प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

कॉफी - काफीच्या झाडांस लॅटिनमध्यें काफिया, अराबिका; मराठींत कॉफी किंवा बुंद हीं नांवें आहेत.
अरब लोकांनां जेव्हां पहिल्यानें कॉफी माहित झाली तेव्हां तिचा मादक गुणधर्म असल्यामुळें इस्लामी धर्मांत सांगितल्याप्रमाणें इतर सर्व मादक पदार्थांबरोबर ते हिचाहि तिटकारा करूं लागले.

वस्तुक्षेत्र - काफीचें झाड मूळचें अबिसिनिया, सुदान,  गिनी व मोझॅंबिक येथील डोंगराळ प्रदेशांतील आहे, असें वनस्पतिशास्त्रज्ञांचें मत आहेतें मूळचें अरबस्तानांतील आहे असेंहि कित्येक लेखकांचें मत आहे.  कॉफीचीं झाडें अरबस्तानांत पुष्कळ आहेत ही गोष्ट मात्र खरी.

इतिहास - कुराणांत अथवा हिब्रू धर्मग्रंथांत कॉफीचा उल्लेख नसल्यामुळें कॉफीचें झाड अरबस्तानांत जरी मूळचेंच असलें तरी तें फार थोड्यानां माहीत असावें असें वाटतें. मक्का, मदीना व बगदाद येथील लोकांनां १४ व्या शतकापर्यंत कॉफी चांगली माहित नसल्याचा पुरावा मिळतो.  कॉफीपासून पेय तयार करण्याची कल्पना फार अलीकडची असून तिचा उगम इराणांत झाला असावा असें वाटतें.  काव्हा नांवाचें पेय फळाच्या आंतील गाभ्याचें करीत असल्यामुळें कांहीं वेळ पर्यंत ते तसेंच ठेवलयास तें मादक बनून त्याला एकप्रकारचा वासहि येत असे.  ईजिप्‍तमध्यें गेलेल्या अल्पीनस (१५८३), व्हेस्लींग (१७३५) वगैरे प्रवाशांनीं कॉफीचें बरेंच वर्णन केलें आहे व त्यापूर्वी तेथें काफीचा उल्लेख आढळत नाही.  यावरून त्याच सुमारास ईजिप्‍तमध्यें काफीचा उपयोग लोकांनां माहीत झाला असावा.

'सँडिजीनें (१६१०) कॉन्स्टांटिनोपल येथील कॉफीगृहांचा उल्लेख केला असून पिएट्रो डेलाव्हॅले (१६६५) यानें कॉफीची कृति दिली असून कॉफी पाचक, तरतरी आणणारी व रक्तशुद्धि करणारी आहे असें मत दिलें आहे.  हरबर्ट (१६७७) व फ्रायर या प्रवाशांनीं कॉफी हें इराणी पेय असून दुकानांतून विकत मिळत असे व दरबारांतून समारंभाच्या वेळी तिचा उपयोग करीत असत, अशी माहिती दिली आहे.  कॉफीच्या भाजलेल्या बियांचा उपयोग प्रमुखत्वानें आरंभी एडन येथें करण्यांत आला.  लवकरच बियांची उपयुक्तता मक्का, मदीना व केरो येथील लोकांना माहीत झाली व एका शतकाच्या आंतच दमास्कस, अलेप्पो व कॉन्स्टांटिनोपल येथील लोकहि भाजलेल्या बिया उपयोगांत आणूं लागले.  पुढें लवकरच जास्त धर्मभोळ्या लोकांनी सार्वजनिक कॉफीगृहांनां प्रतिबंध केला व अशा रीतीनें तेथें होणारे नाच तमाशे बंद केले.  १५११ मध्यें मक्केच्या गव्हर्नरनें कॉफी हें पेय मादक असल्यामुळें त्याचें सेवन जाहीर रीतीनें बंद पाडलें.  परंतु सुलतान हा स्वतः कॉफी पिणारा असल्यामुळें त्यानें आपल्या गव्हर्नरचा हुकूम रद्द केला.  पुढें काफीगृहांत दंगे धोपे होऊं लागल्यामुळें ती बंद करण्यांत आली.  १५३३ त कॉफी पिणें कायदेशीर मानणारे व न मानणारे असे केरोच्या लोकांत दोन तट झाले.  कॉफीच्या बिया भाजल्या म्हणजे त्या कोळशाप्रमाणें होतात व कोळसा खाण्याकरितां विकणें बेकायदेशीर आहे या सबबीवर १५५४ मध्यें कॉन्स्टांटिनोपल येथील कॉफीगृहें कायमचीं बंद करण्यांत आली.

हिंदुस्थानचे प्राचीन राजे प्रवाशी व वनस्पति शास्त्रज्ञ यांच्या पैकीं फारच थोड्या लोकांनीं कॉफीची माहिती दिली आहे.  टॅव्हरनिअर (१६७६) नें हिंदुस्थानांत व इराणांत काफी होत नसून तिचा पुरवठा अरबस्तानांतून होत असें अशी माहिती दिली आहे.

१६९० पर्यंत जगांतील कॉफीचा पुरवठा अरबस्तान व अबिसीनिया येथूनच होत असे.

हिंदुस्थानांत कॉफी केव्हां आली याची खात्रीपूर्वक माहिती मिळत नाही.  परंतु सुमारें दोन शतकांपूर्वी बाबाबुदन नांवाच्या एका मुसुलमान यात्रेकरूनें मक्केहून परत येताना आपणाबरोबर सात बिया आणल्या असें पुष्कळांचें मत आहे.  १८२३ च्या सुमारास कलकत्याच्या बागांतून कॉफींचीं झाडें असल्याची माहिती मिळते.  परंतु हिंदुस्थानच्या सपाट प्रदेशापेक्षां दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशांतच कॉफीचीं झाडें चांगली वाढतात.  चिकमुग्लूरच्या जवळ कॅनन्सनें  १८३० त कॉफीची लागवड पहिल्यानें पद्धतशीर रीतीनें केली.  १८४० व मनान्टोडी व १८४६ त नीलगिरी टेकड्यांतून तिची लागवड केली गेली.  पोर्तुगीझ लोक सिलोनमध्यें येण्यापूर्वीच अरब लोकांनीं कॉफी तेथे नेली होती व १६९० त डच लोकांनीं तिची पद्धतशीर लागवड सिलोनमध्यें सुरू केली.  पुढें कॉफीच्या झाडांवर कांही रोग पडल्यामुळें १८८७ पासून सिलोन येथील कॉफीची लागवड अजीबात बंद झाली.

काफीचा प्रसार :- कॉफीच्या वाढत्या मागणीबरोबर अरबस्तान व अबिसीनिया या दोनच ठिकाणीं तिची लागवड न होतां जगाच्या इतर भागांतूनहि ती सुरू झाली.  डच ईस्ट इंडिया कंपनीनें बटाव्हिया येथें तिची लागवड करून कॉफीच्या व्यापारांत बराच पुढाकार घेतला.  उष्ण कटिबंधांतील डोंगराळ प्रदेशांत कॉफीची लागवड होऊं लागून उत्तम प्रकारची कॉफी निघूं लागली.  अलीकडे सर्व जगांत कॉफीची एका दररोजच्या जरूरीच्या पेयांत गणना होते.

लागवडीच्या उपजाती व प्रकार : - अलीकडील कॉफीच्या लागवडींत तीन उपजाती महत्वाच्या आहेत.  त्यांचें वर्णन पुढील प्रमाणें :-

लिबेरिका कॉफी :- उष्ण कटिबंधांतील पश्चिम आफ्रिकेंत हीं झाडें मूळचीच आहेत.  परंतु येथें त्यांच्या लावगडीकडे कोणी फारसें लक्ष देत नाहीं.  फर्ग्युसन यानें या झाडांचा सिलोनमधील लागवडीचा १८७८ पर्यंतचा इतिहास दिला आहे.  सिलोनमध्यें जेव्हा कॉफीच्या पानांचा रोग सुरू झाला त्याच सुमारास यूरोपमध्यें ह्या उपजातींची माहिती झाली.  हिचीं झाडें मजबूत असल्यामुळे या वरील रोगांपासून या झाडाचें फारसें नुकसान होणार नाहीं असा समज झाला व तो पुढें थोडा बहुत खरा ठरला. कॉफिआ अरेबिका प्रमाणेंच या झाडांनांहि हेमिलिआ नांवाच्या रोगापासून उपद्रव होतो. परंतु रोपांची चांगली जोपासना केल्यास लवकरच त्यांची पूर्ण वाढ होऊन या रोगाशीं झगडण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगी येतें असें सर डॅनिअल मॉरिस यांचें म्हणणें आहे.

हिंदुस्थानांतील अनुभव असा आहे की, अरेबिका व हीं झाडें यांनां वाढण्यास सारखीच सुपीक जमीन लागते.  सर्द व गरम हवेची त्यानां जरूर असून सर्व वर्षभर मिळून ९०० इंच पाऊस पडणारा भाग या झाडांच्या वाढीला फार चांगला.  अवर्षणापासून ह्या झाडांचें फार नुकसान होतें.  उथळ, पाणथळ, वाळू व दगडांचें प्रमाण जास्त असलेली व फार काळी अशा जमीनींत या झाडांची वाढ होत नाही.  नेहमीं ओलसर असणार्‍या व जेथें पाटबंधार्‍यांचें पाणी देतां येतें अशा जागीं ही झाडें चांगलीं वाढतात.  डोंगराळ प्रदेशाप्रक्षां सपाट मैदान या झाडांनां मानवतें.  वर सांगितलेली परिस्थिति या झाडांनां जरूर असल्यामुळें तीं वेस्ट इंडीज, सिलोन, मलायाद्वीपकल्प, उत्तर बोर्निओ, सुमात्रा, जावा व हिंदुस्थानांतील सिलहट, आसाम, ब्रह्मदेश व अंदमान बेटें हीं झाडें होतात.  मादागास्करच्या पूर्वकिनार्‍यावर यांची बरीच लागवड होते.  येथील झाडें मिश्र जातींचीं असून त्यांपासून तयार होणारी कॉफी अरबस्तानांतील कॉफीपेक्षां चांगली असते.  हीं झाडें मोठालीं होत असल्यामुळें एका एकरांत सरासरी ४०० झाडें लावितात.  अलीकडें बरींच वर्षे सर्व जगभर निरनिराळ्या मिश्र जातींची लागवड करूं लागले आहेत.  अशा झाडांनां कॉफीच्या रोगांपासून भीति कमी असते.  लिबेरियन झाडांपासून नियमित व पुष्कळ उत्पन्न होते व ती झाडें इतर जातींच्या झाडांपेक्षां जास्त मजबूत असतात.  सखल प्रदेशांतील झाडांनां उंचवट्यावरील झाडांपेक्षां पुष्कळ व मोठालीं फळें येतात.  परंतु तीं फारशीं रूचकर नसतात.  फळांपासून कॉफीचें उत्पन्न करणें जरा मेहनतीचें काम आहे.  परंतु बिया सावकाश व काळजीपूर्वक वाळविल्यास त्या मेहनतीचें फळ मिळतें. या झाडांतील या कमीपणामुळें व्यापारांत या कॉफीला फारसें महत्व नाहीं.

स्टेनोफिल्ला - कॉफी - या उपजातीचीं झाडें पश्चिम आफ्रिकेंत होतात.  हा अरेबिकाच्या पैकींच एक प्रकार असावा असें बेन्थामला वाटलें होतें.  या झाडांची लागवड प्रयोगाकरितां म्हणून त्रिनिदाद,  जावा, सिलोन, म्हैसूर व इतर कांही ठिकाणी केली आहे.  अरेबिका व लिबेरिका कॉफी यांपासून या जातींत कांही मिश्र झाडें आहेत.  या जातीचीं झाडें चांगलीं वाढतात व त्यांच्यांपासून पुष्कळ उत्पन्न होतें, परंतु त्यांना बहार फार उशीरां येतो.

लॉरेंटी कॉफी - आफ्रिकेच्या उष्णकटिबंधांत या जातीची झाडें होतात.  या झाडांनां 'कांगो कॉफी' असें म्हणतात; यांची वाढ सपाटून होते.  कॉफीच्या रोगांपासून त्यांचे फारसें नुकसान होत नाही व बियांनां एक तर्‍हेचा चांगला वास येतो.  हीं झाडें बहुतेक ओढ्यांच्या कांठांवरून होतात.  त्यांनां ओलसर जमीन लागत असून दाट छाया मुळींच मानवत नाहीं.  लिबेरिका जातीच्या झाडांप्रमाणें हें झाड शेंड्याकडे निमुळतें नसून वाटोळेंच असतें.  नुनेझ नदीच्या कांठी हीं झाडें पहिल्यानें दिसल्यामुळें त्यांनां रिओनुनेझ कॉफी' असेंहि म्हणतात.  हिंदुस्थान व सिलोनमधील या झाडांच्या लागवडीचे प्रयत्‍न निष्फळ झाले.

लागवडीचें क्षेत्रफळ - सरकारी आंकड्यावरून गेल्या ५० वर्षांत कॉफीच्या लागवडींत विलक्षण फेरफार झाला आहे असें आढळतें.  १८८९, १८९१ व १८९३ सालीं झालेल्या ब्राझीलमधील घडामोडींमुळें पुढें एकदोन वर्षे कॉफीचें पीक तेथें फार कमी आलें.  यामुळे हिंदुस्थानच्या कॉफीच्या लागवडीला यापासून बराच फायदा झाला.  १९०४ सालीं कॉफीच्या लागवडीचें क्षेत्रफळ २,१२,९६४ एकर होतें, तेंच १९०६ सालीं २, १०, ६८८ एकर झालें.

१९१७-१८ सालीं हिंदुस्थानांत कॉफीच्या पिकाखालीं लागवडीस असलेली जमीन.

  स्थल.   एकर.
  म्हैसूरसंस्थान   १०८१७८
  मद्रासइलाखा    ५२६८६
  कुर्ग   ४२४९१
  कोचीन   ५९२२
  त्रावणकोर   १२८८
  ब्रह्मदेश   ८५
 मुंबईइलाखा   ४९
 एकूण  २१०६९४ 

कॉफीचें उत्पन्न :- हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व कॉफीची निर्गत मुख्यत्वेंकरून ग्रेटब्रिटन व फ्रान्सकडे होते.  आजपर्यंत (म्हणजे १८८५-८६ सालीं) सर्वांत जास्त ४ कोटी १० लक्ष पौंड कॉफी परदेशी पाठविण्यांत आली.  १८९५ सालीं ३ कोटी पौंडांची निर्गंत झाली.  १९०५-०६ सालीं ४,०१,४०,३८४ पौंड, १९१५-१६ सालीं १,९८,२४,००० पौंड व १९२०-२१ मध्यें २,६१,४०८००० पौंड कॉफी परदेशी रवाना झाली.  ब्राझीलची स्वस्त कॉफीं यूरोपच्या बाजारपेठेंत असल्यानें हिंदुस्थानांतून होणारी निर्गत कमी होत आहे.
    
सन १९२०-२१ साली कॉफीची निर्गत मागील सालापेक्षां १४ टक्क्यानीं कमी झाली.  प्रतिकूल परिस्थितीमुळें फ्रान्सनें शेकडा ५० इतकी हिंदी कॉफीची मागणी कमी केली, पण ग्रेटब्रिटन - आयर्लंडनें ३७ टक्के मागणी वाढविली.  या सालीं नेहमीप्रमाणें ग्रीसकडे निर्गत झाली नाही.  आशियांतील तुर्कस्तानानें चौपट व अरबस्तान, बेहेरीन बेटें आणि ऑस्ट्रेलिया यांनी पूर्वीच्या दुप्पट कॉफी आणविली.  पण सिंहलद्वीपांत होणारा पुरवठा निम्यापेक्षां उतरला.
    
(सँडी, हर्बर्ट, टॅव्हर्नियर, थेव्हेनॉट, ब्रूस यांचीं प्रवासवृत्तें; ऐनी अकबरी; लेहमॅन-कॉफी कल्टिव्हेशन; ईलियट-गोल्ड; स्पोर्ट अॅड कॉफी इन मायसोर; थुर्बार-कॉफी, फ्रॉम प्लँटेशन टु कप; वाल-मॅन्युअरिंग ऑफ कॉफी इस्टेटस; बर्जेस ब्राऊन-कॉफी प्लँटिग; ह्यूजेस-सिलोन कॉफी सॉईल्स अॅंड मॅन्युअर्स; हार्मन-कॉफी-लीफ डिसीज; बँगलोर; ब्रिटानिका; वॅट वगैरे.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .