प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खनिखोदनशास्त्र- जमीनच्या पोटांतील खनिजद्रव्यें शोधून व खणून काढण्याचें शास्त्र. या शास्त्राची व्याप्ति केवळ भूगर्भांतील खनिज पदार्थ शोधून काढण्यापरतीच नसून भूपृष्ठावरील पदार्थांचें खनन करण्याचाहि या शास्त्रांत अंतर्भाव होतो. खननशास्त्राचे मुख्यतः तीन पोटभाग पडतात. (१) खनिजपदार्थ शोधून काढणें. (२) खनिजपदार्थांचें शास्त्रीय संशोधन करणें व खनिखोदनाची सामग्री जमविणें व (३) खाणी चालविणें. या तिस-या पोटभागांत खनिजपदार्थ खणून वर काढण्याचीं साधनें व पद्धति, खनिजपदार्थ काढणा-या लोकांसाठीं सरकारनें केलेले कायदे, खाणी खणतांना होणारे अपघात व तन्निवारणार्थ अपाय इत्यादि बाबींचा समावेश होतो.

ख नि ज प दा र्थ शो ध न- खनिज पदार्थांचा शोध काढणें हें काम फार अवघड आहे. कोणत्या ठिकाणीं कोणता खनिज पदार्थ सांपडूं शकेल याचा अंदाज करण्याला भूस्तरशास्त्राचें खोल ज्ञान असावें लागतेंच. पण त्या बरोबरेंच रसायशास्त्राचेंहि ज्ञान आवश्यक आहे. खनिज पदार्थांचा शोध काढण्याचें काम साहसी संशोधकाशिवाय दुस-याच्या हातून होणें अशक्य आहे. अशा प्रकारच्या साहसी संशोधकाला डोंगरांतील खडकांचें सूक्ष्म अवलोकन करावें लागते व जमीनींतील मातीचें पृथक्करण करावें लागते. कांही विशिष्ट प्रकारच्या जमीनींत विशिष्ट प्रकारचीं झाडें उगवतात. त्या झाडांवरून त्याला त्या जमीनीच्या गर्भांत कोणती खनिज संपत्ति असूं शकेल याचाहि विचार करावा लागतो. पाण्याच्या तळाशी सांचलेल्या गाळावरूनहि त्याला एखाद्या खनिज पदार्थांच्या स्थानाविषयीं तपास लागण्याचा संभव असतो. तात्पर्य खनिज पर्दार्थांचा अंदाज काढणे हें अतिशय सूक्ष्म बुध्दीचें व प्रयासाचें काम आहे.

ख नि ज प दा र्थां चें सं शो ध न व सा म ग्री- अशा रीतीनें खनिज पदार्थ अमच्या ठिकाणीं सांपडूं शकेल असा अंदाज काढल्यानंतर त्या स्थानाची संपूर्ण माहिती मिळविणें हें दुसरें काम होय. यासंबंधी खालील प्रकारची माहिती मिळविणें जरूर आहे. (१) खनिजसंपत्ति असलेल्या स्थानाचें क्षेत्रफळ; खनिज द्रव्याची व्याप्ति व त्यांचे मूल्य, (२) खनिज पदार्थाच्या स्थानांपैकीं खणण्याला योग्य असलेला भाग,  (३) खननकामाला लागणारा खर्च व खननासाठीं स्वीकारावयाच्या पद्धती. खनिजपदार्थांचें संशोधन करण्याची सर्वांत सुलभ पद्धति म्हणजे संशोध्य स्थानाचा पृष्ठभाग बारकाईनें तपासणें होय. जमीनीचा पृष्ठभाग थोडासा खणून पाहिला असतां क्वचित् प्रसंगीं पुष्कळ महत्वाचा शोध लागण्याचा संभव असतो. निदान संशोध्य स्थान हें खणण्याला योग्य आहे किंवा नाहीं ही तरी माहिती बहुतेक मिळूं शकते. पण कांहीं वेळां या भूपृष्टखननाचा बिल्कुल उपयोग होत नाहीं. अशा वेळीं भूगर्भखननाची जरूरी उत्पन्न होते. उदाहरणार्थ कांही खनिज पदार्थांच्या अगर धातूंच्या शिरा चटकन लागत नाहींत. त्या जमिनीच्या खालीं ब-याच खोल असतात. अशा वेळीं जमिनींत बरेंच खोल भोंक पाडून नंतर तेथील थर तपासणें अधिक उपयुक्त असतें. उदाहरणार्थ मीठ, लोखंडाचे दगड इत्यादि पदार्थांचें संशोधन करावयाचें असल्यास, जमिनीच्या गर्भांत भोंक पाडणें जरूर असते. संशोध्य स्थनांमध्यें निरनिरसळया ठिकाणी भोकें पाडून त्यावरून खनिज पदार्थांचे संशोधन करावें. म्हणजे साधारणतः अंदाज चुकत नाहीं. भूपृष्ठखननानें जेव्हां आपल्याला खनिज पदार्थासंबंधीं पूर्ण माहिती मिळते अशा वेळींहि भूपृष्ठखननाचा मार्ग स्वीकारला असतां त्याचा उपयोग अधिक होतो. एखादे वेळीं असें घडतें की, नुसत्या भूपृष्ठखननाच्या योगानें आपल्याला धातूंच्या शिरा लागतात; त्यावरून आपण अंदाज करतो. पण तो अंदाज एखाद्या वेळीं चुकीचा ठरण्याचा संभव असतो. कारण भूगर्भांत या धातूंच्या दगडांबरोबरच दुसरे काही अवशेष मिसळलेले आसतात; व हे आपल्याला केवळ भूपृष्ठखननानें कळून येत नाहीं. अशा वेळीं भूगर्भखननाचा अधिक उपयोग होतो. कांहीं प्रसंगीं हे भूगर्भखनन फार खोलपर्यंतहि न्यावें लागतें.

अशा रीतीनें खनिज पदार्थांचें संशोधन झाल्यानंतर, त्या भागापर्यंत जाण्यासाठीं खड्डे, अगर बोगदे खणण्याच्या कामाला सुरवात होते. ज्या ठिकाणीं खाणीच्या क्षेत्रांत पुष्कळशा खोल द-या   असतात अशा ठिकाणी बोगदे खणण्यासापासून उपयोग होतो. पण खाणीच्या पृष्ठभागाच्या खालीं खनिज पदार्थ असतो त्या वेळीं खड्डा खणणें जरूर होतें. जेव्हां खनिज पदार्थांच्या शिरा वरवर लागतात त्या वेळी आडवा खड्डा खणणें अधिक सोईचे पडतें. इतर वेळी मात्र उभा खड्डा खणावा लागतो. खनिज पदार्थांच्या थरांची जाडी बरीच असेल तर पायथ्याच्या भिंतीमध्यें खड्डा अगर बोगदा खणणें आवश्यक होतें. खाणीचा मुख्य भाग सुरक्षित रहाण्याकरितां मध्यंतरी खनिज पदार्थांचे खांब सोडण्याची पद्धत आहे.

अशा रीतीनें खाणी खणण्यापूर्वींची सर्व तयारी झाल्यावर मग प्रत्यक्ष खाणी खोदून खनिज पदार्थ काढण्याला सुरवात होते. खनिखोदनाचे पुष्कळ प्रकार आहेत. पुष्कळ प्रकारांपैकी कोणता प्रकार अंमलांत आणावयाचा हें खनिज पदार्थांचे गुणधर्म, खडकाची जाडी, इत्यादिकांची तपासणी करून ठरवावें लागतें. जो प्रकार कमी खर्चाचा होईल तोच प्रकार अमलांत आणणें अत्यंत जरूर आहे. खाणी खोदण्याच्या बाबतींत खाणी खोदणा-या मजुरांवर होणारा खर्च महत्वाचा आहे. याशिवाय खनिज पदार्थ वर नेण्यासाठी लागणारे श्रम व खर्च याहि गोष्टी महत्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी लक्ष्यांत घेऊन कमी खर्चाची पद्धति स्वीकारणें अत्यंत अगत्याचें आहे.

खाणी खोदण्याची जागा शक्य तितकी विस्तृत असणें जरूरीचें आहे. पण खडकाची जाडी व खालील भागाची वरचें वजन तोलून धरण्याची शक्ति यांवरून खाणी खोदण्याच्या जागेची मर्यादा ठरवावी लागते. खडक जर फार जाड व कठिण असतील तर खाणींतील काम करण्याचें क्षेत्र १०० ते २०० फूट रुंदीचें असावें लागतें. खडक पातळ असतील तर क्षेत्राची रुंदी २० ते ३० फूट असते. क्षेत्राच्या लांबीची मर्यादा, ही खाणी खोदण्यास लागणारा वेळ, खाणी खोदण्याचा वेग व खनिज पदार्थ वर नेण्याला लागणारा वेळ, खाणी खोदण्याचा वेग व खनिज पदार्थ वर नेण्याला लागणारा वेळ यांवरून ठरविली जाते. 'लाँगवॉल' अथवा मोठीं दालनें ठेवून खणण्याच्या पद्धतींमध्यें व ज्या खाणींमध्यें खांब मध्यें ठेवून मधून मधून खणण्यांत येतें अशा खाणींमध्यें काम करण्याचें क्षेत्र बरेंच लहान असतें.

खाणींतील खनिज पदार्थ पूर्णपणें खोदून काढणें हें जरी इष्ट आहे तरी तसें करण्याला अतिशय खर्च येतो. ज्या खाणींत खनिज पदार्थ विपुल असतो अशा खाणींत खाणीचा वरचा भाग तोलून धरण्यासाठीं बराचसा खनिज पदार्थांचा भाग खांब ठेवण्यासाठी वगळावा लागतो. खनिखननाचा पूर्वेतिहास पाहिला असतां खनिखोदन हें पद्धतशीर रीतीनें होत असल्याचें आढळून येत नाहीं. पण हल्लीं पद्धतशीर रीतीनें खाणी खणण्याची पद्धत अस्तित्वांत आली आहे व त्यामुळें श्रम व खर्च या दोन्ही दृष्टींनीं खाणी खोदण्याचें काम अधिक किफायतशीर झालें आहे. हल्लींची खनिखोदनाची पद्धत फार सोपी आहे. एखादी मोठी खाण खोदावयाची असल्यास हल्लीं खाणीच्या क्षेत्रांत अनेक ठिकाणी एकदम खणण्यास सुरुवात करतात. खाणींचा वरचा भाग तोलून धरण्यासाठी मध्यंतरीं मोठ-मोठे खांब उभारलेले असतात व बाकीची सर्व खाण खोदून झाली की नंतर मध्यंतरी सोडलेले खांब खोदण्यांत येतात. उथळ खाणीमध्यें हे खांब लहान आकाराचे असतात. ते पाडण्याला व त्यांतील खनिज पदार्थ काढण्याला फारसा त्रास पडत नाहीं पण, खोल व विस्तृत खाणींतील खांब फार मोठे असल्यानें ते पाडणें फार जोखमीचें असतें. अशा वेळी सागवानी लांकडाचे भले मोठे खांब उभरून वरचा भाग तोलून धरून नंतर मग खनिज पदार्थांचे खांब पाडण्याचें काम करतात.

खनिज पदार्थ जर फारसा कठिण नसेल तर अशा खनिज पदार्थांच्या खाणींत मोठमोठे खांब असावे लागतात. उदाहरणार्थ कोळशाची खाण. अशा खाणी खोदण्याच्या कामांत 'रूम ऍन्ड पिलर' अथवा खोलीपद्धत अंमलांत आणावी लागते. (या पद्धतीविषयींची माहिती 'कोळसा' या लेखांत दिली आहे.) लोखंडाच्या खाणींत देखील साधारणतः हीच पद्धत स्वीकारण्यांत येते. धातूंच्या खाणी खोदण्याची सर्वसामान्य पद्धत म्हणजे 'स्टूप' अथवा जिन्याची पद्धति होय. या पद्धतीप्रमाणें निरनिराळया मजुरांच्या तुकडयांनां निरनिराळीं खणण्याचीं क्षेत्रें नेमून देण्यांत येतात. पण तीं क्षेत्रें विषम उंचीवरचीं देण्यांत येतात; म्हणजे काही मजुरांनां अगदीं खाणीच्या तळाशीं, तर कांही मजुरांनां त्यापेक्षां थोडयाश्या उंचीवरची जागा खोदण्यासाठीं देण्यांत येते. अशा रीतीनें जिन्याच्या पाय-याप्रमाणें खाणी खोदण्यांत येतात. खनिज पदार्थांचे थर ज्यावेळीं फार जाड असतात, त्यावेळीं खालच्या व वरच्या भागांमध्यें निरनिराळे आडवे भाग पाडण्यांत येतात. हे दिसण्यांत मजल्याच्या आकारासारखे दिसतात. या मजल्यांच्या मधील जागा खणून झालेली असते. अशा रीतीनें भाग पाडण्यांत आल्यावर मग खालून अथवा वरून खोदण्याचें काम सुरू होतें. गजले खणतांना देखील 'रूम ऍन्ड पिलर' ची पद्धत स्वीकारण्यांत येते. खनिज पदार्थ जमीनीच्या पृष्ठभागापासून फारसे खोल नसतील तर, भूगर्भपद्धतीप्रमाणें वर आच्छादन राखून नंतर खाणी खोदण्यांत न येतां, एकदम भूपृष्ठापासूनच खनिखोदनाला सुरुवात होते. खनिज पदार्थ मृदु असेल तर पहारीनें व कुदळीनें खडक फोडण्यांत येतात व प्रसंगी सुरुंगांचाहि उपयोग करण्यांत येतो.

खाणींतील खनिज पदार्थ काढतांच तो डब्यांमध्यें अगर गाडयांमध्यें घालून वर आणण्यांत येतो. या गाडया जनावरांकडून अगर माणसाकडून ओढल्या जातात. गाडयांचा आकार खाणींतील रस्त्यांच्या लांबीरुंदीवर अवलंबून असतो. यूनायटेड स्टेटस्मध्यें दोन ते चार टन माल मावूं शकेल अशा गाडया असतात. युरोपमध्यें १००० ते १५०० पौंड वजन नेऊं शकणा-या   गाडया वापरण्यांत येतात. तांबे, शिसें अगर इतर मौल्यवान् धातूंच्या खाणींत १२०० ते ३००० पौंड माल नेणा-या गाडया वापरण्यांत येत असून त्या माणसांकडून ओढल्या जातात. या गाडया रुळांवरून ओढण्यांत येतात व अतिशय मोठया धातूंच्या खाणींत जनावरांच्या साहाय्यानेंहि गाडया ओढण्यांत येतात. मोठमोठया खाणींतून वाफेच्या साहाय्यानेंहि गाडया चालविण्यांत येतात. पण विजेच्या साहाय्यानें चालणा-या गाडया किफायतशीर असल्याचें आढळून आल्यावरून हल्लीं त्यांचा बराच प्रसार होऊं लागला आहे. अशा प्रकारच्या गाडयांची गति ताशीं सहा ते सात मैल असतें. खाणींतील मार्गात ज्यावेळी भयंकर चढउतार असतो त्यावेळी विजेच्या गाडयांच्यापेक्षां दोरीनें अगर सांखळीनें गाडया ओढण्याचा उपाय अमलांत आणणें जरूरीचें होतें. दोन रूळांच्यामध्यें एक सांखळी असून ती सांखळी रुळांवर ठेवलेली असते व ही साखळी एका एंजिनाला बांधण्यांत येते व हें एंजिन ही सांखळी गुंडाळूं लागलें की गाडी हळू हळू वर येऊ लागते. अशा प्रकारच्या सांखळीनें ओढल्या जाणा-या गाडया कोळशाच्या खाणीमध्यें हल्लीं सरसहा वापरण्यांत येऊं लागल्या आहेत.

खड्डयांच्या द्वारा ज्या खाणी खोदण्यांत येतात अशा खाणींतील माल नेण्यासाठी व तसेंच माणसें व उपकरणें यांची नेआण करण्यासाठीं पाळण्यांच्या आकारांचीं यंत्रे उपयोगांत आणावी लागतात. या यंत्राची रचना अशी असतेः - दोन आडवी पंचपात्रें (सिलिंडरें) एका दाड्यांशीं जोडण्यांत येतात. या दांडयाच्या खालच्या भागाशीं एक अगर दोन पडघमाच्या आकाराचीं पंचपात्रें असतात. यांचा व्यास बराच मोठा असतो. हीं पंचपात्रें वाटोळीं फिरविण्याकरितां जे पेंच असतात त्यांच्या योगानें एंजिन वाटेल तेवढें आझें सहज वर ओढूं शकतें. दातांची चक्रें जेव्हां पाळण्याला असतात त्यावेळीं ही पडघमच्या आकाराचीं पंचपात्रें एका स्वतंत्र दांडयाला जोडलेलीं असतात. जितका अधिक वेग पाहिजे असेल तितक्या प्रमाणांत ही पंचपात्रें कांहीं ठिकाणी कोनाकृति अशीहि असतात. एंजिन चालूं झालें कीं दोरी गुंडळावयास सुरवात होते व या पंचपात्राच्या साहाय्यानें खालील माल वर नेण्यांत येतो. या एंजिनाला चांगले ब्रेक ठेवलेले असतात अगर उलटया दातांची चक्रें लावलेलीं असतात.

या पाळण्यांच्या दो-या पूर्वीं तागाच्या करण्यांत येत असत. पण मोठ्या वजनांचे पाळणे उचलण्याच्या कामीं या दो-या कुचकामाच्या ठरूं लागल्यामुळें लोखंडाच्या सांखळया वापरण्यांत येऊं लागल्या. खोल खड्डयांतून वर माल काढतांना या साखळयांवर फार भार पडत असे. तो कमी करण्याकरितां त्या सांखळयाभोंवतीं अतिशय लवचिक अशी पोलादी तार गुंडाळण्यांत येऊ लागली. या सांखळया वाटोळया व चपटया अशा दोन्हीं प्रकारच्या असतात. कांही ठिकाणीं वाटोळया व कांहीं ठिकाणीं चपटया सांखळया वापरण्याचा प्रघात आहे. पण चपटयापेक्षां वाटोळया सांखळया अधिक टिकाऊं असतात असें आढळतें.

खनिज पदार्थ जसजसा खणून काढण्यांत येईल तसतसा तो लवकर वर नेणें अत्यंत जरूरीचें असतें. मालाच्या गाडयांमध्येंच तो पुष्कळ वेळ ठेवणें खर्चाच्या दृष्टीनें फार महाग पडतें. कारण मालानें भरलेल्या या गाडयांची पुन्हां खालचा माल वर नेण्यासाठीं जरूरी असते. यामुळें खनिज पदार्थ बाजारांत विक्रीला जाण्यापूर्वीं, एके ठिकाणी सांठविण्यासाठीं मोठमोठीं कोठारें बांधलेली असतात.

खाणींतील मजुरांनां खालींवर येण्यासाठी पूर्वीं साध्या शिडयांचा उपयोग करण्यांत येत असे. पण यंत्राच्या साहाय्याने मजुरांनां खाणींत उतरविणें व वर आणणें हें अधिक सोईस्कर पडूं लागल्यामुळें हल्लीं हीच पद्धत अंमलांत आली आहे. ही पद्धत उथळ खाणींत जितकी उपयुक्त आहे तितकी खोल खाणींत उपयोगी पडत नाहीं. ज्या खाणी खोदण्यासाठीं उभे खड्डे खणण्यांत आलेले असतात अशा खाणींमध्यें, मजुरांनां खालीवर आणण्याकरतां पिंजरे तयार केलेले असतात. या पिंजर्‍यांत १५।२० माणसें मावतात. अशा प्रकारचे पिंजरे यूरोपमध्यें व यूनायटेड स्टेट्समधील ब-याच खाणींत अद्यापिहि प्रचारांत आहेत. पण ज्या खाणीं खणण्यासाठीं आडवे खड्डे खणण्यांत येतात, अशा ठिकाणीं या पिंजर्‍यांचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं. अशा वेळीं बॉबिन्सच्या साहाय्यानें लोकांनां वरखालीं नेण्यांत येतें. पण खाणीं अतिशय खोल असल्यास या बॉबिन्स उर्फ पाटयापेक्षा २०।३० माणसें मावतील अशा गाडया उपयोगांत आणतात. 'लेक सुपीरियर कॉपर डिस्ट्रिक्ट' मधील खाणीमध्यें अशा प्रकारच्या गाडया अद्यापिहि वापरण्यांत येत आहेत.

खाणींतील पाणी वर नेण्याची पद्धति:- पुष्कळ खाणींमध्ये सांचलेलें पाणी आपोआप वाहून जावें यासाठी पूर्वीं लांबलचक बोगदे खाणीत. पण हल्लीं ही पद्धत त्याज्य ठरविण्यात आली आहे. यांत्रिक साहाय्यानें खाणींतील पाणी वर नेण्यानें खर्चामध्यें पुष्कळ बचत होते असें आढळून आल्यामुळें हल्ली बहुतेक खाणींमधून याच पद्धतीचा अवलंब होऊं लागलेला आहे. जमीनीच्या पृष्ठभागापासून खाणींत पंप नेऊन या पंपाच्या योगानें पाणी वर नेण्यांत येतें. या पंपाच्या योगानें जें पाणी वर काढण्यांत येतें तें सांठविण्यासाठीं एक पाण्याचा हौद तयार केलेला असतो. खडक जर सारख्या उंचीचे नसतील तर पंपाचा उपयोग न करितां वक्रनलिकेच्या द्वारानें पाणी वर काढण्यात येतें. खाणीमध्यें येणारें पाणी बहुधा जमीनच्या पृष्ठभागावरूनच येत असल्याकारणानें हें पाणी खाणीमध्यें जाऊं नये यासाठी हें पाणी सांठविण्याकरितां खळगे खणण्यांत येतात. पाणी वर काढण्यासाठीं पंप, बादल्या अगर टांकी या तिन्हीं प्रकारांचा अवलंब करण्यांत येतो. ज्या ठिकाणीं उथळ खड्डे असतील त्या ठिकाणीं ३५ ते २०० गॅलन पाणी वर टाकण्यांत येतें. पण खोल खड्डयांमधील पाणी काढण्याकरतां टाक्यांचा उपयोग करण्यांत येतो. खाणीमध्यें ज्यावेळीं अतिशय पाणी साचूं लागतें अशा वेळी या टांकीचा जलदीनें पाणी काढण्याच्या कामीं फार उपयोग होतो.

खाणींतून पाणी काढण्याच्या पंपाचे दोन प्रकार आहेत. (१) कॉर्निश पद्धतीचा पंप व (२) वर्दिग्टननें तयार केलेला पंप. पहिल्या प्रकारांत पंप चालूं करण्यासाठीं जें एंजिन असतें तें जमीनच्या पृष्ठभागावर ठेवलेलें असतें व दुस-या प्रकारांत पंप व एंजिन हीं स्वतंत्र नसून पंपामध्येंच तो आपोआप चालूं होण्याची योजना केलेली असते. कॉर्निश पद्धतीचा पंप खर्चाच्या दृष्टीनें सोईचा आहे. पण आरंभी तो खाणींत बसविण्यासाठीं बराच खर्च करावा लागतो. वर्दिग्टनचा पंप हा वाफेवर चालणारा असतो व कॉर्निश पंपापेक्षा या पंपानें पाणी वर जलद काढतां येते. हल्लीं विजेच्या साहाय्यानें पंप चालूं करण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. सट्रिफ्यूगल अगर केंद्रोत्सारी पंपहि क्वचित वापरण्यांत येतात. खाणीतील पाण्यांमध्यें अम्लाचा बराच भाग असल्यास, पंपाचे भाग हे ब्रांझ धातूचे अगर दुस-या लवकर न गंजणा-या   धातूचे केलेले असतात, अगर पाणी सांठविण्यासाठीं केलेल्या हौदांत चुन्याची निवळी घालून अम्लाचा परिणाम नाहींसा करण्यांत येतो.

खाणींत हवा खेळविण्याची पद्धत.- खाणीमध्यें पुष्कळ माणसें व जनावरें असल्यामुळें, तसेंच असंख्य दिवे लावावे लागत असल्याकारणानें खाणींतील हवा दूषित होते. सुरुंगांतील दारूमध्येंहि विषारी वायू असल्यामुळें त्या वायूच्या अल्पांशानेंहि शरीरांवर फार अनिष्ट परिणामं घडतात. याशिवाय खडकांच्या फटींतून अगर इतर खनिज पदार्थांतून निघणा-या वायूंमुळें या अनिष्ट परिणामांमध्ये भरच पडते. दगडी कोळशाच्या खाणींत स्फोटापेक्षां अग्निजन्य प्राणघातक वायूमुळें व अनूप (मार्श) वायूमुळेंच प्राणहानि अधिक होते असें दृष्टोत्पत्तीस आलें आहे. अशी स्थिति असल्यामुळें खाणीतील हवा शुद्ध राखण्याची अतिशय जरूर असते व त्याकरितां खाणीमधून शुद्ध हवा खेळविण्याचीं साधनेंहि निर्माण करण्यांत आलीं आहेत. पण धातूंच्या खाणींमध्ये कृत्रिम हवा खेळविणेंहि अतिशय जड होतें. हवा खेळविण्यासाठीं शुद्ध हवा आत येण्यासाठीं एक व दूषित हवा बाहेर येण्यासाठीं एक अशा दोन जाळया करण्याची पद्धत असते.

भूगर्भांतील खाणींमध्यें हवामान बहुतेक सर्व ॠतूंत सारखेंच असतें. बाहेरील हवेपेक्षां उन्हाळ्यांत या खाणींमधील हवा अधिक गार व हिंवाळयांत अधिक उष्ण असते. अशी स्थिति असल्यानें खाणीत हवा खेळण्याकरतां केलेलीं धुराडीं निरनिराळया उंचीवर असतील तर, आंतील हवा व बाहेरील हवा यांच्या उष्णमानामध्यें बरेच अंतर पडून प्रापणप्रवाह सुरू होऊन खाणींमध्यें हवेचा प्रवाह आपोआपच लागेल. याप्रमाणें हिवाळयांत तर पुष्कळ हवा खेळत असते. उन्हाळ्यांत मात्र हवा साहजिकच कमी खेळत असते.

खाणींतील हवा उष्ण करून ती खाणींत खेळविण्याचा एक उपाय आहे. हवा येण्याच्या द्वाराच्या तळाशीं एक भट्टी करून हवा उष्ण केली म्हणजे खाणींत हवा खेळूं लागते. पण हा उपाय फारसा उपयुक्त नाही. शिवाय ज्या खाणींत अग्निजन्य प्राणघातक वायु पसरण्याचा संभव असतो त्या ठिकाणीं हा उपाय अमलांत आणणें धोक्याचें असतें. कारण एखाद्या वेळीं हवेचा प्रवाह उलट दिशेने वाहूं लागल्यास खाणींत कर्बद्विप्राणिद (कार्बनिक अ‍ॅसिड गॅस) मोठया प्रमाणांत पसरून खाणींत आग लागण्याचा संभव असतो. अशा प्रकारचा उपाय बराच घातुक असल्यानें पुष्कळ देशांत कायद्यानें हा उपाय बंद करण्यांत आला आहे.

वरील मार्ग टाकाऊ ठरल्यानें हवा खेळविण्याचे कृत्रिम उपाय निर्माण करण्यांत आले आहेत. १८५० च्या सुमारास केन्द्रोत्सारी (सेंट्रिफ्यूगल) हवा खेळविणारीं यंत्रे प्रथम उपयोगांत आली. पंख्याच्या द्वारें खाणींत हवा खेळण्याची दुसरीहि एक युक्ति अमलांत आली आहे. या यंत्राची रचना असते तीः- खाणींत जाण्याच्या खड्डयामध्यें आच्छादनयुक्त असे अनेक वातकुक्कुट (एक प्रकारचा पंखा) एकावर एक बसविलेले असतात. वरून येणारी हवा या पंख्यावर आदळतांच हे पंखे फिरूं लागतात व सर्वत्र हवा खेळूं लागते. आच्छादनविरहित पंख्यामुळें हवा अधिक खेळते. या पंख्यांचा खाणींत हवा पसरविण्याच्या कामी व खाणींतली दूषित हवा नाहींशी करण्याच्या कामींहि उपयोग होतो. खाणींतील दूषित हवा नाहींशी करणा-या पंख्यांत गुइबल पंखा हा विशेष वापरण्यांत येतो. याशिवाय रेटयू, शीलें, पेल्झर वगैरे अनेक नांवांचे पंखे हल्लीं वापरण्यांत येतात. आच्छादनरहित पंख्यांत वॅडेलचा पंख प्रसिद्ध आहे. मंदगति पंख्याचा व्यास तीस ते पंचेचाळीस फूट असतो व त्याच्या योगानें दर मिनिटाला एक लाख घनफूट हवा खेळवितां येते. कोळशाच्या खाणीसारख्या भयंकर खाणींतील खड्डयांमध्यें दोन पंख्यांची योजना करून ठेवण्यांत आली असते. वेळेस अपघाताच्या बाबतींत एखादा पंखा बंद पडला तर दुसरा पंखा चटकन सुरू करता येतो.

हवेचा प्रवाह खाणीमध्यें खेळविणारी ही जी यांत्रिक प्रवर्तक शक्ति असते तिला खाणींतील घर्षणात्मक प्रतिबंधामुळें बराच अडथळा होतो. हा अडथळा नाहींसा करण्याकरतां हवेचा कांहीं भाग खर्ची घालावा लागतो. या प्रतिबंधाचें मान कमी करण्यासाठीं निरनिराळया भागांत निरनिराळे मार्ग करण्यांत येतात. निरनिराळें मार्ग केल्यानें हवा अधिक खेळूं लागते. पण त्याबरोबरच हवेचा प्रवाह एखाद्या वेळी उलटया दिशेनें वाहून स्फोट होण्याचा संभव असतो. अशा वेळीं खाणीच्या ज्या भागांतील हवा उलटया दिशेनें वाहते तेवढयाच भागांचा नाश होतो. बाकीच्या भागाला फारसा उपसर्ग पोहोंचत नाहीं.

खाणी खणण्याचें काम किती खोलपर्यंत नेतां येईल यासंबंधीं खनिशास्त्रज्ञांचे तर्क चालू आहेत. खाणी खोल खणण्याच्या कामीं खाणींतून पाणी वर काढण्यांच्या बाबतींत होणारी गैरसोय व खाणींतून खनिज पदार्थ वर नेण्याची अडचण या बाबी प्रमुख आहेत. पण त्यांशिवाय खडकांचें उष्णमान व वरील थरांचें वजन याहि बाबी लक्षांत घेणें अपरिहार्य आहे. जगांतील सर्वांत खोल खाण म्हणजे मिचिगन संस्थानांतील हुटन परगण्यांतील टमरकची खाण होय. ही खाण ५२०० फूट खोल आहे. या टमरक कंपनीच्या इतर तीन व त्यानजीकच असलेल्या कॅलुमेट व हेलका येथील खाणींची खोली ४००० ते ५००० फुटांच्या दरम्यान आहे. हूटन परगण्यांतील क्किन्सी येथील खाणींची खोली ४००० फुटांपर्यंत गेली आहे. इंग्लंडमधील व बेल्जमधील कांहीं कोळशांच्या खाणी तीनचार हजार फूट खोल आहेत. ऑस्ट्रेलियांतील व्हिक्टोरिया क्कार्टझ् खाण ही ४३०० फूट खोल आहे. ट्रॅन्स्व्हाल येथील कांहीं सुवर्ण खाणींची खोली ४००० फूट पर्यंत गेली आहे. या वरील खाणी अद्यापि पुष्कळ खोल खणतां येतील असा तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. खाणींतून खनिज पदार्थ वर काढण्याची व पाणी वर नेण्याची अडचण दूर करतां येणें शक्य आहे असें तज्ज्ञांनीं ठरविलें आहे. फक्त खडकांचे उष्णमान व खाणींच्या वरच्या भागांतील थरांचें वजन यांसंबंधीं काय तजवीज करतां येईल यासंबंधीं हल्लीं प्रयत्न चालू आहेत. दर ५० ते १०० फूट खोलीला एक डिग्री उष्णता वाढते असें प्रयोगानें सिद्ध झालेलें आहे. मिचिगन व रँडमधील खोल खाणींमध्ये २०० अगर त्याहीपेक्षां अधिक फूट खोलीला एक डिग्री प्रमाण वाढतें असा तेथील अनुभव आहे. व्हर्जीनिया शहरांतील कामस्टाकच्या खाणी १३० फारनहीट डिग्रीपर्यंत खोल खणतां येणें शक्य आहे असें विद्वानांचें मत आहे. पण अतिशय खोलीपर्यंत खणण्यांत आलें असता, मृत्यूचें प्रमाण वाढत जातें असे दृष्टोत्पत्तीस येतें. आल्पस पर्वतांतील खाणींतील हवा दमट असल्यानें ९० डिग्रीपर्यंत खणणें देखील कठिण होतें. साधारणतः खडकांचे उष्णमान ५०० फारनहीट धरलें व १०० ते २०० फूट खोलीला एक डिग्री उष्णमान अधिक वाढतें असें मानलें तर १३०० उष्णमान होण्याला ८००० ते १६००० फूट खोल खणावें लागेल. पण इतक्या खोलीपर्यंत खाणी खणावयाच्या म्हटलें तर वरील भाग तोलून धरण्याकरितां जे खांब मध्यें उभारलेले असतात त्यांना वरील भागाचें वजन असह्य होतें व हे खांब वांकूं लागतात. अशी स्थिति असल्यामुळें, खडकांचें उष्णमान व वरील वजन या दोहोंच्या कारणानें खाणींची खोली पुष्कठ ठिकाणीं ८००० ते १०००० फुटांपुढें नेतां येणें अशक्य होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

खा णी वि ष य क का र भा र.- खाणी खणण्याचा धंदा हा कायमचा नसून तो कांही कालपर्यंत टिकाणारा आहे. खाणींतील खनिज पदार्थांचें पूर्ण खनन झालें कीं त्या खाणीचा कारभार संपला. ही गोष्ट खाणी खोदण्याकरतां कंपनी स्थापन करतांना लक्ष्यांत ठेवणें जरूर आहे. शिवाय खाणी खोदण्याचा धंदा हा इतर धंद्यांपेक्षां अधिक धोक्याचा आहे. ही गोष्ट विसरतां उपयोगी नाहीं. कांही खाणी खणण्यांत फायदा होण्याऐवजीं नुकसानच होतें. कांहीं खाणी फारशा फायदेशीर होत नाहींत. शिवाय खाणी खणतांना स्फोट होऊन पुष्कळ नुकसान होतें. यासाठीं जें कर्जाऊ भांडवल उभारावें लागतें त्यांतून दरवर्षी कर्जाची रक्कम फेडण्याकरतां स्वतंत्र कर्जफेडीचा फंड सांठविण्यांत आला पाहिजे. खाणी खणण्यांत जें नुकसान येण्याचा संभव असेल त्यासाठीं बुडीत भांडवलहि निराळें काढून ठेवलें पाहिजे. या सर्व गोष्टी खाणी खणण्याकरतां स्थापन झालेल्या कंपनीनें पूर्णपणें लक्ष्यांत ठेवल्या पाहिजेत.

खाणीची अंदाजी किंमत.- साधारणतः एखाद्या जिंदगीचें मूल्य ठरवावयाचें तें वार्षिक नफ्यावरून ठरवावयाचें असतें. पण खाणींच्या बाबतींत नफ्यांचे प्रमाणच अनिश्चित असल्यांने वार्षिक नफ्यावरून खाणीची अंदाजी किंमत ठरविता येणें अशक्य असतें. शिवाय खाणी खोदण्याला सुरुवात करण्याच्या अगोदरच खाणी उघडण्याच्या कामी पुष्कळ पैसा खर्च करावा लागतो. अशी परिस्थिति असल्यामुळें, खाणीची अंदाजी किंमत ठरवितांना खालील गोष्टी विचारांत घेणें जरूर आहे. (१) खनिज पदार्थांचे नमुने व त्यांची अंदाजी किंमत. (२) खाणींचा जेवढा भाग उघडला असेल त्याचें परिणाम. (३) उघडलेल्या भागांतील खनिज पदार्थांचें अंदाजी परिणाम. (४) खाणी खणण्याला लागणारा वेळ, त्यांतील खनिज पदार्थांची अंदाजी किंमत व त्यावर होणा-या फायद्याचें अंदाजी प्रमाण. खाणींतींल खनिज पदार्थ खाणींतील सर्व भागांत सारखा पसरला असेल तर थोडेच नमुने घेऊन त्यांवरून खाणीची अंदाजी किंमत साधारणतः निश्चितपणें ठरवितां येते. पण काही खाणींत हा खनिज पदार्थ सर्व भागांत सारखा पसरत नाहीं. अशा वेळी खाणींतील निरनिराळया भागांतील नमुने जमवून त्यांची पारख करून नंतर त्यावरून अंदाजी मोल ठरवावें लागतें.

खाणीविषयक शिक्षण.- या खाणींच्या धंद्यांत खाणीविषयक शिक्षण हें प्रमुख अंग आहे. खाणी खणण्याच्या बाबतींत पुढाकार घेणारे लोक त्या शास्त्रांत तज्ज्ञ असले पाहिजेत. या शास्त्राच्या अभ्यासकाला भूस्तरशास्त्राची पूर्ण माहिती असली पाहिजे. निरनिराळया देशांत खाणी खणण्याचा ज्या पद्धती अंमलांत असतील त्या संर्वांशीं यानें परिचय करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय खनिज पदार्थांचे गुणधर्म भूगर्भांतील खाणी उघडण्याकरितां लागणारें सर्व साहित्य, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र इत्यादिकांचेंहि ज्ञान त्याला जरूर असलें पाहिजे. यासाठीं ज्या ज्या भागांत ब-याच खाणी असतील अशा भागांत या शास्त्रांचे ज्ञान देण्याकरितां शाळा उघडण्यांत आल्या आहेत. याखेरीज खाणींत काम करणार्‍यांच्यासाठीं म्हणूनहि शाळा स्थापन झालेल्या आहेत. या लोकांना रसायनशास्त्र, यंत्रशास्त्र, 'खननशास्त्र' भूस्तरशास्त्र यांची मूलतत्वें शिकवण्यांत येतात. पण अशा रीतीनें या शास्त्रांचा पूर्ण अभ्यास केलेल्या विद्वानांनां देखील अनुभवासाठीं म्हणून काही वर्षे काम करण्यांत घालावीं लागतात.

खाणींतील अपघातः- खनिखोदनाचा धंदा अतिशय धोक्याचा आहे व त्यामुळें अपघात होण्याचा संभव असतो. हे अपघात कमी करण्यासाठी कायदे करण्यांत आले आहेत. हे कायदे सकृद्दर्शनी कडक आहेत असें वाटतें पण सर्वसाधारणतः हे कायदे जरूरीचे व उपयुक्त आहेत. खाणींवर देखरेख करण्याकरितां अधिकारी नेमण्यांत आले आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड येथील खाणींमधील अपघातांचें प्रमाण पाहिलें असतां या कायद्यामुळें ते अलीकडे कमी होत चाललें आहेत असें दिसून येईल. १८७८ मध्यें या अपघातांचें प्रमाण हजारीं २.७८ होतें तर सन १८०९ मध्यें हजारीं २ हें प्रमाण होतें. १९०० मध्यें हेंच प्रमाण हजारीं १.२५ इतकें पडलें. खाणींतील अपघात ज्वालाग्राही पदार्थांच्या स्फोटापेक्षां खाणींतील खडक अगर खनिज पदार्थ एकदम ढांसळून पडल्यामुळें अधिक होतात असें आढळून आलें आहे. याशिवाय कामकर्‍यांच्या हलगर्जीपणामुळेंहि अपघात घडून येतात. खाणीविषयक कायदा अमलांत आल्यानें खाणींत शुद्ध हवेचा पुरवठा, करणें, सुरक्षित कंदिलांचा सार्वत्रिक प्रचार गोष्टींकडे विशेष लक्ष्य देणें खाणीवाल्यांनां भाग पडूं लागलें आहे.

खाणींतील अनूप वायूमुळें खाणींत प्राणघातक वायू उत्पन्न होतात व खनिजपदार्थांच्या कणांशीं त्यांचा संयोग होतांच स्फोट होतो. कित्येक वेळां दगडी कोळशांच्या कणांमुळेंच स्फोट होतों. खाणींतील दिवे जर सुरक्षित असे नसतीलं तर अनूपवायु व साधी हवा यांच्या संयोगामुळेंहि स्फोट उत्पन्न होतो. कोरडया व कणविहीन खाणीमध्यें जिकडे तिकडे पाणी शिंपून अपघातांचे प्रमाण कमी करतां येतें. ज्या ठिकाणीं अग्नीमुळें प्राणघातक वायु पुष्कळ उत्पन्न होण्याचा संभव असतो अशा ठिकाणीं सुरक्षित दिव्याचा उपयोग करणें अत्यावश्यक आहे. खाणीमध्यें आगपेटया व साधे दिवे वापरणें अत्यंत घातुक आहे.

खाणीमध्यें अगदीं साध्या कारणामुळें सुद्धां आग लागण्याचा संभव असतो. पण त्याशिवाय अग्नीमुळें उत्पन्न होणा-या प्राणघातक वायूमुळे, अगर दिव्यांतील गॅस सोडण्याकरतां केलेल्या नळीशी दगडी कोळशाच्या कणाचा संयोग झाल्यामुळेंहि आग लागते. कांही खाणींत केवळ कोळशाच्या कणांच्या घर्षणानेंच आग लागतें. भूगर्भांतील खाणींत आग लागली असतां ती पाण्यानें विझवणें पुष्कळवेळां अतिशय अवघड जातें. अशावेळीं आग विझेपर्यंत खाणी बुजविण्याशिवाय गत्यंतरच नसतें. पण ज्यावेळी हेंहि शक्य नसतें त्यावेळी खाणींच्यावर पाण्याचा सांठा करून तो खाणीमध्यें सर्व मार्गांनीं सोडून देण्याची युक्ति अंमलात आणावी लागते. म्हणजे खाणी जलमय करून टाकणें हा अगदी शेवटचा उपाय होय.

कांही वेळां खाणींमध्यें एकदम पाणी येऊन खाणी पाण्यानें भरून जातात व खाणींचे फार नुकसान होतें. भयंकर पर्जन्यवृष्टीमुळें अगर नद्यांनां पूर आल्यामुळें असे प्रकार घडून येतात. भूगर्भांत पाण्याचे संचय पुष्कळ असले तरी देखील खाणीमध्यें पाणी येण्याचा संभव असतो. भूपृष्टावरील पाणी खालीं शिरूं नये यासाठीं ठिकठिकाणीं पाणी सांचवून तें खाणीच्या क्षेत्राच्या बाहेर सोडण्याची सोय केलेली असते. नद्यांच्या अगर समुद्राच्या खालीं खाणी खणण्याचें काम शक्य असतें असें प्रत्यक्ष अनुभवानें सिद्ध झालें आहे.

ज्या वेळी खाणी खणण्याचें क्षेत्र विस्तृत असतें पण वरचा भाग तोलून धरण्याकरतां मधून मधून ठेवलेले खांब बारीक असून वरील वजन तोलून धरण्याला असमर्थ असतात त्यावेळीं वरचे खडक कोसळून विवर पडतें. एखादेवेळीं खाणींत माणसें काम करीत असतांनाच वरून कांहीं भाग कोसळून पडतो व खाणींतल्या वाटा बुजल्या जातात. पण अजीबात सर्व वाटा बंद झाल्याचे प्रसंग फारच क्वचित येतात.

खा णी वि ष य क आ रो ग्य शा स्त्र.- खाणींतील हवा मूळच्या व आगंतुक कारणांनी दूषित होत असल्यानें अगर ज्या प्रदेशांत खाणी खणण्याचें काम चालूं असतें त्या प्रदेशांतील हवामानामुळें खाणींत काम करणा-या लोकांनां कांहीं रोग होतात. कॉर्नवाल, दक्षिण आफ्रिका इत्यादि ठिकाणच्या खाणींत काम करणा-या लोकांत क्षयाचें प्रमाण उत्तरोत्तर वाढत चालल्याचें आढळून आलें आहे. खाणींत काम करतांना जी धूळ उडते तिच्यामुळे हा रोग मुख्यत्वेंकरून जडतो. खाणी उघडण्याचें काम शक्य तितक्या लवकर व्हावें या हेतूनें अनेक ठिकाणीं यंत्रांच्या योगानें खड्डे खणण्याची जी प्रवृत्ति खाणीवाल्यांत दिसून येतें त्यामुळें सुरुंग उडतांच दारू व धूळ पूर्णपणे नाहींशी होण्याच्या पूर्वींच मजुरांना काम करणें भाग पडतें. त्यामुळें वाईट श्वासोछ्वास केल्यामुळें शरीरावर वाईट परिणाम घडून येतो. कर्बएकप्रणिदा (कार्बन मॉनॉस्कॉइड) मुळें मजुरांच्या शरीरावर फार घातुक परिणाम होतो असें अनुभवास आलें आहे. खालील दमट हवेंत काम करून वर येतांच एकदम गार हवा लागली असतां शरीरप्रकृतीला तें अत्यंत अपायकारक होतें. कांहीं खाणीमध्यें, 'अँकीलास्टोमियासिस' हा रोग अतिशय फैलावला आहे.

अर्थातच अशा प्रकारच्या रोगाला प्रतिबंध करण्याकरितां शक्य ते उपाय अंमलांत आणण्यांत आले आहेत. खाणीविषयक आरोग्यशास्त्रांत पारंगत असे वैद्य प्रत्येक खाणींत नेमण्यांत आलेले आहेत खाणींत काम करणार्‍यांनां आरोग्य शास्त्राचें थोडेसें शिंक्षण देण्याची व त्यांनां आरोग्यशास्त्राचें महत्व समजावून देण्याची कल्पना हल्ली खाणीवाल्यामध्यें पसरत चालली आहे.

खा णी वि ष य क का य दा.- खाणी या स्थावर मालमत्तेंत मोडत असल्याकारणानें स्थावर जिंदगीला जो कायदा लागू तोच खाणींतहि लागू आहे. इंग्लंडांतील 'कॉमन लॉ' प्रमाणे जमिनीच्या मालकाची जमिनीच्या गर्भातील खाणींवरहि मालकी असते. पण प्राचीन काळापासून सोन्यारुप्याच्या खाणीवर मात्र राजाची सत्ता होती. सार्वजनिक अगर सरकारी जमिनीच्या खाली असलेल्या खाणीवर सरकारची मालकी असते व अशा प्रकारची जमीन दुस-याला विकत देतांना जमिनीखालील खाणींचा हक्क आपल्याकडे सरकारनें ठेऊन घेतल्याचीं उदाहरणें आहेत. खाणींतील खनिज पदार्थ बाहेर न काढतां तसेंच राहूं देणे हें लोकहिताचें नसतें हें तत्व प्राचीन काळापासूनच सर्वमान्य असल्याचें दिसतें; व यासाठीं खनिखोदनाला उत्तेजन देण्यासाठी मुद्दाम सवलतीचे कायदेहि सर्व देशांत करण्यांत आलेले आहेत. पुष्कळदां खनिखोदनाच्या कार्यांत सरकारनें अगर एखाद्या राजानें आपला हिस्सा ठेवल्याचीं उदाहरणेंहि आढळतात. पण खाणीवाल्यांनांच त्यांनीं खणून काढलेल्या संपत्तीचा उपभोग घेऊं देणें हें सरकारच्या व लोकांच्या दृष्टीनें फायदेशीर असते असें अनुभवास आलें आहे. सुधारलेल्या राष्ट्रांतील खाणीविषयक कायद्यांचें पर्यालोचन करतां हल्लीं बहुतेक सर्व राष्ट्रांत वरील तत्व अमलांत आल्याचें दिसून येतें व याचा परिणामहि चांगला झाल्याचें रॉकी माउंटनमधील खाणींच्या व ऑस्ट्रेलिया व अलास्का येथील खाणींच्या इतिहासावरून आढळून येतें.

हिंदुस्थानांत फार प्राचीन काळापासून खनिखोदनाचा धंदा चालू होता असें दिसतें. ख्रि. पू. शतकामध्यें कौटिल्यानें आपल्या अर्थशास्त्रनामक ग्रंथांत खनिखोदनाच्या संबंधीं एक स्वतंत्र प्रकरण घातलें आहे. त्यांत खनिज पदार्थांचे गुणधर्म, खनिज पदार्थांच्या जाती वगैरेसंबंधानें विवेचन आलें असून राजानें आपले अधिकारी  नेमून खनिखोदनाचें काम चालू करावें असें कौटिल्यानें म्हटलें आहे. त्यावरून त्याच्यापूर्वींपासूनच खाणी खोदण्याचा धंदा हिंदुस्थानांत चालू असावा असें दिसून येतें. खनिखोदनाच्या कामी राजानें जो अधिकारी नेमावयाचा तो 'शुल्बधातुशास्त्रज्ञ' तांबें व इतर धातू यासंबंधींच्या शास्त्राची माहिती असणारा, अशुद्ध धातू शुद्ध करणें, दगडांची परीक्षा करणें इत्यादि शास्त्रांत पारंगत असणारा असला पाहिजे असें कौटिल्यानें म्हटले आहे. तसेंच या अधिका-यानें आपल्या हाताखालीं खोदन शास्त्रपारंगत अशा तज्ज्ञांनां नेमून नंतर कोणत्या ठिकाणीं कोणत्या खाणी उपलब्ध  होतील यासंबंधाचा शोध केला पाहिजे असेंहि त्यानें म्हटलें आहे. पुढें त्यानें आपल्या ग्रंथांत खाणी शोधून काढण्याचे निरनिराळे प्रकार सांगितले आहेत. त्यावरून खनिखोदनासंबंधीं पूर्वीं हिंदुस्थानांत बरीच प्रगति झाली होती असें दिसून येतें. अशोकाच्या कारकीर्दीत खनिखोदनाचें स्वतंत्र खातें होतें अशी आपल्याला माहिती मिळते.

हिंदुस्थानांत आलेले चिनी प्रवाशी, अशोकाच्या खनिखोदन खात्यासंबंधानें फार चांगले उद्गार काढतात. अशोकानें या खात्यांत उत्तम प्रकारचे खनिशास्त्रज्ञ व खाणीवर देखरेख करणारे अधिकारी नेमले होते. खनिखोदनाला लागणारी प्रयोगशालाहि त्यानें स्थापन केली होती. खनिखोदन खात्यातील आपल्या अधिकार्‍यांच्या उपयोगार्थ अशोकानें एक चोपडें तयार केलें होतें. हें चोपडें हल्ली सांपडलेलें आहे व त्याचे भाषांतर म्हैसूर सरकारच्या मार्फत होत आहे. चिनी प्रवाशांच्या हकीकतीवरून असें दिसून येतं की अशोकाच्या वेळीं ओरिसांत पुरी हें बंदर फार प्रसिद्ध असून, त्या ठिकाणी चिनी व्यापारी येत असत व त्या ठिकाणी सोन्याचांदीची देवाणघेवाण होत असे.

[संदर्भ ग्रंथः- गॅलोबे-लेक्चर्स ऑन माइनिंग (कार्डिफ १९००); ह्यूझेस-कोल माइन (लंडन १९०४); इलसेंगए मॅन्युअल ऑफ माइनिंग (न्यूयॉक १९०५); लॉन-माइनअ‍ॅकाउंटस् अँड माइन बुक कीपींग (लंडन १८९७); लप्टन माइनिंग (लंडन १८९९); टी. ए. रिकर्ड - दि सँपलिंग अँड एस्टिमेशन ऑफ ओअर इन माइन (न्यूयॉर्क १९०४); एंजीनिअरिंग अँड माइनिंग जर्नल (न्यूयॉर्क वीकली); माइन्स अँड मिनरल्स (मासिक-स्कँटन, पेन्सिलव्हानिया); दि माइनिंग अँड सायंटिफिक प्रेस (साप्ताहिक सानफ्रान्सिस्को).].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .