प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
            
कामरूप - आसाम प्रांतांतील एक जिल्हा.  उत्तर अक्षांश २५ ४३' ते २६ ५३' व पूर्व रेखांश ९० ३९' ते ९२ ११'.  क्षेत्रफळ ३८५८ चौरस मैल.
    
उत्तरेस भूतानचें संस्थान; पूर्वेस दरंग आणि नौगांग; दक्षिणेस खासी पर्वत, पश्चिमेस गोलपारा.  ब्रह्मपुत्रा नदी या जिल्ह्यांतून वाहते.  या नदीच्या दक्षिणेकडील प्रदेश डोंगराळ असून या जिल्ह्यांचा मध्यभाग सपाट आहे व त्यांत भाताची लागवड होते.  त्याचप्रमाणें या जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे. दक्षिणेकडील पर्वताच्या पायथ्याशीं जंगल आहे.  परंतु उत्तरेकडील भागांत जंगल मुळींच नाहीं.  यांत हत्ती, गवे, वाघ, चित्ते, अस्वल, डुक्कर, हरीण, ससा इत्यादि आहेत.
    
येथील हवा आसामांतील इतर भागांप्रमाणेंच आहे.  हिंवाळ्यांत येथें चांगली थंडी पडते.  गौहत्ती येथील वार्षिक पावसाची सरासरी ६७ इंच आहे.  डोंगराळ भागांत ८० ते ८५ इंच पाऊस पडतो.  परंतु सर्व पाऊस थोडक्या वेळांत पडून जात असल्यामुळें भातशेतीचें नुकसान होतें.  तारीख १२ जून इ.स. १८९७ रोजीं येथें धरणीकंपाचा मोठा धक्का बसला.  त्यामुळें या भागाचें फार नुकसान झालें.  या दैवी आपत्तीच्या दुसर्‍या वर्षी ब्रह्मपुत्रा नदीस मोठा पूर येऊन शेतीचें भयंकर नुकसान झालें.
    
कामरूप हें नांव भारतांत कोठें आढळत नाहीं.  परंतु प्राग्ज्योतिषपूरचा राजा भगदत्त याचा उल्लेख आढळतो. हा राजा कौरवांच्या बाजूनें भारतीयुद्धांत लढत होता.  रघुवंशांत दोन तीन वेळां हें नांव आलें आहे.  (४.८३,८४ आणि ७.१७ पहा) रघु हा दिग्विजयाच्या वेळीं प्रथम पूर्वेस जाऊन, दक्षिण व पश्चिम या दिशांकडून उत्तरेस वळला.  लौहित्या नामक नदी उतरून प्राग्ज्योतिष देशांत जाऊन त्यापलीकडे कामरूप देशांत तो गेला.  तेथें त्याचा दिग्विजय समाप्‍त झाला.  तेव्हां हा कामरूप देश ईशान्येस किंवा पूर्वेसहि असणें संभवतें.  तेथील राजानें रघूस हत्ती दिले असें वर्णन आहे.  यावरून तो देश (कामरूप) हत्तींविषयीं प्रसिद्ध होता असें दिसतें.  तेव्हां वरील दिशा व वर्णन आसामशी जुळतें.
    
पुंड्रवर्धन येथून पूर्वेस १५० मैलांवर मध्यें एक नदी उतरून ह्युएनत्संग कामरूप देशांत गेला.  कामरूप हें आसाम देशाचें संस्कृत नांव आहे.  या प्रांताचा घेर १६६७ मैल सांगितला आहे.  यावरून त्यांत ब्रह्मपुत्रा नदीचा सर्व प्रदेश व कुचबिहार आणि भूतान हीं येत असावी.  ब्रह्मपुत्रा प्रदेशाचे पूर्वी तीन भाग होते. ते सदिया, आसाम आणि कामरूप.  ह्यास पूर्वेचा, मधला आणि पश्चिमचा असें म्हटलें तरी चालेल.  कामरूप हें संस्थान सर्वांत बलिष्ठ म्हणून सर्व प्रदेशास त्याचें नांव पडलें.  कुचविहार हा मुख्य कामरूपचा पश्चिम भाग होता;  तो प्रदेश फार समृद्ध असल्यामुळें राजे त्यांत रहात असत व त्याची कामतीपुर राजधानी होती.  तीवरून सर्व प्रदेशास हें नांव पडलें.  परंतु ब्रह्मपुत्रा नदीवरील गोहत्ती शहर ही कामरूपची जुनी राजधानी होती असें म्हणतात.  कामतीपुर हें पुवनपासून उत्तरेस बरोबर १४० मैलांवर आहे.  आणि गोहत्ती हे ३१७ मैलांवर ईशान्येस आहे कामतीपुरचें अंतर मिळतें.  यावरून ७ व्या शतकात तीच राजधानी असावी.  येथील भाषा हिंदुस्थानांतल्या सारखीच होती असें ह्युएन लिहितो.  यावरूनहि गोहत्तीपेक्षां जवळचें जें कामतीपुरठीतीच याची राजधानी होती असे म्हणतां येतें.  ह्युएनत्संग मोठी नदी उतरला ती तिस्ता होय.  ह्या राज्याच्या पूर्वेस चिनी शू प्रांत होता.  आग्नेयीस अरण्य होतें, त्यांत पुष्कळ रानहत्ती होते, त्याप्रमाणें हल्लींहि आहेत.
    
कामरूप (आसाम)  देशांत भगदत्ताचा वंश राज्य करीत असून ह्युएनत्संग तेथें गेला असतां कुमार किंवा भास्करवर्मा हा तेथें राजा होता (६४३).  हा प्रख्यात हर्षवर्धनाचा मित्र होता.  हें ब्राह्मण घराणें पुढें दोन शतकें तेथें चालू होतें.  भगदत्तकुळ हें ब्राह्मण असूनहि त्यांतील राजे क्षत्रियांच्या मुली करीत व क्षत्रियांनां (वल्लभी वगैरे) आपल्या मुली देत.  हे राजे गौड, वंग, ओरिसा वगैरे राज्यांवर मधून मधून आपलें वर्चस्व स्थापन करीत; आणि स्वतःचा देश पर्वतवेष्ठित असल्यानें ते स्वतः सुरक्षित असत.  महाभारत कालापासून स. ८०० पर्यंत हें भगदतकुल एकटेंच राज्य करीत होतें, इतकी शतके एकच कुळ राज्य करणारें असें जगांत दुसरें आढळत नाहीं.  कदाचित ही दंतकथाहि असेल परंतु हिमालयाच्या आंत हें राज्य असल्यानें महत्वाकांक्षी राजांच्या आहाराबाहेर हें राही.  (वैद्य म. भा. १ पा. २).
    
मध्यंतरी (१२ वें शतक) कांहीं काळपर्यंत बंगालच्या पाल राजांनीं येथें राज्य केलें होतें (एपि. इंडि. भा.२).  परंतु अरब प्रवाशांनी भगदत्ताच्या वंशाचाच उल्लेख केला आहे.  त्यांनीं या देशाला 'कामन' असें नांव दिलें आहे.  ते म्हणतात '' येथील प्रजाजन फारच सुरेख असून त्यांच्यांत कानाला भोंकें पाडण्याची चाल आहे.  समुद्रगुप्ताच्या राज्याची पूर्वसरहद्द या कामरूपाला भिडली होती (स्मिथ प्रा. हिं.). भास्करवर्मा (कुमारराज) हा बौद्धधर्मीय नसून ब्राह्मणधर्मीय होता, (डाक्का रिव्ह्यु १९१३ जून).  त्यावेळी कामरूप देशाची मर्यादा पश्चिमेस करतोया नदीपर्यंत होती. इ.स. १२२८ च्या सुमारास शान जातीपैकी अहोमांनीं हा प्रदेश काबीज करून घेतला.  येथील धर्म अलीकडे (मंगोलियन लोकांच्या रहिवासामुळें) तांत्रिक बौद्ध व तांत्रिक हिंदु आहे.  या प्रांतांतच प्रख्यात शाक्त मार्गाची आधिदेवता जी कामाख्या देवी तिचें स्थान (गौहत्तीजवळ) आहे.  अद्यापि मंत्रतंत्राबद्दल हा प्रदेश प्रख्यात आहे.  येथील हिंदुराजांनी अनेक वेळां मुसुलमानांचा पराभव करून आपलें स्वातंत्र्य कायम ठेविलें होतें.  बखतियार महंमदानें १२०४ मध्यें त्यांच्यावर चढाई केली होती.  परंतु दार्जिलिंगच्या पुढें त्याला जातां आलें नाहीं.  परत येतांना नदीवरील पूल आसामी लोकांना पाडून टाकल्यामुळें त्याचें बहुतेक सैन्य बुडून मेलें.  तो मोठ्या शिकस्तीनें पांच पन्नास लोकांसह वांचला; परंतु त्याच्या पुढल्याच वर्षी आसाम्यांनीं त्याचा वध केला.
    
सोळाव्या शतकांत काक राज्याचा अधिकार या भागावर चालत होता.  राजा नरनारायण यानें अहोम आणि काचार, जेन्तिआ, सिलहेट आणि टिपरा येथील राजांशीं पुष्कळ लढाया मारल्या.  पुढें या राज्याचे दोन भाग झाले.  त्यांच्यांत भाऊबंदकी सुरू होऊन भांडणें उपस्थित झालीं व त्यांत एकानें मुसुलमानांची व दुसर्‍यानें अहोमांची मदत मागितली.  पुष्कळ दिवस हें वैर सुरू होतें.  अखेरीस इ.स. १६३७ सालीं मुसुलमान विजयी झाले व त्यांनी गोहत्ती आपल्या ताब्यांत घेतली.  यापूर्वी मुसुलमानांनी तेराव्या शतकाच्या आरंभीं आसामवर स्वारी केली होती.  त्यांत त्यांचा थोडाफार जयहि झाला होता.  परंतु जिंकलेल्या मुलुखावर त्यांस सत्ता राखतां आली नाही.  इ.स १६६०-६२ सालीं मीर जुमला यानें आसामवर स्वारी केली.  परंतु त्याचें बरेंच नुकसान होऊन त्यास परतावें लागलें.  तया वेळीं गोलपारा ही मुसुलमानांची सरहद्द ठरली व कामरूपचें राज्य अहोमांच्या राज्यांत समाविष्ट झालें.  अठराव्या शतकाच्या अखेरीस अहोमच्या राजाची सत्ता संपुष्टांत आली होती व त्या राज्यांत त्यावेळीं बरेच बखेडे माजले होते.  त्यांनां आळा घालण्याकरितां इ.स. १७९२ साली कॅप्टन वेल्श यास पाठविलें होतें.  परंतु दोन वर्षांनंतर त्यास परत बोलाविले.  त्यानंतर त्या भागांत दंगे वगैरे फार झाले व अखेरीस तो सर्व प्रदेश ब्रह्मी लोकांनीं आपल्या ताब्यांत घेतला.
     
इ.स. १८२६ सालीं पहिली ब्रह्मी लढाई झाल्यावर कामरूप ब्रिटिश राज्यास जोडण्यांत आलें.  तोपर्यंत तेथें हिंदु राज्य होतें.  हिमालयाच्या पायथ्याशीं असलेलें दुआर भोतियांकडे इ.स. १८४१ पर्यंत होतें.  या सालीं ब्रिटिशांनीं ते खालसा केलें व तेथील डोंगरी जातीस त्या मुलखाबद्दल नुकसानभरपाई दिली.  भूतानच्या लढाईंत इ.स. १८६५ सालीं देवांगिरीच्या ब्रिटिशाकडे आलें.  प्रथमतः आसाम प्रांतांचें मुख्य ठिकाण गोहत्ती होतें; परंतु इ.स. १८७४ सालीं आसाम बंगालपासून वेगळा करण्यांत आला व त्याच वेळी शिलांग हें मुख्य ठिकाण करण्यांत आलें.
    
गोहत्ती, कामाख्या आणि हाजो येथें प्राचीन हिंदु देवळांचे अवशेष पुष्कळ सांपडतात.  लोकसंख्या १९२१ सालीं ७,६२,६७१ इतकी होती.  या जिल्ह्याचे दोन विभाग आहेत.  एक बारपेटा आणि दुसरा गोहत्ती यांत एकंदर १७१६ खेडीं आहेत.
    
या जिल्ह्यांत हिंदूंची वस्ती शेंकडा ६९, मुसुलमान शेंकडा ९ व वन्यधर्मी लोक शेंकडा २१ आहेत.  कामरूप जिल्ह्यांत स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षां अधिक आहे.
    
मुख्य पीक भाताचें असून व्यापारी दृष्टीनें ताग लावण्याचा प्रयत्‍न इकडे होत आहे. १८९१-१९०१ च्या दरम्यान येथील धरणीकंपामुळें व लोकसंख्या कमी झाल्यामुळें या जिल्ह्याचें बरेंच नुकसान झालें आहे.  या जिल्ह्यांत १४९ चौरस मैल संरक्षित जंगल आहे.
    
धंदे - चहाच्या लागवडीशिवाय या जिल्ह्यांत दुसरा महत्वाचा धंदा नाहीं.  येथील व्यापारी वर्ग बहुतेक मारवाडी यांचा आहे.  गोहत्ती, बारपेटा, पळसबारी, नळबारी इत्यादि व्यापाराचीं ठिकाणें आहेत.  आसाम-बंगाल रेल्वेचा ३३ मैल लांबीचा मार्ग या जिल्ह्यांतून आहे.  याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीवर आगबोटी चालत असून त्या गोहत्ती, सोलकुची, पळसबारी, खोलाबांद इत्यादि ठिकाणीं लागतात.
    
आसामांतील इतर भागांप्रमाणें कामरूपमध्यें दुष्काळ कधींहि पडत नाहीं.  या जिल्ह्याचा अधिकार डेप्यूटी कमिशनरकडे असतो.  (आसामचीं नाणी-अॅलन, ग्रेट-आसामचा इतिहास, लायल-एशि. स्टडि; रावटीं बील.भ. १; वाटर्स. भ.१; एपि इंडि. २; हंटर-आसाम. कामरूप गॅ).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .