प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
            
कामशास्त्र - भरतखंडांत अर्थशास्त्राच्या जोडीनें हें शास्त्र प्रगत झालें.  धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गांपासून निघालेलीं हीं दोन्ही शास्त्रें शुद्ध व्यावहारिक स्वरूपाचीं आहेत ज्याप्रमाणें अर्थ मिळविण्याची साधनें व मार्ग दाखविण्याखेरीज व त्याचें रक्षण करण्याखेरीज अर्थशास्त्राचा दुसरा उद्देश नाहीं, त्याचप्रमाणें आपला काम अति उत्तम तर्‍हेनें कसा तृप्‍त करितां येईल याचीं साधनें व मार्ग याचें शिक्षण देण्याचाच केवळ उद्देश कामशास्त्राचा आहे.  साम्राज्य कसें उत्कृष्टतेनें जिंकावें व शासित करावे त्याचे धडे देण्याकरितां ज्याप्रमाणें अर्थशास्त्र, प्रथम राजे व मंत्री या शासनाधिकार्‍यांनां संबोधून लिहिलें आहे, त्याचप्रमाणें कामोपभोग सर्वोत्कृष्टपणें कसा घ्यावा हें दाखविण्याकरितां कामशास्त्र मुख्यतः नागरकांनां उद्देशून लिहिलें आहे.  स्त्रिया या नागरकांशी संबंध असणार्‍या किंवा त्यांच्याच कोटीतल्या असल्यानें त्यांनी या शास्त्रांत केवळ एक भाग घ्यावयाचा आहे.  या दोन शास्त्रग्रंथांच्या रचनेंत व पद्धतींत सुद्धां विशेषतः अति जुनाट प्रतींतून विलक्षण साम्य दिसून येतें. प्रेमकलेवरील उपलब्ध असणारा अतिपुरातन ग्रंथ जो मल्लनाग वात्स्यायन कृत कामसूत्र, तो तर कौटिलीय अर्थशास्त्राच्या धर्तीवर लिहिलेला उघड दिसतो.  भाष्यरचनेसारखी याची सूत्ररूप रचना असून प्रत्येक अध्यायाच्या शेवटीं कांही श्लोक असतात.  अर्थशास्त्राप्रमाणेंच कामसूत्राचा आरंभ, विषयानुक्रमणिका, त्रिवर्गाचें विवेचन आणि विद्यासमुद्देश नांवाचा एक अध्याय यांसहित एका प्रस्तावनेनें होऊन औपनिषदिकम या अधिकारणानेंच त्याचा शेवट झाला आहे.  कामसूत्र आणि अर्थशास्त्र या दोहोंनांहि ब्राह्मणी अर्थाचा धर्म आणि नीतितत्वें पूर्णपणें मान्य आहेत.  तरी या धर्माच्या अनुरोधानें म्हणजे पुण्य आणि पाप यांच्या कक्षेंत राहून ते आपलें सिद्धांत मांडीत नाहींत.  एखाद्या माणसानें एखाद्या कुमारिकेला किंवा परदारेला जिंकण्याच्या (वश करण्याच्या) युक्तया व कला जेव्हां वात्स्यायन शिकवितो तेव्हां तो प्रेमराज्यांतील 'मॅकिआव्हेली' चांगला शोभतो.  उदाहरणार्थ-अर्थशास्त्रांत ज्याप्रमाणें राजाचे मित्र हेर आणि वकील सांगितले आहेत त्याचप्रमाणें त्याच परिभाषेंत कामसूत्रांत प्रेमीमाणसाचे पुरूष मित्र व स्त्रिया संदेशवाहिका सांगितल्या आहेत.
    
कामसूत्रांतील बहुतेक विषय यूरोपीयन वाचकास अश्लील वाटतील पण भारतीयांनीं यूरोपियन लोकांहूनहि जास्त उघडपणें वैषेयिक जीविताची चर्चा पुष्कळ केली आहे असें डॉ. विंटरनिझ्झ म्हणतो.  सूत्राच्या शेवटच्या श्लोकांतून वात्स्यायन आपणांस अशी खात्री देतो कीं, धर्म, अर्थ आणि काम यांनां उपयुक्त म्हणून विनय आणि अतिशय पूज्य बुद्धि ठेऊन आपण हा ग्रंथ लिहिला; आहे, कामविकार उद्युक्त करण्याच्या हेतूनें हा लिहिलेला नाहीं.  कारण या शास्त्राचें खरें महत्व ओळखणारा पुरूष आपल्या इच्छा दाबून ठेवतो व संसारामध्यें धर्म, अर्थ आणि काम या तिहींनां त्यांच्यायोग्य असें स्थळ देतो.  तेव्हां या शास्त्रांत तज्ज्ञ असणारा कुशल माणूस कामोपभोगाच्या वेळीं धर्म आणि अर्थ मनांत वागवील व अमर्यादित विकाराबरोबर वाहून जाणार नाहीं हें वात्स्यायनाचें म्हणणें जरी आपल्याला अगदीं खरें धरून चालतां यावयाचें नाहीं, तरी केवळ रूक्ष अशा एखाद्या ग्रंथरचनेप्रमाणें कामसूत्राची एकंदर रचना आहे असें आपणाला कबूल केलें पाहिजे.  इतर ग्रंथांतल्याप्रमाणें पांडित्यदर्शक व्याख्या, वर्गीकरणें या ग्रंथांत आढळून येतात.  तेव्हां ओव्हिडच्या 'आर्स अॅमोटोरिया' या कृतीशीं त्याची मुळींच तुलना करतां येणार नाहीं.
    
ग्रंथाचा बराचसा भाग मानववंशशास्त्रज्ञ किंवा स्त्रीपुरूषविषयक प्रश्नांचे विवेचक यांखेरीज दुसर्‍या कोणालाहि मनोरंजक वाटणार नाहीं.  तथापि संस्कृति व वाङ्‌मय यांच्या इतिहासांत याचें महत्व केवळ प्राचीनतेच्या दृष्टीनें पाहिल्यास कमी मानतां यावयाचें नाहीं.  प्रास्ताविक भागांत त्रिवर्गांचें महत्वाचें असें तात्विक-नैतिक विवेचन व सुशिक्षित स्त्रियांनां आवश्यक समजलीं जाणारीं शास्त्रें आणि विद्या यांची मनोरंजक यादी यांत दिलेली आहे.  तिसर्‍या अधिकरणांत गृह्य व धर्मसूत्रांतून दिलेल्या लग्नविधींची व चालींची चांगली प्रशंसा केली असून सहाव्या अधिकरणांत वेश्यांची रहाणी व आचारन सांगितले आहेत ते समाजेतिहासाच्या दृष्टीनें फार महत्वाचे आहेत.
    
अशा प्रकारच्या ग्रंथांत कामसूत्र हा उपलब्ध असणारा अत्यंत प्राचीन ग्रंथ असला तरी तो कामशास्त्रावरील अतिशय प्राचीन ग्रंथ आहे असें मुळींच नाहीं.  स्वतः वात्स्यायनच कामसूत्राच्या आरंभी एक अर्धवट पौराणिक, अर्धवट ऐतिहासिक अशी जी प्रस्तावना जोडतो, तीवरून असें कळतें कीं, औद्दालकि श्वेतकेतूचा कामशास्त्रांवर एक पुरातन ग्रंथ होता.  त्यावरून बाभ्रव्य पांचालानें एक संक्षिप्‍त रचना केली, तरी ती बरीच मोठी दिसूं लागली.  तींत सात अधिकरणें होतीं.  वेश्यांसंबंधींचे सहावें अधिकरण पाटलीपुत्र  येथील वेश्यांच्या सांगण्यावरूनच दत्तकानें एका वेगळ्या ग्रंथांत काढलें.  त्यानंतर इतर अधिकरणांतील विषयावर चारायण, सुवर्णनाभ, घोटकमुख, गोनर्दीय, गोणिकापुत्र आणि कुचुमार या पंडितांनीं निरनिराळीं भाष्यें लिहिली.  अशा रीतीनें हें संबंध कामशास्त्र खंडशः विवेचिलें गेल्यावर वात्स्यायनानें अभ्यासकाला त्रासदायक अशी बाभ्रव्याची सबंध प्रत घेऊन आपल्या कामसूत्रांत तींतील सर्व विषय थोडक्यांत ग्रथित केले. वर  सांगितलेले सर्व आचार्य या ग्रंथांत पुन्हां आले आहेत.  इतकेंच नव्हे तर टीकेसुद्धां त्यांची मतें व त्यांच्या ग्रंथांतील श्लोक उद्धृत केले आहेत.  तेव्हां या आचार्यांचे ग्रंथ होते हें खरें दिसतें.  कौटिलीय अर्थशास्त्रांत देखील चारायण आणि घोटकमुख यांचे उल्लेख आहेत.  पतंजलीच्या महाभाष्यांत गोनर्दीय व गोणिकापुत्र हे वैय्याकरण म्हणून आढळतात.  कौटिलीयांखेरीज नंदीसूत्र व अनुयोगोद्रार या जैन ग्रंथांतून ब्राह्मणी ग्रंथामध्यें उल्लेख्लिेलें म्हणून घोटकमुखाचें नांव येतें.  बाभ्रव्याचाहि एक संप्रदाय असावा.  कारण वात्स्यायन हीं बाभ्रवीयांची मतें आहेत असें नेहमी म्हणतो.
    
याप्रमाणें अर्थशास्त्राच्या जोडीनें वाढलेलें हें कामशास्त्र एक चांगलें पुरातन शास्त्र आहे असें दिसतें.  राजदरबारच्या सूतांच्या कृत्रिम काव्याशीं याचा निकट संबंध आहे.  कृत्रिम पद्यरचना करणार्‍या कवीला कामशास्त्राचा अभ्यास करावा लागे व कामशास्त्रांतील बरेचसे विषय काव्यशास्त्रग्रंथांतून विवेचले असतात.  आपल्याला कामसूत्र चांगलें अवगत आहे अशी प्रौढी बरेचसे कवी सांगतात.  उदाहरणार्थ रघुवंशाच्या १९ साव्या सर्गांत कालिदास, नैषधचरित्रांत श्रीहर्ष, मयूराष्टकांत मयूर, कृट्टनीमतांत दामोदर गुप्‍त आणि दशकुमारचरितांत दंडी.  कालिदासाला जरी कामशास्त्र अवगत होतें, तरी वात्स्यायनाचा हा ग्रंथ त्याला माहीत होता कीं नाहीं हे निश्चित नाहीं.  उलट सुबंधु आपल्या वासवदत्तेंत मल्लनागाचा नामनिर्देश करतो व कामशास्त्राचें आपल्याला असलेलें सविस्तर ज्ञान पुढें मांडतो.  भवभूतीहि कामसूत्राचा उल्लेख कारतो.  तेव्हां वात्स्यायनाचें कामसूत्र सातव्या शतकापूर्वी लिहिलें असलें पाहिजे.  किती वर्षांपूर्वी तें नक्की सांगतां येणार नाहीं.  कौटिलीय अर्थशास्त्रानंतर झालेला हा ग्रंथ आहे यांत शंका नाहीं.  पण त्यानंतर थोड्याच कालानें हा रचिला गेला असावा.  कारण या दोन ग्रंथांमधील बरेचसें साम्य पाहून या दोहोंत फारच थोडा काळ लोटला असला पाहिजे.  जर आपण अनुमानानें कौटिलीय अर्थशास्त्राला इ.स. ३ र्‍या शतकांत टाकलें तर वात्स्यायनाच्या कामसूत्राला ४ थ्या शतकात घालणें बरें दिसेल.  पण हें केवळ अनुमानच होय.
    
धर्मशास्त्र, अर्थशास्त्र व कामशास्त्र हीं सर्व आपणच आहोत अशी महाभारतानें अगोदरच प्रौढी मिरविली आहे. खगोलीय ज्योतिषशास्त्रावरील वराहमिहिरकृत बृहतसंहितेत (इ.स.६वें शतक) कामशास्त्रासारखे कांही अध्याय आहेत.
    
कामसूत्राच्या अंतरंगाचें परीक्षण - वात्स्यायनानें आपल्या ग्रंथाचे सात भाग केले आहेत.  त्यांस अधिकरणें म्हणतात.  प्रत्येक अधिकरणांत केवळ लांबलचक मजकूर तोडण्याकरितां केलेला कृत्रिम पोटभाग (अध्याय) असून प्रत्येक अध्यायांत एक किंवा अनेक प्रकरणें आहेत.  प्रत्येक प्रकरणांत एक विशिष्ट प्रश्न घेऊन त्याचा विचार केलेला असतो.  असे ६४ प्रश्न ६४ प्रकरणांत विवेचिले आहेत. (अधि. १, अ. १-५, प्र. १-५)
    
पहिल्या साधारण अधिकरणाच्या पहिल्या प्रकरणांत कामशास्त्रामध्यें कोणते विषय आहेत, त्यांची अनुक्रमणिका दिली आहे. त्यालाच ग्रंथकारानें शास्त्रसंग्रह असें नांव दिलें आहे.  दुसर्‍या प्रकरणामध्यें धर्म, अर्थ व कामरूपी त्रिवर्गाची आवश्यकता मनुष्यास कितपत पाहिजे याची सोपपत्तिक माहिती दिली आहे.  म्हणून याला त्रिवर्गप्रतीकपत्ती असें ग्रंथकारानें नांव दिलें आहे.
    
विद्यासमुच्चय नांवाच्या तिसर्‍या प्रकरणामध्यें कामशास्त्र शिकण्याला अधिकारी कोण ? व्यावहारिक किंवा शास्त्रीय ज्ञान, यांपैकी स्त्रियांनां कोणत्या प्रकारच्या ज्ञानांची विशेष जरूरी आहे, याचा विचार या प्रकरणामध्यें केला असल्यामुळें या प्रकरणाला 'विद्यासमुद्देश' असें नांव आहे.
    
रंगेल किंवा अनुनयकुशल (नागरक) माणसानें कसें वागावें,  त्याचा रोजचा व्यवहार कोणत्या कोणत्या प्रकारचा असावा, त्याच्या मदतीला स्नेही कोणत्या जातीचे किंवा दर्जाचे असावेत, याचा विचार पुढल्या दोन प्रकरणांमध्यें केला आहे व म्हणून त्या दोन प्रकरणांस नायक व सहाय्य करणारे मदतनीस यांचीं कामें (नायक सहाय्यदूतिकर्मविमर्श) असें नांव दिलें आहे.
    
सांप्रयोगिक (अधि. २ अ.१०; प्र. १ ते १७) :- हें अधिकरण श्रृंगाराच्या प्रयोगानेंच भरलेलें असल्यामुळें त्यास सांप्रयोगिक हें नांव ग्रंथकारानें दिलें आहे.  या अधिकरणाच्या प्रथमप्रकरणास 'समरत' असें नांव आहे.  समरत म्हणजे समान  स्त्री-पुरुषांचा श्रृंगारिक व्यवहार. वीर्यस्खलनापासून, समसमान स्त्री-पुरुषांपैकी कोणास प्रारंभी अथवा शेवटीं विसृष्टि सुख होतें, याचा विचार प्रीतिविशेष प्रकरणामध्यें केलेला आहे.  हीच प्रीतिविशेषाला वाढविणारी दुसरी कारणें खालील प्रकरणांमध्यें दिली आहेत.  चुंबन, नखदंत प्रहरण, निरनिराळ्या देशांतील चुंबनादिकांचें रीतिरिवाज, नायिकेकडून नायकाप्रमाणें कृति होणें (पुरुषायित), षंढसमागमवर्तन, प्रणयकलह पशुपक्ष्याप्रमाणें निरनिराळ्यां तर्‍हेनें रतिक्रिडा करणें (चित्रयोग) इत्यादि.
    
कन्यासंप्रयुक्तक - (अधि. ३ रे. अ. १-५ प्र. १ ते ९) :- तिसर्‍या अधिकरणामध्यें नक्षत्रें व लक्षणें या दृष्टीनें विवाह करण्यास 'योग्य' म्हणजे भावी कल्याण सुचविणारी मुलगी कोणती व अयोग्य कोणती हे प्रथम नायकानें ठरवून मग तिच्याशीं विवाह करावा असें सांगितलें आहे.  आश्वलायन सूत्रामध्यें सांगितलेली दैवीपरीक्षा वात्स्यायनाला मान्य होती हें त्याच्या  'दैवं परीक्षणंच स्थापयेयु:' या सूत्रांतील 'दैवं परीक्षणं' हें वाक्य साक्ष देत आहे.  (दैवी प.आ. सू.अ.१खं. ६ सू. ५).  विवाहाला अडचणी कशा येतात, त्या टाळण्याची साधनसामुग्री कोणती, नूतन विवाह झाल्यावर तरुणानें तरूणीशीं कसें वागावें म्हणजे परस्परांमध्यें वैर उत्पन्न होणार नाहीं  या सर्व गोष्टींचा विचार या अधिकरणामध्यें केला आहे.  म्हणून याला 'कन्यासांप्रदायिक' असें नांव आहे.
    
भार्याधिकरण - (अधि.४अ.२प्र.८) :- भार्या, पुनर्भू व वेश्या या त्रिविध नायिकांनीं घरामध्यें कसें वागावें, याचा येथें विचार केला असल्यामुळें अधिकरणास 'भार्याधिकारिक' म्हटलें आहे.  या अधिकरणात भार्येकडे सोंपवावयाची कामें, गृहकृत्यांविषयीं दक्षता, सवतीशीं वागण्याचे नियम, दुर्दैंवी स्त्रीची वर्तणूक, पुष्कळ स्त्रियाशीं पुरुषानें (राजानें) वागण्याचे नियम इत्यादि प्रकरणें आहेत.
    
पारदारिक (अधि. ५ वें.अ.१-६ प्र. १ ते १०) :- चंचल वृत्तीच्या स्त्रियांची लक्षणें कशीं असतात तें समजून घेऊन आपल्या स्त्रीला त्या वृत्तीपासून दूर कसें ठेवावें, हा या अधिकरणाचा मूळ उद्देश आहे.  म्हणून याला पारदारिक (परस्त्रीविषयक) हें नांव दिलें आहे.  यत्‍नसाध्य व अयत्‍न साध्य स्त्रियांचीं लक्षणें, स्त्रीपुरूषांचा शीलविचार, व्यावृत्तिपूर्वक प्रवृत्तीची कारणें, परिचय करण्याचीं साधनें, भाव, परीक्षा, अंतःपुरांतील स्त्रियांच्या रक्षणाचें उपाय वगैरे प्रकरणें या अधिकरणामध्यें आहेत.
    
वैशिक (अधि.६ वें, अ.१-६ प्र. १-६) :- वेश्येसंबंधी माहिती यामध्यें दिलेली आहे म्हणून या प्रकरणाला 'वैशिक' अधिकरण असें नांव आहे.  यामध्यें वेश्येनें वागण्याचे नियम, वेश्येस मदतनिसांची आवश्यकता, अगम्यचिंता (संबंध करण्यास कुष्टादि दोषरहित योग्य पुरुष विचार), नायकनायिकागुणविचार, द्रव्य मिळविण्याचे मार्ग, विरक्त पुरूषांचीं चिन्हें, विरक्तास अनुरक्त करण्याचे उपाय, द्रव्यरहित नायकास घालवून देण्याचा प्रयत्‍न, इत्यादि प्रकरणें या अधिकरणामध्यें आहेत.
    
औपनिषदिक (अ. ७ वें १ - २ प्र. १ - ६) :- वशीकरण, लिंगवृद्धि वगैरे गुप्‍त उपाय या अधिकरणामध्यें सांगितलेले आहेत म्हणून याला औपनिषदिक (गुप्‍त उपाय अधिकरण) असें नांव आहे.
    
तेराव्या शतकांतील यशोधर इंद्रपदानें रचिलेल्या कामसूत्रावरील जयमंगलाख्य या विस्तृत टीकेखेरीज बर्‍याच अर्वाचीन टीका यावर आहेत.  कामशास्त्र - वाङ्यांतील कामसूत्रानंतरच्या अनेक ग्रंथांपैकीं थोड्यांचा येथें उल्लेख करणें जरूर आहे.
    
तेराव्या शतकांत कोक्कोकानें रतिरहस्य हा ग्रंथ लिहिला.  तो कोकशास्त्र या नावानें प्रसिद्ध आहे.  याचीं बर्‍याच देशी भाषांतून भाषांतरें झालीं असून सर्व हिंदुस्थानांत याचा फार प्रसार झाला आहे.  आपण केवळ वात्स्यायन सिद्धांताचा सारांश काढला नसून नंदिकेश्वर आणि गोणिकापुत्र  या प्राचीनतर आचार्यांनांहि आधाराला घेतलें आहे अशी हा कवी प्रौढी मिरवितो.  ज्योतिरीश्वर कविशेखराच्या पंचसायक या ग्रंथांत गोणिकापुत्र, नंदीश्वर, मूळदेव आणि रतिदेव यांचा उल्लेख केला आहे.  ज्याअर्थी हा कवि क्षेमेंद्राचा उल्लेख करतो त्याअर्थी ११ व्या शतकानंतरचा तो असला पाहिजे.  अनंगरंग हा लोकप्रिय ग्रंथ सुमारे १६ व्या शतकांत होऊन गेलेल्या कल्याणमल्ल या राजकवीनें लिहिला आहे.  कामशास्त्रावरील आणखी एक छोटा ग्रंथ म्हणजे साठ पद्यांत पुरी केलेली जयदेव कवीची सुप्रसिद्ध रतिमंजरी होय.  गीतगोविंदाचा कर्ता जयदेव व हा जयदेव हे एक नसावेत.  भारतीय वाङ्‌मयांत विशेषतः कामशास्त्रीय वाङ्‌मयांत नटी व वेश्या यांत फरक केलेला नसतो.  वेश्येला दिल्या जाणार्‍या शिक्षणामध्यें नाट्यकला हेंहि एक अंग असते.  
    
नवव्या शतकाच्या मध्यांत महावीराचार्य या जैन लेखकाने जो एक मोठा ग्रंथ रचिला आहे त्यांत कामतंत्रावर एक प्रकरण आहे.  गणितसारसंग्रह या महावीराचार्यकृत ग्रंथाच्या पद्यमय प्रस्तावनेंत कामशास्त्राचा उल्लेख आलेला आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .