प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खळ- खळीच उपयोग कागद चिटकविण्याकडे, कपडयाला जिल्हई येण्याकरितां कपडयास लावण्याकडे व विणकामांत सूत ताण सहन करण्याइतकें मजबूत व्हावें म्हणून त्यास लावण्याकरितां करतात. मुख्यतः हा शेवटचाच उपयोग जास्त महत्वाचा आहे. सुतास खळ लावण्याच्या क्रियेस सायझिंग (खळ देणें) म्हणतात. कापड विणण्याच्या कामांत स्पिनिंग (कातणें), बाइंडिंग (गुंडाळणें), वॉरर्पिंग (ताणा लावणें) साइझिंग (खळ देणें), ड्राइंग (सुकविणें), वीव्हिंग (विणणें), फिनिशिंग (जिल्हई देणें), फोल्डिंग (घडया करणें) या ज्या मुख्य मुख्य क्रिया असतात त्यांतील साइझिंग अथवा खळ देण्याची क्रिया असतात त्यांतील साइझिंग अथवा खळ देण्याची क्रिया ही एक महत्वाची क्रिया आहे. म्हणून तिचें विस्तृत विवेचन पुढें दिलें आहे. बाकीच्या क्रियांचें वर्णन विणकाम या लेखांत येईल.

पां ज णं.- पांजण अथवा साइझिंग. कापड विणण्यास जें सूत लागतें त्याला खळ दिल्याशिवाय तें विणण्याच्या कामालायक मजबूत होऊं शकत नाहीं. या कारणासाठीं सुतास खळ देण्याच्या क्रियेस मूळ सुरुवात झाली. पूर्वीं सर्व कपडा हातानें विणला जात असते. तेव्हां हातमागावर विणणारांमध्यें पांजण करण्याची जी तर्‍हा होती व हल्लींहि प्रचारांत आहे. तिचें आर्धी वर्णन देऊन मग मिलमध्यें वाफेच्या शक्तीनें चालणा-या साइझिंग मशीनचें (पांजणीचें यंत्र) वर्णन करूं. हातानें विणणाराच्या कामास मिलपेक्षां कमी मजबूत सूत चालू शकतें. व त्यामुळें तें नेहमीं मिलमधील सुतापेक्षां कमी पिळाचें व कमी मजबुतीचें असतें. व त्यास खळहि पण थोडीशी दिली म्हणजे तें विणण्याच्या लायक होते. ही खळ अनेक तर्‍हेची करण्याची हिंदुस्थानांत निरनिराळया प्रांतांत निरनिराळी रीति आहे. कांहीं ठिकाणीं जमिनींत एक प्रकारचे कंद उगवतात, ते शिजवून त्यांची खळ करतात. परंतु जोंधळे, मका, तांदूळ व गहूं हीं धान्यें सामान्य उपयोगांत आहेत. यांपैकी कोणत्याहि धान्याच्या पिठाची खळ सर्वत्र करतात. ही चांगली पातळ करून फडक्यांतून गाळून घेतात. हातमागवाले आपला ताणा पसरून दोन्हीकडे तो ताणून धरतात. मग एक प्रकारच्या गवताच्या मुळया असतात. त्यांचा मोठा कुंचला (ब्रश) बांधलेला असतो. हा कुंचला खळींत बुडवितात व ताण्यावरून तो फिरवितात. ताणा चांगला ओला झाला म्हणजे मग तो वाळेपर्यंत नुसताच त्यावर कुंचला फिरवीत असतात. अर्धा हिस्सा वाळत आला म्हणजे सांधीच्या तळावर मधून मधून तारी सुटया करतात व मधून मधून कुंचला फिरवितात. अशा रीतीनें तारीहि सर्व सुटया होतात व कुंचलाहि फिरतो. कुंचला नेहमीं एकाच दिशेंत फिरवितात. त्याच्या योगें करून सुताच्या अंगावर असलेले सर्व तंतू त्याच्या अंगावर चिकटतात व ताण्याच्या सुतास एक प्रकारचा तुळतुळीतपणा व चकाकी येते. ब्रश मारीत असतां पाऊण हिस्सा ब्रश मारून झाला म्हणजे ब्रशाला थोडासा तेलाचा हात मारून मग ब्रश मारतात. त्यायोगें सुतें एकमेकांपासून लवकर सुटीं होतात. व चकाकीहि जास्त येते. कांही ठिकाणीं हातमागावर खादी वगैरेसारखें कापड विणतात, तेव्हां त्याचा ताणा रात्रभर कांजींत भिजवून ठेवतात. म्हणजे खळ सुताच्या पोटांत शिरते. व सकाळीं त्याला लांकडाच्या मोगरीनें बडवून मग तो ताणा पसरून कुंचल्यानें त्याला साफ करून वाळवून मग विणण्यास घेतात. यायोगें सुतांत थोडी कांजी जास्त शिरते. व खादीसारखें कापड जास्त भरदार दिसतें. हातमागवाले हें पांजणींचें काम बहुधा पहाटेस अगर संध्याकाळीं करतात. कारण ताणा लवकर न वाळून कुंचला जेवढा जास्त फिरेल तेवढा त्यांनां पाहिजे असतो. मिलमध्यें सुताच्या पोटांत कांजी भरण्याचें काम वाफ करते. व सूत सुकविण्याचें कामहि वाफच करते. त्यायोगेंकरून त्यांचें पांजणीचें यंत्र सारा दिवस चालू असतें. आतांपर्यंत हातानें पांजण करण्याची माहिती दिली. आता मिलमध्ये पांजण करितात त्याला साइझिंग म्हणतात, त्याकडे वळूं.

मिलमध्यें पांजणीचा विषय फारच महत्वाचा आहे. कारण मालकाचें सर्व नफानुकसानच त्यावर अवलंबून आहे. मिलचा बहुतेक कपडा वजनानें रतलाच्या भावावर विकण्याची वहिवाट आहे. त्यामुळें ज्या कापडांत सर्वांत जास्त खळ असेल तें कापड स्वस्त भावांत पडतें. उदाहरण- एक दहा रत्तल वजनाचा तागा आहे. तो एका मिलनें ८ रत्तल सूत व २ रत्तल कांजी घालून बनविला. एकानें ९ रत्तल सूत व १ रत्तल कांजी घालून बनविला तर कोणता तागा स्वस्त पडतो तें पाहूं. त्या कापडांत २० नंबर सूत लागतें असें हिशेबाला धरलें व त्याचा भाव ८ आ. रत्तल आहे असा धरला व कांजीचा भाव १ आ. रत्तल धरला तर पहिल्या कापडाची किंमत ४ रु. २ आ. झाली व दुस-याची ४ रु. ९ आ. झाली. यामुळें जो कारखानदार सुतावर जास्त खळ चढवून कापड काढील तो जास्त फायदा कमवूं लागेल. सुमारें ३५-४० वर्षांपूर्वीं मुंबईस जेव्हां नवीनच गिरण्यांची स्थापना झाली त्यावेळीं ताण्याच्या सुतावर २०-२२ टक्के कांजी चढविली म्हणजे बस होत असे. आतां मुंबईचें कांजीचें प्रमाण ४०-५० टक्के झालें आहे व सोलापूरकडे तर हेंच प्रमाण ६०-७५ पर्यंत गेलें आहे व अहमदाबादनें कमाल करून हें प्रमाण १०० पासून १५० पर्यंत नेलें आहे. व विलायतेंत क्वचित् कापडावर २०० टक्के कांजी चढवितात. कापड वापरते वेळीं तें धुवूनच वापरलें जातें व त्यामुळें धुतल्यानंतर कांजी सर्व निघूनच जावयाची. पण पहिल्यानें घेतांना कापड जाड दिसलें पाहिजे ही पुष्कळशा अडाणी लोकांची समजूत असते. व शिवाय कपडा स्वस्त मिळावा अशीहि लोकांची इच्छा असते. त्यामुळें जास्त खळ घालण्याचें प्रचारात आलें. नाहींतर मूळ जो उद्देश की कापड विणतां येईल इतकें सूत मजबूत व्हावें त्याला १० टक्यापासून २० टक्यापर्यंत खळ पुरेशी होते. पुष्कळ वेळां चांगलीं मनुष्यें कापडाची परीक्षा नसल्यामुळें बाहेरच्या स्वरूपावर जाऊन फसतात.

हें वर्णन कापड विणण्याच्या पूर्वीं सूतावर चढविण्याच्या खळीचें झालें. पण कापड विणल्यानंतरहि त्या कापडावर जास्त खळ चढवून त्याला जास्त जाड दिसेल असें करितात. या कृतीला फिनिशिंग असें म्हणतात. अशा रीतीनें फिनिश केलेला कपडाच कांहीं लोक पसंत करतात. हें त्याचें अज्ञानच होय. पण याला इलाज नाहीं. गिरणीवाल्यांनीं ही तर्‍हा आधीं सुरूं केली; व ती लोकानां पसंत पडली व ते तशाच तर्‍हेचा कपडा मागूं लागले. पुढें ती तर्‍हा रूढ झाली व इतरहि गिरणीवाल्यास तसें करणें भाग पडलें. वर्‍हाडांत ही तर्‍हा बरीच प्रचारांत आहे. धोतरजोडा हातांत घेतला असतां ताठ उभ राहिला पाहिजे, जाड दिसला पाहिजे, उचलून पाहिलें तर हाताला वजन लागलें पाहिजे व पुन्हां स्वस्त पाहिजे. अशा तर्‍हेचा माल वर्‍हाडांत पुष्कळ प्रचारांत आहे. असा माल खालच्या वर्गाच्या अशिक्षित लोकांत फार खपतो.

आतां आधी साइझिंगच्या यंत्राबद्दल थोडी माहिती सांगून मग कांजी तयार करण्याविषयीं माहिती सांगू. साइझिंगच्या यंत्राचे मुख्य तीन भाग केले जातात. एक भाग सिलेंडराच्या (पंचपात्राच्या) पुढचा, ज्याला 'हडेस्यक' असें म्हणतात. दुसरा भाग दोन्ही सिलेंडर्स मिळून व तिसरा भाग कांजीच्या टांकीचा. यापैकीं पहिल्या भागाचें वर्णन आधीं देऊं. पुढच्या भागाच्या मध्यावर एका शाफ्टिंग (लाट) वर एक कोन (शंक्वाकृति ढोल) बसविलेला असतो व याच शाफ्टिंगच्या एका तोंडावर सांचाला चालविणा-या पुल्या बसविलेल्या असतात. या पुल्या तीन असतात. बाहेरच्या बाजूस फास्ट (शीघ्रगति) पुली असते. ही शाफ्टिंगवर पक्की बसविलेली असते. व हिच्यावर पट्टा आला असतां साचा जोरानें चालूं लागतो. मध्यें एक कमी रुंदीची पुली असतें तिला स्लो मोशन (मंदगति) पुली म्हणतात. यावर पट्टा आला असतां सांचा फार हळू हळू चालूं लागतो त्याच्याच बॉसवर आंतल्या बाजूस लूज (सुटी) पुली असते. हिच्यावर पट्टा आला असतां सांचा बंद रहातो व पट्टयाबरोबर लूज पूली नुस्ती फिरत रहतो. या शाफ्टिंगवर मध्यें एक कोनड्रम बसविलेला असतो म्हणून वर सांगितलें आहे. त्याच्याच समोर संच्याच्या पुढच्या बाजूस दुसरी एक शाफ्टिंग (लाट) बसविलेली असून तिच्यावरहि याच मापाचा एक कोनड्रम बसविलेला असतो. मात्र तो या कोनड्रमच्या उलट दिशेंत असतो. कोनड्रम म्हणजे ज्याचें एक तोंड मोठें आहे व दुसरे तोंड लहान आहे असा एक ढोल. याची कल्पना यावयास पाहिजे असल्यास पखवाज मध्यें जाड असतो व तो दोन्ही तोंडांस बारीक असतो. तेव्हां जर मध्यंतरी सर्वांत जाड भागावर त्याला कापून दोन तुकडे केले तर त्या तुकडयांना जो आकार येईल त्याला कोनड्रम म्हणतां येईल. याच आकाराचा पण सुमारें ३॥-४ फूट लांब असा हा बिडाचा ढोल बोल्ट मारून या शाफ्टिंगवर घट्ट बसविलेला असतो. व त्याच्या समोर दुस-या शाफ्टिंगवर असाच कोन-ड्रम उलट दिशेनें बसविलेला असतो. व या पहिल्या ड्रमवरून पट्टा दुस-या ड्रमवर नेलेला असतो. पहिला ड्रम फिरूं लागला कीं या पट्ट्याचें योगें दुसरा ड्रम फिरूं लागतो. त्यामुळें हे कोन उलट सुलट समोरासमोर बसविण्याचा मतलब हाच कीं पट्टा ड्रमवर कोणत्याहि ठिकाणीं असला तरी तिकाच घट्ट रहातो, ढिला पडूं शकत नाहीं. या दुस-या कोनड्रमच्या एका तोंडावर एक लहानसें दांतांचें चाक बसविलेलें असतें. व त्यावर मध्यें एक कॅरिअर व्हील (गतिवाहकचक्र) देऊन त्याच्यावर मोठें चक्र असतें. कोनशाफ्ट फिरूं लागल्याबरोबर मधलें 'कॅरिअर व्हील' फिरतें व त्याच्याबरोबर हें वरचें चाकहि फिरूं लागतें. याच्याच एका तोंडावर वाकडया दाताचें एक (बेव्हील) चक्र दिलेलें असतें. व त्याच्या योगें सायझिंगच्या एका अंगावर एक लांबच लांब साइड शाफ्ट नांवाचा शाफ्ट असतो तो फिरूं लागतो. वरती हें मोठें चाक फिरूं लागतें म्हणून सांगितलें तें चाक पुढें एक बिडाचा सुमारें १ फूट जाडीचा रूळ असतो त्याच्या अंगावर कायम बसविलेलें असतें. त्यामुळें हें मोठें चाक फिरूं लागल्याबरोबर हा बिडाचा रूळहि फिरूं लागतो. या बिडाच्या रूळाचे आंगावर बनात गुंडाळलेली असते व हा रूळ मागाहून कांजी लागून आलेल्या सुताला पुढें ओढून नेण्याचें काम करितो. याच्याच आंगावर वरच्या बाजूस बिडाचा आणखी एक रूळ असतो त्याला टिनरोलस हें नांव आहे. व पुढच्या बाजूस आणखी एक बिडाचा रूळ असतो. या तिन्ही रुळांच्या मधून सूत येऊन तें पुढें साच्यावर लागणा-या रूळावर गुंडाळले जातें. वरतीं जें मोठें चाक फिरतें म्हणून सांगितलें तें पुढच्या बाजूला घर्षणपट (फ्रिक्शन प्लेट) म्हणून जी रचना बीम भरण्याकरितां केलेली असते त्याला चालवितें. या फ्रिक्शनप्लेटमधील मुख्य तत्व हेंच आहे कीं बीम ज्या वेळीं नवीन लावतात त्यावेळीं त्याच्या मधल्या रुळाची जाडी लहान असते. त्यामुळें बीम लवकर फिरून पुढें येणारें सर्व सूत त्यावर गुंडाळलें जातें. व सूत गुंडाळून बिमाची जाडी जशी वाढत जाते तशी त्याची गति सावकाश व्हावी लागते व ती रचना या फ्रिक्शनप्लेट मोशनमध्यें साधलेली आहे. तसेंच बिमावर गुंडाळणरें सूत जास्त घट्ट (टाईट) भरावयास पाहिजे असेल तर या फ्रिक्शनप्लेटच्या रचनेशीं जोडलेली एक तरफ असते. तीवरील वजन जसजसें पुढें सरकवावें तसतसें सूत घट्ट भरतें. कारण त्या वजनाच्या योगें फ्रिक्शनप्लेटवर जोर येऊन बीम लवकर फिरण्याचा प्रयत्न करिते. बीमावर भरलें जाणारें सूत जास्त घट्ट भरलें जाऊन त्याची जाडी सर्व ठिकाणीं सारखी व्हावी म्हणून खालच्या बाजूनें दोन फिरते लोखंडी रूळ, बीम भरणें सुरू झालें म्हणजे त्याला दाबूं लागतात व या रुळांच्या बैठकीला वर खालीं करणारी तरफ खालीं एका आडव्या शाफ्टवर बसविलेली असते व याच शाफ्टच्या दुस-या   टोंकाला उलट दिशेला दुसरी एक लांब लिव्हर लावून त्याच्यावर एक वजन आडकविलेलें असतें. त्याच्या योगानें या खालच्या दाबणा-या रुळावर वजन पडून ते रूळ वरील बिमाच्या अंगावर जोरानें टेंकून रहातात व बीम फिरूं लागलें म्हणजे हे रूळहि फिरूं लागतात. आतां वरती जे तीन रूळ असतात म्हणून सांगितलें-कीं ज्याच्यामधून सूत दबून पुढें ओढलें जातें- त्यामध्यें, व ज्याचें नांव टिनरोलर म्हणून सांगितलें त्याच्याच एका तोंडावर एक चक्र दिलेलें असून या चक्राच्या योगें दुसरीं चक्रें चालून त्याच्यावर, बिमावर जितक्या वारावर खूण पाहिजे तितक्या वारावर खूण करणारी एक 'मार्किंग मोशन' लाविलेली असते. या टिनरोलरवरील चक्र व त्याच्या खालीं एक स्टड व्हील म्हणून असतें, हीं दोन चक्रें कांही हिशेबानें बदलून आपणास वाटेल तितक्या अंतरावर रंगाची खूण पाडतां येते. त्या योगेंकरून साच्यावर विणतांना साचेवाला ही खूण पाहून तीवर रंगीत आडवीं सुतें घालतो. ह्या कृतीला हेडिंग असें म्हणतात. हीं चक्रें काय हिशेबानें बदलावयाचीं त्याचा हिशेब असाः-
 Insert

स्टडव्हील × बेलव्हील × टिनरोलरचा घेर = खुणेची लांबी
टिनरोलस व्हील

गतीमध्यें रोलरव्हील असतें म्हणून सांगितलें; त्याखालीं एक स्टेड व्हील असतें. व या दोहोंचा संबंध जोडणारें एक बाजूला कॅरिअर (गतिवाहक) चक्र असतें. स्टडव्हीलच्या आंसावर एक 'वर्म' असून तो वर्म एका चक्रास चालवितो. त्याला बेलव्हील (घंटाचक्र) म्हणतात. कारण या चक्रावरूनच खूण पडण्याच्या पूर्वीं एक घंटाहि वाजत असते. हें बेलव्हील बहुधा ४५ दांतांचें असतें. आतां या टिन रोलरच्या मागच्या बाजूचे दोन फिरते रूळ असतात. ज्यांना टेनशनबार्स (ताणदंड) असें म्हणतात- त्यातील मागच्याच्या वरून व पुढच्यांच्या खालून सूत पुढें येतें. हे सुताच्या ओढीनें फिरतात. यांच्या मागें एक फणी बसविलेली असते, तिचे दांत वरून उघडे असतात. मागून कांजी लावून येणारीं सुतें सिलेंडर्सवर वाळून पुढें साळयांच्या योगें सुटीं झाल्यानंतर मग तीं या फणीमध्यें सारखीं वाटून भरलेली असतात त्याच्या योगें पुढें ज्या मापाचें बीम लाविलेलें असेल तितकाच सुताचा पन्हा या फणीच्या योगें ठेवितां येतो. साइझिंगच्या पुढच्या बाजूला दोन्ही हाताला दोन दांडे असतात. एक दांडा फिरविला असतां फणी लहान मोठी होते. दुसरा फिरविला  असतां फणी उजव्या अगर डाव्या बाजूस सरकूं शकते; हें फणीचें वर्णन झालें. आतां त्यांच्या मागें थोडया अंतरावर सिलेंडर्सच्या पुढें दोन्ही बाजूला लहान लहान ब्रॅकेट्स बसविलेले असतात. त्यांच्यामध्यें लोखंडी नळाच्या शिगा बसविण्याची योजना केलेली असते. हे नळ दोन्ही बाजूनीं चपटे केलेले व अतिशय गुळगुळीत केलेले असे असतात. त्यायोगें कोठेंहि न अडकतां हे सुतामधून आरपार घालतां येतात. यांचा उपयोग मागून कांजी घालून येणारी सुतें चिकटलेलीं असतात ती एकमेकांपासून सुटीं करण्याच्या कामीं चांगला होता. यामध्यें एक नळ सुमारें २ इंच जाडीचा असतो व बाकीचे १ इंच जाडीचे असतात. मागें क्रीलवर जितकीं बिमें लाविलीं असतील त्यांपेक्षां हा एक कमी लागतो. याचें कारण यांचा उपयोग प्रत्येक बिमांच्या तारी एकमेकांपासून सुटया करण्यासाठीं असतो. तेव्हां जर मागें दोन बिमें असतील तर त्यांच्या तारी वेगळया करण्यास एकच शीग (बाट) पुरे आहे. तीन बिमें असल्यास दोन शिगा पुरे होतील. आपल्या हाताला पांच बोटें आहेत. पण त्या बोटांच्या मधील खांचा चारच आहेत. या शिगांच्या बैठकीच्या मागें एक टिनचा रूळ असतो. पूर्वीं मार्किंगि मोशन या रुळाला लावलेली असल्यामुळें या रुळावर बसविल्या जाणा-या चक्रास टिनरोलर व्हील असें म्हणण्याची चाल पडली. आतां या रुळावरील मोशन काढून पुढच्या बिडाच्या रुळावर नेली तरी त्या रुळावर लागणा-या चक्राला टिनरोलर व्हील म्हणण्याचीच वहिवाट पडली आहे. या रुळाच्या खालच्या बाजूस एक अगर दोन पंखे बसविलेले असतात व ते कोनड्रम शाफ्टवरून पट्टा घेऊन फिरविले जातात. ताणा जो लहान सिलेंडराच्या खालून येतो तो या दोन्ही पंख्यांच्या खालून येऊन मग बाजूनें थोडा वर जाऊन मग उलट मागच्या बाजूला वर सांगितलेल्या टिन रुळावरून पुढें जातो.

येथपर्यंत वर्णन पुढील हेड स्टॉकचें झालें. आतां मधले दोन सिलेंडर्सविषयीं पाहूं. हे सिलेंडर्स दोन असतात. एक मोठा असतो व दुसरा लहान असतो. मोठा सिलेंडर वर जो टिनरोलर सांगितला त्याच्याच मागें बसविलेला असतो व याच्या मागें व कांजीच्या टांकीच्या पुढें असा लहान सिलेंडर बसविलेला असतो. कांजीच्या टांकींतून जें सूत बाहेर पडतें तें आधीं मोठया सिलेंडरवर येतें व त्याला फेरा देऊन मग लहान सिलेंडरावर जातें. या लहान सिलेंडराला संबंध फेरा देऊन मग खालच्या बाजूनें मोठया सिलेंडराच्या पुढें पंख्यांच्या खालून त्याच्या पुढच्या रुळावर जाऊन मग वरच्या दिशेस जातें हें वर सांगितलेंच आहे. या सिलेंडराच्याबाजूस जाड लोखंडी पत्रा असून मध्यें त्याला आधारासाठीं लोखंडी टायबार्स (जोडदांडे) दिलेले असतात. व या लोखंडी पत्र्यावर दोन्ही बाजूला चिकटून सबंध फेरावर तांब्याचा पत्रा बसविलेला असतो. पूर्वीं तांब्याच्या जागीं कल्हईच्या टिनचा पत्रा बसवीत असत, पण त्यावर वाफेचा दाब हल्लीं इतका घेतां येत नसे. शिवाय त्याला लवकर भोकें पडून सिलेंडर खराब होई. म्हणून अलीकडे तांब्याचा पत्रा बसवूं लागले. त्यायोगें सिलेंडर जास्त दिवस चालतो व दाब जास्त घेतां येतो. हे सिलेंडर २५ ते ३० पौडांपर्यंत दाब सहन करतील अशी परीक्षा करून घेतात. व कामासाठीं १२ पासून १५ पौंड पर्यंत दाब घेतां येतो. या सिलेंडर्समध्यें जेथून वाफ येते त्या नळीवर वाफेचा प्रेशर दाखविणारें घडयाळ बसविलेलें असतें. काहीं दुरुस्ती करण्याकरितां सिलेंडरच्या आंत जाण्याचा प्रसंग आल्यास त्यासाठीं प्रत्येक सिलेंडरला एक मॅनहोल (मोठें भोंक) ठेविलेलें असतें. या सिलेंडर्सवर कांजींत भिजलेलें सूत वाळण्यासाठीं येत असतें व या सिलेंडर्सच्या आंतील वाफेच्या उष्णतेच्या योगानें सिलेंडर तापलेला असतो व त्यामुळें हें सूत सुकतें. पण यामुळें या सिलेंडरच्या एका तोंडांतून आंत वाफ सोडलेली असते. त्या वाफेचें या वरील ओल्या सुतामुळें वरचेवर पाणी होऊन ते या सिलेंडरमध्ये जमा होत असतें. तें बाहेर काढून टाकण्याची योजना या सिलेंडरांत केलेली असते. या सिलेंडरच्या दुस-या तोंडाकडे टिनाचीं अगर तांब्याचीं बकेट्स (बादल्या) बसविलेलीं असतात. त्यायोगें रहाटगाडग्यानें जसें विहिरींतील पाणी वर काढावें त्या प्रमाणें ही बकेट्स खालीं आलीं म्हणजे त्यांत पाणी भरतें व ती वर गेलीं म्हणजे तें पाणी दुस-या बाजूच्या तोंडांत उतरतें व बाहेर पडूं लागतें. त्याबरोबर वाफ येऊ लागतें. म्हणून बाजूला एक पेटी बसवून तिच्याशीं एक नळी या सिलेंडरच्या तोंडापासून जोडलेली असते. या पेटींत एक खालींवर होणारा गोळा बसवून अशी योजना केलेली असते कीं, तिच्या योगें वाफ बाहेर जाऊं शकत नाहीं. फक्त पाणी मात्र बाहेर जातें. हिला स्टीम वेस्ट (बाष्पपेटिका) म्हणतात. सूत जितकें जाड असेल व त्यावर कांजी जितक्या जास्त प्रमाणानें चढविलेली असेल त्या मानानें सूत सुकण्यास वेळ लागतो व वाफहि सिलेंडरमध्यें जास्त ठेवावी लागते. सूत जितकें बारीक असेल त्या मानानें त्यावर कांजीहि पण कमी चढवितात. व त्यामुळें ते सुकण्यास वाफ कमी पुरतें व सूत लवकर सुकल्यामुळें यंत्रहि जोरानें चालविता येतें. ४० ते ५० नंबरचें सूत असल्यास सिलेंडरमध्यें २-३ पौंड दबाची वाफ पुरते. बारीक सुताला ५ पौंडांवर दाबाची वाफ कधी घेऊं नये. उन्हाळयाचे दिवस असल्यास लहान सिलेंडरचा स्टीम व्हाल्ह (बाष्प पडदा) बंद ठेवावा. म्हणजे सूत जास्त सुकून कडक होणार नाहीं. आतां याच्या मागला भाग जी कांजीची टांकी (साईझ बॉक्स) तिची माहिती देऊं. या कांजीच्या टांकीच्या दोन्ही बाजू बिडाच्या ओतलेल्या असतात व या मधील टांकी लांकडाची केलेली असते व सबंध टांकीला बहुधा आंतून तांब्याचा पत्रा बसविलेला असतो. व टांकी मजबूत राहण्यासाठीं टांकीच्या दोन्हीं बाजूला व खालीं बाहेरून टायबार्स लावून टांकी मजबूत केलेली असते. या टांकीच्या आंत एक लोखंडी पडदा लावून या टांकीचे दोन भाग केलेले असतात. एक भाग लहान असतो व एक भाग मोठा असतो. लहान भागांत नवीन येणारी कांजी पडण्याची व्यवस्था केलेली असते. मोठया भागांत मध्यें तांब्यानें मढविलेले दोन रूळ बसविलेले असतात. व याच्याच वर कांजी पिळून काढणारे बिडाचे वजनदार स्क्वीझिंग रोलर्स असता. या रुळाच्या बाजूला सुताला कांजींत बुडविणारा (इमर्शन रोलर) रूळ असतो. हा रूळ पाहिजे तेव्हां कांजींत बुडविता येतो व पाहिजे तेव्हा कांजीच्या बाहेर काढिता येतो. ज्यावेळीं यंत्र चालू असतें त्यावेळीं त्याला कांजींत बुडवितात. ज्यावेळीं यंत्र बंद असतें त्यावेळीं याला कांजीच्या बाहेर उचलून ठेवितात. हा इमर्शन रोलर केव्हां केव्हां तांब्याच्या नळीचा बनविलेला असतो व केव्हां केव्हां एक गोल रहाटाचा बनविलेला असतो. कांजी जास्त चाढविणें असल्यास रहाट असलेला बरा. हे जे दोन तांब्याचे रूळ आंत असतात म्हणून सांगितले त्याच्या तोंडावर बेव्हल व्हील्स दिलेलीं असून पूर्वीं पुढच्या भागाच्या वेळीं बाजूला एक लांबच लांब शाफ्ट असतें म्हणून सांगितलें. त्या शाफ्टवर बेव्हील चक्रें असून ती या रूळांना चालवितात. म्हणजे मागें क्रीलवर जी वॉर्विंगचीं विमें ठेविलेलीं असतात त्याच्या वरील तारी उलगडल्या जाऊन त्यांना कांजी लागून, याच रुळांवर स्क्वीझिंग रोलर्स असल्यामुळें याच्या योगें ओढून पुढें दिल्या जातात. त्यामुळें यांनां डिलिव्हरी रोलर्स म्हणावयास हरकत नाहीं. मागून जितकें सूत पुढें दिलें जाईल तितकें पुढें घेण्याचें काम पुढें जे तीन रूळ असतात म्हणून सांगितलें आहे ते करीत असतात. मागल्या रुळापेक्षां या पुढच्यांतील खालचा रूळ ज्याला मूळ गती मिळते त्याची जाडी (डायमेटर) सुमारें एक द्वितीयांश इंच कमी असते व ती मागच्याच्याबरोबर करण्याकरितां या रुळावर बनात गुंडळतात. ती पक्की रहावी म्हणून या बिडाच्या रुळांत एका ओळींत मध्यें मध्यें लहान लहान भोंकें पाडून त्यांत लांकडाच्या खुंटया बसविलेल्या असतात. बनातीच्या पहिल्या फे-यावर या खुंटयांच्या ठिकाणीं बारीक टेकस मारून मग बनात लपेटली जाते. पहिल्यानें सरासरी तीन फेरे बनात गुंडाळून मग सांचा चालू करून पहातात. साइझिंगचा मोठा सिलेंडर व तांब्याचा रूळ यांमध्यें सूत ढिलें पडूं लागल्यास बनात अजून पाहिजे असें समजावें व जर तेथें सूत टाइट येऊं लागलें तर बनात जास्त झाली असें समजून ती कमी करावी. सूत जास्त ढिलें न पडतां जरा जरा झोले खात चालूं लागल्यास बनात बरोबर आहे म्हणून समजावें. या ठिकाणीं सूत ओलें असता तीवर जर तें टाईट राहून ओढ बसेल तर तें विणतांना जास्त तुटेल. कारण ओलेपणीं सूत ओढलें असतां जास्त लाबेंल. आणि तसेंच ओढलें असतां, न तुटतां लांब होण्याची जी शक्ति (स्थितिस्थापकता)- जशी रबराच्या अंगीं असते त्या प्रकारची-सुताच्या अंगी रहाणार नाहीं. ओव्या वरती खालती होतांना त्या ठिकाणीं सुतावर ताण पडत असतो त्यावेळीं जर ही ताणण्याची शक्ति त्याच्या अंगी नसेल तर तें अर्थांत जास्त तुटणार, म्हणून ही सुताच्या आंगची शक्ति त्याच्यांत कायम राखावी लागते. तांब्याचे जे रूळ सांगितले त्यांच्यावर जे स्क्वीझिंग रोलर्स असतात ते जड बिडाचे सरासरी ६ इंच जाड पत्र्याचे असतात. यांच्या अंगीं मऊपणा यावा म्हणून याच्यावर बनात गुंडाळतात. ती त्याच्यावर रहावी म्हणून आधीं रुळाला व्हाइट लेड म्हणून सफेत रंग असतो तो लावितात. त्याचे एक दोन थर वाळले म्हणजे त्यावर पुन्हा एक थर देऊन त्यावर साध्या कापडाचा तुकडा चिकटवितात. या कापडाच्या तुकडयाचे सुमारें दोन फेरे व्हाइट लेडनें चिकटवून झाले म्हणजे मग त्यापुढें सुमारें ६ इंच कपडा नुसता सुटा ठेवितात व या कपडयास वाळूं देतात. रंग चांगला वाळला म्हणजे या सहा इंच कपडयाच्या खालीं बनातीचें टोंक घालून बनातीचा एक फेरा लपेटून घेतात व मग चालूं यंत्रांमध्यें हा रूळ तांब्याच्या रुळावर ठेवून सांचा हळू हळू चालवून बनात त्यावर जास्त गुंडाळीत जातात. बनातीचा पहिला फेरा सरासरी चार वारांच्या तुकडयाचा घेतात व मग त्याच्यावर दोन दोन वाराचे तुकडे गुंडाळतात. अशा रीतीनें त्याची जाडी ९ इंचाची करतात. चालू केल्यावर सांचामध्यें बनांत खराब झाल्यास वरचा एक तुकडा काढून त्या जागीं दुसरा एक नवा तुकडा गुंडाळतात. आतां या टांकीबद्दल एकच गोष्ट सांगावयाची राहिली ती ही कीं, सांचा चालू असतां कांजी चांगलीच गरम म्हणजे उकळती राहिली पाहिजे व यासाठीं या टांकीमध्यें वाफेचा नळ बसवितात. कांजी उकळती असली म्हणजे ती सुताच्या पोटांत भिनते. ही एक गोष्ट जर उपयोगांत आणली नाहीं, तर सूत विणण्याच्या कामांस निरुपयोगी होईल, इतकी ही गोष्ट महत्वाची आहे. टांकीच्या आंत जी नळी असते ती तांब्याची असते व बाहेरून तिला लोखंडी नळी जोडतात. आंतल्या तांब्याच्या नळीला सुमारें तीन तीन इंचाच्या अंतरानें बारीक भोकें पाडलेलीं असतात. वाफ सोडली म्हणजे या भोंकांवाटें बाहेर पडून ती कांजींत मिसळते व त्यायोगें कांजी गरम होत असल्यामूळें गरम होतांना ती आटून कमी होत नाहीं. केव्हांहि पांजण सुरू करण्याच्या पूर्वीं मात्र आधीं वाफेच्या नळांतलें पाणी नीट काढून टाकावें लागतें व मग वाफ काजीच्या टाकींत सोडावी लागतें; नाहींपेक्षां वाफेचें पाणी कांजीत शिरून कांजी पाहिजे त्यापेक्षां पातळ होते. त्याचप्रमाणें सकाळी आल्याबरोबर कांजी गरम करून त्यांतली पांच सात बादल्या कांजी काढून तेवढीच त्यांत नवी कांजी घालवी व मग काम सुरू करावें म्हणजे बीम वजनाला हलकें येत नाहीं. वरती स्क्वीझिंग रोलर्स असतात म्हणून सांगितलें त्याच्या वरचा बनातीचा एक तुकडा रोज संध्याकाळीं काम बंद केलें म्हणजे काढून पाण्यांत भिजत घालावा व सकाळीं त्यातील पाणी नीट पिळून मग तो त्या रुळांवर गुंडाळावा. ही बनात गुंडाळतेवेळीं त्या रुळावरील बनातीचा वरचा थर थोडें पाणी घालून भिजविण्याची चाल आहे. यायोगें वर लाविलेल्या बनातींत नरमपणा राहून कांजी कमी पिळून निघते म्हणजे सुतावर कांजी जास्त बसते. व बनात धुतल्याच्या योगं जास्त टिकते. असें न केल्यास बीम हलकें येऊं लागतें व हलकें बीम आलें कीं बनात नवी लावावी लागून शिवाय बनातीचा खर्च जास्त वाढतो. गिरणीच्या कामांत प्रत्येक लहान सहान बाबतींतहि शक्य तेवढी काटकसर करणें हें वरच्या अधिकार्‍यांचें काम आहे. मात्र ही काटकसर करणें हें वरच्या अधिकार्‍यांचें काम आहें. मात्र ही काटकसर फाजील होऊन कामाच्या चांगलेपणास धक्का बसतां कामा नये. साच्याला घालण्याच्या तेलांत पुष्कळ लोकांची काटकसर करण्याची चाल आहे. पण ही नेहमीं घातुक होते. सांच्याचे भाग लवकर झिजून सांचाचें आयुष्य कमी होतें. व पुष्कळ वेळां सांच्याचे भाग गरम होऊन आग लागण्याचाहि संभव असतो. येथें मुख्य पांजणीच्या यंत्राचें (साइझिंग मशीन) वर्णन संपले. आतां या यंत्राचें मागें वॉर्पिंगच्या सांच्यावरील बिमें ठेवण्याची क्रील असते तिचें थोडें वर्णन देऊं. ही क्रील म्हणजे म्हणजे बिमांची बैठक यंत्राबरोबर येते ती. ही बहुधा सहा बिमें ठेवण्याची असते. नेहमीं बहुधा सहा बिमांच्या आंतच काम भागतें. परंतु केव्हां केव्हां सहाच्या जागीं आठ अगर नऊहि बिमें लावावीं लागतात. त्यासाठीं मशीन आणणाराकडून एक लहान तीन बिमांपुरती क्रील मागविली असल्यास बरें; नसलीच तर मग एक लांकडी क्रील तयार करून घेऊनहि पण काम भागतें. या क्रीलची रचना अशी असते कीं, एक बीम खालीं बसावें तर त्याच्या मागचें बीम वरच्या बाजूला बसावें. पहिलें, तिसरें व पांचवें बीम खालीं बसलें तर दुसरें, चौथें व सहावें हीं बिमें वर बसतात. हीं बिमें वरखालीं बसविण्यांत मुख्य हेतु कमी जागा लागावी हा होय. नाहींतर एका ओळींत एका मागें एक बिमें ठेवूनहि काम भागूं शकेल. ही बिमें अशा रीतीनें क्रीलवर ठेवितात कीं, पहिलें बीम पुढच्या बाजूनें खालून वर उलगडावे तर दुसरे बीम वरून खालीं व मागून पुढें असे उलगडत जावें. तिसरें बीम पुनः पहिल्या सारखें उलगडतें तर चौथें बीम दुस-या सारखें उलगडते. त्यायोगें चौथ्या बिमाच्या तारी तिस-या बिमाच्या खालून घेऊन पुढें घेतल्या म्हणजे चौथ्या व तिस-या दोन्ही बिमाच्या तारी एक जागीं होऊन सारख्या उलगडूं लागतात. या दोन्ही बिमाच्या तारी एक जागीं होऊन सारख्या उलगडूं लागतात. या दोन्ही विमाच्या तारी पुनः दुस-या बिमाच्या वरून घेऊन त्या बिमाच्या तारी मिळून पहिल्या बिमाच्या खालून पुढच्या बाजूस येतात व अशा रीतीनें चारी बिमांच्या तारी एका जागीं येऊन त्या सर्व पहिल्या बिमाच्या पुढच्या बाजूनें पुढें येऊन उलगडत असतात. नवीन बिमें क्रीलवर ठेविलीं म्हणजे पहिल्या बिमाच्या तारींची व दुस-या बिमाच्या तारींची गाठ मारतात. आणि तिस-या बिमाच्या तारींची चौथ्या बिमाच्या तारींशीं गाठ मारतात. या गाठी नेहमीं चार मारण्याची पद्धत आहे. याप्रमाणें वार्पिंगवरून एकंदर तारींचे चार भाग करून पाठविले जातात. त्यामुळें सर्व तारींचा मध्यभाग आपोआप वेगळा होतो. त्या योगें पुडें साइझिंगची फणी भरताना सध्यावरून सुरुवात केली म्हणजे अर्ध्या तारी इकडे व अर्ध्या तिकडे अशा सारख्या भरल्या जातात. वर सांगितल्याप्रमाणें गांठी मारून झाल्या म्हणजे एक लांब काठी घेऊन ती दोन माणसें तिस-या व चौथ्या बिमाच्या गांठीवर धरूनं ती त्या दोन्ही बिमांच्या तारी खाली दाबतात व दोन्हीं बिमाच्या तारी तिस-या   बिमाच्या खालून पुढें वर घेतात व ती काठी त्या तारीसकट पुनः पहिल्या व दुस-या   बिमाच्या गाठीवर दाबतात व पहिल्याप्रमाणेंच सर्व तारी पहिल्या बिमाच्या खालून घेऊन पुढच्या बाजूनें वर घेतात त्यायोगें चारी बिमाच्या तारी एकत्र होऊन पुढून उलगडूं लागतात. त्या तारींचीं पहिल्या तारीचीं जीं शेवटें साच्यावर असतात त्याच्याशीं गाठ मारून मग यंत्र सुरू करितात. सहा बिमें अगर आठ बिमें असलीं तरी कृति हीच करावी लागते. यंत्र चालूं केलें म्हणजे गाठी तांब्याच्या रुळाच्या पुढें जाऊं देऊन मग स्क्वीझिंग रोलर्स वर उचलेले असतात ते खालीं ठेवितात व काजींतील रहाट हा वर घेतलेला असतो तो कांजींत बुडवितात. या वेळीं तो फारच थोडा कांजींत बुडवावा. गांठी आणखी थोडया पुढें जाऊं देऊन मग रशा टाकण्यास सुरुवात करावी. या रशा टाकावयाच्या त्या अशासाठीं कीं, प्रत्येक दोन बिमाच्या तारी एकमेकांपासून वेगळया करतां याव्या. या रशा टाकून झाल्या व त्या कांजीच्या टांकींतून बाहेर पडल्या म्हणजे इमर्शन रोलर कांजीच्या टांकीत थोडासाच बुडलेला असतो तो जास्त खालीं घ्यावा. ह्या वेळी सिलेंडर्स गरम केलेले असावेत. मग सिलेंडरमधील वाफ बंद करावी व साइझिंग हळूहळू चालवून सूत सुकूं द्यावें. रशा 'लीज् रॉडस्' च्या जागीं आल्या म्हणजे कांजीतींज रूळ वर घेऊन सांचा बंद करावा. मग पुढील फणी भरून रशांच्या जागीं लीज रॉडस् टाकूट व जितक्या वारावर खूण पाहिजे असेल (याला कामवाले लासन असें म्हणतात) त्या हिशेबानें चक्र लावून कांजीच्या टाकींतील कांजी गरम करून यंत्र सुरू करावें. जीज रॉडस् टाकण्याचा क्रम असा कीं सर्व रशा एके ठिकाणीं असतात व पाहूं गेले असता एका रशीखालीं दुसरी, तिच्या खालीं तिसरी, तिच्या खालीं चौथी असा क्रम असतो या लीजरॉडस्मध्यें टिनरोलरच्या जवळ असणारा लीजरॉड आकारानें मोठा असतो म्हणून सांगितलें. हा नेहमीं मधल्या रशीवर टाकावा. पहिल्यानें सर्वांत वरच्या रशीमध्यें लीज रॉड टाकून तो पुढच्या बाजूस ठेवावा. तीनच रशा असल्यास मग खालच्या रशींत रॉड घालून तो त्याच्या मागें ठेवावा व मधल्या रशींत मोठा रॉड घालून तो त्याच्या जागीं ठेवावा. चार रशा असल्यास वरच्या दोन रशांत आधीं रॉड घालावा, मग खालच्या रशींत व मग तिस-या रशींत मोठा रॉड घालावा. या ज्या तारी एकाखालीं एक येंतात त्या पैकीं कोणत्या बिमाची कोणती तार हें सांगतों. सर्वांत वर असणारी तार पहिल्या बिमाची होय. तिच्या खालीं तिस-या बिमाची येते. तिच्या खालीं पाचव्या बिमाची येते. तिच्या खालीं सहाव्या बिमाची येते. तिच्या खालीं चौथ्या बिमाची येते व तिच्या खालीं दुस-या बिमाची तार येते. याचा उपयोग रंगीत कपडा काढणें असल्यास कोणतें बीम कोठें ठेवावें या बाबतींत होतो.

आतां फणी कशी भरतात तें पाहूं. बहुधा फणीला ३०० दांत असतात. फणी एकदां अगदीं लहान करून पहावीं व एकदा मोठी करून पहावी व दोन्ही वेळां एका इंचांत फणीचे दांत किती बसतात ते पहावें व दोन्हींच्या मधली संख्या घ्यावी. ही पुष्कळशा फण्यांत सहा ही येते. या संख्येनें जितक्या इंचाचें बीम साइझिंगवर लावावयाचें असेल त्या इंचास गुणावें व त्या संख्येनें एकंदर तारींच्या संख्येस भागावें. जो भागाकार येईल तितक्या तारी प्रत्येक फणीच्या घरात घालाव्या, हा ठोकताळा झाला. आतां साइझिंगचें बीम वजनाला हलकें अगर भारी करणें असल्यास कसं करावें तें पाहूं. इमर्शन रोलर कांजीच्या जितका आंत घ्यावा तितकें बीम भारीं येईल व इमर्शन रोलर जितका वर ठेवावा तितकें बीम हलकें येईल. बीम हलकें येत असल्यास स्क्वीझिंगरोलरवर नवीन बनात लावावी. भारी येत असल्यास नवी बनात असल्यास ती काढून टाकावी. कांजी पातळ असल्यास बीम हलकें येईल व कांजी घट्ट जसल्यास बीम भारी येईल. कांजी घट्ट असून बीम भारी येत असल्यास कांजीत थोडें पाणी घालावें. तसेंच कांजी पातळ असल्यामुळें बीम हलकें येत असल्यास थोडी पातळ कांजी काढून घेऊन नवी घट्ट कांजी घालावी. स्क्वीझिंग रोलरच्या बनातीवर साधा कपडा गुंडाळला असतांहि बीम थोडें हलकें येतें. या सर्व गोष्टी रोजच्या काम करणा-या नेहमींच्या परिचयांतल्या आहेत. व तो बिमें वजनांत बरोबर काढून देईल त्यालाच हुशार सायझर समजतात. आतां कांजी तयार करण्यासंबंधी थोडी माहिती सांगून हें प्रकरण संपवूं.

कांजी तयार करणें- मिलमधील कांजीचें यंत्र प्रचारांस आल्यापासून कांजीचें एक शास्त्रच बनून बसलें आहे. हातमागवाला सूत विणतां येईल अशी पांजण तयार करितो व विणावयास बसतो. येथें ५० टक्के कांजी चढीव, ६० टक्के चढीव, १०० टक्के चढीव, १५० टक्के चढीव व २०० टक्के चढीव अशी चढाओढ होऊन बसली आहे. व त्यासाठीं कांजी बनविण्याचे निरनिराळे पदार्थ शोधणें व निरनिराळया कृती शोधून काढणें असे शोध नित्य चालू आहेत. कांजी बनविण्याच्या जिनसांचें पुढीलप्रमाणें भाग करितां येतीलः-

(१) कांजीमध्यें चिकटपणा देणारे:-  या सदराखालीं इंग्रजींत ज्याला स्टार्च म्हणतात म्हणजे धान्याचें सत्व अशा तर्‍हेचे पदार्थ येतात. २ कांजीमध्यें नरमपणा आणणारे, या सदराखालीं चरबी वगैरे जिन्नस येतात. ३ कांजीमध्यें वजन देणारे, या सदराखाली चायनाक्लेसारखे जिन्नस येतात. ४ इंग्रजींत ज्याला अँटिसेप्टिक म्हणतात ते म्हणजे कापडावर खळ चढविल्यानंतर त्यावर बुरशी येऊं नये यासाठीं वापरावयाचे जिन्नस. या चार सदरांखाली कांजीमध्यें घातले जाणारे सर्व जिन्नस येतात.

या विषयावर इंग्रजींत स्वतंत्र ग्रंथ आहेत. पण आपणाला नेहमींच्या प्रचारांत काय आहे येवढेंच येथें पहाणें आहे.

१ कांजीमध्यें चिकटपणा देणारे पदार्थ या सदराखालीं पुढील जिन्नस येतातः- गव्हाचें सपीठ, फरीना (बटाटयाचं सत्व) सॅगो फ्लोअर (साबूदाण्याचें पीठ), मेझ स्टार्च (मक्यासारख्या एका धान्याचें सत्व), साइझिंग काँपोझिशन (हा एक चिकट पदार्थ फरीन्यापासून तयार करितात.) वरील सर्व जिन्नस नेहमींच्या उपयोगांत आहेत. त्यापैकीं गव्हाचें पीठ वापरतांना तें आधी भिजवून ठेवून मग वापरावें लागतें. यासाठी लांकडाच्या टांक्या बनविलेल्या असतात. सरासरी ४ फूट लांब, ४ फूट रुंद व ४ फूट खोल येवढया टांकीमध्यें गव्हाच्या पिठाचीं आठ पोतीं मावतात. हें पीठ कमींत कमी १५ दिवस तरी भिजावें म्हणजे त्यात आंबूसपणा उत्पन्न होतो व तें फुगून वर येतें. इंग्रजींत या कृतीला फरमेंटेशन म्हणतात. या योगें गव्हाच्या पिठाचे सर्व बारीक कण फुगून त्यायोगें ते जास्त चिकटपणा देतात. हें पीठ भिजविण्याची कृति पुढीलप्रमाणें आहे. टांकीच्या प्रमाणानें जितके थैले टांकींत भिजत घालावयाचे असतील त्याच्या निमे थेले टांकीत भिजत घालावयाचे असतील त्याच्या निमे थैले पहिल्या दिवशीं घालावे. टांकीच्या एकद्वितीयांश उंची इतकें पाणी आधीं घ्यावें व त्यांत १० पौंडापर्यंत झिंक टाकून मग त्यांत पिठाचे थैले टाकण्यास सुरुवात करावी. या टांकीत एक पंखा सतत फिरत रहावा. पीठ अशा तर्‍हेनें पसरून थेडें थोडें टाकावें कीं त्याचा एकच ठिकाणीं गोळा होऊन बसूं नये. आधीं एक थैला टाकावा मग मध्यें तासभर जाऊं देऊन मग दुसरा थैला टाकावा. अशा रीतीनें दिवसभरांत ते थैले टाकावे. एकंदर आठ थैले टाकावयाचे टांकींत पहिले दिवशी चार, दुस-या   दिवशीं दोन, तिस-या दिवशीं एक व चौथ्या दिवशी एक या प्रमाणांत आठ थैले टाकावेत. मोठी टांकी बहुधा सोळा थैल्याच्या पेक्षां मोठी असत नाहीं. पहिले चार थैले टाकून झाल्यावर मग पुढील थैले टाकतांना पंखा फिरूं शकेल. अशा बेतानें थेडें थोडें पाणी घेत जावें. ४८ इंच उंचीच्या टांकीत, सर्व थैले टाकून झाले म्हणजे ४० इंच पाणी व आटा मिळून उंची करावी म्हणजे पंखा फिरतांना पीठ वर उडत नाहीं. खळ वापरण्याच्या पूर्वीं टांकींत आणखी ४ इंच पाणी घेऊन ४४ इंच करावें म्हणजे प्रत्येक थैल्यामागें ५ इंच उंची वापरण्यास येते. व शेवटीं ४ इंच पीठ टांकींत रहातें. हें चार इंच पीठ टाकींत नेहमीचेंच राहूं देऊन पुनः तींत नवीन पीठ घालावें. फरीना सॅगो हे वापरतांना आयत्या वेळीं पाण्यांत कालवून कांजींत घालतात. साइझिंग काम्पोझिशन वापरणें झाल्यास ज्या टांकींत चायना क्ले शिजवितात त्या टाकींत आधीं थोडें पाणी घेऊन त्यांत साइझिंग कॉम्पोझिशन घालून अर्धापाऊण तास शिजवावें.

(२) कांजीमध्यें नरमपणा आणणारे पदार्थः- चरबी (टॅलो), मेण, एरंडेल तेल, खोबरेल तेल, सॉफ्ट सोप, पामीन, मॅग्निशिअम् क्लोराइड इत्यादि पदार्थ येतात. चरबी व एरंडेल तेल पुष्कळ लोक वापरतात. खोबरेल तेल महाग असल्यामुळें कोणी वापरीत नाहीं. मेण प्या-याफिन वॅक्स म्हणून असतें तें अलीकडे फार वापरतात. सॉफ्ट सोप शिजवतांना जास्त वाफ झाल्यास उतूं जातों म्हणून तो क्वचित कोणी वापरतात. पामीन वगैरे नांवाखालीं अलीकडे ब-याच जिनसा प्रचारांत आल्या आहेत. पण त्यांत मूळ द्रव्य तेल असतें. त्यामुळें ते कोणी वापरीत नाहींत. असले जिन्नस वापरणरयास जिन्नस बनविणाराकडून पुष्कळ वेळां भरपूर कमिशन मिळतें. मॅग्निशिअम् क्लोराइड हा खार आहे. याला कामवाले लोक थंडा खार म्हणतात. यांच्यामध्यें हवेंतील पाणी शोषून घेण्याची फार मोठी शक्ति आहे. व त्या योगें याचा कांजीच्या कामात विशेष उपयोग होतो. हा खार जास्त प्रमाणांत वापरून त्यापासून कापडांचे वजन वाढविण्याच्या कामांत याचा उपयोग होऊं लागला आहे. मात्र हा खार वापरला असता हवेंत पाणी असलें पाहिजे तर हा तें शोषून घेईल. यासाठीं हवेंत पाणी सोडून हवा थंड करण्याचे पुष्कळ प्रकार प्रचारांत आले आहेत.

(३) कांजींत वजन वाढविणारे या सदराखालीं चायना क्ले नावाची माती येते. ही विलायतेंत जमीनीच्या पोटात सापडते. अलीकडे अहमदाबादेकडेहि हिच्या खाणी सापडल्या आहेत. हा जिन्नस वापरतांना येवढेंच पहावयाचें कीं यांत रेंतीचा अंश कमी असावा. याचा लहानसा खडा तोंडांत टाकून लाळेबरोबर विरघळूं दिल्यास रेती असल्यास आपोआप समजून येते. अगर पाण्यांत कालविल्यास जास्त पाणी घालून पातळ केलें असतां रेती बुडीं रहाते. वर सांगितलेल्या मॅग्निशिअम क्लोराइड खाराचाहि समावेश या सदरांत होईल.

(४) अ‍ॅन्टिसेप्टिकः- या सदराखालीं क्लोराइड ऑफ झिंक हा पदार्थ मुख्यत्वेंकरून येतो. कॉस्टिक सोडाहि याच सदराखालीं येतो. त्याचा उपयोग थोडया ठिकाणीं होतो. आतां हे पदार्थ मिसळून कांजी कशी तयार करितात तें पाहू. कांजी तयार करण्यास मुख्यतः तीन टांक्या लागतात. एकांमध्यें चायना क्ले शिजवितात ती, एकीमध्यें गव्हाचें सपीठ भिजत घालतात ती व तिसरी जींत कांजी शिजवून तयार करावयाची ती. कांजी शिजविण्याची टांकी निदान जमीनीपासून सात आठ फुटांच्या उंचीवर बसविलेली असते. व जीमध्यें चायनाक्ले शिजवितात ती यांच्याहीवर ७-८ फुटांवर या वरील टांकीच्या डोक्यावर बसविण्याची योजना केलेली असते. म्हणजे शिजविलेला चायना क्ले सहजीं या खालच्या टांकींत नळ उघडल्याबरोबर पडावा. पिठाच्या टांक्याहि या चायनाक्लेच्या टांकीच्या उंचीलाच बसविलेल्या असल्या म्हणजे ठीक. म्हणजे पीठ घेतांना आपोआप नळ उघडल्याबरोबर टांकीत पीठ पडूं शकेल. ज्या ठिकाणीं पिठाची टांकीं कांजीच्या टांकीच्याच उंचीवर असते. त्या ठिकाणीं पीठ या टांकीत पडावें म्हणून पिठाच्या टांकीला एक पंप लावलेला असतो. परंतु वर दिलेली पहिली योजनाच बरी. तयार कांजी साइझिंग मशीनमध्यें पडण्यासाठींहि असाच नळ लावून योजना केलेली असते. कांहीं ठिकाणीं बादल्या भरून हातानें कांजी टाकण्याची रीत आहे. कांहीं ठिकाणीं कांजीच्या टांकीलाहि पंप लावून त्या पंपाच्या योगें कांजी साइझिंगच्या टाकींत येऊन पडावी अशी योजना केलेली असते. चालनाक्लेच्या टांकीत साइझिंग काम्पोझिश वापरांत असल्यास तें आधीं शिजवून घ्यावें. नंतर त्यांत चायनाक्ले घालावा व पुनः शिजवावें. चायनाक्ले सरासरी दोन तास शिजवावा. नंतर त्यांत चरबी, मेण, तेल वगैरे जे कांही जिन्नस घालावयाचे असतील ते घालावेत व सुमारें एक तास शिजवावें. या योगेंकरून सर्व जिन्नस एकसर होऊन त्याला पांढरा सफेत रंग येतो. नंतर पंखा चालू ठेवून स्टीम बंद करावी. ज्या टांकींत तयार कांजी शिजवावयाची असेल तिच्यांत गव्हाचा आटा (चांगला भिजवून फरमेंट झालेला) जितका घेणें असेल तेवढा घ्यावा. तीमध्यें वरील टांकींत शिजलेले चायनाक्ले चरबी वगैरेंचे मिश्रण सोडावें. नंतर त्यांत क्लोराइड ऑफ मॅग्निशिया व क्लोराइड ऑफ झिंक हे घालावेत. तसेंच सॅगोफ्लोअर व फरीना यापैकी जें घालणें असेल ते घालावें. हें नुसतें पाण्यातं कालवून घालावयाचे असतात. व नंतर त्यांत निळा रंग घालावा. हा ''सोल्युबल ब्लू' म्हणून विरघळणारा निळा रंग मिळतो तो वापरतात. त्या योगें करून कांजीला सफेतपणा येऊन साइझ झालेल्या सुताला देखील सफेतपणा येतो व कापडहि त्यामुळें सफेत दिसते. ब्लू रंग टाकून झाला म्हणजे एकंदर मिश्रण किती इंच कराववयाचें तें टांकीच्या प्रमाणानं ठरलेलें असतें. ते एक इंचाच्या खुणा केलेली कांठी असते, तिनें मापून पाहून जर कमी असेल तर आणखी पाणी घेऊन तेवढे इंच उंचीबरोबर करून मग कांजींत स्टीम सोडून शिजवावी. हें शिजविण्याचें प्रमाणहि प्रत्येक वीव्हिंग मास्तरचें निराळें असतं. कोणी थर्मामिटर हातांत घेऊन त्यानें कांजीची उष्णता पाहतो; कोणी त्या बरोबरच तिची जाडी (ट्वाडल) पहातो. दुसरी एक पद्धत अशी आहे कीं, कांजी आधीं एकदम घट्ट शिजवावयाची व मग पंखा बंद झाला म्हणजे पट्टा अर्धाफास्ट व अर्धा लूज पुलीवर ठेवावयाचा व कांजींत थोडीशी स्टीम ठेवावयाची. याच्या योगें कांजी हळू हळू पातळ होऊन पंखा आंत फिरूं लागतो. पंखा फिरूं लागला कीं स्टीम बंद करावयाची. ही पूर्ण शिजविलेली कांजी होय. कोणी वरील टाकींत कांजी अर्धवटच शिजवितात व मग ती पुढें कांजीच्या टांकींत मध्यें जो पडदा असतो म्हणून वर सांगितलें त्याच्या बाजूच्या लहान टाकींत ती कांजी घ्यावयाची व तेथें स्टीम ठेवून तेथें ती शिजवावयाची. या पार्टिशनला म्हणजे पडद्याला बुडाला गोळे असतात त्यांतून कांजी दुस-या बाजूला येत असते. कांजीमध्यें तीन प्रकार आहेत. लाइट साइझ, मीडियम साईझ व हेवी साइझ. ही वर सांगितलेली कांजी अर्धवट शिजविण्याची पद्धित पहिल्या तर्‍हेच्या व दुस-या तर्‍हेच्या कांजीला ठीक पडेल. पण ही हेवी साइझिंगला उपयोगी नाहीं. निदान तसा अनुभव नाहीं असें लेखकाचें मत आहे. पण हें मत प्रत्येक वीव्हिंग मास्तर आपआपल्या अनुभवावर बनवीत असतो. तेव्हां चांगली अगर वाईट न म्हणता दोन पद्धती आहेत असें म्हणणें हेंच बरें. लाइट साईझ म्हणजे ५ टक्क्यापासून १५ टक्क्यांपर्यंत, मध्यम साईझ म्हणजे २० टक्क्यापासून ४० टक्क्यांपर्यंत व हेवी साइझ म्हणजे ५० टक्क्यापासून वर. याशिवाय प्युअर साईझ म्हणून आहे ती लाइट साईझच्याच वर्गांत येतें म्हणजे पांच टक्क्यापासून पंधरा टक्यापर्यंत ही चाढवितात. ही धुवट मालाला व रंगीत मालाला वापरतात. हिनें सुताला ताकत चांगली येते. हिच्यामध्यें फक्त सॅगो फ्लोअर व चरबी आणि कॉस्टिक सोडा येवढेच जिन्नस असतात. त्याचें साधारण प्रमाण पुढीलप्रमाणें आहेः- १०० रत्तल स्पॅगो, १ रत्तल कॉस्टिक सोडा व ५ पौंडापासून १० पौंडापर्यंत चरबी, आपणाला जेवढी जाडी पाहिजे असेल त्या प्रमाणांत पाणी घ्यावें कांजीच्या प्रमाणाविषयीं ग्रंथकारानें हेंच म्हटलेलें आहे की प्रत्येक कारखान्यांतील कांजीचें प्रमाण निराळे असते. तेव्हां ज्याला जें अनुभवानें आवडेल तें त्यानें वापरावें. हें स्वयंपाक करण-या प्रमाणें आहे. मुख्य तत्व कापड विणताना सूत तुटूं नये. चढविलेली कांजी सुतावर रहावी, गळून पडूं नये. त्याला ड्रॉपिंग म्हणतात. कापडावर कांजी सारवल्याप्रमाणें न दिसतां ती कापडाच्या अंगांत भिनून जावी म्हणजे कापडावर खुमास चांगली येते. याला कव्हर म्हणतात. आतां कांजीचीं प्रमाणें दोनचार सांगून हें प्रकरण संपवूं.

लाइट साइझ (पातळ कांजी.)
मिश्रण न. १ मिश्रण नं. २
१०० पौंड गव्हाचा आटा ५० पौंड सॅगो फ्लोअर
५ '' चरबी ५० '' फरीना
१० ''  चरबी
मिडिअम साइझ (मध्यम कांजी.)
१०० पौंड गव्हाचा आटा मिश्रण नं. ३
५० '' चायनाक्लें
२० '' चरबी
२५ '' क्लोराईड ऑफ मॅग्निशिया
५ '' झिंक क्लोराईड
२ '' पेनिवेट ब्लू
हेवी साइझ (भारी कांजी.)
१०० पौंड गव्हाचें पीठ मिश्रण नं. ४
१२५ '' चायनाक्ले
१५ '' साइझिंग कॉम्पोझिशन
६० '' चरबी
६० '' मॅग्निशिया क्लो
१० ” झिंक क्लो
३ '' पेनिवेट ब्लू रंगपाण्याचें प्रमाण टांकीच्या आकारावर, कांजीच्या जाडीवर व किती परसेंटेज चढवावयाचें त्यावर अवलंबून राहील. नेहमीं काम करणाराला हें तेव्हांच समजतें.

ख ळी ची मा ती (फुलर्स अर्थ)- ही हिरव्या रंगाची माती आहे. ती वाळल्यावर तिचा रंग पिंगट होतो. कापडाला खळ लावणारे लोक, कापडावरील तेलकटपणा काढून टाकण्याकरितां हिचा उपयोग करीत असत व कोठें कोठें अजूनहि करतात. ही विशेष चिकट नसते. हिची सुकी भुकटी जिभेवर टाकल्यास ती चिकटतें. पाण्यांत घालतांच हिचे बारीक तुकडे होतात. हे बाकीचे गुणधर्म पुष्कळ प्रकारच्या मातींत आढळतात. परंतु स्निग्धपणा काढून टाकण्याचा गुण याच मातींत आढळतों. हिचें वि. गु. १.७ ते २.४ पर्यंत असतें. हिची जमिनीवर ओढलेली रेघ चकाकते. ही हातास स्निग्ध लागते. हिच्या रासायनिक पृथक्करणावरून असें दिसतें कीं, स्निग्धपणा काढून टाकण्याचा गुण हा तिचा खरखरीतपणा व थोडासा चिकटपणा यावरच अवलंबून आहे. हिचें पृथक्करण केलें असतां अनेक प्रणिदें तींत सापडतात.

खळीची माती पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणीं सांपडते. विशेषतः इंग्लंड व अमेरिकंत ही पुष्कळ सांपडते. कॅरेलिना येथें सांपडते. ही माती यंत्रानें किंवा कुदळींनें खणून सुकवितात. कांही ठिकाणीं तिची वाळल्यानंतर पूड करतात. मग ती पाण्यांत घालून त्यातील जाडीभरडी माती काढून टाकतात. म्हणजे बाकीच्या मऊ मातीची चिक्की बनते. ही चिक्की साफ केलेल्या जमिनींवर पसरून वाळवितात. मग त्याचे तुकडे करून परदेशीं पाठवितात. सध्या कापडाला व लोंकरीला खळ देण्याकरितां हिचा आजकाल फार उपयोग करीत नाहींत. परंतु खनिज तेलें गाळण्याकरितां व वनस्पतिजन्य तेलांनां ओपविण्याकरितां हिचा आजकाल फार उपयोग होतो. साबण करण्याकरितां व भांडीं साफ करण्याकरितांहि हिचा उपयोग होतो. कांहि ठिकाणीं विटा व गिलावा करण्याकरितां हिचा उपयोग करतात.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .