प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  
           
कार्ले - पुणें जिल्ह्यांत मावळ तालुक्यामध्यें पुण्याहून १७ कोसांवर जी.आय.पी. रेल्वेच्या मळवली स्टेशनहून १ कोसावर हे खेडें आहे.  याला विहारगांव असें दुसरें नांव आहे.  सह्याद्रीच्या ज्या फांट्यावर येथील लेणें आहे त्याची उंची जमीनीपासून ४०० फूट आहे.  कार्ल्याची लेणी प्रसिद्ध आहेत इंद्रायणी खोर्‍यांत हा पहाड आहे.  पायथ्यापासून थेट लेण्यापर्यंत गाडीरस्ता आहे.  या पहाडाच्या माथ्यावरून कुडबचा डोंगर, बदराशीचा डोंगर, विसापूर व लोहगड किल्ले, तुंग व मोरगिरी गड व साखरपठार वगैरे ठिकाणें स्पष्ट दिसतात.  लेण्याच्या तोंडाशी दगडी कमानीवरील नगारखाना व एकवीरा देवीचें देऊळ आहे.  नगारखान्याची नेमणूक पेशवे सरकारनीं केली होती.  एकवीरा देवीच्या देवळाचा जीर्णोद्धार इ.स. १८६६ मध्यें झाल्याचा शिलालेख देवळावर आहे.  देवीचें स्थान फार प्राचीन आहे.  लेण्याच्या महाद्वाराजवळ बर्‍याच घंटा टांगलेल्या आहेत.  पैकीं एका मोठ्या घंटेवर इंग्रजी १८५७ चा आकडा खोदलेला आहे.  ही एकवीरा देवी ठाणें व पुणें जिल्ह्यांतील आणि कोकणांतील कोळ्यांची (व प्रभु लोकांचीहि) कुलदेवता असल्यानें त्यांनीं देवीला नजर केलेल्या वस्तु येथें आहेत.  देवीचा नंदादीप सतत तेवत असतो.  मूळ देवीची मूर्ती ही पाषाणाची (डोंगराच्या दगडांत कोरलेली) असून सध्यां ती फार झिजली आहे.  तिच्या अंगावर दागदागिने व मुखवटे वगैरे घालतात.  हिची यात्रा चैत्र शु. अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते.  देवळाची व्यवस्था पंचांच्या ताब्यांत आहे.  कोळी लोक यात्रेस येतांना वारकर्‍यांप्रमाणें पालख्या आणून त्यांत एकवीरा देवीचे चांदीचे टांक व मुखवटे आणीत असतात.  कोंबडी व बकरी यांचे बळी येथें देतात.  एकवीरा हें नांव द्रविडी अक्का अवेयार (पूजनीय माता) या नांवापासून झालें असावें.  ही देवी येथील बौद्ध विहाराच्याहि पूर्वीची असावी.  कदाचित तिच्या या प्रांतांतील प्रसिद्धीमुळेंहि येथें बौद्धांनी लेणें कोरलें असावें असें वाटतें.  परशुराम हा एकच वीर जिच्या पोटी झाला ती (रेणुका) एकवीरा असेंहि म्हणतात.
    
लेण्यांबद्दल नेहमीप्रमाणें पांडवांच्या कथा सांगण्यांत येतात.  मुख्य चैत्याला धर्मराजाचा डेरा असें म्हणतात.  या मुख्य चैत्याशिवाय विहार (रहाण्याच्या खोल्या) बरेच आहेत.  चैत्यांची लांबी १२५ व रुंदी ४५ फूट आहे.  एकंदर (दोन्ही बाजूंचे मिळून) ३० खांब आहेत.  खांब अष्टकोनी असून सुंदर कोरलेले आहेत.  त्यावर दोन हत्ती व स्त्रीपुरूषांचें एक एक जोडपें आहे.  डेर्‍याच्या मागील व महाद्वाराजवळील काही खांबांवर नकशी फार थोडी आहे.  कांही खांबावर रंगीत चित्रें आढळतात.  उजव्या हाताकडील आठव्या खांबावर एक धर्मचक्र व हरिणें वगैरे चित्रें कोरलेली असून खांब सोळा कोनी आहे.  सभामंडपाच्या ओवर्‍याच्या बाजूस घोडेस्वारांच्या मूर्ती आहेत.  घोडे मात्र प्रमाणबद्ध नाहीत.  प्रत्येक खांबावर निरनिराळ्या प्रसंगांची चित्रे आहेत.  मेंढा, घोडा, गरूड, नंदी, हत्ती, रेडा, स्त्री व पुरूष यांची चित्रें-मूर्ती-खोदलेली आहेत.  वरील छत अर्धचंद्राकार असून त्यांत लाकडी फळ्या बसविलेल्या आढळतात.  मुख्य गाभार्‍यात बुद्धाचा दाघोबा (धातुगर्भ) आहे.  हा इतर ठिकाणच्या दाघोबापेक्षां साधा असून दोन मजली आहे व साधारण भेलसाचैत्याप्रमाणें दिसतो.  दाघोबाच्या माथ्यावर फार जुनी अशी लाकडी छत्री आहे.  तिच्याखाली दाघोबाच्या माथ्याच्या कडांवर नकशी कोरलेली आहे.  दाघोबाच्या वायव्येस, माथ्यावर एक १० इंचाचें भोंक आहे; यातून बुद्धाचा अवशेष आंत ठेवतां येत असावा.  याशिवाय आणखी ८ भोकें आहेत, त्यांचा उपयोग कांही वस्तु अडकविण्याच्या कामी होत असावा.  या चैत्याच्या वरती सज्जा आहे.  त्यांत ठेवलेल्या खिडक्यांतून खाली उजेड पडण्याची सोय केलेली आहे. अशा सोयी भाजे, कोंडाणें व भेलसा येथील लेण्यांत केलेल्या आहेत.  महाद्वाराजवळच्या कमानीला लाकडी कमानीचा आधार आहे.  ही जुनी असावी; जरी ती नवी असली तरी प्राचीन कमानीचाच तो नमुना असावां हें खास.  सांची येथील दगडी कमानीबरहुकूम ही आहे.  यावरून वरील म्हणणें ग्राह्य ठरतें.  कांहींचें म्हणणें असें आहे कीं, कमान ही मुसुलमानांनीच हिंदुस्थानांत प्रथम (इमारत कामांत ) उपयोगांत आणिली.  परंतु हें खरें वाटत नाही.  पुढील द्वारमंडप हा गाभार्‍यापेक्षां जास्त रूंद असून मोठ्या दोन अष्टकोणी खांबांचा त्याला आधार आहे.  यावरील सज्यांतून मोठ्या सज्जांत असलेला खिडक्यांनां उजेड पुरविण्याची व्यवस्था केलेली आहे.  चैत्याच्या पुढील पडवींत दोन अष्टकोनी कोरींव खांब आहेत.  तेथील तीन हत्ती, त्यांच्यावर असलेल्या उत्तरकालीन (५ व्या अगर ६ व्या शतकांतील) बु्द्धाच्या बैठ्या मूर्ती, शिलालेखाच्या शिलापट्टिका, देवळाचे दरवाजे, स्त्रीपुरूषनर्तकांची व दोन जोडपीं ही पहाण्यासारखीं आहेत.  या जोडप्यांच्या माथ्यावरहि दरवाजे व खिडक्या एकावर एक अशा दोनचारदां दाखविलेल्या असून त्यांवरील कोरीव काम पाहण्यालायक आहे.  या पडवीस एक मधील व दोन बाजूंची अशीं तीन दारें असून त्यांच्यावरील कमानी घोड्याच्या नालासारख्या आहेत.  मधल्या दाराशी दोन्ही बाजूस स्त्रीपुरूषांचें एक जोडपें आहे. स्त्रीच्या पायांत सांखळ्या, कमरेस कमरपट्टा व कानांत बाळ्या आहेत.  पुरूषानें केंसांची गांठ कपाळाच्या मधोमध मारलेली असून त्याच्या कानांत कुंडलें व कमरेस कमरपट्टा आहे.  उजव्या बाजूस बुद्धाची मूर्ती असून तिचें आसन कमळांचे असून तें नागांनीं उचलून धरलेलें आहे.  बुद्धाच्या दोन्ही बाजूस चोपदार, चवरीवाले व इतर कांही मूर्ती आहेत.  या ठिकाणी अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत.  एकमेकांच्या खांद्यावर अगर गळ्यांत हात घातलेल्या व अंगावर दागदागिनें घातलेल्या अशा स्त्रीपुरूषांच्या जोडप्यांच्या बर्‍याच मूर्ती आहेत.  त्यांच्यावरून तत्कालीन पोषाख, केशरचना   व दागदागिने यांची चांगली कल्पना होते.  बुद्धाच्याहि चार पांच मूर्ती आहेत.  त्यांपैकी कांही उभ्या, कांही बैठ्या व कांही उपदेश अगर व्याख्यान करीत असलेल्या आणि शिष्यांनी घेरलेल्या अशा आहेत.  पुरूषांच्या हातांतहि कडी अगर मणिबंधासारखे दागिने असत असें दिसतें.  पद्मपाणी बुद्धाच्याहि दोन तीन मूर्ती आढळतात.  ही मूर्ती कमळाच्या सिंहासनावर उभी असलेली, डाव्या हातांत कमळ व उजवा हात अभयदर्शक अशी कोरलेली असते.  तिच्या दोन्ही बाजूस भक्तगण दाखविलेले असतात. कांही बुद्धांच्या मूर्तीवर नागाचें छत्र असतें.  एके ठिकाणी विचारांत तंद्री लागलेला बुद्ध दाखविलेला असून त्यावर एक कमान आहे. जवळच एक शिलालेखहि आहे.  पडवीच्या डाव्या बाजूसहि मूर्ती वगैरे आहेत. तेथें असलेले तीन सोंडतुटके हत्ती अति उत्तम कुसरीचे आहेत. हत्तींच्या वर व बाजूस समाधि लागलेल्या बुद्धाच्या मूर्ती आहेत.  पडवीच्या पाठीमागील भिंतीत तीन दारें असून त्यांवरील तीन शिलापट्टिकांत कोरींव छोट्या मूर्ती व दोन शिलालेख आहेत.  या दारांच्या प्रत्येक बाजूस एक स्त्रीपुरुषांचे जोडपें आहे.  त्यांच्या पोषाखावरुन व पुष्कळ दागिन्यांवरुन शातकर्णी कालांतील या मूर्ती असाव्यात असें वाटतें.  याला बळकटी, त्यांच्या शेजारी असलेल्या शिलालेखांवरुन मिळते.  येथें बुद्ध हा उपदेश करणारा दाखविला आहे.  जवळच एक मोठी व डोक्यांत पुष्कळ दागीने घातलेली अशी स्त्रीची मूर्ति आहे.  बहूधा हिनेंच या ठिकाणचें कोरींव काम केले असावे.  हा भाग बहुधा ५ व्या अगर ६ व्या शतकांतील असावा असें त्याच्या एकंदर स्वरूपावरून वाटतें.  पडवीच्या उत्तरेस वरीलप्रमाणेंच तीन हत्ती व बुद्धाच्या तीन मूर्ती (वरीलप्रमाणें परिवारासह) आहेत.  येथील कांही भाग अपुरा राहिला आहे.  हा भाग महायानपंथाचा असून तो इ.स. ४००-५०० च्या सुमाराचा असावा.  येथेंच लेणें कोरणार्‍याचा मूळ शिलालेख आहे.  जवळच नर्तन करणार्‍या व इतर स्त्रीपुरूषांच्या लहान लहान अनेक मूर्ती आहेत.  पडवीच्या पुढील भागांत पहाण्यालायक असा सिंहस्तंभ आहे.  हा सोळाकोनी असून याचा एकंदर आकार भेलसा येथील खांबासारखा आहे.  याच्यावर चारी बाजूस चार सिंह आहेत.  त्यांचे मागील भाग एकमेकांस जोडलेले आहेत.  परंतु ते निरनिराळे असल्याचें दिसत नाहीं व जोडले असल्यास त्यांचे जोड तर मुहींच आढळत नाहींत.  याच्याच जोडीला दुसरा खंब (हल्लीच्या एकवीरा देवीच्या देवळाच्या भागाखालीं) असावा व त्यावर बौद्धधर्माचें प्रख्यात चिन्ह जें चक्र तें असावें असें वाटतें.
    
पडवी व गाभारा मिळून सर्व लेण्यांत एकंदर बावीस शिलालेख आहेत.  त्यांतील सारांश पुढीलप्रमाणें आहे :- (१) पडवीच्या डाव्या टोंकास, तीन हत्तींच्या माथ्यावरील - ''वैजयंतीच्या भूतपाल शेट यानें जंबुद्वीपांतील उत्तम असें शिलागृह बांधिलें''. (२) सिंहस्तंभावरील - ''मराठा, मोठा योद्धा, गोतीचा मुलगा अग्निमित्राणक यानें दिलेली सिंहस्तंभाची देणगी''.  (३) पडवीच्या उजव्या टोंकास हत्तीच्या पायथ्याशीं - ''पहिल्या दोन हत्तींची व त्यांच्यावरील व खालील पट्टिकांची देणगी देणारा पूज्य भदंत इंददेव''.  (४) उजवीकडील लहान दरवाज्यावरील - ''धेनुकाकतचा सिंहदत्त गांधी (अत्तरवाला) याची दरवाज्याची देणगी''. (५) पडवीच्या बाहेरील खांबावर - ''महादेवनक गृहस्थाची आई भाईल हिची देणगी''.  (६) त्याच खांबावर खालच्या बाजूस - ''धेनुकाकतचा रहिवाशी वेणुवस सुतार याचा मुलगा शमीक यानें दार व द्वारमार्ग तयार केला''. (७) गाभार्‍यांत डावीकडील चौथ्या खांबावर - ''धेनुकाकतच्या सिहधय नांवाच्या यवनाची खांबाची देणगी''. (८) पांचव्या खांबावर उत्तर बाजूस - ''सोपारक येथील नंदा नांवाच्या बाईचा पुत्र शतिमित यानें आपल्या आईबापांसह ही खांबाची देणगी आपला मामा व गुरू जो भदंत धमुतरय त्याच्या संस्मरणीय सेवेसाठी दिली''.  (९) वरील लेखाखाली - ''भदंत धमुतरय याचा भाचा सोपारकचा शतिमित यानें, ज्यांत (बुद्धाचा) अवशेष आहे अशा खांबाची देणगी दिली''.  (१०) याच बाजूच्या तिसर्‍या खांबावर - ''धेनुकाकतच्या धम नांवाच्या यवनाची देणगी''.  (११) पुढील सातव्या खांबावर - ''धेनुकाकतच्या उसभदतचा पुत्र मितदेवनक याची खांबाची देणगी''. सज्जांतील आतल्या भागांत - "जोगीण अशाढमिता इ-यी देणगी" (१३) मध्य दरवाजाच्या उजवीकडे वरती - ''पूर्णाप्रत दीनिक याचा पुत्र व राजा खहराट खतप नहपान याचा जांवई, तीन लक्ष गाई देणारा, ज्यानें सोनें (दान) दिलें आणि जो बनासा नदीच्या तीर्थास आला होता, देवब्राह्मणांस सोळा गांवें देणारा, पवित्र प्रभास क्षेत्री आठ ब्राह्मणांची लग्नें करून देणारा, तीन लक्ष गाईंचें दान करणारा, आणि पावसाळ्यांत या लेण्यांत आश्रयार्थ राहणार्‍या व चार्‍ही दिशांकडून आलेल्या संघांतील भिक्षूंनां ज्यानें वलुरक येथें मुक्काम असतांना करजक गांव इनाम दिलें असा उसभदत''.  (१४) याच दरवाज्याच्या डावीकडे - ''राजा वासीठीपुत प्रख्यात प्रभु (सामिसिरी) (पुलुमायी) सातव्या वर्षी उष्णकाळांतील पांचव्या पंधरवड्याचा, आणि पहिला दिवस; त्या दिवशी सोमदेव, फार शूर वसीठी व मितदेव यांचा पुत्र कोसौकीचा नातु.  ओखलकीयचा मोठा लढवय्या, यानें वालुरकांच्या संघास एक गांव दिलें.  या देणगीचा उपयोग वालुरकाच्या लेण्याची दुरूस्ती करण्याकडे करणें''.  (१५) उजव्या हाताकडील दरवाजाच्या उजव्या बाजूस स्त्रीपुरूष जोडप्यांच्या वर - ''भदसम भिक्षूनें दिलेली जोडप्यांची देणगी''.  (१६) पडवीच्या पुढें, उजव्या कोंपर्‍यास आंतील बाजूस, एका जोडप्यावर वरील १५ व्याप्रमाणेंच (१७) मध्यदरवाजाच्या डावीकडे, चित्राच्याखालीं - ''.... समणची आई हिची वेदिकाची देणगी'';  (१८) याच दरवाजाच्या उजवीकडे खाली - ''घूणिक याची आई कोडी भिक्षुणी इची वेदिकाची देणगी, नदिक यानें तयार केली.'' (१९) मध्यदरवाजा व उजवीकडील दरवाजा यांच्यामधील बुद्धमूर्तीच्या वर-यांत ''मामल (मावळ) येथील तालुकदारानें भिक्षूंनां वासिस्ठी पुत्राच्या १९ व्या वर्षी दिलेली देणगी'' नमूद केली आहे.
    
सिंहस्तंभाच्या वायव्येस कांही विहार आहेत.  एक पाण्याचें टांकें व जवळच एक पडका दाघोबा आहे.  याच्या उत्तरेस १०० फूट लांबीच्या लेण्यांत २ । ३ बिहार आहेत.  त्याच्याहि उत्तरेस आणखी विहार, टांकी व पडका दाघोबा आहे.  यांच्यावर एक २८ x २७ x ८ फुटांचा विहार असून त्यांत ४ खोल्या दोन बाजूस व पांच खोल्या मागे आहेत.  खोलीत एक एक दगडी ओटा (निजण्यास) आहे.  एका खोलींतून वर जाण्यास जिना आहे.  याच्या वर आणखी एक विहार ३४ x ८ x ९ फुटांचा आहे.  यांत १४ खोल्या आहेत, डावीकडे एक मोठा दगडी ओटा आहे, येथें लाकडीकामाचा अवशेष दिसतो.  पूर्व व दक्षिण बाजूंच्या भिंतीत अलीकडे कोरलेल्या बुद्धाच्या दोन मूर्ती आहेत.  याच्या पुढें चार खिडक्या व त्याच्यापुढें ४० x ७ x १२ फुटांची पडवी आहे.  तिच्या पुढें उत्तरेस एक पाण्याचें टांकें व त्याच्या पुढें सज्जा आहे.  उत्तरेस आणखी एक ३८ x १७ फूट लांबीरूंदीचा बिहार असून त्यांत सहा खोल्या - निजावयाच्या दगडी ओट्यांसह - आहेत.  या विहाराच्या पूर्वभिंतीवर (२० वा) शिलालेख आहे - ''पूर्णाप्रत.  राजा वासिठीपुत प्रख्यात (सिरी) पुलीमावी, (त्याच्या राज्याच्या) चोविसाव्या वर्षी, हेमंतॠतूंतील तिसर्‍या पंधरवड्यांतील, दुसर्‍या दिवशी नऊ खोल्यांच्या या मंडपाची उदार देणगी अबुलामचा रहिवासी एक सोवसक, सेतफरनचा मुलगा हरफरन यानें दिलेली, चारी दिशांतून आलेल्या महासंघांतील संघाच्या ताब्यासाठी बाप, आई, सर्व लोक व जीवंत वस्तू यांच्या सततच्या कल्याणाभिवृद्धीसाठी एकविसाव्या वर्षी स्थापिलें.  माझ्यासह बुधरखित आणि त्याची आई उपासिका.  बुधरखिताच्या आईनें एक रस्ता तयार करून अणीक धर्मकृत्यास मदत केली.''  यापुढील खोलीतील पाण्याच्या टाक्यावर पुढील (२१ वा) शिलालेख आहे - '' (पुलुमायीच्या) पांचव्या वर्षी व हेमंतपक्षांत भदंताच्या स्त्रीशिष्यिणीनें हें लेणें कोरलें व एका श्राविकेच्या भाचीनें हें टाकें भिक्षुसंघाकरिता केलें.'' चैत्यागाराच्या दक्षिणेस अनेक कोरीव कामें आहेत.  एक प्रशस्त पण अपुरा असा दिवाणखाना, एक लहान खोली (हिच्यांच पाठीमागील भिंतीत बुद्धमूर्ति आहे), एक पाण्याचें टांकें, एक मोठा विहार (आंत नऊ खोल्या असलेला) आहे.  या विहारांत मागल्या भिंतींत एक बुद्धाची मूर्ति, कमळावर बसलेली, कमळाखालीं दोन हरिणांच्यामध्यें चक्र असलेली, मागें दोन पूजक असलेली, दोन्ही बाजूंस चवरीवाले व डोकीवर दोन विद्याधर असलेली अशी आहे.  या दिवाणखान्यांत एक दरवाजा, दोन खिडक्या व पडवी असून उत्तरेकडे एक खोली आहे.  समोर दोन अष्टकोनी खांब व त्यांवर लहानसा एक सज्जा आहे.  या दिवाणखान्याच्या पुढें दोन खोल्या आहेत, त्यांपैकी दक्षिणाभिमुखी खोलीच्या पूर्वबाजूच्या भिंतींत पुढील (२२ वा) शिलालेख आहे - ''पूर्णाप्रत. बुधरखिताची पुण्यकारक देणगी.''  याच्याहि पलीकडे पूर्वेस एक गुहा, असून तींत एक खोली व एक टाके आहे.
    
मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूनें या पर्वताच्या माथ्यावर जाण्यास एक वाट आहे.  या रस्त्यावर तीन जुन्या इमारतीचे अवशेष आढळतात.  पैकी एक देऊळ व दुसरी स्तूपाची असावी.  ही जागा कार्ले बंगल्याच्या जागेहून ५५० फूट उंच आहे.
    
कार्ल्याच्या आसपासच्या डोंगरात अनेक ठिकाणी थोडथोडी व अपुरी कोरीव कामें आहेत.  कोठें खोल्या तर कोठें पाण्याचीं टांकी आढळतात.  कार्ल्याजवळील देवगड येथें एक अपुरा विहार आहे.  त्यांतील खांब पहाण्यासारखे आहेत.  गांवाच्या पूर्वेस पहाडाच्या चढावावर तळीं व टांकी आहेत.  शेलेटण गांवाच्या दक्षिणेस एक मोठें तळें व कुंड आहे.  उत्तरेस धान्याचें दगडी अंबार व एक गोलस्तंभ (अपुरा दाघोबा) आहे.  टांकवें गांवी दोन मोठी तळीं, वळक गांवी एक अपुरा लहानसा दाघोबा, एक लहान लेणें, एक कमान, एक खोली व एक अंबार आहे.  अयरें गांवीं व कार्ले गांवच्या ईशान्येकडील डोंगरांत अनेक ठिकाणी पुष्कळ कोरीव कामें आहेत ती बहुधा एक एक भिक्षूच्या राहण्याच्या सोईची आहेत.  वलुरक हें कार्ल्यांच्या बौद्धविहाराचें प्राचीन नांव असावें.  (पुणें ग्याझे भाग ३; फर्ग्युसन-केव्ह टेंपलस ऑफ इंडिया, मुंबई ग्याझे. पु.१५भा. २; कित्ता. पु. १६; आर्कि ऑलॉ. सर्व्हे ऑफ वेस्टर्न इंडिया नं. १०; मुंबई ग्याझे. पु. १३)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .