प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खो जात- हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर चित्रळ खोर्‍यांत आणि पामिरच्या दक्षिणेस असलेल्या त्यालगतच्या प्रदेशांत रहाणारी एक जात. पूर्वेस यासीन आणि गिलजिट आहेत. त्या ठिकाणी शिन भाषा चालते. पश्चिमेस काफिरीस्तान असून त्यांत निरनिराळया हिंदु काफिरी पोटभाषा बोलतात. उत्तरेस पामीर पठार आहे. येथें इराणी भाषा आढळते; आणि दक्षिणेस अनेक लहान लहान, मुख्यतः शिन वंशाच्या व कांहीं पठाणी जाती आहेत. ''खो'' (वास्तविक हो) व गिलजिटचे शिन आणि काफिरिस्तानचे काफीर या सर्वांनां दरद असें नांव देण्यांत येतें; पण वास्तविक हें नांव फक्त शिन लोकांस लावतात. या तिन्ही जाती प्राचीन पैशाच्या जाती असाव्यात. हौ भाषेचा उल्लेख चिनी बौद्ध वाङ्मयांत येतो. त्सिन (शिन) हा चीनवाचक शब्दहि अनेक ठिकाणीं येतो. तसाच दरदांचा उल्लेख महाभारत वगैरे संस्कृत वाङ्मयांत अनेक ठिकाणीं येतो. हे त्यावेळीं डोंगरी मुलुखांत रहाणारे लोक म्हणून प्रसिद्ध होते. खो लोकांचे पेहराव व चालीरीती ख-या दरदांप्रमाणें असल्यानें प्रस्तुत लेखांत दरदांहून भिन्न अशा प्रश्नांचाच विचार केला आहे. (दरद पहा).

चित्रळमध्यें खो ही जात राजसत्ताधिष्ठित नाहीं. राज्य करणारांची जात यांनां तिरस्कारानें 'फकीर मुष्कीन' किंवा ''गरीब भिकारी'' असें म्हणते. यांच्याहून वरच्या दर्जाची जात चित्रळचा राजा मेहतर याचे पगारी नौकर असून त्यांनां 'एरबाब झादा' (मालकाचे मुलगे) असें नांव आहे. या दोन दर्जांच्या लोकांमध्यें लग्नव्यवहार होतो. या प्रदेशाचे नुकतेच झालेले जेते जे 'अदमजादा' (माणसांचीं मुलें) त्यांच्या उत्पत्तीविषयीं चांगलीशी माहिती नसून त्यांच्यांपैकीं कांहीं इ. स. १६ व्या शतकांत पामीर ओलांडून उत्तरेकडून आलेसे दिसतात. खो यांनीं आपली भाषा त्यांच्यावर लादली.

दंतकथा, पौराणिक कथा वगैरेंवरून पाहतां एकदां संबंध चित्रळ खोरें काफिरांनीं व्यापिलें होतें. आद्यापहि कांहीं काफीर जाती (उदा. कलाशा) त्या ठिकाणीं राहतात. काफिर पोटभाषांवरूनहि हेंच दिसतें. पूर्वीं एकदां काफिरिस्तान, चित्रळ आणि गिलजिट हा सबंध प्रदेश एकाच जातीच्या लोकांनीं व्यापलेला असून पुढें खो लोकांच्या धाडीमुळें त्याचे दोन वर्ग पडले असा साहाजिक तर्क होतो.

सातव्या शतकांत खरोष्ट्र शब्दाचा लोप झाला असावा आणि त्या प्रदेशास आणि तेथील लोकांस ''होऊ'' हें नांव त्या वेळेस मिळालें असावें. या सुमारास बौद्ध संप्रदायानें व हिंदु संस्कृतीनें परिवेष्टिलेलें यूएची राष्ट्र दुर्बल होऊन हा प्रदेश पुन्हां चीनच्या ताब्यांत गेला आणि पुन्हां चिनी नांवें सुरू झालीं.

''होऊ'' या शब्दाखालीं चीनच्या सरहद्दीवरील अनेक जातींचा समावेश होई. अरल समुद्र, पामीर, पीत नदी, सैबीरिया इत्यादि प्रदेशांत संचार करणा-या अस्थिर टोळयांस 'होऊ' हें नांव मिळालें. होऊंमध्यें हिंदुस्थानांतील लोकांसहि चिनी लेखकांनीं जमा धरलें नाहीं याचें कारण म्हटलें म्हणजे हिंदुस्थान हा देश बुद्धधर्मी आहे हें होय. होऊ व हिंदू यांच्या चालीरीती जरी कांहीं बांबतींत चिनी लोकांस एक दिसल्या तरी होऊ व हिंदू यांतील भेद ते विसरले नाहींत. होऊ लोक गुडघे टेंकीत त्यामुळें ''होऊ पद्धतीनें '' असें चिनी लोक म्हणत. त्याविषयीं इत्सिंग म्हणतो कीं, 'होऊ पद्धति' असें आपण उगाच म्हणतों, कां कीं हिंदु देखील गुडघे टेंकतात. [सि. ले. व्ही इं. अँ. १९०९].

विडुल्फ (ट्राइब्स ऑफ दि हिंदुकूश, पान ७३) म्हणतो कीं, खो लोकांच्या ठिकाणीं त्यांच्या दरद आप्तांहून भिन्न अशीं कांहीं शारीरिक वैशिष्टयें आहेत. स्वरूपावरून त्यांनां दरदांप्रमाणेंच उच्च दर्जाचे आर्य म्हणतां येईल. पण ते ज्यास्त सुंदर, उभंट चेह-याचे, चांगल्या ठेवणीचें आणि मोढाले सुरेख डोळे असलेले असे दिसतात; इतके कीं यूरोपांत सुध्दां सौंदर्यामध्यें त्यांचा उच्च दर्जा लागेल. लांब केंसाविषयीं त्यांची प्रसिध्दी आहे व त्याबद्दल त्यांनां अभिमानहि वाटतो. उलट त्यांच्या काफिर शेजार्‍यांनां ते 'टकले' म्हणून संबोधितात. कारण त्यांचे केस आंखूड असतात. प्राचीन काळीं काबूल, पेशावर आणि बदकशान येथील गुलामांच्या बाजारांत खो स्त्रियांच्या सौंदर्यामुळें त्यांनां अतोनात मागणी असे.

पुरुष टोपी घालून तिच्या भोवंती बारीकसा फेटा गुंडाळतात. अंगांत सदरा, पायांत अगदीं सैल विजार व खाली रंगीत पायमोजे आणि मऊ कातडयाचे बूट घालतात. बायका डोक्याला पांढरी रेशमी कलाबूतची टोपी, अंगांत गुडघ्यापर्यंत पोहोंचणारा सैल खमीस आणि पायात रुंद विजार असा पेहेराव करतात. प्रवासाच्या वेळीं  पुरुषांप्रमाणें त्या पायमोजे व बूट घालतात (बिडुल्फ पान ७५, ओब्रायन- ग्रामर अ‍ॅन्ड व्होक्याबुलरी ऑफ दि खोचार डायलेक्ट पान ६). यांच्यांत तरुण बायका व मुली शिंगांच्या कोळशाच्या पुडीनें आपली तोंडें काळी करतात. त्यापासून उन्हाचा त्रास होत नाहीं व कातडेंहि मउु पडतें असा त्यांचा समज आहे. वागणुकीमध्यें शिष्टाचारावर फार भर देण्यांत येतो. भेटीच्या वेळीं स्नेही एकमेकांनां आलिंगन देतात. वरिष्ठ मनुष्य भेटल्यास कनिष्ठ मनुष्य खालीं उतरून त्याच्या हाताचें चुंबन घेतो (बिडुल्फ पान ७५, ओब्रायन पान ८). चित्रळ नांवाच्या ग्रंथांत (लंडन १८९८) रॉबर्टसननें खो लोकांचें चांगलें वर्णन केलें आहे. विषयासक्ति, खून, भयंकर निष्ठुरपणा, विश्वासघात, भयंकर मृत्यु हीं मानसिक पापें यांस शिवत नाहींत. यांच्याहून ज्यास्त साधे, सभ्य व आनंददायी स्नेही दुसरे कोणीहि सांपडणार नाहींत. प्रत्येकजण इतका सुखी दिसतो, लहान मुलें इतकीं गोजीरवाणीं असतात, व सर्वत्र नैसर्गिक शालीनता इतकी पहावयास मिळते कीं, जर अन्नानदशा झालेले गुलाम हे फळांवर रहात असलेले किंवा उपाशी मरत असलेले कोठें कोठें दिसतात ते दिसत नसते, तर एखाद्या अनोळखी प्रवाशाला आपण एका हर्षोत्फल्ल स्वप्नसृष्टींत आहों अशी कल्पना झाली असती. या लोकांचा पोलो हा राष्ट्रीय खेळ असून त्यांच्यांत यांचें प्राविण्य दिसून येतें. गिलजिट येथील पोलोहून हा थोडा निराळा आहे. प्रत्येक गांवीं जनाली नांवाचें पोलोक्रीडांगण असतें. घोडयावर बसून पोपटासारख्या पक्ष्यांवर गोळया झाडणें हाहि एक यांचा आवडता खेळ आहे. गाणें व नाचणें हींहि करमणुकीच्या प्रकारांत येतात. सण, वाढदिवस, लग्न किंवा अशाच एखाद्या समारंभाच्या वेळीं नाच होतो. गाणें तर नेहमीं पोलो खेळण्याच्या वेळीं चालूंच असतें.

पूर्वींच्या काळीं या देशाचा धर्म बौद्ध असे. चित्रळच्या उत्तरेस वीस मैलांवर खडकांत एक बौद्ध मूर्ति सांपडली आहे. तीवरील संस्कृत किंवा पाली लेख इ. स. तिस-या शतकांतील असावा. हल्लीं खो हे सुनी पंथाचे मुसुलमान आहेत. पण उत्तरखोर्‍यांतील लोक उत्तर गिलजिटांतल्याप्रमाणें मौलवी पंथाचे आहेत. इस्लामी धर्माचा प्रवेश येथें चवदाव्या शतकाच्या सुमारास झाला, व हल्लींचा मुसुलमान वंश १६ व्या शतकांत खोरासानकडून इकडे आला. हे लोक सात दिवस वृद्धि पाळतात. कांहीं उच्च चित्रळ जातींतून प्रत्येक तान्ह्या मुलाला जातींतील प्रत्येक सत्रीनें स्तनपान करविलें पाहिजे अशी चाल आहे. त्यामुळें जातींत एकी होण्याकडे चांगली प्रवृत्ति होते. लग्नसमारंभ शेजारच्या जातींतल्याप्रमाणेंच उरकण्यांत येतात. पण खालील कांहीं प्रकार चित्रळमध्यें नवीन आढळतात. मुल्लानें विवाह मंत्र म्हटल्यावर सासू जावयाच्या हातीं मुलीला देऊन त्याच्यापासून कांहीं पारितोषिक मिळविते. नंतर नवरा बायकोला घेऊन घरीं जावयास निघतो. हिंदुकूशच्या उत्तरेस नव-यामुलाला नवरीच्या घरीं आणण्यांत येतें. बहुपत्‍नीत्वाची चाल यांच्यांत आहे. व नियोगपद्धति रूढ आहे पण सक्तीची नाहीं. गिलजिटमध्यें ती सक्तीची आहे. पातिव्रत्याकडे मुळींच लक्ष नसून पुरुष देखील आपल्या पत्‍नीविषयीं क्वचितच संशय घेतात. हुझानंगर या शेजारच्या संस्थानांत जारकर्म हा गुन्हा मानीत नसून आपली बायको पाहुण्याच्या उपयोगाकरितां द्यावयाची पूर्वापार चाल आहे. संस्थानच्या मुख्याच्या तर्तुदींत आपली बायको ठेवावयाची व त्याचें तिजकडे लक्ष जात असल्यास अभिमान बाळगावयाचा ही यांच्यांत जुनी वहिवाट आहे. चित्रळमध्यें याच्याच जोडीला नव-याला असा अधिकार देऊन ठेविला आहे कीं आपली बायको जारकर्म करीत असतांना नव-यानें पाहिल्यास एकदम दोघांनांहि त्यानें ठार करावें. जर त्यानें एकाला मारून दुस-याला सोडलें तर त्याच्यावर खुनाचा आरोप येत असे. [संदर्भग्रंथ लेखांत पहावेत].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .