प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खिलजी घराणें- या घराण्याचा संस्थापक जलालुद्दीन नांवाचा मुसुलमान सरदार होता. अफगाणिस्तानांतील खल्ज नांवाच्या प्रांतांतील रहिवाश्यांनां खिलजी असें म्हणतात; त्या जातीचा हा जलालुलद्दीन होता. गुलाम घराण्याच्या वेळीं राज्यांतील मोठमोठया जागा तुर्कांना मिळत. त्यामुळें तुर्कांचा व खिलजी जातीचा बेबनाव असे. बंगाल जिंकण्यांत या लोकांनी बरेंच शौर्य दाखविलें होतें. गुलाम वंशाच्या अखेरीस हे लोक बरेच शिरजोर झाले होते. कैकोबाद हा गुलाम घराण्याचा शेवटचा राजा होता. तो जुलुमी असल्यानें व त्यांच्या वजीराचा शिरच्छेद झाल्यामुळें बंडखोर खिल्ज लोकांनीं त्याचा पुढारी जलालुद्दीन याच्या चिथावणीवरून कैकोबादचा निर्दयपणें खून केला. पुढें लोकांच्या डोळयांवर येऊं नये म्हणून कैकोबादच्या अल्पवयी शम्सुद्दीन नांवाच्या मुलास जलाल यानें गादीवर बसविलें, परंतु थोडयाच दिवसांत त्याचाहि खून करून जलालनें तख्त बळकावून स्वतःस फिरोजशाह नांव घेतलें. (फेब्रु – १२९०). यावेळीं त्याचें वय ७० होतें. या घराण्यांत सहा राजे होऊन त्यांनीं एकंदर तीस वर्षें राज्य केलें, त्यांत अल्लाउद्दीन हा प्रख्यात झाला.

जलालुद्दीनाबद्दल सरदारदरकदार व प्रजा यांचें चांगलें मत नव्हतें म्हणून तो घाबरून दिल्लीस न राहतां जवळच किलुखेडी येथें राजवाडा बांधून राहिला व त्या खेडयास नौशहर (नवें शहर) असें नांव दिलें. त्याचा राज्यकारभार फार ढिलाईचा होता; वयमानानें त्याला कडक शिस्त राखतां आली नाहीं. त्यामुळें सर्वच बंडखोरांचा व लुटारूंचा सुळसुळाट झाला. इ. स. १२९१ त उत्तरेंत मोठा दुष्काळ पडला असतां सिद्दी मौला नांवाच्या एका फकीराने त्याचा जीव घेण्याचा कट केल्यानं यानें त्याला फाशीं दिलें. या विरहित त्यानें कोणास कडक शिक्षा केली नाहीं. पुढें १२९२त मोंगलांनीं पंजाबवर स्वारी केली तेव्हां स्वतः जलाल त्यांवर चालून गेला. लढाई होऊन दोघांत तह झाला. स्मिथ म्हणतो कीं, जलालनें मोंगलास खंडणी दिली. कडामाणिकपुर येथील सुभेदार मलीक छज्जु यानें बंड केल्यानें तें मोडून जलालनें तेथें आपला पुतण्या व जांवई अल्लाउद्दीन यांस नेमलें (१२९१). जलालनें दोन वेळां रणथंबोरच्या किल्ल्यास वेढा दिला पण तो किल्ला पडला नाहीं; तेव्हां जलालनें माळव्यांत जाऊन लुटालूट करून व उज्जैनहि लुटुन आणि माळव्यांतील देवळें फोडून तो परत दिल्लीस गेला (१२९१). वरील मोंगलांच्या स्वारींत चेंगीझखानाचा नातू उल्घूखान हा जलालच्या हातीं लागला असतां त्यास त्यानें त्याच्या तीन हजार मोंगल लोकांनिशीं दिल्लीस ठेविलें; या सर्वांनीं पुढें मुसुलमानी धर्म स्वीकारल्यामुळें त्यांनां नवे मुसुलमान म्हणू लागले. पुढें (१२९३) अल्लाउद्दीनानें पूर्व माळवा जिंकल्यानें जलालनें त्याला अयोध्या (कडा माणिकपूर) प्रांताची सुभेदारी जहागीर दिली व त्याचा सुमारास आपला मुलगा अर्कलीखान यास मुलतानचा व नसरतखानास सिंधचा सुभेदार नेमलें. अल्लाउद्दीन पुढल्या वर्षी देवगिरीवर गेला. प्रथम माळ्यांतून निघून गेल्यावर खानदेशांतून तो देवगिरीवर उतरला. रामदेवरावाचा नाश होण्याची वेळ आली होती, पण त्याचा मुलगा शंकरदेव हा एकाएकीं मदतीस आल्यानें अल्लाउद्दीनाचें कांही न चालतां त्यानें तह करून व खंडणी घेऊन परत माळव्याकडे प्रयाण केलें. या स्वारींत त्यानें बरीच लूट मिळविली व पुष्कळ सैन्य पदरीं ठेवलें आणि त्याची वार्ता जलालुद्दिनास लागूं न देण्याची खटपट केली. याबद्दल जलाल यांस पुष्कळ लोकांनीं सांगून पाहिलें परंतु त्याचा अल्लावरील विश्वास उडाला नाहीं. अल्ला हा परत कडामाणिकपुरास आल्यावर त्यानें जलालास भेटीस बोलावलें आणि जलाल हा इतरांचें न ऐकतां भेटीस गेला. तेव्हां अल्लानें त्याची भेट घेत असतां विश्वासघात करून मारेक-या कडून त्याचा खून केला. (जुलै १२९६). त्याचें डोकें भाल्यास खोंचून सर्व फौजेंत फिरविलें व फौजेला भरपूर बक्षिसें वाटलीं. जलाल हा दुर्बळ मनाचा राजा होता. तो चोरांनां अगर दरवडेखोरांनां कडक शिक्षा देत नसे. त्याच्या वेळीं ठगांनीं सर्वत्र सुळसुळाट केला असतां त्यानें एक हजार ठग लोकांनां पकडून त्यांना शिक्षा न करतां फक्त बंगालमध्यें हद्दपार केलें. त्यामुळें पुढें पुष्कळ शतकें बंगालमध्यें या ठगांचा व चांच्याचा उपद्रव होत होता. चोरांनीं चोरी करणार नाहीं अशी नुसती शपथ घेतली कीं हा त्यांनां सोडून देई. ही त्याची दुर्बळवृत्ति खिलजी लोकांसहि आवडली नाही. त्यानें विद्वानांस आश्रय दिला होता. त्याच्या या वर्तनानें दरबारांत व बाहेरहि त्याच्याविरुद्ध कट सुरू झाले व त्यांचा मुख्य अल्लाउद्दीन बनला. जलाल मेल्यावर त्याच्या बेगमेनें वडील पुत्र अर्कलीखान हा मुलतानास असल्यानें धाकटा पुत्र रुक्नुद्दीन इब्राहिम यांस गादीवर बसविलें. परंतु अल्लाउद्दीन हा दिल्लीस फौजेसह आल्यावर बेगम आपल्या मुलासह मुलतानास पळून गेली व अल्लाउद्दीन हा मुहम्मदशहा हें नांव घेऊन २१ आक्टोबर १२९६ त तख्तावर बसला. अल्लाउद्दीन याचें चरित्र ज्ञानकोशाच्या सातव्या भागांत विस्तृत आलें आहे तेथें ते पहावें. त्याशिवाय विशेष मजकूर येथें दिला आहे. अल्लाउद्दीनानें मुलतानास आपला भाऊ उल्घुखा यास पाठवून व अर्कली रुक्नुद्दीन व (जलालुद्दीनची मुलें) यांना (वचन देऊन) पकडून आणवून त्यांचे डोळे काढले. पुढें १२९६ त मोंगलांनीं पंजाबवर स्वारी केली असतां जालंधर येथें त्यांचा उल्घुखान व झाफरखान यांनीं पराभव केला. याच उल्घुखानानें इ. स. १२९८ त गुजराथच्या स्वारींत सोमनाथाचें देऊळ लुटून व तेथील मूर्ति फोडून खंबायत व अनहिलपट्टण काबीज केलें. परत जातांना उल्घूनें फौजेजवळ लुटीचा एकपंचमांश भाग मागितल्यानें सैन्यानें बंड केलें. परंतु तें मोठया मुष्किलीनें मोडलें गेलें. याच वेळी खंबायत येथें उल्घूनें पुढें फार प्रसिध्दीस आलेल्या मलिक काफर नांवाच्या गुलामास कैद केलें. याच वेळीं (१२९८) पुन्हां मोंगलांनीं सल्दीच्या हाताखालीं सिबिस्तानावर स्वारी केली, तेव्हां त्यांचा पराभव जाफरखानानें केला. रणथंबोरच्या लढाईंत अल्लाउद्दीनाचा सरदार नसरतखान मारला गेला व मुसुलमानांचा पूर्ण पराभव झाला तेव्हां अल्लाउद्दिन स्वतः रणथंबोरवर गेला. याच वेळीं दिल्लीस त्याचा पुतण्या सुलेमानशाह आकतखान यानें बंड करून स्वतःस बादशहा म्हणून जाहीर केलें व अल्लाउद्दिनास ठार मारण्याचा कट केला. तेव्हां अल्लाउद्दीनानें त्याला पकडून ठार मारिलें. पुढें रणथंबोरचा वेढा चालू असतां, मंगूखान व उमरखान या दोघां पुतण्यांनीं बदाऊन येथें व दिल्लीस हाजी मौलानें बंडें उभारलीं. अल्लाउद्दीनानें त्या सर्वांनां पकडून ठार मारून शांतता स्थापन केली. रणथंबोर पडल्यावर तेथें उल्घुखानाची नेमणूक केली पण तो पुढें सहा महिन्यांनीं मरण पावला. याचवेळी (१३०२) दाऊद मोंगलानें लाहोरवर स्वारी केली होती. यानंतर (१३०३) अल्लाउद्दीनानें मलिक छज्जू व फकिरुद्दीन यांनां तेलिंगणावर पाठविलें व स्वतः चितोडला जाऊन (२८ जाने. इ. स. १३०३) किल्ल्यास वेढा दिला. परंतु मोंगल दिल्लीकडे आल्यानें त्याल परतावें लागलें. पुढें २५।८।१३०३ रोजीं अल्लाउद्दीनानें चितोड घेतलें व तेथें खिजरखान (वडील मुलगा) यास सुभेदार नेमलें. पुढल्याच वर्षी चितोडचा पकडून आणलेला राणा कैदेंतून पळून गेला. मोंगल हे ख्वाजा ताशच्या हाताखालीं हिंदुस्थानांत अस्रोहपर्यंत चालून आले (१३०४) तेव्हां गाझींबेगनें त्यांचा पराभव केला; पुन्हा १३०५ त ऐबक खान हा मोंगलासह चालून आला. परंतु त्याचाहि गाझीनें पराभव केला. याच वेळीं अल्पखान यानें कारेथचा किल्ला बांधला. नंतर अल्लाउद्दीनानें ३ जुलै १३०८ रोजीं सिवानला वेढा देऊन १० सप्टेंबर रोजीं तें घेतलें व तेथील राजास ठार मारिलें; याच सालीं त्यानें झालवाडहि घेतलें. पुढें मलिककाफूर यानें वरंगळास वेढा देऊन एक महिन्यानें तें घेतलें (१७ फेब्रुवारी १३१०) व तेथील प्रतापरुद्र राजाशीं तह करून व लूट घेऊन तो परत दिल्लीस गेला (१० जून); परंतु पुन्हा द्वारसमुद्रावर स्वारी करण्यास निघून तेथें तो २५ फेब्रु. १३११ रोजीं पोहोंचला. तेथचा राजा वीरबल्लाळ हा त्याला शरण आला तेव्हां तेथून काफूर हा रामेश्वरापर्यंत जाऊन व तेथें एक मशीद बांधून परत दिल्लीस गेला. याच सुमारास (१३१२) दिल्लीस राहिलेल्या नव्या मुसुलमानांनीं (पूर्वींचे मोंगल लोक), त्यांना अल्लाउद्दीनानें सैन्यांतून कमी केलें म्हणून त्याचा खून करण्याचा कट केला, परंतु तो उघडकीस आल्यानें त्यानें त्या सर्वांची कत्तल केली. अल्लाउद्दीनाचा वडील मुलगा खिझरखान यानें मामेबहिणीशीं लग्न लाविलें. (१३१२) तेव्हां मलिक काफूरनें चिथावल्यावरून अल्लाउद्दीनानें त्यास कैद केलें व त्याच्या मेव्हण्यास गुजराथचा सुभेदार अल्पखान यास ठार मारिलें. त्यामुळें गुजराथेंत बंड झालें; त्यावर कमालुद्दीन यास पाठविलें असतां, बंडखोरांनीं त्याला ठार मारिलें. पुढें अल्लाउद्दीन मरण पावला. याच्या पदरीं झियाउद्दीन नराणी म्हणून इसम होता, त्यानें याच्याबद्दल पुढील प्रमाणें लिहून ठेविलें आहे. राज्यावर बसल्यापासून तीन वर्षांच्या आंत त्यानें राज्याचा चांगला बंदोबस्त केला. त्यामुळें त्याला चैनींत दिवस घालवितां येऊं लागले. त्याच्या फौजेस भराभर जय मिळाले; दरके वर्षी त्याला दोनतीन मुलें होऊं लागली; तिजोरींत भरपूर पैका जमला; हिरे-रत्‍नांच्या पेटया जमूं लागल्या व हजारो हत्ती पीलखान्यांत झुलूं लागले. त्यामुळें तो ऐश्वर्यमदानें उन्मत्त बनला; गर्वानें व अज्ञानानें त्याचे डोकें बहकून तो भलती कृत्यें करूं लागला. त्याला विद्येचा गंधहि नसल्यानें विद्वानांची संगति याला आवडत नसे. तो हट्टी निष्ठुर व उर्मट होता. परंतु त्याला दैव अनुकूल होतें. नवीन धर्म स्थापून आपण त्याचे पैगंबर बनावें असें तो म्हणूं लागला; त्यानें आपणास दुसरा शिकंदर (अलेक्झांडर) असें नांव धारण केलें. लोकांनीं बंडें उभारलीं तेव्हां त्यानें लोकांचा छळ केला. हिंदूंनीं हत्यारें घेऊं नयेत, घोडयावर बसूं नये, उंची पोशाख करूं नये असे नियम केले. त्याच्या या कडकपणाने राज्यांत वरवर स्वस्थता दिसत असे.

अल्लाउद्दीनाच्या पश्चात काफूरनें त्याच्या बेगमेस हांकलून देऊन त्याचा मुलगा खिझरखान व त्याचा एक भाऊ यांनां आंधळें करून शिहाबुद्दीन नांवाच्या त्याच्या एका भावास तत्खवर बसविलें (१३१६). परंतु पुढें एक महिन्याने काफूर याचा खून त्याच्या जुलुमानें त्रासलेल्या दरबारी मंडळीनीं पाईक लोकांच्या एका टोळीकडून करविला. तेंव्हा मुबारकशाह म्हणून अल्लाउद्दीनाच्या दुस-या एका मुलानें शिहाबुद्दिनास पदच्युत करून आपण तख्तारोहण केलें. (१३१७). त्यानें गुजराथेंतील बंड मोडून तेथें आपला सासरा मलिक दिनार उर्फ शाफरखान यास सुभेदार नेमलें. देवगिरीकर शंकरदेवाचा मेव्हणा हरपाळदेव यानें यावेळीं उचल केली; तेव्हां मुबारकानें त्याच्यावर स्वतः जाऊन त्याचा पराभव केला (१३१८). मुबारक दुर्व्यसनी व चैनी होता. त्यानें हलक्या लोकांस मोठमोठया जागा दिल्या. हसन नांवाच्या आपल्या एका आवडत्या गुलामास त्यानें वजीर करून त्यास मलिक खुश्रू पदवी दिली. खुश्रूनें मलबारवर स्वारी करून पुष्कळ लूट आणिली (१३१९). अल्लाउद्दीनानें निष्कारण कैदेंत टाकिलेल्या लोकांनां मुबारकनें मोकळें करून रयतेच्या जप्त केलेल्या जमिनी सोडल्या व जुलुमी कर बंद केले. खुश्रूच्या हातीं सर्व कारभार आल्यानें त्यानें करडा अंमल गाजविला. मुबारक आळशी व व्यसनी बनला. राज्यांत दारूचीं दुकानें वाढली; सर्वत्र महागाई झाली; देशांत बंडें उठलीं; त्यामुळें बादशहानें दडपशाही सुरू केली; निरपराध्यांनां ठार मारिलें; शेवटीं मलिक खुश्रूनें आपल्या मदतनिसाकरवीं मुबारकचा खून केला (१३२०). येथें खिलजीघराण्याचा शेवट झाला.

मलिक खुश्रू हा मूळचा हिंदू होता. त्यानें १ वर्षपर्यंत दिल्लीचें राज्य केलें. त्याच्या मनांत पुन्हां दिल्लीस हिंदूंचें राज्य स्थापावयाचें होतें. त्यानें आपल्यास नासीरउद्दीन हें नाव घेतलें होतें. त्यानें खिलजीघराण्यांतील लोकांची कत्तल केली व मुबारकाच्या मुख्य बेगमेशीं (ही सुध्दां मूळची हिंदु होती) लग्न लाविलें. मुसुलमानाविरुद्ध त्यानें एकदम उचल केल्यानें ते चिडले व त्यांनीं बंड केलें. शेवटी गाझीबेग तघलख यानें (हा पंजाबचा सुभेदार होता) दिल्लीवर स्वारी करून, मलिक खुश्रूचा पराभव केला. लढाईंत खुश्रू ठार होऊन गाझीबेग घियासुद्दीन तघलख नांव धारण करून तक्तावर बसला (१३२१). खुश्रूस जर त्या वेळच्या सर्व हिंदु राजांनीं मदत केली असती तर दिल्लीस हिंदूंचें राज्य पुन्हां स्थापन झालें असतें.

[संदर्भग्रंथ – ताझीयतुल् – अम्सीर; झिआउद्दीन बिराणी – ता. ई फिरूझशाही; माबेल डफ – इंडियन क्रॉना०; स्टॅन्ले लेनपूल-मिडीव्हल इंडिया; मिरात ई अहमदी; तारीख ई अलई; तुहफत उल् कीरान; फेरिस्ता; व्हि. स्मिथ.].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .