प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें- ग्वेर्नसे
 
खनिजविज्ञान.- पृथ्वीच्या पाठीवर सांपडणा-या खनिज द्रव्यांच्या जाती व वर्गीकरण, तीं सापडण्याची स्थानें, त्यांचे गुणधर्म व उपयोग यासंबंधींच्या सामान्य तत्वांचें या शास्त्रांत विवेचन केलेलें असतें. ही खनिज द्रव्यें कोणत्या घटकांची (किंवा मूल द्रव्याचीं) बनलेली असतात हा रसायन शास्त्रचा विषय आहे. खनिजद्रव्यांच्या ठिकाणीं असणारे पारदर्शकत्व व दुसरे तत्सदश गुणधर्म यांच्या संबंधाची माहिती पदार्थविज्ञानशास्त्राच्या सहाय्यानें प्राप्त होते. खनिज स्फटिकासंबंधानें स्फटिकशास्त्रां (क्रिस्टलोग्रफी)त माहिती संगृहीत केलेली असते; हीं खनिज द्रव्यें कशीं तयार होतात व त्यांच्याजवळ सांपडणारीं इतर द्रव्यें व त्यांचे निरनिराळे प्रकार (पर्याय) इत्यादिकांसंबंधीं माहिती भूस्तरशास्त्रांत दिलेलीं असते आणि विशिष्ट द्रव्यें पृथ्वीच्या कोणत्या भागांत सांपडतात यासंबंधाची माहिती भूगोलशास्त्रांत दिलेलीं असते. हे पदार्थ कोणत्या रीतीनें खणून काढावेत, अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू कसे तयार करावेत, त्या धातूंचा इमारती, अलंकार इत्यादिकांकडे उपयोग व त्यांचा निरनिराळया देशांत खप वगैरेसंबंधानें खनिखोदनशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादि शास्त्रांत विवेचन केलेलें असतें. प्रस्तुत स्थलीं खनिज पदार्थांसंबंधी ठोकळ माहिती दिली आहे.

इ ति हा सः- कित्येक खनिज द्रव्यांचा अनेक प्रकारें मनुष्यास उपयोग होत असल्याकारणानें व अलंकारांत यांतील कांही वापरले जात असल्यानें फार प्राचीन काळापासूनच मानवी प्राण्यांचें लक्ष्य या पदार्थाकडे वेधलें आहे. पाषाणाचीं आणि ब्राँझ (पंचरसी) धातूचीं शस्त्रें हल्लीं उपलब्ध झालीं आहेत; व हीं शस्त्रें प्रागैतिहासिककालीन मनुष्यांची आहेत असें तज्ज्ञांचें मत आहे. यावरून फार प्राचीन काळापासून मनुष्यांस खनिज विज्ञानाचें थोडें फार ज्ञान होतं असें दिसून येतें. या शास्त्रावर सर्वांत जुना व सध्या उपलब्ध असलेला असा एक ग्रंथ थिओफ्रेस्टस यानें इसवी. स. पूर्वीं ३१५ च्या सुमारास लिहिला; या ग्रंथाच्या कांहीं भागाचें इंग्रजीत भाषांतर झालें आहे. त्या काळी खनिज द्रव्यांचें तीन भाग केले होते ते पाषाण, धातु आणि मृत्तिका हे होते. इ. सन ७७ च्या सुमारास प्लिनी या नांवाच्या प्रसिद्ध ग्रंथकर्त्यानें हिस्टोरिआ न्याच-यालिस या नांवाचा एक महत्वाचा ग्रंथ तयार केला; या ग्रंथाचीं अनेक खंडें आहेत. त्यांतील शेवटच्या पांच खंडांत धातु, अशोधित धातु, रत्‍नें आणि मृत्तिका यांच्या संबंधाची माहिती दिली आहे. अरबी सत्ता त्रिखंड पसरली असतां अरब लोकांनी जुन्या ग्रीक आणि रोम ग्रंथांचें भाषान्तर करून अनेक शास्त्रांचा अभ्यास सुरू केला व त्यानीं शास्त्रीय ज्ञानांत बरीच भर घातली. सन १२६२ च्या सुमारास अल्वर्टस म्याग्नस यानें या विषयावर एक ग्रंथ लिहिला या ग्रंथाचें नांव डी मिनरॅलिबस असें आहे. १६ व्या शतकांत जार्जिअस अग्रिकोला यानें याच्या संबंधानें कित्येक ग्रंथ प्रसिद्ध केले. यांत खाणी, धातु, अशोधित धातु, इत्यादिकासंबंधानें बरीच माहिती दिली होती. याच सुमारास (१५६५) के. ग्रेस्नर यानें एक ग्रंथ लिहून खनिज द्रव्यासंबंधानें पद्धतशीर माहिती दिली आहे. सन १६०९ सालीं अ‍ॅन्सेल्म बोइथस डी बूट यानें मौल्यवान खडयासंबंधानें ग्रंथ लिहिला आहे. इरास्मस बार्थोलिनस यानें आइस लंड-स्पारसंबंधानें शोध करून त्यासबंधाची माहिती देणारें पुस्तक प्रसिद्ध केलें. सन १७२५ सालीं जे. एफ हेन्केल यानें आणि सन १७३५ सालीं सी. लिनिअस यानें प्रत्येकी एकेक पुस्तक प्रसिद्ध करून या शास्त्रासंबंधानें जास्त माहिती उपलब्ध केली. हा काळपर्यंत खनिज द्रव्यांच्या बाह्य आंकारावरून त्यांचें वर्गीकरण केलें जात असे. जे. जी. वालेरिअस या स्वीडिश शास्त्रज्ञानें रासायनिक गुणधर्मांकडे लक्ष्य (१७४७) पुरविलें. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत रासायनिक पद्धतीकडे लक्ष्य पुरविलें गेलें नाही. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभास स्फटिकशास्त्राचा पाया घालण्यांत आला. रोमे डील आस्ले आणि आर. जे. हाउये यांनीं स्फटिकशास्त्रास सुरवात केली. त्या योगानें रसायन शास्त्राचा खनिजविज्ञानांत मोठया प्रमाणांत प्रवेश झाला. सन १८०९ सालीं डब्ल्यू. एच्. वॉल्यास्टन यानें परावर्तक कोनमापक (रिल्फेक्टिंग गॉनिकोमीटर) शोधून काढल्यापासून स्फटिकाचे कोन अगदी बरोबर मोजतां येऊं लागले व त्या योगानें स्फटिकशास्त्रास अत्यंत मदत झाली. समाकारत्व (इसोमॉर्फिझम) आणि ह्याकारत्व (डायोमॉर्फिझम) यांच्या संबंधानें इ. मित्सशर्लिझ यानें अनुक्रमें १८१९ आणि १८२१ सालीं सिद्धन्तस्वरूपानें माहिती प्रसिद्ध केल्यापासून या शास्त्रांतील ब-याच गोष्टींचा उलगडा झाला व त्या योगानें या शास्त्राचें पाऊल पुढें पडण्यास पुष्कळ मदत झाली. याच सुमारास इ. एल्. मालूस यानें असें दाखवून दिलें की, कांही खनिज स्फटिकांच्या योगानें प्रकाशाचें ध्रुवीभवन होतें व सन १८६७ साली ए. डेस्. क्लॉइझो यानें स्फटिकाचे अति पातळ छेद सूक्ष्मदर्शक यंत्राखालीं तपासण्याचें काम करून त्या त्या द्रव्यांचे प्रकाशगुणक (ऑप्टिकल कॉन्सटंट) निश्चित केले. या पोटविषयासंबंधानें जरूर तेथें ऐतिहासिक माहिती देण्याचें योजिलें आहे.

ख नि ज द्र व्यां चे वि शे ष गु ण ध र्म.- प्रथमतः आपणांस खनिज पदार्थांमधील महत्वाचे गुणधर्म कोणते आणि गौण गुणधर्म कोणते याबद्दल विवेचन केलें पाहिजे. महत्वाच्या गुणधर्मांत रासायनिक घटना, स्फटिकाचा विशेष आकार व स्फटिकविशिष्टगुणधर्म आणि गुरत्वविशिष्टत्व यांचा समावेश होतो. एकाच जातीच्या निरनिराळया नमुन्यांत हे गुणधर्म बहुतेक सारखे असतात व त्यांत फरक पडल्यास विशिष्ट मर्यादेपेक्षां जास्त प्रमाणावर फरक पडत नाहीं. गौण गुणधर्मात रंग, तेज, काठिण्य, आकार (अर्थात् स्फटिकरहित आकार) इत्यादि गुणधर्मांचा समावेश होतो. हे गुणधर्म त्या पदार्थांत असणा-या अशुद्ध द्रव्यावर अवलंबून असतात. अगदी शुद्ध स्वरूपांत व परिणत स्फटिक रूपांत खनिज द्रव्य घेतल्यास (किंवा तयार करविल्यास) हे सारे गुणधर्म एकसारखे असतात. परंतु अगदी शुद्ध असें खनिज द्रव्य नैसर्गिकरीत्या सृष्टींत सांपडणें बरेंच अशक्य असतें व असले स्फटिक ज्या रीतीनें तयार झाले असतील त्या रीतीवरहि हे गुण काहीं प्रमाणावर अवलंबून असतात.

आकारवैशिष्टयः- जर द्रव्य स्पटिक स्वरूपांत असेल तर आकारवैशिष्टय गुण दिसून येतो; परंतु कोणत्याहि द्रव्याच्या ठिकाणीं स्फटिकत्व असेलच असें नाहीं. ज्यांची रासायनिक घटना एक आहे त्या द्रव्यांचे स्फटिक अगदीं सारखे असतात. परंतु दोन स्फटिकांच्या ठिकाणीं समाकारत्व असल्यास त्या दोन स्फटिकांची रासायनिक मूल द्रव्यें एकच असतात असें यावरून कोणीहि समजूं नये. उदाहरणार्थः- सिल्वर आयोडाइड, झिन्क आक्साइड आणि झिंक सल्फाइड स्फटिक अगदी सारखे असतात. परंतु त्याचे रासायनिक घटकावयव अगदीं भिन्न आहेत हें उघड आहे. स्फटिक मोठे आणि उत्तम प्रकारें विकास पावलेले असे असल्याखेरीज त्यांचा आकार किंवा त्यांच्या बाजवांचा कोन यथायोग्यपणें समजत नाही. असो. स्फटिकाच्या आकारावरून ठोकळ मानानें खनिज द्रव्यांच्या सहा जाती केल्या आहेत.

प दा र्थ वि ज्ञा न शा स्त्र दृ ष्टया गु ण ध र्म.- खनिज द्रव्यांतून प्रकाश गेला असतां त्या प्रकाशावर जो परिणाम होतो तो शास्त्राच्या दृष्टीनें अत्यंत महत्वाचा आहे. जें खनिज द्रव्य अपारदर्शक असतें त्या खनिज द्रव्याचे अगदीं पातळ पापुद्रे (थर) घेऊन त्यांतून प्रकाश पाठवितात व प्रकाशावर काय परिणाम होतों हें पहातत. वक्री भवनाचा गुणक (रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स) द्रिवक्रीभवनाचें (डबल रिफ्रॅक्शन) सामर्थ्य, प्रकाश-अक्षाचा (ऑप्टिक अ‍ॅक्शल अँगल) कोन व द्रव्याच्या कांहीं बाजूवर प्रकाशकोनाचा अभाव इत्यादि गुणधर्मांचें अगदीं बरोबर रीतीनें मोजमाप करतां येतें. पारदर्शकत्व या गुणाचें मापन करून त्या योगानें खनिज द्रव्याच्या जातीसंबंधीं अनुमान काढतात. रंगाकडेहि विशेष लक्ष पुरवावें लागतें. परंतु रंग हा महत्वाचा गुणधर्म नसून त्याची गौण गुणधर्मांत गणना केली आहेः कारण रंगाचे प्रकार आणि छटा अनेक आहेत व एकाच द्रव्याच्या अंगीं भिन्न भिन्न रंग व छटा असूं शकतात. एखाद्या द्रव्यांत भिन्न भिन्न जातीचीं विभिन्न द्रव्यें आणि सूक्ष्म प्रमाणांत व या सूक्ष्म द्रव्यंच्या योगानेंहि पदार्थास निरनिराळे रंग व छटा येतात. द्रव्यांस रंग आणणारे पदार्थ इतक्या सूक्ष्म प्रमाणांत असतात कीं, त्यांचे पृथक्करण करून ते निश्चित प्रमाणांत ठरविणें कठिण असतें. हिरे आदीकरून मौल्यवान वस्तूंची किंमत त्यांच्या रंगावर आणि पाण्यावर अवलंबून असते. वर सांगितलेंच आहे की, रंग हा खनिज द्रव्यांच्या संबंधानें क्षुलज्क गुणधर्म गणला आहे, म्हणजे रंगावरून खनिज द्रव्याची योग्य पारख होऊ शकत नाहीं. पारदर्शक स्फटिकाकडून निरनिराळया दिशेनें येणारे प्रकाश किरण भिन्न भिन्न प्रमाणांत अपशोषण केले जातात, यामुळें स्फटिकाकडून निरनिराळया दिशेंने भिन्न भिन्न रंगांचीं किरणें बाहेर पडतात; याला द्विवर्णत्व (डायक्रोइझम) किंवा बहुवर्णत्व (प्लिक्रोओइझम) असें नाव दिलें गेलें आहे. खनिज द्रव्याचा खरा रंग कळण्याकरितां त्या द्रव्यांवर घर्षणानें चरा (रेघ) पाडून त्याचा रंग पहाण्याचा प्रघात आहे. एखादा खनिज द्रव्याची चकाकी किंवा तेज पाहून त्यावरूनहि त्या द्रव्याच्या विषयीं अनुमान काढतां येतें. परंतु या योगानें शास्त्रीय परीक्षा योग्य प्रकारें होईलच असें नाहीं. कित्येक खनिजद्रव्यें लोहचुंबकाकडून जोरानें आकर्षिलीं जातात. तसेंच भिन्न भिन्न खनिज द्रव्यें भिन्न भिन्न प्रमाणांत विद्युत्प्रवाहास विरोध करितात. ज्या द्रव्यांच्या अंगी धातूप्रमाणें तेज असतें. त्या खनिज द्रव्यांपैकी ब-याच द्रव्यांच्या अंगी विद्युद्वाहक गुण असतोः इतरांच्या अंगीं बहुतकरून विद्युद्विरोधक गुण असतो. उदाहरणार्थ ग्राफाइटच्या अंगीं विद्युतद्वाहक गुण आहे, परंतु हि-याच्या अंगीं विद्युद्विरोधकत्व आहे. कित्येक खनिज स्फटिक उष्णतेच्या किरणांस आपल्यांतुन अव्याहत जाऊं देतात. कांहीं खनिज द्रव्यांचे वितळण्याचे बिंदू पुढें दिले आहेतः-

स्टिब्नैट ५२५ शतांश
नाट्रोलैट ९६५ ''
आल्मान्डाइन १२६५ ''
आक्टिनोलाइट १९९६ ''
आर्थोक्लेज ११७५ ''
ब्रान्झाइट १३०० ''
क्वार्टझ १४३० ''


यांपैकी पहिला स्टिब्नैट हा मणेबत्तीच्या ज्वालेंत वितळूं शकतो; परंतु शेवटचा क्वार्टझ हा अति प्रखर ज्वालेंत सुद्धा (भट्टीच्या ज्वालेंत) सुध्दां मोठ्या कष्टानें वितळूं शकतो.

अ ण्वा क र्ष णा व र अ व लं बू न अ स णा रे गु ण ध र्म- कित्येक खनिज द्रव्यांच्या अंगीं उत्तम प्रकारची स्थितिस्थापकता असते; असलीं द्रव्यें वांकविली असतां वांकतात परंतु त्यांच्या वरील दाब काढून घेतला असतां ती मूळचा आकार धारण करितात. अभ्रक हें अशा प्रकारचें द्रव्य आहे. दुसरीं कांही द्रव्यें सहज वांकवितां येतात; परंतु हीं परत पूर्वस्थितीला जात नाहीत. अशा प्रकारच्या द्रव्यांना लवचीक द्रव्यें म्हणतात. टाल्क हें या वर्गांतील द्रव्य होय. क्लोरार्गिराइटसारखीं कांही द्रव्यें सुरीनें कापतां येतात. कांपता कपतां हीं द्रव्यें फुटत नाहींत. या छेदनशीलतेच्या गुणाशीं संबद्ध असे दुसरे गुण म्हणजे धनवर्धनीयता (उदाहरण आर्जेंन्टाइट) व तन्तुभवनयोग्यता (उ० चांदी) हे होत. निरनिराळया खनिज द्रव्यांच्या चिवटपणांत अथवा ठिसूळपणांत पुष्कळच फरक दिसून येतो. खनिज द्रव्य फुटलें असतां फुटलेल्या तुकडयाचें छेदांग द्रव्यभेदाप्रमाणें भिन्न स्वरूपाचें दिसतें. या कारणानें छेदांगाच्या स्वरूपावरून द्रव्य कोणतें तें निश्चित करण्यांत मदत होते. स्फटिकीभूत खनिजांचा असा एक महत्वाचा नैसर्गिक धर्म आहे की, त्यांना फोडल्यानें जे त्याचे खंड होतात त्यांचा प्रत्येकाचा कांही विशिष्ट निश्चित आकार असतो व द्रव्यभेदाप्रमाणें तो भिन्न भिन्न असतो. उदाहरणार्थ गलीना द्रव्याचे खंड नेहमी घनाकार पडतात. या खंडधर्मावरून खनिज द्रव्यें ओळखण्यास फार मदत होते. खनिजांचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे टणकपणा, दाढर्य किंवा काठिण्य होय. खनिजपरीक्षणाच्या कामीं या कमी अधिक गुणाचा उपयोग करण्याचा फार प्रघात आहे. द्रव्यांचे कमी अधिक काठिण्य एका पदार्थानें दुस-या पदार्थावर चरा उठण्याच्या क्रियेवरून ठरविलें जातें. एका स्फटिकांचे काठिण्य व त्याच जातीच्या मृत्तिकायुक्त स्फटिकसमूहांचे काठिण्य वेगवेगळें असतें. ही गोष्ट परीक्षण करतांना लक्षांत ठेवावी लागते. एफ् मोह यानें १८२० मध्यें एक काठिण्यक्रमपत्रक तयार केलें. या पत्रकावरून खनिजांचे कमीअधिक काठिण्य आंकडयांनी सांगतां येतें.

मोह याचें काठिण्यपत्रकः- १ टाल्क (संगजिरा) २ जिप्सम (शिरगोळा), ३ काल्साइट (चुना, खडू इत्यादि), ४ फ्लुअर स्पार (गारगोटीसारखें एक द्रव्य), ५ अ‍ॅपाटाइट, ६ आर्थोक्लोज, ७ क्वार्टझ्  (चकमकी वगैरे), ८ टोपॅझ (पुष्पराग), ९ कोरंडम (नीलमणि), १० हिरा. या यादींत टाल्क सर्वांत नरम (काठिण्य = १), जिप्सम त्याहून कठिण (काठिण्य= २) व या क्रमानें हिरा सर्वांत कठिण (काठिण्य= १०) समजावा. जिप्समच्या तुकडयानें टाल्कला खरवडलें तर चरा उठतो. याप्रमाणें प्रत्येकासंबंधानें समजावें. शेवटचा हिरा हा सर्वांत जास्त कठिण आहे हें उघड आहे. या यादींप्रमाणें एखाद्या खनिजानें जिप्समवर चरा पडत असला व काल्साइटचा या खनिजावर चरा पडत असला तर त्याचें काठिण्य २ व ३ यांच्यामध्यें म्हणजे अडीच आहे असें मानतात.

विशिष्टगुरुत्वः- घनत्व किंवा विशिष्टगुरुत्व हा गुण फार महत्वाचा आहे. खनिज द्रव्याची (रासायनिक) घटना सारखी असेल तर विशिष्टगुरुत्व मापून त्यायोगानें पदार्थांविषयीं अनुमान काढतां येतें. हे विशिष्टगरुत्व मापण्याच्या मुख्य तीन रीती आहेत. जलाचा उपयोग करून मापण्याची पद्धत, पिक्नामिटर नांवाचें गुरुत्वमापक यंत्र व जड द्रवरूप पदार्थाचा उपयोग करून विशिष्टगुरुत्व काढण्याची रीत. खनिज द्रव्याचा तुकडा मध्यम आकाराचा असेल तर जलाचा उपयोग करून विशिष्टगुरुत्व काढतां येतें. जर खनिज द्रव्याचे अगदीं बारीक तुकडे असतील तर पिक्नामिटरचा उत्तम उपयोग होतो. द्रवरूप जड पदार्थांच्या योगानें लवकर आणि अतिसुलभतेनें विशिष्टगुरुत्व काढता येतें. हें कसें काढतात याविषयीं थोडक्यांत पुढें माहिती दिली आहे. मिथिल आयोडाइड नांवाचें स्वच्छ, प्रवाही जड द्रव्य आहे. याचें विशिष्टगुरुत्व ३.३३ आहे. यांत बेन्झिन नांवाचा द्रव थेंबथेंब घालून त्याचें विशिष्टगुरुत्व वाटेल तितकें कमी करता येतें. खनिज द्रव्याचा एक लहानसा तुकडा घेऊन तो मिथिल आयोडाइडमध्यें घालतात. जर त्या तुकडयांचें विशिष्टगुरुत्व मिथिल आयोडाइडपेक्षां कमी असेल तर तो तुकडा त्या द्रवावर तरंगतो, परंतु त्या द्रवांत बेन्झिन थेंब थेंब घालून त्या द्रवाचें गुरुत्व योग्य तितकें कमी केलें तर तो तुकडा त्या मिश्रणांत बुडूं शकतो. अशा प्रकारें त्या मिश्रणांत बेन्झिनचे किती थेंब मिळविले असतां योग्य त्या प्रकारचे विशिष्टगुरुत्व येतें हें काढतात व त्यावरून त्या मिश्रणाचें विशिष्टगुरुत्व काढतां येऊन त्या योगानें खनिज द्रव्याचें विशिष्ट गुरुत्वहि निश्चित करतां येतें. मिश्रणाचें गुरुत्व निश्चित करण्याची दुसरी एक पद्धत आहे; त्या मिश्रणाचें वजन वजा करितात व त्यांतून मिळविलेल्या बेन्झिनचें वजन वजा करितात; त्या योगानें मिथिल आयोडाइड आणि बेन्झिन यांचें प्रमाण कळतें व त्यावरून त्या मिश्रणाचें विशिष्टगुरुत्व कळतें. याखेरीज ज्याचें विशिष्ट गुरुत्व निश्चितपणें माहीत आहे असे कांही तुकडे जवळ ठेवलेले असतात. उदाहरणार्थ पुढील द्रव्याचे तुकडे विशिष्ट गुरुत्व निश्चित करणारे शास्त्रज्ञ बहुधा जवळ ठेवितात.

द्रव्याचें नांव विशिष्ट गुरुत्व
जिप्सम २.३२
कोलेमानाईट २.४२
आर्थोक्लासे २.५६
क्वार्टझ २.६५
काल्साईट २.७२
आरागोनाईट २.९३
रुबेलाइट ३.०२
अपाटाईट ३.२०
डायोटासे ३.३२


वरील द्रव्याचे तुकडे बुडण्याइतकी मिथिल आयोडाइडची स्थिति प्राप्त झाली असतां त्या तुकडयाच्या विशिष्टगुरुत्वाइतकें विशिष्टगुरुत्व किंवा जवळ जवळ तितकें विशिष्टगुरुत्व त्या मिश्रणाचें असतें हें उघड आहे.

स्पर्श चव आणि वास- खनिज द्रव्याचा स्पर्श, चव किंवा वास घेऊन कित्येकदा त्याची पाखर करतां येते. उदाहरणार्थ टाल्क म्हणजे संगजिरा हा हातास मऊ लागतो. परंतु ट्रिपोलाईट व ट्राकाइट हे हातास खरखरीत लागतात. कित्येक सच्छिद्र खनिज द्रव्यें जिभेस चिकटतात. या प्रकारच्या खनिज द्रव्यांत वाळलेला चिखल आणि हायड्रोजन फेन हे येतात. रत्‍नें चकाकतात, व त्यांचा स्पर्श कांचेच्या रत्नांपेक्षां जास्त थंड असतो. बिटयुमेन आणि कांहीं चिखल हे पाण्यांत भिजविले असतां त्यांचा एक विशिष्ट वास येतो व त्या योगानें त्यांची पारख करतां येते. पायराइट्स आणि दुसरीं कित्येक खनिज द्रव्यें घांसली असतां गंधकमय वास येतो. जी खनिज द्रव्यें पाण्यांत विरघळूं शकतात त्यांस चव असते.

रा सा य नि क वि शे ष गु ण ध र्म.- रासायनिक गुणधर्म हे फार महत्वाचे आहेत. या रासायनिक गुणधर्मांच्या सहाय्यानें आधुनिक खनिजविज्ञानांतील द्रव्यांचें वर्गीकरण बसविलें आहे. तथापि केवळ रासायनिक घटनेच्या योगानें कोणत्याहि द्रव्याची वर्गवारी लावतां येणार नाहीं. कारण असे कित्येक खनिज पदार्थ आहेत कीं, ज्याच्यांतील रासायनिक घटकावय अगदीं सारखे आहेत. परंतु त्यांना एकाच वर्गात घालतां येत नाहीं. उदाहरणार्थ ग्राफाइट (म्हणजे कार्बनची एक जात) आणि हिरा यांचे रासायनिक घटकावय अगदीं एकच आहेत; परंतु त्या योगानें त्यांचा एकच खनिजवर्ग होऊं शकत नाहीं. कॉल्साइट आणि अरागोनाइट हे दोन्हीहि कल्सिअम कार्बोनेट नावाच्या द्रव्यापासून तयार झाले आहेत. परंतु हे दोन्ही पदार्थ भिन्नभिन्न वर्गांत मोडतात. अशा ठिकाणीं खनिजद्रव्याच्या स्फटिकाविषयीं कांहीं माहिती असणें जरूर असतें. खनिज द्रव्याचे घटकावयव एक असतांना सुध्दां तो पदार्थ किती निरनिराळया स्फटिकाकृती धारण करूं शकतो याची माहिती असावी लागते.

रसायनशास्त्रज्ञास आतांपर्यंत उपलब्ध झालेली सर्व मूलद्रव्यें खनिजद्रव्यांत सांपडलेलीं आहेत व या मूल द्रव्यांपैकी काहीं मूलद्रव्यें आपणांस खनिज द्रव्यांतूनच काढून घ्यावीं लागतात कारण तीं द्रव्यें आपणास सेंद्रिय द्रव्यांतून मिळूं शकत नाहींत. नैट्रोजन हा सेंद्रिय द्रव्यांत फार विस्तृत प्रमाणांत आढळतो, परंतु हाच नैट्रोजन खनिजद्रव्यांत सांपडणें अत्यंत दुर्मिळ आहे. कार्बोनेट या नांवाखांली मोडणा-या खनिज द्रव्यांत कार्बन हा विस्तृत प्रमाणावर सांपडतो. पृथ्वीच्या कठिण कवचात (खाणी खणत असतांना आपण जों जों पृथ्वीच्या पोटांत जावें तों तों पृथ्व्यन्तर्गत भागाची उष्णता वाढत गेलेली आढळून येते. यावरून शास्त्रज्ञांनीं असें अनुमान बसविलें आहे कीं, पृथ्वीचा पृष्ठभाग घनावस्थेंत असून अंतर्भाग प्रवाही स्वरूपांत असावा). कोणकोणतीं द्रव्यें काय प्रमाणात असावींत याच्या संबंधानें शास्त्रज्ञांनीं प्रायोगिक व इतर प्रमाणांच्या सहाय्यानें पुढील आकडे प्रसिद्ध केले आहेत. पृष्ठभागांपैकीं शेंकडा ४७ भाग (वजनी) ऑक्सिजन आहे शेंकडा (वजनी) २७ भाग सिलिकान आहे. शेंकडा आठ भाग अल्युमिनम आहे. सिलिकोट किंवा अल्युमिनो सिलिकेट नांवाचीं द्रव्यें खडकासारख्या द्रव्यांतून फार मोठया प्रमाणावर आढळतात.

खनिजद्रव्यांचे रासायनिक घटकावय काढण्याकरितां रसायनशास्त्राच्या नेहमींच्या पद्धतीनें पृथक्करण करतात. खनिज द्रव्यांत भिन्न भिन्न प्रकारचीं द्रव्यें मिसळलेलीं असण्याचा बहुधा संभव असतो. म्हणून त्या त्या जातीचें शुद्ध स्वरूपाचें खनिज द्रव्य शोधून काढणें बरेंच कठिण असतें याच कारणामुळें कित्येक खनिज द्रव्यांची अगदीं बरोबर अशी रासायनिक घटना अद्यापपर्यंत कळली नाहीं. याकरितां प्रथमतः शुद्ध अशा प्रकारचा स्फटिक घेऊन त्याच्या थोडयाशा अंशाचें रासायनिक पृथक्करण करून पहाण्यापूर्वीं त्या स्फटिकाच्या आकारदिकांची उत्तम प्रकारें परीक्षा करून ठेवितात. जेव्हां खनिज पदार्थ अल्प प्रमाणांत उपलब्ध अंसेल आणि त्याचे गुणविषयक पृथक्करण करावयाचें असेल त्या वेळेस सूक्ष्म रासायनिक पृथक्करणपद्धति आणि वाहकज्वाला याच्या साहाय्यानें पृथक्करण करतात.

समाकारत्वाच्या तत्वाकडे विशेष लक्ष्य दिल्याखेरीज या शास्त्रांज्ञांतील वर्गीकरण कळणार नाहीं. क्वार्टझसारख्या खानिज द्रव्यांत समकारत्व दिसत नाहीं म्हणजे त्यांतील भस्म किंवा आम्ल यांची दुस-या खनिज द्रव्यांतील अनाम्ल किंवा आम्ल यांच्याशीं अदलाबदल होऊं शकत नाहीं. परंतु बहुतेक सर्व खनिज द्रव्यांत अशा प्रकारची अदलाबदल नेहमीच होते किंवा झालेली असते. अशा प्रकारच्य अदलाबदलींत बहुतकरून अनाम्लाचीच अदलाबदल होते. कित्येक खनिज द्रव्यांत ही पूणपणें न होता फत्त कांहीं अंशानें होते तसेंच ही अदलाबदल किती प्रमाणानें व्हावी याच्या संबंधानें कांहींत निश्चित मर्यादा असते, परंतु कांहीत अशी मर्यादा असत नाहीं र्‍हांबोहेड्रल कार्बोनेट या नांवाखाली मोडणा-या खनिज द्रव्यांत अनाम्लाची अदलाबदल विशिष्ट प्रमाणांत होते. परंतु सिलिकेटसारख्या द्रव्यांत अनाम्लाची अदलाबदल अनियमित प्रमाणांत झालेली दिसून येते.

या वरील प्रकाराशिवाय द्विलवण म्हणजे डबलसॉल्ट नांवाचीं खनिज द्रव्यें असतात. द्विलवणत्वविशिष्ट द्रव्यांत डोलोमाइट आणि बारिटो कॉल्साइट हीं दोन द्रव्यें मोडतात.

खनिजद्रव्यांत जल हें कोणत्या प्रकारानें संयुक्त झालें असतें हें ठरवितां येणेंहि कठिण आहे. झिओलाइट नांवाच्या द्रव्यांतील पाणी कमी उष्णमानावर उडून जातें; व हा पदार्थ सल्फ्युरिक अ‍ॅसिडाच्या पात्रांत असला तर तें अ‍ॅसिड त्यांतील जलाचें शोषण करून घेऊं शकतें व हा पदार्थ अनार्द्र करून (अनाहायड्रस) हवेंत ठेविला तर त्यांत फिरून जलाचा प्रवेश होऊं शकतो. या सा-या प्रकारामुळें झिओलाइट किंवा एतत्सदृश द्रव्य यांच्यांतील जलास ''स्फटिकीभवनाचें जल'' अशी संज्ञा आहे. दुस-या कित्येक द्रव्यांतील जल काढून घेण्यास अति उष्ण्ता लागते म्हणून त्या द्रव्यांतील जलास 'घटनेचें जल' अशी संज्ञा आहे. कित्येक द्रव्यांत असलेल्या जलापैकीं कांहीं जलांश स्फटिकीभवनाचें जल असतें व कांही जलांश घटनेचें जल असतें. खनिज द्रव्यांच्या रासायनिक घटनेसंबंधानें पृथक्करण करून निश्चित असें कांहींच सिद्ध झालें नाही. प्रत्येक शास्त्रज्ञाच्या पृथक्करणांत भिन्न भिन्न प्रमाणांत मूलद्रव्यें सांपडलीं आहेत; त्यामुळें यांत अझून पुष्कळ परिश्रम व्हावयास पाहिजेत हें उघड आहे.

ख नि ज द्र व्यें त या र क र णें.- प्रयोगशाळेंत खनिज द्रव्यें तयार करण्यांत रसायनशास्त्रज्ञांस बरेंच यश आलें आहे; व या बाबतींत फ्रेंच शास्त्रज्ञ सर्व जगांत सध्यां अग्रेसर आहेत. त्यांनीं बरींच खनिज द्रव्यें तयार केलीं आहेत. या कृत्रिम खनिज द्रव्यांपैकीं बहुतेक सारीं द्रव्यें स्फटिक स्वरूपांत असलेली अशीं आहेत. या कृत्रिम स्फटिकांचा आकार नैसर्गिक स्फटिकापेक्षां थोडासा लहान असतो. परंतु त्यांच्या अंगीं नैसर्गिक स्फटिकांचे सारे गुणधर्म आढळून येतात.

ख नि ज द्र व्यां चीं मू ल स्था नें आ णि उ त्प त्ति.- कित्येक खनिज द्रव्यें अग्निजन्य खडकांत सांपडतात. या अग्निजन्य खडकांत हीं खनिज द्रव्यें नाना प्रकारांनी तयार होतात. या अनेक प्रकारांत दाब, उष्ण, वायुरूप द्रव्यांचें घनरूप द्रव्यांत रूपांतर होणें, उष्णतेच्या सहाय्यानें रासायनिक क्रिया घडणें, द्रव्य शीत होत असतांना त्याचे स्फटिक तयार होणें इत्यादि अनेक प्रकारांचा समावेश होतो. ज्वालामुखीचा उद्रेक किंवा दुस-या कांही कारणानें पृथ्व्यंर्तगत द्रव्य बाहेर पडणें किंवा शीत होणें इत्यादि कारणांनीं अग्निजन्य खडक तयार होतात व त्यायोगानेंच हीं द्रव्यें तयार होतात.

आकारवैशिष्टयजन्य खडकांत तयार झालेलीं खनिज द्रव्यें:- पृथ्व्यन्तर्गत दाहाच्या योगानें सभोंवतालच्या खडकावर परिणाम होतो व त्यायोगानें सभोंवतालचे खडक भाजून निघतात; या भाजण्याच्या क्रियेनें अनेक प्रकारचीं रूपांतरें होतात.

गाळाच्या थरानें तयार झालेले खडकः- पाऊस, द्रव, हिम, उष्णता, वारा इत्यादि अनेक नैसर्गिक कारणांनीं पृथिवीच्या पृष्ठभागावरील खडक झिजतात व पावसानें हे झिजलेले भाग धुवून जाऊन खोलगट भागांत गाळाच्या रूपानें जमतात; हे एक प्रकारचे खडकच होत. समुद्रादिकांत विद्राव्य झालेलीं खनिज द्रव्यें पाण्यांतून खालीं बसतात व त्यांचे कठिण किंवा मृदु खडक होतात.

रेषास्वरूपाचीं खनिज द्रव्यें:- निरनिराळया खडकांतून पाणी पाझरतें. हें पाणी निरनिराळया द्रव्यांतून फिरत असतांना त्याबरोबर अनेक द्रव्यें विद्रुत झालेलीं किंवा नुसतीं मिश्रित होतात. नंतर हीं विद्रुत झालेलीं किंवा मिश्रित झालेली द्रव्यें खडकाच्या भेगांतून बसतात व त्या योगानें अनेक प्रकारच्या खनिज द्रव्यांची उत्पत्ति होते.

ख नि ज द्र व्यां च्या पो ट जा ती.- वरील प्रकारांपैकीं कोणत्या तरी एखाद्या प्रकारानें खनिज द्रव्यें उत्पन्न झाल्यानंतर त्यांवर दाब, उष्णता व विद्रुत स्वरूपांत विशिष्ट द्रव्यें यांच्या योगानें त्या खनिजद्रव्यांच्या स्फटिकाकारांत फेरफार होतात किंवा त्यांच्या रासायनिक घटनेंत बरेच बदल होतात, किंवा मूळचीं खनिज द्रव्यें किंवा त्यांतील कांहीं भाग विद्रुत होतात व नवीन खनिज द्रव्यें तयार होतात.

ख नि ज द्र व्या चें ना म क र ण आ णि व र्गी क र ण.- खनिज द्रव्यांचा स्फटिकाकार आणि रासायनिक घटना यांच्यावर खनिज द्रव्यांचें वर्गीकरण अवलंबून असतें. ज्या खनिजद्रव्यांची रासायनिक घटना निश्चित असते त्यांच्या जाती थोडया असतात; परंतु ज्या ठिकाणीं खनिज द्रव्यांच्या घटकावयांची अदलाबदल झालेली असते त्या ठिकाणीं त्या अदलाबदलीच्या योगानें इतक्या जाती उत्पन्न होतात कीं, खनिज द्रव्यांतील भिन्नभिन्न द्रव्यांचे वैशिष्टय दाखवून त्यांचें स्पष्ट वर्गीकरण करणें बरेंच कठिण जातें व कित्येक ठिकाणीं हे बहुतेक अशक्य आहे.

कांहीं स्फटिकांचीं नांवे- चौरस (घन), चतुष्कोण, सरल चतुष्कोण, एकवलनात्मक, षट्कोनाकृति, विषमपार्श्व, असमभुज चतुष्कोण इत्यादि.

ख नि ज द्र व्यां चें व र्गी क र ण.- निसर्गसिद्ध मूलतत्वें (अ) अधातुवर्गः- हिरा, ग्रफाइट, गंधक. (आ) अर्धधातुवर्ग- आर्सेनिक, अ‍ॅन्टिमनी, बिस्मथ. (इ) धातुवर्गः- सोनें, रुपें, तांबें, प्लाटिनम. या प्रकारानेंच सल्फाईड, ऑक्साईड वगैरेंचें वर्गीकरण करतात.

[संदर्भग्रंथः- डाना-मिनरल्स अँड हौ टु स्टडी देम; ब्रौन्स दि मिनरल्स किंगडम; इड्डिंग्स- रॉक मिनरल्स, दि मिनरॅलॉजिकल मॅगेझाईन अँड जर्नल ऑफ दि मिनॅरॅ सोसायटी; लंडन, ग्रेटब्रिटन, आयर्लंड, फ्रान्स, जपान वगैरे मोठमोठया देशांतील खनिज द्रव्यासंबंधी विवेचनात्मक ग्रंथ स्वतंत्र लिहिलेले आहेत.]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .