प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
काबूल, प्रांत. - अफगाणिस्तानाचा मध्यवर्ती व महत्वाचा प्रांत.  उत्तरेस अफगाण-तुर्कस्तान, पूर्वेस जलालाबाद जिल्हा, दक्षिणेस आणि पश्चिमेस कंदहार आणि हिरात. हा प्रांत समुद्रापासून सुमारें ७००० फूट किंवा त्याहून जास्त उंचीवर असावा.  कोहिस्तान, पंजशीर, बामिआन, सैघान आणि निजराव हे उत्तरेकडील जिल्हे होत.  हजारजात, पश्चिमेकडील व नैर्ॠत्येकडील जिल्हा होय.  गझनी, गर्देश, खोस्ट आणि लोंगर हे जिल्हे दक्षिणेस व आग्नेयीस आहेत.  येथील हिवाळा फार कडक असतो.  परंतु इतर ॠतू अगदी यूरोपांतील ॠतूंप्रमाणें असतात.
    
या भागांत पर्शियन, ग्रीक, हिंदु, बौद्ध व मुसुलमान या लोकांचें अस्तित्व शाबीद करणारे पुष्कळ प्राचीन अवशेष सापडतात.
    
शहर - अफगाणिस्तानची राजधानी.  उत्तर अक्षांश ३४ ३०' व पूर्व रेखांश ६९ १३'.  हें शहर पेशावर पासून १८१ मैलांवर काबूल नदीच्या दक्षिण-तीरावर बसलेलें आहे.  हें शहर समुद्रसपाटीपासून ५७८० फूट उंचीवर आहे.  शहराच्या उत्तरेस नदीच्या वामतीरावर असलेल्या काबूल शहरभागाच्या पलीकडे शेरपुर नांवाची लष्करी छावणी असून जवळच बेमारू नांवाचा पर्वत आहे.  येथें सुमारें दीड लाख वसती असून पैकीं एक लाख काबुली व चार हजार हिंदु असावेत.  शहरचा परिघ ३ १/२ मैल असून हल्लीं शहरास तट नाहीं.  परंतु पूर्वी या शहरास तट होता या विषयीं पुष्कळ दृश्य दाखले अद्यापि आहेत.
    
अमीराच्या राज्यांतील जरी हें सर्वांत श्रीमंत शहर आहे तरी वरकांती तें तसें दिसत नाहीं.  घरें साधी विटांचीच आहेत. यास पूर्वी सात दरवाजे होते.  हल्ली पूर्वेकडील दरवाजा-इ-लाहुरि हा एकच शिल्लक आहे.  शहराचे मोहल्ले पाडलेले आहेत.  रस्ते फरसबंदी आहेत पण सांडपाण्याची योग्य व्यवस्था केलेली नसल्यामुळें ते अत्यंत घाणेरडे आहेत.  
    
काबुलची हवा निरोगी आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.  शेरपुर छावणीपलीकडील वझिराबाद नांवाचा मोठा तलाव हल्लीं कोरडा पडला आहे;  परंतु बालाहिस्सार व बेनी हिस्सार या पर्वतांतील प्रदेश दलदलीचा असल्यामुळें हिंवतापाची सांथ वारंवार उद्भवते.  तथापि पाण्याची सोय, सुंदर हवा व आल्हाददायक असा आसमंतांतील प्रदेश असल्यामुळें काबुलशहरांतील मृत्यूचें प्रमाण अफगाणिस्तानांतील इतर कोणत्याहि गांवांपेक्षां कमी आहे.  येथें धान्य बरेंच स्वस्त असतें.  प्राचीन महत्वाची ठिकाणें काबूल शहरांत फारशीं नाहींत.  तैमूरनें बांधलेली मशीद-इ-सफेद, बाबरनें बांधलेली मशीद-इ-बाला-चौक, व पूर्वीच्या एका अमीरानें बांधलेली जाम मशीद या इमारती पहाण्यासारख्या आहेत.  बाबरच्या दरग्याभोंवती सुंदर बागबगीचा केलेला आहे.  अबदुल रहिमानखान हा अमीर झाल्यापासून यानें पुष्कळ सुधारणा केली.  त्यानें निरनिराळ्या कारखान्यांवर युरोपिअन तज्ज्ञ माणसांची नेमणूक करून बर्‍याच लष्करी उपयोगाच्या वस्तू आपल्याच राज्यांत करविल्या आहेत. काबुली लोकांनी स्वतः एकाद्या विशिष्ट धंद्यांतील तत्व समजून घेतल्यानंतर तो ते धंदा उत्तम चालवूं शकतात.  इ.स. १८९४ सालीं एकंदर १४ युरोपिअन या अमीरानें नेमले होते.  इ.स.१९०४ सालीं फक्त दोनच होते.  त्यांपैकीं एक तोफा करणारा व एक इलेक्ट्रिकल इंजीनिअर होता.
    
काबूल नदीवर एकंदर पांच पूल असून त्यांपैकी एक बाबरच्या वेळचा असून तो हल्लीं पडलेला आहे; व दुसरा शहाजहाननें बांधलेला आहे.
    
काबुलांतील फळफळावळ फार प्रसिद्ध आहे.  या भागांत कित्येक मैल फळबागा सारख्या लागलेल्या आहेत.  येथें सफरचंद, पिअर, क्विन्स, प्लम, अप्रिकॉट, पीच, चेरी, मलबेरी, द्राक्षें इत्यादि फळें पुष्कळ पिकतात.  येथील कलिंगडे हिंदुस्थानांत फार दूरवर पाठविलीं जातात.
    
इतिहास - काबूलचें प्राचीन नांव (ह्युएनत्संगच्या वेळचें, कदाचित चिनी) कपिश होतें (६३०).  त्यावेळीं येथील राजा क्षत्रिय असून बौद्धमतानुयायी होता.  त्याचें नांव ह्युएननें दिलें नाहीं; पण त्याचा अंमल लंपाक, नगर व गांधार या प्रांतांवर होता.  गांधार प्रांत प्रभाकरवर्धनाच्या नंतर या कपिश राज्यांत सामील झाला असावा.  फार प्राचीन काळीं काबूल हा भारतवर्षाचाच एक प्रांत असावा.  ॠग्वेदांत सप्‍तसिन्धूमध्यें कुभा व क्रुमु या नद्यांचीं नांवें येतात.  याच हल्लींच्या काबूल व कुर्रम नद्या होत.  इराणच्या इतिहासांतील प्रति भीम रूस्तुम यानें एका काबुली राजकन्येशीं लग्न लावल्याचा उल्लेख आहे.  तेथील पारसिक साम्राज्यांत केव्हां केव्हां काबूल जाई यावरून काबुली लोक व राजे हे आर्यवंशी असून एकीकडे भारतीय व दुसरीकडे पारसिक आर्यांशीं त्याचा विवाहसंबंध होई.  हल्लींचे अफगाण हे आर्य व तुर्क यांचें मिश्रण असल्याचें रिस्ले यानें लिहिलें आहे.  प्राचीन ग्रीक त्यांनां आर्यवंशोद्‍भवच समजत.  इसिडोरस म्हणतो कीं, काबुली लोकांच्या देशाचें नांव आराकोसिया (पारसिक-हरहवती संस्कृत - सरस्वति) होय.  पार्थिअन लोक त्याला 'श्वेतभारत' म्हणत.  तुर्कांनीं काबूल जिंकीपर्यंत हा प्रदेश हिंदुस्थानांतच मोडत असे (१०२०).  ह्युएनच्या वेळीं हें राज्य बरेंच मोठें होतें.  तत्पूर्वीची साधार माहिती उपलब्ध नाही. अलेक्झांडर हा काबुलास आला होता असें म्हणतात (ख्रि.पू. ३२७) चंद्रगुप्‍त  मौर्य यानें सर्व अफगाणिस्तान जिंकलें होतें.  त्यानंतर अशोकाचा काबूल हा एक प्रांत होता.  पुढें (ख्रि.पू. २०८) अंटायोकस यानें काबूलचा राजा सुभागसेनाचा पराभव केला. डेमेट्रिअस यानेंहि काबूल काबीज केलें होतें (ख्रि.पू. १७५) पुढें तर मिलिंद हा साक्षात काबूल येथेंच राज्य करूं लागला (ख्रि.पू.१६०-१४०).  पहिला कुशाण कडफिसेस हाहि काबूलचा राजा होता. (४८) ह्युएनच्या वेळचा राजा स्वतःस शहा म्हणवी.  ही पदवी इराणी भाषेंतून घेतली होती.  कारण काबूल राज्य इराणी साम्राज्यांत बहुधा सामील असे.  सारांश काबूल राजा धर्मानें बौद्ध, वर्णानें क्षत्रिय व पदवी (शहा) नें इराणी असल्यानें हिंदी - इराणी परंपरेचा व सुधारणांचा त्यानें एकत्र मिलाफ केला होता.  राजाची प्रजा सामान्यतः बौद्धधर्मी होती.  लंपाक व गांधार येथील लोक हिंदु होते.  काबूलची प्रजा थंड हवेंत असल्यानें गौरवर्णी असे म्हणून त्या देशाला श्वेतभारत म्हणत.  अरबांनी काबूलराजाला 'झंतबिल' म्हटलें आहे.  याचा खरा अर्थ समजत नाही. सं. ६४०-१००० पर्यंतच्या ४०० वर्षांच्या काळांतील सार्‍या राजांनां अरब लोक वरीलच नांव देत. आरबांनीं मेकरान (६४०) व हिरात (६५०) जिंकून काबूलची हद्द गांठली.  पुढें अबदुल रहिमाननें ६६३ त वर्षभर वेढा देऊन तें घेऊन तेथील लष्करी लोकांची कत्तल करून बायकामुलांनां गुलाम केलें. राजा मुसुलमान झाला व त्यामुळें त्याला गादीवर कायम ठेविलें;  परंतु अरब परत गेल्यावर तो स्वतंत्र झाला; तेव्हां त्याच्यावर हज्जाजनें अबदुल्ला म्हणून एक अरब सेनापति पाठविला.  त्याला डोंगरांत कोंडून शहानें त्याचा पराभव करून, सात लाख दीनार दंड घेऊन त्याला सोडून दिलें.  तेव्हां हज्जाजनें अबदुल रहिमानास पाठविलें, त्याचाहि वरील युक्तीनेंच शहानें पराभव केला व अबदुलानेंहि बंड उभारलें (७००). पुढें ७८६ मध्यें हरून अल रशिदनें अब्बासला काबुलवर पाठविलें.  त्यानें तेथील शहाविहार (बौद्ध मठ) लुटला.  मात्र शहानें पूर्वीच्या लढायांप्रमाणें (गनिमी काव्यानें) त्याचाहि पराभव केला.  या वेळी शहा व त्याची प्रजा बौद्धच होती.  त्यानंतर समानी आरबांनी काबूल जिंकलें (८५०). तरी शहा एक शतकभर गझनीचा मांडलिक म्हणून राहिला होता.  यानंतर ९३४ त तुर्की अल्फ तेगीन (अल्फतगीन असा एकत्र उच्चार चूक आहे) यानें गझनी घेतली, त्यावेळीं काबूलच्या हिंदुशहानें गझनीकरास साहाय्य केलें होते.  ९७५ त सबक्तगीननें काबूलचें राज्य जिंकलें, तेव्हां काबूलशहा त्याचा मांडलिक झाला.  महंमूद गझनीकर यानें १०२१ त राज्यलोभानें काबूलचें सारें राज्य घशांत घातलें; त्यावेळी शहानें निकरानें तोंड दिलें, पण त्याचा कांहीं एक उपयोग झाला नाही.  प्रजेला जुलुमानें बाटविलें.  त्या वेळची एक गमतीची हकीकत आढळते ती अशी कीं, काबुलच्या सुभेदारानें, आपण बाटूं पण गोमांस भक्षण करणार नाहीं, व खोजे बाळगणार नाहीं अशा अटी घातल्या होत्या.  पण पुढें या लोकांचा व मुसुलमानांचा सर्व बाजूंनी इतका एकजीव झाला कीं, काबूल येथें पूर्वी कधीं काळीं एक हिंदुराज्य होतें ही स्मृती सुद्धां कोणांस राहिली नाहीं !
    
राजतरंगिणीवरून पुढील हकीकत समजते.  काश्मीरराज शंकरवर्मा यानें काबूलशहा लल्लिय याचा पराभव करून त्याचें राज्य बळकाविलें (९००).  व लल्लिय पळून आलखान गुर्जराच्या आश्रयास गेला.  शंकरवर्मा मेल्यावर शाहीराजानें काबूल पुन्हां घेतलें; यावेळीं लल्लियाचा पुत्र तोरमाण होता.  या शाहीराजघराण्यांतील एक राजकन्या काश्मीरराज क्षेमगुप्तास दिली होती.  दहाव्या शतकांत काबूलराज भीमशहा होता.  त्यानें बौद्धधर्म टाकून न हिंदुधर्म स्वीकारून काश्मीरांत एक विष्णुमंदीर बांधलें.  या घराण्यांतील शेवटचा हिंदुराजा त्रिलोचनपाल याच्यावर गझनीकरानें स्वारी केली असतां, त्यानें काश्मीरराजाच्या मदतीनें त्याला तोंड दिलें; पण शहानें सांगितलेली गनिमीकाव्याच्या लढाईची आज्ञा काश्मीरसेनापतीनें न ऐकून उघड्या मैदानांत लढाई दिल्यानें मुसुलमानांचा जय झाला व काबूलचें हिंदु राज्य नष्ट झालें !  तुर्कांनीं राज्यांतील सार्‍या प्रजेस बाटविलें.  त्रिलोचनपाल परदेशांत पळाला (१०२०).  या काबूलशहांच्या नांवापुढें ''पाल'' हें उपपद येतें;  त्यावरून झंतबील म्हणजे रणपाल असें नांव असावें व हा पुरूष शाहीराजघराण्याचा मूळ संस्थापक असावा अशी इतिहासज्ञांची समजूत आहे.  ह्युएनत्संगच्या वेळचें क्षत्रिय घराणें व हें शाही घराणें भिन्न दिसतें.  हें घराणें तुर्की होतें असें स्मिथ म्हणतो पण तें चूक आहे.  राजतरंगिणीवरून लल्लिय व त्याचा वंश हा ब्राह्मण होता असें दिसतें.  मात्र यांच्या राजकन्या क्षत्रियांच्या वाटेल त्या घराण्यांत देत.  स्मिथचें दुसरें म्हणणें कीं ह्युएनत्संगच्या वेळचें क्षत्रिय घराणें हे कनिष्कांचे वंशज घराणें होतें, तेंहि चुकीचें आहे. कनिष्काचे वंशज पेशावरास होते व ते ह्युएनत्संग येण्यापूर्वीच नष्ट झालें होतें.  काबूलच्या क्षत्रिय घराण्यांतील शेवटच्या शहास पदच्युत करून त्याच्या लल्लिय (अलबिरूणीचा कल्लर) या ब्राह्मण सेनापतीनें गादी बळकाविली त्यानें ''शहा'' व ''स्पलपति'' (स्थलपति ? समरपति ?) या राजाच्या पदव्याहि आपल्याला घेतल्या; याच्या वंशजांची जीं नाणीं सांपडतात त्यांवर एका बाजूस शंकराचा नंदी व त्रिशूळ असून दुसर्‍या बाजूस भाला घेतलेला घोडेस्वार व स्पलपति हा शब्द असतो.  हीं नाणीं तिकडे इतकीं लोकप्रिय होती कीं, महंमुद गझनीकरास तींच कायम ठेवावीं (फक्त आपलें नांव संस्कृतांत लिहून) लागलीं.  या शाहीघराण्याची वंशावळ अशी बसवितां येते.  ती :- (१) स्पलपतिदेव, (लल्लिय, कल्लर) स. ८८०-९००; (२) सामन्तदेव, स. ९००-९२०; (३) खर्मर्यक, (कमलु, कमलुक, तोरमाण) स. ९२०-९४०; (४) भीमदेव, स. ९४०-९६०; (५) जयपाल, स. ९६०-९८०; (६) आनंदपाल, स. ९८०-१०००; (७) त्रिलोचनपाल, स. १०००-१०२१;  देव उपपदावरून हे ब्राह्मण होते हे स्पष्ट दिसतें. क्षत्रिय घराण्यांशी बेटीव्यवहार झाल्यामुळें पुढें हे क्षत्रिय बनले असावेत व पाल हें उपपद त्यांनी धारण केलें असावें.  त्रिलोचनपालाचा, अलबिरूणी हा समकालीन होता.  त्यानें या हिंदुराज्याच्या अंताबद्दल कल्हणाच्या (राजतरंगिणी) प्रमाणेच दुःखोद्वार काढले असून ते वाचण्यासारखे आहेत.
    
स. १०२१ त महंमुद गझनीकरानें हे ब्राह्मणी राज्य नष्ट केल्यावर तो प्रांत गिझनीच्या अंमलाखाली मोडूं लागला.  नंतर घोरी व गझनी या घराण्यांत भांडणे लागली असतां हा प्रांत कोणाकडे तरी राही.  असें एक मोठें भांडण ११५० त झालें होतें.  पुढें ११७३ त घियासुद्दीन घोरी हा काबूलचा राजा झाला.  यानंतर प्रख्यात महंमद घोरी हा गादीवर आला.  यानें येथूनच हिंदुस्थानावर स्वारी केली.  यानंतर हें राज्य चेंगीझखानाच्या अंमलाखालीं कांही दिवस होतें.  नंतर तैमूरलंगाच्या हातीं जाऊन त्याच्या वंशजांच्या ताब्यांत पुढें हा प्रांत सतत २०० वर्षें होता.  खुद्द बाबर हा १५०४ मध्यें काबूल येथे राज्य करीत होता.  हुमायून व कामरान यांच्या भांडणांत हुमायुननें इराणच्या शहाच्या मदतीनें प्रथम काबूल घेऊन नंतर दिल्ली घेतली (१५५३-५४).  अकबराचा सावत्र भाऊ महमंद हकीम यानें बंड करून काबूल बळकाविलें (१५८०).  अकबरानें त्याचा पराभव केला;  मात्र त्याच्या मरणापर्यंत काबूल त्याच्याकडे ठेविलें (१५८५).  नंतर पुन्हां हा मोंगली सुभा झाला.  पुढे नादीरशहाच्या ताब्यांत (१७३७) काबूल गेलें.  यानंतर अहंमदशहा दुराण्याचा ताबा या देशावर बसला; त्याचाच नातु शाहशुजा होय.  याच्या कारकीर्दीतच इंग्रजाचा पाय प्रथम अफगाणीस्तानांत पडला (१८३८).  याबद्दलची साग्र माहिती ''अफगाणिस्तान'' या सदराखाली पहा (व्हि. स्मिथ; वैद्य; प्राचीन भूवर्णन; ह्युएनत्संग; राजतरंगिणी; ॠग्वेद; रिस्ले-सेन्सस रिपोर्ट; अलबिरूणी; रॉबर्टी; कनिंग-ह्याम-म.भा.नाणीं वगैरे).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .