विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खरगोण- इंदूर संस्थान. निमार जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. उ. अ. २१ ५०'. व पू. रे. ७५ ३७'. नर्मदेला मिळणा-या कुंडी नदीवर हें वसलें आहे. लो. सं. (१९११) ९४२३. मोंगलांच्या अमदानींत हें गांव प्रसिध्दीस आलें असावें. प्रथम माळवा सुभ्यांतील बिजागड सरकारच्या एका महालाचें हें मुख्य ठिकाण होतें. नंतर बिजागड सरकारचें मुख्य ठिकाण बनलें. त्यावेळचीं कांही घरें व कबरी अद्याप दिसतात. जिल्हा व परगणा यांच्या कचेर्‍यांखेरीज शाळा, तुरुंग, दवाखाना, लायब्ररी वगैरे या गांवांत आहेत. स्थानिक कारभार म्युनिसिपालिटी पहाते.