प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  
           
कॉर्नवालीस - लॉर्ड कॉर्नवालीस हा बंगालचा दुसरा गव्हर्नर जनरल इ.स. १७८६ च्या सप्टेंबर महिन्यांत आपल्या वयाच्या ४८ व्या वर्षी मोठ्या नाखुषीनें कामावर रूजू झाला.  हा जातीचा शिपाई होता.  याचा अमेरिकेमध्ये १७८१ त पराभव झाला होता.  यावेळी विलायतेंत सरदार-मंडळाचें वर्चस्व असल्यानें याला इकडे नेमिलें.  हेंन्स्टिग्जला आपलें पद कायम ठेवण्याकरितां अनेक लटपटी कराव्या लागल्या, तसें याला कांही करावें लागलें नाहीं.  याच्यावर प्रधानमंडळाचा पुरा विश्वास असल्यानें याला मुलकी व लष्करी सारे अधिकार दिले होते.  कौन्सिलचा एकमुखी निकालहि योग्य वाटल्यास धाब्यावर बसविण्याचा त्याला अधिकार मिळाला होता.  हेस्टिंग्जच्या मार्गात हीच मोठी अडच्ण होता.  कॉर्नवालीस हा उपजत तैलबुद्धीचा नसला तरी धाडशी व करारी होता.  त्याच्या हातून चुका व त्याचे पराभव झाले तरी तो मुत्सद्दी होता हें खास.  त्यानें पहिल्या तीन वर्षांत सिव्हिल सर्विसच्या नियमांची दुरूस्ती केली.  कंपनीचा मारवाडी कंजूषपणा त्यानें कमी करविला.  मोठ्या नोकरांचे अगडबंब पगार कमी करून त्यानें खालच्या दर्जाच्या नोकरांचे वाढविले.  होता होईतों चढाईचें धोरण स्वीकारावयाचें नाहीं असें त्यानें ठरविल्यामुळें, इकडे आल्याबरोबर पेशवे व निजामअल्ली यांनां पत्रें पाठवून, त्यांचें टिपूशीं जें युद्ध चाललें होतें त्यांत भाग घेण्याची आपली मुळींच इच्छा नाहीं, असें त्यानें स्पष्ट कळविलें.  तथापि त्यानें तीन्हीहि इलाख्यांतील आपलें लष्कर वाढवून त्याची तयारी मात्र जय्यत ठेविली होती.  यामुळें आपणाशीं युद्ध करण्याकरितां इंग्रजांनी ही पूर्वतयारी चालविली आहे अशी टिपूस शंका येऊन त्याच्या मनांत इंग्रजांविषयी पक्की अढी बसली व त्यानें पेशवे व निजामअल्ली यांच्याशीं तह करून त्यांच्याशी चाललेलें युद्ध बंद केलें.
    
सन १७६८ साली इंग्रज व निजामअल्ली यांच्या दरम्यान जो तह झाला होता त्या तहान्वयें सलाबतजंगाच्या मरणानंतर निजामअल्लीनें गंतूर जिल्हा इंग्रजांच्या स्वाधीन करावयास हवा होता.  परंतु सलाबतजंग मरून सहा वर्षे होऊन गेली तरी तो निजामअल्लीकडून इंग्रजांनां मिळाला नाही.  म्हणून कॉर्नवालीस यानें निजामअल्लीच्या दरबारी आपला वकील पाठवून तो जिल्हा स्वाधीन करण्याविषयी आतां मागणी केली (१८७८).  निजामअल्लीस आपल्या राज्याच्या कमकुवतपणाची पूर्ण जाणीव असल्यामुळें त्यानें गंतूर जिल्हा ताबडतोब इंग्रजांच्या पदरांत घातला (सप्टेंबर).  अशा रीतीनें कॉर्नवालीस यानें अल्प आयासांत एक जिल्हा मिळविला खरा, परंतु त्यायोगें जो एक निराळाच प्रश्न त्याच्यापुढें उपस्थित झाला तो सोडविण्याकरितां त्याला दुटप्पी धोरणाचाच अवलंब केल्याशिवाय गत्यंतर राहिलें नव्हतें.  कारण १७६८ सालच्या तहांत टिपूचें राज्य काबीज करण्याकरितां इंग्रजांनी निजामअल्लीच्या मदतीस दोन पलटणी व सहा तोफा पाठवाव्या अशीहि एक अट होती. निजामअल्लीनें आतां ती अट पूर्ण करण्याविषयी गव्हर्नर जनरलास कळविले (१७८९).  तेव्हां तो फार पेंचांत सापडला.  कारण १७६९ साली मंगलोर येथें हैदराशी व १७८४ त पुन्हां टिपूशी असे इंग्रजांचे त्या बापलेकांशीं जे दोन तह झाले होते, त्या तहांनी इंग्रजांनी टिपूचा त्याच्या राज्यावरील हक्क कबूल केला असल्यामुळें त्याचें राज्य काबीज करून तें निजामअल्लीस देण्याचा इंग्रजांनां कांहीच हक्क नव्हता; म्हणून कॉर्नवालीस यानें निजामअल्लीस एक असा खलीता पाठविला की, जर पुढें मागें टिपूचा मुलूख आमच्याकडे आला तर त्या तहाच्या अटी आपण पूर्ण केल्याशिवाय रहाणार नाहीं.  यावरून टिपूवर स्वारी करण्याचा कॉर्नवालीसचा विचार होता असें अनुमान निघतें व या अनुमानास त्याच्या पुढील वाक्यांनी अधिकच बळकटी येते. इ.स. १७६८ च्या तहांत इंग्रजांनां गरज नसेल तेव्हां त्यांनी निजामअल्लीच्या मदतीस दोन पलटणी व सहा तोफा पाठवाव्या असें म्हटलें होतें. पण या खलित्यांत कॉर्नवालीस यानें निजामअल्लीस गरज लागेल तेव्हां ही मदत पाठविण्याचें कबूल केलें होतें.  इंग्रजांच्या दोस्तांविरूद्ध लढण्यांत या पलटणींचा उपयोग केला जाऊं नये अशीहि एक अट घालण्यांत आली होती खरी; पण दोस्तांची जी नावनिशीवर यादी दिली होती तींत मराठ्यांचें नांव नमूद केलें असून टिपूचा मुळीं उल्लेखच नव्हता.  त्यामुळें इंग्रजांनी आपल्यावर स्वारी करण्याकरितां निजामअल्लीशीं गट्टी केली आहे अशी टिपूची साहजीकच समजूत होऊन त्यानें ता. २९ डिसेंबर सन १७८९ रोजी  त्रावणकोरच्या तटबंदीवर उघडउघड हल्ला केला.  त्रावणकोरचें राज्य काबीज करण्यासाठीं टिपूनें बरेच दिवस अगोदरपासून तयारी चालविली होती.  त्यानें इतके दिवसपर्यंत इंग्रजांची प्रत्यक्ष जरी कांही आगळिक केली नव्हती तरी त्याच्या एकंदर धोरणावरून कॉर्नवालीसचें मन त्याच्या हेतूविषयी साशंक होऊन त्याला मराठे व निजामअल्ली यांच्याशी असलेली दोस्ती पक्की करण्याची आवश्यकता भासूं लागली होती.  निजामअल्लीस जवळ ओढण्याकरितां दुटप्पी धोरण स्वीकारून त्यानें टिपूच्या रोषास स्वतःला जें पात्र करून घेतलें त्याला अंशतः हीहि गोष्ट कारण झाली होती.  सन १७८७ साली नाना फडनविसानें टिपूपासून मराठी राज्याचें संरक्षण करण्याकरितां कार्नवालीसची मदत मागितली तेव्हा, ''कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या'' हुकमाशिवाय गव्हर्नर जनरलानें आपण होऊन हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांशीं भांडण उकरून काढूं नयें, असा पार्लमेंटचा ठराव झाला असल्यामुळें, त्यानें ती नाकारली होती.  पण आतां नाना फडनविसानें मॅलेटमार्फत कॉर्नवालीसशी पुन्हां बोलणें लाविलें.  तेव्हां तो टिपूवर स्वारी करण्यास कबूल झाला (१७९०) व इंग्रज, मराठे व निजामअल्ली या तिघांनी मिळून टिपूवर मोहीम करून जिंकलेला मुलुख तिघांमध्यें सारखा वांटून घ्यावा असें ठरविण्यांत आलें (१७९०) कॉर्नवालीसनें मद्रासच्या गव्हर्नरास सैन्याची तयारी करावयास हुकूम सोडले परंतु त्या शिस्तवान गव्हर्नरानें (हॉलंड) ते फेटाळून लाविले ! पुढें त्याला बडतर्फ करून दुसरा सुभेदार नेमावा लागला !!
    
टिपूवरील मोहिमेचें काम पहिले आठ महिने सेनापति मेडोज याजकडे सोपविले होतें.  सन १७९१ सालच्या जानेवारी महिन्यांत तो परत आल्यावर त्याच महिन्याच्या २९ व्या तारखेस ब्रिटिश सैन्याचें आधिपत्य आपल्या स्वतःकडे घेऊन कॉर्नवालीस मोहिमेंवर निघाला.  या मोहिमेंत टिपूनें त्याची सारी रसद मारली तेव्हां तो बंगलोर येथें असतांनां त्याला उपासमारीनें नाइलाजामुळें मोहीम थांबवावी लागली.  एवढेंच नव्हे,  तर त्याची फार बिकट स्थिति झाली तेव्हां परशुरामभाऊ पटवर्धनांनी तात्काळ त्याच्या मदतीस येऊन त्याची लाज राखिली.  कॅप्टन मूर म्हणतो ''दैवानेंच मराठ्यांनां आमच्या मदतीस पाठविलें'' पुढें मराठ्यांच्याच साहाय्यानें या युद्धांत टिपूचा पराभव होऊन इंग्रजांनां एक कोटि दहा हजार रूपये खंडणी व दिंदिगल, बारामहाल, कुर्ग व मलबार हे जिल्हे मिळाले.  सर्व दोस्तांनां मिळून टिपूचें अर्धे राज्य व तीन कोटी तीस लाख रूपये खंडणी मिळाली होती.  या मोहिमेचें काम आटोपल्यावर सन १७९२ सालच्या मार्च महिन्याच्या अखेरीस कॉर्नवालीस आपल्या मुलखांत परत यावयास निघाला.  पार्लमेंटचा कायदा मोडून टिपूचा मुलुख दाबल्याबद्दल बक्षीस म्हणून कंपनीनें कार्नवालीस याला मार्क्विस केलें.
    
यावेळी त्यानें बंगाल, वहार, बनारस व ओरिसा या प्रांतांत कायमधार्‍याची पद्धत प्रचारांत आणली.  पण त्यामुळें तीन कोटींचा तोट्याचा बोजा विनाकारण इतर प्रांतांवर बसविला गेला.
    
त्यानें पोलीस खातें आयरिश पद्धतीवर स्थापलें.  न्यायखात्यांत हेस्टिंग्जची पद्धति बदलून, मुसुलमानी कायद्यांचा निष्कारण कांच काढून दरेक जिल्ह्यास हल्लींसारखीं (पण फिरती) सबजज्जांची कोर्टें स्थापून सुधारणा केली.  त्याचा येथील कोण्याहि (हिंदु अगर मुसुलमान) अधिकार्‍यांवर अजिबात विश्वास नसल्यानें सर्व वरिष्ठ अधिकारी त्यानें यूरापियनच नेमिले, ! ''एतद्देशीय मग तो कोणत्याहि जातीचा असो त्याच्या हाती निदान या खात्याचें तरी काम दिलें तर योजिलेल्या सर्व सुधारणा निष्फळ होतील !'' असें तो स्वतःच म्हणतो, आणि त्यासाठी नेमलेल्या यूरोपियन अधिकार्‍यास मात्र हिंदीलोकांपेक्षा भरमसाट जास्त पगार देतो ! या बाबतींत मार्शमन म्हणतो ''याच्या या, म्हणजे हिंदीलोकांना कोणत्याहि महत्वाच्या जागेवर अविश्वासानें न नेमण्याच्या, अत्यंत मोठ्या घोडचुकीमुळें त्यांची कायदेशीर व मानसिक महत्वाकांक्षा मुळांतच त्यानें खुडून टाकून'' प्रजेंत या नवीन राज्यकर्त्यांबद्दल असंतोष व अप्रीति उत्पन्न केली ! बरें यामुळें कांही फायदा न होतां उलट ''पुष्कळ वर्षे प्रजेला न्यायच मिळाला नाही'' !! इ.स. १७९५ मध्यें बनारस येथील कोर्टांत तीस हजार खटले शिल्लक राहिले होते !! याच्यानें कर्नाटक व अयोध्या येथील राज्यकारभार सुरळींत चालविला गेला नाही. टिपूशीं चाललेलें युद्ध संपल्यावर कॉर्नवालीसच्या मनांत आपण मध्यस्थी करून निजाम व मराठे यांच्यामधील देण्याघेण्याच्या प्रश्नांसंबंधी कांही तरी तडजोड करून द्यावी व देशांत शांतता राहील अशी व्यवस्था करावी असें होतें.  परंतु ह्याचा अर्थ इंग्रज आपणांस मराठ्यांविरूद्ध मदत करण्यास तयार आहेत असा करून निजामानें मराठ्यांचे वाजवी देणेंहि फेंटाळून लावण्याचा विचार चालविला व मराठ्यांचें वाजवी देणेंहि फेंटाळून लावण्याचा विचार चालविला व मराठ्यांनां कार्नबालीसचें हें कृत्य म्हणजे आपल्या कामांत निष्कारण ढवळाढवळ आहे असें वाटून, त्यांनीं कॉर्नवालीस यानें सुचविलेल्या अटींनां उत्तर देण्याची चालढकल चालविली.
    
इ.स. १७९३ च्या आक्टोबर महिन्यांत लॉर्ड कॉर्नवालीस हा सर जॉन शोअर याच्या हवाली आपलें काम करून विलायतेस निघून गेला.  तत्पूर्वी त्यानें कंपनीची सनद पार्लमेंटकडून आणखी वीस वर्षे वाढवून घेतली.  मिशनरी लोकांनां त्यानें इकडे येऊं न देण्याबद्दल मत दिलें.  कंपनीशिवाय इतर व्यापारी अगर इंग्रजी रयत यांनां जास्त हक्क देऊं नयेत म्हणून खटपट केली.  कंपनीच्या कोणाहि नोकरास गव्हर्नरजनरलची जागा देऊं नये असेंहि त्याचें मत होतें.
    
शोअरच्या नंतर मार्क्विस वेलस्ली हा गव्हर्नर जनरल होऊन आला.  यानें एतद्देशीय संस्थानिकांशी युद्धें करण्यांत आपली सर्व कारकीर्द खर्च करून कंपनीस बरेंच कर्ज करून ठेविल्यामुळें व डायरेक्टरांचें तो ऐकेनासा झाल्यामुळें तो इंग्लंडांतील लोकांस फार अप्रिय झाल्यानें इंग्लंडांतील अगदी वरिष्ठ अधिकार्‍यांनी व डायरेक्टरांनी आग्रह धरून वेलस्लीस स्वदेशीं परत बोलाविलें.  व त्याच्या ऐवजीं मार्क्विस कॉर्नवालीस याची गव्हर्नर जनरलच्या जागी पुन्हां एकदां नेमणूक करून पाठविलें.  कार्नवालीस हा १८०५ साली जुलै महिन्याच्या ३० व्या तारखेस कलकत्यास येऊन पोंचला व त्याच दिवशीं तो आपल्या कामावर रूजू झाला.  परकीय शत्रूनें स्वारी केली असतां तिजपासून स्वतःचें रक्षण करण्याकरितां परस्परांनीं परस्परांस मदत करण्यासंबंधी वेलस्ली यानें एतद्देशीय संस्थानिकांशी केलेले तह व त्याकरितां त्यानें शोधून काढलेली कुमकी सैन्याची टूम या दोन्हीहि गोष्टी कॉर्नवालीस यास मुळींच पसंत नव्हत्या.  होळकराशीं चाललेल्या युद्धाचा एकदांचा शेवट करण्यास तो इतका उत्सुक झाला होता कीं, शिंद्यानें ब्रिटिंश वकीलास कैदेंत ठेविलें असतांहि ती गोष्ट विसरून जाऊन तो ग्वाल्हेर, गोहद व त्याच्या खालचा मुलुख या सर्वांवर पाणी सोडून यमुना ही इंग्रजांची सरहद्द कबूल करण्यास तयार झाला.  चालू युद्धांत जिंकून घेतलेला सर्व मुलूख परत करून आपण तह करण्यास तयार आहों असें त्यानें होळकरास कळविलें होतें.  जोधपूर, जयपूर, भरतपूर, माचेडी व बुंदी येथील संस्थानिकांच्या मुलुखांचें शत्रूंपासून संरक्षण करण्याची वेलस्लीनें घेतलेली जबाबदारीहि तो जमल्यास स्वतःवरून काढुन टाकू पाहात होता.  यापैकी जोधपूरच्या राजास तर त्याच्या वकीलानें इंग्रजांशी केलेला तह मान्यच नव्हता.  जयपूरच्या राजानेंहि आपल्या तहाच्या अटी अद्याप पूर्ण पाळल्या नसल्यानें कार्नवालीस यानें इंग्रजांचा त्याच्याशीं झालेला तह रद्द समजण्यांत यावा असे ताबडतोब त्यास कळविलें.  राहतां राहिले भरतपूर, माचेडी व बुंदी येथील राजे; त्यांच्यासंबंधीची जबाबदारी काढून टाकण्याकरितां दिल्लीच्या दक्षिणेकडील व यमुनेच्या पश्चिमेकडील शिंद्यापासून जिंकून घेतलेला मुलूख ह्या संस्थानिकास वांटून देऊन ते आपले इंग्रजांशी झालेले पूर्वीचे सर्व करारमदार रद्द समजण्यास तयार होत असल्यास प्रयत्‍न करून पहावा, असें त्यानें से.लेक यास १९ सप्टेंबर रोजीं लिहूनहि पाठविलें.  परंतु हा खलिता लेक याला मिळण्यापूर्वीच त्यानें गव्हर्नर जनरलाचें धोरण ओळखून, अंबाजी इंगळ्यास शिंद्यांच्या कारभार्‍याची जागा मिळाली होती या गोष्टीचा फायदा घेऊन शिंद्यांकडून तहाचें बोलणें आणविलें होतें व शिंद्यांनी ब्रिटिश वकिलास बंधमुक्त करण्याचें कबूल करतांच शिंद्यासंबंधीच्या तडजोडीची योजना, गव्हर्नरजनराकडे रवाना केली होती.  ही योजना रवाना केल्यावर गव्हर्नरजनरलाचें पत्र (से.लेक) याच्या हाती पडलें; तेव्हां शिंद्यानें तहाचें बोलणें लावलें असल्यामुळें उत्पन्न झालेली अनुकूल परिस्थिति व राजपुतान्यांतील संस्थानिकांशी झालेले करारमदार रद्द करण्यापासून उद्‍भणारा घोंटाळा पुढें ठेवून, स्वतःच्या योजनेचा विचार होऊन उत्तर येईपावेतों आपण वाट पहाण्याचें ठरविलें आहे, असें त्यानें गव्हर्नरजनरलास कळविलें.  हें पत्र कॉर्नवालीस यास पोंचण्यापूर्वीच तो आजारी पडला व त्या दुखण्यांतच त्याचा तारीख ५ आक्टोबर रोजी गाझीपुर येथे अंत झाला.  त्याच्या मागून बंगाल कौन्सिलचा सीनियर मेंबर सर जॉर्ज बार्लो हा त्याचें काम पाहूं लागला.  कॉर्नवालीसच्या हिंदुस्थांनांतील राजे लोकांशी सख्यत्वाच्या ठेविलेल्या या धोरणाचा साम्राज्याभिमानी इंग्रज अधिकार्‍यांनी व स्मिथसारख्या पक्षाभिमानी इतिहासकारांनी निषेध केला आहे व त्यानें हिंदुराज्यें घशाखालीं उतरविण्यांचा वेलस्लीच्या प्रयत्‍नाला पाठिंबा दिला नाही, म्हणून त्याला दोष दिला आहे. (डफ, इ.स्मिथ, मालकम पहा.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .