प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कायदा
- समाजनियमनाच्या अनेक साहित्यांपैकी 'कायदा' हें एक साहित्य होय.  समाजनियमन हें केवळ कायद्यानेंच होतें असें नाहीं.  प्रचलित नीतिनियम, पारमार्थिक विचार, विशिष्ट वर्गाबद्दल आदर इत्यादि अनेक साधनांनी समाजनियमन होतें.  त्यांपैकी राजशासनास कायदा म्हणण्याची वहिवाट आज पडली आहे.  पाश्चात्य कायदेशास्त्राच्या अभ्यासकांत शासनसंस्थांनीं उत्पन्न केलेल्या नियमांसच कायदा म्हणावें काय याविषयीं एक मत नाहीं.  तथापि आपण आज कायदा म्हणजे शासनसंस्थेची शासनें असा अर्थ करूनच अर्वाचीन कायदेशास्त्राविषयीं येथें विवेचन करूं.  भारतीय धर्मशास्त्र, ख्रिस्ती सांप्रदायिक कायदा इत्यादि गोष्टी स्वतंत्र लेखाचा विषय करूं.
    
अर्वाचीन कायदेशास्त्र - मनुष्यजात ही अनेक भिन्नभिन्न मानवसमूहांची अथवा समाजांची बनलेली आहे.  हे समाज परस्परांपासून कितीहि भिन्न असले तरी त्यांची आपसांतील परस्परांशी वागणूक विशिष्ट नियमानुसार होत असते.  प्रत्येक समाजाची कांही तरी नियमनपद्धति असते.  हे नियम हाच कायदेशास्त्राचा विषय होय.  या नियमसमुच्चयांचा अभ्यास अनेक तर्‍हेनें करतां येईल.  उदाहरणार्थ या समुच्चयांतील नियम अथवा कायदा,  हक्क, कर्तव्य, मालमत्ता, गुन्हा इत्यादि सदृशवस्तुबोधक शब्द व ते देखील निरनिराळ्या पद्धतीतील घेऊन त्यांचा अभ्यास करणें यास इंग्लंडमध्यें 'पृथक्करणात्मक कायदेशास्त्र' म्हणतात.  या अभ्यासांत हक्क अथवा कर्तव्य म्हणजे काय व परस्परसंबंध काय इत्यादि प्रश्न येतात.
    
दुसरी अभ्यासाची पद्धति म्हणजे विशिष्ट नियम अबाधित रहातात काय, किंवा त्यांत फरक होत गेल्यास तो कसकसा होत जातो याचा अभ्यास करणें; यास ऐतिहासिक अथवा तौलनिक कायदेशास्त्र असें म्हणतात.  ''तौलनिक कायदेशास्त्र'' आणि ''ऐतिहासिक कायदेशास्त्र'' हे वस्तुतः भिन्न अभ्यासविषय होत.  तथापि ऐतिहासिक कायदेशास्त्रांत तौलनिक पद्धतीस बरीच वापरली गेली आहे.  म्हणून या दोहोचें नीट पृथक्त्व झाले नाहीं.  या अभ्यासाला सर्व कायदेपद्धतींचा विश्वसनीय इतिहास उपलब्ध झाला पाहिजे.  या अभ्यासपद्धतीमध्यें विशिष्ट नियमपद्धतींत निरनिराळ्या वेळीं कसा फरक होत गेला हेंच पहाणें नसून अनेक नियमपद्धतींची उदा. इंग्रजी व रोमन, हिंदू व इराणी अशा नियमांची तुलना करावयाची असते.  प्रत्येक समाजांत कायद्यांचा उद्देश विशिष्ट गोष्टी घडवून आणावयाचा असतो व सर्व कायदेपद्धतींचे अंतिम ध्येय जवळ जवळ एकच असतें.  ''उपयुक्तता'' हें कायद्याचें व नीतिशास्त्राचें ध्येय असावें म्हणून बेन्यामनें व त्याच्या अनुयायांनी विचारमाला प्रचलित केली.  हें ध्येय साध्य करण्याकरतां जे अनेक निरनिराळे उपाय भिन्नभिन्न पद्धतींत योजले जातात त्यांची तुलना केली असतां कायदे करणार्‍याला कोणते उपाय सदोष आहेत व ते दोष कसे काढून टाकावे हें समजतें.
    
''कायदेशास्त्र'' हा शब्द वरील दोहोंपैकी कोणत्यातरी पद्धतीनें कायद्याचें परीक्षण करणें या अर्थी योजतात.  अर्थात कायदेशास्त्राचा विषय म्हणजे विशिष्ट समाजांत रूढ असलेले कायदे युक्ततादि दृष्टींनी तपासून पहाणें व त्यांचा इतर कायदेपद्धतीशी तुलनात्मक अभ्यास करणें हें होय.  कायद्याच्या मूलभूत कल्पना व संज्ञा या अभ्यासास तात्विक अभ्यास म्हणतां येईल.
    
''तात्विक'' कायदेशास्त्राचा पाया इंग्लंडमध्यें जॉनऑस्टिन यानें घातला.  कायदा म्हणजे वागण्याचा नियम.  हा शासनसंस्थेपासून आज्ञारूपानें अस्तित्वांत येतो.  ऑस्टिननें प्रथम ज्यांनां वास्तविकपणें 'कायदा' ही संज्ञा लावता येईल व जे केवळ लाक्षणिक अर्थानें कायदे म्हणून समजले जातात त्यांमध्यें फरक दाखविला आहे.  ब्लॅकस्टोन यानें (१) निर्जीव पदार्थांचे नियम (२) प्राण्यांचें पोषण, पचन वगैरे संबंधीचें नियम (३) केवळ बुद्धिगम्य असे सृष्टिनियम (४) दैवी अथवा साक्षात्कारानें प्राप्‍त होणारे नियम असें कायद्याचें वर्गीकरण केले आहे.  हें ''लॉ'' या शब्दाच्या अनेक अर्थांचे वर्गीकरण म्हणतां येईल.  या सर्व नियमांच्या मुळाशीं वरिष्ठ सत्तेपासून निघणारी आज्ञा ही कल्पना स्पष्ट अगर लक्षणेनें असते .  ऑस्टिन यानें वरील नियमांपैकी कांही आज्ञारूपी असून, कांही तसे नाहींत असा भेद दाखविला आहे व सृष्टिनियम हे आज्ञारूपी नाहींत म्हणून त्यांस कायदे म्हणतां येत नाहीं  असे प्रतिपादिलें आहे.
    
आज्ञा ही अर्थात वरिष्ठ  व्यक्तीकडून कनिष्ठ व्यक्तीला केली जाते व कनिष्ठ व्यक्तींनें ती पाळली नाहीं तर वरिष्ठाकडून तिचें नुकसान होण्याचा संभव असतो.  अर्थात वरिष्ठाची आज्ञा पाळणें हें कनिष्ठाचें कर्तव्य होतें व न पाळल्यास होणार्‍या नुकसानीस 'शासन' असें म्हणतात.  याप्रमाणें आज्ञा, कर्तव्य व शासन या तीन गोष्टी परस्परसंबंधीं आहेत.
    
तथापि सर्व आज्ञा म्हणजे कायदे नव्हत.  ज्या आज्ञा विशिष्ट  व्यक्तीस उद्देशून केलेल्या नसून एखाद्या वर्गास बंधनकारक असतात त्याच कायदा या संज्ञेस पात्र होतात.  तथापि या नियमास अपवादहि आहेत.  उदा. एखाद्या धन्यानें चाकरास अमुक दिवशीं सकाळीं ६ वाजतां उठलें पाहिजे अशी आज्ञा केल्यास ती विशिष्ट आज्ञा होऊन तीस नियम अथवा कायद्याचें स्वरूप येत नाहीं.  परंतु रोज सकाळीं सहा वाजतां उठलें पाहिजे हा नियम होतो.  तसेंच विशिष्ट हुद्यावर असणार्‍या मनुष्यानें अवश्य करावयाच्या गोष्टी बोधणारा नियम; कायदा या संज्ञेस पात्र होतो.  उलट विशिष्ट दिवशीं सर्व नागरिकांनीं सुतक पाळावें या राजकीय वरिष्ठाकडून निघालेल्या विधिवाक्यास कायद्याचें स्वरूप नसतें.
    
कायदा ही विशिष्ट आज्ञा आहे असें म्हटलें असतां सर्व कायदे हे विशिष्ट वरिष्ठ सत्तेपासून निघतात असें ध्वनित होते.  परंतु बरेच कायदे असे आहेत कीं ज्यांचा उगम विशिष्ट सत्तेपर्यंत नेतां येत नाही.  कांहीं कायदे प्राचीन परंपरागत असतात तर कांही वजनदार अशा खासगी व्यक्तींच्या मान्यतेमुळें रूढ होतात, तर कांही कायदेपंडित अथवा कायद्यावरील ग्रंथकारापासून उत्पन्न होतात.  व कांही तर दुसर्‍या समाजांच्या अनुकरणापासून निघालेलें असतात.  हा विषय अर्थात ऐतिहासिक अभ्यासाचा आहे.  कायद्यावरील ग्रंथामध्यें हे निरनिराळे कायद्याचे उत्पादक होत असें म्हटलेले आढळते.  तथापि या सर्वांच्या मुळाशीं एक गोष्ट स्पष्ट  दिसते कीं राजा जो कायदा अमलांत आणील त्यालाच वास्तविक कायदा ही संज्ञा योग्य होईल.  थोडक्यांत असें म्हणतां येईल की कायद्याचें साहित्य म्हणजे नियम अनेक ठिकाणांहून येतात पण त्यांस कायदेपणा शासनसंस्थेमुळें येतो.
    
कोणत्याहि देशांत प्रचलित असलेले सर्व कायदे घेतले तर प्रत्यक्ष राजाज्ञेनें अथवा वरिष्ठ सत्तेच्या हुकमानें प्रस्थापित झालेले कायदे थोडेच असतात.  वरिष्ठ सत्ता हा कायदे प्रस्थापित होण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे एवढेंच.  याप्रमाणें कायदे प्रस्थापित होण्याचे दुसरेहि मार्ग आहेत.  जस्टिनियननें अशा प्रकारचे चार पांच मार्ग दाखविले आहेत.  त्यापेकी निवाडा देतांना न्यायाधीश कांही नियम प्रस्थापित करतो ते आहेत.
    
यापुढें कायद्यांचें ''साक्षात कायदा'' व तद्‍व्यतिरिक्त नियम'' असें ऑस्टिननें वर्गीकरण केलेलें आहे.  साक्षात कायद्याव्यतिरिक्त नियम म्हटले म्हणजे (१) नैसर्गिक स्थितीत रहाणार्‍या मनुष्यानें आपणास बंधनकारक मानलेले नियम.  (२) राजांनीं आपल्या साक्षात अधिकाराखालीं नसलेल्या लोकांकरितां केलेले नियम, उदा. सार्वराष्ट्रीय कायदा (३) प्रजेनें एकमेकांसंबंधी पाळावयाचे परंतु कायदेशीर हक्कानें बंधनकारक असलेले नियम; यांनां ऑस्टिननें शुद्ध नीतिनियम असें नांव दिलें आहे.
    
मनुष्यें जेव्हां एखाद्या विशिष्ट शासनसत्तेच्या नियंत्रणाखालीं अथवा एखाद्या राजकीय समाजाचें घटक म्हणून रहात नसतील तेव्हां ती नैसर्गिक स्थितींत अथवा वैराज्यांत रहात असलीं पाहिजेत.  यावरून कायदेपद्धतीला शासनसंस्थायुक्त समाजाचें अस्तित्व अवश्य आहे; परंतु कोणत्या समाजाला राजकीय समाज म्हणतां येईल याबद्दल निरनिराळ्या पंडितांत मतभेद  आहे.  वर उल्लेखिलेल्या तीन प्रकारच्या नियमांत, तिसर्‍या प्रकारच्या नियमापैकी कांही कायदे असे असतात कीं, ज्यांस साक्षात कायदे म्हणावें किंवा नीतिनियम म्हणावें हें निश्चित करतां येत नाहीं.  उदा. एखाद्या पालकानें ज्या बाबतींत त्याला नियम घालण्याचा हक्क आहे अशा बाबतींत आपल्या पाल्याकरितां तयार केलेले नियम हे साक्षात कायदा या सदरांत येतात.  तसेंच एखाद्या धन्यानें आपल्या गुलामास घालून दिलेले नियम यांस साक्षात कायद्याचें व नीतिनियमांचें ही दोन्हींहि स्वरूपें असतात.  उलट एखाद्या संस्थेनें आपल्या सभासदांकरितां केलेले नियम हे जरी कायदे असले तरी त्यांस साक्षात कायदे म्हणतां येत नाही.  कारण हे नियम जरी निश्चित सत्तेपासून उद्भूत होत असले तरी त्यांस राजकीय शासन नसतें.
    
ऑस्टिन हा सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्रा (इंटर न्याशनल) ला कायदा ही संज्ञा लावीत नाहीं, याबद्दल पुष्कळांनां आश्चर्य वाटतें.  तथापि या कायद्याला जरी केवळ नीतिनियम ही संज्ञा योग्य होणार नाहीं तरी सार्वराष्ट्रीय व्यवहारनियम करणारी सत्ता सर्वमान्य अथवा शासनक्षम नसतें ही गोष्ट  विसरून चालावयाचें नाहीं व म्हणून त्या नियमांस कायदा या सदरांत घेतां येणार नाहीं.
    
आतां साक्षात कायदा याची व्याख्या करूं-प्रत्येक साक्षात कायदा हा वरिष्ठ सत्ताधिष्टित व्यक्ति अथवा व्यक्तिसमूह यांजकडून एखाद्या स्वतंत्र अशा राजकीय समाजाच्या घटकास किंवा घटकसमूहास बंधनकारक असा असतो व ती सत्ताधिष्ठित व्यक्ति अथवा  व्यक्तिसमूह ही अंतिम सत्ता असते.  कायदे करणारा म्हणजे ज्यानें विशिष्ट  नियम प्रथम तयार केला ती व्यक्ति नसून ज्याच्या सत्तेमुळें तो नियम अबाधित राहतो ती व्यक्ति होय.  याप्रमाणें कायद्याची व्याख्या केली तर आपणांस वरिष्ठ सत्ता, स्वतंत्र राजकीय समाज इत्यादि गोष्टींचें नीट विवरण केले पाहिजे.  या गोष्टींचें विवेचन ऑस्टिन यानें आपल्या ग्रंथांत उत्तम रीतीनें केलें आहे.  विशिष्ट  समाज हा स्वतंत्र राजकीय समाज आहे किंवा नाही हे पहावयाचें मुख्य गमक म्हणजे त्यांतील बहुसंख्याक व्यक्ती सर्वसाधारणतः एखाद्या विशिष्ट  व्यक्तिची सत्ता मान्य करीत असल्या पाहिजेत व ती विशिष्ट व्यक्ति अथवा व्यक्तिसमूह दुसर्‍या कोणत्या विशिष्ट  व्यक्तीच्या अगर व्यक्तिसमूहाच्या सामान्यतः अंकित असतां कामा नये.  त्याप्रमाणेंच विशिष्ट  राजकीय समाजांत विशिष्ट सत्ताधिष्ठित व्यक्ति अथवा व्यक्तिसमूह कोणता व विशिष्ट कायदा किंवा नियम अशा कोणत्या वरिष्ट सत्तेपासून प्रादुर्भूत झाला हें निश्चित करणेंहि बरेंच मनोरंजक आहे.  ऑस्टिन यानें वरिष्ठ सत्तेचीं लक्षणें अशीं सांगितली आहेत कीं, ही सत्ता कायद्यानें अनियंत्रित असते, प्रत्येक कायदा या सत्तेपासून प्रार्दुभूत होतो व कोणताहि करार त्या सत्तेवर बंधनकारक नसतो.
    
वरील ऑस्टिनच्या उपपत्तीला दोन मुद्यांवर विरोध झाला.  पण तो विरोध फारसा संयुक्तिक नव्हता.  (१) बरेचसे नियम ज्यांनां आपण सामान्य व्यवहारांत कायदा म्हणतो, व ज्यांस कायदा म्हणण्यास वास्तविक कांही हरकत नाहीं-असे नियम आस्टिनयाच्या व्याख्येच्या प्रमाणें कायद्यांत येत नाहीत.  (२) वरिष्ठ सत्तेची उपपत्ती संबंधाने आस्टिन याची व्याख्या बरीच सदोष समजली गेली आहे.  फ्रेड्रिक हॅरिसन यानें असे बरेच नियम अथवा कायदे दिले आहेत कीं ज्यांत ऑस्टिनची उपपत्ती बरीच अपूर्ण वाटेल.  उदाहरणार्थ :- प्रत्येक मृत्युपत्र लेखनिविष्ट असलें पाहिजे हा नियम घ्या.  या नियमामुळें कोणास कायदेशीर हक्क उत्पन्न झाला आहे या प्रश्नाचें उत्तर ऑस्टिन मतवादी कोणीहि सहज देईल. कोणत्याहि कायद्याच्या पुस्तकांतील विशिष्ट वाक्य हें व्याख्येप्रमाणें कायदा या संज्ञेस प्राप्‍त होईलच असे नाहीं, तें तसें व्हावयास तें योग्य शब्दांत मांडलें गेलें पाहिजे. त्याप्रमाणेंच वरील वाक्य हें एका विशिष्ट नियमाचा केवळ एक भाग आहे असें म्हणतां येईल.  ''कोणत्याहि व्यक्तीनें आपल्या अखेरच्या मृत्युपत्रानें विशिष्ट व्यक्तीस दिलेल्या मिळकतीची ती विशिष्ट व्यक्ती कायदेशीर मालक समजली जाईल''.  हें वाक्य कायदा या संज्ञेस पात्र असून त्यानें वरिष्ठ सत्तेची आज्ञा व तीमुळें विशिष्ट व्यक्तीस प्राप्‍त होणारा हक्क हीं स्पष्ट निर्देशिलीं जातात.  वरील वाक्यांत मृत्युपत्रानें या शब्दापूर्वी लेखनिविष्ट हा शब्द घातला असतां या वाक्याचें कायद्याचें स्वरूप कायम रहातें, व त्याप्रमाणें वरील विवेचनास घेतलेले शब्द हे विशिष्ट कायद्याचा भाग कसे आहेत हें दाखवितां येतें.  याप्रमाणें बहुतेक सर्व नियमांची व्यवस्था लावितां येते व हॅरिसनच्या आक्षेपांचे निराकरण करता येतें या बाबतींत घोंटाळा होण्याचें मुख्य कारण म्हणजे सर्व कायदे नेहमींच आज्ञार्थी वाक्यांत लिहिलेले नसतात हें होय. जसजसी एकाद्या कायदेपद्धतीची वाढ होत जाते तसतसें त्या पद्धतींतील कायद्यांचें आज्ञार्थी स्वरूप कमी कमी होत जातें.  ऑस्टिनलाहि वरील आक्षेपाचें महत्व कळून येऊन त्यानें असें म्हटलें आहे कीं, केवळ विधानात्मक कायदे व जुने कायदे रद्द करणारे कायदे हे जरी साक्षात कायदे नसले तरी त्यांस 'कायदा' या सदरांत घालण्यास हरकत नाही.  तथापि तो त्यांस साक्षात नीतिनियम किंवा लाक्षणिक कायदे या सदरांत घालतो.  पण असें करण्याचें वास्तविक कारण नाहीं.  कारण विधानात्मक कायदा अथवा रद्द करणारा कायदा यांच्याशी संबंद्ध अशा जुन्या कायद्याबरोबर वाचला असतां दोहोंमिळून आपणास आज्ञार्थक स्वरूपाचा कायदा पहावयास मिळेल.
    
काय चालविण्याचे कायदे हेहि अपवादादाखलच समजण्यांत येत असत.  तथापि त्यांमध्येंहि आज्ञा अंतर्भूत असून त्यांत शासनाचें वर्णन व पद्धति ही दिली असल्यामुळें त्यांसहि साक्षात कायदा म्हणण्यास हरकत नाहीं.
    
ऑस्टिनच्या कायद्याच्या व्याख्येवर दुसरा आक्षेप म्हणजे वरिष्ठ सत्तेसंबंधीचा होय.  असे अनेक समाज पृथ्वीच्या पाठीवर आढळतात कीं ज्यांचे व्यवहार पूर्वापार रूढीप्रमाणें अव्याहत चाललेले असतात, व त्या प्रदेशांतील राजा हा केवळ कर घेणारा व तो घेण्याच्या हक्काकरितां युद्ध, तह वगैरे करणारा असतो.  परंतु तो जन्मांत एकहि कायदा करीत नाहीं.  उदाहरणार्थ रणजितसिंग हा जरी अनियंत्रित सत्ताधारी राजा होता तरी त्याचें काम फक्त कर वसूल करण्याचें असून त्याच्या राज्यांतील अनेक भिन्न भिन्न लहान लहान समाज आपले व्यवहार प्राचीन रूढीप्रमाणें सुरळीत रीतीनें चालवित होते व समाजनियंत्रणाकरितां कायदा करण्याचा प्रसंग त्याला क्वचितच आला असेल.  त्याप्रमाणेंच अथेन्स येथील लोकसभा अॅटिका प्रांतांतील लोकांकरितां जे कायदे पास करी ते वास्तविक कायदे असून इतर शहरांवर व बेटांवर अथेन्सची सत्ता कायदे करण्याइतकी नसून केवळ कर वसूल करण्यापुरतीच असते.  अशा प्रसंगी ऑस्टिन म्हणेल की स्थानिक कायदे सत्ताधीश कायदे म्हणून मानतो म्हणूनच कायदे होत, नाही तर नाहींत.  याप्रमाणेच जे धार्मिक स्वरूपाचे कायदे वरीष्ठ राजकीय सत्ता मान्य करणार नाहीत तेहि 'वास्तविक कायदे' या सदरांत न येतां नीतिनियम अथवा दैवीनियम या सदरांत पडतील.  एवढेच मात्र खरे की, लोकांस किंवा वकीलास नेहमी उपयोगी पडणारी आस्टिनची व्याख्या नव्हे.  तिचें दौर्बल जेम्सब्राईसनें दाखवून दिलें आहे.
    
ऑस्टिनच्या उपपत्तीचें सार थोडक्यांत असें दिसतें की, जे नियम मोडले असतां समाजांतील शासनसंस्थेकडून प्रत्यक्ष शासन होईल अशा भीतीनें पाळले जातात त्या नियमांस वास्तविकपणें कायदे ही संज्ञा देतां येईल.  कोर्टांनी स्वीकारलेल्या सर्व नियम, रूढी, आचार व कायदे यांच्या मुळाशीं ही शासनाची कल्पना असते व नसल्यास ते कायदे या संज्ञेस प्राप्‍त होत नाहींत.    
    
आतां आपण 'हक्क' या कायद्यांतील संज्ञेकडे वळूं कायद्यामुळें विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट गोष्ट करण्याचें अथवा न करण्याचें कर्तव्य उत्पन्न होतें.  कायद्यानें निषिद्ध गोष्ट जर त्या व्यक्तीनें केली तर तो गुन्हा होतो व त्याबद्दल त्या व्यक्तीस शासन होतें.  याप्रमाणें ज्या व्यक्तीच्या हातांत वरिष्ठ सत्तेकडून विशिष्ट व्यक्तीस एखादें कर्तव्य न केल्याबद्दल अथवा निषिद्ध गोष्ट केल्याबद्दल वरिष्ठ  सत्तेकडून शासन करविण्याचा सत्ता यतें, तया व्यक्तीला तो हक्क प्राप्‍त झाला आहे असें आपण समजतों.  हक्क या शब्दाची सुलभ व्याख्या करणें बरेंच कठिण आहे.  हॉलंड यानें हक्क या शब्दाची व्याख्या पुढें दिल्याप्रमाणें केली आहे.  हक्क म्हणजे विशिष्ट व्यक्तीच्या वर्तनावर स्वतःशक्तीनें नव्हे, तर समाजाच्या शक्तीनें दाब उत्पन्न करण्याची सत्ता.  जेव्हां ही समाजाची शक्ति अप्रत्यक्ष असते तेव्हां नैतिक हक्क उत्पन्न होतो आणि जेव्हां ही शक्ति वरिष्ठ सत्तेकडून प्रत्यक्ष उपयोजिली जाते तेव्हां तो हक्क कायदेशीर असतो.
    
कांही हक्क सार्वजनिक स्वरूपाचे म्हणजे सर्व जगाविरूद्ध वापरण्यासारखे असतात तर कांही व्यक्तिविषयक अथवा विशिष्ट व्यक्तीविरूद्ध वापरावयाचे असतात.  उदाहरणार्थ एखाद्या मालमत्तेच्या मालकाला त्या मालमत्तेचा पूर्णपणे उपभोग घेण्याचा सर्व जगाविरूद्ध हक्क असतो पण ज्या दोन व्यक्तींमध्यें एखादा करार होतो त्या दोन व्यक्तींनां फक्त परस्परांविरुद्ध त्या कराराप्रमाणें हक्क प्राप्‍त होतात.  इतरांविरुद्ध होत नाहींत.
    
कायद्यांचे व्यक्तिविषयक कायदे व वस्तुविषयक कायदे असेंहि एक वर्गीकरण करण्यांत येतें.  आपणाला समाजांतील व्यक्तींचे विशिष्ट हक्क व कर्तव्य यांनी युक्त असे गट बनवितां येतात.  या विशिष्ट हक्क, कर्तव्यें वगैरे गोष्टीच्या समूहास त्या विशिष्ट व्यक्तींचा दर्जा अथवा समाजांतील स्थान असेंहि म्हणतात.  अर्थात निरनिराळ्या दृष्टींनीं विचार केल्यास विशिष्ट  समाजांतील विशिष्ट व्यक्तीचें स्थान एकसमयावच्छेदेंकरूनच भिन्नभिन्न असूं शकेल.  उदाहरणार्थ एकच मनुष्य एकाचा धनको तर दुसर्‍याचा ॠणको असूं शकेल.  व्यक्तिविषयक कायदा म्हणजे ज्या हक्क, कर्तव्यें इत्यादीमुळें व्यक्तीचा समाजांतील दर्जा ठरविला जातो त्यांस दाखविणारा नियमसमुच्चय होय.  इतर सर्व कायदा वस्तुविषयक कायदा होय.
    
हॉलंड हा ऑस्टिनचें वरील वस्तुविषयक व व्यक्तिविषयक वर्गीकरण अमान्य करून सार्वजनिक व खासगी असें कायद्याचें वर्गीकरण करतो, व व्यक्तींनां अथवा व्यक्तिसमूहाला विशिष्ट हक्क उत्पन्न होतात तो खासगी अगर सार्वजनिक समजला जाईल असें प्रतिपादितो.  ऑस्टिन याच्या उलट राजसत्तेला कायदेशीर हक्क अगर कर्तव्यें नसतातच असें म्हणून वरील भेद करीत नाहीं.  ऑस्टिनच्या मतें सार्वजनिक कायदा हा शब्द फक्त राजकीय व्यवस्थेच्यासंबंधीच्या नियमांस लावतां येईल, व तो इतर कायद्याहून अगदीं निराळा असेल.  तथापि तो व्यक्तिविषयक कायद्यांतच अन्तर्भूत होईल.
    
ऑस्टिननें व्यक्तिविषयक कायद्यांचें वर्गीकरण प्राथमिक हक्क व प्राथमिक कर्तव्यें आणि शासनात्मक हक्क व शासनात्मक कर्तव्यें असें केले आहे.  पहिल्या प्रकारचे हक्क स्वाभाविकच असतात.  परंतु दुसर्‍या प्रकारचे हक्क हिल्यावर अवलंबून असतात व हक्क व कर्तव्यें ही विशिष्ट वस्तुस्थिति अथवा गोष्टी यांवर अवलंबून असतात व त्यांस प्रतिबंध अगर विरोध ज्या गोष्टीमुळें होतो त्यास गुन्हा अथवा नुकसानी म्हणतात.  गुन्हा अथवा नुकसानीपासून उत्पन्न होणार्‍या हक्कास अगर कर्तव्यास शासनात्मक हक्क अगर कर्तव्यें म्हणतात.
    
फ्रेडरिक हॅरिसन यानें असें म्हटलें आहे की, इंग्रजी कायद्यांचें शास्त्रीय वर्गीकरण करणें फायदेशीर होणार नाही.  जर सर्व कायद्यांचा संग्रह करून त्यांचें एकीकरण करावयाचें असेल तर या वर्गीकरणापासून फायदा होईल, नाही तर श्रमाच्या मानानें सध्यां आहे या स्थितींतच कायदा ठेवावयाचा असल्यास किंवा त्याचा साकल्यानें अभ्यास करावयाचा विचार नसल्यास शास्त्रीय वर्गीकरणाचे श्रम व्यर्थ होत.  असें वर्गीकरण केल्यास त्याचा धंदेवाईक कायदे-पंडितांपेक्षां कायद्याच्या अभ्यासकांस व कायदेशिक्षणास उपयोग होईल.
    
कायद्यांच्या ऐतिहासिक अभ्यासास सर हेनरी मेन यानें सुरवात केली.  त्या पद्धतीचा प्रसार बराच झाला व कायद्याचे इतिहास बनूं लागले व शासनशास्त्राच्या अभ्यासाचा फायदा पुष्कळच झाला.  तौलनिक कायदेशास्त्राचा नुकताच उदय होत आहे व तें एक नवीनच शास्त्र बनूं पहात आहे.  सध्या हें शास्त्र केवळ ऐतिहासिक तत्वज्ञान या स्वरूपांत आहे.  या शास्त्रापासून मुख्य फायदा म्हणजे आतांपर्यंत जी कायद्याची तत्वें विशिष्ट सामाजिक संस्थांशी संबद्धअशीं चुकीनें मानली जात होती किंवा कांही केवळ अंतिम सत्यें म्हणून मानली जात होती त्यांच्या परंपरेवर व परस्पर संबंधावर पडलेला प्रकाश होय. कायद्याचे ऐतिहासिक दृष्टीनें विवेचन केल्यामुळें पूर्वीच्या बर्‍याचशा चुकीच्या कल्पना नाहींशा होत चाललेल्या आहेत.  पूर्वी एखाद्या कायद्याची सयुक्तिकता दाखविण्याकरितां त्यांतील पारिभाषिक संज्ञांच्या ओढून ताणून केलेल्या व्युत्पत्तीवर भर देण्यांत येत असें.
    
दुसरी एक कायद्याची संयुक्तिकता पटविण्याची रीत म्हणजे आध्यात्मिक होय.  या पद्धतीनें विशिष्ट  कायद्याचे स्पष्टीकरण निसर्गांत आढळून येणार्‍या तत्सदृश अशा एखाद्या सर्वव्यापी नियमावरून करण्यांत येत असे.  उदाहरणार्थ इंग्लंडमध्यें इ.स. १८३३ च्या पूर्वी मृत्युपत्र केल्याशिवाय मृत झालेल्या मनुष्याची मालमत्ता त्याच्या बापाला अथवा इतर पूर्वजाला न मिळतां मामा किंवा मावशीला मिळत असे.  या गोष्टीचें अनेक कायदेपंडितांनां आश्चर्य वाटत असे व ती संयुक्तिक रीत आहे असें दाखविण्याकरतां धडपड चालू होती व व्युत्पत्तिशास्त्रहि मदतीला घेतले जाई. ब्रॅक्टन याच्या काळी 'डिसेन्ट' (जन्म अगर अवतार) या शब्दाच्या यौगिक अर्थावरून हा कायदा प्रचारांत आला असें याचे स्पष्टीकरण देण्यांत येत असे.  परंतु वास्तविक गोष्ट अशी होती कीं, काही विशिष्ट सामाजिक कारणामुळेंच हीच चाल पडली व नंतर हिला कायद्याचें स्वरूप आलें.  या दृष्टीनें निरनिराळ्या अस्तित्वांत असलेल्या कायद्याचें स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्‍न आपणांस प्रथम ब्लॅकस्टोन याच्या ग्रंथांत आढळून येतो.  अर्थात त्यास उपलब्ध असलेली साधनसामुग्री अपुरी असल्यामुळें त्याचें विवेचनहि अपुरेंच आहे.
    
ऐतिहासिक अभ्यासामुळें जरी व्युत्पत्त्यात्मक अभ्यास व आध्यात्मिक पद्धतीचा अभ्यास यापेक्षां कायद्याच्या अभ्यासांत प्रगति झाली आहे तथापि ऐतिहासिक अभ्यासानें प्राप्‍त झालेले कांही सिद्धांत पृथक्करणात्मक अभ्यासापासून निघालेल्या सिद्धांतांशीं विरोधी दिसतात.  हा विरोध विशेषतः रूढ परंपरेनें प्रचारांत आलेल्या कायद्याच्या बाबतींत आढळून येतो.पृथक्करणात्मक पद्धतीमध्यें ज्या समाजांत विशिष्ट कायद्यांच्या पाठीमागें सत्तात्मक शासन असतें व ज्या समाजांतील नियमांमागें असें प्रत्यक्ष सत्तात्मक शासन नसतें त्या समाजांत मोठा भेद करण्यांत येतो.  तसेंच विशिष्ट समाजाला स्वतंत्र राजकीय समाजाचें स्वरूप केव्हां येतें हेंहि निश्चितपणें सांगतां येणार नाहीं.  ऐतिहासिक पद्धतीनें अभ्यास करणार्‍यालाहि अडचण येत नाहीं.  त्याच्या दृष्टीनें विशिष्ट नियमाला एका समाजांत स्वरूप आलेलें असणें व दुसर्‍या समाजांत त्याच वेळीं तो नियम समजला जाणें ही गोष्ट नित्यपरिचयाची असते.  पृथक्करणात्मक अभ्यासकाला आज कायद्याच्या स्वरूपांत असलेली गोष्ट व काहीं कालापूर्वी रूढीच्या स्वरूपांत असलेली तीच गोष्ट यांमध्यें महत्वाचा फरक वाटतो.  त्याचें क्षेत्र वरिष्ठ सत्तेनें घालून दिलेल्या नियमांच्या पलीकडे जात नाही.  उलट ऐतिहासिक अभ्यासला या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या वाटतात. याप्रमाणें ऐतिहासिक अभ्यासकाला चालीरीती व रूढी यांचें कायद्याइतकेंच महत्व वाटतें, आणि या चालीरीतींची उत्पत्ती, वाढ, त्यांचें समाजावरील वजन, त्यांचें समाजाच्या निरनिराळ्या काळच्या बौद्धिक प्रगतीवर अवलंबून असणारें महत्व इत्यादि गोष्टींचा अभ्यास मुख्यतः करावयाचा असतो.  या शास्त्रासारखेंच दुसरें शास्त्र म्हटलें म्हणजे भाषाशास्त्र होय. एकाला कायदे व रूढी यांचें जितकें महत्व वाटतें तितकेंच दुसर्‍याला शब्दाचें वाटतें.  तथापि शब्दांच्या अभ्यासानें व्युत्पत्तिशास्त्राची जितकी वाढ झाली आहे तितकी ऐतिहासिक अभ्यासानें कायदेशास्त्राची वाढ झाली नाही. तथापि रोमन कायद्यांच्या अभ्यासानें या अभ्यासाला विशेषतः जर्मनीमध्यें विशेष चालन मिळालें.  त्यांनीं आपल्या चालीरीतींचा व त्यांपासून उत्पन्न झालेल्या कायद्यांचा अभ्यास करून आणि त्यांची रोमन चालीरीतींशी व कायद्यांशीं तुलना करून कायद्यांतील तत्वांचा ऐतिहासिक अभ्यास केला.  साव्हिनी यानें ऐतिहासिक पद्धतीची इतकी वाढ केली की सध्यां पृथक्करणात्मक, ऐतिहासिक उपपत्यात्मक या तीन निरनिराळ्या सदरांखालीं होणारा अभ्यास त्यानें आपल्या सर्वव्यापी तात्विक अभ्यासांत अंतर्भूत केला आहे.  जर्मन कायदेशास्त्रांत आध्यात्मिक विवेचन बरेंच असून साक्षात कायद्याचें पृथक्करणहि सदोष आहे.  तथापि त्यांची एकंदर कायद्यासंबंधींची कल्पना ऐतिहासिक तत्वज्ञानाच्या वाढीला पोषक असून तिच्यापासून निघणारीं अनुमानें फार महत्वाची आहेत.  साव्हिनीचें ताब्यासंबंधीं कायद्याचें पृथक्करण हें या गोष्टीचें उदाहरण म्हणून देतां येईल.
    
इंग्रजी कायद्याची वाढहि अगदी स्वतंत्र तर्‍हेनें झाली आहे.  जरी रोमन कायद्याचा बराच भाग आज इंग्रजी कायदेपद्धतींत अन्तर्भूत झाला आहे तरी एकंदर इंग्रजी कायद्याची वाढ स्वतंत्र रीतीनें झाली असून इंग्रजी कायदा हा स्वतंत्र अभ्यासास योग्य विषय आहे.
    
(संदर्भग्रंथ - लेखांत उल्लेखिलेल्या ग्रंथांशिवाय अत्यंत वाचनीय ग्रंथ म्हटला म्हणजे जेम्स ब्राइसचा 'स्टंडीज इन हिस्टरी अॅंड ज्युरीसप्रुडन्स' हा होय.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .