुष्य वाटेल त्या मताचा असला तरी त्याला पुढं मागें इतर धार्मांमध्यें जातां येईल अथवा दुस-या मतांचा स्वीकार करतां येईल असें या नवीन पंथाचें म्हणणें होतें. म्हणजे हा पंथ चर्चपेक्षा व्यक्तीला जास्त मान देत होता असें म्हटलें तरी चालेल. हें मत आजकाल अमेरिका, ग्रेटब्रिटन वगैरे देशांत फार मान्य आहे व त्यामुळें अनेक पंथ निर्माण झाले आहेत. वरील माहितीवरून हें सहज कळून येईल कीं, अर्वाचीन चर्चच्या इतिहासाची संगतवार माहिती देणें शक्यच नाहीं. कारण चर्चच्या इतिहासाचा प्रवाह हा फार भिन्न भिन्न झालेला आहे व त्याचें अनेक प्रवाह झालेले आहेत. फक्त हे सर्व पंथ 'ख्रिश्चन धर्म' या सर्वसामान्य नांवाखालीं मोडतात एवढेंच काय तें त्यांत साम्य आहे.

विचारघटना आणि मतप्रसारः- ख्रिश्चॅनिटी उर्च्फ ख्रिश्चन धर्म याची सुटसुटीत शब्दांत व्याख्या करावयाची म्हटल्यास असें म्हणतां येईल कीं ख्रिश्चन धर्म म्हणजे ख्रिस्तप्रणीत धर्म होय. पण ही व्याख्या दोषरहित नाहीं. कारण ख्रिश्चनधर्माची हल्लींची कल्पना ख्रिस्तानें प्रतिपादन केलेल्या धर्माहून अधिक व्यापक आहे. बौद्ध धर्माची व्याख्या 'बुद्धप्रणीत धर्म' एवढीच ज्याप्रमाणें करून भागणार नाहीं त्याचप्रमाणें ख्रिश्चन धर्माचीहि स्थिति आहे. कारण ख्रिस्तानें प्रतिपादन केलेल्या धर्मामध्यें इतर तत्वांची पुष्कळ भरती होऊन हल्लींचा ख्रिश्चन धर्म बनलेला आहे. हल्लींच्या ख्रिश्चन धर्माची व्याख्या, 'ख्रिस्तद्वारां ज्यामध्यें मनुष्याचा व देवाचा संबंध निश्चित करण्यांत येतो अशा नीतितत्वांचें विवेचन करणारा, सार्वत्रिक, एकेश्वरी, जगांतील दुःखापासून सोडविणारा, ऐतिहासिक धर्म' अशी करतां येईल.

वर दिलेल्या व्याख्येंतील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. व प्रत्येक शब्दावर पृथक् विवेचन करतां येण्यासारखें आहे. ख्रिश्चन धर्म हा सार्वत्रिक धर्म आहे असें म्हणण्यांत येतें. एका अर्थानें हें म्हणणें खरें आहे व एका अर्थानें खोटेंहि आहे. ख्रिस्त या व्यक्तीनें प्रतिपादन केलेला हा धर्म असल्यामुळें याला सार्वत्रिक धर्म म्हणणें गैर होईल. बौद्ध धर्म, इस्लामी धर्म हे ज्याप्रमाणें सार्वत्रिक धर्म नाहींत त्याचप्रमाणें हा ख्रिश्चन धर्महि सार्वत्रिक नाहीं. पण यांतील मुख्य तत्वें जगांतील कोणत्याहि राष्ट्रांतील माणसांनां आपलीं जातीबंधनें न सोडतां स्वीकारतां येण्यासारखीं आहेत असें या ख्रिश्चन धर्मीयांचें म्हणणें असल्यानें या धर्माला सार्वत्रिक धर्म असें संबोधण्यांत येंऊ लागलें आहे. वास्तविक कोणत्याहि धर्माचीं सामान्य तत्वें हीं सार्वत्रिक स्वीकार होण्याला योग्यच असतात व अशा रीतीनें विचार केल्यास ख्रिश्चन धर्माला सार्वत्रिक धर्म असें नांव देण्यांत कांहींच वैशिष्टय उरत नाहीं.

कांहीच्या मतें ख्रिश्चन धर्म हा स्वाभाविक धर्म आहे; पण याहि म्हणण्यांत कांहीं तथ्य नाहीं. जगांतील कोणताहि पंथ स्वाभाविक नाहीं. परिस्थितीच्या खतांतच धर्माचें बी रुजतें व वाढतें. ख्रिस्तानें जो धर्म प्रतिपादन केला तो केवळ स्वयंस्फूर्त असा धर्म नसून त्याच्या मुळाशीं त्याच्या पूर्वीं होऊन गेलेल्या धर्मांतील तत्वें होतीं. ख्रिस्तानें परिस्थितींप्रमाणें व आपल्या दैवी स्फूर्तीनें त्याला नवीन वळण लावून त्यांत नवीन तत्वांची भर घालून तो ओजस्वी केला. आपल्या पूर्वीं होऊन गेलेल्या भविष्यवाद्यांचीं उर्फ धर्मस्थापकांचीं तत्वें व ती विशद करण्याकरितां वापरलेले शब्द हे त्यानें जसेच्या तसे कायम ठेवले. फक्त त्या शब्दांचा त्यानें नवीन तर्‍हेनें उपयोग करण्यास सुरुवात केली. तात्पर्य ख्रिश्चन धर्माची भूमिका ही ख्रिस्तनिर्मित नसून ख्रिस्तपूर्व धर्मप्रतिपादकांच्या तत्वांची होती असें दिसून येतें.

ख्रिश्चन धर्माची प्राणप्रतिष्ठा आशियाखंडांत झाली. पण थोडयाच काळांत त्याचा प्रसार रोमसाम्राज्यांत व त्याच्या पलीकडे असलेल्या रानटी जातींत झाला. चौथ्या शतकांत रोमन साम्राज्य हें ख्रिश्चनधर्मीय बनलें व त्याचा परिणाम असा झाला कीं सर्व पश्चिम जगानें ख्रिश्चनधर्म स्वीकारला व यूरोपियन लोकांनीं जेथें जेथें वसाहती केल्या तेथेंहि त्यांनीं आपला धर्म बरोबर नेला. पण पौरस्त्य देशांत त्याच्या धर्माचा प्रसार झाला नाहीं व होणें शक्यहि नव्हतें. कारण या वेळीं आशियाखंडांत इस्लामी धर्माचें प्राबल्य होतें.

ख्रिश्चनधर्म हा व्यक्तिप्रणीत धर्म असल्यानें ख्रिस्त व त्याचें चरित्र याच्याशीं त्या धर्माचा निकट संबंध येणें स्वाभाविकच आहे. किंबहुना त्याचें चरित्र हें त्यानें प्रतिपादन केलेल्या तत्वांचा मूर्तिमंत आदर्शच होय असें म्हटलें असतां वावगें होणार नाहीं. पण आपल्या इकडील अवतारी पुरुषांप्रमाणेंच त्याच्याहि चरित्रांत ब-याच अतिमानुष गोष्टी भरल्या असल्यानें, त्यानें प्रतिपादन केलेलीं धर्मतत्वें त्यांतील गोष्टीमुळें प्रामुख्यानें नजरेस येत नाहींत. खुद्द त्याच्या शिष्यांनांहि त्याचा दैवी संदेश कळला नाहीं. ख्रिस्ताचें गुन्हेगार या नात्यानें मरण व त्याचें पुनरुत्थान या गोष्टींमुळें ज्यू लोकांनां आपल्या धर्मांत सांगितलेला 'भेसाया' म्हणजे हाच असें वाटूं लागलें व हे ज्यू लोक त्याच्या तत्वांपेक्षां ख्रिस्त या व्यक्तीलाच मान देऊं लागले. ख्रिस्ताच्या तत्वावर सेंट पाल यानें प्रथमतः प्रकाश पाडला; पण त्याचें म्हणणें हें ज्यू लोकांनां पटेना व ज्यू लोकांनीं ख्रिश्चन धर्माचा त्याग केला.

अशा रीतीनें ज्यू लोकांनीं या धर्माचा त्याग केला तरी ख्रिश्चन धर्म हा खुंटला न जाता उत्तरोत्तर प्रसारच पावूं लागला; व रोमन साम्राज्यांत तर या धर्माचा फारच झापाटयानें प्रसार झाला. पण त्याच्या प्रसाराबरोबरच त्या धर्मांतील तत्वांनांहि निराळें स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहिलें नाहीं. रोम साम्राज्यांत त्यावेळी ग्रीकांचा समावेश होत असे. ग्रीक लोकांत ख्रिस्ताच्या पूर्वींपासूनच तत्वज्ञानाचा उदय झाला होता. हें जग कोणी निर्माण केलें, ईश्वराचें स्वरूप काय आहे वगैरे अनेक गहन प्रश्नांवर त्यांच्यांत विचार चालू झालेले होते. प्लेटो, आरिस्टॉटल यांसारख्या तत्वज्ञांनीं ईश्वरप्राप्ति ही सामान्य माणसाच्या आटोक्यांत नसून ज्ञानी माणसालाच ती शक्य आहे असें प्रतिपादन केलें होतें. दुस-या कांहीं तत्वज्ञांनीं ईश्वर हा सर्वत्र पसरला आहे असें प्रतिपादन केलें होतें. तात्पर्य ग्रीक लोकांत या काळीं अनेक तत्वज्ञानपंथ निर्माण झाले होते. ग्रीक लोकांची ही तत्वज्ञानविषयक चळवळ बौध्दिक होती; त्यामुळें सामान्य लोकांनां त्यात विशेष आस्था वाटण्यासारखें कांहींहि नव्हतें. सामान्य लोक मनास पटेल त्या तर्‍हेनें एकेश्वरी पंथाचे अगर अनेकेश्वरी पंथाचे अनुयायी झाले होते. ग्रीक तत्वज्ञानांत श्रध्देचा ओलावा नव्हता, व सामान्य लोकांनां आपलें म्हणणें पटवून देण्याचा सहेतुक प्रयत्‍न या ग्रीक तत्वज्ञांनीं केला नाहीं. अशी स्थिति ग्रीक लोकांत व तत्कालीन रोमन साम्राज्यांत होती. अशा आणीबाणीच्या वेळीं ख्रिश्चन धर्माचा रोमन साम्राज्यांत चंचुप्रवेश झाला व त्याचा प्रसार झाला.

या झटपट प्रसाराची कारणें उघडच होतीं. रोमन साम्राज्यांत विचारी माणसें व सामान्य माणसें यांच्यांत वर सांगितल्याप्रमाणें फारकत झाली होती. सामान्य लोकांनां कोणता पंथ स्वीकारावा यासंबंधी सुचेनासें झालें होतें. अशा स्थितींत 'तुं माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे तूं माझ्याप्रत पोहोंचशील' असें ठांसून प्रतिपादन करणारा, सामान्य जनांच्या बुध्दीला पटणारा असा धर्म तत्काल लोकप्रिय व्हावा यांत आश्चर्य नाहीं. पण सामान्य जनांनां ज्याप्रमाणें हा धर्म प्रिय झाला त्याचप्रमाणें तत्वज्ञांनांहि या धर्मांत, त्यांनां भांबावून टाकणार्या   तात्विक प्रश्नांचें उत्तर आहे असें आढळू आलें. ईश्वरचा व मनुष्याचा परस्परसंबंध काय आहे, आत्म्याचा व जड देहाचा तसेंच परमात्म्याचा व जीवात्म्याचा कशा प्रकारचा संबंध आहे या गूढ प्रश्नांचें उत्तर ख्रिस्त धर्मांत त्यांनां सांपडलें. पॉलनें व त्याच्या काळच्या इतर विद्वानांनीं ख्रिस्त हा परमेश्वराचा मानसपुत्र आहे व त्याच्या द्वारें परमेश्वर हा जगाच्या उद्धरार्थ अवतीर्ण झाला आहे असें सांगण्यास सुरुवात केली होती. ग्रीक तत्वज्ञांनीं ही अवताराची कल्पना या धर्मांतून घेतली. परमेश्वर हा पृथ्वीपासून अमित अंतरावर आहे तो ज्ञानसागरच आहे या तत्वांच्या जोडीला, परमेश्वर हा मनुष्यप्राण्याच्या उद्धारार्थ, या पृथ्वीवर प्रकट होतो हें तत्व प्रतिपादन करण्यास त्यांनीं सुरुवात केली व परमेश्वर व भूत मात्र यांच्यामध्यें ख्रिस्त हा दुवा आहे असें सांगण्यास आरंभ केला. अर्थात याचा परिणाम पुढील ग्रीक तत्वज्ञांवर अतिशय झाला. पण त्याचबरोबर ग्रीकांच्या विचारसरणीचा परिणामहि ख्रिश्चन धर्मावर झाल्याशिवाय राहिला  नाहीं. तात्पर्य ख्रिश्चन धर्माचें अंतरंग म्हणजे ज्यू लोकांच्या धर्मस्थापकांची सुधारून वाढविलेली आवृत्ति होय. व ग्रीक विचारपद्धति ही त्या धर्माचें बाह्य स्वरूप होय असें म्हणावयास हरकत नाहीं.

त्रैतत्व (ट्रिनिटी मत):- ज्यू लोकांत परमेश्वर हा सर्व जगाचा पिता आहे असें मानीत असत. ख्रिस्त हा मेसाया अगर प्रेषित असून तो परमेश्वराचा मानसपुत्र होय, असें त्यांचें मत होतें. 'आत्मतत्व' हा शब्द देखील त्यांच्या ग्रंथांत वारंवार वापरलेला आढळून येतो. स्वतः ख्रिस्तानें 'आत्मतत्व' उर्फ स्पिरिट हा शब्द कधींच वापरला नाहीं. सेंट पॉलनें जरी हा शब्द वापरला होता तरी त्यानें हा शब्द कोणत्या अर्थानें वापरला हें स्पष्ट होत नाहीं. पण ग्रीक लोकांच्या तात्विक विचारसरणीचा ख्रिस्तमतानुयायांनां परिचय झाल्यामुळें त्यांनीं ग्रीक पद्धतीनें वरील प्रश्न सोडविण्यास सुरवात केली. 'परमेश्वर हा एकमेवाद्वितीयम्, अज, अनंत, असून, या नश्वर व साद्यंत जगतांत तो अंशरूपानें अवतरला असून सर्व मनुष्यजातीमध्यें तो आत्मस्वरूपांत वास करतो' अशा तर्‍हेनें त्यांनीं परमेश्वर, पुत्र व आत्मतत्व या तीन्ही कल्पनांची सांगड घातली.

तात्विक दृष्टया अशा तर्‍हेनें तीन्हीं तत्वांचा मेळ जमला व याला त्रैताचें तत्व असें नाव पडलें. धार्मिकदृष्टया देखील या त्रैतत्वाचें महत्व कायम राहीलें. परमेश्वर हा ख्रिस्ताच्या रूपानें सर्व प्राण्यांच्या उद्धरार्थ आला आहे, व ख्रिस्ताच्या स्वरूपांत सर्वांनीं परमेश्वराला भजलें असतां   जगांतील पापापासून मनुष्याचा आत्मा मुक्त होतो अशी धार्मिक दृष्टया उपपत्ति लावण्यांत आली. अशा रीतीनें तत्वज्ञांच्या तात्विक दृष्टीने व श्रद्धाळू लोकांच्या धार्मिक दृष्टीनें हें त्रैततत्व दोषरहित व सर्वमान्य ठरलें.

त्रैततत्व ख्रिश्चन धर्मांतील सर्वांत महत्वाचें तत्व समजण्यांत आल्यामुळें त्या तत्वावर निरनिराळया लोकांनीं निरनिराळी भाष्यें करावींत हें स्वाभाविकच आहे. कांहींनां ख्रिस्ताच्या स्वरूपांत परमेश्वराला भजणें पसंत नाहीं. ख्रिस्त हा केवळ मार्गदर्शक महात्मा असून त्यानें जो मार्ग चोखाळला त्या मार्गानें म्हणजे शुद्ध आचारविचारानें वागलें असतां परमेश्वरस्वरूपीं लीन होतां येतें व हेंच मनुष्याचें अंतिम ध्येय होय असें त्यांचें मत आहे. इतर कांहीं लोकांच्या मतें, हीं तिन्हीं तत्वें स्वतंत्र असून परमेश्वराच्या ठायीं एकसमयावच्छेदेंकरून वास करितात.

मुक्तितत्व.- या त्रैततत्वाच्या इतकेंच किंबहुना कांहींच्या मतें अधिक महत्वाचें तत्व म्हटलें म्हणजे मुक्तितत्व होय. याला इंग्लिशमध्यें 'डॉक्ट्रिन ऑफ दि क्रॉस' असेंहि म्हणतात. ख्रिस्ताला सुळावर चढविण्यांत आलें व तें सुध्दां गुन्हेगार म्हणून. परमेश्वर हा जर सर्व जगाचा शास्ता आहे तर ही गोष्ट देखील त्याच्याच इच्छेनें घडून आलेली असली पाहिजे. ख्रिस्तासारख्या भक्ताला सुळी चढविण्यांत परमेश्वराचा काय हेतु असावा असे विचार प्रत्येकाच्या मनांत येणें स्वाभाविकच होतें. तेव्हां या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर देणें अत्यावश्यकच होऊन बसलें. अर्थात पुष्कळांनीं पुष्कळ तर्‍हेनें या प्रश्नाचें  उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांतील महत्वाचें उत्तर म्हणजे ख्रिस्त हा स्वःच्या अपराधाकरितां मेला नसून मनुष्य जातीच्या पापांकरिता बळी गेला हें होय. ख्रिस्त हा पापी लोकांचें पाप वहाणारा देवाचा दूत आहे असें इसैयामध्यें म्हटलेलें आहे.

पण या उत्तरानें वरील प्रश्नांचा उलगडा समाधानकारक तर्‍हेनें होत नाहीं. परमेश्वर हा जर परमदयाळू आहे तर तो पापी माणसांनां क्षमा कां करीत नाहीं? पापी माणसासाठीं ख्रिस्तानें सुळी जावयाचें काय कारण? इत्यादि अनेक प्रश्न उद्भवतात व वरील उत्तरानें हे प्रश्न सुटले जात नाहींत. पण धर्मग्रंथांत या प्रश्नांनां उत्तरें देण्याचा प्रयत्नहि झालेला दिसत नाहीं. सेंटपॉलनें मात्र या प्रश्नांना निराळया तर्‍हेनें उत्तर देण्याचा प्रयत्न केला. स्वार्थत्यागाचा ख्रिस्त हा अत्युच्च आदर्श असून त्यागाची परमोच्च कल्पना ख्रिस्तामध्यें केंद्रीभूत झाली आहे; धर्मगुरु व त्याग हीं ख्रिस्ताचीं दृश्य स्वरूपें असून साक्षात्कार होण्याचा समयाला हीं बाह्य स्वरूपें नाहींशी होतात असें सेंट पॉलनें वरील प्रश्नांचें धार्मिक दृष्टीनें उत्तर दिलें आहे. याशिवाय इतर विद्वानांनींहि ख्रिस्ताच्या मरणाविषयीं आपापले तर्क लढविले आहेत. ख्रिस्ताचें मरण म्हणजे वाईटावरील जय अगर सैतानाला संतुष्ट करण्याकरतां दिलेली लांच असें ओरिगेन म्हणतो, तर मनुष्याची जी च्युति झाली ती नाहींशीं करून मनुष्याला पुन्हां पूर्वींच्या स्थितींत आणण्याचें तें साधन आहे. असें झेनियस म्हणतो व मनुष्यानें परमेश्वराच्या आज्ञेचें उल्लंघन केल्याचें प्रायश्चित असें अ‍ॅनसेल्स आणि रिफॉर्मर्स म्हणतात. परमेश्वराचें राज्य पृथ्वीवर प्रस्थापित व्हावें यासाठीं मनुष्याला केलेली शिक्षा असें ग्रोटियसनें म्हटलें आहे. मनुष्याच्या स्थितीविषयीं परमेश्वराला वाटत असलेली सहानुभुति असा बुशनेलनें तर्क लढविला आहे. अशा एक ना दोन अनेक तर्‍हांनीं ख्रिस्ताच्या मरणाचें खरें रहस्य काय आहे हें उकलण्याचा विद्वानांनीं प्रयत्न केला आहे.

मुक्तीचा मार्ग व त्याच्यासंबंधींचे निरनिराळया विद्वानांनीं केलेले तर्क याबद्दलचें वर विवेचन केलें. आतां मुक्तिकल्पनेसंबंधीं थोडा विचार करणें जरूर आहे. रोमनसाम्राज्यांत ख्रिस्ती धर्माचा पूर्ण प्रसार होण्यापूर्वीं ख्रिस्त हा मेसाया असून, त्याचें आदर्शभूत राज्य पृथ्वीच्या पाठीवर प्रस्थापित होणार या तत्वावर व ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर तत्कालीन लोकांचा पूर्ण विश्वास होता. पण रोमन साम्राज्याच्या काळांत या तत्वांवरील लोकांचा विश्वास उडत चालला. पृथ्वीवर देवाचें राज्य होणार व त्यामुळें सर्व जगाचा उद्धार होणार ही मुक्तीच्या संबंधींची कल्पना जाऊन साधु पुरुषांचें आकाशांतील बापाच्याकडे गमन म्हणजे मुक्ति होय अशी नवीन कल्पना उदयास आली. तसेंच 'ख्रिस्ताचें पुनरुत्थान' याचा अर्थ ख्रिस्त हा पुन्हां खरोखर जिवंत होणार असा नसून, आत्म्याचें अमृतत्व सिद्ध करण्यासाठीं वरील शब्दयोजना रूढ झाली असा करण्यांत येऊं लागला. जगाच्या अंतीं सर्व लोक पुन्हां जिवंत होऊन त्यांच्या पापपुण्याचा निवाडा जगाच्या शेवटच्या दिवशीं होणार हीं कल्पना मात्र नाहींशीं झाली नाहीं. ख्रिस्तीधर्मामध्यें जे विचार करणारे विद्वान होते त्यांनीं वरील मुक्तिकल्पनेचा लाक्षणीक अर्थ करण्यास सुरुवात केली. पृथ्वीवर देवाचें राज्य लवकरच होणार याचा अर्थ, ख्रिस्ताच्या तत्वांचा जगभर प्रसार होणार असा करण्यास त्यांनीं सुरुवात केली. पापी मनुष्याला नेहमीं यातना भोगावयास लागतात अशी कल्पना ख्रिस्ती लोकांत पूर्वीं होती पण ही कल्पना हळू हळू नाहींशीं होत चालली असून तिच्या जागीं परमेश्वर हा परमकारुणिक असल्यामुळें तो कोणालाहि कायम नरकांत टाकणार नाहीं ही कल्पना रूढ झाली. तसेंच स्वतःच्या आत्मोन्नतीपुढें सर्व जग हें तुच्छ आहे ही विचारसरणी अस्तित्वांत आली.

धर्मसंस्कारः- ख्रिश्चन चर्च हें ख्रिस्ताचें भौतिक शरीर असून त्यामध्यें ख्रिस्ताचा आत्मा वास करतो अशी ख्रिस्ती लोकांची भावना असे. ख्रिस्ती लोकांची चर्चविषयी अशी भावना असल्यामुळें चर्चसंस्थेला फार महत्व प्राप्त झालें. कालांतरानें या चर्च संस्थेनें ख्रिस्ती लोकांनीं कोणते धर्मसंस्कार पाळणें आवश्यक आहे याबद्दल नियम करण्यास सुरुवात केली. रोमन कॅथोलिक पंथाच्या मतें प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याचे सात संस्कार झाले असले पाहिजेत. या सात संस्कारांमध्यें बाप्तिस्मा व प्रभुभोजन हे मुख्य संस्कार होत. या बाप्तिस्म्याच्या संस्कारामुळें मुलाच्या जन्माबरोबर जे कांहीं दोष आले असतील त्यांचा परिहार होतो असें रोमन कॅथोलिक पंथाचें मत आहे. प्रॉटेस्टंट लोकांच्या मतें हा संस्कार म्हणजे प्रत्येक मूल ख्रिस्ताच्या कृपेला पात्र आहे याची बाह्य खूण असून, आईबापांनीं आपलें मूल देवाला अर्पण केल्याचा हा संस्कार निदर्शक होय. प्रभुभोजनाच्या संस्कारामुळें मनुष्याच्या पंचमहाभूतात्मक देहाचें ख्रिस्ताच्या शरीरांत व रक्तांत रूपांतर होतें असें रोमन कॅथोलिक पंथांतील लोकांचें म्हणणें आहे. ल्यूथरच्या पंथाच्या मतें या संस्कारामुळें या भौतिक देहामध्यें ख्रिस्त हा वास करूं लागतो. कॅलव्हीन पंथाचे लोक हा संस्कार ख्रिस्ताच्या कृपेची बाह्य खूण मानितात.

ख्रिस्ती धर्माची मुख्य तत्वें कोणतीं आहेत याचें आतांपर्यंत विवेचन केलें. त्यानंतर ख्रिस्ती धर्मामध्यें नीतितत्वें कोणतीं आहेत हेंहि सांगणें जरूर आहे. ख्रिस्ती धर्मांतील तत्वे धर्मपर नसून विशेषतः नीतिपर आहेत असें म्हटलें असतां वागवें होणार नाहीं. कांहीं पंथांच्या मतें ख्रिस्ती धर्माचें महत्व ख्रिस्तानें प्रतिपादन केलेल्या नीतित्त्वांवरच अवलंबून आहे. मनुष्यजात ही परमेश्वराची संतति असल्याकारणानें मनुष्यानें परमेश्वरावर अनन्यभक्ति केली पाहिजे व त्याबरोबरच आपल्या बांधवांवर व शेजा-यापाजार्‍यांवरहि प्रेम केलें पाहिजे हें अत्युच्च तत्व ख्रिस्तीधर्मांत आढळून येतें. परमेश्वराची अनन्यभक्ति करणें म्हणजे त्याला अनन्य भावानें शरण जाणें व अहंभावाची वृत्ति विसरून जाणें होय. येशू ख्रिस्त हा स्वतः या तत्वाचा मूर्तिमंत आदर्श होता. त्यानें हें तत्व प्रस्थापित करतांना स्वतःचा बळी देखील दिला. 'अनन्यभावानें तूं जगाचा स्वामी जो परमेश्वर त्याची भक्ति कर व आपल्या शेजा-यावर प्रेम कर' असा ख्रिस्ताचा उपदेश आहे असें ख्रिस्ती सांप्रदायिकांचें म्हणणें आहे.

सर्व लोक हे आपले बांधव आहेत अशा प्रकारची बंधुत्वाची भावना चर्चच्या पूर्वेतिहासांत आपल्याला आढळून येते पण पुढें ही व्यापक व उच्च भावना हळू हळू लुप्तप्राय होत चालली व त्याच्या जागीं वैयक्तिक उन्नतीकडे लोकांचें लक्ष्य वेधलें. संसाराचा त्याग करून, भिक्षुवृत्तीनें एखाद्या मठांत राहून, स्वतःची आत्मोन्नति करण्यापलीकडे जगांत उच्च कर्तव्य नाहीं अशी कल्पना रूढ झाली. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक प्रेमाची शिकवण मागें पडली, तरी पण भिक्षूलोकांचा वर्ग वाढत चालल्यानें लोकांच्या आचारविचारांत बरीच शुद्धता येत चालली. ख्रिस्ताप्रमाणें अगदी निर्धन होऊन रहाण्यांत कित्येकांनां आपल्या जीविताचें ध्येय आहे असें वाटू लागलें; व तशा प्रकारचा उपदेशहि करण्यांत येऊ लागला.

उपासनाविधि- परमेश्वराची अनन्यभक्ति हें ख्रिस्तनीतीचें प्रमुख अंग आहे असें वर सांगितलें. ही भक्ति कशी करावयाची यासंबंधीं ख्रिस्ती धर्मांत कोणते विधी आहेत हें आपण पाहूं. परमेश्वर व भक्त यांमधील संबंध हा वैयक्ति स्वरूपाचा असतो. ज्याला जसें वाटेल त्या प्रकारानें परमेश्वराला भजण्याची प्रत्येकाला मोकळीक असावी हें उचित होय. ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीं प्रत्येकाला परमेश्वराची उपासना करण्याच्या बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य असे पण पुढें उपासनेच्या बाबतींतील स्वातंत्र्य हळू हळू नष्ट होत जाऊन उपासनेच्या बाबतींत बरेच निर्बंध घालण्यांत आले व अशा रीतीनें उपासनेला सांप्रदायिक स्वरूप देण्यांत आलें. चर्चमधील धर्मगुरु ठरवितील त्या मार्गानेंच उपासना करण्याचा प्रघात अमलांत आला. रोम व ग्रीसमधील चर्चमध्यें उपासनेचे ठराविक नियम करण्यांत आले. इंग्लंडच्या चर्चनें आपला उपासनाविधि निश्चित केला. इतर चर्चनींहि आपापले उपासनाविधी ठरवून टाकले. सर्व लोकांनीं चर्चमध्यें जमून प्रभुभोजन केलें असतां मनुष्याला पुण्यप्राप्ति होते, सामुदायिक प्रार्थना केली असतां मनुष्याचें पाप परमेश्वर जाळून टाकतो अशा प्रकारच्या कल्पना धर्मगुरूंनीं प्रसृत केल्या व त्यामुळें या विधींनां एक प्रकारचें पावित्र्य प्राप्त झालें. या उपासनाविधींच्या विरुद्ध पुष्कळदां आक्षेप घेण्यांत आले पण त्यांचा फारसा उपयोग झाला नाहीं.


सारांश ख्रिस्ती धर्म हा भक्तिचा पंथ आहे. आपल्या देशांतील भत्तिच्मार्गाशीं याचें पुष्कळ साम्य दिसून येतें. ख्रिस्त हा देवाचा अवतार असून त्याची भक्ति केली असतां परमेश्वराची प्राप्ति होते, हें या धर्माचें मुख्य अंग आहे. विश्वप्रेम हें या धर्माचें नैतिक अंग आहे. इतर धर्मांतील तत्वांचा खरा अर्थ लावण्यासाठीं ज्याप्रमाणें पुष्कळ श्रेष्ठ पुरुषांनीं प्रयत्न केले त्याचप्रमाणें ख्रिस्ताच्या धर्मांतील मुख्य तत्वासंबंधीचें विशदीकरण करण्याचा पुष्कळांनीं प्रयत्न केला. ख्रिस्ताच्या मूळ धर्मतत्वांमध्यें कालांतरानें कांही तत्वांची भर पडली. या धर्माचे आज अनेक पंथ झाले आहेत. व पुढें आणखीहि होतील. पण या सर्व भूत व वर्तमान पंथांच्या मुळाशीं ख्रिस्त हा परमेश्वराचा अंश असून त्याच्या भक्तीमुळेंच परमेश्वराची प्राप्ति मनुष्याला करून घेतां येते हेंच सामान्य तत्व ग्रथित केल्याचें आढळून येतें.

ख्रि स्ती सं प्र दा य, शा स न सं स्था व मा न वी स्वा तं त्र्य.- ख्रिस्ती संप्रदायामध्यें जे शिरले ते ख्रिस्ती संप्रदायाच्या आद्य मताप्रमाणें रहावयास तयार झाले आणि संप्रदायाचीं आद्यमतें सर्वांस बंधनकारक आहेत असें त्याबरोबर गृहीत धरण्यांत येतें. संप्रदायाचे ग्रंथ विशिष्ट आज्ञारूप किंवा सूत्ररूप नसल्यामुळें  ते ग्रंथ विधिनिषेधात्मक करण्यासाठीं त्याचा अर्थ काढणें अवश्य होतें. हे अर्थ काढावयाचे झाले म्हणजे वाटेल तो मनुष्य वाटेल तो अर्थ काढणार. या परिस्थितींत अर्थ काढण्यास कोणी अधिकारी मनुष्य पाहिजे अशा तर्‍हेचा युक्तिवाद कोणासहि पटणार. अर्थ काढण्याचा किंवा विधिनिषेधात्मक शेवटचे नियम देण्याचा अधिकार आमचा आहे असें रोमच्या पोपनें मांडण्यास सुरूवात केली. रोमचा पोप हा, इतिहास पाहतां केवळ रोमचा बिशप होता पण त्यास रोमन साम्राज्याच्या अस्तित्वामुळें धार्मिक प्रामुख्य प्राप्त झालें; आणि रोमचें साम्राज्य जरी लयास गेलें तरी रोमच्या पोपचें महत्व कायमच राहिलें. याचा परिणाम असा झाला कीं, सर्व पाश्चात्य जग बौध्दिक आणि अध्यात्मिक बाबतींत रोमच्या तावडींत सांपडलें, आणि राज्याचे म्हणजे पोलीसी अधिकार तेवढे राजाकडे राहिले. राजावर व त्याच्या प्रजेवर अध्यात्मिक अधिकार पोपचा. पोपनें वाटेल त्या राजावरहि बहिष्कार घालावा आणि प्रसंग पडल्यास राजाच्या प्रजेसहि राजाचे हुकूम न मानण्यास सांगावें अशा तर्‍हेची परिस्थिती उत्पन्न होऊन शासनसंस्था (म्हणजे राज्याधिकार) पोपच्या तावडींत पूर्णपणे सांपडल्या. शासनसंस्थांवरील पोपचें किंवा पंथाचें महत्व कमी करण्यास तीन पायर्‍यांनीं प्रयत्‍न झाले.

पहिला प्रयत्न प्राटेस्टांटिझम होय. यामध्यें धर्मग्रंथाचा आयुष्यावरील हक्क प्रधानतेनें झुगारला नाहीं; किंवा अधिकारयुक्त व्यक्ती किंवा संस्थांनीं लावलेल्या अर्थाचें महत्व कमी करण्यांत आलें नाहीं, तर केवळ पोपचें वर्चस्व झुगारून लावलें. पहिले जे प्रॉटेस्टंट पंथ होते ते व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि मतस्वातंत्र्यवादी मुळींच नव्हते. ते स्वतः जरी पोपच्या मतापासून भिन्न असले तरी त्यांच्या मतापासून भिन्न असलेल्या लोकांचा ते फारच छळ करीत.

अधिकारयुक्त अर्थस्पष्टीकरण मानावयास लावण्याची पद्धति जरी कांहीं दिवस चालू राहिली तरी लवकरच वैयक्ति अर्थ लावण्याचा अधिकार सांगणारे नॉनकन्फरमिस्टांचे पंथ तयार झालेच. त्यामुळें चर्चचा पगडा बराच कमी झाला. तथापि ख्रैस्त्य हें शासनसंस्थेला आद्य कायदा आहे या प्रकारच्या समजास धोका पोहोंचला नव्हता. तथापि अमेरिकेनें जेव्हां आपलीं शासनसंस्थेचीं आद्यतत्वें लेखनिविशिष्ट केलीं आणि चर्चचा किंवा खैस्त्याचा शासनसंस्थेशीं संबंध तोडून टाकला तेव्हां शासनसंस्थेचें स्वातंत्र्य पूर्णपणें स्थापन केलें गेलें. अमेरिकेंत शासनसंस्थेशीं युक्त असा ख्रैस्त्य पंथ नाहीं एवढेंच नव्हे तर सार्वजनिक शाळांतून बायबलचें शिक्षण बंद केलें आणि बायबलास 'सेक्टेरियन' म्हणजे पक्षविशिष्ट पुस्तक ठरविलें.

विवाहादि संस्कारांवर ताबा ठेऊन म्हणजे मनुष्याच्या आयुष्याला कृत्रिम तर्‍हेनें जखडून टाकून धर्माचें अध्यात्मिक स्वरूप कमी करण्याच्या प्रयत्नाचा शेवट अजून लागला नाहीं. अजून ''ख्रिस्ती'' लग्नें प्रचलित आहेतच. हा सर्व पाश्चात्य भिक्षुकशाहीचा प्रयत्न होय. ख्रिस्त स्वतः लग्नेंमुंजी लावणारां भिक्षुक नव्हता. त्या पंथाला ही भिक्षुकी पाश्चात्य देशांत जोडली गेली. ही जेव्हां नष्ट होईल तेव्हां धर्माचें खरें स्वरूप प्रगट होईल. हिंदुस्थानांत ख्रिस्ती मत वाढत आहे. आणि जर लग्नासारखे संस्कार भावी राष्ट्रीय ख्रिस्ती पंथांतून हिंदुस्थानानें अजीबात हांकलून लावले तर ख्रिस्ती संप्रदायाचें अत्युच्च स्वरूप हिंदुस्थानांत प्रगट होईल अशी जी जगाची आशा आहे त्या आशेस मूर्त स्वरूप येण्यास मदत होईल.

हिं दु स्था नां ती ल ख्रि स्ती स मा ज.- १९२१ सालीं एकंदर ख्रिस्ती लोक ४७,५४,०७९ होतें. १९११ सालीं ३८,७६,२०३ होते. १८७२ ते १९११ या ५ दशकांतल्या खानेसुमारीच्या आंकडयांवरून पहातां ख्रिस्ती समाज कसा झपाटयानें वाढत आहे तें दिसून येईल.

काल हिंदी ख्रिस्त्यांच्या संख्येंतील फेरबदलाची शेंकडेवारी
१८७२-१८८१ +२२.०
१८८१-१८९१ +३३.९
१८९१-१९०१ +३०.८
१९०१-१९११ +३४.२


१९११ च्या ख्रिस्ती लोकसंख्येंत ३५,७४,७७० हिंदी ख्रिस्ती म्हणजे शंकडा ९२ हून अधिक व बाकीचे यूरोपियन आणि आंग्लोइंडियन होते. हिंदी ख्रिस्त्यांपैकीं अदमासें २/5 रोमन कॅथॉलिक व १/९ रोमो सिरियन होते. एकंदर संख्येच्या १/११ प्रत्येकीं आंग्लिकन व बाप्टिस्ट असून राहिलेल्या पंथांपैकीं शेंकडा सहा लुथरन, मेथॉडिस्ट व प्रेसब्रिटेरियन हे प्रत्येकीं शेंकडा पांचहून कमी व कॉन्ग्रेगेशनॅलिस्ट शेंकडा चार होते.

आतां प्रांतवार विचार करितां (१९११ च्या खानेसुमारीवरून ) असें आढळून येतें की, हिंदी ख्रिस्त्यांच्या एकंदर संख्येपैकीं अदमासें ३/५ लोक मद्रास इलाखा व त्यांतील हिंदी संस्थानें यांतून रहातात. मद्रासेंतील कोचीन व त्रावणकोर संस्थानांत तर एकंदर लोकसंख्येच्या १/४ हूनहि जास्त ख्रिस्ती आहेत. खुद्द मद्रास इलाख्यांतील ख्रिस्त्यांपैकीं निम्मे ख्रिस्ती दक्षिण जिल्ह्यांतून आहेत. ते सेंट फ्रान्सिस झेवियर व स्च्वार्झ यांच्या अमदानींत झालेल्या ख्रिस्त्यांचे वंशज आहेत. इतर प्रांतांतील ख्रिस्तीमतप्रसार मद्रासेंतल्या प्रसारापेक्षां बराच मागाहूनचा आहे. मद्रासनंतर बिहार ओरिसा (२६८०००), मुंबई (२४६०००), ब्रह्मदेश (२१००००), पंजाब (२०००००) आणि संयुक्तप्रांत (१८००००) असा उतरता संख्यानुक्रम लागतो. प्रमुख प्रांतांत बंगाल (१३००००), वर्‍हाड मध्यप्रांत (७३०००) व आसाम (६७०००) यांत ख्रिस्ती अगदीं थोडे सांपडतात.

निरनिराळया ख्रिस्ती मिशनरी पंथांचा वाढता प्रसार दृष्टीखालीं घातल्यास स्वसमाजबलवर्धनासाठीं प्रत्येक मिशनरी पंथ काय काय खटपटी करीत असेल याकडे लक्ष जाईल. १९०१-१९११ या दशकांत आंग्लिकन कम्यूनिअनची वाढ शें. ९ नें झाली या वाढींत बिहार-ओरिसानें शेंकडा ६६, पंजाबनें ४७ व मद्रासनें २१ मिळवून दिले. पुष्कळसे प्रॉटेस्टंट आंग्लिकन म्हणून गणिले जातात, त्यामुळें वरील आंकडयांत जरा फेरफार होईल. बाप्टिस्ट पंथाचें मुख्य पीठ मद्रासेंत असून वरील दशकांत तो शेंकडा २२ नें वाढला. लुथरन शें. ४१ नें वाढले तर मेथॉडिस्ट दोन पूर्णांक एक चतुर्थांश पटीनें जास्त झाले. एकंदर मेथॉडिस्ट (१७२०००) पैकीं तीनपंचमांश संयुक्तप्रांतांत आहेत. प्रेसबिटेरियनांची १९११ मधील १,८१,००० ही संख्या १९०१ मधील संख्येच्या तिप्पट आहे. पंजाबांत १९०१ सालीं सारें ५००० प्रेसबिटेरियन होते; तर दहा वर्षांनीं पाहूं जातां ९५००० भरले. रोमन कॅथोलिकांची वाढ बिहार ओरिसांत शेंकडा ६८ झाली असून मद्रासेंत म्हणजे जेथें त्यांची संख्या सर्वांत अधिक (६९४०००) आहे येथें सारी शें. ९ ची वाढ झालेली दिसते. साल्वेशनिस्ट (मुक्तिफौज) लोकांची संख्या १९ हजारांवरून ५२ हजारांवार गेली. या वाढीचें मुख्य कारण गुन्हेगार जाती व अस्पृश्यवर्ग यांकडे या पंथाचें विशेष लक्ष आहे.

स र का र ची ख्रि स्ती सं प्र दा या च्या वा ढी स म द त.- ब-याचशा प्रांतांतून या जातींनां ख्रिस्ती कळपांत ओढण्याला सरकारची मदत या पंथाला मिळते. पोलिसांच्या देखरेखीनें सुध्दां ज्यांची वाईट प्रवृत्ति कमी होत नाहीं त्या जातींनां ताळयावर आणण्याची विशेष व्यवस्था या पंथानें सरकारकडून करून घेतली आहे. हलक्या जातींच्या लोकांची आर्थिक स्थिति सुधारण्यासाठीं उद्योगधंदे शिकविण्यांत येतात.

मलबार किना-यावर धर्मांतराचें कार्य करणारा सीरियन पंथ फार प्राचीन (इ. स. ६ वें शतक) असून त्यांत रोमोसिरियन, जॅकोबाईट, सिरियन व रीफॉर्मड (सुधारलेले) सीरियन असे तीन मुख्य वर्ग आहेत. इ. स. १९०१-१९११ या दशकांत सीरियनांची एकंदर वाढ शें. २७ वर झाली. या समाजांतील ४/५ हून अधिक लोक खुद्द त्रावणकोर संस्थानांत आहेत.

ए त द्दे शी य ख्रि स्त्यां ती ल न वी न स्था नि क पं थ.- हिंदुमुसलमान बाटून ख्रिस्ती बनल्यावर पूर्वसंस्कारांमुळें किंवा अन्य कारणांनीं नवीन आचारविचार सुरू करितात किंवा पूर्वधर्मांतील कांहीं संस्कार व विचार कायम ठेवून त्यांनां ख्रैस्त्याला फारसें विसदृश दिसणार नाहीं असें वळण देतात. यामुळें त्यांच्यांत नवीन पंथ अस्तित्वांत येतात.

युगोमयम पंथ.- त्रावणकोर संस्थानामध्यें अशाच प्रकारचा एक पंथ गेल्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वांत येऊन त्यांतील लोकांची संख्या (इ. स. १९११) ११२१ पर्यंत गेली  आहे. उपासना, भोजन, विवाह, और्ध्वदेहिक वगैरे बाबतींत सामान्य ख्रिस्त्यांपेक्षां या पंथाच्या चालीरीती वेगळया आहेत. पंथसंस्थापकाच्या घराण्याहून जास्त श्रेष्ठ असा कोणीहि मानिला जात नाहीं. याचा हल्लींचा मुख्य उपाध्याय या घराण्यांतील एक आहे. नवा व जुना करार यानां सारख्याच दर्जाचें मानण्यांत येतें. जाहीर उपासनेचें स्थळ यांनां लागत नाहीं. लग्नें घरांतल्या घरांत होतात. फक्त लग्नाचें रजिस्टर उपाध्यायानें ठेवावें लागतें. यांच्यांतील 'आशीर्वाद' संस्कार ब्राह्मणी धर्तीवर आहे.

अहल-इ-नसारा आणि आर. सी. दत्त पंथ.- पंजाबांतील प्रॉटेस्टंट ख्रिस्त्यांत वरील पंथ आहेत. नांवावरूनच ते नवीन म्हणून ओळखिले जातात. हे पंथ प्रेसबिटेरियन आहेत अशी माहिती मिळते.

गुलाबशाही पंथ.- पंजाबांत आणखी हा एक विचित्र नामाचा पंथ आहे. त्याचा समावेश रोमन कॅथोलिकांत करितात. गुलाबशही नांवाचा एक मुसुलमान गुजर होता. तो बाटून ख्रिस्ती झाला. नंतर त्यानें हा पंथ स्थापिला. हा फकिरी पंथासारखा असून यांतील पुरुष व बायका दोघेहि मुंडण करून घेतात व ब्रह्मचारी वृत्तीनें राहतात.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .