प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
            
कार्थेज - कार्थेज हें आफ्रिकेच्या उत्तरकिनार्‍यावरील अति प्राचीन व प्रसिद्ध शहरांपैकी एक शहर होतें.  फिनिशियन लोकांनी हें शहर ख्रि.पू. ८२२ मध्यें वसविलें.  परंतु रोमन लोकांनी ख्रि.पू. १४६ त याचा नाश केला.  त्यांनीच पुन्हां हें शहर वसविलें.  तें अखेरीस अरबांनी इ.स. ६९८ त कायमचेंच पाडून टाकिलें.  फिनिशियन भाषेत याचा अर्थ 'नवें शहर' असा होतो.  सायनस युटीसेन्सीस (आधुनिक - टयुनीसचें आखात) याच्या मध्यभागी हें असून याच्या पश्चिमेस अॅपोलो भूशीर (आधुनिक रासअली एल मेक्की) व पूर्वेस मर्क्युरी अथवा केप बॉन (आधुनिक रास अद्दार ) आहेत. केप गॅमार्ट, सिद्दी बुसैद खेडें (हें टेंकडीवर असून याची उंची ४९० फूट आहे) व गोलेटाबंदर ही तीन मिळून कार्थेजची त्रिकोणाकृति सरहद्द होते.  केप गॅमार्टवर मुख्य स्मशानभूमि होती.  बालेकिल्ला बिर्साच्या टेकडीवर (सध्यां येथें एक मठ व प्रार्थनामंदीर आहे) होता.  बिर्साच्या दक्षिणेस कांही अंतरावर बंदरें होती.  गॅमार्ट व गोलेटा यांमधील अंतर ६ मैल होतें.
    
टयुनीसच्या आखाताच्या दुसर्‍या बाजूस पर्वताची एक उंच ओळ असून येथें रोम व कार्थेज, आणि रोम व व्हँल्डाल यांच्यामधील निकराच्या लढाया झाल्या.  यांपैकी कित्येक ठिकाणी जुने अवशेष पुष्कळ आहेत.  बिर्साच्या भोंवती व मैदानांत जिकडे तिकडे जवांची शेतें व द्राक्षाचे मळे दृष्टीस पडतात.  कार्थेजमुळें आसपासच्या समुद्रावर व जमीनीवरील बर्‍याचशा प्रदेशावर नजर ठेवतां येते.
    
येथील प्राचीन बंदरे लष्करी व व्यापारी अशा दोन्ही सोयीची असत.  याशिवाय मालउतारासाठी किनार्‍यावर एक मोठा धक्का असे.  लष्करी बंदर कोथोन याचा संबंध व्यापारी बंदराशीं एका कालव्यानें जोडला होता.  बंदरांत १२० गलबतें राहण्याची सोय होती.  त्याच्या मध्यभागी एक अगदी लहान बेट असून तेथून बंदरांतील सर्व आरमाराची पहाणी करतां येई.
    
येथील अवशेषांत घोडदौडीचें ठिकाण, एक मैदान, प्रतिनिधिसभागृह, सराफकट्टा, अपोलोचें मंदीर, न्यायसभा व थिओडोरसचें स्नानगृह वगैरे अवशेष आढळतात.  सेंट लुईच्या टेंकडीवर प्राचीन बालेकिल्ला बिर्सा असून कांही ठिकाणी त्यावर तटबंदीच्या रांगा होतया.  हा किल्ला पुन्हां पाडला व बांधला गेला आहे.  या पठारावर सर्वांत प्राचीन (प्युनिक) कबरी व मोठाले हौद, एशमुन ह्या प्रसिद्ध मंदिराचा पाया व रोमन सुभेदाराचा राजवाडा यांचे अवशेष सापडले.
    
लामाल्गा स्टेशनपासून कांही अंतरावर एक नाटकगृह, चार स्मशानें व वायव्येस इद्रिसी नांवाच्या अरबी भूगोलज्ञाच्या वेळेचे (२४ पैकी) १४ हौदांचे अवशेष आढळतात.
    
पेटिट सेमिनेर टेंकडीवर एक ख्रिस्ती मंदिर, गार्गिलीयसचे हमामखाने व कांही मोठ्या कबरी पडक्या स्थितींत आढळतात.  डर्मेशे भागांत अॅंटोनियसचे हमामखाने, डुईमेसमध्यें एक संगमरवरी दगडाचा (रोमनकाळचा) राजवाडा, कांही मोठी पाण्याची टांकी, बोर्ज किल्ल्याच्या पलीकडे पठारावर एक नाटकगृह व (रोमनकाळांतील) बरेचसे संगमरवरी पुतळे सापडले.  येथील महत्वाचा अवशेष म्हणजे रोमन कालव्याचा होय.  हा सुमारें ५६ मैल लांब होता.
    
कार्थेज येथील अवशेषांच्या शास्त्रीय शोधास १८३३ पासून सुरूवात झाली.  सर्व संशोधकांत डेलट्रे याचे शोध फार महत्वाचे आहेत.
    
इतिहास - कार्थेजच्या इतिहासाचे चार भाग पडतात. (१) स्थापनेपासून ख्रि.पू. ५५० त झालेल्या सिसिलीयन ग्रीकांबरोबरच्या युद्धापर्यंतः (२) ५५० पासून २६५ म्हणजे प्युनिक युद्धाच्या सुरूवातीपर्यंत; (३) प्यूनिक युद्धापासून कार्थेजचा पाडाव होईपर्यंत (ख्रि.पू. १४६); (४) रोमन व बायझन्टाईन अंमलापासून अरबांनी इ.स. ६९८ त यांचा नाश करीपर्यंत.
    
स्थापने पासून ख्रि.पू. ५५० पर्यंतचा काळ - अतिप्राचीन काळापासून फिनिशियन दर्यावर्दी आफ्रिकेच्या किनार्‍यावर जात असत व तेथील लिबियन लोकांशी मालाची देवघेव करीत.  ख्रि.पू.१६व्या शतकांत किनार्‍यावर सिडोनियन लोकांच्या वखारी होत्या.  त्यांपैकी कंबे येथील वखारीच्याच जागीं पुढें कार्थेज वसलें.  बोर्ज जेदिदजवळ या वसाहतीच्या बर्‍याच खाणाखुणा सापडल्या आहेत.  कार्थेजची स्थापना ख्रि.पू. ८५० त टीरियन लोकांनीं केली असें दंतकथेवरून कळते.  या लोकांत टीरीयन राजाची कन्या एलिसा ही मुख्य असून ती आपल्या भावाच्या गांजणुकीनें त्रासून येथें पळून आली.  या नवीन लोकांनी जमीन विकत घेऊन त्यावर शहर बांधण्याचें ठरविलें.  एलिसानें बैलाच्या कातड्याइतकी जमीन मागितली व ती लीबियन राजानें देण्याचें कबूल केलें.  नंतर तिनें त्या कातड्याच्या बारीक वाद्या काढल्या व त्या एकीस एक बांधून इतक्या मोठ्या केल्या की, त्यांनी सबंध टेकडी व्यापिली आणि कार्थेज वसविलें.  एलिसानें हें केल्याबद्दल टायर देशांतील एका देवळास कार्थेजचें लोक पुढें बरीच वर्षे दरसाल देणगी पाठवीत असत.  तसेच एलिसा उर्फ डिडोचें चित्र रोमन साम्राज्याच्या वेळी नाण्यावर कोरीत असत.
    
कार्थेजचा प्राचीन इतिहास उपलब्ध नसून ६ व्या शतकाच्या पुढील उपलब्ध होतो.  या वेळी या शहराला राजधानीचें पूर्ण वैभव प्राप्‍त झालें होतें.  शहराचे झ्युगिटाना बायझांशियम व सौदागर पेठ असे तीन मोठमोठे भाग पडले होते.  प्रांताच्या सरहद्दी ठरविण्यावरून येथील लोकांचे व ग्रीकांचे पहिलें भांडण झालें.
    
पुढें ६ व्या शतकांत टायरचा नाश झाल्यावर भूमध्यसमुद्रावर अर्थातच कार्थेजचे वर्चस्व बसलें.  ग्रीकांच्या विरुद्ध स्पेन व सिसिलीमधील टायर व सिडॉन वसाहतवाल्यांनी कार्थेजची मदत मागितली.  त्यावेळेपासून वर सांगितल्याप्रमाणें कार्थेज हें भूमध्यसमुद्राचें नाक बनलें.  याप्रमाणें सिसिलींतल्या वसाहतीनां कार्थेजवाल्यांनी अडथळा करून आपल्या स्वतःच्या वसाहती तेथें व स्पेन आणि आसपासची बेटें यांत केल्यामुळें त्यांचा परिणाम म्हणून अखेरीस ख्रि.पू. ५५० च्या सुमारास या दोघां (ग्रीक व कार्थेज) मध्यें युद्ध सुरू झालें.
    
ग्रीकांच्या बरोबर झालेली युद्धें : - प्रथम ख्रि.पू. ५५० त कार्थेजवाल्यांनी बहुतेक सिसिली प्रांत जिंकून तेथून ग्रीकांनां हांकून लाविलें.  या लढाईत कार्थेजवाल्यांच्या एका मलकस नांवाच्या सेनापतीनें कसूर केल्यामुळें त्यांनीं त्याला हद्दपार केलें असतां, त्यानें या गोष्टीचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून कार्थेजला वेढा दिला व स्वतःच्या मुलाचा बळी देऊन शहर सर केलें.  नंतर बरेच दिवस त्यानें शहराचा कारभार केला.  परंतु अखेरीस त्याच्याच पक्षाच्या लोकांनी त्याला ठार केलें.  त्याच्या नंतर मॅगो हा कार्थेजचा सुभेदार झाला.  हाच कार्थेजच्या खर्‍या लष्करी सत्तेचा उत्पादक होय.  यानें सार्डिनिया वगैरे बेटें जिंकून कार्थेजची सत्ता इतकी वाढविली की, सिसिली व इटालींतील वसाहतवाल्यांवर त्यानें व्यापारी तहनामे लादले.  कार्थेज व रोममधील पहिला तहनामा ख्रि.पू. ५०९ मध्यें झाला.  त्यांत इटली रोमन लोकांच्या कडे राहून आफ्रिकेचा किनारा कार्थेजच्या ताब्यांत राहिला.  सिसिली तटस्थ समजण्यांत आलें.  मॅगोनंतर त्याचा मुलगा हस्ड्रुबल हा सुभेदार झाला.  तो ख्रि.पू. ४८५ च्या सुमारास मरण पावल्यावर त्याचा भाऊ हॅमिलकार यानें सिसिली जिंकण्यासाठीं २०० जहाजांचें आरमार तयार करून स्वारी केली.  परंतु ख्रि.पू.४८० मध्यें हिमेरा येथें त्याचा पराभव झाला व दीड लक्ष कार्थेंजियन शत्रूच्या हातीं लागले.  
    
हस्ड्रुबल याला हॅनिबॉल हस्ड्रुबल व सॅफो आणि हॅमिल कारला हिमिलको, हॅनो व गिस्को अशी मुलें होती.  हे सर्व पुरूष पुढें मोठमोठ्या अधिकारावर चढले होते; हॅनोनें ४६०मध्यें पश्चिम आफ्रिकेच्या किनार्‍यावरील हल्लींच्या सेनेगाल व गिनी आणि मदिरा व कॅनरी या प्रदेशांत वसाहती स्थापन केल्या.
    
सिसिलींतील युद्ध १०० वर्षेपर्यंत चाललें होतें.  ४०६ त हॅनिबॉल यानें अॅग्रिजेंन्टमचा नाश करून या स्थळास वेढा दिला असतां,  तिकडे कार्थेजमध्यें भयंकर प्लेग सुरू झाला व यादवी माजली त्यामुळें व शत्रूनें जोर धरल्यामुळें हॉनिबालला मागें हटावें लागलें.
    
पुढें ६६ वर्षांनी हॅनो नांवाच्या एका कार्थेजच्या सरदारानें बंडाचा प्रयत्‍न केला परंतु तो फसला.  मात्र या यादवीचा फायदा घेऊन सिसिलीच्या तत्कालीन सुभेदारानें कार्थेजवाल्यांचा चांगलाच पराभव केला.  त्या वेळी त्या दोघांत तह झाला; पण तो फार दिवस टिकला नाही.  तीस वर्षांनंतर बोमिलकार नांवाच्या एका कार्थेजवाल्यानें खूळ (बंड) माजविलें.  त्याचा फायदा घेऊन सिसिलीच्या सुभेदारानें कार्थेजला वेढा दिला.  परंतु लोकांनी बोमिलकारला फांशी देऊन सिसिलीवाल्यांच्या पराभव केला, एवढेंच नव्हे तर थोड्या दिवसांनी कार्थेजवाल्यांनी आपली सत्ता सिसिलीवर बसविली व पिर्‍हसच्या विरूद्ध रोमला मदत करण्याचें कबूल केलें.
    
याप्रमाणें हळूहळू बळावत जाऊन कार्थेजनें समुद्रावर आपला हक्क प्रस्थापित केला.  त्या समुद्रांत वावरणार्‍या गलबतांनां ते लुटूं लागले.  ते इतके सावधपणें वागत कीं आपले दर्यावर्दी मार्ग ते कधीच कोणास सांगत नसत.  मार्ग उघड करण्यापेक्षां आपलें जहाज बुडविण्यास ते तयार होत.  पॉलिबियस म्हणतो कीं, कोणी कोणत्याहि मार्गानें संपत्ति मिळविली तरी कार्थेज येथें त्याला त्यावेळी लोक दोष देत नसत.
    
रोमशीयुद्धें - पहिलें प्युनिक युद्ध २७ वर्षे (ख्रि.पू.२६८-२४१) टिकलें.  यांत कार्थेजचा हेतु फक्त सिसिलींतला आपला प्रांत व टिर्हेनियन समुद्रावरील आपली सत्ता राखण्याचा होता.  कार्थेजविरूद्ध दोन ठिकाणी रोमवाल्यांनां जय मिळाल्यामुळें ते रेग्युलसच्या आधिपत्याखाली आफ्रिकेंत चालून आले.  परंतु त्यांचा कार्थेजियनांनी स्पार्टन लोकांच्या  मदतीनें पराभव केला.  यानंतर सिसिलीमध्यें या दोघांमध्यें अनेक झटापटी होऊन व एकमेकांचा जयापजय होऊन रोमन लोकांस जय मिळून युद्ध थांबलें (ख्रि.पू. २४१).  यावेळी कार्थेजनें आपल्या सैन्यास रजा देण्याचें ठरविलें.  सैनिकांनी आपल्या थकलेल्या पगाराची मागणी केली.  परंतु सरकारनें ती नाकारल्यामुळें फौजेनें बंडाळी करून कार्थेजला वेढा दिला.  त्यावेळी हॅमिलकार नांवाच्या सरदारानें मोठ्या युक्तीनें बंडवाल्यांचा मोड करून त्यांची कत्तल केली.
    
नंतर कार्थेजनें स्पेन जिंकण्यास सुरूवात केली.  सेनापति हॅमिलकारनें ९ वर्षे लढून हें काम पुरें केले; या कामांतच तो मरण पावला (ख्रि.पू.२२८) त्याचा जावई हस्ड्रुबल यानें ख्रि.पू. २२७ त कार्थेजिन शहर बसवून व रोमशीं तह करून कार्थेजची आणि रोमची सरहद्द ठरवून टाकिली.  हॅमिलकारच्या मागें हा कार्थेलचा शुभेदार झाला ह्यावेळी कार्थेजची लोकसंख्या सुमारें १० लाख असून तें भरभराटीच्या शिखरास पोहोंचलें होतें.  अंतर्गत व परकीय व्यापार फार चांगला होतो.  येथील एका जातीचें उंची कापड बहुतेक देशांत खपत असे.  गुलाम, हस्तिदंत, धातु, जवाहीर व मध्यआफ्रिकेंतून येणारा माल कार्थेजियन लोक ग्रीस, इटली व सिसिलींत विकीत.  स्पेनमध्यें ते  तांबे व रूपें विकीत.  ओस्का व कार्थेजिना येथील खाणी प्रथम यांनीच शोधून काढल्या.  कार्थेजच्या भोंवतालचा प्रांत फारच सुपीक असून येथूनच कार्थेजला (व नंतर रोमला) धान्याचा पुरवठा होई.
    
ह्या उत्कर्षाच्या काळांतच रोमशीं दुसरें युद्ध जुंपले.  यावेळी कार्थेजचा अलौकिक बुद्धिमान पुरूष जो हॅनिबाल त्यानें केलेल्या स्पेन, इटली व आफ्रिका यांतील लढाया, लष्करी दृष्टीनें तज्ज्ञांच्या प्रशंसेस अद्यापि पात्र झालेल्या आहेत.  रोमन लोकांचें शहर सागन्टम हॅनिबालनें ख्रि.पू. २१९ त घेऊन स्पेंन गॉलमधून प्रवेश करून इटलींत लढाई आणली (ख्रि.पू.२१८).  या वेळच्या टिसिनस.  ट्रेबिया, ट्रॉसिमेनी व कॅनी या महत्वाच्या लढाया झाल्या.  यापुढें रामचा मार्ग हॅनिबॉलला खुला होता, परंतु त्यानें त्याचा फायदा घेऊन पुढें चाल केली नाही व कार्थेजियन सीनेटनेंहि त्याला मदत पाठविली नाही. त्याच्या पाठपुराव्यास त्याचा भाऊ हस्ड्रुबल हा येत असतां, रोमन लोकांनी त्याचा वाटेंत पराभव केला; नंतर रोमन लोकांनी स्पेनमध्यें आपला ताबा पुन्हां बसविला व हॅनिबॉलला इटलीत चढाई करतां येत नाही असें पाहून त्यांनी आफ्रिकेंत लढाई सुरू केली.  आपला भाऊ हस्ड्रबल याचा पराभव झाला असें पाहून हॅनिबॉल इटलीहून परत निघाला.  वाटेंत रोमन लोकांनी त्याचाहि पराभव केला (ख्रि.पू. २०२). यानंतर झालेल्या रोम व कार्थेजच्यां तहांत कार्थेजचें आरमार नष्ट होऊन त्याच्या आफ्रिकेबाहेरच्या सर्व वसाहती हातांतून गेल्या.  परंतु या युद्धानंतर लवकरच कार्थेज पुन्हां भरभराटीस आलें. अजूनहि त्याची लोकसंख्या ७ लक्ष असून रोमला त्याचा दरारा वाटत असे.  रोमन सीनेटच्या संमतीशिवाय कार्थेजनें युद्ध पुकारूं नये ह्या (२०२ मधील) तहांतील कलमाचा फायदा घेऊन रोमन पक्षांतील न्युमिडियाच्या राजानें कार्थेजचा प्रांत बळकाविला.  कार्थेजची तक्रार ऐकण्यास रोमहून वकीलमंडळ आलें होतें.  त्यांतील केटो हा कार्थेजची संपत्ति व वैभव पाहून दिपून गेला होता.
    
यावेळी कार्थेजमध्यें तीन राजकीय पक्ष होते.  पहिला पक्ष रोमशी सख्य करण्यास इच्छिणारा; दुसरा न्युमिडियन लोकांशी संधि करण्यास तयार असणारा व तिसरा लोकपक्ष.  लोकपक्षाचा नेता हॅस्ट्रबल होता.  लोकपक्षानें दुसर्‍या पक्षाचा पराभव करून न्युमिडियाच्या विरूद्ध लढाई जाहीर केली (ख्रि.पू. १४९) यावेळी कार्थेजचा पूर्ण नाश करण्याचा निश्चय मनांत करून रोमनें आपल्या संमत्तीशिवाय कार्थेजने न्युमिडियाशीं युद्ध पुकारलें या सबबीवर कार्थेजवर स्वारी केली.  हे तिसरें प्युनिक युद्ध तीन वर्षेपर्यंत चाललें.  त्यांत कार्थेजनें शौर्यानें बचाव केला, पण अखेरीस ख्रि.पू. १४६ त ते शत्रूच्या हाती पडलें.  शेवटच्या प्रतिकारांत हस्ड्रुबलच्या अधिपत्याखाली कार्थेजच्या सर्व शूर वीरांनी चांगलाच पराक्रम केला. परंतु त्यांचे दैव फिरलें होतें.  त्यांचा पूर्ण पराभव झाला व रोमन शिपायांनी शहर लुटून, जाळून व पोळून फस्त केलें.  रोमहून आलेल्या व्यवस्थापक मंडळानें सर्व शहर, मंदिरे, घरें व तटबंदीसुद्धां जमिनदोस्त केली.  सर्व प्रांत बेचिराख केला.  आज जमिनींत ९६ । १७ फुटांखालीं सांपडणार्‍या हाडांच्या व कोळसे वगैरे इतर वस्तूंच्या मुबलकपणावरून या नाशाची बरीच कल्पना येईल.
    
राज्यपद्धति - कार्थेजची राज्यपद्धति उमरावपक्षसत्ताक असून तींत कुलशीलापेक्षां संपत्तीचाच वरचष्मा असे.  प्रतिनिधिसभेंत लोकपक्षाचें वर्चस्व राही व या पक्षांत कांही सरदारघराणींहि असत.  पुष्कळ वेळां प्रसिद्ध वक्ते अधिकारारूढ होत.  खरें पाहिले असतां धनिक लोकांची तेथे सत्ता असे. उमरावपक्षचे दोन सुफेट नांवाचे अंमलदार व सिनेटसभा असून लोकपक्षाचीहि एक सभा असे.  सुफेट सर्व दिवाणी कारभार पहात.  सुफेटांची निवडणूक दरवर्षी होई पण एकच सुफेट अनेकदां पुन्हां पुन्हां निवडून येई. हॅनिबॉल हा एकसारखा २२ वर्षेपर्यंत सुफेट होता.  सीनेट नांवाच्या उमरावसभेंत तीनशें सभासद असून तिचा अधिकार सार्वजनिक कामावर चाले.  युद्ध व तह तिच्याच अनुरोधानें ठरे.  ही सीनेटसभा सुफेटनां मदत करण्यास एक दहा जणांचे मंडळनिवडीत असे.  कधीं कधीं या मंडळाऐवजी शंभर सभासदांचें एक महामंडळहि नेमीत.  हें महामंडळ न्याय, शांतता, लष्करी चौकशी वगैरेंकडे लक्ष देई.  पुढें पुढें हें महामंडळ फार जुलमी झालें.
    
लोकसभेत सर्वसाधारण लोक नेमीत नसून, टिमुकी म्हणजे थोडीफार मालमत्ता असलेले लोक नेमीत.  सुफिट सभेच्या निवडणुकीस या सभेची मान्यता लागत असून या दोन सभांची एकवाक्यता कधींच होत नसे.  कार्थेजचा नाश होण्यास हें एक मुख्य कारण होतें.  
    
सीनेटर लोक हे सैन्यांत शिपायांची भरती करीत.  ते निरनिराळ्या देशांतील मुख्य मुख्य व्यपारीशहरांत जाऊन तेथील अधिकार्‍यांबरोबर अथवा राजांबरोबर मक्ता ठरवून शिपाई गोळा करीत.  या मक्त्याची बाकी नेहमी थकलेली राही आणि त्यामुळें वारंवार शिपायांची बंडे होत.  कार्थेजने युद्धांत हत्तींचा उपयोग ३ र्‍या शतकांत सुरू केला.  वर सांगितलेल्या भाडोत्री सैन्यापेक्षां राज्यांतील खानदानीच्या घराण्यांतील तरुणांचें एक वेगळें लष्करी-पथक असून त्यांतल लोकांनां पुढें अधिकाराच्या जागा देत.
    
परमार्थसाधन - कार्थेजियन व फिनिशियन हे एकाच धर्माचे होते.  त्यांच्यांत अनेक देव असून त्या सर्वांवर बॉल अमॉन (शनी), टनिट (चंद्र) व एश्युन (संरक्षक) हे तीन देव मुख्य असत.  यांशिवाय अनेक देवता व त्यांचे उपासक पंथ बरेच होते.  ख्रि.पू. ४ थ्या शतकाच्या अखेरपासून कार्थेजियन लोकांशी सिसिलियन व ग्रीक यांचे दळणवळण सुरू झाल्यामुळें त्यांच्यांत ग्रीक धार्मिक कल्पनांचा शिरकाव झाला.  येथील सार्वजनिक पटांगणांत असलेली अॅपोलोची मूर्ति रोम येथें नेण्यांत आली.  यांचा मुख्य देव जो बॉल अॅम्मॉन तो वृद्ध असून त्याच्या कपाळावर एडक्याप्रमाणें शिगें असत.  त्याला लहान मुलांचे बळी देत. मुलांनां अग्निकुंडांत बळी देण्याची ही चाल रोमन अमंलांत सुद्धां चालू होती.
    
रोमनकाल - ख्रि.पू. १२२ त रोमन सीनेटनें हें शहर पुन्हां बसविण्याचें ठरविलें.  या नवीन शहराला कालोनिया जुनोनिया (ल्याटिन वसाहत) असें नांव मिळालें.  परंतु या शहराची पहिल्यासारखी भरभराट झाली नाही.  पन्नास वर्षानंतरचा प्रवासी मेरीयस याला हें शहर त्यावेळी ओसाड स्थितींत दिसलें.  फक्त कांही प्युनिक लोक आसपास राहत होते.  पुढें पांपेच्या पक्षाच्या पाठलाग करीत असतां, येथें ज्युलीयस सीझरनें सैन्याचा तळ दिला होता.  त्यावेळी त्याला येथें स्वप्न पडलें, म्हणून त्यानें कार्थेज पुन्हां वसविण्याचा हुकूम दिला अशी एक दंतकथा आहे.  ऑगस्टसनेंहि येथें वसाहत करविली व कांही सरकारी सुभेदारहि येथे राहूं लागलें.  ते म्हणजे आफ्रिकेंतील प्रांताचे ''प्रोकान्सल'' होत (ख्रि.पू.१४-१३).  त्यावेळीं कार्थेंजला कॉलोनिया जुलीया कार्थेगो हे नांव मिळालें.  सर्व रोमन साम्राज्यांत कार्थेज हें सर्वात मोठें व श्रीमान शहर असल्याचें मेला व स्ट्रेबो हे लिहितात.  हेरोडीयनच्या मतें हें रोमच्या खालोखाल होतें.  व्हर्जिल कवीनें येथें डिडोची कहाणी आपल्या काव्यांत दिली आहे. त्यावेळी येथे डिडेची पूजा सार्वजनिक रीतीनें होत असे.  या दंतकथा, कार्थेजनें आफ्रिकेंत पुन्हां बसविलेली सत्ता व त्याचा स्वातंत्र्याकडे असलेला कल या गोष्टी लक्षांत घेऊन, रोमच्या मनांत पुन्हां संशय उत्पन्न झाला व त्यानें व्हँन्डालच्या स्वारीपर्यंत कार्थेंजला तटबंदी बांधूं दिली नाही. इ.स. ६८ त न्युमिडीयाचा सुभेदार क्लोडीयस यानें बंड केलें असतां त्याला कार्थेंजनें साहाय्य केलें.  व्हिंटेलीयसच्या अभिषेकाच्या वेळी आफ्रिकेचा सुभेदार पिसो याची बादशहा म्हणून कार्थेज येथें द्वाही फिरविण्यांत आली.  अॅंटोनियस पायस याच्या वेळी मोठ्या मैदानाकडील कार्थेजचा भाग जळून खाक झाला. हेड्रीयन याच्या अंमलांत येथील प्रचंड झाघवान कालवा बांधला गेला.  या कालव्यांतून दररोज ७० लक्ष ग्यालन पाणी तळ्यांत पडत असे.  
    
ख्रिस्ती संप्रदायाच्या सुरूवातीला कार्थेजनें त्यांत बराच महत्वाचा भाग घेतला होता.  येथें बरेच ख्रिस्ती लोक होते. त्यावेळच्या पुढार्‍यांची विद्वता, उपदेशकांचें धैर्य व वक्तृत्त्व, ख्रिस्त्यांचा छळ, पाखंड मताचा प्रसार व उत्कर्ष वगैरे गोष्टी प्रसिद्ध आहेत.  दुसर्‍या शतकाच्या अखेरीस येथें बिशपची स्थापना झाली.  बादशहा डेसियस व व्हॅलेरीयन यांच्या अमलांत ख्रिस्त्यांचा छळ झाला.  इ.स. २६४-६५ च्या सुमारास सेलससनें आर्थेजचें सम्राटपद धारण केल्याची द्वाही फिरविली; परंतु तो लवकरच मारला गेला.  पुढें मॅक्झेंटीयस व डोमीटस यांनींहि आफ्रिकेंत व कार्थेज येथें स्वतःची द्वाही फिरविली, परंतु मॅक्झेंटीयसनें डोमिटस यास ठार मारलें.  इ.स. ३११ च्या सुमारास प्रसिद्ध डोनाटिस्ट पंथाचा उदय झाला.
    
इ.स. ४१३ त कार्थेजच्या लोकांनी बंड करून हेरॅक्लिअसला बादशहा केलें.  परंतु पुढें त्याला ठार मारण्यांत आलें.  डोनाटिझमच्या नंतर पेलाजियानिझम या पंथाचा उदय झाला.  या धर्मांत निरनिराळ्या संप्रदायांच्या भानगडी चालू असतां इ.स. २९ मध्यें व्हँडाल लोकांनीं जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून मारेटॅनियावर स्वारी केली.  दुसर्‍या थिओडोसिअसनें कार्थोज येथें नवीन कोट बांधला (४३९).  यावेळी कार्थेजची लोकसंख्या ५ लक्ष असून तटाला २२ बुरूज होते.  परंतु आतां त्याचें महत्व कमी झालें.  इ.स. ४७० त रोमन पूर्वसाम्राज्याचें आरमार कार्थेजवर चालून आलें असतां तेथील लोकांनी व व्हँडाल अधिकार्‍यांनी त्याचा नाश केला.  
    
बायझन्टाईनअंमल - व्हँडाल राजांच्या अंमलांत कार्थेजमध्यें बरीच क्रूर कृत्यें झालीं.  अखेरीस बायझन्टाईन सेनापति बेलीसॅरियसनें शेवटचा व्हँडाल राजा जेलिमर याचा पराभव करून कार्थेज सर केलें.  त्यानें शहराचा कोट पुन्हां दुरूस्त करून येथील कारभार सालोमनच्या हातीं सोपविला.  त्यानें इमारती, स्तंभ वगैरे बांधले.  या बायझन्टाईनच्या शंभर वर्षे पर्यंतच्या अंमलांत कार्थेजची पुन्हां भरभराट झाली.  
    
शेवटीं इ.स. ६९७ मध्यें अरबांची धाड कार्थेजच्या पुढें येऊन थडकली.  ईजिप्‍तचा सुभेदार हसन यानें कार्थेजवर हल्ला करून तें सहज घेतलें.  तो गेल्यानंतर कार्थेजच्या लोकांनीं त्याच्या सरदारास हांकून लाविलें;  तेव्हां हसननें परत फिरून पुन्हां बायझन्टाईन लोकांचा पराभव करून शहर काबीज केलें व शेवटी तें जमीनदोस्त करण्याचा हुकूम सोडला.  याप्रमाणें इ.स. ६९८ त कार्थेज इतिसांतून कायमचें नाहीसें झालें.  पुढें (इ.स.१२७०) फ्रेंच राजा नववा लुई हा ख्रिस्ती धर्मयुद्धावर जात असतां येथें उतरला होता.
    
(संदर्भग्रंथ :- पॉलिबिअर डिडोरस, सिसुलस, लिव्ही, जस्टिन, स्ट्रॅबो, टर्टुलिअन, सायप्रिअस, आगस्टाईन हे प्राचीन ग्रंथ.  नायन डेव्हिस-कार्थेज अॅंड हर रिमेन्स.  गिलमन-कार्थेज (स्टोरी ऑफ दि नेशन्स)).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .