प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें- ग्वेर्नसे
 
खरतरगच्छ- एक जैन गच्छ. जैन गच्छांची कल्पना उपकेशगच्छाच्या आरंभीं दिली आहे. खरतरगच्छ व तपागच्छ यांमधील भेद अंचलगच्छांत सांगितला आहे. (उपकेशगच्छ व अंचलगच्छ पहा.)

ख र त र ग च्छा प ट्टा व ली- हींत पहिला महावीर याचा पहिला शिष्य गौतम होता. त्याच्या नंतरः-

२ सुधर्माः- हा कोल्लांक ग्रामांत जन्मला. गोत्र आग्निवेश्यायन. हा धम्मिल्ल व भद्दिला यांचा पुत्र. वीरानंतर २० वर्षांनीं व वयाच्या १०० व्या वर्षी निर्वाणाप्रत गेला.

३ जंबूः- हा राजगृहांत जन्मला. गोत्र वाश्यप. श्रेष्ठी ॠषभदत्त व धारिणी यांचा पुत्र. वीरानंतर हा ६४ वर्षांनीं वयाच्या ८० व्या वर्षी निर्वाणाप्रत गेला. तो शेवटचा केवलिन् होता.

४ प्रभवः- कात्यायन गोत्र. जयपूरच्या विंध्य राजाचा पुत्र. वयाच्या ८५ (अथवा १०५) व्या वर्षीं. वीरनिर्वाणाब्द ७५ मध्यें मृत्यु पावला.

५ शयम्भवः- वात्स्य गोत्रोत्पन्न. 'शांतिदेवी'चा साक्षात्कार होऊन यानें धर्माची दीक्षा घेतली. त्याचा मुलगा मनक याकरितात्यानें दशावैकालिकसूत्र नांवाचा ग्रंथ रचला. वयाच्या ६२ व्या वर्षी वीरनिर्वाणाब्द ९८ मध्यें हा मृत्यु पावला.

६. यशोभद्रः- तुंगायियान गोत्र. वयाच्या ८६ व्या वर्षी वीरनिर्वाणाब्द १४८ मध्यें मृत्यु पावला.

७ संभूतिविजय:- माठरगोत्राय. वयाच्या ९० व्या वर्षी वी. नि. १५६ मध्यें मृत्यू पावला.

८ भद्रबाहु:- प्राचीनगोत्रीय. त्यानें उपसर्गहरस्तोत्र, कल्पसूत्र आणि आवश्यक, दशावैकालिक वगैरे दहा शास्त्रांवरील निर्युक्ति रचल्या. वयाच्या ७६ व्या वर्षीं वी. नि. १७० मध्यें मृत्यु पावला.

९ स्थूलभद्रः- गौतम गोत्र बाप नवव्या नंदाचा मंत्री शकडाल. आई लाच्छलदेवी. वैश्यकोशाचें यानें रूपांतर केलें.

१० आर्य महागिरिः- ईलापत्यगोत्रीय. तो गृहांत ३०, व्रतांत ४०, व सूरीप्रमाणें ३० वर्षे राहून वयाच्या १०० व्या वर्षी वी. नि. २४९ मध्यें मरण पावला.

११ सुहस्तिन्:- वासिष्ठगोत्रीय. वयाच्या १०० व्या वर्षी वी. नि. २६५ मध्यें मरण पवला. त्यानें संप्रति राजाला धर्मदीक्षा दिली. सुहस्तीनें अवंतिसुकुमाल व दुसरे पुष्कळ लोक यांनां धर्मदीक्षा दिली.

१२ आर्यसुस्थितः- याला कोटिशः सूर्यमंत्राचा जप केला म्हणून कोटिक व काकंदी नगरींत जन्मला म्हणून काकंदिक अशीं दोन बिरुदें होती. हा व्याघ्रापत्य गोत्राचा होता. ९६ व्या वर्षी वीरनिर्वाणाब्द ३१३ त मरण पावला. यापासून कोटिकगच्छ उत्पन्न झाले. सुप्रतिबुद्ध त्याचा लघुभ्रातर होता. १३ इंद्रदिन्न. १४ दिन्न.

१५ सिंहगिरि, जातिस्मरणज्ञानवान्- त्या काळीं पादलिप्ताचार्य, वृद्धवादिसूरि व त्याचा शिष्य कमुदचंद्र हें दीक्षानाम मिळालेला सिद्धसेन दिवाकर हे जिवंत होते. सिद्धसेन दिवाकरानें उज्जयिनी येथील महाकालेश्वराच्या देवळांतील रुद्रांचें लिंग फोडिलें व कल्याणमंदिरस्तवनामक ग्रंथानें पार्श्वनाथाच्या एका मूर्तीचा स्तव केला. वी. नी. ४७० मध्यें विक्रमादित्याला त्यानें धर्मदीक्षा दिली.

१६ वज्र- गौतमगोत्रीय. धनगिरि व सुनंदा तुंबवन ग्रामांत रहात होते. त्याचा हा पुत्र होता. हा वी. नि. ४९६ त जन्मला. वयाच्या ८८ व्या वर्षी वी. नी. ५८४ मध्यें तो मरण पावला. सिंहगिरीनें त्याला ११ अंगें शिकविलीं. त्यानंतर दृष्टिवादांग नांवाचें १२ वें अंग शिकण्यासाठीं अंवंती (उज्जयिनी) ला भद्रगुप्ताकडे दशपुराहून वज्र गेला. पूर्ण १० पूर्वें माहित असलेला शेवटचा मनुष्य तो होता. त्यानें बुध्दंच्या राज्यांत दक्षिणेकडे जैन धर्माचा विस्तार केला. त्याच्यापासून वज्र शाखा निघाली.

१७ वज्रसेनः- उत्कौशिक गोत्र श्रेष्ठी. जिनदत्त व ईश्वरी ह्यांचे चार पूत्र चार कुलांचे स्थापक होऊन गेले. त्यांची नांवें गेंद्र, चंद्र, निवृत्ति आणि विद्याधर अशीं होतीं. त्या चार पुत्रानां सौपारक येथें वज्रसेनानें धर्माची दीक्षा दिली.

१८ चंद्रः- याच काळीं आर्यरक्षित जिवंत होता. दश पूर येथें रहाणारे पुरोहित सोमदेव व रुद्रसोमा ह्यांचा तो पुत्र होता. वज्रपासून तो ९ पूर्वे व दहाव्याचा कांही भाग शिकला व ती पूर्वें आपला शिष्य दुवलिकापुष्पमित्र ह्याला शिकविलीं.

१९ सामंतभद्रः- ह्याला वनवासिन् म्हणतात. २० देवः- ह्याला वृद्ध म्हणतात. २१. प्रद्योतन. २२. मानदेवः- शातिस्तवाचा कर्ता. २३- मानतुंगः- भक्तामरस्तोत्र व भयहरस्तोत्र ह्यांचा कर्ता.

२४ वीरः- लोहित्यसूरीचा शिष्य देवर्द्धिगणिक्षमाश्रमण यानें वी. नि. ९८० मध्यें वलभीच्या दरबारी सिध्दंत ग्रंथाचा लेख केला. देवर्द्धीच्या वेळीं फक्त एक पूर्व शिल्लक राहिलें.

२५ जयदेव, २६ देवानंद, २७ विक्रम, २८ नारसिंह, २९ समुद्र, ३० मानदेव, ३१ विबुधप्रभ, ३२ जयानंद, ३३ रविप्रभ, ३४ यशोभद्र, ३५ विमलचंद्र, ३६ देवः- हा सुविहितपक्षगच्छाचा संस्थापक होता. ३७ नेमिचंद्र.

३८ उद्योतनः- याच्या शिष्यांपासून हल्लीं अस्तित्वांत असलेले ८४ गच्छ उत्पन्न झाले. ॠषभाची पूजा करण्याकरिता मालवक देशाहून शत्रुंजयाकडे यात्रा करीत असतां तो मरण पावला.

३९ वर्धमानः- हा पहिला सूरि असून चैतयवासिन् जिनचंद्राचा शिष्य होता परंतु उद्योतनाकडे गेला. सोमब्राह्मणाचे शिवेश्वर व बुध्दिसागर नांवाचे दोन पुत्र व कल्याणवती नांवाची कन्या ह्यांनां धर्माची दीक्षा दिली त्यानें शिवेश्वराला दीक्षेच्या वेळी जिनेश्वर हें नांव दिलें. वर्धमानसूरि विक्रम संवत १०८८ मध्यें होऊन गेला.

४० जिनेश्वरः- चैत्यवासिन् लोकांबरोबर वादविवाद करण्यास मरु देशाहून गुर्जर देशाप्रत जिनेश्वर आपला बंधु बुध्दिसागर याबरोबर गेला. विक्रम संवत् १०८० मध्यें अनहिल्ल पुराचा राजा दुर्लभ याच्या राजसभेंत त्यानें चैतन्यांचा पराभव केला व खरतर हें बिरुद नांव मिळविलें.

४१ जैनचंद्रः- हा संवेगरंग शाळाप्रकरणाचा कर्ता होय.

४२ अभयेदवः- हा जिनचंद्राचा लघुगुरुभ्राता धारानगरचा श्रेष्ठी धन व धनदेवी यांचा पुत्र होता. त्यांचें मूळ नाव अभयकुमार होतें. शरीराला त्रास दिल्यामुळें त्याला कुष्ठरोग झाला, परंतु दैवी चमत्कारानें तो बरा झाला. जयतिहूयण स्तोत्रानें त्यानें स्तम्भनकाजवळील पार्श्वमूर्तीचा स्तव केला. नऊ अंगांवर त्यानें टाका लिहिल्या व गुर्जर देशांतील कप्पडवाणिजग्रामांत मरण पावला.

४३ जिनवलज्भः- जिनेश्वर सूरीचा पहिला शिष्य, कूर्चपूरगच्छावा एक चैत्यवासिन् नंतर हा अभय देवाचा शिष्य झाला. पिंडविशुद्धिद्विपकरण, गणधरसार्धशतक, पडशीति वगैरे त्याचे ग्रंथ आहेत. संवत् ११६७ मध्यें देवभद्रचार्यानें त्याला सूरि म्हणून अभिषेक केला. त्यानंतर ६ महिन्यांनी तो मरण पावला. त्याच्या (धार्मिक व्यवस्थेच्या) कारकीर्दीत मधुखरतरशाखा विभक्त झाली, आणि हा पहिला गच्छभेद होय.

४४ जिनदत्त:- वाच्छिगमंत्री व वाहड देवी यांचा पुत्र. संवत् ११३२ त जन्मला. गोत्र हंबड. याचें मूळ नांव सोमचंद्र होतें. संवत् ११४१ मध्यें त्याला दीक्षा मिळाली. संवत् ११६९ वैशाख वद्य षष्ठीच्या दिवशीं चित्रकूट येथें देवभद्राचार्या पासून त्याला सूरिमंत्र मिळाला. पुष्कळ शहरांत दैवी चमत्कार करून त्यानें जैनधर्मांचा विस्तार केला. संदेहदोलावले व दुसरे पुष्कळ ग्रंथ त्यानें रचिले. तो आषाढ शुद्ध ११ संवत् १२११ रोजी अजमेरू येथें मरण पावला. संत् १२०४ मध्यें रुद्रपल्ली येथें जिनशेखराचार्यानें खरतरशाखा स्थापिली. हा दुसरा गच्छभेद होय.

४५ जिनचंद्रः- भाद्रपद शुद्ध संवत् ११९७ रोजी हा जन्मला साह रासल व देल्हणदेवी यांचा पुत्र फाल्गुन वद्य ९ संवत् १२०३ रोजीं अजमेरु येथें दीक्षा मिळाली. वैशाख शुद्ध ६ संवत् १२११ (वयाच्या १४ व्या वर्षी) रोजीं विक्रमपूर येथें त्याला जिनदत्तानें आचार्य केला. भाद्रपद वद्य १४ संवत् १२२३ रोजीं दिल्ली येथें मरण पावला. याच्या स्मरणार्थ दिल्ली येथें एक स्तूप उभारला आहे. त्याच्या डोक्यांत एक रत्न होतें असे मानतात.
    
४६ जिनपतिः- संवत् १२१० त जन्मला. साहयशोवर्धन व सूहवदेवी यांचा पुत्र. दिल्ली येथें संवत् १२१८ त दीक्षा घेतली. संवत् १२२३ त जयदेवाचार्यांनें त्याची पदस्थापना केली. संवत् १२७७ व वयाच्या ६७ व्या वर्षी पाल्हाणपुरांत तो मरण पावला. चित्रावालगच्छच्या जगच्चंद्र सूरीपासून स. १२१३ आंचलिकमत व सं. १२८५ त तपागण उत्पन्न झाले.

४७ जिनेश्वरः- मरोटा येथें सं. १२४५ त जन्मला. भांडागारिक नेमिचंद्र व लक्ष्मी यांचा पुत्र होय. मूळचें नांव अंबड. सं. १२५५ त खेडनगरात दीक्षा घेतली तेव्हां वीरप्रभ नांव यास मिळालें. सर्वदेवाचार्या नें जालोर नगरांत सं. १२७८ पदस्थापना केली. तो सं. १३३१ त मृत्यु पावला. त्याच वर्षी लघुखरतरशाखा जिनसिंहसूरीनें स्थापिली. हा तिसरा गच्छभेद होय.

४८ जिनप्रबोधः- दुर्गप्रबोध व्याख्येचा कर्ता साह श्रीचंद्र व सिरियादेवी यांचा पुत्र. हा सं. १२८५ तजन्मला. मूळ नांव पर्वत. सं. १२९६ त धीरापद्रनगरांत दीक्षा व प्रबोधमूर्ति हें नाव घेतलें. सं. १३३१ त पट्टाभिषेक झाला व त्याच वर्षी पदमहोत्सव झाला. मृत्यु सं. १३४१

४९ जिनचंद्रः- समीयाणाग्रामांत सं. १३२६ त जन्मला. छाजहडगोत्राचा मंत्री देवराज व कमलादेवी यांचा पुत्र. मूळ नांव शंभराय. जालोरा येथें सं. १३३२ त दीक्षा घेतली. सं. १३४१ त पदमहोत्सव. यानें चार राजांनां दीक्षा दिली. कलिकाकेवलिन् हें बिरुद (उपपद) त्याला होतें. तो कुसुमाणाग्रामांत सं. १३७६ त मृत्यु पावला.

५० जिनकुशल- हा दादोजी ह्या नांवाने प्रसिद्ध होता. समीयणाग्रामांत सं. १३३७ त जन्मला. छाजडगोत्राचा मंत्री जिल्हागर व जनतिश्री ह्यांचा पुत्र. सं. १३४७ त दीक्षा. सं. १३७७ राजेंद्रचार्या पासून सूरिमंत्र घेतला सं. १३८९ त मृत्यु पावला.

५१ जिनपद्मः- छाजहडवंशातला होय. पंजाबांत जन्मला तरुणप्रभाचार्या पासून सूरिमंत्र घेतला व पाटणा येथें सं. १४०० मध्यें मृत्यु पावला.

५२ जिनलब्धि- नागपुरांत सं. १४०६ मृत्यु पावला.
५३ जिनचंद्रः- स्तभ्भतीर्थांत १४१५ मध्यें मृत्यु पावला.
५४ जिनोदय:- पाल्हणपुर येथें राहणारा. साह-रुन्डपाल व धारलदेवी यांचा पुत्र. सं १३७५ त जन्मला. मूळ नांव समरऊ. स्तम्भतीर्थ येथें तरुणप्रभाचार्या नें त्याची पदस्थापना सं. १४१५ त केली. त्याच स्थळीं त्यानें अजिताला एक चैत्य स्थापिला. आणि शत्रुंजयावर पांच प्रतिष्ठा केल्या. तो पाटण येथें संत. १४३२ मध्यें मरण पावला. त्याच्या काळांत सं. १४२२ मध्यें धर्मवल्लभगणीनें स्थापिलेल्या वेगडखरतरशाखेचा उदय झाला. हा ४ था गच्छभेद होय.

५५ जिनराजः- पाटण येथें सं. १४३२ त सूरिपद मिळालें व देवलवाड येथें सं. १४६१ त मृत्यु पावला.

५६ जिनभद्रः- सं. १४६१ त प्रथम जिनवर्धनसूरि. हा जिन राजाच्या पाठीमागून गादीवर बसणारा म्हणून नेमला गेला होता. परंतु त्यानें चतुर्थ व्रत मोडलें म्हणून तो अयोग्य गणला जाऊन त्याची जागा सं. १४७५ त जिनभद्राला दिली गेली. जिनभद्र हा भणशालिक गोत्राचा होता. त्याचें नांव भाडो होतें. त्यानें पुष्कळ मूर्ती बसविल्या. पुष्कळ देवळें व ग्रंथसंग्रहालयें स्थापन केली. कुंभलमेरु येथ सं. १५१४ त तो मृत्यु पावला. वर निर्दिष्ट केलेला जिनवर्धनसूरि ह्यानें सं. १४७४ त पिप्पलक खरतरशाखा स्थापिली. हा पांचवा गच्छभेद होय.

५७ जिनचंद्रः- चम्मगोत्राचा साह वच्छराज व वाहलादेवी यांचा पुत्र. जेशलमेरु येथें सं. १४८७ मध्यें जन्मला सं. १४९२ त दीक्षा. सं. १५१४ त सूरिपद. जेशलमेरू येथें सं. १५३० त मृत्यु.

५८ जिनसमुद्र:- पारषगोत्राचा देकौ-साह व देवलदेवी यांचा पुत्र. बाहडमेरु येथें सं. १५०६ मध्यें जन्मला. दिक्षा सं. १५२१. पदस्थापना सं. १५३० अहमदाबाद येथें सं. १५५५ मध्यें मृत्यू.

५९ जिनहंसः- चोपडागोत्राचा साहमेघराज व कमलादेवी यांचा पुत्र सं. १५२४ त जन्मला. दीक्षा सं. १५३५ अहमदाबाद येथें सं. १५५५ त पदस्थापना. पाटण येथें सं. १५८२ त मृत्यु. मेरुदेशांतील आचार्य शांतिसागर ह्यांनीं स्थापन केलेली आचर्यीय खरतर शाखा सं. १५६४ त निर्माण झाली. हा ६ वा गच्छभेद होय.

६० जिनमाणिक्य:- कुकडचोपडा गोत्राचा साह जीवराज व पद्मादेवी यांचा पुत्र सं. १५४९ त जन्मला. सं. १५६० त दीक्षा. सं. १५८२ त पदस्थापना. सं. १६१२ त मृत्यु.

६१ जिनचंद्रः- ॠहड गोत्राचा साह-श्रीवन्त व सिरीयादेवी यांचा पुत्र. तिमरीनगराजवळील वडली ग्रामांत सं. १५९५ त जन्मला. सं. १६०४ मध्यें दीक्षा. जेशलमेरू येथें सं. १६१२ त मूरिपद. असें म्हणतात कीं ह्यानें अकबर बादशहाला जैनधर्माची दीक्षा देऊन त्याचें धर्मांतर करविलें. समयराज, महिमराज, धर्मनिधान, रत्‍ननिधान, ज्ञानविमल वगैरे त्याचे ९५ शिष्य होतें. तो वेणातट येथें सं. १६७० त मृत्यु पावला. भावहर्पोपाध्यायानें स्थापिलेली भावहर्षीय खरतर शाख सं. १६२१ मध्यें निर्माण झाली. हा ७ वा गच्छभेद होय.

६२ जिनसिंहः- गणधर चोपडा गोत्राचा साह-चांपसी व चतुरंददेवी याचा पुत्र. खेटासर ग्रामांत सं. १६१५ त जन्मला. मूळ नाव मानसिंह. बिकानेर येथें सं. १६२३ त दीक्षा घेतली. जेशलमेरू येथें सं. १६४० त वाचकपद मिळालें. लाहोर येथें सं. १६४९ त आचार्यपद मिळालें. वेणातट येथे सं. १६७० त सूरिपद मिळालें. मेडटा येथें सं. १६७४ त तो मृत्यु पावला.

६३ जिनराजः- बोहिथ्यरागोत्राचा साहधर्मसी व धारलदेवी यांचा पुत्र. सं. १६४७ त जन्मला. बिकानेर येथें सं. १६५६ त दीक्षा घेतली. दीक्षानाम राजसमुद्र असें होतें. सं. १६६८ त वाचकपद मिळालें. सं. १६७४ त मेडटा येथें सूरिपद मिळालें. त्यानें पुष्कळ प्रतिष्ठा केल्या. उदाहरणार्थ, शत्रुंजयावर ॠषभ व दुस-या जैनाच्या ५०१ मूर्ती सं. १६७५ त स्थापन केल्या. त्यानें जैनराजी नांवाची नैपधीय काव्यांवर एक वृत्ति लिहिली व दुसरे ग्रंथ रचिले. तो पाट्टण येथें सं. १६९९ त मृत्यु पावला. सं. १६८६ त आचार्य जिनसागरसूरीपासून लघ्वाचार्यीय खरतरशाखा निर्माण झाली. समयसुंदराचा शिष्य हर्षनंदन (ॠषिमंडल टीकेचा कर्ता) ह्यानें ती शाखा स्वतः निमित्तभूत होऊन उपस्थित केली होती. हा आठवा गच्छभेद होय. सं. १७०० त रंगविजयगणीपासून रंगविजयखरतरशाखा निर्माण झाली. हा नववा गच्छभेद होय. आणि ह्या शाखेपासून श्रीसारोपाध्यायानें स्थापिलेली श्रीसारिय खरतरशाखा उत्पन्न झाली. हा दहावा गच्छभेद होय. अकरावा गच्छ भेद बृहत्खरतर नांवाचा मूलगुच्छ आहे. याप्रमाणें खरतरगच्छाचे अकरा भेद आहेत.

६४ जिनरत्न.- लुणीया गोत्राचा साह तिलोकसी व तारादेवी यांचा पुत्र. मूळ नांव रूपचंद्र सं. १६९९ त सुरिमंत्र घेतला. अकब्बराबाद येथें हा सं. १७११ त मरण पावला.

६५ जिनचंद्र.- गणघर चोपडा गोत्राचा साह-आसकरण व सुपियारदेवी यांचा पुत्र. मूळ नांव हेमराज. दीक्षानाम हर्षलाभ सं. १७११ मध्यें पदस्थापना झाली. हा सुरत येथें सं. १७६३ त मृत्यु पावला.

जिनसौख्य.- लेचाबुहरा गोत्राचा साह रूपसी व सुरूपा यांचा पुत्र. फोगपट्टण येथें सं. १७३९ त जन्मला. पुण्यपालसरग्रामांत सं. १७५१ मध्यें दीक्षा घेतली. दीक्षानाम सुखकीर्ति. सं. १७६३ त सूरिपद मिळालें. सं. १७८० त ॠणी येथें मरण पावला.

६७ जिनभक्ति.- सठेगोत्राचा साह हरिचंद्र व हरिसुखदेवी यांचा पुत्र. इंदपालसर ग्रामांत सं. १७७० मध्यें जन्मला. मूळ नांव भीमराज. सं. १७७१ मध्यें दीक्षा घेतली.  दीक्षानाम भक्तिक्षेम. सं. १७८० त (वयाच्या दहाव्या वर्षी) ॠणी येथें सूरिपद मिळालें. सं. १८०४ मध्यें कच्छ देशांतील मांडवी येथें मृत्य पावला.

६८ जिनलूभ.- बिकानेर येथें राहणारा बोहिथ्थरा गोत्राचा साह पचायणदास व पद्मादेवी यांचा पुत्र. सं. १७८४ त वापीउ ग्रामांत जन्मला. मूळ नांव लाडचंद्र, जेशलमेरूं येथें सं. १७९६ त दीक्षा घेतली. दीक्षनांव लक्ष्मीलाभ. माडवी येथें सं. १८०४ मध्ये पदस्थापना झाली. त्यानें पुष्कळ यात्रा व प्रतिष्ठा केल्या. तो गुढा येथें सं. १८३४ त मृत्यु पावला.

६९ जिनचंद्र.- बिकानेर येथें राहणारा वच्छावत मुम्हता गोत्राचा रूपचंद व केसरदेवी यांचा पत्र. कल्याणसर ग्रामांत सं. १८०९ त जन्मला. मूळ नांव अनुपचंद्र. मंडोवर येथें सं १८२२ त दीक्षा घेतली. दीक्षानाम उदयसागर. गुढा येथें सूरिपद सं. १८३४ त मिळालें. सरत येथें सं. १८५६ त मृत्यु पावला.

७० जिनहर्ष.- मिथादिथावहुरा गोत्राचा साह- तिलोकचंद्र व तारादेवी यांचा पुत्र. वालीग्रामांत जन्मला. सं. १८४१ व औग्रामांत दीक्षा घेतली. सुरत येथें सं. १८५६ त सूरिपद मिळालें. मृत्य सं. १८९२.

७१ जिनमहेंद्र.- जन्म सं. १८६७ दीक्षा सं. १८८५ सूरिपद सं. १८९२. मृत्यु सं. १९१४.

७२ जिनमुक्ति,- जन्म सं. १८८७. दीक्षा सं. १९०७ सूरिपद सं. १९१५.

[माइल्स- ट्रॅन्झॅक्ट. आर. ए. सो. पु. ३ टाड्र राजस्थान; वेबर- बार्लिन अ‍ॅकॅ. १८८२; किलहॉर्नचा रिपोर्ट १८८०-८१ इं. गॅ. पु. १(अबु). याकोबी- झेड्. डी. एम्. जी. पु. ३३; पीटर्सनचा रिपोर्ट ४. (बॉ. ब्र. आर. ए. सो. १८९४)]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .