प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
            
कायस्थ - कायस्थांची हिंदुस्थानांतील एकंदर लो.सं. १९११ सालीं २१,७७,३९० भरली त्यांपैकी २१,७६,७११ ब्राह्मणधर्मीय असून १९६ शीख, १८० जैन, १बौद्ध व १३०२ मुसुलमान होते.  यांची प्रांतवार विभागणी पाहिली असतां आपणांस सर्वांत जास्त संख्या बंगाल प्रांतांत (११,१३,६८४) आढळतें.  नंतर संयुक्त प्रांतांत ४,८५,०७३; बहार ओरिसामध्यें ३४७६१३; आसामांत ८१९६७, मध्य हिंदुस्थानांत ७१, ३९२; मध्यप्रांत - वर्‍हाडांत ३३,५८४; राजपुतान्यांत २३,६१०; पंजाबांत १३,३७४ व इतर प्रांतांत ८०९३ याप्रमाणें यांची वस्ती आढळते.  वर दिलेल्या आकड्यांत कायस्थ प्रभूंची लोकसंख्या येत नाही.  कायस्थ प्रभूंची संख्या सेन्सस रिपोर्टमध्यें प्रभु (परभु) या सदरांत दाखविली असून याच संख्येत मुंबई प्रांतांतील कायस्थ प्रभूंचा अंतर्भाव होतो अशी टीप दिली आहे.  प्रभू (परभूं) ची एकंदर लोकसंख्या हिंदुस्थानांत ३३,२८० असून त्यांपैकी २७,१२० मुंबई इलाख्यांत व ६१६० इतर प्रांतांत आहे.
    
यापुढें आम्ही ज्या कायस्थ जातीचें विवेचन मुख्यतः करीत आहों ती संयुक्त प्रांतांतील कार्यस्थ जात होय, कां की कायस्थ जातीचा केंद्रहि मध्यदेशच होय.  संयुक्त प्रांतांतील कायस्थ व बंगाल प्रांतांतील कायस्थ यांत फरक आहे.  बंगालमध्यें जरी कायस्थांची संख्या संयुक्त प्रांतांतील संख्येपेक्षां मोठी दिसली तरी तींत कलितांचें मिश्रण आहे. संयुक्त प्रांतांतील कायस्थ बंगालमध्यें जाऊन वसाहत करून राहिले असें म्हणावें तर संयुक्त प्रांताकडून कायस्थांची संख्या बंगालकडे कमी कमी होत जावयास पाहिजे तसें दिसत नाहीं. उलट कलित्यांचें स्थान जें आसाम, तिकडून कलकत्याकडे कमी होत आलेली आढळते.  कलकत्याकडे कायस्थ व वैद्य या दोन जातींत लग्नव्यवहार होतो तसा संयुक्त प्रांतात होत नाही. कलकत्यांतील कायस्थांचा दर्जा उच्च व्हावा म्हणून मूळ ५ कुलीन घराणीं (मित्र, घोस, बोस वगैरे) बाहेरून आणलीं अशी समजूत तेथें रूढ आहे.  यावरून बंगालमधील कायस्थ व संयुक्त प्रांतांतील कायस्थ हे पूर्णपणें एकवंशीय नसावेत.
    
कोणत्याहि जातीच्या समाजांतील स्थानाकडे दोन दृष्टीनीं पहातां येतें.  एक कायद्याप्रमाणें विशिष्ट जातीचा दर्जा काय ठरतो ही दृष्टि व दुसरी ऐतिहासिक दृष्टि.  कायद्याचा प्रश्न फक्त विशिष्ट व्यक्तीची मालमत्ता कोणत्या वारसास मिळावी हें पहाण्याचा असतो.  विशिष्ट  जातीतील पुरूषानें दुसर्‍या एखाद्या स्त्रीशीं विवाह केला अगर अनीतिमूलक संबंध ठेवला, तर त्या लग्नापासून अगर संबंधापासून झालेली संतति त्याच्या इस्टेटीस कायदेशीर वारस होऊं शकते किंवा नाही एवढाच विचार न्यायाधीश करतो, व शूद्र व क्षत्रिय असा भेद त्यावेळी करण्याचा प्रसंग येतो.  कायदेपंडितांस ऐतिहासिकदृष्ट्या फार खोलांत जाण्याची प्रवृत्ति त्या विशिष्ट जातीचे पूर्वज कोण होते, त्यांचा त्यावेळी समाजांत कोणता दर्जा होता,  जातिपरंपरेत त्यांचे स्थान कोणतें होतें, त्यांचें कसकसें स्थलांतर होत गेलें व त्या स्थलांतराप्रमाणें त्यांच्या सामाजिक दर्जांत कसकसा फरक पडत गेला, त्यांच्या निरनिराळ्या पोटजाती वगैरे कशा पडत गेल्या त्यांचे परस्परसंबंध कसकसे तुटत गेले वगैरे मानववंशीय व मानवेतिहासात्मक गोष्टी ऐतिहासिक अभ्यासकास ज्ञातव्य असतात.  जुना इतिहास व निकटवर्ती परंपरा वगैरे भिन्नभिन्न गोष्टीस व स्थानिक रूढींस महत्व हायकोर्टांनां द्यावें लागतें. यामुळें अगदी निरनिराळीं व केव्हां केव्हां विसदृश अनुमानें काढतात.  याप्रमाणें कलकत्ता हायकोर्टाच्या दोन कायस्थ जातींच्या न्यायमूर्तीनींच कायस्थ जात ही शूद्र जात आहे असें ठरविलें आहे.  परंतु हा निकाल अलाहाबाद हायकोर्ट मान्य करीत नाही.  इतिहासप्रज्ञतेचा दोषारोप हायकोर्टावर आम्ही करीत नाही.  व विशिष्ट जातीच्या उत्पत्तीस अगर इतिहासास त्याच्या निर्णयाचा उपयोग मुळींच नाहीं.
    
पूर्वगत ऐतिहासिक विवेचन - कायस्थ ज्ञातीसंबंधी पूर्वगत ऐतिहासिक विवेचन पाहूं जातां त्यांत अनेक प्रकार आढळतील.  धर्मशास्त्रीय अगर पुराणांतील वचनें सत्य म्हणून गृहीत धरून त्यांवरून कल्पना करीत बसणें हा एक प्रकार कायस्थांनीं व त्यांच्या विरूद्ध लेखकांनी अवलंबिला आहे.  व त्याचीच कांही यूरोपीय लेखकांनी (उदाहरणार्थ रसेल.  एन्थॉवेन, रिस्ले वगैरे) री ओढली आहे.  अधिक व्यापक विवेचन रा. भागवत व रा.वि.का. राजवाडे यांनी केले आहे.  पण राजवाडे यांनी देखील उत्पत्तिविषयक मत संस्कृत ग्रंथकारांचेंच स्वीकारलें आहे.  आम्हांस यांपैकी कोणतेंहि मत स्वीकारतां येत नाहीं.  तथापि रा. भागवत व रा. राजवाडे यांची मतें येथें देणें अवश्य म्हणून दिलीं आहेत.
    
काश्मीरच्या राजतरंगिणीमध्यें कायस्थांविषयी तिरस्कार व्यंजक वाक्यें आहेत, त्यांवरून रा.रा. राजारामशास्त्री भागवत कल्पना करतात की, ब्राह्मण व कायस्थ यांचा परस्पर द्वेष असे.  कां कीं कल्हण हा ब्राह्मण होता.  कायस्थ हा शब्द वराहमिहिरांत नाही; तथापि वराहमिहिरापेक्षां हा शब्द अधिक जुना आहे  असें मृच्छकटिकावरून भागवत ठरवितात.  भागवत मृच्छकटिकाचा काळा शालिवाहनाचें दुसरें शतक समजतात.  कायस्थ म्हणजे 'देहांत रहाणारा' अशी व्युत्पत्ति चूक असून 'कैथ' शब्दापासून कायस्थ शब्द बनला आहे आणि कैथ शब्दाचा कथ धातूबरोबर आणि गाथा शब्दाबरोबर संबंध असावा.  कैथ ही मूळ जात जुन्या कथा सांगणारी आणि गाथा म्हणजे जुनीं गाणीं म्हणणारी असावी व त्यावरून कैथ हें नांव पडलें असावें.  कैथांनी जी लिपी शोधून काढली ती कैथी.  कैथी लिपींत 'पडमात्रा' म्हणजे एकाराच्या ऐवजीं अक्षराच्या पाठीमागें ओळ असते उदाहरण याचें के-क असें आढळतें.
    
यादवांचे किंवा जाधवांचे शिलालेख जे विद्यमान आहेत त्या सर्वांत पडमात्रा पहाण्यांत येते.  ब्राह्मणधर्मीयांस पूर्वी लेखनकला माहित नव्हती.  पाणिनिकाळीं लेखनकला ब्राह्मणांस इतर लोकांपासून मिळाली.  तिचा जरी ब्राह्मणांत प्रचार झाला तरी ब्राह्मणांनी लिखितपाठकत्वाचा निषेध केला आहे.  वेद लिहिलेला वाचतो तो चांगला पाठक नव्हे असा निर्बंध शिक्षेंत आढळतो.
    
देवनागरी व बालबोध या दोन्ही शब्दांचा कोणत्याहि संस्कृत ग्रंथांत पत्ता लागत नाही.  रामायण, महाभारत वगैरे ग्रंथांत देवनगर कोठेहि येत नाही.  तेव्हां लेखनकला प्रथम ब्राह्मणांनी काढली असें म्हणण्यास आधार बिलकल नाही.  
    
राजाराम शास्त्रयांची कल्पना अधिक दूर न्यावयाची म्हणजे कायस्थांचा सूतांशी म्हणजे इतिहासरक्षकांशीं संबंध जोडावयाचा.
    
राजारामशास्त्री आणखी म्हणतात, ''आपल्या देशांत कायस्थ शब्दापेक्षा 'परभु' शब्द अधिक प्रचारांत आहे.  कायस्थ शब्द संस्कृतांत बराच वापरला जातो, तसा परभु शब्द वापरला जात नाहीं.  कर्‍हाड्यांतील, कुडाळ्यांतील व शेणव्यांतील प्रभु आडनांव असणारे मूळचे परबु होते अशी शंका येते.
    
शालिवाहनाच्या शतकांत 'चित्रगुप्‍त' निःसंशय सुप्रसिद्ध होता.  चित्रगुप्‍त म्हणजे यमास दिलेला कारकून.
    
हल्ली कायस्थ परबु नांवाची जात अस्सल कोंकणी होय. हे लोक मूळचे मावळे असून मावळांतून खालीं उतरले.  यांचे आद्यस्थान लोणावळ्याजवळील कारली हें असलें पाहिजे.
    
कारलीजवळ एकवीरा आहे ती आमच्या देशी कायस्थांचे कुलदैवत होय.  एकवीरा व रेणुका हीं एकच असें कायस्थांचा व परशुरामाचा संबंध जोडण्याकरतां माजविलेलें दिसतें.  एकवीरा बोलून चालून वीरांची देवी.  तिला कोंबडी व बकरीं चालतात.  जिचा जमदग्नीनें विनाकारण वध केला त्या बाईमध्यें वीरपणा होता हें म्हणणें म्हणजे अजप्रयोग करणें होय.
    
कायस्थांची नांवे कांही गांवांवरून व कांही हुद्यांवरून पडलीं आहेत.  कोरडे कोरलई हें नांव गांवावरून पडले आहे.  दिघे कायस्थांत आहेत तसे कर्‍हाड्यांत आहेत.  तेव्हां तें नांव गांवावरून पडलें असलें पाहिजे.  ताह्मणे नांवांचें एक गांव राजापुराजवळ आहे पण तें कायस्थांचें नसावें.  दवणे हें नांव दमण (फिरंग्यांचें) यावरून पडलें आहे.  फणसी नांवाचीं गांवें कोंकणांत व देशावर बरींच आहेत; त्यावरून फणसे; भिशे किंवा भिसे गांव रोहे तालुक्यांत आहे त्यांवरून भिसे मोहिली पेण तालुक्यांत आहे.  शृंगारपूरे हबसाणांत बरेंच प्रसिद्ध आहे त्यावरून शृंगारपूरे वखार नांवाचें गांव आहे किंवा वखार ज्याची तो वखारे, येणेंप्रमाणें वखारे नांवाच्या दोन व्युत्पत्ती असाव्यात.  या आडनांवांवरून कायस्थांचे मूळ ठिकाण चेऊल किंवा अष्टागर प्रांत ठरतें.  हा कायस्थांचा इतिहास शालिवाहन शकाच्या नवव्या शतकापलिकडे फारसा पोंचत नाही.'' (भागवत वि.वि.पुस्तक २३ अंक ११).
    
रा.वि.का.राजवाडे कायस्थ शब्दाची व्युत्पत्ति साधण्याचा पुढें दिल्याप्रमाणें प्रयत्‍न करतात.
    
''कायस्थ, कायथ, काइन, काइथ.  हा शब्द काय व स्थ यांच्या संहितेपासून निघाला आहे.  'क्षत्रियात शूद्रायां जातः कायस्थः' अशा धर्मशास्त्रीय वचनानें इतिहास खुला होतो अशी समजूत करून घेऊन राजवाडे चालतात आणि काय म्हणजे धन, त्यावर उपजीविका करणारा तो कायस्थ.  ''काये कायेन वा तिष्टति यः स कायस्थः'' असा त्याचा अर्थ देऊन सांगतात कीं, यांचा मूळ धंदा व्याजबट्टा करण्याचा दिसतो.  नंतर लेखन चित्रकर्में यांनां नेमून दिलीं असें दिसतें.  अथवा बोटाचीं शेवटें म्हणजे काय व त्यांच्या साहाय्यानें उपजीविका करणारा तो कायस्थ.  लेखन व चित्रकर्म हा कायस्थांचा मूळ धंदा व तद्‍नंतर इतर धंदे.  कायस्थांनां प्रभुपणा महाराष्ट्रांतच व विशेषतः कोंकणात मिळालेला आहे.  कोंकणांत ब्राह्मण, शेणवई, मराठे हे प्रभु आहेत तसेच कायस्थहि प्रभु आहेत.  हे मूळचे उत्तर हिंदुस्थानांतील आहेत यांत संशय नाहीं.  ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य उत्तर हिंदुस्थानांतूनच आले.  इतकेंच कीं, कायस्थ इतरांच्या बरेच नंतर आले. यांची संख्या महाराष्ट्रांत फार थोडी आहे.  जर हे ब्राह्मणादिकांच्या बरोबर आले असते तर त्यांचीहि लोकसंख्या इतरांप्रमाणेंच असती.  गुप्ते, राजे, कर्णिक, समर्थ इत्यादि आडनांवावरून त्यांचा संबंध गुप्‍त राजांबरोबर लावतात.  तो तसा असणें शक्य आहे, पण आहेतच असें निश्चित नाही.  हे क्षत्रियोत्पन्न आहेत, पण इतकेंच कीं मूळ शूद्रक्षेत्राच्या ठायीं उत्पन्न झालेले आहेत.  मनुसंहिता, मुद्राराक्षस, मृच्छकटिक व याज्ञवल्क्य यांत हा शब्द येतो. (भा.इ.सं.मं.१८३२).
    
राजवाडे आणि भागवत यांचा शोधांत कायस्थतिहास नैरुक्त, पौराणसाहित्याचा व बाहेरच्या कायस्थांविषयीं विचार वगळून एकदम महाराष्ट्रांतील कायस्थांशीं संगति लावण्याचा प्रयत्‍न हा दोष प्रधान आहे.
    
कायस्थांचे ऐतिहासिक व पौराणिक उल्लेख - कायस्थ शब्दाचा उल्लेख माळव्याच्या शिलालेखांत इ.स. ७३८ ते ७३९ सालीं केलेला आहे.  इ.स.९८७ शिलालेखांत यांचें नांव 'कांचन' असें लिहिलेलें आढळतें.  इ.स. ११८४ त केलेल्या दिल्ली येथील शिवालिक स्तंभावरील लेखांत माहवाचा पुत्र शिसपती कायस्थानें हा लिहिला असें लिहिलें असून या लेखांत कायस्थ शब्द जाति या अर्थानें उपयोगांत आणला.
    
कायस्थांच्या कुळासंबंधी बर्‍याच दंतकथा आहे.  पद्मपुराणांत असें लिहिलें आहे की, ब्रह्म हा एकदां ध्यानस्थ बसलेला असतांनां त्याच्या कायेपासून एक दौत व लेखणी घेतलेला पुरूष निर्माण झाला त्यास चित्रगुप्‍त असें नांव देण्यांत आलें.  ब्रह्मदेवाच्या कायेपासून हा पुरूष झाला म्हणून त्यास कायस्थ म्हणतात.  भविष्यपुराणांतहि यास कायेपासून झाला म्हणून कायस्थ म्हटलें आहे.  त्याचें लौकिक नांव चित्रगुप्‍त असें ठेवण्यांत आलें.  चित्रगुप्‍त हाच या लोकांचा मूळपुरूष मानण्यांत येतो.  एका खानेसुमारींत १९६७ श्लोक चित्रगुप्ताची उपासना करणारे आढळले.  यावरून कायस्थ हे शैव किंवा वैष्णव असून चित्रगुप्ताची पूजा करतात असे दिसून येते.  हे स्वतःची उत्पत्ति यमाची खाते-वही लिहिण्याकरितां ब्रह्मदेवानें उत्पन्न केलेल्या चित्रगुप्तापासून झाली आहे असें सांगतात.  चित्रगुप्ताच्या दोन बायका होत्या.  एक सूर्याची नात व दुसरी एका ॠषीची कन्या होती.  या कन्येपासून त्याला ८ मुलें झालीं.  त्यांनीं नागकन्याबरोबर विवाह केले.  पहिल्या बायकोपासून चार मुलें झाली.  या १२ मुलांस आर्यावर्तांतील निरनिराळ्या भागांत राज्यव्यवस्थेची कामें वाटून दिलीं व त्या स्थानावरून यांच्या जातीचीं नांवे पडली आहे.  परशुराम पृथ्वी निःक्षत्रिय करीत असतां एका गर्भवती राजपत्‍नीस एका ॠषींनें आश्रय दिला आणि पुढें त्या गर्भास तो पुढें कारकून बनेल अशा अटीवर जाऊं दिलें व त्या गर्भापासून कायस्थांची उत्पत्ति आहे अशी कथाहि प्रचलित आहे.  वरील पौराणिक उल्लेखांचाहि ऐतिहासिक जिज्ञासेस फारसा उपयोग नाही.
    
सामान्यतः एखाद्या विशिष्ट जातीची उत्पत्ति निरनिराळ्या तीन चार प्रकारांनी होऊं शकते. (१) एखादी गोंड, इंग्रज, भिल्ल यांसारखी राष्ट्रजाति हळूहळू जातिस्वरूप पावते. (२) दुसरा प्रकार असा आहे की एखादा वर्ग विशिष्ट धंदा करीत असतो पण पुढें तो धंदा अशक्य झाला व त्या धंद्यामुळें उत्पन्न होणारें स्थानहि नवीनास मिळविणें अशक्य झालें तरी त्या वर्गाचे वंशज त्याच वर्गात मोडतात.  याप्रमाणें विशिष्ट वर्गास पुढें जातीचें स्वरूप येतें ब्राह्मण वर्णाचें जातित्व याच तर्‍हेनें झालें आहे. (३) एखादा विशिष्ट धंदा करणारे लोक आपली श्रेणी बनवितात व त्या श्रेणीला अंतर्घटना उत्पन्न होते तेव्हां त्या श्रेणीचा धंदा बंद झाला नाहीं तर त्या श्रेणी अंतर्व्यवस्थेमुळें जातिस्वरूप पावतात.  अनेक धंदेवाइकांच्या व व्यापार्‍याच्या जाती या प्रमाणें बनल्या आहेत. (४) इतर जातींचा संकर होऊन एखादी नवीन जात निर्माण होते.
    
आतां कायस्थांची उत्पत्ति यांपैकी कोणत्या कारणापासून झाली असावी असा विचार करूं लागल्यास आपणांस चवथें कारण अगदींच असंभाव्य दिसतें.  क्षत्रिय ही जात कधींच नव्हती व तो वर्गहि निश्चितपद नव्हता.  निरनिराळ्या जाती व कुले जेव्हां महत्व पावत तेव्हां त्यांस क्षत्रियत्व प्राप्‍त होई. निश्चित जात अनिश्चित वर्गापासून उत्पादणें अशास्त्रीय आहे.  शिवाय २१ लाख कायस्थ संकरानें उत्पन्न होण्यास क्षत्रिय किती पाहिजेत व अधर्मानें उत्पन्न झालेले नेमका लेखकाचाच धंदा कसा करीत ? अर्थात पूर्वी ही एखादी विशिष्ट  राष्ट्रजाति असली पाहिजे किंवा विशिष्ट धंद्याच्या संघास (गिल्ड) जातीचें स्वरूप आलें असलें पाहिजे.  जर ही एखादी परकीय जाति असून आद्य लिपिप्रवर्तक किंवा एखादी स्वतंत्र लिपिप्रवर्तक जाति असेल तर तिची राष्ट्रजातिमूलक उत्पत्ति असणें संभवतें.  म्हणून हा विशिष्ट धंदा करणारा संघ असून पुढें जातिस्वरूप पावला असें असण्याचा जास्त संभव आहे.  हा वर्ग अर्थात ब्राह्मणांप्रमाणें सामान्य लोकांतूनच निघाला असला पाहिजे.  कारण यांचा लेखनाचा धंदा असून निरनिराळ्या ठिकाणच्या लेखकांस ही जातिसंज्ञा प्राप्‍त झाली असावी.  कारण यांच्या ज्या पोटजाती आहेत त्यांत अनेक जातींचीं नांवें केवळ स्थानिक आहेत.  उदा. माथुर, गौड, भटनागर इ. श्रीवास्तवांचाहि श्रावस्तीशीं संबंध असेल.  कांही पोटजातींची नांवें कुलनामावरून पडलेली दिसतात.  तेव्हां जेथें एखादा जातिस्वरूपी वर्ग हा धंदा करीत असेल तेथें त्यास त्या स्थानाचें नांव त्या वर्गास मिळून ती पोटजात बनली असेल व जेथें थोडी कुटुंबे या धंद्यांत असतील तेथें कुलनामप्राप्‍त नांव पोटजातीस पडलें असावेसें वाटते.  अशा अनेक पोटजाती तयार होऊन पुढें त्या कायस्थ या नांवाखाली आल्या असतील.
    
राष्ट्रजातीवरून ही जात तयार होणें हेंहि प्रथम वाटतें तितकें अशक्य नाही.  कायस्थ हें एक प्रथम राष्ट्र असून तें पुढें नामशेष झालें असावें हेंहि शक्य आहे.  ज्याप्रमाणें माध्यदिन हें राष्ट्र असणें व तें राष्ट्रनाम ब्राह्मणशाखेस मिळणें हे जसें शक्य आहे तसेंच कायस्थ हें प्रादेशिक राष्ट्रनाम असून तें पुढें जातिनाम होणें शक्य आहे.  पांचाल हें राष्ट्र नष्ट झाल्यानंतर त्यांतील व्यक्ती किंवा समूह निरनिराळ्या जातींच्या पोटजाती म्हणून राहिले.  त्याप्रमाणें थोडासा प्रकार कायस्थांतहि दिसतो.  उदाहरणार्थः- संयुक्तप्रांतांत भडभुंज्यांमध्यें कायस्थ व कैथिया या दोन पोटजाती असल्यामुहें थोडा घोंटाळा होतो.  कैथिया ही पोटजात आपली उत्पति सकसेन कायस्थांपासून झाली असें सांगतात. कायस्थ भडभुंजे हीहि पोटजात पुष्कळ ठिकाणी आहे असें ब्लंटचे मत आहे.  या लोकांत दिराशीं लग्न लावण्याची चाल प्रचलित आहे.  गोरखपूर, एटा, व मुरादाबाद या जिल्ह्यांत कायस्थ दरजी जातीचे लोक आहेत.  एटा व मुरादाबाद येथील कायस्थ दरजी लोक सकसेन कुळांतले आहेत.  या लोकांत निरनिराळ्या गोत्रांचे लोक आहेत.  ह्यांत कायस्थ हेंहि एक गोत्र आहे.  यांनीं आपल्या जातीच्या इतिहासाबद्दल एक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.  या लोकांची एक पंचायतहि आहे.  कानपूर प्रांतांत कायस्थ मोची हे लोक आपण श्रीवास्तव कायस्थांपैकी आहोत आणि मोची हें नांव आम्हासं फक्त आमच्या धंद्यावरून पडलें असें म्हणतात.  या लोकांचा धंदा जोडे करण्याचा नसून खोगीर, जीन इत्यादि वस्तू करण्याचा आहे. त्यामुळे त्यांनां कायस्थ जिनगर हें नांव जास्त आवडतें.  हे मोच्याचा धंदा करीत नाहींत व त्यांचा मोची जातीशी कोणताहि संबंध नाहीं. ते कायस्थ लोकांशी संबंध जोडतात व जन्म, लग्न व मरण या प्रसंगी यांच्या चालिरीती उच्च हिंदूप्रमाणेंच असतात.  यांच्यातहि विधवा दिराशीं लग्न लावते.  कायस्थ सेंदुरिया, ही जात गोरखपूर प्रांतांत आढळते, तिचें तेथील दरजी जातीशीं बरेंच साम्य आहे. (सेन्सस रिपोर्ट संयुक्तप्रांत १९११.)
    
कायस्थ अशी जर राष्ट्रजाति असेल तर तींतील लेखक वर्ग निरनिराळ्या देशांत जाऊन तेथें कारकून बनला असणें अशक्य नाही.  व कायस्थ राष्ट्रांतील इतर धंदे करणारे लोक आपणांस कायस्थ शिंपी, कायस्थ मोची असें म्हणवूं लागले असावे.
    
पुढें कायस्थ हें लिहिण्याच्या धंद्याचें वाचक नांव होऊन त्या धंद्याचे इतर जातींतील लोक आपणांस कायस्थ म्हणवूं लागले असावेत व या रीतीनें त्यांच्या पोटजाती वाढूं लागल्या असाव्यात.  आसाम बंगाल्यांतील कलिते दिवसानुदिवस कायस्थ होत चालले आहेत हें आपण आज पहातच आहोंत.  उलटपक्षीं ओरिसांतील करण हे इतर उडियांतून पूर्णपणें निराळें नसतां त्यांस करण हे इतर उडियांतून पूर्णपणें निराळें नसतां त्यांस करण पोटजात म्हणून कायस्थांत ओढण्याचा प्रयत्‍न दिसतो.  ओरिसामध्यें क्षत्रिय, करण, खांडाइत, उडिया यांच्यांत अनुलोमविवाह होतात.
    
आपणांस कायस्थांचा हिंदुस्थानांत निरनिराळ्या प्रांतांत कोठकोठें प्रसार झाला आहे तें पूर्वी दिलेल्या आकड्यावरून कळून आलेच आहे.  त्यांत आपणांस मद्रासकडे कायस्थ मुळींच दिसत नाहींत.  आतां निरनिराळ्या कायस्थांतील कांही विशेष सांगून नंतर त्यांची प्रांतवार माहिती देऊं.
    
महाराष्ट्रांतील कायस्थ प्रभू मांडवगडाहून उज्जनी वगैरे बाजूनें आले असें म्हणतात पण त्यास आधार नाहीं. हे आपला बंगालशीं संबंध लावतात तोहि लागू पडत नाही.  कारण ते बंगाल्याकडून महाराष्ट्रांत आले असते तर मध्यंतरी त्यांचे कांही कांही जमाव तत्तत्स्थानीय लोकांशी सदृश असे असते; व परस्परांच्या भाषांवर परिणाम झाला असता.  तसेंच त्यांची संख्या कोंकणापेक्षां देशावर अधिक असती.  तशी ती आढळत नाहीं.  यावरून सारस्वत, कायस्थ प्रभु आणि बहुतकरून चित्पावन हे समुद्रमार्गानें कराची, गुजराथ या बाजूनें सिंधुमुखाकडून कोकणांत आले असावे.  ज्याअर्थी त्यांच्या भाषेंत मराठीखेरीस इतर भाषांचा अंशहि सांपडत नाही त्याअर्थी वरील समुद्रमार्गाचीच उपपत्ति युक्त दिसते.  महाराष्ट्रीय कायस्थ प्रभु आणि उत्तरेकडील कायस्थ एकवंशसंभव आहेत काय हाहि प्रश्नच आहे.
    
आतां आपण संयुक्त प्रांतांतील कायस्थांकडे वळूं.  कायस्थांच्या बारा पोटजाती आहेत.  त्या श्रीवास्तव्य अथवा श्रीवास्तव, भटनागर, सकसेन, अमिष्ट अथवा अन्वस्त, ऐथन, अस्थान, वाल्मिकी, माथुर, सूर्यध्वज, कुलश्रेष्ठ, करण, गौर अथवा गौड उर्फ निगम या होत.  तेराव्या एका जातीला उनाय म्हणतात.  या सर्व जाती तेथील स्थानिक आहेत अशी आमची खात्री नाहीं.  
    
कायस्थ सगोत्र अथवा सापिंडयविवाह करीत नाहींत.  मृतपत्‍नीच्या धाकट्या बहिणीशीं लग्न करण्याची चाल त्यांच्यामध्यें आहे.  पापकर्म करणार्‍या बहिष्कृतांस प्रायश्चित विधीनें स्वजातींत घेतलें जातें.  प्रोढविवाह रूढ असून बहुभर्तृत्वास मनाई आहे.  बहुपत्‍नीत्व तत्वतः मान्य असलें तरी सर्वसाधारण तशी चाल नाही.  स्त्रियांच्या पुनर्विवाहास सक्त मनाई असून एखादी स्त्री वाईट चालीची असल्यास ती तिच्या नातेवाईकांकडून बहिष्कृत होते.  लग्नापूर्वी वराची सोडमुंज किंवा मुंज झाली पाहिजे असा निर्बंध असून कन्यादान, पाणिग्रहण, सप्‍तपदी व सिंदूरदान इत्यादि सर्व लग्नविधिकायस्थांमध्यें आहेत.  अयोध्या प्रांतांतील खेडेंगांवामध्यें जी हलक्या जातीची लग्ने होतात त्यामध्ये निरनिराळे धार्मिक व सामाजिक असे अनेक रूढ विधी आहेत.  वधू-वरांची पत्रिका पहाणें, गणगोत ठरविणें व हुंड्याबद्दल वाटाघाट करणें वगैरे गोष्टी लग्नापूर्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या आधीं चार दिवसांपासून ते लग्न संपेपर्यत निरनिराळें विधी व समारंभ करण्यांत येतात.  उभयतांकडे एकेक पंडित व न्हावी असतो.  धर्मासंबंधी सर्व काम पंडित करतो व पाय धुण्याचें आणि सरबत तयार करून तें वाटण्याचें वगैरे अनेक उद्योग न्हावी व त्याची बायको हे करीत असतात.  गौरीगेणेश व नवग्रह यांचें पूजन वराला करावें लागतें.  तिलक लावण्याचा समारंभ व कलशपूजन हे विधी मुख्य मानले जातात.  प्रत्येक समारंभाच्या वेळीं सुवासिनी स्त्रियांनी त्या त्या विधीला उचित अशीं गाणीं म्हणण्याची चाल कायस्थांमध्यें आहे.  वराच्या बहिणीस लग्नसभारंभांत फार मान असतो.  बरींच गाणी वधूनें कसे वागावें यावर असतात.  राम, कृष्ण इत्यादि देवांच्या लग्नावरहि रचलेलीं बरींच गाणीं असल्या प्रसंगी म्हणण्यांत येतात.  खेडेंगांवांतील कायस्थांच्या लग्नसमारंभांत स्त्रिया चरख्यावरील व कोष्ट्यावरीलहि कांही गाणी म्हणतात. नाच व जेवणावळी चाललेल्या असतात.  सोहागबंधन (सौभाग्य बंधन) हा समारंभ करतेवेळी वधूला सात घरें जाऊन कुंकुम द्यावयाचें असते.  मोठ्या थाटानें वर वधूच्या घरी लग्नसमारंभास जातो.  त्यावेळी 'तर्की फेरना' व 'डेरा चपावन' हे समारंभ करण्यांत येतात.
    
कायस्थ हे प्रचलित असलेल्या निरनिराळ्या पंथांचे अनुयायी आहेत.  कांही शैव, शाक्त व वैष्णव असे आहेत.  नानकशाही, कबीरपंथी, आचारी असेहि कायस्थ लोक आहेत. कांही आर्यसमाजी आहेत.  परंतु संप्रदायभिन्नत्वामुळें त्यांच्यांत जातीला बट्टा लागत नाही.  वैष्णवपंथी कायस्थाला शाक्तपंथी स्त्रीशी लग्न करतां येतें. मात्र गोत्रांतर विवाहाचें बंधन पाळिलें पाहिजे.  वैष्णव नवरा शाकाहारी असला व मद्यमांसाशन करीत नसला तरी त्याच्या शाक्त स्त्रियेस मद्य व मांस खाण्याची किंवा न खाण्याची पूर्ण स्वतंत्रता असते.  कायस्थ आपल्या कुलदेवतेची म्हणजे चित्रगुप्ताची प्रत्यही पूजा करतात.  इतर ठिकाणी कार्तिकशुद्ध द्वितीयेस यांचा सार्वजनिक उत्सव होतो.  कार्तिकांतील द्वितायेस यमद्वितीया असें समजतात व चित्रगुप्‍त हा चौदा यमांपैकी एक मानतात.  चैत्र वद्य द्वितीयेस ही पूजा करण्यांत येतें.  फळें, मिठाई व पैसे अर्पण केले जातात.  हे पैसे देवळाचा पूजारी घेतो.  विविध कुटुंबांच्या विविध देवता असतात व त्यांचीहि अर्चा करण्यांत येते.  कायस्थांच्या इतर देवता दुर्गा, जयन्ती, लक्ष्मी, शांभरी, महादेव, विष्णु, गणेश, कृष्ण, राम, गंगा, अनंत व नारायण इत्यादि आहेत.  सर्व धर्माविधींत ब्राह्मण लागतात व त्यांनां पुरोहित, उपाध्याय व आचार्य म्हणतात.
    
कायस्थाबद्दल कितीहि मत्सर इतर लोकांत दिसून आला तरी त्यांचा सामाजिक दर्जा मोठा आहे यांत शंका नाहीं.  जे वैष्णव पंथाचे असतात असे कायस्थ मांस खात नाहींत. जे कायस्थ शाक्त असतात ते सुरापान करतात.  अलीकडे त्यांनी या बाबतीत बराच आळा घातला आहे असें म्हणतात.  वैष्णव सुरापान वर्ज्य मानतात.  वैष्णव कायस्थ हे आपली ज्ञाति सोडून इतरांच्या एकाच ताटांतील कच्ची किंवा पक्की रसई खात नाहीत; एकाच भांड्यांतून पाणी पीत नाहींत व एकाच हुक्क्यांतून तंबाखू सुद्धां ओढीत नाहींत.  सर्व पोटजाती पक्की रसई एकत्र बसून खातात पण कच्चीं खात नाहीत.
    
लेखन, शिक्षणविषयक काम करणें हाच या जातीचा धंदा असून, शिक्षण, कायदेकानू वगैरे खात्यांत त्यांनी सरकारी अधिकार्‍यांची कामें केली आहेत.  लेखक, लिपिकार, अक्षरजीवक, अक्षररचना, इत्यादि अनेक संस्कृत नांवें यांचा धंदा ध्वनित करतात; परंतु सध्यांची जात वरील नामनिर्दिष्ठ धंदाच करणारी आहे असें नाहीं.  या जातीच्या उच्च वर्गांतील लोकांचा बराच लौकिक असला तरी खेडेगांवांतील 'लाला' हा एक हिशेबी कारकूनच असतो व त्याचा फारसा चांगला लौकिक नसतो.
    
मध्यप्रांतांत हे लोक विशेषेकरून सागर, दमोह, जबलपूर नरसिंगपूर जिल्ह्यांतून रहात असून तुरळक् तुरळक सर्व प्रांतांत पसरले आहेत.  यांबद्दल रिस्ले व हिरालाल हे आपल्या ग्रंथांत (कास्टस अॅड ट्राइडस इन सी.पी.) पुढील माहिती देतात.  यांचा धंदा लेखकांचा व गांवच्या पटवारीपणाचा आहे पण मराठी जिल्ह्यांत यांची जागा परभू व विदुरांनी पटकाविली आहे.
    
गुजराथेंतील कायस्थ - हे मुख्यतः सुरत परगण्यांत सांपडतात.  हे संख्येनें जरी थोडे असले तरी बुद्धीनें व शिक्षणानें गुजराथेंतील इतर हिंदूंमध्यें यांनांच प्राधान्य मिळालें आहे.  यांच्या शाखांपैकी वाल्मीक, माथुर व भटनगर हे तीनच पोटभेद गुजराथेंत आढळतात.  हे इतर गुजराथी हिंदूंपेक्षां अलग आहेत एवढेंच नव्हे तर आपसांतहि रोटीबेटीव्यवहार करीत नाहींत.
    
वाल्मीक कायस्थ - सुरत परगण्यांत हे आढळतात.  काठेवाडांतील वाल्हा नांवाच्या गांवी ४ थ्या शतकांत कायस्थ स्थायिक झाल्याचा दाखला सापडतो.  परंतु दक्षिण गुजराथेंत कायस्थ लोक १६ व्या शतकांत आले असें दिसतें.  यांचे औदिच्य ब्राह्मण उपाध्याय आहेत.  हे वल्लभानुयायी आहेत. लग्नापूर्वी दोन तीन दिवस वधूवर घरांतील मुलांबरोबर आपापल्या भावी श्वशुराच्या घरी जातात व तेथें गणपतिपूजन करतात.  त्यांनां केळीं, मिठाई व थोडेसे पैसे देतात.  लग्नाच्या दिवशीं वधूच्या घरीं व लग्नापूर्वी एकदोन दिवस अगोदर वराच्या घरी ग्रहशान्ति नांवाचा विधि करण्यांत येऊन वधूवरांनां हळद लावतात.  लग्नाच्या दिवशीं वधूकडे व वराकडे जातींतील मंडळींनां मेजवानी होते.  सूर्यास्ताच्या सुमारास वर वधूकडे मिरवत जातो.  वधुगृहीं आल्यावर वर एका चौरंगावर उभा राहतो व वधूची आई वरावरून पिठाच्या गोळ्या ओवाळून चारी दिशेला टाकते व नंतर वराला एक छोटासा नांगर, मुसळ, रवी व बाण दाखवून वराचें नाक ओढते.  त्यानंतर ती वराला हातीं धरून मांडवांत नेते व त्या ठिकाणी एका बांबूच्या छत्राखालीं त्याला बसविते.  मुलीचा मामा मुलीला वराच्या समोर एका चौरंगावर आणून बसवितो व मग त्यांच्यामध्यें अंतःपट धरतात.  पाणिग्रहणसमयीं वल्लभाचार्य महाराजांनां तेथें हजर रहावें लागतें वधूवरांचे वडील या महाराजांनां रोकड दक्षिणा देतात.  व महाराज वधुवरांस कांही वस्त्रें वगैरे देतात.  मंत्रपठण झाल्यानंतर वधुवराचे हात एकमेकांच्या हातांत घालतात व मधील अंतःपट दूर करतात.  पाणिग्रहणानंतर वरपक्षाकडील मंडळी रूसून मंडपांतून उठून जातात व वधूपक्षाकडील मंडळी त्यांची समजूत घालून त्यांनां नजराणे वगैरे देऊन परत आणतात.  नंतर वधूवर अग्नीभोंवती चार प्रदक्षिणा घालतात.  नवरा मुलगा खरोखरीच लहान मुलगा असला तर आपल्या 'मेथाजीनें' अथवा पंतोजीनें शिकविलेली लग्नासंबंधीची गाणी म्हणतो.  यानंतर वधूवर 'कंसार' नांवाच्या गव्हाचें पीठ, तूप, साखर वगैरे घालून तयार केलेल्या पक्कान्नाचा एकमेकांनां घास देतात.  नंतर वधूवर पालखीत बसून वरगृहीं जातात.  त्यांचें स्वागत वरमाता करते.  नंतर वधूवर कुलदेवतेचें पूजन करून पत्ते खेळतात.  लग्नाच्या दिवशीं मुलाचा बाप जातींतील लोकांनां मेजवानी देतो.  नंतर दोन तीन दिवसांनी वधूवर परत वधूच्या घरीं वाजतगाजत जातात.  त्या ठिकाणीं त्यांनां अभ्यंगस्नान घालून उंची पोषाख लेववितात.  वधूच्या माहेरी ह्या दिवशीं दोन पांढर्‍या कबुतरांचें एक जोडपें ब्राह्मणाच्या करवीं आणतात.  त्या कबुतरांच्या गळ्याला तांबडी दोरी बांधलेली असते.  वधूवर त्यांनां तेल लावतात.  त्यांची पिसें सारखीं करतात व त्यांनां आरशांत पहावयास लावितात.  त्यांनां कुंकवाच्या भिवया लावून कपाळावर अक्षता लावतात.  अशा रीतीनें हें पक्षीपूजन आटोपलें म्हणजे त्या कबुतरांना एका मुसुलमानाच्या हवालीं करतात.  त्या मुसुलमानाला वाढणें व आठ आणे देतात; व नंतर वधूवर एकमेकांच्या केसास तेल लावून विंचरतात; व एकमेकाला हातरूमालाचा पिळा करून मारतात.  नंतर वर वधूला आपल्या घरो नेतो.  पांचसहा दिवसांनी कुलदेवतेचें पूजन होतें; त्यावेळी जातिभोजन होतें व वधूवर पुन्हां एकमेकांचे केस तेल लावून विचरतात.
    
यांच्यांतील जातिभोजनें इतर जातीप्रमाणें होत नसून रात्रौ नवापासून बारापर्यंत होतात.  वधू आपल्या सासूच्या व सासर्‍याच्या ताटांतील थोडें थोडें उष्टें खातें.
    
यांच्यातील मृतांचे संस्कार इतर जातीप्रमाणेंच आहेत.  परंतु मृताच्या ११ व्या १२ व्या व १३ व्या दिवशीं चार संन्याशांनां याच्यांत जेऊं घालतात.
    
माथुर कायस्थः - अमदाबाद, वडोदें, दाभोई, सुरत, राधनपूर व नडियाद येथें हे आढळतात.  हे लोक गुजराथेंतून खानदेशांतील नंदुरबार येथें व वर्‍हाडांतील बर्‍हाणपुर येथें जाऊन राहिलेले आहेत.  यांच्या नांवावरून पहातां यांचें मूळचें ठिकाण मथुरा असावें असें वाटतें.  मोंगल सुभेदाराबरोबर कारकून म्हणून हे इ.स. १५७३-१७५० च्या दरम्यान गुजराथेंत आले.
    
दिसण्यांत हे बनिया लोकांसारखेच दिसतात.  तीस वर्षांपूर्वी स्त्रीपुरूष दोघेहि घरांत हिंदुस्थानी भाषा बोलत असत.  अलीकडे मात्र गुजराथी भाषेचा ते उपयोग करूं लागले आहेत.  पूर्वी यांच्या स्त्रिया गोषा पाळीत असत, परंतु अलीकडे पाळीत नाहींत.  हे लोक पूर्वी मांसाहारी होते, परंतु आता शाकाहारी बनले आहेत.  चैत्र व आश्विन महिन्यांत आपल्या कुलदेवतांचें पूजन करतांनां मद्यमांसाचा नैवेद्य समर्पण करण्याचा यांच्यांत प्रघात असे, परंतु बरेच दिवस गुजराथी ब्राह्मणांशी सहवास झाल्यामुळें त्यांनी तो प्रघात आतां मोडला आहे.  भोजनाच्या पूर्वी ब्राह्मणांप्रमाणें हे वैश्वदेव करतात व भोजनप्रसंगी चित्राहुती घालतात.
    
या माथुर कायस्थांपैकी कांही रामानुजपंथी, कांही वल्लभाचार्यांचे अनुयायी व कांही शैव आहेत.  यांची उपजीविका सर्वथैव कारकुनीच्या पेशावर अवलंबून असते.
    
यांच्यांतील लग्नाची तर्‍हा मात्र जरा विलक्षण आहे.  लग्नापूर्वी एक दिवस अगोदर वधू पुरूषाचा उंची पोशाख करून अश्वारूढ होऊन वराच्या घरीं जाते.  वराच्या नात्यांतील सर्वात वडील माणसानें वधूचें मंडपांत स्वागत केल्यानंतर वधू आल्या वाटेनें परत स्वगृही जाते.  वधू मंडपांत असेतोपर्यंत वरानें तेथें येऊन तिचें तोंड पहावयाचें नसतें.  दुसर्‍या दिवशी वर वधूच्या घरीं जातो. लग्नापूर्वी वधूचा चुलता वधूला खांद्यावर घेतो व वराचा चुलता वराला खांद्यावर घेतो.  नंतर दोघेहि नाचतात.  वधूच्या हातांत एका वृक्षाच्या फांद्या दिलेल्या असतात.  त्या फांद्यांनी तीं आपल्या भावी पतीला मारण्याचा प्रयत्‍न करते व वर त्या फांद्या तिच्या हातातून ओढून घेण्याचा प्रयत्‍न करतो.  अशा रीतीनें बराच वेळ धुमाकूळ घातल्यानंतर त्यांचें लग्न लागतें.
    
इतर हिंदु सणांखेरीज माथुर कायस्थांचे पुष्कळ सण असतात.  कार्तिक शुद्ध द्वितीया व चैत्र शुद्ध द्वितीया व दिवशीं हे लोक आपला मूळपुरूष जो चित्रगुप्‍त त्याची पूजा करून हे दिवस सणासारखे पाळतात.  फाल्गुन शुद्ध सप्‍तमीला माथुर कायस्थ स्त्रिया गार पाण्यानें स्नान करतात व आदल्या दिवशींचें शिळें अन्न खातात.
    
भटनगर कायस्थ :- अमदाबाद, बडोदें व तुरळक तुरळक सुरत येथें हे आढळतात.  उत्तर हिंदुस्थानांतून हे लोक गुजराथेंत आले.  त्यांचाहि मूळपुरूष चित्रगुप्‍तच आहे.  विस व दाश असे ह्यांचे आणखी दोन पोटभेद आहेत.  विस लोक दाशांनीं शिजविलेलें अन्न खात नसत परंतु दाशांच्या मुलीशीं लग्नें मात्र लावीत पण आपल्या मुली दाशांच्या घरीं देत नसत.  या भटनगर कायस्थांचे आचारविचार माथुर कायस्थांच्या आचारविचाराबरोबर पुष्कळ बाबतींत जुळतात.  यांचे उपाध्याय श्रीगौड ब्राह्मण असतात.  यांच्या जातींतील भांडणें मताधिक्यानें मिटविलीं जातात.
    
लग्नाच्या दिवशी वधूवरांच्या घरी गृहपूजा करण्यांत येते व वधुवरांनां मंगल स्नान घालण्यांत येतें.  स्नान झाल्यानंतर वराचें डोकें तांबड्या फडक्यानें आच्छादितात ह्या फडक्याचे एक टोक त्याच्या केसांत गोवून केसांच्या शेवटी चांदीची गोफनी लावतात.  वराच्या अंगांत तांबडे कुडतें घालतात.  पायांत चाळ घालतात.  अशा तर्‍हेच्या पोषाखांत तो एखाद्या मुलीप्रमाणें दिसूं लागतो.  असा पोशाख केल्यानंतर तो आपले तोंड फुलांच्या माळांनी व पल्लवानीं आच्छादित करून आपल्या आप्तेष्टांसमवेत वधूगृही येऊन दाखल होतो.  लग्नमंडपांत प्रविष्ट होण्यापूर्वी नवरदेवास नांगराचें व सूत काढण्याच्या चातीचें दर्शन देतात.
    
खानदेशात कायस्थ जातीचे लोक भुसावळ व चोपडा येथें सापडतात.  यांचा धंदा लेखकाचा-कारकुनीचा असून, यांनी बर्‍याच मुसुलमानी चालीरीती उचलल्या आहेत.  हे मांस खातात व त्याचप्रमाणें दारू देखील पितात.  पण दुसर्‍या जातीच्या हातचें अन्न खात नाहींत.  बायका आपलें सबंध शरीर वस्त्रानें झांकून घेतल्यावर चार चौघांत कधींहि जात नाहींत इतकेंच नव्हे तर स्वज्ञातीच्या वडील माणसांशीं सुद्धां भाषण करीत नाहींत.  पुरूष गळ्यांत यज्ञोपवीत घालतात व दारू प्यावयाची असल्यास ते काढून ठेवतात.  यांच्यांत विधवांनां पुनर्विवाहाचा अधिकार नाही महाराष्ट्रांतील कायस्थांचा इतर भागांतील कायस्थांशीं एक वंशात्वाच्या कितपत संभव आहे याचा विचार ''प्रभू'' या लेखांत केला जाईल.  (क्रूक, रसेल व हिरालाल; एन्थोवेन; सेन्सस रिपोर्ट १९११ मुं.गॅ.पु.९, १२ वगैरे).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .