प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खेळ- खेळांचा प्रधान हेतु करमणुक हा असतो. मग करमणुक साधून व्यायाम झाल्यास उत्तमच. पण व्यायामाचा अंश त्यांत फार असतां कामा नये. निरनिराळया देशांत निरनिराळया प्रकारचे खेळ असतात. खेळाची प्रवृत्ति मनुष्यामध्यें स्वभावतःच असल्यामुळें आपणांस अगदीं प्राथमिक अवस्थेंत असलेल्या मानवसमाजांत करमणुकीचे प्रकार व खेळ दृष्टीस पडतील. वैदिक काळांत फांशांचा खेळ फार प्रामुख्यानें दृष्टीस पडतो. ॠग्वेदांतील दहाव्या मंडळांत द्यूतकाराचें आत्मगत भाषण त्याची स्थिति उत्तम प्रकारें दाखविते. यज्ञामध्यें रथांच्या शर्यती, दोर ओढण्यासारखा चामडें ओढण्याचा खेळ वगैरे असत. (वेदकाळांतील शब्दसृष्टि, बुद्धंपूंर्व जग.प्र. ५ खेळ, पा ३५०-३५२ पहा). पुराणकालांत त्याबरोबर धनुर्विद्याहि दृष्टीस पडते. घोडयांच्या शर्यती वेदकाळांत सुरू असाव्यात असें कांहीं ॠग्मंत्रावरून वाटूं लागतें. (ॠग्वेद १. ६३, ५; ९ ३२, ५; ४७; ५; १०. ६८, २); शिकार करणें हा व्यवसाय मानवोत्पत्तीच्या समकालीनच असून प्रथम हें वृत्तीचें साधन असून अलीकडे यास एका मर्दानी करणमुकीचें स्वरूप प्राप्त झालें आहे. प्राचीन ईजिप्तमधील लोकांत सोंगटया बुदबळांसारखे खेळ असत. राणी हतसूचा खेळण्याचा पट संशोधिला गेला आहे. वेदकालानंतर लवकरच हिंदुस्थानांत अर्वाचीन बुदबुळांच्या खेळाचें मूळ स्वरूप जो चतुरंग नांवाचा खेळ तो प्रचारांत आला असावा; त्यानंतर शतरंज आला. नवव्या शतकांतील अबुल आबास व दहाव्या शतकांतील फिरदौसी यांनीं बुध्दिबळाच्या खेळासंबंधीं आपल्या ग्रंथांतून माहिती दिली आहे. चीन, जपान, सयाम, ब्रह्मदेश वगैरे प्राच्य देशांतून हा खेळ पुरातन म्हणून गणला जातो. फांसे सोंगटयांचा खेळहि राजवाडे, झनाने व सामान्य लोकांचे अड्डे यांतून रूढ असे. मोंगलकालीन हिंदुस्थानांत सोंगटया व कवडयांच्या खेळाला पचीसी म्हात. फत्तेपूर शिक्रीच्या राजवाडयांत अकबर बादशहा मोठया थाटानें खेळत असे असें रुसेलेट सांगतो (इंडिया अँड इट्स नेटिव्ह प्रिन्सेस १८७६) त्या राजवाडयाच्या फरशींत एक सोंगटयांचा पट बसविला आहे. या पचीसीचे चौरस व चौपट असे दोन प्रकार असत.

याप्रमाणें फार प्राचीन कालापासून खेळांची परंपरा सर्वत्र अव्याहत चालत आली आहे. सध्यांच्या प्रचलित खेळांचें वर्गींकरण आपणांस अनेक तर्‍हानीं करतां येईल. उदाहरणार्थ स्त्रियांचे व पुरुषांचे खेळ, बैठे व मैर्दानी खेळ. तसेंच एकच खेळ लहानपणीं, तरुणपणीं व म्हातारपणीं उपयोगी पडत नाहीं तेव्हां या तीन अवस्थांतील खेळहि निरनिराळे असतात. तसेंच खोखो, आटयापाटया यांसारखे सांधिक, बुध्दीबळासारखे वैयक्तिक असेंहि खेळांचें वर्गीकरण करतां येईल.

(१) स्त्रियांच्या सध्यांच्या खेळांत मुलींचे (अ) फुगडी, झिंम्मा, कवडया, सागरगोटे, भातुकली, आंधळीकोशिंबीर, लपंडाव, खोखो हे खेळ दृष्टीस पडतात व (आ) बायकांमध्यें पत्ते, सोंगटया, टेनिस, बॅटमिंग्टन व इतर पाश्चात्य स्त्रियांचे खेळ आढळतात. आपल्या समाजांत लग्न झाल्यावर सामान्य बायकांनां खेळावयास मिळत नसल्यानें त्यांच्यांत फारसे खेळ नाहींत. अलीकडे सुशिक्षित स्त्रिया खेळांत बहुधा इंग्रजी स्त्रियांचें अनुकरण करतात व बहुधा पाश्चात्य खेळ खेळतात. तथापि पोहणें, धांवणें वगैरे शक्तीचे खेळ अद्याप खेळत नाहींत.

(२) पुरुषांच्या खेळांत (अ) मुलांचे :- विटीदांडू, गोटया, लगो-या, खोखो हे खेळ प्रचलित असून (आ) तरुणांचेः- आटयापाटया, खोखो, बुध्दिबळें, पत्ते, क्रिकेट टेनिस, हॉकी, फुटबॉल, मलखांब, कुस्त्या, दांडपट्टा, बोथाटी इत्यादि बैठे व मैर्दानी तसेंच शरीरसामर्थ्यवर्धक खेळ आढळतात. (इ) वृध्दांचेः- टेनिस, बिलियर्ड, गंजिफा, बुद्धिबळें, सोंगटया, पत्ते हे खेळ विशेष आवडीचे असतात. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल वगैरे खेळ पाश्चात्य लोकांचे असून भारतीयांच्या आतां ते पूर्णपणें अंगवळणी पडले आहेत. आटयापाटया, खोखो, दांडपट्टा या खेळांसहि व्यवसिथत स्वरूप, दिलें असून त्यांचे अलीकडे बरेच सामने वगैरे पहावयास सांपडतात. कुस्त्या, पळणें, पोहणें, लांब व उंच उड्या मारणें यांसारखे मर्दानी खेळ सार्वराष्ट्रीय समान्याचे विषय झाले आहेत. मुष्टियुद्ध अद्याप आपल्याकडे सुरु झालेलें नाही. स्काउट (बालवीर अथवा बालचर) चळवळींमुळें नवीन नवीन बैठे खेळ मुलांत बरेच शिरले असून त्यांतील व्यावहारिकतेकडेहि बरेंच लक्ष देण्यांत येतें. मुलांकरितां विदेशी बैठया खेळांची माहिती बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररी खात्यानें प्रसिद्ध केली आहे. या ठिकाणीं केवळ खेळाविषयीं सामान्य विवेचन देऊन विशिष्ट खेळांवर स्वतंत्र लेख दिले आहेत.

पाश्चात्यांतहि सार्वजनिक व वैयक्तिक खेळांची परंपरा बरीच जुनी आहे.

सा र्व ज नि क खे ळ.- प्राचीन ग्रीक, रोमन लोकांच्या सार्वजनिक खेळांत मल्लयुध्दाच्या सामन्यांसारखे अनेक प्रकार व खेळ असून एखाद्या धार्मिक कृत्यांशीं अथवा सणाशीं त्या सर्वांचा संबंध असे. ग्रीक वाङ्मय व कला यांमध्यें आदर्शभूत होणारें राष्ट्रीय शील आणि शारीरिक व बौध्दिक सौंदर्य या गुणांचा विकास होण्याचा जर कोणती गोष्ट कारणीभूत झाली असेल तर ती म्हणजे ग्रीक लोकांचे सार्वजनिक खेळ व सामने वगैरे गोष्टी होत. म्हणूनच प्राचीन खेळांची उत्पत्ति व वाढ कशी झालीं हें जाणण्यास ग्रीक लोकांच्या इतिहासाचें अवलोकन केलें पाहिजे. रोमन लोकांच्या 'सरकस' व अ‍ॅम्पीथिएटर' वगैरे संस्था या जुन्या ग्रीकांच्या 'ऑलिंपिया' व 'पायथिया' वगैरे संस्थांच्या केवळ नकाला होत यांत संदेह नाहीं.

ग्री क- अगदीं आरंभी ग्रीक खेळांचा धर्माशीं निकट संबंध असे. धार्मिक प्रार्थना, संकटनिवारण, यशप्राप्ति व प्रायश्चित वगैरे प्रसंगीं खेळाचे सामने होत असत व प्रत्येक खेळांच्या स्थानाचा कोणी तरी एक देव किंवा एखादा पौराणिक वीर असे. ईलिअड व ऑडिसी या महाकाव्यांत उल्लेखिलेले, खेळ पाहिले असतां त्याकाळीं मुष्टियुद्ध, कुस्ती, ओझीं उचलणें, धांवण्याची शर्यत व रथांची शर्यत वगैरे खेळांच्या बाबतीत ग्रीकांची प्रगति झाली होती हें आढळून येतें. या एकंदर चार राष्ट्रीय उत्सवांत ऑलिंपिअन खेळांची फारः प्रसिध्दि होती. एलिअसच्या मैदानानजीक एका जागेला ऑलिंपिया असं नांव असून त्या ठिकाणच्या अलताइ उद्यानांत ऑलिंपिअन झीअस नांवाच्या देवाचें एक देऊळ असून यशस्वी व प्रसिद्ध मल्लांचे त्या ठिकाणीं पुतळे ठेवलेले असत. तेथील देवळांत आयफिटस व लायकरगस यांचीं नांवें व खेळाचें नियम कोरलेले होते. ऑलिंपिअड हा एक राष्ट्रीय उत्सव असून तो दर चार वर्षांनीं पाळला जात असे. व त्यावेळीं अनेक खेळांचे सामने होऊन बक्षिसें दिलीं जात असत. या खेळांच्या सामन्यास सुरुवात झाली म्हणजे चोहोंकडे उत्साह दिसून येत असे. निर्णय देणारे १० न्यायाधीश असून खेळाडूंच्या तालमींमध्ये योग्य शिक्षण घेतल्याचा दाखला पुढें करावा लागत असे. खेळाडूंच्या कुलशीलाबद्दल विशेष चौकशी करण्याची पद्धत असून सामन्यांत कपटाचरण होणार नाहीं अशी त्यांनां शपथ घ्यावी लागत असे. सुरुवातीस शिंग फुंकून नंतर खेळास सुरुवात होत असे. (१) पळण्याची शर्यत, (२) कुस्ती, (३) उड्डाण मारणे, (४) मुष्टियुद्ध व (५) रथांची शर्यत इतके महत्वाचे खेळ व सामने त्याकाळीं अमलांत होते. रथांच्या शर्यतींत हल्लींच्या घोडयांच्या रेसमधींल जॉकीपेक्षां तत्कालीन सारथ्यास अधिक कौशल्य व चपळपणा अंगीं आणावा लागत असे. चाळीस पन्नास रथांची शर्यत लागे व या खेळांत राजे लोकांचें अंग असे. वरील कोणत्याहि खेळांत यशस्वी झालेला खेळाडू झिअसच्या देवळाकडे वाजतगाजत जांताना लोक त्याला अनेक देणग्या फुलें व अलंकार वगैरे अर्पण करीत असत. पिंडार, युरिपिडीससारखी कवी त्यांचा सन्मान करीत असत व त्याच्या नांवानें मोठीं स्मारकें बांधलीं जात. सिसेरो म्हणतो कीं, एखाद्या सेनापतीपेक्षांहि यशस्वी खेळाडूस अधिक सन्मान प्राप्त होत असे. वरील पांच प्रकारच्या खेळांप्रमाणेंस पिथिअन, नेमिअन व इस्थमिअन असे ग्रीकांचे तीन प्रकारचे खेळ होते. डेल्फी येथें होणा-या पिथिअन अपोलो देवाच्या उत्सवांतच पिथिअन खेळाचें मूळ सापडतें. या खेळांत गाण्याची चढाओढ असते. नेमिअन खेळ, नेमिअनझिअस नांवाच्या उत्सवापासून सुरू झाले असून त्यांत अनेक सामने होत असत. इस्थमिअन खेळ हे कॉरिंन्थच्या संयोगभूमींत होत असून या खेळांत मल्लविद्या, संगीत वगैंरेंचा अंतर्भाव होत असे.

रो म न.- ग्रीस देशाप्रमाणेंच रोमध्येंहि खेळांचा धर्माशीं निकट संबंध असे. वर्षारंभीं देशाची सुरक्षितता रहावी म्हणून देवास खेळ नवसासारखे मागून घेतले जात व त्यांचा खर्च सरकारतर्फें होई. तथापि खासगी पैशंतूनहि लोक खेळाच्या कामीं पैसे खर्चून धार्मिक पुण्य व करमणूक या दोन्ही गोष्टी साधून घेण्यास कमी करीत नसत. सीझरनंतर जे राजे झाले त्यानीं तर या कामीं फार खर्च केला. रोमन इतिहासांत व रोमन लोकांच्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेंत खेळांचें मोठें महत्व आहे हें खरें; परंतु मल्लयुध्दें व शर्यती वगैरे गोष्टींत समंजस मनुष्य सर्वदा अगदीं तल्लीन कसा होतो याविषयीं प्लिनीनें आश्चर्य प्रकट केलें आहे. ग्रीक व रोम खेळ पाहून भिन्न विकार उत्पन्न होतात. याचें कारण असें कीं, ग्रीक लोक मुळचेच नाटकी व रोमन लोक हे केवळ प्रेक्षक असें त्यांचें वर्णन करतां येईल. झीनोफानीज म्हणतो कीं, एखाद्या मल्लाच्या देहसामर्थ्याचें एखाद्या तत्वज्ञाच्या ज्ञानापेक्षांहि त्या काळीं जास्त चीज होत असे. कितीहि उच्च दर्जाचा मनुष्य असला तरी ऑलिंपिक खेळांत भाग घेणें ग्रीकांला कमीपणाचें वाटत नसे. परंतु उच्च कुळांतील रोम लोकांनां मात्र असल्या खेळांत भाग घेणें कमीपणाचें वाटत असे. रोमन खेळ हे बहुधा नवस म्हणून मागून घेऊन नंतर खेळले जात असत. तथापि त्यांचें वर्गीकरण स्थानाप्रमाणें अर्थात सरकस व अ‍ॅम्पीथिएटर या ठिकाणाप्रमाणें करण्यांत येतें. लूडी मॅग्नी हा उत्सव म्हणजे मूळची एका ज्युपीटर देवाला नवसार्थ केलेली मेजवानीच होय. सेनापती युद्ध करून परत आल्यावर ती करण्यांत येत असे. कॅपिटॉलपासून फोरमपर्यंत व नंतर सरकसकडे एक लष्करी मिरवणूक निघत असे व ह्या वेळीं खेळ होत असत. (१) रथांची शर्यत (२) लूडस ट्रोइ, (३) लष्करी पाहणी व (४) मल्ल युध्दें असे चार महत्वाचे खेळ होते. रथांच्या शर्यतींत पूर्वीं दोन रथांची शर्यत होत असे. परंतु अनेक घोडे जुंपून अनेक रथांच्या शर्यती पुढें होऊं लागल्या. तत्कालीन सारथ्यास आधुनिक जॉकीपेक्षांहि फार मान मिळत असे. त्या सरकस नांवाच्या स्थानीं अनेक पक्ष असत. व ते सारथ्यांच्या कपड्यांच्या रंगांवरून ठरविले जात. लूडस ट्रोई या खेळांत पॅट्रिशियन लोक भाग घेत असत. अश्वारोहण करून एखादी खोटी लढाई देण्याचा हा खेळ आहे. वरील खेळ सरकसमध्यें होत, परंतु अ‍ॅम्पिथिएटरांतहि बरेच खेळ होत असत. ''वेनाती ओ'' नांवाच्या खेळांत पशूंची परस्परांत किंवा मनुष्य व पशू यांचीं युध्दें करविलीं जात असत. त्या ठिकाणीं मोठाले वाघ, सिंह, हत्ती, रेडे व बैल वगैरे आणून त्यांचे व मनुष्यांचे किंवा पशूपशूंचे सामने होत असत. ''नॅऊमॅची'' खेळांत समुद्रांतील खोटें युद्ध करण्याची पद्धत असे. परंतु अ‍ॅम्पीथिएटरांत विशिष्ट खेळ म्हणजे 'म्यूनस ग्लॅटिएटोरिम' नांवाचा खेळ होय. मार्कस व डेसिमस ब्रूटस यांच्या स्मशानयात्रेच्या वेळीं होणा-या   खेळापासून वरील खेळ सुरू झाला. यांत मनुष्यांचीं युध्दें होत व गुलाम व कैदी यांची असहाय स्थिति कशी होती हें यांत दिसून येई. 'लूडि अपोलोनरीज' व 'मेगॅलेन्सीज' हे खेळहि प्रतिवर्षीं होत असत.

खा स गी खे ळ.- यांचें वर्गीकरण बाहेर खेळण्याचे खेळ व घरगुती खेळ असें करतां येईल. जगांत मोठया माणसांच्या खेळांपेक्षां मुलांच्या खेळांत चोहोंकडे साम्य असलेलें आढळून येतें. होमरमध्यें मुलें वाळूवर किल्ले बांधीत असें वर्णन आहे. ग्रीक व रोमन मुलांचेहि बाहुल्या, चाकें, उडया मारण्याच्या दो-या, घोडे, पतंग, रस्सीखेंच, उन्हाळी पावसाळी, चेंडूफेक व लपंडाव इत्यादि अनेक खेळ होते. परंतु क्रिकेट, टेनिस, गोल्फ अथवा पोलोसारखे खेळ त्यावेळीं नव्हते. कोंबडयांची झुंज हा खेळहि ग्रीस व रोम देशांत चालू असे. फाशासारखा 'टेसेरा' म्हणून एक खेळ, जुगार, फांशांचा खेळ, डयूओ डेसिमस्क्रिप्टा  व कॉटॅबस इत्यादि अनेक खेळ ग्रीस व रोम देशांत ख्रिस्तशकापूर्वींच्या काळांत चालू असत असें दिसतें.

कांही अर्वाचीन खेळांना राष्ट्रीय व सार्वराष्ट्रीय महत्व येत चाललें आहे. खेळांचे सार्वराष्ट्रीय सामने दरवर्षीं होत असतात व त्यांत आपलें राष्ट्र मागासलेलें दिसूं नये म्हणून प्रत्येकाची खटपट असते व त्यामुळें खेळांकडे विशेष लक्ष दिलें जातें ही चांगली गोष्ट आहे.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .