प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खानेसुमारी- अलीकडील काळांत नियमित कालावधीनें केवळ लोकसंख्या मोजण्याचें किंवा इसमवार उद्योगधंदे व शेतकीचीं साधनें मोजण्याचें किंवा मागील काळांत करविभागणी करण्याच्या हेतूनें घरदार, गुरेढोरें, शेतवाडी वगैरे सर्व प्रकारची मालमत्ता मोजण्याचें जें काम सरकारतर्फे करण्यांत येत असतें त्याला खानेसुमारी हा शब्द लावतात.

पू र्वे ति हा स.- अशी खानेसुमारी करण्याचे उद्देश निरनिराळें असल्याचें प्राचीन काळापासून दिसून येतें. जमाबंदीच्या अधिका-यानें कर देणारीं व न देणारीं अशी घरें वेगळीं मोजून प्रत्येक गांवांतील चारहि वर्णांच्या लोकांची संख्या मोजावी. शेतकरी, गुराखी, व्यापारी, कसबी, मोलकरी, गुलाम, द्विपाद व चतुष्पाद प्राणी यांची नक्की मोजदाद करावीः प्रत्येक घरांत तरुण व वृद्ध माणसें किती, त्यांचे चरित्र, धंदा, उत्पन्न व खर्च यांची माहिती काढावी. त्याचप्रमाणें भ्रमणशील लोकांच्या स्थलांतरांची कारणें वगैरें शोधावीं असें कौटिलीय अर्थशास्त्रांत ५४-५५ व्या अधिकरणांत सांगितलें आहे. या गणतीचा हेतु मुख्यतः राज्याचें उत्पन्न वाढविण्याचा असे. पूर्वीं एकदां इस्त्रायल लोकांतील वीस वर्षांवरील सर्व पुरुषवर्गाची खानेसुमारी करण्यांत आली होती, तिचा उद्देश त्यावेळीं त्या समाजांत युध्दोपयोगी माणसें किती आहेत तें ठरविण्याचा होता. डेव्हिडच्या आज्ञेवरून जोआबनेंहि याच उद्देशानें एकदा खानेसुमारी केली होती; आणि त्यामुळें जे अनिष्ट परिणाम भोगावे लागले त्यांचा उच्चार १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत खानेसुमारीविरुद्ध असणारे लोक करीत असत. इराणच्या प्राचीन राज्यांत खंडणी ठरविण्याच्या कार्याकरितां प्रत्येक प्रांताची खानेसुमारी घेण्याची योजना अमलांत होती असें दिसतें. चीनमध्येंहि प्रांतवार करवसुलीच्या व सैन्यभरतीच्या कार्यांकरितां लोकसंख्येची व मालमत्तेची गणना करण्याची पद्धति पूर्वापार चालू होती. ईजिप्तमध्यें प्रत्येक मनुष्याचा धंदा नोंदून ठेवण्याची वहिवाट असे. त्याचा उद्देश अनीतीच्या मार्गांनीं उदरंभरण करणा-यानां आळा घालून सार्वजनिक नीतिमत्ता सुधारावी असा होता. आणि हीच पद्धति पुढें सोलननें आपल्या राज्यपद्धतींत समाविष्ट केली असें हिरोडोटसचें म्हणणें आहे. तथापि पुढें उपर्युक्त उद्देश मागें पडून मतदारांची नोंद करणें हा खानेसुमारीचा उद्देश बनला.

प्राचीन रोममध्यें खानेसुमारी करण्याची व्यवस्थित पद्धति प्रथम सुरू झाली. अगदीं पहिली खानेसुमारी प्राचीन रोंमन राजा सर्व्हियस टयुलियस यानें केली आणि त्यानें केलेल्या एका कायद्यावरून असें दिसतें कीं, सर्व लोकांची त्यांच्या मालमत्तेसुध्दां-जमीन, गुरेंढोरें, गुलाम व इतर नोकर यांसुध्दां-खानेसुमारी दर पांच वर्षांनीं करावी असा नियम त्यानें घातला. पुढें पुढें या खानेसुमारीला कर वसुलींचे साधन इतकेंच आर्थिक स्वरूप आलें. आगस्टस बादशहाच्या वेळेपासून खानेसुमारी सर्व साम्राज्याची होऊं लागली. सेंट ल्यूकच्या गॉस्पेलमध्यें तर असे शब्द आहेत कीं, त्यानें (आगस्टसनें) ''सर्व पृथ्वीवरील मनुष्यमात्रांवर कर बसवावा व त्याकरतां सर्वांची खानेसुमारी करावी'' असा हुकूम सोडला होता. एवढें अवाढव्य गणनचें काम पार पाडण्याच्या कार्यांत मरेपर्यंत तो बादशहा व्यग्र झालेला होता, परंतु तें कार्य त्याच्या हातून पुरें झालें नाहीं. त्यानंतरच्या मध्ययुगांत इंग्लंडमध्यें पहिल्या वुइल्यमचें डूम्स डे बुक व शार्लमेनचें ब्रेव्हियरी हीं नोंदबुकें तयार झाली. तीं रोमन खानेसुमारीच्या पद्धतीवरच हुबेहुब होती.

आ धु नि क प द्ध ति.- खानेसुमारीच्या प्रचलित पद्धतीचा  पाया यूरोपांत १७व्या शताकच्या उत्तरार्धात घातला गेला. या कामांत पुढाकार स्वीडननें घेतला. त्याकरतां पॅरिसमध्यें (खेडयांत) क्लर्जी (पुरोहित) लोकांनी जन्म, मृत्यु व विवाह यांची नोंद करून ठेविली पाहिजे असा सक्त नियम करण्यांत आला. पुढें याच नोंदबुकांत खेडयाच्या हद्दींतील सर्वच रहिवाशांची नोंद करून ठेवावी असा कायदा करण्यांत आला. फ्रान्समध्यें कोलबेरनें १६७० त पॅरिसमध्यें जन्ममृत्यूची नोंद करून ती माहिती ठराविक मुदतीनें प्रसिद्ध करण्याची फार वर्षें चालू असलेली पद्धति गांवोगांवी सुरू केली. या सालच्या पूर्वींच पांच वर्षे नियतकालिक कुटुंब व लोक गणनेची पद्धति न्यू फ्रान्स नामक वसाहतींत सुरू करण्यांत आली होती. क्किबेकमध्यें १६६५ पासून ती सुरू झाली. याप्रमाणें आधुनिक खानेसुमारीची पद्धति अस्त्विांत आली.

खानेसुमारीच्या वेळीं कोणकोणत्या बाबीसंबंधीची माहिती पुष्कळशी बिनचुकपणानें मिळवितां येईल व अशा माहितीची प्रांतवारीनें परस्पर तुलना करतां यावी म्हणून ती कोणत्या स्वरूपांत नोंदून ठेवावी, या दोन मुद्यांसंबंधानें आंकडेशास्त्रांतील पंडितांत १८७२ पासून बरीच भवति न भवति झालेली आहे. यांपैकीं पहिल्या मुद्यासंबंधानें असें ठरलें आहे कीं, कुटुंबातील प्रमुखांवर या बाबतींत भिस्त नं ठेवतां जर सरकारनें लायक अधिकारी नेमून माहिती मिळविली तर पुष्कळ प्रकारची माहिती मिळविणें शक्य आहें. हें ध्येय साधण्याकरितां प्रत्येक खानेसुमारीच्या वेळीं अधिकाधिक दक्षता ठेवण्याचे प्रयत्न अलीकडे करण्यांत येत आहेत. राष्ट्राराष्ट्रांची व देशादेशांची तुलना करण्याच्या दृष्टीनें वय, स्त्रीपुरुषभेद, सांपत्तिक स्थिति, जन्मठिकाण, शारीरिक व्यंगें, धंदा इतक्या गोष्टींचा खानेसुमारीच्या माहितीपत्रकांत समावेश करणें जरूर आहे. याच नमुन्यावर जर्मनी फ्रान्स, बेल्जम, कानडा व युनायटेड स्टेट्समध्यें खानेसुमारी करण्यांत येत असते. धार्मिक पंथ किंवा संप्रदाय कोणता हें कलमहि घालण्याची कित्येक देशांत जरूरी असते. तसेंच राष्ट्रजाति किंवा मातृभाषा कोणती हें कलम पुष्कळ ठिकाणीं घालतात. याप्रमाणें बहुतेक मुद्यासंबंधानें हल्लीं सर्वत्र एकवाक्यता झालेली आहे.

ग्रे ट ब्रि ट व आ य र्लं ड.- १९ व्या शतकापर्यंत येथील लो. सं. किती याबद्दल केवळ अंदाजी माहिती असे. १७५३ मध्यें लोकसंख्येची वार्षिक गणना करावी अशाबद्दल एक सूचना कामन्ससभेंत मांडली गेली होती, परंतु 'यानें इंग्रज रयतेंचे उरलेंसुरलें तेंहि सर्व स्वातंत्र्य जाईल' तसेंच या गणतीमुळें 'कांहीं तरी मोठें अरिष्ट किंवा रोगाची सांथ खास उद्भवेल.' असले आक्षेप घेऊन कित्येक सभासदांनी सदर्हू सूचनेला जोराचा विरोध केला. तथापि कामन्ससभेनें सूचना मंजूर केली पण लॉर्डांच्या सभेंत ती साफ फेंटाळून लावण्यांत आली. या सूचनेला महत्वाचा आक्षेप असा होता कीं, असल्या गणतीमुळें इंग्लंडजवळ युध्दोपयोगी मनुष्यबळ किती आहे हें शत्रूंनां कळेल. पुढें लवकरच माल्थसचे लोकसंख्ये संबंधाचे निबंध प्रसिद्ध होऊन लोकसंख्या व अन्नाचा पुरवठा यांचे परस्पर प्रमाण काय आहे तें मधून मधून नक्की समजणें जरूर आहे असें मत लोकांत उत्पन्न झालें. आणि १८०० मध्यें खानेसुमारीसंबंधानें एक सूचना पार्लमेंटांत येऊन ती बिलकुल विरोध न होतां पास झाली. त्याअन्वयें ग्रेटब्रिटनची खानेसुमारी पुढील सालच्या मार्च महिन्यांत करण्यांत आली. त्या कामाकरितां इंग्लंडांत जस्टिसेस ऑफ पीस, कान्सटेबल्स व स्कॉटलंडांत शाळामास्तर, शेरीफ यांची मदत घेण्यांत आली होती. शिवाय प्रत्येक खेडया (पॅरिस) मधील जन्म, मृत्यु व विवाह यांचे आंकडे उपाध्यायानीं (क्लर्जींनीं) पार्लमेंटकडे पाठवावे असें ठरलें. पुढें १८११, १८२१, १८३१, १८४१ याप्रमाणें दहा दहा वर्षांनीं खानेसुमारीचें काम करण्यांत येऊन प्रत्येक वेळीं माहितीच्या सदरांत कामाच्या पद्धतींत आणि बिनचुकपणांत सुधारणा होत गेली. १८५१ ची खानेसुमारी सर्व बाजूंनीं व्यवस्थित होऊन तीच व्यवस्था अद्याप चालू आहे. १८७१ मध्यें मेंदू बिघडलेल्या पण वेडयाच्या इस्पितळांत नसलेल्या लोकांच्या नांवांची स्वतंत्रपणें नोंद करण्यांत आली. इ. स १८९१ मध्यें वडिलोपार्जित इस्टेटीवर निर्वाह करून निरुद्योगी रहाणा-या लोकांची स्वतंत्र नोंद केली गेली. याप्रमाणें प्रत्येक वेळीं एखाददुसरी माहिती स्वतंत्रपणें नोंदविण्याची सुधारणा होत असते. स्कॉटलंडमध्यें खानेसुमारी इंग्लंडबरोबरच व त्याच पद्धतीवर होत आलेली आहे. एखादे वेळीं एकाददुसरें सदर अधिक दाखल करण्यांत येतें. उदा. १८६१ मध्यें एक किंवा एकाहून अधिक खिडक्या असलेल्या खोल्या किती आहेत याची नोंद करविण्यांत आली व त्यावरून मनुष्यवस्तीस योग्य अशी जागा किती व दर खोलीस माणसांचे प्रमाण किती वगैरे सरासरी ठरविली गेली.

आयर्लंडमध्यें १६७२ त व नंतर १७१२ मध्यें शिरगणति करण्यांत आली पण तिचा मुख्य उद्देश शेगडी-पट्टी (हार्थमनी) जमा करण्याला मदत हा होता. खरा व्यवस्थित प्रयत्न १८११ व १८२१ मध्यें करण्यांत आला पण काम नीट झालें नाहीं. १८३१ मध्यें गणतीदारांनां नोंदीच्या संख्येच्या मानानें मेहेनताना देण्याचा नियम केल्यामुळें आंकडेवाढ लबाडीनें दाखविण्यांत आली. यामुळें तीन वर्षांनीं पुन्हां गणति व दुबार खर्च करावा लागला. १८४१ तील खानेसुमारी मात्र नीट व्यवस्थितपणें पार पडली. तेव्हांपासून इंग्लंडपेक्षांहि अधिक सदरें घालून विस्तृत माहिती मिळविण्यांत येत असावी. धार्मिक पंथ, शिक्षणमर्यादा, वसतिस्थानाचा तपशील वगैरे अधिक सदरें ऐरिश नोंदबुकांत असतात.

ब्रि टि श व सा ह ती व ब्रि ट न शा सि त दे श.- ब्रिटिश साम्राज्याच्या सर्व विभागांत एकाच वेळीं एकाच पद्धतीवर खानेसुमारी व्हावी अशी पुष्कळांची इच्छा आहे. परंतु त्या कामीं अडचणी फार येतात. उदा. वेळसंबंधानें पाहतां ब्रिटिशसाम्राज्य भूपृष्ठावरील सर्व भागांत असल्यामुळें इंग्लंड, कानडा, आस्ट्रेलिया व आकिा येथें एकाच वेळीं सारखे ॠतु व हवामान नसतें. त्यामुळें इंग्लंडात खानेसुमारीला सोयीची जी तारीख ती उष्णकटिबंधांतील किंवा दक्षिण गोलार्धांतील साम्राज्यविभागांत गैरसोयीची ठरते. शिवाय राज्यकारभारपद्धति प्रत्येक विभागांत निरनिराळी असल्यामुळें नोंदणीबुकांतील सदरेंहि थोडीफार बदलावीं लागतात. तथापि १९०५ मध्यें स्त्रीपुरुषभेद, वय, सांपत्तिक स्थिति, जन्मठिकाण, धंदा व शक्य तेथें शिक्षण, धार्मिक पंथ व शारीरिक व्यंग इतकीं सदरें भरून सर्व साम्राज्यविभागाची माहिती प्रसिद्ध करण्यांत आली.

का न डा.- या भागांत पहिली खानेसुमारी १६६५ त झाली होती. त्यावेळीं कुटुंबावर नोंद करून कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीबद्दल लिंगभेद, वय सांपत्तिक स्थिति व धंदा यांबद्दल माहिती घेतलेली होती. पुढें ब्रिटिश सत्तेखालीं कानडा आल्यावर १७६५ व १७८४ मध्यें खानेसुमारी करण्यांत आली. १८२४ ते १८४२ पर्यंत दरसाल गणना करण्यांत येत असे. १८७१ त संयुक्त कानडयाची पहिली खानेसुमारी झाली. व तेव्हांपासून दशवार्षिक गणना चालू आहे. कोष्टकांचा नमुना युनायटेड स्टेटसच्या पद्धतीवर व विशेष तपशील वार असतो. व प्रत्येक गृहस्थाला ५६१ प्रश्नांची उत्तरें द्यावीं लागतात. ही माहिती भरून देण्याचें काम घरवाल्यावर न सोंपवतां स्वतंत्र नोंदणीदारांकडून करविण्यांत येतें. येथें अंतर्गमन नेहमीं चालू असल्यामुळें खानेसुमारीच्या वेळीं प्रत्येक व्यक्तीची आई व बाप यांचें जन्मठिकाण, राष्ट्रजाति व अंतर्गमनाची तारीख, सन वगैरे नमूद करण्यांत येत असते.

आ स्ट्रे लि या.- येथें प्रथम मोठी वसाहत गुन्हेगारांचीच असल्यामुळें थोडयाशा स्वतंत्र वसाहतवाल्यांपुरती १७८८ पासून खानेसुमारी होऊ लागली. पण १८२० पर्यंत त्यांत पद्धति व बिनचूकपणा मुळीच नव्हता. १८२८ मध्यें प्रथम सर्व लोकांची व्यवस्थेशीर खानेसुमारी करण्यांत आली. १८४१ मध्यें न्यूझीलंड व टॅस्मानिया यांची पृथक् खानेसुमारी झाली. १९०१ पासून आस्ट्रेलियांतील प्रत्येक स्टेटची खानेसुमारी पृथकपणें होते.

द क्षि ण आ फ्रि का.- केप-ऑफ-गुड-होप व आसपासचा प्रदेश हस्तगत केल्यापासून 'नेदर्लंड्स ईस्ट इंडिया कंपनी' ही तेथील लोकसंख्या गुरेंढोरें व शेतीचें उत्पन्न यांची दरसाल गणती करत असे. १६८७ पासून पुढील शंभर वर्षांचे असले रिपोर्ट उपलब्ध आहेत. पुढें ब्रिटिशांनी ताबा घेतल्यावर तीच पद्धत चालू ठेवली. १८६५ पासून दशवार्षिक गणनापद्धति सुरू झाली. बोअर युद्धच्या गडबडीमुळें १९०१ ची खानेसुमारी १९०४ सालीं करण्यांत आली. माहितीपत्रकांतील सदरें ऑस्ट्रेलियांतील पद्धतीवर असतात. नाताळची खानेसुमारी १८९१ पासून स्वतंत्र होत असते. त्यांत प्रथम काफीर लोकांची गणती करतच नसत; पुढें करूं लागले. पण काफीर व हिंदी मजूर यांची गणती गो-या वसाहतवाल्यांपासून पृथक् व त्यांची माहिती थोडक्या सदरांत दिलेली असते. शिवाय इकडे अडाणी मजूरांची वस्तीच पुष्कळ असल्यामुळें खानेसुमारीच्या कामाला भरपूर माणसेंच मिळत नाही. म्हणून उत्तरर्‍होडेशिया, ब्रिटिश पूर्व आफ्रिका, नायगेरिया, गँबिया, सीरा लिऑन व लॅगॉस येथील खानेसुमारी १९०६ पर्यंत मुळींच करण्यांत आली नव्हती.

दि वे स्ट इं डी ज.- या द्वीपसमुदायांपैकी प्रत्येक पृथक् राजकीय विभागाची खानेसुमारी पृथक् होत असते. १८७१ पासून ती साधारणपणें एका ठराविक तारखेच्या सुमारास मात्र होते. माहितीचीं सदरें प्रत्येक विभागांत भिन्न असतात. काळेगोरे असा भेद क्वचित आहे. हिंदी मुदतबंदी, मजुरांची माहिती बरीच तपशीलवार जमवितात.

इ त र दे श.- करवसुलीच्या कामाकरितां म्हणून स्थानिक अधिकार्‍यांकडून देशांतील लोकांची गणति करण्याची पद्धति यूरोपखंडांत इ. स. १४ व्या शतकापासून अस्तित्वांत असल्याचा पुरावा आहे. उदा. फ्रान्समध्यें चूलपट्टी (हार्थ टॅक्स) निमित्त अशी गणती करीत असत. राज्यकारभारविषयक कामानिमित्त लोकगणना करीत असल्याचें उदाहरण यूरोप खंडाबाहेर दूर चीनदेशांत आढळतें. येथें शिरपट्टी वसूल करण्याकरितां म्हणून लोकांची गणति १७११ मध्यें केली; तेव्हां लोकसंख्या अवघी २८० लक्ष भरलीं. पुढें चाळीस वर्षांनी दुष्काळपीडित देश झाला. त्या वेळीं दुष्काळमदत देण्यास लायक अशा लोकांची मोजदाद करण्याकरितां गणति केली. आणि आश्चर्य असें कीं त्यावेळी लोकसंख्या १०३० लक्ष भरली. करवसुली इत्यादी राजकीय हेतूव्यतिरिक्त नियतकालिक लोकगणना करण्याची कल्पना प्रथम १६८६ मध्यें स्वीडन देशांत उद्भवली, तथापि तेथेंहि प्रथम खेडयाच्या उपाध्याया (पॅरिशच्या क्लर्जी) मार्फत जन्ममृत्यु नोंदीच्या स्वरूपांत गणति होत असे. तेथें स्वतंत्र अशी खानेसुमारी प्रथम १७४९ मध्यें झाली. पुढल्या सालीं स्वीडनचें अनुकरण फिनलंडनें केलें व त्यानंतर वीस वर्षांनीं नार्वेनें केले. १८ व्याच शतकांत दुस-या अनेक देशांनीं खानेसुमारी केली. यापैकीं स्पेन हा एक होता. पण येथें भरवंशलायक आंकडे १८८७ पर्यंत सुध्दां मिळत नसत. इटालींतील कांहीं लहान लहान संस्थानांत १७५० च्या सुमारापासून खानेसुमारी करीत असत. पुढें इटली स्वतंत्र होऊन सर्व इटलीचें एक राज्य बनल्यावर १८६१ पासून सर्व इटलीची खानेसुमारी होऊं लागली. आस्ट्रियांत १७५४ मध्यें पॅरिशच्या क्लर्जीकडून गणती करण्यांत आली. पुढें वीस वर्षांनीं हंगेरीच्या कांही भागांत करण्यांत आली. तथापि १८५७ पर्यंत व्यवस्थित खानेसुमारी आस्ट्रियाहंगेरींत होत नव्हती. सर्व साधारणपणें असें म्हणतां येईल की, १८२५ ते १८६० च्या दरम्यान युरोपांतील सर्व देशांत नियमित खानेसुमारी होण्यास सुरुवात झाली. सर्व जर्मन संस्थानचें एक साम्राज्य बनलें. त्या वेळेपासून पंचवार्षिक गणति तेथें होऊं लागली. खानेसुमारी सुरू करण्याच्या बाबतींत शेवटचा नंबर रशियाचा आहे. १७२१ पासून रशियांत सैन्यभरती, करवसुली किंवा पोलीसभरती वगैरे राजकीय कारणाकरितां लोकांची गणति नियमित कालावधीनें करण्यांत येत असें. १८९७ सालीं प्रथम सर्व देशांत खानेसुमारी करण्यांत आली. त्या वेळीं रशियाची लोकसंख्या हिंदुस्थानच्या खालोखाल आहे असें निदर्शनास आलें. चीनचा नंबर लोकसंख्येंत पहिला आहे, पण त्या वेळीं चीनची लोकसंख्या नक्की कळली नव्हती. हिंदुस्थानांतल्याप्रमाणें रशियांतहि भाषा अनेक असल्यामुळें खानेसुमारीचीं नोंदबुकें अनेक भाषांत छापावीं लागतात. याशिवाय बाकी राहिलेले तुर्की साम्राज्य, अफगाणिस्तान, इराण, चीन, इंडोचायना हे आशियांतील देश, ९/१० आफ्रिकेचा भाग आणि दक्षिण अमेरिकेचा बराचसा भग या प्रदेशांतील लोकसंख्या किती आहे हें अद्यापहि निश्चितपणें सांगण्याची सोय झालेली नाहीं.

यु ना य टे ड स्टे ट स्.- खानेसुमारीची अर्वाचीन पद्धति युनैटेट स्टेटस्मध्यें निघालीं असें म्हणावें लागतें. स्वीडन व नार्वें देशांत १७४९ पासून पॅरिशमधील क्लर्जीकडून सक्तीने जन्ममृत्यूची नोंद करवीत असत व नोंदबुकांतील माहिती खानेसुमारीच्या माहितीप्रमाणें विश्वसनीय असे. तथापि १८१५ पर्यंत नार्वेमध्यें ख-या स्वरूपाची खानेसुमारी झाली नव्हती. नार्वे, स्वीडन व युनायटेड स्टेटस् या तीन देशांपैकीं खानेसुमारीचा आद्यप्रवर्तक कोण असा प्रश्न आहे. युनायटेड स्टेटस् मध्यें १७९० त पहिली खानेसुमारी करण्यांत आली हें निश्चित असल्यामुळें अग्रमान या देशालाच देणें भाग आहे. खानेसुमारीचा प्रश्न निश्चित स्वरूपांत या वेळी युनायटेड स्टटेसमध्यें उपस्थित होण्याचें कारण असें कीं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लवकरच त्या देशांची राज्यघटना निश्चित करण्याच्या वेळीं कायदेमंडळांतील प्रतिनिधींच्या संख्येंसंबंधानें प्रश्न निघाला. लोकसंख्येच्या मानानें प्रतिनिधी असावे असें मोठाल्या संस्थानांचें म्हणणें पडलें. त्याला छोटया संस्थानांनीं विरोध केला. तेव्हां तडजोड अशी झालीं कीं, कांग्रेसचे दोन भाग असावे व त्यांच्या पैकीं प्रतिनिधिसभेचे सभासद लोकसंख्येच्या मानानें पाठविण्याचा हक्क संस्थानांना असावा असा ठराव झाल्यामुळें अर्थातच लोकगणना करणें जरूर झालें. यामुळें १७९० मध्यें पहिली खानेसुमारी करण्यांत आली. त्या वेळीं गुलाम व स्वतंत्र असे लोकांचे दोन मुख्य वर्ग पाडून नंतर स्वतंत्र लोकांचे गोरे व इतर असे भेद, नंतर स्वतंत्र गो-या लोकांत स्त्री-पुरुष, आणि स्वतंत्र गो-या पुरुषांमध्यें सोळा वर्षांच्यावरचे व आंतले असे वर्गीकरण करण्यांत आलें. १८०० च्या खानेसुमारींत वयोमानानुसार स्त्री व पुरुष यांचे पांच वंर्ग मांडण्यांत आले. १८१० च्या गणतीमध्यें कला व उद्योगधंदे यांच्यासंबंधानें सविस्तर माहिती नोंदण्यांत आली. १८२० मध्यें शेतकी, उद्योगधंदे व व्यापार अशा सदराखालीं पृथक् नोंद करण्यांत आली. १८३० मध्यें परके लोक, बहिरे, मुके व आधळें यांची पृथक् नोंद झाली. १८५० च्या खानेसुमारीकरितां कायद्यानें एक स्वतंत्र सेंन्ससबोर्ड स्थापण्यांत आलें. १८५० सालची खानेसुमारी फार विस्तृत प्रमाणावर झाली. या वेळींस पृथक् तक्ते करून एका तक्त्यांत स्वतंत्र रहिवाशी, दुसर्‍यांत गुलाम, तिसर्‍यांत गतसालचे मृत्यू, चवथ्यांत शेतकी, पांचव्यांत औद्योगिक कारखाने व सहाव्यांत सामाजिक गोष्टीसंबंधानें आंकडे अशी माहिती जमविण्यांत आली. १८६० ची खानेसुमारी पूर्णपणें मागील नमुन्यावर झाली. १८७० ची खानेसुमारी गुलामांच्या स्वातंत्र्यनिमित्त झालेल्या युद्धनंतर झाली पण ती बरीच सदोष झाली. १० व्या खानेसुमारीच्या वेळीं खानेसुमारीच्या कांयद्याची दुरुस्ती करण्यांत आली व स्वतंत्र सेन्सस ऑफिस उघडण्यांत आलें. यावेळेची एकंदर सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यास वीस पुस्तकें लागलीं. हा सेन्सस रिपोर्ट म्हणजे एक मोठा ज्ञानकोशच झाला. पुढील खानेसुमा-या याच नमुन्यावर होत गेल्या. तथापि १८९० ची गणती चुकीची झालीं असा प्रथम फार गवगवा झाला. कारण त्या गणतींत लोकसंख्या अनुमानाच्या मानानें फार कमी भरली. १८८०, १८६०, १८५० वगैरे मागील आठदहा खानेसुमार्‍यांत लोकसंख्या दर वेळीं शेंकडा २५ ते ३० पर्यंत वाढत असल्याचें सिद्ध झालें होतें, आणि १८९० सालीं ही वाढ फारच अल्प झाल्याचें खानेसुमारींत दिसून आलें, आणि वाढ मागील प्रमाणाच्या मानानें न होण्याची काहीं विशिष्ट कारणेंहि सेन्ससच्या अधिकार्‍यांनां दाखवितां आली नाहींत. अर्थांत गणतींत चुका झाल्या अशी ओरड झाली. सदरहू रिपोर्टांत दहा वर्षांखालील मुलांचा आंकडा स्वतंत्र दिलेला असल्यामुळें व हा आंकडा मागच्यामानानें फार कमी भरल्यानें १८८० ते १८९० च्या दहा वर्षांत जन्म फार कमी झाले व त्यामुळें लोकसंख्यामागील मानाप्रमाणें वाढली नाहीं असें ठरलें. १९०० च्या खानेसुमारींतहि लोकसंख्येंत फारशी वाढ झाल्याचें आढळलें नाहीं. तेव्हा गणती चुकली हा आक्षेप फोल ठरला व वाढ मागील प्रमाणांत न होण्याचीं कारणें निराळींच असली पाहिजेत असें निश्चित झालें.

युनायटेड स्टेटस्मध्यें लोकसंख्येनुसार प्रतिनिध पाठवावे असा कायदा असल्यामुळें लोकसंख्येचे आंकडे मुद्दाम वाढवून सांगितले जाण्याचा संभव होता; तो टाळण्याकरितां प्रत्यक्ष करांचा बोजा लोकसंख्येनुसार बसविण्याचें कांग्रेसनें त्याच वेळीं ठरविलें. या दोन परस्परविरुद्ध अशा हितसंबंधांमुळे लोकांची वृत्ति समतोल राहून लोकसंख्या कमीअधिक न होतां बरोबर नोंदली जाईल अशी योजना करण्यांत आली होती. सेन्ससचें स्वतंत्र ऑफिस व तज्ज्ञ अधिकारी नेमून खानेसुमारीचें काम बिनचूक व निर्दोंष होण्याबद्दल पूर्ण खबरदारी घेण्यांत येऊं लागली.

खानेसुमारीच्या वेळीं जमविलेल्या विविध व विस्तृत माहितीची संकलित मांडणी वीस पंचवीस पुस्तकांत करण्याच्या एकंदर कामाला कालावधि बराच लागू लागल्यामुळें एकंदर कामाचे मुख्य व दुय्यम असे भाग करण्यांत आले व मुख्य माहिती ताबडतोब प्रसिद्ध करून दुय्यम माहिती दहा वर्षांत प्रसिद्ध व्हावी असें ठरलें. दुय्यम भागांतील माहिती सदोष व चुकीची असण्याचा फार संभव असतो. उदा० शेतकीविषयक माहितींत मुख्य मुख्य पिकें शेतात किती पिकतील व त्यांची किंमत काय येईल हें पुष्कळशा शेतकर्‍यांना बिनचुक सांगतां येणें शक्य नसतें. कारखान्यासंबंधानें माहितीहि चुकीची असण्याचा संभव फार असतो. कारण अशी माहिती लोकांत जाहीर प्रसिद्ध झाल्यानें इतरांनां चढाओढ करण्यास सोईचें होईल अशा भीतीमुळें तसेच हिशोब ठेवण्याची पद्धति सर्व कंपन्या व कारखानदार यांची एकच नसल्यामुळें बरोबर माहिती मिळत नाही. सेन्सस-कामगारांच्या मार्गांत या अडचणी आहेत. तथापि उत्तरोत्तर बिनचूक माहिती मिळविण्याची खटपट चालू आहे. आणि अनेक महत्वाच्या बाबतींत आंकडेवर माहिती पुष्कळ देशांत मुळींच उपलब्ध नसते त्या मानानें पाहतां अमेरिकेला असल्या ठोकळ आंकडयांनीहि पुष्कळ व्यावहारिक उपयोग करून घेतां आला आहे.

खानेसुमारीच्या कामांत आंकडयांचे तक्ते भरणें व ते तपासून पाहणें हीं कामें फार त्रासदायक व फार वेळ खाणारीं असतात; ही कामें विद्युतयंत्राच्या साहाय्यानें सुलभ रीतीनें करण्याची युक्ति अमेरिकेनें काढून सेन्ससच्या कामांत मोठी सुधारणा केली आहे. या युक्तिनें विद्युतप्रवाहाच्या साहाय्यानें आंकडे ताबडतोब तपासून पाहतां येतात व फार वेळ वांचतो. युनायटेड स्टेटस्मधील खानेसुमारीसंबंधानें दुसरी महत्वाची गोष्ट ही कीं, सदरहु कामाला खर्च इतर देशांच्या मानानें फार अधिक लागतो व हा खर्चाचा आंकडा १७९० मध्यें ४४,३७७ डॉलर होता तो १९०० मध्यें १,६१,१६,९३० डॉलरवर गेला. इंग्लंडमध्यें १९०० च्या खानेसुमारीबाबत माणशी खर्च २.२४ सेंट व युनायटेड स्टेटस्मध्यें २१.१६ सेंट आला. म्हणजे इंग्लंडचा खर्च अमेरिकेच्या खर्चाच्या अजमासें एकदशांश पडला. या खर्चाचें मुख्य कारण असें की, युनायटेड स्टेट्स मधील गणति पगारी नोकरांकडून करवितात तर इंग्लंडमध्यें बहुतेक काम कुटुंबांतील प्रमुख माणसाकडून बिन मोबदल्यानें करून घेतात. शिवाय युनायटेड स्टेट्समध्यें सेन्सस ऑफीस कायमचें असून त्यामार्फत अनेक प्रकारचीं माहितीपुस्तकें सरकार प्रसिद्ध करवितें. सरकी काढण्याच्या गिरण्या, त्यांतील मजुरांची संख्या व मजुरीचे दर यांची माहिती देणारे रिपोर्ट त्या त्या हंगामांत या आफीसकडून प्रसिद्ध होतात. रस्त्यांतील व विजेच्या आगगाडया, धातूच्या व दगडांच्या खाणी, विजेच्या शक्तीनें व उष्णतेनें तयार होणारी झाडें व वनस्पती, धर्मार्थ संस्था, वेडयांची व भिकार्‍यांची संख्या वगैरे अनेक प्रकारची माहिती याच आफीसकडून प्रसिद्ध होत असते. अलीकडे कांग्रेसनें आणखीहि कित्येक आंकडेविषयक माहिती प्रसिद्ध करण्याचें काम या आफीसकडे सोंपविलें आहे. तात्पर्य, बर्लिनमध्यें सर्व जर्मन साम्राज्यसंबंधीं आंकडेविषयक माहिती पुरविणारें जसें आफीस आहे तशाच प्रकारचें हें सेन्सस आफीस आहे.

सी लो न.- एकाच वेळीं सीलोनंत व हिंदुस्थानांत खानेसुमारी होत असते, कारण या दोन देशांत लोकांची परस्पर जा ये सारखी चालू असते. सीलोनमध्यें कोष्टकांत जात या सदराऐवजीं वंश सदर असतें. शिवाय १९०१ पर्यंत सीलोनांत स्वतंत्र गणतीदारांकडून गणती न करवितां ग्रेटब्रिटनमधील पद्धतीप्रमाणें ठरलेल्या तारखेच्या पूर्वीं तक्ते घरोघर वाटून कुटुंबांतल्या प्रमुख माणसांकडून ते भरवून घेत असत. हल्लीं स्वतंत्र गणतीदारांकडून तक्ते तयार करविले जातात.

हिं दु स्था न.- एका वेळीं व एकाच प्रकारच्या पद्धतीनें गणती केली जाणारा सर्वांत अत्यंत मोठा लोकसमुदाय हिंदुस्थानांतला होय. ब्रिटिश साम्राज्यांतील एकंदर लोकसंख्येपैकीं ३/४ लोकसंख्या हिंदुस्थानांत आहे. आणिं पृथ्वीच्या पाठीवरील एकंदर लोकसंख्येचा १/५ एकटया हिंदुस्थानांत आहे. १८५३ आणि १८८१ यांच्या दरम्यान प्रत्येक प्रांतांत पृथक् खानेसुमारीचें काम करण्यांत येत असे. १८८१ मध्यें वरिष्ठ सरकारमार्फत खानेसुमारीचें काम करण्यांत आलें व तीच पद्धति तेव्हांपासून चालू आहे. दर खानेसुमारीच्या वेळीं नवा नवा प्रदेश समाविष्ट होत असतो. तसेंच रानटी व मागासलेल्या जातीमध्यें गणतीचे तक्ते विशेष तपशीलवार होऊं लागले आहेत. काम करणारीं माणसेंहि अधिकाधिक वाकबगार मिळूं लागलीं असून काम अलीकडे बरेंच चोख होऊं लागलें आहे. हिंदुस्थानांत ज्यांनां  लिहितां वाचतां येतें अस कुटुंबी शेंकडा ५ हून अधिक सापडत नाहींत, आणि खानेसुमारीचा तक्ता सर्व नीट भरून देता येईल असे इसम त्याहूनहि कमी आहेत. यामुळें सुशिक्षित असलेल्या अत्यंत अल्प वर्गांतून या कार्याला लागणारे इसम मिळवावे लागतात. उपलब्ध होणा-या थोडक्या गणतीदारांकडून एका रात्रींत सर्व नोंद होणें शक्य नसल्यामुळें कामाचे दोन भाग पाडतात. ठरलेल्या रात्रीच्या पूर्वीं थोडे दिवस सर्व तक्ते कच्चे भरून घेतात आणि ठराविक रात्री पुन्हां प्रत्येक घरीं जाऊन त्यांत कमजास्त करून तक्ता पुरा करतात. प्रत्येक गणतीदाराकडे अजमासें ३०० इसमांची नोंद करण्याचें काम येतें. याप्रमाणें १९०१ च्या खानेसुमारींत जवळ जवळ ९० लाख गणतीदार लागले होते. शिवाय गणतीदारांच्या मदतीला, त्यांच्यांवर देखरेखीला, सर्व तक्ते गोळा करून खानेसुमारीच्या स्थानिक कचेरीकडे रवाना करण्याला आणखी एक लाखांपर्यंत माणसें लागतात. तथापि येवढे इसम हल्लीं मिळूं शकतात. या कार्याला सरकारी आफिसें, म्युनिसिपालिटया, शाळा, कालेजें वगैरे संस्थांतील नोकरांची मदत होते. शिवाय विद्यार्थी व सुशिक्षित यांची स्वखुषीनें फुकट मदत मिळते. खानेसुमारीच्या तक्तयांत स्त्रीपुरुष, वय सांपत्तिक स्थिति, जन्म ठिकाण, धंदा शरीरव्यंग, मातृभाषा, धर्म व धार्मिक ग्रंथ, जात व पोटजात इतकीं सदरें असतात. हे तक्ते निरनिराळया वीस भाषांत छापविलेले असतात.

खानेसुमारीची तारीख चांदणी रात्र असेल, धार्मिक उत्सव, जत्रा, यात्रा वगैरे गोष्टी नसतील असें पाहून नेमावी लागते. खानेसुमारीच्या कामाच्या नियमांचे स्वतंत्र पुस्तक छापून वांटण्यांत येतें. तरी गणतीदाराच्या प्रत्यक्ष कामांत चमत्कारिक अडचणी येतातच. गणतीच्या रात्री बहिरेमुके व वेडे इसम भटकतांनां आढळल्यास त्याच्यांजवळून तक्त्यांतील सर्व माहिती कशी विचारून घेणार? दुसरी अडचण ही कीं कित्येक प्रांतांत मौनव्रत धारण केलेले कित्येक संन्यासी असतात त्यांचें व्रत कोण व कसें मोडणार? दुसरी अडचण ही कीं कित्येक प्रांतांत मौनव्रत धारण केलेले कित्येक संन्यासी असतात त्यांचे व्रत कोण व कसें मोडणार? भिल्ल वगैरे रानटी जातींचे लोक गणती करणा-या इसमास घरांत येऊनच देत नसत. दुष्काळांत मदत मिळेल वगैरे फायदे दाखवून त्यांची गणिती करण्यास संमति मिळवावी लागते. इतर अडचणी म्हटल्या म्हणजे आगगाडयांतील प्रवासी, कित्येक दिवस बंदरास न लागणा-या बोटींतून प्रवास करणारे लोक किंवा झाडें तोडण्याकरितां कित्येक दिवस जंगलांतून जाऊन राहणारे लांकूडतोडे वगैरे लोकांची ठराविक रात्रीं गणति कशी करावयाची? या सर्व अडचणींवर सेन्सस अधिकार्‍यांनीं उपाय काढलेले आहेत. उदाहरणार्थ, खानेसुमारीच्या दिवशीं संध्याकाळीं ७ वाजल्यानंतरच्या सर्व गाडया स्टेशनावर थांबवून तेथें गणति करण्याची व्यवस्था करतात.

गणतीच्या कामाकरितां ३० ते ५० घरांचा एक गट करून त्या ब्लॉकच्या गणतीकरितां एक गणतीदार नेमतात. असे १० ते १५ गट मिळून एक सर्कल बनवितात. त्यांत सुमारें ५०० घरें असून त्यांवर सुपरव्हायझर नेमतात. तालुक्यांतील किंवा तहशीलींतील सर्व सर्कलांवर अधिकारी चार्ज सुपरिटेंडेंट म्हणून असतो. गणतीच्या दुस-या दिवशीं गणतीदार फक्त लोकसंख्येचा आंकडा सुपरव्हायझरला ताबडतोब कळवितात. सुपव्हायझर सगळे आंकडे बेरीज करून चार्ज सुपरिटेंडेंटकडे व ते तशीच बेरीज करून जिल्हाधिकार्‍यांकडे कळवितात. जिल्ह्यांतील सर्व आंकडयांची बेरीज करून ती एकूण संख्या तारेनें प्रॉव्हिन्शियल सुपरिटेंडेंट व सर्व हिंदुस्थानचा कमिशनर याजकडे कळवितात. याप्रमाणें आठ दहा दिवसांत सर्व हिंदुस्थानांतील आंकडे एकत्र होऊन गणतीच्या दिवसापासून पंधरा दिवसांत लोकसंख्येचे आंकडे लोकांच्या माहितीकरितां प्रसिद्ध केले जातात. इतक्या जलदीनें काम होऊनहि शिवाय .०३ इतक्या अल्प प्रमाणांत म्हणजे २९,४२,६६,७०१ या लोकसंख्येच्या एकूण आकडयांत ९४,३५५ इतकीच चूक १९०१ सालीं सांपडली होती. हें पहिलें काम झाल्यावर प्रत्येक प्रांतांत स्त्री-पुरुष, विवाह, वय, शिक्षण वगैरे प्रत्येक सदराचे आंकडे एकत्र करून त्यांचे स्वतंत्र तक्ते तयार करणें व प्रत्येक सदरासंबंधीनें चर्चात्मक माहिती लिहून सर्व रिपोर्ट तयार करण्याचें काम प्रांतोप्रांताचे सुपरिंटेंडेंट करतात. निरनिराळया सदरानुसार तक्ते तयार करण्यांत १९०१ पूर्वीं एक जुनी 'टिक' पद्धति म्हणून प्रचलित होती. ती फार भानगडीची असल्यामुळें चुका होण्याचा संभव फार असून कालाविधीहि फार लागत असल्यामुळें १९०१ च्या खानेसुमारीच्या वेळीं एच. एच. रिस्ले सेन्सस कमिशनरः यांनी 'स्लिप' (चिठ्ठी) पद्धति सुरू केली. या स्लिप्स (चिठ्ठया) धर्म दर्शविण्याकरितां निरनिराळया रंगांच्या घेऊन स्त्रीपुरुषभेद व सांपत्तिक स्थिति (सिव्हिल कंडिशन) दर्शविण्याकरितां विवक्षित चिन्हें केलीं असतात. यामुळें ही माहिती लिहावी लागत नाहीं. शिवाय इतर माहितीकरितां संक्षेप उपयोगांत आणतात. यामुळें एक मनुष्य एका दिवसांत ५०० स्लिप्स लिहून तयार करूं शकतो. स्लिप्सवरील माहिती तपासूनहि लवकर पहातां येतें. यामुळें काम लवकर व बिनचूक होतें. आंकडे तपासण्याकरितां हॉलेरिथ यंत्र वगैरे अमेरिकेंतील साधनें येथें वापरीत नाहींत. कारण हलक्या स्वरूपाचें कारकुनी काम करण्याला हिंदुस्थानांत थोडक्या पगारावर भरपूर लोक मिळतात. उलटपक्षी तज्ज्ञ लोक अल्प असल्यामुळें 'स्लिप्स' पद्धतीनेंच काम थोडक्या  खर्चांत व बरेचसें बिनचूक होतें. इ. स. १९११ सालच्या खानेसुमारीला हिंदुस्थान सरकारला २०.३ लाख रुपये (१,३५,००० पौंड) खर्च आला. म्हणजे माणशीं प्रमाण सरासरी हजारास पांच सहा रुपये पडतें. हिंदुस्थानच्या खानेसुमारींत ब्रिटिश बलुचिस्तान, वायव्य सरहद्दीवरील प्रांत, ब्रिटिश ब्रह्मदेश, अंदमान निकोबार बेटें, सर्व देशी संस्थानें यांचाहि समावेश होतो.

१९०१ सालच्या रिपोर्टांत धर्मानुसार व मानवजाति वर्णनशास्त्रानुसार फार बारकाईनें माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंगाला, बिहार व ओरिया या प्रांतांसंबंधानें मिस्टर गेट यांचा रिपोर्ट, मिस्टर रसेल यांची मध्यप्रांतांतील जाती व रानटी लोकांसंबधींची चर्चा, मिस्टर एनथॉवेन यांची मुंबईतील विविध समाजाबद्दलची माहिती व मिस्टर रोज यांचा पंजाबांतील विविध धर्मप्रसार व पोटजातींतील मिश्रविवाह या संबंधाचा उहापोह फार वाचनीय झालेला आहे.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .