प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
काफिरिस्तान - काफिरिस्तान हें अफगाणिस्तानच्या एका प्रांताचें नांव आहे.  कर्नल लॉकहार्ट याचें मिशन या प्रदेशांत जाण्यापूर्वी यासंबंधीं फारच थोडी माहिती होती.  इ.सन १८८९ मध्यें मि.जी.एस.रॉबर्टसन यांनी आपलें मिशन या देशांत नेल्यावर जी माहिती गोळा केली व ज्या गोष्टी नमूद केल्या त्याच काय त्या चित्तवेधक असून या देशाविषयींच्या आपल्या माहितीचा विश्वसनीय आधार होत.
    
काफिरिस्तान म्हणजे काफिर किंवा नास्तिक लोकांचा देश.  चित्रळ अफगाणी राज्य यांनी वेष्टिलेल्या प्रदेशास काफिरिस्तान म्हणतात.  पूर्वी या देशांत नास्तिक पहाडी लोक रहात असत.  ते स्वतंत्र होते, पण १८९५ मध्यें त्यांनां अफगाणिस्तानचा अमीर अबदुल रहमान यानें जिंकिलें व त्यांनां इस्लामधर्माची दीक्षा बलात्कारानें दिली.  या प्रदेशाचा समावेश उत्तर अ. ३४० ७१'' ते ३६ आणि पूर्व रे. ७०० ते ७१० ३०' दरम्यान होतो.  ह्याचें एकंदर क्षेत्रफळ ५००० चौरस मैल आहे.
    
साधारणतः हा प्रदेश खोल, निरूंद व नागमोडी अशा ओबडधोबड दर्‍या व त्यांच्या  आंत लहान लहान द-या यांचा बनलेला आहे. या संबंध भागांत मैदान म्हणून मुळींच नाहीं.  निश्चल शिखरें, कठिण, निराच्छादित कडे, बर्फमय प्रदेश, बर्फाच्या नद्या, पाईन झाडांची वने, विस्तीर्ण वृक्षाच्छादित उतरणी, वाहत्या झर्‍यांच्या कांठावरील जंगली द्राक्षें व डाळिबें यांची अरण्यें वगैरे पर्वतदृश्यांचा प्रत्येक प्रकार येथें आढळतो.  निरनिराळ्या उंचीवर रानटी फुलें आहेत.  नद्यांत विपुल मासे आहेत.  तांबड्या पायाचीं तित्तिरें, कबुतरें, डोव्ह, फेझन्ट वगैरे पक्षी येथें आहेत.  वन्य पशूंपैकी मुख्य मारखोर (एक प्रकारचा बकरा) व ऊरियल (एक प्रकारची शेळी) हे होत.  या प्रदेशांत अस्वलें व चित्ते बरेच आढळतात.  'आयबेक्स' नांवाचें जनावर फार क्वचित आढळतें.
    
घांटवरस्तें - बदकशानकडे जाणारे सर्व उत्तरेकडील घांट १५००० फुटांहून जास्त उंच आहेत.  यांपैकी मुख्य मंडळ, कामाह, क्ती, कुलाम व रामगळ घांट हे होत चित्रळकडे जाणारे घांट, उदाहरणार्थ, झिडिग, शुई, शावळ, पारपिट, पाटकुन हे कांहीसे कमी उंचीवर आहेत.  वाटाड्याशिवाय या मार्गाने जाणें परकी माणसास फार धोक्याचे आहे.  अतिशय दुर्गम अशा बहुतेक घांटांवरून या प्रदेशांतील चपल जनावरांच्या साहाय्यानें जातां येतें.
    
नद्या - या प्रदेशांतील सर्व नद्यांचे क्षुब्ध प्रवाह काबूलमध्यें जातात.  पूर्व काफिरिस्तानांत बाश्गल नदी वहाते.  हिला मिळणार्‍या नद्या स्कोरिगाल व माननगाल ह्या होत.  या देशाच्या मध्यभागांत पेच, कामा, प्रेसन अथवा व्हिरोन अशीं निरनिराळीं नांवें असलेली नदी वाहते.  हिला उजवीकडून क्ती व अश्किन व डावीकडून वाई ह्या नद्या मिळतात व अखेरीस ही नदी चिगारसराईजवळ कुनार नदीला मिळते.  पश्चिम काफिरिस्तानांतून वहाणार्‍या अलिंगर अथवा काव या नदीसंबंधी खात्रीलायक सविस्तर माहिती नाहीं.
    
हवा - उंचीच्या मानानें हवा बदलते.  उंचावरील दर्‍यांत हिंवाळा कडक असतो.  समुद्रसपाटीपासून ४,००० फुटांहून जास्त उंचीच्या प्रदेशांत सर्वत्र बर्फ पडतें.  पुष्कळशा दर्‍यांतून वार्‍याचा अभाव असतो.  त्यामुळें बरीच थंडी विशेष त्रास न होतां सहन करतां येते.  पर्जन्याच्या अभावामुळें कालवे वगैरे पाणीपुरवठ्याच्या साधनांची जरूर पडते व हे कालवे, पाटबंधारे वगैरेंची व्यवस्था बर्फ पडण्यावर अवलंबून असते.
    
काफिरलोक - या देशांतील सध्यांचे रहिवाशी बहुशः महंमदाच्या अनुयायांनीं इस्लाम धर्म न स्वीकारल्याबद्दल हांकून लाविलेल्या पूर्वअफगाणिस्तानच्या विस्कळित झालेल्या टोळ्यांचे वंशज आहेत.  ह्यांनीं या देशांतील उतरणीवरील व खोर्‍यांतील मूळच्या लोकांवर हल्ला करून त्यांनां पादाक्रांत केलें, गुलाम केलें व त्यांच्याशीं कांहीसे ते संलग्न झाले.  हे पुरातन लोक म्हटले म्हणजे प्रेसन लोक, गुलाम व नामशेष झालेल्या जझी व अरॉम लोकांपैकी शिलकी लोक होत.  सध्यां या लोकांचे (१) शिया-पोश, (२) वायगुळी, (३) प्रेसनगली किंवा व्हायरन लोक असे विभाग करतां येतील.
    
गुलाम - या प्रदेशांत गुलाम पुष्कळ आहेत.  यांची उत्पत्ति फार पुरातन रहिवाशी व लढाईंतील कैदी यांच्यापासून झालेली आहे.  हे गुलाम खेड्यांतील एका विशिष्ट भागांत रहातात त्यांनां लोक अपवित्र समजत असत व कांही पवित्र क्षेत्राजवळ जाण्याची त्यांना मुभा नव्हती.  सर्व गुलाम शियापोशांप्रमाणें पोशाख वापरतात असें आढळून येतें.
    
स्त्री स्वातंत्र्य - हे लोक बायकांनां फारच थोडा मान देतात.  साधारणतः त्या पुरूषांच्या राखा व गुलाम असतात.  त्यांना विकतां येतें व शेतकीच्या कामांत मजुरांप्रमाणें त्यांना उपयोग करून घेतां येतो.  त्या कांहींशा कुरूप असतात.  त्यांचा वर्ण काळा असतो.  शेतकीचीं सर्व प्रकारची कामें व ओझी वहाण्याचें वगैरे हलक्या प्रतीचे धंदे त्यांनां करावे लागतात.  त्यांनां त्यांचे नवरे अगर पुरूषवर्गांतील त्यांचे नातलग यांच्यापासून कोणतेच हक्क मिळत नाहींत. त्यांनां मालमत्तेचा ताबा मिळूं शकत नाहीं, किंवा मालमत्तेवर त्या वारसा सांगू शकत नाहीत.

भाषा - या देशांत तीन भाषा बोलतात.  याशिवाय पुष्कळ उपभाषाहि आहेत.  पैकी शिया-पोष लोकांची भाषा जास्त प्रचारांत आहे.  ही एक प्राकृत भाषा आहे. यूरोपिय लोकांना ही भाषा शिकणें अशक्य आहे.
    
धर्म - अबदूर रहमान यानें या लोकांना जिंकण्यापूर्वी काफिर लोक मूर्तिपूजक होते.  यांच्यामध्ये पूर्वजांची पूजा व अग्निपूजाही थोडथोडी होती.  देवांची संख्या अगणित होती. इम्र हा विधाता होता व इतर सर्व देवता त्याच्या ताब्यांत असत.  हलक्या प्रतीच्या देवतांपैकी मोनी ही फार पुरातन होय; व गिश ही रणदेवता असून फार लोकप्रिय होती. प्रत्येक खेड्यांत हया देवतांचे एक अगर निरनिराळीं देवळें असत. देवळांत दगडाच्या अगर लाकडाच्या मूर्ती असत.  यांच्यापुढें जनावरांचे बळी देत असत.  इम्रदेवतेला गाई, बकरें व बैल यांचा आणि धनदेवतेला शेळ्या यांचा बळी देत असत. वंशपरंपरागत धंदा करीत आलेल्या धर्मोपाध्यांयाकडून पूजाअर्चा होत असे. देवतांपुढें गाणें, नाचणें इत्यादि हे लोक करीत असत व या लोकांची, नरक म्हणजे पापी लोक मरणोत्तर जेथें जाळतात ती जागा अशी समजूत असे.
    
ज्ञाती संघटना - या टोळ्यांपैकीं ब-याचशा निरनिराळ्या घराण्याच्या बनलेल्या होत्या.  कोणाहि माणसाचें महत्व त्याच्या घराण्याची संपत्ती व त्या घराण्यांतील पुरुषमंडळींची संख्या यांवर अवलंबून असे.  जसजसें एखाद्या घराण्यांतील पुरुष मंडळीचें अंगीं शौर्य जास्त व जसजशी त्यांची संख्या जास्त तसतसें त्या घराण्याचें वजन जास्त. गुलामांच्या वरच्या पण अगदीं हलक्या प्रतीच्या घराण्याचे लोक उच्च दर्जाच्या घराण्यांतील लोकांची मेंढपाळ वगैरे होऊन सेवा करीत असत. कोणाहि श्रीमंत माणसाला धर्मिक विधी आगर मोठे सामाजिक समारंभ व मोठमोठ्या मेजवान्या देऊन '' जास्ट'' अथवा वडील बनतां येत असे. व त्याहिपेक्षां जास्त खर्च करुन लोकांना मीर अथवा नायक बनतां येत असे. परंतु असे लोक थोडे असत. प्रत्येक टोळींचे सर्व महत्वाचें व कामकाज जास्ट लोक पंचायतींत लांत करीत असत.  फार महत्वाच्या प्रश्नांचा निकाल टोळीतील सर्व लोकांच्या बनलेल्या सभेंत होत असें.  टोळींतील अंतर्व्यवस्था बारा मदतनिसांच्या सहाय्यानें एक लोकनियुक्त न्यायाधीश पहात असे. त्याचें काम म्हटलें म्हणजे लोकांच्या चालीरीती योग्य रीतीनें पाळल्या जातात किंवा नाहीं हे पहाणें व फळें व पिकें गोळा करण्याकरितां लोक योग्य वेळी आरंभ करतात किंवा नाही हें पाहणें होय. ते पाटबंधारे वगैरेंचे नियमन करीत असत. प्रत्येक घराच्या मालकापासून मिळालेल्या धान्य वगैरेंच्या वर्गणीच्या योगाने ह्या लोकांचा नायक टोळींतील पाहुण्यांचें  आदरातिथ्य करीत असे.
    
घरें व खेडी - यांची घरें साधारणतः मजबूत असतात. व तीं लांकडाचीं बनविलेलीं असतात.  तीं दोन किंवा जास्त मजली असून त्यांच्यावर उघडी गच्ची असते.  श्रीमंत लोक घरांवरील साध्या नमुन्याच्या कोरीव कामाचे फार शोकी आहेत. खोल्या चौकोनी असून त्यांना लहान खिडक्या असतात.  दरवाज्यांना बंद करण्याकरितां मागेंपुढें सरकणारे लांकडी अडसर असतात.  कांहीं खेडीं अगदी दाट वस्तींची लांबट  व किल्ल्याच्या आकाराचीं असतात.  कांही खेडीं थोड्याशा झोपड्यांची असून एखाद्या टेंकडीवर वसविलेली असतात.  त्यांत प्रवेश करण्याकरितां शिडी असते.  कांहीं थंड खो-यांतील घरें जमीनींत खोल असतात.  खाचा असलेल्या खांबांचा शिड्यांसारखा उपयोग करतात.  
    
स्वभाव -  काफिर लोक सरासरी ५ फुट ६ इंच उंच असतात.  ते अशक्त असतात.  ते नेहमीं निकृष्ट स्थितींतच आढळतात.  ते फार चपल, उड्या मारणारे, कधींहि न थकतां चालणारे व डोंगर चढण्यांत वस्ताद असतात.  कांहीं थोडेसे लोक उंच व मजबूत असतात.  दिसण्यांत ते पूर्वेकडील लोकांप्रमाणें असतात.  ते आपल्या सोबत्यांशी कधींहि बेइमान होत नाहींत.  काफिर लोक आपल्या मित्रांना अंतर देत नाहींत. ते क्रूर नसतात.  मुलें व जनावरें यांच्यावर ते दया करतात, दुबळे व म्हातारें यांचें ते रक्षण करतात.  लोभ व मत्सरामुळें यांच्यांत परस्परांत जरी नेहमी भांडणें होतात.  तरी गोतावळ्याशीं किंवा नातेवाईकाशी मात्र ते तीं भांडणें  विसरतात.  
    
पोशाख, हत्यारें व भांडी कुंडी - येथील पुरुषांचा राष्ट्रीय पोशाख म्हटला म्हणजे ओबडधोबड रीतींने कमाविलेलें बक-यांचे कातडें होय.  हे कातडें छातीजवळ खिळे जडविलेल्या चामड्याच्या पट्टयानें आवळलेलें असतें व या पट्टयांत लोखंड किंवा तांब्यानें मढविलेल्या लांकडी म्यानांत बसविलेली एक ओबडधोबड आकाराची व गुलामांनीं बनविलेली कट्यार अडकविलेली असते.  बायकांच्या अंगांत काळ्या रंगाचें लोंकरी झबलें असतें.  हें खांद्याखालीं घेरदार असतें व याला तांबडी किनार असतें.  हें छातीजवळ लोखंडी टांचणी अगर कांट्यांने अडकविलेलें असतें व शरीराभोंवती हें एका विणलेल्या पट्टयांनें आवंळलेलें असतें.  याला पुढच्या अंगास गांठ मारुन याचा घोळ (झालर) खाली सोडलेला असतो; कांहीं टोळ्या कापसाचे कपडे वापरतात.  या प्रदेशांत कपड्यांची दुर्मिळता आहें.  बक-याच्या केसाने बनविलेले बर्फात चालण्याकरितां उत्तम ''गेरट'' नांवाचे जोडे हे लोक वापरतात.  लोंकरी घोंगड्या व बक-याच्या केसाचे बनविलेले बुरणूस हे लोक  आंथरण्या पांघरण्याकरितां वापरतात.  वीरांची आयुधें म्हटलीं म्हणजे चकमकीनें उडविण्याच्या बंदुका, सोटे, व हलक्या कुर्‍हाडी हीं होत.  मऊ दगड खाणींतून काढून त्यांचीं भांडी करतात व धान्य ठेवण्याकरितां लांकडाच्या कोरून पेट्या व करंडे बनवितात दूध, लोणी, पाणी वगैरे ठेवण्याकरितां मुठीसहित सुबक खोदीव काम असलेले पेले करतात.  बकर्‍याच्या चामड्याच्या बनविलेल्या पिशव्यांत दारू, धान्य वगैरे साठवितात.  बांसरी लहान नगारे जुन्या तर्‍हेच्या सारंग्या व एक प्रकारची वीणा हीं त्यांचीं गीतवाद्यें आहेत.
    
विशिष्ट चालीरीती - प्रत्येक खेड्यांत वस्तीबाहेर एका बाजूस बाळंतिणी व विटाळशी बायकाकरितां एक जागा असतें.  जन्मल्याबरोबर मुलांची नांवें ठेवितात.  लग्न म्हणजे दलालामार्फत बायको विकत घेणें होय.  घटस्फोट म्हणजे बायकोला गुलाम म्हणून विकणें यांचे प्रेत संस्कार फार लांबलचक असतात व ते पुरूष असल्यास त्याच्या शौर्यावर व स्त्री असल्यास तिच्या घराण्याची संपत्ति व नांवारूपावर अवलंबून असतात.  येथील लोक प्रेतांनां पुरीत नाहींत; तर तीं लांकडी पेटींत घालून त्या पेट्या दूर एकीकडे जमा करून ठेवितात.  या लोकांची नीतिमत्ता फार हलक्या दर्जाची आहे.  यांच्यात रंगेलपणा फार असून व्यभिचार म्हणजे शिष्टाचार समजला जातो ! मात्र तो नवर्‍याच्या लक्षांत येतां कामा नये ! चोरी, मारामारी व इतर गुन्हे यांबद्दलच्या शिक्षा नुकसानभरपाईच्या तत्वावर बसविलेल्या आहेत.  न्यायाची कल्पना काफीर लोकांनां पूर्ण आहे.  शेतकीचीं कामें बायका करतात.  गुरें चारणें व दूधदुभतें करणें हे काफीर लोकांचे मुख्य धंदे आहेत.
    
इतिहास - काफिरिस्तानचा इतिहास प्रचारांत असलेल्या दंतकथांचा बनलेला आहे.  ज्याला मध्ययुगीन आशियाखंडांतील लोक बिलौर म्हणत असत अशा काश्मीर व काबूल यांच्या मधल्या लोकांच्या प्रदेशालाच सध्यां काफिरिस्तान म्हणतात, असें सर हेन्री यूल म्हणतो.  तैमूरच्या इतिहासांत काफीर लोकांच्या नांवाचा उल्लेख आहे.  अंदारब येथील लोकांच्या विनंतीवरून हिंदुस्थानच्या स्वारीवर जातांनां तैमूरनें या देशावर स्वारी केली होती.  काटूरच्या दर्‍याखोर्‍यांत त्यानें आपल्या स्वारीच्या स्मरणार्थ एक शिलालेख लिहविला.  या प्रदेशासंबंधी माहिती बाबरनें आपल्या स्मरणवहीत दिली आहे.  ऐने-इ-अकबरींत या लोकांचा एखाद-दुसरा उल्लेख सांपडतो.  सर जॉर्ज रॉबर्टसन या लोकांत जाऊन राहिल्यानंतर १८९२ मध्यें त्याच्याबरोबर कांही काफीरलोक हिंदुस्थानांत आले व यानंतर या लोकांशी बरेंच दळणवळण सुरू झालें.  अखेरीस १८९५ मध्यें हिंदुस्थानसरकार व काबूलचा अमीर यांच्यामधील तहान्वयें हा प्रदेश काबूलचा अमीर अबदूल रहमान याच्या नामधारी सत्तेखालीं आला.

(रॉबर्टसन-दि काफीर्स ऑफ दि हिंदुकुश, बेल्यू-अफगाणिस्तान अॅड दि अफगाण्स; मॅकमोहन दि सदर्न बॉर्डर्स ऑफ अफगाणिस्तान; टेट-नॉर्दन अफगाणिस्तान).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .