प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य    

कापूस
- या झाडास लॅटिनमध्यें गॉसिपिअम, इंग्रजीत कॉटन, संस्कृतांत कार्पास, मराठींत कापूस, गुजराथींत कपास, हिदींत कपाशी इत्यादि नांवें आहेत.
    
खाण्याच्या धान्याच्या खालोखाल महत्वाची पिकें तंतूचीं होत.  कारण अन्नानंतर मनुष्यप्राण्याला वस्त्रप्रावरणाची जरूरी आहे तंतुवर्गांत कापूस व ज्यूट हीं फार महत्वाची आहेत.  त्याच्या खालोखाल काथ्या, केकताड, ताग, अंबाडी, कागद करण्याचे तंतू, दोर्‍या वळण्याचे तंतू, हातर्‍या अगर चट्या विणण्याचे तंतू वगैरे होत. प्राण्यांपासून होणार्‍या तंतूंत रेशीम, लोंकर व केंस मोडतात.  सर्वांमध्ये कापसाची वस्त्रें जास्त वापरलीं जातात व कापसाचें पीक सर्व उष्ण कटिबंधांत व समशीतोष्ण कटिबंधांतील कांही भाग मिळून विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ३०० ते ४० अंशांपर्यंत चांगले येतें.  म्हणून कापसाचें विशेष महत्व आहे.
    
याशिवाय हिंदुस्थानांतून निर्गंत होणार्‍या मालांत कापूस व कापड हे जिन्नस फार महत्वाचे आहेत.  महायुद्धापूर्वीच्या पांच वर्षांची सरासरी, मार्च सन १९१४ अखेर पाहिली तर कापूस व कापड यांची पंचेचाळीस कोटि व ताग व तागाचें कापड यांची बेचाळीस कोटि रुपये किंमतीची निर्गत होती.
    
हिंदुस्थानांत कापसाचें कापड विणण्याची पहिली गिरणी इ.स. १८१८ साली कलकत्ता येथें स्थापन झाली व वाफेनें चालणारी पहिली गिरणी मुंबई येथें सन १८५३ सालीं उभारली गेली.  सन १८८२ सालापासून हिंदुस्थानांत गिरण्यांची वाढ झपाट्यानें होऊं लागली.  गिरण्यांची ही वाढ कसकशी होत गेली याची कल्पना पुढील कोष्टकावरून स्पष्ट  होईल.

 वर्ष  गिरण्यांची संख्या  माग (हजार )  चात्या (लक्ष)
 १८७८  ५८  ९.१   १२.८९
 १८८८  ११४  १९.४  २४.८८
 १९१४  १७८  १०४.१  ६७.७८

सन १९१४ सालापासून महायुद्धास सुरूवात झाली.  या तीन वर्षांत चात्यांची संख्या साठ हजार व मागांची संख्या सहा हजारांपर्यंत वाढलेली आहे.  परंतु इंग्लंडांतील लोकसंख्या व तेथील चात्या व माग यांचें प्रमाण पाहिलें असतां, हिंदुस्थानांतील हा धंदा किती मागें आहे हें सहज दिसून येईल.  इंग्लंडांतील लोकसंख्येंत दर हजारीं ३१८.२ चात्या व १७.८ माग पडत असून हिंदुस्थानांत तें प्रमाण दरहजारीं २१.७ चात्या व ०.३५ माग इतके अल्प आहे.
    
मुंबई इलाख्यांत एकदंर २५७,००० सुती व २३,००० रेशमी कापड विणणारे कोष्टी आहेत.
    
इतिहास - वेदामध्ये आश्वलायन श्रौतसूत्रांत कापसाच्या वस्त्रांबद्दल उल्लेख आहे.  हिंदुस्थानांत फार प्राचीन कालापासून कापसाचा उपयोग माहीत आहे.  अगदी प्राचीनकाळीं, जेव्हांपासून वर्णव्यवस्था अस्तित्वांत आली तेव्हांपासून ब्राह्मणाचें यज्ञोपवीत कापसाचें असावें असा नियम रूढ आहे.  यावरून हिंदुस्थानांत सर्व ठिकाणीं कापसाची लागवड होती असें दिसतें.  ख्रिस्ती शकापूर्वी ४५० या वर्षी हिरोडोटस नांवाचा ग्रीक प्रवासी आला होता, त्यानें ''हिंदुस्थानांत कांही झाडें आहेत, त्यांच्या फळांस लोंकर येते'' असें नमूद केलें आहे.  इसवी सन १५० त अरिअन यानें 'अरब लोक पात्याळा, भडोच वगैरे ठिकाणांतून कापूस तांबड्या समुद्राच्या मार्गानें अदोलीपावेतों नेत असत व त्याप्रमाणेंच मच्छलीपट्टणांत रंगविलेल्या कपड्याचा पुष्कळ व्यापार चालतो' असें म्हटलें आहे.
    
शिकंदर बादशहाच्याबरोबर आलेल्या लोकांकडून ग्रीक लोकांना कापसाच्या झाडासंबंधीं माहिती मिळाली.  अति प्राचीन लेखकांनी लेप, गाद्या, वगैरेंकडे कापसाचा उपयोग होतो असा उल्लेख आहे.  परंतु कापूस कातणें व कापड विणणें यासंबंधी त्यांनी मौन धारण केले आहे.  हिंदुस्थानांतील विणकामासंबंधी उल्लेख करणारा पहिला यूरोपीय लेखक क्टेसिअस हा आहे.  अरिअनच्या ''इंडिका'' ग्रंथांत (इ.स.१५८) त्यानें हिंदुस्थानचा कापूस इतर देशांतील कापसापेक्षां जास्त पांढरा व चकचकीत असतो असें लिहिलें आहे.  यानंतर अरबी ग्रंथकार व मार्कोपोलो वगैरे प्रवाशांच्या ग्रंथांत कापूस व त्याच्या वस्त्रांचा उल्लेख बराच आढळतो.  
    
ईजिप्‍तमध्यें प्राचीन ग्रंथांत किंवा चित्रांत कापसाचा उल्लेख कोठेंच आढळत नाही.  यावरून ईजिप्‍तमध्यें कापूस बाहेरून येत असावा.  परंतु ईजिप्‍त व हिंदुस्थानांतील कापसाच्या झाडासंबंधी बहुवर्षजीवि असा उल्लेख आढळतो, तेव्हां वर्षजीवि झाडें अरबस्तानांतील असावींत व अरबांनींच त्यांचा प्रसार आपल्याबरोबर सिसली, मेसापोटेमिया वगैरे ठिकाणीं केला असावा.  अमेरिकेचा शोध लागला त्यावेळी तेथील रानटी लोकांत लागवड केलेल्या कापसाचीं वस्त्रें विणण्याची कला आढळून आली.  पुढें अमेरिकेमध्ये प्रथम व्हर्जिनियांत कापसाची पद्धतशीर लागवड करण्यास सुरूवात होऊन तींत वरचेवर वाढ व सुधारणा होत गेली.
    
हिंदुस्थानांतून येणार्‍या सुती कापडाविरूद्ध इंग्लंडच्या लोकांनी ओरड सुरू केली, तेव्हां १८ व्या शतकाच्या आरंभी ब्रिटिश पार्लमेंटनें हिंदुस्थानचा चिटाचा व्यापार दडपून टाकण्याकरितां कायदे केले. इ.स. १७८२ मध्यें इंग्लंडांत प्रथमतः मलमल करण्यास आरंभ झाला व तेव्हांपासून दक्षिण अमेरिकेंतून कापूस येण्यास सुरूवात झाली.
    
त्यापैकी १,००,००,००० पौंड ग्रेटब्रिटन घेत असे. तेथें एकंदर ५४० लक्ष पौंड कापसाची आयात होत असे.  त्यांपैकी हिंदुस्थानांतून ६५ लक्ष पौंड जात असे.
    
इसवी सन १७८८ साली ईस्ट इंडिया कंपनीनें डाका येथील व्यापारी मुखत्यार याजकडे तेथील कापसासंबंधी रिपोर्ट मागविला.  ते मुखत्यार म्हणतात कीं, 'सर्व जगांत उत्तम असा कापूस येथेंच होतो.' त्याचा तलम कपडा बनतो.  हें झाड बहुवर्षायु आहे व हा कापूस डाकाच्या वायव्येकडील जिल्ह्यांत गंगेच्या कांठी व तिच्या फांट्यावर पिकतो.  त्याला बैराटी कापूस असें म्हणतात.  या कापसाचे तंतू मजबूत, रेशमासारखे नरम व मऊ असतात.  याची मलमल करतात. इ.स. १७९८ सालीं रासबर्ग लिहितो की, 'डाका येथील कापसाच्या झाडांचा, पानांचा व फुलांचा रंग तांबूस असतो'.
    
डाकाची मलमल ग्रीक लोकांनां 'गंगेतिका' या नांवानें माहीत होती.  यावरून कापसाचें सूत काढून कापड तयार करण्याची कला सुमारे २००० वर्षांपासून हिंदुस्थानास अवगत आहे असें म्हणण्यांस हरकत नाही.  इंग्लंडांत कापड विणण्याची कला १७ व्या शतकांत सुरू झाली; व इ.स. १७२१ सालीं मँचेस्टरकरिता हिंदुस्थानातून 'कालिको' चें कापड आणण्याच्या बंदीबद्दल कायदा पसार करण्यांत आला.  इ.स.१७८४ सालीं अमेरिकेंतून पहिल्यानें लिव्हरपूल येथें थोडा कापूस आला व त्यानंतर कापसाच्या व्यापाराची दिशा बदलली.  तेव्हा पासून हलके हलके ज्या हिंदुस्थानांतून पाश्चात्य देशांत कापड जात असे, तेंच हिंदुस्थान आपल्याला लागणार्‍या कापडाकरिता यूरोपवर अवलंबून राहू लागले.  याचे कारण यूरोपखंडांत विद्या व कला यांची वाढ होऊन यंत्राच्या व वाफेच्या सहाय्यानें बहुतेक माल तयार होऊं लागला हे होय.  त्याचा परिणाम असा झाला की, इकडील हातमागांचा धंदा बसला व बर्‍याच कोष्टयांना आपला धंदा सोडून शेतीकडे वळावें लागलें किंवा नोकरीसाठी बाहेरदेशीं रस्ता धरणें भाग पडलें.
    
बियाण्यांतील सुधारणा - जगांतील लागवडीत असलेल्या कापसाच्या जाती आशिया, आफ्रिका व अमेरिका या ठिकाणी होतात.  पहिल्या दोन ठिकाणीं होणार्‍या कापसाला सूक्ष्मतंत्वावरण असलेल्या सरकीचा एशियाटिक कापूस व दुसर्‍या कापसाला सूक्ष्मतंत्वावरणरहित सरकीचा कापूस असे यांचे दोन वर्ग करण्यांत यावे असें कांही लोक प्रतिपादितात.  परंतु आशियांतील कापसाच्या सर्व जाती सूक्ष्मतंत्वावरण असलेल्या सरकीच्याच असतात व अमेरिकेंतील सर्व जाती सूक्ष्मतंत्वावरणरहित सरकीच्याच असतात असें नाही.  आशियांतील मूळच्या कापसाच्या कोणत्याहि जातीची सरकी सूक्ष्मतंत्वावरणरहित नसते.  आशियांतील कापसांत सूक्ष्मतंत्वावरण असलें तरी सरकीच्या कापसाच्या झाडांची पुष्पोपांगपर्णे खालीं जोडलेली असतात व अमेरिकेंतील सूक्ष्मतंत्वावरण असलेल्या सरकीच्या कापसाच्या जातीच्या झाडांची पुष्पोपांगपर्णे तशी जोडलेली नसतात.
    
सूक्ष्मतंत्वावरणरहित व सूक्ष्मतंत्वावरणसहित अशा कापसाच्या जातींचा संकंर होणें शक्य नाही असें कांही लोकांचे मत आहे.  परंतु त्या मतांत फारसे तथ्य नाहीं.  कापसाच्या जातींचा संकंर न होऊं देणें फार कठीण आहे असें एका वर्गांचें मत आहे, तर दुसरा वर्ग म्हणतो कीं असलें मिश्रण जरी सृष्टिनियमाविरुद्ध नाही तरी त्यापासून कांहीच तादृश फायदा नाहीं.  तोडॅरोसारखे कांही वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतात कीं, कापसाच्या ५४ पोटजाती आहेत, व पालटोरसारखे वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतात की, त्या फक्त सातच असून प्रत्येकीचे असंख्य प्रकार आहेत.  हल्लीं कापसाच्या वर्गीकरणाकरितां ज्या जाती निःसंशय वन्य आहेत त्या आधारभूत धरल्यामुळें वादास जागाच रहात नाही.
    
हिंदुस्थानांतील कापसाच्या जातींचा अभ्यास केल्यानंतर वॅटचें असें मत पडलें की, संकर हा एक कापसाची निपज सुधारण्यास महत्वाचा उपाय आहे.  कापसाच्या मूळ पांचच पोटजाती आहेत हें मत मात्र त्याला मान्य नाहीं.  अमेरिकेंतील तज्ज्ञांनी संकराच्या योगानें असंख्य प्रकार उत्पन्न केले असून संकराचा उपाय अतिशय महत्वाचा आहे असें त्यांचें मत आहे.
    
संकीर्ण जातीच्या झाडांचे गुणधर्म, ज्या दोन झाडांच्या मिश्रणापासून ती झाली असेल त्यांतील स्त्रीवनस्पतीप्रमाणें असतात व बोंडें व कापूस पूंवनस्पतीप्रमाणें असतात.  त्याचप्रमाणें कापसाच्या कोणत्याहि प्रकाराची प्रवृत्ति नेहमी मूळ नमुन्याकडे असते.  या व असल्या प्रकारच्या विचारावरूनच असें प्रतिपादण्यांत येतें की, संकरापासून सर्व प्रकारचा कापूस उत्पन्न करणें शक्य आहे.
    
कापसाकरितां साधारणतः योग्य अशी जमीन शोधण्याकरितां हिंदुस्थान सरकारच्या हुकुमानें बरेच प्रयत्‍न झाले. हिंदुस्थानांतील मूळ जातींच्या सुधारणेकडे अगदी अलीकडील कालापर्यंत दुर्लक्ष केलें होतें.  हिंदुस्थानच्या कापसाच्या प्रगतीकरितां सर्व जगांत अस्तित्वांत असलेल्या कापसाच्या जातींचा शास्त्रीय दृष्ट्या शोध लावणें अवश्य आहे अशी वॅटची शिफारस आहे.  संकीर्ण जाती उत्पन्न करण्याचा फायदा शास्त्रीय दृष्ट्या घेऊन प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म निश्चित करून प्रत्येक प्रदेशांत योग्य जातीची लागवड होणें अवश्य आहे.
    
सरकी काढण्याच्या कामी बाष्पयंत्रांचा हिंदुस्थानांत प्रसार झाल्यामुळें येथील कापसाला एक नवीनच विघ्न उपस्थित झालें.  कारण अशा ठिकाणीं निरनिराळ्या जातींचा कापूस येतो व तो वटवून जी सरकी निघते तीच शेतकरीवर्ग जातीचा अगर आपल्या शेतांत त्याचें चांगले पीक येईल किंवा नाही या गोष्टींचा विचार न करितां, आपल्या शेतांत पेरतो.  अज्ञान, दारिद्रय व कर्जबाजारीपणा या गोष्टीमुळें शेतकरीवर्ग आपला स्वतःचा सरकीचा सांठा ठेवूं शकत नाही.  संयुक्त संस्थानांतील लांब धाग्याच्या कापसाचा कपडा तयार करण्याच्या अनुरोधानें इंग्लंडनें आपली यंत्रसामुग्री सुधारल्यामुळें हिंदुस्थानच्या लहान धाग्याच्या कापसाचा खप तेथें होत नसे; परंतु जर्मनी, जपान व हिंदुस्थान येथें हलक्या प्रतीचा माल तयार करणार्‍या गिरण्या स्थापण्यांत आल्या व शेतकरीवर्गाला असें सांगण्यांत आलें की, त्यांनां लांब धाग्याच्या कापसाला जास्त किंमत मिळणार नाहीं.  यापूर्वी लांब धाग्याच्या कापसाचें पीक थोडें येई, त्याची भरपाई जास्त किंमतीमुळें होत असे; परंतु आता ती आशा नष्ट झाल्यामुळें सर्व देशभर हलक्या प्रतीच्या कापसाचें पीक काढतात.  हें अरिष्ट दूर करण्यास कमीत कमी एक शतक तरी लागेल.
    
मध्यप्रांत व वर्‍हाड येथील वेलाति अथवा जरी जातीच्या कापसाबद्दल एका युरोपांतील व्यापार्‍यानें असें लिहिलें आहे कीं (१) याचें पीक लवकर येतें, यामुळें शेतकर्‍यांनां लवकर मोबदला मिळतो; (२) त्याला अकाली थंडीपासून भीति नसते; . (३) या झाडांनां रोग होत नाहीं व पावसामुळें नुकसान होत नाहीं.  (४) यापासून अधिक वजनाचा बिनसरकीचा कापूस निघतो व (५) बाजारांत या जातीचा कापूस इतर जातींपेक्षा स्वच्छ स्थितीत येतो.
    
अगदी पूर्वी शेतकीत सर्वसाधारण सुधारणा करण्याचे प्रयत्‍न न करतां एखाद्या विवक्षित पिकाच्याच सुधारणेकडे जास्त लक्ष देण्यांत येत असे. असें असल्यामुळें स्वाभाविकच कापसाच्या सुधारणेकडे जास्त लक्ष देण्यांत आलें.  या सुधारणेला तीन दिशांनीं सुरूवात झाली.
    
पहिली :- परदेशी लांब धाग्याच्या कापसाचें बी आणून तें शेतकर्‍यांत वांटणें. उदाहरणार्थ अमेरिकन कापूस (अपलॅन्ड, न्यू ऑर्लिअन्स व बोरबोन) व इजिप्शिअन (मिसर देशांतील) कापूस.   
दुसरी :- कापसाच्या लोडणीसाठी सॉ जिन्स (करवती चरक) व रोलर जिन्स (रुळाचा चरक) वापरणें.   
तिसरीः- निर्भेळ बियांचा प्रसार.
    
सन १७८३ सालापासून हिंदुस्थानांतील कापूस कमीजास्त प्रमाणानें विलायतेला जात आहे, परंतु १८०३ सालीं जेव्हां अमेरिकन कापसाला जास्त भाव मागूं लागले तेव्हापासून येथें त्याच्या सुधारणेकडे जास्त लक्ष जाऊं लागले.  बोरबोन कापसाचे प्रयोग खेडाजिल्हा, मालवण, रत्‍नागिरी, करंजें, (कुलाबा जिल्हा) व साष्टी येथें करण्यांत आले.  पण कोंकणपट्टींतील हे प्रयोग लवकरच बंद करण्यांत आले.  हल्ली बोरबोन कापसाचें जें झाड कोठें कोठें परड्यांत आढळतें (ज्याला देवकापूस म्हणतात) तें यापैकींच होय.  मद्रास इलाख्यांत कोईमतूर जिल्ह्यांत बोरबोन कापसाची लागवड थोड्या प्रमाणावर राहिली आहे.  स. १८२९ सालीं भडोच व धारवाड येथें प्रयोगाचीं क्षेत्रे स्थापन झालीं.  अमेरिकेंतून बीं आणून तें मोफत किंवा माफक दरानें देण्यांत आलें.  ज्यांचीं उत्तम पिकें आलीं त्यांस बक्षिसें देण्यांत आली.  इ.स.१८३३ साली धारवाडास गठ्ठे बांधण्याकरितां वखारी काढल्या.  खानदेशांत १८४५ सालीं कापसाचे प्रयोग सुरू केले.  त्याचप्रमाणें सोलापूर, सातारा, बेळगांव, विजापूर, खेडा, सुरत, अहमदाबाद वगैरे जिल्ह्यांत कापसाच्या सुधारणेसंबंधीं नवे नवे प्रयोग करण्यांत आले.  पैकीं एका फक्त अमेरिकन कापसाची लागवड धारवाड जिल्ह्यांतील कांही भागांत सफल झाल्यामुळें ती मात्र अद्याप टिकून राहिली आहे.  यापैकीं खानदेश व मध्यप्रांतांतील अमेरिकन कापसाच्या लागवडीच्या प्रयोगांतील अवशिष्ट झाडें अद्यापि कांही कांही ठिकाणी वर्‍हाडी कापसाबरोबर मिश्र झलेलीं आढळतात.
    
धारवाडी कापूस लोडण्यास सॉ जिन्सच्या गिरण्या काढिल्या व त्या अद्यापि कोठें कोठें आहेत. इ.सन १८२९, १८६३ व १८७८ या सालीं कापसाच्या भेसळीसंबंधानें कायदे करण्यांत आले पण ते सर्व इ.स. १८८२ सालीं रद्द झाले.
    
अमेरिकेंत (इ.स. १८६२-६६) जेव्हां यादवी युद्ध सुरू झालें व अमेरिकेंत कापसाचा दुष्काळ पडला, त्यावेळीं इ.स. १८६३ साली मुंबई इलाख्यांत कापसाकरितां स्वतंत्र कमिशनर नेमण्यांत आला व दुसर्‍या वर्षी (१८६४) वर्‍हाड व मध्यप्रांत यांतहि कमिशनरची नेमणूक झाली.  सन १८६३ चा नववा कॉटन फ्रॉड्स (कापसांतील लबाडी) चा कायदा पसार करण्यांत आला.  या कायद्यानें मुळींच फायदा झाला नाहीं. इ.स. १८७८ सालीं वरील कायद्यांत सुधारणा होऊन पुन्हां हा कायदा सुरू करण्यांत आला.  मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत बनी अगर हिंगणघाट या जातीच्या कापसीचें निवडक बीं कमिशनरांनी वर्‍हाड, नेमाड, जबलपूर आणि छत्तीसगड या जिल्ह्यांत व इतर प्रांतांत वाटले.  सन १८६७ सालीं तर ८५५ टन बीं वांटण्यांत आले.  यावेळींच अमेरिकन कापसाचें बीं वाटण्यांत आलें.परंतु हे दोन्ही तर्‍हेचे प्रयत्‍न निष्फळ झाले.  या वेळीं कॉटन-कमिशनरनीं कापसाची नेआण करण्याच्या सोईसाठी वर्‍हाडांत आगगाडीचे रस्ते बांधण्याबद्दल केलेले प्रयत्‍न, कापूस सांठविण्याकरितां व विक्रीकरितां नवीन उघडलेलीं मार्केटे व सरकी काढण्याची यंत्रे काढिली.  त्यांपैकी गठ्ठे बांधण्याच्या गिरण्या तेवढ्या फायदेशीर होऊन कापसाच्या सुधारणेचें पाऊल १८६७ नंतर पांच वर्षांनी पूर्वस्थितीवर आलें.
    
वर नमूद केलेल्या यादवी युद्धाचा असा परिणाम झाला कीं, हिंदुस्थानांतून कापसाची निर्गत अतोनात वाढली.  इ.स. १८६९ अखेर पुर्‍या झालेल्या दहा वर्षांची सरासरीनें ग्रेट ब्रिटनची एकंदर आयात २७३६६६१ गठ्ठे (प्रत्येक गठ्ठा ४०० पौंड) होती.  त्यापैकी १८४७७५९ गठ्ठे हिंदुस्थानांतून रवाना झाले. पुढें पुढें १९ व्या शतकाच्या शेवटीं हिंदुस्थानांतून कापूस पाठविण्याच्या ऐवजीं तें उलटपक्षी सुमारें २,००,००,००० पौंडांचे कापड घेणारें गिर्‍हाईक बनलें.
    
या एकंदर हकिगतीवरून असें स्पष्ट दिसतें कीं, कापसाच्या सुधारणेसंबंधानें सुमारें सन १९०० सालापावेतों जे प्रयत्‍न करण्यांत आले ते सर्व कापूस पिकणार्‍या भागांत लांब धाग्याच्या कापसाचें उत्पन्न व्हावें म्हणून करण्यांत आले.  हवामान व तेथें होणार्‍या कपाशीच्या जाती वगैरेसंबंधी पूर्वी जितका विचार व्हावयास पाहिजे होता तितका झालेला दिसत नाही.  इ.सन १९०० सालापासून कापसांत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्‍न पद्धतशीर चालले आहेत व त्यांचे फळहि कोठें कोठें दृष्टीस पडूं लागलें आहे.  उदाहरणार्थ, सिंधमध्यें कालव्याखालीं होणारा अमेरिकन अपलंड जातीचा कापूस, भडोच व सुरत येथें भडोची बियांची निवड करून सुधारलेला कापूस, धारवाड जिल्ह्यांत कुमठा कापसांत सुधारणा व भडोची कापसाचा प्रसार, गदगभागांत (जिल्हा धारवाड) कांबोडिया वगैरे. ही वर दिलेली उदाहरणें फक्त सरकारी प्रयोगशाळेंत झालेलीं नसून मोठ्या प्रमाणांत शेतकर्‍यांच्या शेतांत झालेलीं आहेत.  परंतु एकंदरीत हिंदुस्थानांत मोठ्या प्रमाणात होणार्‍या कापसाचें क्षेत्र म्हटलें म्हणजे आंखूड धाग्याचेंच होय.  खानदेशांतील कापसांत पुष्कळ भेसळ असते, व या जातीचा कापूस जेथें जेथें होतो तेथें तेथें त्यात अशीच भेसळ सापडते.  या भेसळीतील निरनिराळ्या जाती वेगवेगळ्या तपासून कांही वर्षांच्या प्रयोगाअंती असें ठरलें आहे कीं, ज्या झाडांचीं फुलें पांढरी असून पानें लांब बोटासारखीं चिरलेली असतात त्या झाडांच्या कापसाचें उत्पन्न जास्त येतें.  पण त्याचा धागा आंखूड असून खरबरीत असतो.  मध्यप्रांतांत इ.स. १९०४ सालीं केलेले प्रयत्‍न निष्फळ झाले.  पुन्हां शेतकी खात्याकडून १९०६ सालीं जरी (देशी) नामक कापसांतील पोटजाती वेगवेगळ्या करून त्यांची निरनिराळी लागवड पांच वर्षे करून शेतकर्‍याला फायदेशीर जात रोझिया असा निर्णय ठरविण्यांत आला.  पोटजातींचा तपशील खालीं दिला आहे.  

 कापसाचें सरासरी दरएकरी उत्पन्न
 जात  कच्चा कापूस   पक्का कापूस   सरकी  किंमत X
 पौंड  पौंड  पौंड  रु.  आ.
 गॉसिपियम निग्लेटक्म (मालव्हेन्सीस)  ३७३  ११२  २६१  ५७-५
 गॉसिपियम निग्लेटक्म (व्हेरा)   ३४३  ११५  २२८  ५१-११
 रोझिया  ४०२  १६१  २४१  ६९-१४
 रोझिया कच्छिका  ४१२  १५०  २६२  ६६-०
 वर्‍हाड जरी  ३७१  १३२  २३९  ५८-५
 भुरी (अमेरिकन टाइप)   ३०३  १००  २०३  ५७-१५
 बनी  २५५  ७४  १८१  ४४-३
  X ही किंमत सन १९११ ची असून ती सरकी व कापूस यांची मिळून आहे.

याशिवाय कापसांत तीन तऱ्हांनी अंतर्गत सुधारणा करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.  पहिला-धाग्याची लांबी वाढविण्याविषयीं; दुसरा-उत्पन्न वाढविणें, व तिसरा, रुईचे प्रमाण वाढविणें.
    
शेतकर्‍याच्या फायद्याच्या दृष्टीनें विचार केला असतां, दर एकरीं कापसाचें उत्पन्न व रुईचें प्रमाण जास्त पडणें हें महत्वाचे आहे.  आखूड धाग्याच्या जातीचें उत्पन्न जास्त येऊन रुईचें प्रमाण जास्त पडतें.  या कापसाचें झाड कणखर असून तें हवापाण्याच्या फेरफारांनां फारशी दाद देत नाही.  म्हणूनच शेतकरी ही जात अधिक पसंत करतात.  याकरितां मध्यप्रांत, संयुक्तप्रांतांतील पश्चिमभाग, खानदेश जिल्हा, अहमदनगर, सोलापूर वगैरे मुंबई इलाख्यांतील जिल्ह्यांत पांढर्‍या फुलाचें व चिरक्या पानांच्या जातीचें उत्पन्न लांब धाग्याच्या जातीपेक्षां जास्त येत असून, रुईचें प्रमाणहि जास्त येतें, म्हणून याचा प्रसार जारीनें करण्याचे प्रयत्‍न शेतकी खात्याकडून चालू आहेत.  वर्‍हाडांतील सुमारे एकतृतीयांश क्षेत्र या निवडलेल्या सरकीनें पेरलें जातें; व खानदेशांत दरसाल सरासरी ३०,००० एकर क्षेत्रांत या जातीची लागवड होते.  ब्रह्मदेशांत आखूंड धाग्याचाच कापूस चांगला होतो.  सरकारी क्षेत्रांत बियांची निवड करून तें शेतकर्‍यास देण्याचा क्रम चालू आहे.  त्याप्रमाणेंच भडोच जातीच्या कपाशीचा कर्नाटकांत बराच प्रसार होत आहे.  मुंबई इलाख्यात गुजराथ  व कर्नाटक, मद्रास इलाख्यांत तिनेवेल्ली व निझामच्या राज्यांत कांही ठिकाणीं लांब धाग्याचा कापूस पैदा होतो.  सिंध प्रांतांत, पंजाबांतील नव्या वसाहतींत, संयुक्त प्रांतापैकी काहीं भागात व त्याप्रमाणेंच मुंबई व मद्रासपैकी कांही भागांत परदेशी कापसाचा फैलाव वाढत आहे.  सिंधमधील अनुभवानें असें ठरलें आहे कीं, ट्रएम्प नांवाची अमेरिकन जात तेथें चांगली होते.  संयुक्त प्रांतांत अमेरिकन जातीच्या कापसाचा, पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी प्रसार होत आहे.  मुंबई व मद्रास या दोन इलाख्यात कॅम्बोडिआचा प्रसार होत आहे.  मद्रास इलाख्यांत याची लागवड सन १९०४ सालीं सुरू झाली.  सरासरीनें हिंदुस्थानांतील कापसाखालीं असलेल्या क्षेत्रापैकी निम्में क्षेत्र मुंबई इलाखा व वर्‍हाड प्रांत यांत असतें.  व बाकीचें क्षेत्र मध्यप्रांत, मद्रास इलाखा, निजामचें राज्य, संयुक्तप्रांत व पंजाब यांत वाटलेले असतें.  शिवाय बंगाल, आसाम, ब्रह्मदेश व सिंध यांतहि थोडथोडें क्षेत्र कापसाखालीं असतें.  एकंदरीत कापसाच्या लागवडीचें क्षेत्र वर्षानुवर्ष वाढत्या प्रमाणांत आहे.
    
मुंबई इलाख्यात कोंकणखेरीज कापसाची लागवड सर्वत्र होते.  गुजराथेंत पंचमहालखेरीज सर्व ठिकाणीं कापूस पिकतो.  खानदेश व कर्नाटक येथें कापसाची लागवड फार महत्वाची आहे.  हल्ली कापसाचा प्रसार नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यांत झपाट्यानें होत आहे.
    
वर्‍हाड(पेनघाट, उमरावती, अकोला, बुलढाणा) व मध्यप्रांत (नागपूर व नर्मदाप्रांत) यांत कापसाचें क्षेत्र विशेष असून, निझामच्या राज्यांत (मराठवाडा) औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, गुलबर्गा, बेदर वगैरे ठिकाणी कापसाची बरीच लागवड होते.
    
क्षेत्र व उत्पन्न - इसवी सन १९१४-१५ सालीं ब्रिटीशहिंदुस्थानांत १,५२,२२,००० एकर क्षेत्र कापसाखाली होते.  यापैकी शेकडा ३१ मध्यप्रांत व वर्‍हाड, २८ मुंबई, १४ मद्रास, ११ पंजाब व १० संयुक्तप्रांतांत होतें.

 प्रांत  वर्ष  एकर   गठ्ठे
     (गठ्ठा व. ४०० पौंड)
 मुंबई  १९१५-१६  ५००५०००  १०५१०००
 संस्थानांसहित  १९१६-१७  ६३९४०००  १५१९०००
 मध्यंप्रांत  १९१५-१६  ४०६१०००  ११०६०००
 व वर्‍हाड  १९१६-१७  ४४०१०००  ६०००००
 निजाम   १९१५-१६  २९६४०००  ४५००००
 हैद्राबाद  १९१६-१७   ३२०००००  ५०००००

सर्व हिंदुस्थानांत कांही विवक्षित भागांखेरीज हलक्या दर्जाचा, खरबरीत व आंखूड धाग्याचा कापूस पिकतो.  
    
निरनिराळ्या ठिकाणची गठ्ठे बांधण्यासंबंधी मि. रॉबर्ट (प्रिन्सी. लयालपूर, शेतकीकॉलेज) यांनी दिलेली माहिती :-

 देशाचें नाव
 गठ्ठे वजन पौंड
 माप इं.  घनफूट वजन पौं.
 बारदान वजन
 हिंदुस्थान  ४००  ४९ × २० × १७  ४२-८  ८
 इजिप्‍त  ७४०  ५२ × २१।। × ३२  ३५-८  २५
 अमेरिका   ५००  ५८ ×२९ × २२  २३-० २९

जगांतील कापसाचा पुरवठा व त्यांतील ब्रिटिश राज्याचा वांटा


ब्रिटिश कॉटन ग्रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष मि.जे. आर्थर हटनसाहेब यांनी ब्रिटिशराज्यांतील कापूस पिकणारी ठिकाणें व कापसाचें उत्पन्न वगैरेंबद्दल दिलेली उपयुक्त माहिती खालीलप्रमाणें आहे :-

 देशाचें नांव धा.व.  क्षेत्र चौरस मैल  लोकसंख्या  उप्‍तन्न गठ्ठे (गठ्ठा सुमारें ४०० पौंड).
 अत्युत्तम नरम वेस्टइंडीज  १२१४०  १७१८२१६  ४५००
 लांब धाग्याचा ईजिप्‍त  ३६३१८१  ११२८७३५९  १३६००००
 सूदन   ९८४५२०  ३००००००  १६०००
 उंगाडा मध्यम धागा   १२१४३७  २८९३४९४  ३२०००
 न्यासालँड व  ना.ई.ऱ्होडेशि.

 ३२९८०१  १८४७९०४   ५५००
 नायजिरिंआ हिंदुस्थान  ३३६०००  १७६११९४१   ३२०००
आंखूड धा.  १८०२६५७  ३१५१५६३९६  ४००००००
 एकंदर  ३९४९७३६  ३५३५१५३१०  ५४५००००

वरील आंकड्यावरून असें दिसते कीं सर्व ब्रिटिश राज्यांत पुरेसा कापूस पिकतो.  कारण एकंदर उत्पन्न ५५ लक्ष गठ्ठे असून लांकाशायरला फक्त ४० लक्ष गठ्ठे लागतात.  परंतु हिंदुस्थानच्या उत्पन्नापैकीं निम्में पीक हिंदुस्थानांतच खपते.
    
जगात देशपरत्वें कापसाच्या अनेक जाती आहेत.  त्यांपैकी कांही वर्षायु आहेत व कांही बहुवर्षायु आहेत.  परंतु कोणत्याहि कापसास पाणी वगैरे असल्यास त्याचें झाड पुष्कळ वर्षे टिकूं शकतें.  कित्येक वेळां त्याचीं मोठमोठीं १२ ते १५ फूट उंचीचीं झाडें होतात.  कांहींचीं झाडें हिरवीगार असतात, कांहीं तांबड्या रंगावर असतात व त्यांचे देंठ , पानें, फुलें व बोंडें हीं तांबड्या रंगावर असतात.  उदाहरणार्थ :- देवकापशी.  एकंदरीत वर्षायु कापशीचीच लागवड जास्त प्रमाणावर करतात. बहुवर्षायु झाडें देवळाजवळ अगर परड्यांत पुष्कळ आढळतात.  यांनांच देवकापूस म्हणण्याची चाल आहे.
    
कित्येकांचा कापूस खरबरीत व आंखूड धाग्याचा असतो.  (उदाहरणार्थ, वर्‍हाडी कापूस.) व कित्येकांचा नरम व लांब धाग्याचा असतो (उदाहरणार्थ भडोच कपाशी).  कित्येकांत कांही कापूस सरकीला चिकटून रहातो (उदाहरणार्थ धारवाड अमेरिकन वगैरे.).
    
शिवाय कापसामध्ये लवकर व उशिरां निघणार्‍या जाती असे दोन भेद करतां येतील.  पहिली ८।९ महिने लागणार्‍या लांब धाग्याची जाती.  दुसरी सुमारें ४।५ महिने लागणार्‍या आंखूड धाग्याच्या जाती.  अधिक महिने लागणार्‍या जातींची लागवड काळ्या, खोल, ओलावा धरून ठेवणार्‍या अगर पाऊसकाळ बरेच महिने असणार्‍या ठिकाणीं करतात.  कापूस फेब्रुवारी-मार्च महिन्यांत तयार होतो.  उदाहरणार्थ :- भडोच, सुरत, वगैरे (गुजराथ;), धारवाड, बेळगांव (कर्नाटक;), तिनेवेल्ली वगैरे (मद्रास).  या जातीचा कापूस लांब धाग्याचा, मजबूत व नरम असा असतो.  रुवाचें प्रमाण शेंकडा ३२-३७ पर्यंत भडोची कापसाचें असून अगदीं कमी मद्रासेकडील तिनेवेल्ली व कर्नाटकांतील कुमठा येथील कापसांत तें शेकडा २५ असतें.  या जातीचीं झाडें कमी उंच व गेंदेदार असतात.  यांचें सूत ३०ते ४० काउंट (नंबरी) पर्यंत निघतें.
    
लवकर होणार्‍या कापसाच्या जाती अनेक आहेत.  त्यांत पुष्कळ पोटजातींची भेसळ असते.  या सर्व जातींचा कापूस हिंगणघाट अगर बनी खेरीज करून आंखूड, खरबरीत पण जास्त पांढर्‍या रंगावर असतो.  हा कापूस नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारींत तयार होतो.  या कापसाचा उपयोग निमलोंकरी कपडा तयार करण्याच्या कार्मी फार होतो; म्हणून याला जपानांतून व यूरोपांतील राष्ट्रांतून जास्त मागणी असते.  या जातींत रुवाचें प्रमाण शेंकडा तीस ते पंचेचाळीसपर्यंत असतें.  या जातीची झाडें उंच असून फांद्या थोड्या असतात.  या जाती कमी पावसाच्या प्रदेशांत चांगल्या होतात; व सर्वसाधारणरीत्या पाऊस बेतशीर पडल्यास यांचे उत्पन्न चांगलें येतें.
    
कापसाच्या जाती - सर्व जगांत उत्तम कापूस म्हटला तर सीआयलंड होय.  दुसरा इजिप्शियन, तिसरा अमेरिकन, चवथा भडोच व कुमठा व पांचवा वर्‍हाडी वगैरे.  हिंदुस्थानांतील कापसाच्या जातीचें खालीं दिल्याप्रमाणें वर्ग करण्यांत येतात : -
    
(१) लाल झाडांचा वर्ग :- या जातीचीं झाडें उंच वाढणारी, निमुळत्या फाद्यांचीं व लाल किंवा पिंवळ्या फुलांची असून झाडास कापूस थोडा येऊन रूवाचें प्रमाणहि थोडें असतें.  उदाहरणार्थ :- लाल नवसरी, रोझी, बगरसिया, बगरसफेद (पंजाब) (२) भडोची (डेरेदार झाडांचा) वर्ग :- या जातीचीं झाडें तीन चार फूट उंच वाढतात व त्यांच्या फांद्या खालपासून वरपर्यंत झाडास आच्छादून टाकितात.  पानांचा रंग पिंवळसर हिरवा असतो.  पान जाड व नरम असतें व कापूस नरम असून त्याची लांबी एक इंचपर्यंत असते.  रुवाचें प्रमाण अजमासें शेंकडा ३३ असतें.  उदाहरणार्थः- भडोच, घोगारी, बागड, कुमठा (मुंबई), जेटी (बंगाल) ज्वारीहत्ति, उप्पम तिन्नेवेल्ली, (मद्रास) (३) बनीवर्ग : - या जातीची झाडें सहा सात फूट उंच वाढवतात व खालील फांद्या लहान असून मध्यें लांबट व शेंड्यास आंखूड अशा असतात.  याचीं फुलें पिंवळी असून पानें साधारण रुंद, पातळ व दाट हिरव्या रंगाची असतात.  याचीं बोंडें लांबट, त्रिकोनी आणि अणकुचीदार असून आंतील कापूर नरम व सुमारें एक इंच लांब असतो.  परंतु रुवाचें प्रमाण शेंकडा २५ असतें.  झाडावर बरीच पाने लहान व बिनकात्र्याची अशीं असतात.  उदाहरणार्थः- बनी, (हिंगणघाट), नेमाडी, चांदा, करकेली वगैरे.  (४) जरी वर्गः- या जातीचीं झाडें वरीलप्रमाणेंच असून फक्त त्यांचीं पानें बोटासारखीं चिरलेलीं असतात.  यांचीं फुलें पिंवळी असून बोटासारखीं चिरलेली असतात.  यांची फुलें पिंवळी असून बोंडांतील कापूस साधारण खरखरीत, सुमारे ३ / ८ इंच लांब व रुवाचें प्रमाण शेकडा ३३-३४ असतें.  उदाहरणार्थः- जरी, माठियो, काटी, विलायती, हिरबाणी वगैरे. (५) वर्‍हाडी वर्ग :- या जातीचीं झाडें वरीलप्रमाणेंच असतात.  फुलें मात्र पांढरी असून कापूस खरखरीत व सुमारें १ / २ इंच लांब असतो.  रुवाचें प्रमाण शेंकडा ३७ ते ४० असतें.  उदाहरणार्थः- वर्‍हाडी वगैरे. (६) कोमिला-वर्ग :- या वर्गांतील झाडें बरींच लहान असून पानें फारच चिमटलेली असतात.  ही जात आसाम, ब्रह्मदेश वगैरे ज्या प्रांतांत पाऊस फार पडतो अशा ठिकाणीं होते.  या जातीची बोंडें लांबट व अणकुचीदार असून आंतील कापूस लोकंरीप्रमाणें खरखरीत व फार आंखूड धाग्याचा असतो.  रुवाचें प्रमाण शेंकडा ४५ पर्यंत असतें.  उदाः- कील, कोमिला, गारोहिल, खुनसा, खोंखेचिकाओ वगैरे. (७) अमेरिकन वर्ग :- या जातीचीं झाडें ठेंगणी व रूंद पानाचीं असून फुलें पांढरवट पिंवळीं असतात व त्यांवर लाल रंगाचा ठिपका नसतो.  फुलांवरील वेष्टण करवतीदार असून त्याचीं टोके बोंडांवर एकमेकांत वेष्टण करतात.  बोंडें गोल आकाराची असून कापूस मऊ व सुमारें एक इंच लांब असतो.  रूवाचें प्रमाण शेंकडा सुमारें ३३ ते ३६ पर्यंत असतें.  सरकीचा रंग काळा व हिरवट असून ती मोठी असते, व तिला बारीक कापूस चिकटलेला असतो.  उदाहरणार्थ :- धारवाड, अमेरिकन, कांबोडियाबुरी, अपलंड जॉर्जिअन आणि खाकी (लायलपूर).
    
गॉसीपीयम हर्बेसिअम या नांवाची जात उत्तर अरबस्तान व आशियामायनर येथील असून वन्यस्थितीत कोठेंच आढळत नाही.  सिसिली माल्टापासून ग्रीस, मेसापोटेमिया, इराण ते वायव्येकडील प्रांत वगैरे ठिकाणीं ही जात आढळते.  बहुतेक समशीतोष्ण कटिबंधांतील उष्ण प्रदेशांत ही जात सापडते असें.  म्हणण्यास हरकत नाही.  अमेरिकेंतील लहान धाग्याच्या कापसासारखा कापूस या जातीपासून निघतो.  कापसाची ही जात लेव्हाँटमधून युरोपखंडांत व तेथून अमेरिकेंत गेलीं आहे.
    
गॉसीपीअम अर्बोरीयम अथवा देवकापूसः- याचें झाड लहान असतें.  तें मूळचें आफ्रिकाखंडांतलें आहे असें म्हणतात.  परंतु वनस्पतिशास्त्रज्ञांनां तें अद्याप मूळचें कोणत्या देशांतील असावें हें समजलें नाहीं. ईजिप्‍त, आफ्रिका, अरबस्तान व हिंदुस्थान येथें हीं झाडें देवळांजवळच्या बगिच्यांतून आढळतात.  चीन, जावा, जपान आणि मलाया येथेंहि ती वाढतात.  माकासर येथें ती विपुल आहेत.
    
हिंदुस्थानांतील दंतकथांवरून हाच कापूस यज्ञोपवीत तयार करण्याला उपयोगांत आणला पाहिजे असें दिसतें; व इजिप्शियन धर्मोपाध्याय याच कापसाचा उपयोग धार्मिक कृत्यांकडे करीत असावेत असें वाटतें.
    
हिंदुस्थानांत देवकापसाची लागवड इतर जातींच्यापेक्षां प्राचीन नसली तरी ती निदान त्याच्याइतकी प्राचीन खास आहे.
    
तांबड्या फुलांचा कापूस :- या झाडांनां लाल फुलें येतात.  हिंदुस्थानांत या जातीचीं झाडें क्वचित आढळतात. तीं आफ्रिकेंत बरीच आहेत.  एके काली या जातीचीं झाडें हिंदुस्थानांत सर्वत्र होतीं.  हल्ली ती अयोध्याप्रांतांत सांपडतात.
    
बंगाल्यांत बेलाति, विलायति, खानदेश, कटेली मठी, जरी वगैरे जातींचा कापूस होतो.
    
चिनी कापूस - ह्या जातीची झाडें बहुवर्षजीवि आथवा वर्षजीवि असून त्यांच्या फांद्या नाजुक व जांभळ्या रंगाच्या असतात. चीन, जपान, मलाया, सयाम, ब्रह्मदेश, हिंदुस्थान, वायव्य - हिमालय, इराण, मध्य-आशिया, उत्तर-ईजिप्‍त व आफ्रिका या ठिकाणी या जातीची लागवड बरीच होते.
    
वतनी कापूस :- या जातीची झाडें लहान असून ती वर्षजीवि अथवा द्विवर्षजीवि असतात.  त्यांनां पिवळी फुलें येतात.  हिमालयाच्या भागांत व हिंदुस्थानांतील उंचवट्याच्या प्रदेशांत याच जातीची लागवड करतात.  याला बगर अथवा वतनी कापूस म्हणतात.  हिंदुस्थान व चीन येथें होणार्‍या या जातीच्या झाडांत फरक असतो.  चीन व जपान येथें होणारा कापूस धाग्याच्या बाबतींत सरस असतो.  हिंदुस्थानांत होणार्‍या झाडांची पानें मोठीं व रुंद असून त्यांचा खालचा भाग बदामी आकाराचा असतो व सर्व रोंपावर कुसें असतात.
    
कोकोनाडी कापूस :- हीं झाडें साधारणतः बहुवर्षजीवि असून झुडुपांसारखीं असतात; व त्यांच्या पानांचा रंग काळसर हिरवा व देंठाचा रंग गहिरा-तांबडा असतो. ब्रह्मदेशांतील वागले नांवाची बहुवर्षजीवि झाडें, वानि नांवाचा खाकी कापूस व बहुवर्षजीवि वाग्यि नांवाचा कापूस हे तिन्ही याच जातीचे.  परंतु निरनिराळ्या स्थितींतील आहेत.  या जातीच्या एका प्रकारची लागवड दक्षिण-हिंदुस्थानांत मोठ्या प्रमाणावर होते व ते त्याला नाद म्हणतात.  हा मद्रास इलाख्यांतील हलक्या प्रतीचा कापूस असून या झाडांचीं फुलें उमलण्यापूर्वी गुलाबी रंगाची व उमलल्यानंतर तांबूस जांभळ्या रंगाचीं असतात.  सप्टेंबरपासून नोव्हेंबरपर्यंत अगर एप्रिल ते जूनपर्यंत याची पेरणी करतात.  म्हणून तेथें दोन पिकें होतात.  तांबूस, रेताड अगर खडकाळ जमिनीवर याची लागवड करतात.  क्वचित काळ्या जमिनींतहि यांची पेरणी करतात.  हीं झाडें बहुवर्षजीवि असून त्यांची उंची ६ पासून ८ फुटांपर्यंत असते.  शेतांत या जातीचीं झाडें रांगेनें अगर कुंपण म्हणून दुसर्‍या पिकांच्या रक्षणाकरिता लावतात.
    
हिंगणघाटी कापूस :- या जातीच्या झाडापासून उत्कृष्ट व अतिशय मऊ कापूस निघतो.  त्याला बाजारांत उमरस, हिंगणघाटी, नागपुरी बिहारी कापूस म्हणतात.  बनि व जरी असे दोन प्रकार वरील कापसाचे आहेत.  बनि उंचवट्याच्या व रुक्ष जमिनीत होतो; तो उत्तम व मऊ असतो.  परंतु त्याचें पीक कमी येतें.  जरी कापसाची लागवड उत्तर प्रदेशांतील जमिनींत होते.  हा कापूस हलक्या प्रतीचा व लोंकरीसारखा असून त्याचें पीक भरपूर येतें.  जरी ही बनी जातीची हलकी प्रत आहे.  बनि जात चिनी जातीपैकीच एक असल्यामुळें त्या जातीच्या कापसाचा धागा रेशमासारखा असतो.  या जातीच्या झाडांच्या पानांचा आकार व फुलांचा रंग नादप्रमाणें असतो.  परंतु ती मोठी व केसाळ असतात.
    
या जातीच्या कापसाचा धागा अनेक प्रकारचा असतो.  याला बिहारमध्यें जेथि अथवा देशी, बंगालमध्ये भोगल्ल, वर्‍हाडांत तिडकी व जडी म्हणतात.  हैद्राबाद संस्थानांत भैसि येथें होणारी जात सर्वोत उत्तम असते.  वर्‍हाड, मध्यप्रांत, बिहार व बंगालचा कांही भाग या ठिकाणी ही जात थोडथोडी आढळते.
    
रोझी कापूस :- या जातीची झाडें झुडुपांसारखीं असून बहुवर्षजीवि असतात.  त्यांनां पिवळी फुलें येतात.  ही जात विशेषतः बडोदा व खेडा या ठिकाणी आढळते.  या जातीची झाडें ६ पासून ८ फूट उंच असून त्यांनां अतिशय फांद्या असतात.  रोझी जातीच्या झाडांनां कुंपणांत वाढूं दिलें असतां ती वेलासारखी पसरतात व त्यांचा कापूस आंखूड धाग्याचा व तांबूस होतो.  शेतांत जर ही झाडें ३/४ वर्षांपेक्षा जास्त दिवस राहूं दिली तर त्यांचा कापूस हलक्या प्रतीचा होतो.
    
हिंदी रान-कापूस - या जातीची झाडें झुडुपांसारखीं असून त्यांची पानें लहान असतात.  बोंडें लंबाकृति असून सरकीच्या भोंवती राखेच्या रंगाचे धागे असतात.  हीं झाडें मूळचीं सिलोनमधील असून त्यांची लागवड करीत नाहीत.  ही जात वर्षजीवि असून यांतील सरकी फार लहान असते.
    
कापसाच्या कांही मुख्य जाती खाली दिलेल्या आहेत.
    
(अ) शुद्ध प्रकार :-
(१) कहनामी - भडोच.  सुरत, नवसारि, बडोदा वगैरे ठिकाणचा ''देशी'' कापूस.   
(२) बडोदा व भडोच येथील हलक्या प्रतीचा गोघरि नांवाचा कापूस.   
(३) लालिओ :- अहमदाबाद व काठेवाड येथील धोलेरा नांवाचा देशी कापूस.   
(४) दक्षिणमहाराष्ट्रांतील कुमठा नांवाचा कापूस.   
(५) उप्पम नांवाचा दक्षिण हिंदुस्थानांतील लांब धाग्याचा कापूस. हा विशेषतः  तिनेवेल्लि व कोइमतुर येथें होतो.
    
(आ) संकीर्ण प्रकार :- (१) कनबिः- या जातीच्या कापसाला बहुधा खानपुरी म्हणतात.  गॉ. अॅर्बोरिअम निगलेक्टा या जातीशी झालेल्या संकरापासून हा प्रकार झाला असावा (२) वागरिआकापूस उत्तरगुजराथ, काठेवाड, कच्छ येथें होणारा असून बहुधा गॉ. नागकिंग जातीशीं झालेल्या संकरापासून हा प्रकार झाला असावा.  (३) तेल्लपट्टि, दक्षिणहिंदुस्थानांतील काळ्या बियाच्या कापसाचें हें नांव असून उप्पम व बुर्बोन कापसाच्या संकरापासून हा झाला असावा.
    
बहुतेक वन्य कापसाच्या बियांनां सूक्ष्मतंतूंचें आवरण असतें.
    
पेरूवियन व इजिप्शियन कापूस :- या जातीचीं झाडें मूळचीं मध्य व दक्षिण अमेरिकेंतील असून याला पेरूव्हियन कापूस म्हणतात.  ह्या जातीचीं झाडें कापूस होणार्‍या सर्व प्रदेशांत आढळतात.  हीं झाडें विशेषेंकरून पश्चिम आफ्रिकेंत आढळतात व तेथें त्यांनां ओवु, उकोको वगैरें नांवें आहेत.  आफ्रिका व अमेरिका येथें लागवडींत असलेल्या कापसाच्या जातींत सूक्ष्मतंत्वावरण असलेली सरकी असते; व झाडांची पानें थोडीबहुत केशाच्छादित असतात. केशाच्छादनरहित पानांच्या जातीच्या कापसाची सरकी सूक्ष्मतंत्वावरणरहित असते.
    
सूक्ष्मंतंत्वावरण रहित सरकीच्या कापसाच्या जाती - बोर्बोन :- (गॉ.पापेरॅसन्स) या झाडांची लागवड होत असून तीं बहुवर्षजीवि असतात.  या जातीचे बरेच प्रकार असून त्यांपासून निघणार्‍या कापसाला बाजारांत बुर्बोन व पोर्टोरिको कापूस म्हणतात.
    
या जातीच्या कापसांतील सरकी सूक्ष्मतंत्वावरणरहित असते व झाडाची पानें गुळगुळीत असतात.  हीं झाडें बेटांतच चांगलीं होतात, म्हणून यांच्या लागवडीच्या बाबतींत उत्तर हिंदुस्थानापेक्षां दक्षिणहिंदुस्तानातच जास्त यश आलें आहे.
    
गॉ. बार्बाडेन्स - याला बाजारांत ''सीआयलंड'' कापूस म्हणतात.  या जातींत सर्व लांब धाग्याचे व उच्च प्रतीचे कापसाचे प्रकार येतात.  या जातीचीं झाडें झुडुपांसारखी असून बहुवर्षजीवि असतात.  ही फक्त लागवडीच्या अवस्थेंतच आढळतात व त्यांची लागवड वार्षिक असतें.  हीं झाडें देंठ व कोंवळ्या पानांच्या शिरांखेरीज गुळगुळीत असतात.
    
प्राचीन लेखकांनां गॉ बेस्टा, गॉ व्हॅटी, फोलियम हीं नांवें एकाच जातीच्या झाडांची आहेत हें माहित नव्हतें.  लागवड व मिश्रण या योगानें सी आयलंड नांवाचा एक प्रकार उत्पन्न झाला, त्यालाच अलीकडल्या लेखकांनीं गॉ. बार्बाडेन्स हें नांव दिलें.
    
जरी अनेक वेळां या जातीची लागवड हिंदुस्थानांत करण्यांत आली तरी कोणत्याहि प्रदेशांत ती यशस्वी झाली नाही.  अंदमान व निकोबार बेटांत व तेनासरिमच्या कांही भागांत कदाचित या जातीची लागवड फायदेशीर होण्याचा संभव आहे.  
    
कापसांतील भेसळ व तिचा परिणाम - शुद्ध कापूस परदेशी पाठविण्यासंबंधी कितीहि काळजी घेतली तरी थोडीच आहे असें मिल्बर्न यानें लिहिलें असून हिंदुस्थानांतील कापसांतील भेसळ व त्याचा गुणर्‍हास या गोष्टीकडे एक शतकापासून लक्ष लागलें आहे.  हिंदुस्थानच्या कापसाला कमी किंमत येण्याची सेंट जार्ज टकर यानें दहा कारणें दिली आहेत.  निरनिराळ्या जातीची निरनिराळी लागवड करून त्यांचे निरनिराळे वेंचे करण्याला एतद्देशीय शेतकर्‍यांनां उत्तेजन मिळत नाही, हें त्यांचे कारण नसून भेसळ नसलेल्या कापसाला जास्त किंमत मिळते हें होय असें रायल यानें लिहिलें आहे.  याचप्रमाणें हिंदुस्थानचा कापूस लहान धाग्याचा असल्यामुळें त्याला इंग्लंडच्या बाजारांत तेजीची मागणी नाही, परंतु बाजारांत तो भेसळस्थितींत मिळतो, हेंहि त्याची कमी किंमत होण्याचें एक कारण आहे.  हलक्या प्रतीचा कापूस उच्च दर्जाच्या कापसांत मिसळण्याच्या विरुद्ध बरीच ओरड सुरू झाली तेव्हां 'कॉटन फ्रॉड' कायदा यास झाला.  (१८६३) व इ.स १८७८ च्या कायद्यानें त्यांत दुरुस्ती केली.
    
विशार्ट यानें कापसाची भेसळ यावर एक लेख लिहिला आहे (१८९१). त्यांत तो म्हणतो कीं, आपल्या हलक्या प्रतीच्या कापसाला खरें गिर्‍हाईक राहिलें नाही.  कारण एतद्देशीय कोष्टी त्याचा उपयोग करूं शकत नाहींत व चिनी लोकानांहि तो फायदेशीर पडत नाहीं.
    
इ.स. १८९१ मध्यें सिंधच्या कमिशनरनें कापसासंबंधी एक पत्रक काढलें; त्याला मुंबईच्या कॉमर्स सभेनें जें उत्तर दिलें त्यांत तिनें असें मत दिलें की कापसाची सुधारणा करणें अवश्य आहे;  परंतु त्याकरितां प्रतिबंधक कायद्यांची जरूर नाही.  हेंच मत सरकारचेंहि होतें.  हिंदुस्थानच्या कापसाची निकृष्टावस्था सरकार व गिरण्यांच्या मालकांच्या संस्था यांच्या नजरेस ना. पेटिट यांनी इ.स. १९०१ मध्यें आणली.  चीन व जपान हें दोन देश आपल्या देशांतच हलक्या प्रतीचें कापड तयार करूं लागल्यामुळें हिंदुस्थानचीं दोन मुख्य गिर्‍हाईकें सुटल्यासारखें झालें.  अर्थातच हिंदुस्थानांतील गिरण्यांच्या मालकांनां आपल्या मालांत सुधारणा करणें भाग झालें.  २० नंबरच्या सुताऐवजी त्यांनां आतां ८० नंबरचें सूत काढण्याचा विचार करणें भाग पडलें.  परंतु त्याकरितां लागणारा कापूस त्यांनां ईजिप्‍त व अमेरिकेंतूनहि आणणें भाग आहे.  अशा रीतीनें भेसळीमुळें कापड तयार करण्याच्या धंद्याला बराच  अडथळा झाला आहे.  म्हणून भेसळ करण्याविरूद्ध कायदा असावा, अशी ओरड पुन्हां सुरू झाली असून ज्या प्रदेशांत कापूस झाला, त्या प्रांताचा गाठीवर छाप असला म्हणजे बराच प्रतिबंध होईल असेंहि सुचविण्यांत आलें आहे.
    
कपाशीच्या लागवडीसजमीन - उत्तम, खोल, काळ्या व चिकण जमिनींत कापूस चांगला होतो.  तथापि त्याची लागवड मध्यम, काळ्या व मिसळीच्या जमिनींतहि करितात.  उत्तम जातीच्या कापसाची लागवड सिंध, गुजराथ, कर्नाटक, मद्रास व निझामच्या राज्यांत होते.  हलक्या कापसाची लागवड खानदेश, नगर, सोलापूर, वर्‍हाड व मध्यप्रातांत-जेथें जेथें तीस ते चाळीस इंच पाऊस पडतो - तेथें होते.  उत्तर गुजराथेंत सोय असेल तेथें कापसाला पाणी देतात.  इतर प्रांतांत बहुतकरून आंखूड धाग्याचा कापूस होतो.  उत्तम कपाशी पिकण्याचे जे जे प्रदेश आहेत तेथें सरपणाची अतिशय महागाई आहे व त्यामुळें सरपणाच्या कामीं शेणाच्या गोंवर्‍यांचा उपयोग करणें भाग पडतें.  तथापि जें कांही खत असेल तें ज्या वर्षी कपाशी पेरितात, त्या वर्षी देण्याची चाल असते. धारवाडाकडे मात्र जमीन खतविण्यांत फरक आढळतो तो असा कीं, कापसाशी ज्वारीचा फेरपालट असल्यामुळें ज्या वर्षी ज्वारी करतात त्या वर्षी तिकडे खत देतात.  भडोच व जळगांव येथें सरकारी प्रयोगशाळेंत ताज्या मैल्याचे खतासाठीं प्रयोग कापसावर करण्यांत आले.  हें खत फार फायदेशीर आहे, असें खालीं दिलेल्या आंकड्यावरून स्पष्टपणें दिसून येईल.  खताचें प्रमाण दर एकरी पौडांत दिलें आहे.

 नांव  मैला ए.  किंमत  बिनखती  खताचा
 गाड्या  दर ए.  भाग  भाग
 भडोच  ७०   ४९  २६४  ११९८
 जळगांव   ३४।।  ३६  २१३  ९८८


कापसाच्या लागवडींत सुधारणा करावयाची असल्यास ती प्रांतवारीनें निरनिराळी करावी लागेल.  सुधारणा करावयाच्या मुख्य तर्‍हा तीन आहेत. (१) व्यापारी व परिस्थितीच्या दृष्टीनें बियांची निवड,(२) संकीर्ण जातीचा शोध, (३) परदेशांतील मौल्यवान जाती एतद्देशीय हवेशींसात्म्य करणें.  या तिन्ही उपायांचा अवलंब हल्लीं हिंदुस्थानांत होत असून बहुतेक भागांत अस्तित्वांत असलेल्या जातींतून केलेली निवडच आशाजनक वाटते.  अगदी नवीन जात शोधून काढण्यास संकराचा उपायच जास्त श्रेयस्कर वाटतो.

बियांची निवड - हिंदुस्थानांतील शेतकरी बियांची फारशी काळजी घेत नाहींत.  ते बहुतकरून सरकी जिनांतून आणतात.  गिरण्या आल्यापासून हातचरक बंद झालें.

सर्वांत मोठ्या व ज्याला सर्वांत जास्त बोंडें आलीं असतील अशा झाडांच्या कापसांतून काढलेली सरकी पुढील सालच्या पेरणीकरिता राखून ठेवावी.  बोंडावरील किडे ज्या झाडांवर आहेत त्यांच्या कापसांतील सरकी बियांकरितां उपयोगांत आणू नये.  बोंडांना किडे लागूं नयेत म्हणून पेरणी करण्यापूर्वी बियांची सरकी मोरचुदाच्या पाण्यांत (१०० भाग पाण्यांत २/२ भाग मोरचूद) भिजवून उन्हांत वाळवावी. हवेंतील अकालीन बदलामुळें कापसाच्या पिकावर वाईट परिणाम होण्याचा बराच संभव असतो.

परदेशांतील कापसाच्या जाती. - कर्नाटकमध्यें एक अमेरिकेंतील कापसाची जात तेथील हवेशीं साम्य झाली आहे.  याखेरीज कोठेंहि परदेशच्या कापसाच्या जातीला म्हणण्यासारखें यश आलें नाही. (घाटापलीकच्या प्रदेशांत पावसाळ्याखेरीजच्या आठ महिन्यांत इजिप्शियन कापसाचें पीक काढण्याचा प.वा.टाटांनी प्रयत्‍न केला होता.  इ.स. १९०० मध्यें पुण्याला २ इजिप्शियन जातींचा प्रयोग करून पहाण्यांत आला.  पहिल्यापासूनच हीं झाडें रोगट दिसत व पुष्कळ बोंडें उमलण्यापूर्वीच गळून पडलीं.  दोन्ही जाती मिळून दरएकरी सरासरी ४०१ पौंड(रू व सरकी) उत्पन्न झाले.

अमेरिकेंतील शेतकरी बियाणाची निवड कशी करितात, ह्यासंबंधाने में रॉबर्टसन - लायलपूर कॉलेजचे प्रिन्सिपाल - हें आपल्या अमेरिकेंतील प्रवासवर्णनांत लिहितात कीं, अमेरिकेंत सर्व शेतकरी सरकीच्या निवडीसंबंधी जास्त काळजी घेतात.  बहुतेक शेतकर्‍यांचे बियांची निवड करण्यासाठी तीन वेगवेगळाले भाग असतात.

पहिल्या सालीं सर्व शेतांत फिरून एक उत्तम झाड निवडून त्याची सर्व सरकी पुढील सालीं एका भागांत पेरितात. कापूस तयार झाल्यावर पुन्हां या भागांत एक उत्तम झाड निवडून दुसर्‍या सालीं त्याचें बीं वेगळ्या भागांत पेराचें व बाकी निवडलेल्या झाडांची सरकी मोठ्या प्रमाणावर शेतांत पेरावयाची.  तिसर्‍या सालीं पुन्हां एक उत्तम झाड निवडावयाचें व पुन्हां त्याची वेगळी सरकी पेरावयाची. असा क्रम वर्षानुवर्ष चालू ठेवितात.  या योगानें दर वर्षी चांगल्या बियांची उपज होऊन जास्त प्रमाणावर पेरण्यासाठी उत्तम बी मिळतें.

याप्रमाणें दर एका मोठ्या इस्टेटींवर एक भाग, निवडक एका झाडाच्या बियांचा, दुसरा भाग, थोड्या प्रमाणावर सरसकट निवडक बियांचा व तिसरा भाग जास्त प्रमाणावर सरसकट निवडक बियांचा असतो.

गुजराथेंतील लागवड. - भडोच व सुरत येथें सुमारें तीस चाळीस इंचावर पाऊस पडतो.  कपाशीच्या जमिनीस उन्हाळ्यांत पाळ्या घालितात व पूर्वीच्या पिकांचे गबाळ काढून टाकितात. खत असल्यास मे महिन्यांत देऊन नंतर पाऊस सुरु झाल्याबरोबर एकदोन वेळ वखरुन दोन फणी पाभरीनें बी पेरितात.  दोन ओळींमधील अंतर सुमारें २२ ते २६ इंच असतें. सरकी पेरण्यापूर्वी बीजास, शेण व माती पाण्यांत एकत्र कालवून त्याचें पूट देतात.  याचा हेतु, सरकीस जे कापसाचे तंतु चिकटून राहिलेले असतात ते त्या सरकीच्या अंगाला बळकट चिकटून जाऊन तें बीं चाड्यांतून बिनहरकत पडावें असा असतो.  बहुतेक शेतांत वर्षाआड कापूस पेरितात.  कांही ठिकाणी जमीन पड ठेवितात.  कांही ठिकाणी पहिल्या वर्षी ज्वारी व दुसर्‍या वर्षी कापूस पेरितात.  कांही ठिकाणीं हंगामांत गहूं, शाळू, अगर तूर व तीळ पेरतात.  कित्येक ठिकाणी कापसाच्या बियांबरोबर तूर, तीळ व अंबाडी व भडोच जिल्ह्यांत व कहानम भागांत जेथें जास्त पाऊस पडतो तेथें कापसाच्या ओळींत अगर मधील जागेंत भाताचीं तासें घालितात.  खेडा जिल्ह्यांत गोराडू वगैरे जमीनींत 'रोझी' नांवाच्या कापसाच्या ओळी दूरदूर घालून, मधील जागेंत बाजरी अगर इतर कडधान्यें पेरितात.  दरएकरीं बियांचें प्रमाण दहा ते पंधरा पौंडपर्यंत असतें.  पीक सुमारें चार सहा इंचांवर आल्यावर पहिली कोळपणी व निंदणी देतात.  दाट झाडें पातळ करून ओळींत अठरा इंचांपासून ते दोन फुटांपर्यंतच्या अंतरानें झाडें ठेवितात.  पुढें एक दोन कोळपण्या देऊन सप्टेंबर - आक्टोबर महिन्यांचे शेवटीं ओळीमध्यें एक नांगराचें तास घालितात.  आक्टोबर-नोव्हेंबरमध्यें फुलें येण्यास सुरूवात होऊन तीं जानेवारीपर्यंत येत असतात.  वेंचणी जानेवारीअखेर सुरू होऊन मार्च-एप्रिलपावेतों चालते.  वेंचणीस सकाळची वेळ चांगली समजली जाते.

कर्नाटक, धारवाड वगैरे जिल्ह्यांत पहिले व नंतरचेहि वळीव पाऊस पडतात.  अशा स्थितीमुळें जूनमध्यें बीं पेरल्यास ऐन वेंचणीच्या वेळीं पावसानें कापूस न नासावा म्हणून पेरणीचा हंगाम ऑगष्ट महिन्यांत सुरू होतो.  पेरणी फणाच्या मागें चाडीं बांधून खानदेशाप्रमाणें करितात.  रोपें भडोच व सुरतेप्रमाणें पातळ करीत नाहीत.  कोळपणी, निंदणी, टिपणी, वेंचणी वगैरे गुजराथप्रमाणेंच करितात.

कर्नाटक सोडून जों जों पुढे दक्षिणेकडे मद्रास इलाख्यांत जावें, तों तों कापूस पेरण्याचा हंगाम पुढें सरसावत जातो.  कर्नूल व कडाप्पा जिल्ह्यांत कापसाची पेरणी ऑगष्ट-स्प्टेंबरांत होते व तिनेवेल्लिस कापसाची (करांगणी व उप्पम मिसळ जात.) लागण आक्टोबर-नोव्हेंबरांत होते.

खानदेश, वर्‍हाड, मध्यप्रांत व निझामचें राज्य यांतील कापसाच्या लागवडींत फारसा फरक नाही.  कारण जमीन, हवापाणी, उष्णता, पाऊसकाळ वगैरेंत वरील प्रांतांत बरीच साम्यता आहे.

खानदेशांत कापसाचा पेरा अव्वल काळ्या, हलक्या व मध्यम काळ्या जमिनींतहि करतात. हलक्या व मध्यम काळ्या जमिनींत एक वर्ष कापूस व दुसर्‍या वर्षी ज्वारी, बाजरी अगर तीळ करून तिसर्‍या वर्षी पुन्हां कापूस पेरितात.  अव्वल काळ्या जमिनींत कापसाचा फेरपालट ज्वारी, गहूं, हरभरा, जंवस वगैरे रब्बी पिकांशी करतात.  वर्‍हाडांत बनी व जरी अशा दोन कपाशीच्या जाती असून पैनघाटाच्या दक्षिणभागांत बहुतकरून बनीची पूर्वी जास्त लागवड होत असे.  पण आतां ती कमी झाली आहे.  बनीला सप्टेंबरमध्यें फुलें येऊन त्यांचा कापूस नोव्हेंबरमध्यें वेंचण्यास येतो.  बनीचा कापूस उत्तम असतो.  परंतु उत्पन्न कमी येऊन रुवाचें प्रमाण फार कमी असतें.  यालाच हिंगणघाट कापूस म्हणतात.

कापूस करण्याकरितां जमीन बहुतकरून दरसाल नांगरीत नाहींत.  त्याऐवजी चार पांच कुळवाच्या पाळ्या करून काम भागवितात.  हें काम उन्हाळ्यांत सुरू होतें.  खत असल्यास दर एकरी शेणखताच्यादहा गाड्यांपर्यंत देतात.  पेरा जून महिन्यांत ओलावा पुरेसा झाला म्हणजे होईल तितका लवकर करतात.  पेरा करताना दुस्थाच्या मागे दोर्‍या अडकवून त्याला मोगण्या बांधितात; व तयार केलेलें बी बायकांकडून पेरतात.  ओळींमधील अंतर सुमारें दीड फूट असतें.  बियांत तुरीचा, अंबाडीचा, तिळाचा, ज्वारीचा वगैरे उतवडा असतो.  कांही ठिकाणी तुरीचीं तासें घालतात.  दर एकरी सुमारें बारा ते वीस पौंड बीं पेरितात.  कित्येक ठिकाणीं मागसलेल्या भागांत (तळोदें, शहादें वगैरे भागांत) पूर्वी फारशी मशागत न करितां कुळवाला मोगणी बांधून दर खेपेस एकेक तास असा पेरा करितात.  रोपें सहा ते आठ इंच झालीं म्हणजे कोळपणी (वर्‍हाडांत डवरा मारणें) सुरू होते अशा तीन चार कोळपण्या देतात.  कोळप्याच्या योगानें तण मुळासकट उपटतें.  जमीन भुसभुशीत होऊन रोपांनां थोडथोडी मातीची भर पडते.  सवडीप्रमाणें व पैशाच्या बळाप्रमाणें कपाशीला दोन किंवा तीन निंदण्या देतात.  निंदणीच्या वेळीं बायका ओळींतील तणें व दाट असल्यास कपाशीचीं रोपें उपटून काढितात.  कापूस निंदणें व तो वेंचणें ही कामें बर्‍याच खर्चाची आहेत.  कापूस वेंचण्याचें काम बहुतकरून आक्टोबर (पश्चिम खानदेश) व नोव्हेंबर (पूर्वखानदेश व वर्‍हाड) या महिन्यांत सुरू होतें.  उत्तम पिकाचे तीन ते चार वेंचे होतात.  यांपैकी पहिल्या व दुसर्‍या वेंचणीच्या कापसाची सरकी पुढील सालाकरितां राखून ठेवितात.  जे मजूर कापूस वेंचतात त्यांस पूर्वी मजुरीबद्दल पैसे न देता कापूसच देत असत.  हा दर बाजारांतील रुईच्या भावावर अवलंबून असे.  साधारण मान असें असे कीं, पहिल्या वेंचणीच्या वेळीं एका दिवसांत वेंचलेल्या कापसाच्या एक दशांश हिस्सा, दुसर्‍या वेंचणीचा एक षष्ठांश व तिसर्‍या वेंचणीचा एक तृतीयांश हिंस्सा देत असत.  परंतु हल्ली कापसाचा भाव वाढल्यानें रोकड पैसे देण्याचा प्रचार सुरू झाला आहे.  याप्रमाणें दिलेल्या रुईची किंमत दर एकरीं दहापासून पंधरा रुपयांपर्यंत होते.  पंजाबांत अद्यापि वांट्याची चाल प्रचलित आहे वांट्यानें दिलेल्या कापसाची किंमत तेथें सन १९१७-१८ सालीं दर एकरी सुमारें आठ रुपये होती.  

हिंदुस्थानांत निरनिराळ्या भागांत कापसाच्या निरनिराळ्यां जाती असून त्यांनां देशपरत्वें वेगवेगळालीं नांवे पडलेली आहेत.  हीं नांवे व व्यापारांत प्रचलित असलेलीं कापसाचीं नांवे बरीच भिन्न आहेत.

  जात  धाग्याची लां.इं.  धाग्याचें वर्णन
 गुजरात
  माथिओ  ४/८ - ५/  खरखरीत व पांढरा
  भडोच  ५/८ - ६/८   नरम पांढरा
  नवसारी  ७/८ - १  नरम पांढरा
  घोगारी  ४/८ - /८  नरम पांढरा
  लालिओ  ५/८ - ६/  नरम पांढरा
  वाघड  ६/८ - ७/  थोडा अंधुक
  रोझि  ५/  खरखरीत अंधुक
 खानदेश -
 खानदेशरोझी  ३/८ - ४/   खरखरीत पांढरा
 एन. आर. एन्. आर. सी (व-हाडी)  ३/८ - १   खरखरीत पांढरा
 एन.व्ही. एन. व्ही. एम्. एन. व्ही. के. (जाड)  ५/   व-हाडीपेक्षा बरा
 बनी  १ - ११/८   लांब धाग्याचा अंधुक पांढरा
 कर्नाटक -  
 कुमठा  ७/८   नरम थोडा अंधुक
 धारवाड अमेरिकन  ९/८ ३ - ७/  नरम थोडा अंधुक
 कांबोडिया  ५/८ - ७/  नरम सफेत

कपाशीवरील रोग व त्यांवर उपाय - कापसाला बरेच रोग होतात त्यांपैकी पानें खाणारे व बोंडांतील बीं खाऊन कापूस बिघडविणारे किड हे मुख्य होत .  शिवाय कधीं कधीं झाडांच्या मुळ्या कुजूनहि थोडें नुकसान होतें.  तथापि रोगानें अजिबात पीक जातें असें कधींहि होत नाही.
    
कापसाचें पीक हलक्या प्रतीचें कां येतें याच्या कारणांबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे.  चहा व कॉफी यांच्या पिकांच्या मानानें पाहातां कापसाच्या पिकाचें प्रतिकूल हंगामापेक्षा, रोगांमुळेंच जास्त नुकसान होतें, असें म्हणतां येणार नाही.
    
मॅक्सवेल लेफ्रॉय यानें १४ प्रकारच्या रोगांची माहिती दिली असून त्यांचे चार वर्ग केले आहेत. (१) मुख्यतः सप्टेंबरपर्यंत दिसणारे किडे, (२) बुंध्यांतील किडे, (३) बोंडांतील किडे, (४) संकीर्ण वर्ग.  त्यानें लिहिलें आहे कीं, आगष्ट व सप्टेंबर महिन्यांत किड्यांवर लक्ष ठेवून ज्या फांद्यांवर व बोंडांवर किडे दिसतील त्या फांद्या व ती बोंडें काढून टाकावींत.
    
ज्याला एतद्देशीय लोक गोसावी अथवा तुलसी म्हणतात, तो हिंदुस्थानांत मोठ्या प्रमाणांत आढळतो.  या रोगामुळें प्रथमतः मोठीं व जोमदार असलेलीं पानें पुढें गुंडाळलीं जातात व त्यांच्यावर कुसीचें आवरण चढतें.  या झाडांनां फुलें व फळें येत नाहींत.  गुजराथमध्यें हा रोग बराच असून शेंकडा ५ ते १० झाडें या रोगामुळें निरुपयोगी होतात.  या रोगावर गंधक अथवा केरोसीन एमलशन यांचा उपयोग करावा.
    
टोंका किड्यांचा नाश करण्याच्या कामीं ग्वाटिमालामधील केकची नांवाची कापसाची जात लावल्यापासून बराच फायदा होतो, असें ओ. एफ. कूक यानें लिहिलें आहे.
    
कापसाचे बाजार :- गुजराथेंत, नवसरी, सुरत, भडोच, डभोई, अहमदाबाद, विरमगांव; खानदेशात - अमळनेर व धुळें; कर्नाटकांत - हुबळी, गदग, धारवाड व विजापूर; वर्‍हाडांत - उमरावती, खामगांव, आकोट, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर वगैरे होत; निजामच्या राज्यांत - कर केली, परभणी, नांदेड व बार्शी.
    
सर्व कापसाच्या क्षेत्रांत जागोजागी सरकी काढण्याची इंजिनें (गिरण्या) व यंत्रानें दाबून रुवाचे गठ्ठे बांधण्याचे कारखाने झाले आहेत.  पुष्कळ शेतकरी आपला माल जागेवरच लहान व्यापर्‍यांस विकतात.  कित्येक शेतकरी लोक आपला माल मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी आणितात व बाकीचा माल त्या गांवच्या सावकार लोकांमार्फत येतो.  मोठमोठ्या शहरी हिंदी व युरोपियन असे दोन्ही जातींचे व्यापारी असतात; ते रुई खरेदी करून रेल्वेनें परठिकाणीं पाठवितात.  लांब पल्यावरच्या ठिकाणी त्यांचे मुखत्यार असतात; ते आसपासच्या शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करून आपापल्या कारखान्यांत पाठवितात.
    
उपयोग - कापसाच्या पळाट्यांचा उपयोग सरपणाकडे पांट्या, कणगी, गाड्याच्या बाजू विणण्याकडे फार करितात.  हल्ली पळाट्यांपासून कागद तयार होतो अगर होण्याचा संभव आहे असें नागपूर शेतकी कॉलेचांतील रसायन शास्त्रवेत्ते यांनी प्रसिद्ध केलें आहे.  सरकी गुरांस खावयास घालतात.  ती फार पौष्टिक असून दुभत्या गुरांस दिल्यास दुधांत लोण्याचें प्रमाण वाढतें.  हल्लीं नवसरी येथें व वर्‍हाडांत अकोला येथें सरकीचें तेल व पेंड करितात.  या तेलांचा तळण्याकडे व साबण करण्याकडेहि चांगला उपयोग होतो.  विलायतेकडे सरकीच्या तेलापासून मारगाईरन तयार करितात.  याची पेंड गुरांस चांगली मानवते.  सरकीच्या वरचीं टरफलें कडब्यांऐवजीं गुरांस चांगलीं उपयोगी पडतात.  सरकी सन १८९८-९९ सालापासून परदेशी जाऊं लागली असून वर्षानुवर्ष ती जास्त प्रमाणांत जात आहे.
    
सन १८९८ ते १९०७ सालापर्यंत हिंदुस्थानांतून सरकीची निर्गत खालीं दिल्याप्रमाणें झालेली आहे.  खालील आंकडे (हंड्रेडवेट्सचे) ११२ पौडांचा एक हंड्रेडवेट, या प्रमाणांत आहेत.

 सन   हंड्रेडवेट.
 १८९८-९९   ३७,०००
 १९०२-०३  ३९७४,०००
 १९०६-०७  ४३७८,५३४

हल्लीं दरसाल हिंदुस्थानांत सरासरीनें अठरा लक्ष टन सरकी उत्पन्न होते.  यापैकी दोन लक्ष टन बीं कापसाच्या लागवडीकडे खर्च होऊन १५१५९५ टन सरकीची दरसाल निर्गत होते.  सगळ्यांत जास्त निर्यात २८४३२७ टन सन (१९१३-१४ सालीं) झाली आहे.

इंडियन काँटन कमिटीच्या रिपोर्टांत पानें ७ ते ११ यांत दिलेल्या परिशिष्टांतील माहिती.

सरकी काढणें, गठ्ठे बांधणें वगैरे - शिकंदर बादशहाबरोबर आलेल्या शास्त्रीय अधिकार्‍यांनी हिंदुस्थानांतील कापूस वटणें, सूत काढणे, विणणे वगैरे कलाबद्दल माहिती दिली आहे.  प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत कापूस वटण्याकरितां २ तर्‍हेची यंत्रे उपयोगांत होती, असें म्हणण्यास हरकत नाही.  या यंत्रांपैकीं पायानें चालविल्या जाणार्‍या रुळांचा अलीकडे फारसा उपयोग होत नाही.  दुसर्‍या प्रकारच्या यंत्रांतच हल्लीं सुधारणा करून ती चालविण्याकरितां बाष्पशक्तीचा उपयोग केला जातो.  पूर्वी अशा प्रकारच्या यंत्रांनां चरक हें नांव असून त्यांत विरूद्ध दिशेनें फिरणारे दोन लांकडी अथवा लोखंडी रूळ व त्यांनां फिरविण्याकरिता त्यांनां जोडलेलें एक चाक असे व हें चाक हातानें फिरवीत असत.  कापसाच्या बोंडातून सरकी काढणें व सूत विणणें यांसंबंधी १७३३ ते १७६४ चे दरम्यान इंग्लंडमध्यें फार महत्वाचे यांत्रिक शोध झाले; व त्याच सुमारास जेम्स वॅट याने वाफेचे यंत्र शोधून काढले. सरकीला घट्ट चिकटलेलें तंत्वावरण काढण्याकरितां मॅकॉर्थीयाच्या सॉ जिनाचा उपयोग होऊं लागला.  लांब धाग्याचा कापूस वटविण्याकरितांहि या यंत्राचा चांगला उपयोग होतो.  अर्वाचीन यंत्रांनीं एतद्देशीय चरकांपेक्षां कापूस व सरकी यांची जरी किंचित जास्त खराबी होते, तरी कापूस वटविण्याला जुन्या चरकानें जास्त वेळ जागतो व पुष्कळ कापूस वटविण्याकरितां त्याचा उपयोग होत नाही.  या कारणामुळें कापूस पिकणार्‍या प्रदेशांत बाष्पशक्तीनें चालणारे कापूस वटविण्याचे मोठमोठे कारखाने निघाले आहेत.  या सुधारणेपासून फायद्याबरोबर थोडा तोटाहि झाला आहे.  कारण जिनांतून सरकी काढतेवेळेस निरनिराळ्या प्रकारची रुई त्यांत मिसळली जाते व शेतकरीवर्गाला मिश्र बीं उपयोगांत आणावें लागतें.  यामुळें हिंदुस्तानांतील कापूस हलक्या दर्जाचा झाला असा समज आहे.  यासाठी उत्तम व एकच जातीचें बी वापरण्यांत यावें याबद्दल सध्या सरकारचे प्रयत्‍न सुरू आहेत.
    
इ.स. १९०४ सालीं हिंदुस्थानांत कापूस वटविण्याचे व त्याचे गठ्ठे बांधण्याचे ९५१ कारखाने असून त्यांत ८५,५५९ लोक काम करीत होते.
    
कित्येक वर्षेपर्यंत बहुतकरून फक्त मुंबईसच गांठी बांधल्या जात असत.  ने-आण करण्याकरितां लागणार्‍या खर्चांत काटकसर करण्याच्या उद्देशानें गांठी बांधण्याचे निराळे कारखाने काढणे जरूर पडलें.  अलीकडे बहुतेक ठिकाणी कापूस वटविण्याच्या कारखान्यांतच गांठी बांधण्याचें काम होत असतें.
    
सरकी - तेल काढण्याकरतां व जनावरांनां खावयाला घालण्याकरितां सरकीचा उपयोग होतो.  सन १८९८ सालापर्यंत हिंदुस्थानाबाहेर सरकी जात नसे.  परंतु १८९९ पासून तेल काढण्याकरितां सरकीला परदेशची मागणी एकदम वाढली असून ही निर्यात विशेषतः संयुक्त राष्ट्रांतच जास्त होत आहे.  १८९९-१९०० साली ४३,००० हं. सरकी बाहेरदेशी गेली.  त्याच्या पुढील सालीं म्हणजे १९००-०१ त २,२५००० हं. सरकी परदेशी गेली.  हा निर्गतीचा आंकडा सारखा वाढत असून १९१३-१४ साली ७२ लक्ष हंड्रेडवेट किंवा ३,६४००० टन झाला.  सरकीचें टरफल काढण्याच्या यंत्रांचा शोध, अमेरिकेंतून होणार्‍या पुरवठ्याची कमतरता, सरकीच्या तेलाचा चरबीच्या ऐवजी होणारा वाढता उपयोग वगैरे कारणांमुळे सरकीची सर्व जगांतील मागणी वाढली असावी; तरी हिंदुस्थानांतून एकंदर जगाच्या पुरवठ्यापैकी सुमारें शेकडा ३३ पेक्षां जास्त माल बाहेर जात नाही.
    
सरकीचें तेल - तेल काढण्याकरितां सरकीवरचें सूक्ष्म तंत्वावरण काढून नंतर तिच्यावरचें फोलफट काढतात.  सरकींत शेंकडा २० ते २५ पर्यंत तेलाचा भाग असतो.  तेल काढल्यानंतर ढेप गुरांनां खाण्यास उपयोगी पडावी म्हणून फोल काढणें अवश्य असते.  तेलाचा ज्या कामाकडे उपयोग करावयाचा असेल त्याप्रमाणें तेल काढण्याची रीत बदलते.  फोल काढलेल्या सरकीवर थंड दाब घालून तिच्यांतील शेंकडा १० ते १२ तेलाचा अंश काढतात.  हें तेल बेचव असून त्याचा ओलिव्ह तेलांत मिसळण्याकडे अगर ओलिव्ह तेल म्हणून विकण्याकडे उपयोग करतात.  तळणाच्या कामीं याचा चांगला उपयोग होतो.  थंड दाबानें तेल काढल्यानंतर उष्णतेचा उपयोग करून त्यांतून शेंकडा १० या प्रमाणांत तेल काढलें जातें. ढेपेमध्यें तेलाचें योग्य प्रमाण नसलें तर ती गुरांच्या खाण्याकडे उपयोगी पडत नाही.  हिंदुस्थानांत गुरांनां सरकी देतात.  यामुळें तेल काढण्याच्या कामीं तिचा फार थोडा उपयोग केला जातो.  याचें कारण सरकीचें तेल वैद्यशास्त्रदृष्ट्या खाण्यास पथ्यकर नाहीं, अशी लोकांची भ्रामक समजूत झालेली आहे हें होय.  गुरांनां खावयास घालण्याकडे सरकीचा उपयोग प्राचीन काळींहि करीत असा उल्लेख आहे.  परंतु हिंदुस्थानांतील बर्‍याच भागांत हल्लीसुद्धा सरकीला किंमत नाहीं.
    
अलीकडे असें आढळून आलें आहे कीं, सरकी अथवा सरकीचें टरफल यांचा उच्च प्रतीचा कागद तयार करण्याच्या कामी उपयोग होतो.  कापसाचे  वेंचे झाल्यानंतर व गुरांनी प-हाटीचा खाण्यासारखा भाग खाल्यानंतर तिची साल काढतात. पर्‍हाटी व साल याचें ५:१ हें प्रमाण असतें.  या सालीपासून तंतू काढून त्याचा तागाप्रमाणें उपयोग करतात.  १ टन सालीपासून ७०५० शेर ताग निघतो.  कपाशीच्या झाडापासून कागदहि तयार करतां येईल असे दिसून आलें आहे.  सर्वसाधारणत: हिंदुस्थानांतील कापसाच्या धाग्याची लांबी पाऊण इंचापेक्षा जास्त असत नाही.  ''सीआयलंड'' जातीच्या कांही जातींच्या कापसाच्या धाग्याची लांबी २ इंच असते.  महत्वाच्या जातींच्या कापसाच्या धाग्याची जास्तींत जास्त लांबी खालीं दिली आहे.  न्यू ऑर्लिन्स १.१६ इंच,  ''सीआयलंड'' १.८० इंच, ब्राझिलियन १.३१ इंच; ईजिप्शियन १.५२ इंच, एतद्देशीय १.०२ इंच, हिंदुस्थानांत लागवडींत असलेला अमेरिकन कापूस १.२१ इंच, हिंदुस्थानांत होणारा सी आयलंड कापूस १.६५ इंच.
    
कापसाच्या बोंडाच्या टरफलाचे दोन भाग असतात.  एक वरचा व दुसरा आंतील.  या दोहोंनाहि सूक्ष्म छिद्रें असतात.  या शोधावरून बोंडांच्या आंत ओलेपणा कोठून जातो या गोष्टीचा उलगडा होतो.  पूर्ण वाढीस पोहोंचलेल्या तंत्वावरणांत अपुर्‍या वाढीचे कांही तंतू असतात.  ते बारीक असून त्यांनां पीळ नसतो.  असल्या तंतूमुळेंच कापसाची किंमत कमी होते; कारण पूर्ण वाढ झालेल्या तंतूप्रमाणें त्यांनां रंग वगैरे देतां येत नाहीं.  त्यांनां मृत कापूस म्हणतात.  हलक्या प्रतीच्या कापसांत मृतकापूस पुष्कळ असतो व सीआयलंड जातीच्या कापसांत तो क्वचित आढळतो.
    
धाग्यांची लांबी व सारखेपणा यांवर कापसाची किंमत मुख्यात: अवलंबून असते, मऊपणा, बळकटी, स्वच्छपणा व रंग या बाबीहि महत्वाच्या आहेत.  बाजारांतील कापसांत शेंकडा ७।। ते १२।। ओलेपणा असतो.
    
कॉस्टिक सोड्याच्या द्रावणांत कापूस भिजविला असतां त्याच्या तंतूंना रेशमाप्रमाणे तुकतुकी येऊन ते जाड होतात व अधिक वजनदार व बळकट होतात.  याशिवाय कांही रंग त्यांनां अधिक पक्के बसतात.  या रीतीनें तयार केलेल्या कापसाला 'मरसिराइझड' कापूस म्हणतात.  पाणी, मद्यार्क, ईथर, वनस्पतिजन्य अम्ल यांत कापसाचे तंतू विरघळत नाहींत.  परंतु तीव्र अल्कलीच्या द्रवांत ते विरतात व तीव्र खनिज अम्लाच्या योगानें त्यांचे विघटन होतें.
    
कापड तयार करण्याचे हिंदुस्थानांतील कारखाने - या कारखान्यांचें (१) हिंदी हातमाग, (२) बाष्पशक्तीनें चालणार्‍या हिंदी लोकांच्या मालकीच्या सुताच्या व कापडाच्या गिरण्या व (३) बाष्पशक्तीनें चालणार्‍या विदेशी यांच्या गिरण्या असे तीन विभाग आहेत.
    
हातमाग ''हल्लीं हातमागावर काम करणारे लोक बहुधा फावल्या वेळींच तें काम करतात.  याखेरीज पूर्वीपासून जेथें कोष्ट्यांची वस्ती आहे अशा ठिकाणी अद्याप विणंकामाचाच धंदा करणारे लोक आढळतात सुतावरील कर काढणे व त्याची भरपाई करणारा कर बाष्पशक्तीनें चालणार्‍या मागांच्या कारखान्यांवर बसविणें या दोन कारणांमुळें कोष्ट्यांनां  ऊर्जित दशा येईल असे काही लेखकांचे मत आहे. एतद्देशीय कोष्ट्यांना धावत्या घोट्यांचा व इतर कांही योजनांचा उपयोग शिकविला असतां हातमागाच्या धंद्याला ऊर्जितावस्था येईल असें वाटतें.   बाष्पशक्तीनें चालणार्‍या मागांशीं झालेल्या हातमागांच्या चढाओढींत यूरोपखंडांत या योजनांना यश आलें नाही.  परंतु यूरोपपेक्षां हिंदुस्थानांतील परिस्थिति भिन्न असल्यामुळें हातमागांच्या धंद्याला अतिशय महत्व आलें आहे.  याकरितांच असें प्रतिपादण्यांत येत असे कीं, जो माल गिरण्यांनां किफायतशीर रीतीनें तयार करतां येणार नाहीं, तो माल तयार करण्याकडे हातमागांचा उपयोग झाला तर त्यांची ऊर्जितावस्था होण्याची आशा आहे.  विशिष्ट प्रकारच्या साड्या व लुगडीं तयार करण्याचा धंदा हातमागांनां योग्य आहे.  कारण त्या बाबतींत चढाओढ करण्यांत गिरण्यांच्या मालकांनां यश येणार नांही.  गिरण्यांत फक्त साधीं लुगडी निघतात.
    
हातमागवाल्यानें इंग्लडमध्यें तयार झालेलें उत्तम सूत घेऊन त्याचें कापड विणावें, म्हणजे त्याचा माल हिंदुस्थानांतील गिरण्यांत तयार होणार्‍या मालापेक्षां खात्रीनें चांगला निघेल.  ज्या मालाला फार मोठी मागणी आहे असा माल तयार करण्यापेक्षां ज्याला फक्त स्थानिक मागणी आहे असाच माल तयार करणें कोष्ट्याला धोक्याचें होणार नाही.  
    
कच्च्या मालाचें सान्निध्य, धंदेवाईक कोष्टीवर्गाचें अस्तित्व व व्यापाराच्या मुख्य ठिकाणी मालाची ने-आण करण्याची सोय, या तीन गोष्टींच्या अनुरोधानें वाफेनें चालणार्‍या कारखान्याला लागणार्‍या जागेची निवड होते.  साधारणतः असें दिसतें कीं, हिंदुस्थानांत ज्या ज्या ठिकाणीं प्राचीन काळीं हातमागांचा धंदा होता, त्या त्या ठिकाणीं वाफेनें चालणार कारखाने आतां निघाले आहेत.
    
डाक्का, बनारस वगैरे ठिकाणी अद्याप पातळ मलमल होते.  दिल्लीच्या बादशाहीच्या लयाबरोबरच डाक्काच्या मलमलीच्या धंद्याचाहि मागणीच्या अभावीं लय होईल असें वाटत होतें; परंतु १९०३ सालच्या दिल्लीच्या प्रदर्शनाच्या वेळी जी मलमल विकली गेली ती १८८४ मध्ये तयार झालेल्या कलकत्ता म्यूझियममधील मलमलीचया तोडीची होती.  डाक्काच्या प्राचीन मलमलीचे नमुने कोठेंच सांपडत नाहींत.  डाक्काच्या हल्लींच्या मालाचें सूत ४०० अथवा ४५० नंबराचें असतें व इंग्लंडातील कारखान्यांत ६०० नंबरचें सूत होतें.
    
डाक्काच्या मलमलींतील विशेष हा आहे की, तेथील सूत कांतणारे लोक इतकें उत्तम सूत काढतात कीं, ते जो हलक्या प्रतीचा कच्चा माल उपयोगांत आणतात, त्याच मालापासून जगांतील कोणत्याहि यंत्राच्या साहाय्यानें तितके उत्तम सूत निघणार नाही.  ओपविण्याच्या वेळीं अमेरिकन कापसाचें सूत फुगतें व डाक्काचें सूत बारीक व बळकट राहातें; म्हणून डाक्काचें सूत काढणारे लोक अमेरिकन सुताचा उपयोग करीत नाहींत.
    
फक्त हिंदुस्थानांत खपणारें कापड - हिंदुस्थानांत होणार्‍या कारागिरी कापडाचे, रेशमी जरतारी कापड व साधी अथवा चित्रित मलमल, असे दोन प्रकार आहेत. या कापडावर असलेली चित्रे बहुधा ठशाने उमटविलेली नसून विणलेली असतात.  याशिवाय फक्त हिंदुस्थानांत खपणारें कापड म्हणजे धोतरें, साड्या, पटके वगैरे होत.
    
पोषाखाच्या बाबतींत हिंदुस्थानांतील लोक जितके जुन्या रूढीला चिकटून राणारे आहेत तितके जगांतील कोणतेहि लोक नाहीत.  याकरितां ज्या व्यापार्‍याला वर दिलेल्या विशिष्ट मालाचा कारखाना काढावयाचा असेल, त्याला प्रत्येक ठिकाणी खपणार्‍या कापडाचा आकार, रंग, वगैरे गोष्टीबद्दल माहिती मिळविली पाहिजे.
    
कापसाच्या मालांपैकी चित्रित मलमलींत विशेष कारागिरी दिसते.  डाक्का, शांतिपूर, चितागांग वगैरे ठिकाणें या मालाकरिता बरीच प्रसिद्ध आहेत.

जगाच्या निरनिराळ्या भागांत किती चात्या जालतात त्याचें सन १९२२ मधील कोष्टक. व हिंदुस्थानांत सन १९१८-१९ सालीं यांत्रिक शक्तीनें चालणार्‍या गिरण्या.

कापडाच्या कारखान्यांतील कामकर्‍यांचें वेतन :- कापडाच्या कारखान्यांतील निरनिराळीं कामें करणारांस निरनिराळें वेतन मिळते.  सर्व हिंदुस्थानभर वेतनाचें एकच प्रमाण नाहीं.
    
कर, जकाती वगैरे - १८५७ च्या बंडानंतर कांही दिवसपर्यंत कापसाच्या आयात मालावर शेंकडा पांच टक्के कर होता.  पुढें तो दहा टक्के होऊन १८६४ मध्यें ७।। झाला.  १७७५ मध्यें तो पुन्हां ५ झाला.
    
हाउस ऑफ कॉमन्स सभेच्या ठरावान्वयें १८८२ मध्यें आयात मालावरील कर उठविण्यांत आला.  १८९४ मध्यें कापसाच्या मालाखेरीज इतर आयात मालावर कर बसविण्यांत आला.  तेव्हा एतद्देशीय कारखानदारांनीं तक्रार केल्यावरून कांही आयात मालावर जकात बसविण्यांत आली.  हिंदुस्थानांत परदेशाहून येणारें कापड व सूत मुख्यतः उच्च प्रतीचें असतें व हिंदुस्थानांत होणारा माल हलक्या प्रतीचा असतो.  तथापि मध्यम प्रतीचा माल हिंदुस्थानांतहि होतो व बाहेरुनहि येतो.  याकरतां बाहेरुन येणार्‍या मध्यम प्रतीच्या मालावर कर बसविल्यामुळें त्याला संरक्षित व्यापाराच्या तत्वावरील कराचें स्वरूप येऊं नये म्हणून हिंदुस्थानांत होणार्‍या कांही मालावर जकात बसविण्यांत आली.  कराचा बोजा दोन्ही कारखानदारांवर सारखा बसविण्याच्या या प्रयत्‍नास यश आलें नाहीं.  याकरितां इ.स. १८९६ मध्यें सुतावरील कर उठविण्यांत आला व बाहेरून येणार्‍या व एतद्देशीय कारखान्यांत होणार्‍या कापडावर सरसहा ३।। टक्के कर बसविण्यांत आला.  सध्यां परकी कापडावर ११ टक्के जकात आहे.  येथील कापडावरील जकात उठविण्याचा ठराव लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत पास झाला आहे.  १९२०-२१ सालीं या कराचें उत्पन्न २।। लाख रूपये होतें.
    
कापूस, देशी व परदेशी कापड व सूत यांचा व्यापार - १९१९-२० सालीं हिंदुस्थानांत २३०६३००० एकर जमीन कापसाच्या लागवडीखाली असून ५८४५००० गाठी कापूस झाला.  हल्लीं हातमागांवर काम करणारे कोष्टी क्वचितच सूत काढतात.  ते परदेशी अथवा देशी सूत विकत घेतात.  इ.स. १९१९-२० सालीं ८५६६६०० हंड्रेडवेट कापूस परदेशांत गेला.  त्याची किंमत सरासरी ५८।। कोटी रूपये होती.
    
हिंदुस्थानांत होणारा कापूस आंखूड धाग्याचा व हलक्या प्रतीचा असतो.   लांब धाग्याच्या कापसाला कारखानदार जास्त किंमत देत नसत.  म्हणून शेतकरीवर्ग अर्थातच जास्त पीक येणार्‍या आंखूड धाग्याच्या कापसाची लागवड करूं लागले.  या कारणामुळेंच गेल्या तीस वर्षांत लांब धाग्याचा व उच्च प्रतीचा कापूस हिंदुस्थानांतून नामशेष झाला.  हलक्या प्रतीच्या कापसाचा पुरवठा जवळ असल्यामुळें एतद्देशीय गिरणीवाल्यांनीं हलक्या प्रतीचा माल तयार करण्यांतच लक्ष घातलें व थोड्याच वेळांत निदान या मालाच्या बाबतीत तरी हिंदी बाजारांत परकीय आयात माल बंद झाला.  संयुक्त संस्थानाचा लांब धाग्याचा कापूस घेऊन इंग्लंड उच्च प्रतीचा माल तयार करूं लागलें व अशा रीतीने हलक्या प्रतीच्या हिंदी मालास इंग्लंडचा बाजार बंद झाला.
    
सुताचा स्थानिक व्यापार - हिंदुस्थानांतील गिरण्यांत दिवसेंदिवस दिवस जास्त सूत निघत आहे.  १९१९-२० साली हिंदुस्थानांत ६३,५७,६०,२७३ पौंड सूत तयार झालें.  यांपैकी मुंबई इलाख्यात ४३,९७,९९,६२५ पौंड, बंगालमध्यें ३,५२,२९,१७९ पौंड, मद्रासमध्यें ४,४३,४६,२६८ पौंड, संयुक्तप्रांतांत ३,५१,८१,२८४ पौंड, पंजाबांत ३३,५९,१०७ पौंड व एतद्देशीय संस्थानांत ३,८४,०४,९८३ पौंड सूत काढण्यांत आलें या सालच्या सुतापैकी ३५,५९,९६७ पौड सूत उच्च प्रतीचें म्हणजे ४० नंबरी सुतापेक्षां चांगलें होतें.  अर्वाचीन व्यापारांतील विशेष हा आहे कीं,  हिंदुस्थानांत होणार्‍या उच्च प्रतीच्या सुताचा पुरवठा वाढत असून त्याकरितां परदेशी कापसाची जास्त जास्त आयात होत आहे.  इ.स. १९०५-६ साली संयुक्त राज्य, जर्मनी, ईजिप्‍त व संयुक्त संस्थानें येथून १,६१,४७६ हंड्रेडवेट कापूस हिंदुस्थानांत आला.  हिंदुस्थानच्या कापसाच्या व्यापाराचे आकडे पाहिले असतां असें दिसून येतें कीं, उच्च प्रतीच्या आयातीची वाढ व हिंदुस्थानांत होणार्‍या त्याच वर्गाच्या सुताच्या निर्गतीची वाढ यांचें प्रमाण व्यस्त आहे.
    
१८८८-८९ सालीं ५,२५,००,००० पौंड सूत परदेशहून आलें.  हा आकडा कमी कमी होत १९०३-०४ सालीं २,८०,००,००० पौंड झाला.  परंतु १९०५-०६ साली तो ४,५७,५०,००० पौंड झाला.
    
१८७६-७७ सालीं ८०,००,००० पौंड हिंदुस्थानांत होणारें सूत परदेशी गेलें.  त्याची किंमत ३६,७५,०००रु. होती. १९०६-०७ सालीं हाच आंकडा २४,३५,००,००० पौंड असून त्याची किंमत १० कोटि रूपये होती. १९१९-२० सालीं १५।। कोटी पौंड सूत परदेशीं गेलें.
    
१९०५-०६ साली हिंदुस्थानांत तयार झालेल्या सुतांतून त्या सालीं परदेशीं गेलेल्या सुताचें वजन वजा जातां येथे ३५,७५,००,००० पौंड सूत राहिलें.  याशिवाय ४५,७५,०००० पौंड सूत परदेशहून आलें.  हें एकंदर सूत हिंदुस्थानांतील गिरण्या व हातमाग यांच्या उपयोगी पडलें.
    
कापड - हिंदुस्थानांतील गिरण्यांत १८९९-१९०० सालीं ९५०००००० पौंड कापड तयार झालें.  १९०५-०६ सालीं संस्थानांत तयार झालेला माल धरून १६३०००००० पौंड कापड तयार झालें.  १९१८-१९ सालीं ३४९५८०४५० पौंड कापड झालें.  हिंदुस्थानांत तयार होणार्‍या मालापैकी शेंकडा ८३ पांढर्‍या रंगाचा कोरा माल असतो.  १ पौंड वजनाचा कोरा कपडा सरासरी ४ वार लांब असतो.  येथें होणार्‍या उच्च प्रतीच्या कापडाचे प्रमाण निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळें असून मद्रासमध्यें शेंकडा ६४ कापड उच्च प्रतीचे असते.  मध्यप्रांतांत शेकडा ३८ व मुंबई इलाख्यांत शेकडा १७ उच्च प्रतीचें असतें.
१९१८-१९ साली ६४५ लक्ष रुपयांचे येथे होणारे कापड परदेशी गेले.     
कापडाची आयात - परदेशहून हिंदुस्थानांत येणार्‍या कापडाचा २/५ भाग ग्रेटब्रिटनहून येतो.  कापडाचे कोरें, धुवट व रंगित असे प्रकार आहेत.  १९०५-०६ सालीं या तीन प्रकारचें २,४६,३०,००,००० वार कापड परदेशहून हिंदुस्थानांत आलें.  यापैकी ६,७०,००,००० वार कापड पुन्हां परदेशी गेलें म्हणजे येथें २,३९,६०,००,००० वार कापड राहिलें.  याच सालीं हिंदुस्थानांत होणार्‍या कापडांतून निर्गत वजा जातां ५४,७०,००,००० वार कापड येथें राहिलें असें दिसतें.  म्हणजे या साली एकंदर हिंदुस्थानांत ३,०१,६०,००,००० वार कापडाचा पुरवठा होता असें दिसतें.  ३०,००,००,००० लोकसंख्येच्या मानानें पहातां दर माणशी दरवर्षी १० वार कापड पडूं शकतें.  १९१९-२० सालीं ५४ कोटी ७२ लाख रूपये किंमतीचें कापड परदेशांतून इकडे आलें.
    
एकंदरीत पहातां, हिंदुस्थानांतील गिरण्यांत होणारें सूत बर्‍याच मोठ्या प्रमाणांत चीन व इतर देशांत जातें.  येथें होणारें कापड बहुतांशीं याच देशांत खपतें.  हिंदुस्थानांत होणार्‍या कापसापैकी निम्मा कापसाच्या रूपांतच परदेशी जातो, १/४ सुताच्या रूपांत परदेशी जातो, १/४ हिंदुस्थानांत उपयोगांत येतो.  ज्याप्रमाणें येथें होणार्‍या सुतानें सुताची आयात बहुतेक थांबविली त्याचप्रमाणें येथें होणार्‍या कापडानें कापडाची आयात कितपत थांबते हें भविष्यकाली दिसून येईल.
    
कापूस बाजार - कापसाचा बाजार सर्व जगाचा आहे.  कारण हा माल टिकाऊ असून इकडून तिकडे नेण्यासारखा आहे.  याच्या जाती आणि निरनिराळ्या तर्‍हा यांची नमुन्यांवरून पारख करतां येते.  अगर त्या त्या जातींनां त्यांच्या चांगलेपणाबद्दल कांही ठराविक नांवे दिलेलीं असल्यामुळें नमुन्यांशिवाय नुसत्या नांवावर, तारेनें अगर पत्रानें दुरूनसुद्धा खरेदीविक्री करतां येऊन भावहि ठरवितां येतात.  नमुन्याप्रमाणें अगर नांवांत गृहीत धरलेल्या चांगुलपणाप्रमाणें माल न मिळतां जर वांधा पडला, तर दोन्ही बाजूचे तपासनीस (सर्व्हेअर) नेमून मालाची परीक्षा करण्यांत येते आणि शेवटीं ते जो निकाल देतील तो ग्राह्य मानावा लागतो.  अशा अनेक सोयी असल्यामुळे अगदीं थोड्या वेळांत अवाढव्य घेवाळ देवाळ होते; आणि भावांत सर्व जगामध्यें फारशी तफावत राहूं शकत नाहीं.
    
वायद्यांचे प्रयोजन - कापसाच्या व्यापारांत हजर-मालाची, त्याप्रमाणेंच वायद्याची खरेदीविक्री करतां येते.  वायद्याच्या खरेदीविक्रींत व्यापार्‍यांस मालाची खरोखरी जरूरी असेल किंवा त्यांचा केवळ सट्टयाचाच हेतू असूं शकेल.  वायद्याच्या प्रयोजनांत याप्रमाणें पुढील गरजेकरितां आजपासूनच तयारी ठेवावी हें कांही अयोग्य नाही.  दर एक कारखानदार भविष्यकाळीं आपणाला अजमासें किती माल लागेल याचा नक्की पडताळा ठरवून ठेवित असतो.  त्याला ज्या भावांत माल विकावयास परवडेल त्याच भावाला तो बांधला गेलेला असतो, आणि म्हणूनच कच्चा माल काय भावांत पुढें मिळेल याचा विचार त्याला अगोदरच करून ठेवावा लागतो.  कापसाचे पुढील भाव म्हणजें वायद्याचे भाव हे स्थानिक शेतकर्‍यांच्या मजुरीवर अवलंबून नसून जगांतील एकंदर पुरवठ्यावर, एकंदर मागणीवर आणि पिकांच्या बातम्यांवर तसेंच बाजाराच्या कांही विशिष्ट चळवळीवर अवलंबून असल्यामुळें त्यावर विचार करणें फारच भानगडीचें असतें.  कांही तरबेज धंदेवाईक तर केवळ या बाजारच्या चळवळींचाच अभ्यास करतात, आणि पुढील मागणीच्या कमीजास्त प्रमाणावर चालू भावांत फेरबदल अगर वाढघट कशी काय करावयाची याचा ते आपल्या या अभ्यासानें कयास बांधून त्याप्रमाणें बाजारभावाची घटना घडवून आणितात.  याप्रमाणें कापसाचे दलाल नवीन पीक कमी निघेल असा अजमास पहातांच आपले भाव वाढवितात आणि चालू मागणीस बराच आळा घालतात.   यामुळें असें होतें की, पुढील मागणीकरितां बराच माल शिल्लक राहूं शकतो व असें केल्याखेरीज गत्यंतरच नसतें. नाहीं तर चालू कमी भावांत बहुतेक माल उठविला जाऊन पुढें पीक कमी निघाल्यावर भाव भलताच कडकेल.  अशा रीतीनें भावाच्या वाढघटीला मोठ्या धोरणानें आळा घालावा लागतो.  कारण भलतीच वाढघट होणें व्यापाराला अंहितकारक असतें.  या व्यापारांत कांही लोक असे असतात कीं, त्यांनां व्यापारांतील पूर्ण ज्ञान कसें तें मुळींच नसतें; परंतु केवळ सट्टेबाजी अगर जुगार खेळण्याकरितांच ते या धंद्यांत शिरलेले असतात.  आणि त्यामुळें या लोकांत आणि पद्धतशीर खरेदीविक्री करणारे व्यापारी यांच्यांत सारखी चढाओढ लागून भावाचा निकाल ठरतो.  अर्थातच पद्धतशीर काम करणारेच शेवटी विजयी होतात हें निराळें सांगणें नको.
    
हजरमालाची खरेदी - अमका एक हजरमाल घेण्याचें ठरलें म्हणजे त्याचा नमुना पाहून भाव नक्की केला गेल्यावर त्यावर (गांसडीवर) ते आपला मार्क म्हणजे छाप घालून ठेवितात, व छाप घालून ठेवल्यापासून २१ दिवसांच्या आंत त्या मालाची 'डिलिव्हरी' घ्यावी लागते.  गिरणीवाला माल घेणारा असेल आणि गिरणीकरितां त्याला माल पाहिजे असेल तर तो माल गिरणीवाला गिरणीकडे रवाना करील.  बाहेरदेशीं व्यापार करणारा असेल तर तो जहाजाच्या सोयीप्रमाणें बाहेरदेशीं रवाना करील किंवा खरेदीविक्रीकरतांच केवळ घेतला असेल तर आपल्या गोडाऊनमध्यें तो माल मनाप्रमाणें भाव येईपर्यंत नेऊन ठेवील.  हंजरमाल गोडाऊनमध्यें पडलेल्या लॉटवर द्यावा लागतो.  समजा, गोडाऊनमध्यें १४६ गांठी एका नमुन्याच्या आहेत.  एखादा व्यापारी त्यांपैकीं शंभरच घेईल.  आतां बाकी राहिलेल्या ४६ गांठी मात्र एकदम सर्व द्याव्या लागतील.  त्याखाली सौदाच होणार नाहीं.
    
गजानन - माल तोल करून घेतांना 'गजानन' म्हणून एक दोन रत्तलाचा दगड वजनाच्या बाजूला लादण्यांत येतो; आणि माल नमुन्याप्रमाणें आहे कीं नाहीं हें मधून मधून गांसडीतील माल काढून घेऊन पहावें लागतें.  शंका असल्यास गांसडी खुशाल फोडावी.  माल नमुन्यासारखा असला तर ठीक, नाहीं तर ती गांसडी बाजूला ठेऊन पुढें माल घेण्यास आरंभ करावा.  नंतर वांध्याच्या गांसडीचा निकाल करावा.  वांघ्याच्या गासडीचा आपसांत निकाल न झाला तर दोन्ही पक्षाचे सर्वेअर नेमून त्यांच्या मार्फत निकाल करून घ्यावयाचा असतो.  अर्थात त्यांच्या निकालाप्रमाणें शेवटीं निमुटपणें वागावें लागतें.
    
खर्चाचा तपशील - हजरमालाच्या व्यापारांत होतां होई तोंपर्यंत इतर कांहीं भानगडी होत नाहींत.  वांधा पडल्यास तो फक्त माल नमुन्याप्रमाणें नसला तरच होतो.  अगर हिशेबाचे वेळी 'बारदान' आणि 'नमुन्या' विषयींचा वांधा होतो.  डिलिव्हरी घेतल्यानंतर रक्कम ठरींव दिवसांनी द्यावी लागतें.
    
भाव खंडीचा असल्यामुळें तोलाची वगैरे विशेष भानगड नसते.  हा तोल येणेंप्रमाणें :- २८ रत्तल = १ मण, ४ मण = हॅड्रेडवेट, ७ हंड्रेडवेट =१ खंडी.  अलीकडे वटाव ५।। टक्के देण्याचें बंद आहे.  फक्त गांसडीमागें दलाली आठ आणे, मुकादमी बारा आणे बारदान वगैरे (७।। - पासून १३ रत्तल) नमुना आठ आणे धर्मादाय वगैरे कापून हिशेब मिळतो.
    
वायद्याच्या खरेदीविक्रींत आजच रक्कम द्यावी लागत नाहीं.  रोजची खरेदीविक्री जमा नांवें होऊन वायदा तुटेल त्या दिवशीं प्रत्यक्ष माल अगर सट्टा असल्यास हिशेबांतील फरक घ्यावा द्यावा लागतो.
    
वायदे - ठराविक वायदे पुढीलप्रमाणें करतात.  या धंद्यात तूर्त तरी रक्कम गुंतून पडत नाही.  व्यापारी नसून हा धंदा करावयाचा असेल तर त्याला पेढी अगर दलालामार्फतच तो करावा लागेल.  अर्थात नफानुकसानीबद्दलची हमी म्हणून बाजारच्या परिस्थितीप्रमाणें जमा रक्कम ठेवावी लागेल. डिपॉझीट रक्कम दलालाजवळ ठेवण्यापेक्षां पेढीवर ठेवणें अधिक चांगलें.  पेढीवरील काम सुद्धां दलालच करीत असतात.  परंतु पेढीची स्थायिकता जास्त.  दलाल तेव्हां बारगळेल याचा नेम नसतो.  पेढीचा व्यवहार फार मोठा असते आणि कांही तरी व्यवस्थित चाललेला असतो.  म्हणून अनामत रक्कम बुडण्याचा धोका बराच कमी असतो.  शिवाय पेढीमार्फत वाटेल तसा धंदाहि करतां येतो.  हजर मालाचा, वायद्याचा किंवा तेजीमंदीचा यापैकी मनास येईल तो धंदा करावा.  तेजीमंदीप्रीत्यर्थ कच्च्या खंडीला काय अगर पक्क्या खंडीला काय दर एक खंडीमागें २।। - रूपये तरी निदान डिपॉझिट ठेवावें लागतें.  मग तें दलालाजवळ ठेवावें अगर पेढीवर ठेवावें.
    
वरील सर्व व्यवहार दलालामार्फत चालतात.  त्यांची दलाली दर एक गांसडीपाठीमागें ८ आणे असते.  ही दलाली माल देतांघेतां मिळूनची असते.  नुसता माल घेऊन दिला अगर नुसता विकून दिला तर दलाली अर्थात ४ आणेच त्यांनां मिळेल.  मोठ्या धंद्यांत शंभर खंडीमागें ७५ रु. असे कांही उक्ते ठरावहि करून घेतां येतात.  २ गांसडी म्हणजे जवळ जवळ १ खंडी होते.
    
कच्च्या खंडीच्या व्यवहारांत दलालास दलाली माल देतां घेतां दर खंडीमागें चार आणे असते.  कच्च्या खंडीचा अर्थ असा आहे की त्यांत केवळ सट्टा असून माल प्रत्यक्ष देवाण घेवाण होत नसतो.  आणि सौदे बहुधा ५० खंडीच्या खालीं आणि स्टँपवर नोंदल्याशिवाय होत असतात.  येथील तेजीमंदी ५१ च्या वर गेल्यास देण्याघेण्याची नसते असे ठरलें आहे.  कच्च्या खंडीच्या व्यवहारांत मोठमोठाले व्यापारी अगर दलाल नसतात.  हा धंदा किरकोळ लोकच करतात.  याचा बाजार (मुंबई) सराफ बाजाराजवळ काळबादेवी रोडवर आहे.  हिशेबाचा दिवस सोमवार ठरलेला आहे.  
    
कुलाब्याचें - हल्लीं शेवडीचें - मार्केट फार मोठें आहे.  वरीलप्रमाणें हजर मालाच्या खेरीज करून वायद्याच्या वगैरे शंभर गांसडीखालीं येथें सौदाच होत नाही.  सर्व व्यवहार स्टँपवर वगैरे चोख होतात.  तेथील हिशेबाच्या तारखा अलीकडे दर महिन्यास १० वी आणि २५ वी अशा दोन ठरलेल्या आहेत.  या दिवशीं सर्वांनी एकमेकांचा हिशेब पुरा करून चुकता केला पाहिजे असा नियम केला गेला आहे.  तरी पण आपापसांत खात्यावर बाक्या ओढून व्यापारी व्यवहार पुढें चालू करतात.
    
या व्यवहारांत निरनिराळे प्रकार आहेत ते असे :- (१) स्वतःच्या पैशावर, म्हणजे पेढीवाले अगर इतर व्यापारी व गिर्‍हाईक. (२) पेढीमार्फत, म्हणजे पेढीच्या पैशावर अगर स्वतःच्या पैशावर.  (३) मार्जिन ठेऊन म्हणजे पेढीवाल्याजवळ अगर दलालाजवळ मार्जिन म्हणजे तेजीमंदीच्या फरकाची रक्कम ठेऊन.
    
स्वतःच्या पैशावर व्यापारी रीतीप्रमाणें पेढीवाले अगर व्यापारी अगर त्यांची गिर्‍हाईकें (देशी किंवा परदेशी) खरेदीविक्री करूं शकतात.  फक्त दलालाची मध्यस्थी असली म्हणजे झालें. या व्यवहारांत हजर माल तर घेतां येतोच पण वायदा अगर सट्टाहि करतां येतो.  किंवा इतकी तेजी किंवा इतकी मंदी होईल असें स्वतःशी ठरवून ''तेजी'' लावावयास किंवा ''मंदी'' लावावयास येते; अगर दोन्हीहि लावावयास येतात.
    
पेढीमार्फत स्वतःच्या पैशावर धंदा केला तर पेढीवाल्यास फक्त आडत व दलालास (पेढीवाल्याच्या) दलाली द्यावी लागते.  पेढीचा पैसा वापरला तर अर्थात वरच्या दोन कलमांत व्याजाचें तिसरें कलम अंगावर येतें.  पेढीवाल्यामार्फत वरीलप्रमाणें सर्व व्यवहार करतां येतात.
    
पेढीवाल्यामार्फत अगर कपाशीच्या धंदेवाईक दलालाजवळ 'मार्जिन' बद्दल म्हणजे फरकाबद्दल पैसे  आगाऊ भरून त्यावर धंदा करतां येतो.  फक्त 'हजरमाला'च्या धंद्याचा यांत अंतर्भाव होऊं शकत नाहीं.  ''वायदा'' आणि ''तेजीमंदी'' चा धंदा मात्र करतां येईल.
 
वरील तीनहि प्रकारांत 'अदलाबदल' वाटेल तशी वाटेल त्यावेळी आपल्या धोरणाप्रमाणें करतां येते.  मार्जिन ठेऊन धंदा केल्यास मात्र मार्जिनच्या रकमेबाहेर नुकसानीची रक्कम जाणार नाहीं अशी काळजी घेतली जाते.
    
अदलाबदल - समजा भडोचजिनचा कापसाचा भाव ६०० रु.  आहे व त्यांत खरेदी अगर विक्री केलेली आहे.  थोड्या वेळानें अगर दुसर्‍या दिवशीं जर भाव खालीं गेला (म्हणजे ५९९ अगर खालीं), किंवा चढला (६०१ अगर वर) तर त्या चढत्या अगर उतरत्या भावांत खरेदी अगर विक्री करतां येतें.  म्हणजे आपल्या धोरणाप्रमाणें ६०५ च्या वरती भाव जाईल असें नसेल तर ६०५ भाव आल्याबरोबर आपला खरेदीचा माल काढून टाकणें अगर पुनःबाजारचें ''ध्यान'' तेजींतच असलें तर पुनः त्या भावांत खरेदी करून चढत्या भावांत विक्री करतां येते.  याचप्रमाणें उतरत्या भावांतहि करतां येतें.  यामुळें नुकसान होतां होईतों येत नाही; किंवा आलेंच तर फार कमी येतें.  ५९९ भाव झाला तर दर खंडीमागें १ रु. नुकसान येईल.  भाव भलताच उतरला तर या एवढ्या नुकसानीवरच सुटका होईल.  पण समजा पुनः तेजीचा रंग दिसला आणि चालू भाव ५७० असला तर पुनः खरेदी करून अपेक्षेप्रमाणें तेजीच्या भावांत विक्री करतां येते.  पण भाव उतरून आपलें धोरण चुकीचें ठरलें तर चटकन पुनः विक्री करतां येते अशी चढत्या व पडत्या भावांत खरेदीविक्री करणें याला अदलाबदल करणें म्हणतात.
    
या बाजारांत सर्वस्वी मारवाडी लोकांचाच जोर आहे.  गुजराथी आणि भाटियेहि पुष्कळ आहेत.  पण त्यांचा जोर मारवाडी लोकांपुढे टिकाव धरूं शकत नाहीं.  गुजराथी व भाटिये हे बहुधा हजर मालांत विशेष धंदा करतात.  बाजारांत भाषा मारवाडी व गुजराथी वापरली जाते.  इतर देशांच्या व्यापार्‍यांचे एजंटहि मारवाडी अगर गुजराथी असल्यामुळें परदेशी लोक बाजारांत फारकरून दिसत नाहीत.  बाजारांत परदेशी लोक म्हणजे जपानी आणि यूरोपीयन हे आलेच तर ते प्रत्यक्ष भाग न घेतां बाजूस एकत्र उभे राहून आपापल्या दलालास काय करावयाचें त्याबद्दल सूचना करतात.
    
कपाशीच्या तेजीमंदीचीं कारणें अनेक आहेत.  पाऊस पाणी व्यवस्थित असेल तर मालाची पैदास जास्त होईल आणि वायद्याच्या धोरणापेक्षां मालाची पैदास जास्त झाली तर अर्थात त्यावेळीं भाव घटून चढत्या भावाच्या विक्रींत वायद्याच्या कमी भावाच्या खरेदीनें नफा मिळवितां येईल. आणि अजमासापेक्षां कमी झाली तर अर्थात उलट परिणाम होईल म्हणजे चालू भावापेक्षांहि वायद्याचा भाव तेजीचा होईल आणि साहजिक नुकसान अंगावर येईल.  यावरून असें दिसून येईल की, मालाची पैदास आणि मागणी यांचा एकमेकांवर उलट परिणाम होऊन भाव घटतो अगर वाढतो.  येथील मिलवाले यांच्याहि अनपेक्षित मागणीमुळें बाजारांत बरीच वाढघट होते.
    
बंदरांत आगबोटी पुष्कळ असल्या तरी लगेच परदेशी व्यापारी अगर त्यांचे एजंट मालाच्या खरेदीला सुरूवात करतात आणि लागलीच माल बाहेरदेशी रवाना करतात.  अर्थात मागणी जास्त झाल्यामुळें भाव वाढतो.  याच वेळी आगबोटीच्या भाड्याबद्दलहि विचार करावा लागतो.  भाडें जास्त असल्यास येथून माल त्या देशीं कोणत्या भावांत जाऊन पडेल आणि इतर देशचा त्याच नमुन्याचा माल तेथे कोणत्या भावांत जाऊन पडेल याचा हिशेब पाहतां ज्या ठिकाणाहून माल स्वस्त येऊं शकेल तेथें खरेदी होईल.  आणि येथील मालाची मागणी मंदावून भाव लागलीच मंदींत येईल. पुरेशा आगबोटी बंदरांत नसल्या तर आगाऊच मालाच्या खरेदीकरितां कोणीहि परदेशी व्यापारी खटपट करणार नाही.  कारण माल घेऊन विनाकारण रक्कम गुंतवून आणि जोखीम अंगावर ठेवून घेण्यास सहसा कोणी तयार होणार नाही.  सट्टाच करावयाचा असेल तर मात्र गोष्ट निराळी.
    
रोकडबाजारांत नाण्याची टंचाई झाली तर भाव उतरण्याचा बराच संभव असतो.  कारण लोकांजवळ रोकड नसल्यामुळें खरेदी कमी होईल आणि भाव उतरेल.
    
लढाई वगैरे जरी नेहमीची तेजीमंदीची कारणें नसलीं तरी या चारपांच वर्षांत भावामध्यें भयंकर खळबळ होऊन कशासच घरबंध राहिलेला नाहीं; आणि नक्की धोरण बांधणें फार मुष्किलीचें झालें आहे.
    
हा व्यापार सर्वस्वी परदेशी बाजारावर अवलंबून आहे.  लिव्हरपूल आणि न्यूयार्क येथील भावावर मुंबई येथील मार्केटमधील भाव चढतात अगर उतरतात.  हिंदुस्थानचा हा व्यापार जरी फार मोठा आहे तरी हिंदुस्थानच्या भावावर कोणतेंहि परदेशी मार्केट, हिंदुस्थान ज्याप्रमाणें परदेशी मार्केटवर अवलंबून आहे, त्याप्रमाणें अवलंबून नाहीं.  म्हणजे स्वतःच्या हिमतीवर भावांत चढउतार करण्याची आणि परदेशास त्या भावांतच खरेदी करण्याला लावण्याची ताकद हिंदुस्थानास नाहीं.  एक्सपोर्ट कस्टम डयुटी दर एक गाठडीमागे चार आणे आहे.
    
परदेशीकोटेशन - हा माल परदेशाहून इकडे थोडा येतो तर येथून परदेशी जास्त रवाना होतो.  बहुधा इंग्लंड आणि जपान या दोन देशांत माल जास्त जातो.  या परदेशच्या मागणीवर फार बारकाईनें नजर ठेवावी लागते.  परदेशी लोकहि वायदे, सट्टे वगैरे करतात.  परंतु या धंद्यांत सुद्धां ते फार पद्धतशीर रीतीनें वागतात.  एखाद्या वेळीं माल तेजींत जरी अंगावर आला तरी तो बाहेरदेशी पाठवून त्याचा पक्का माल तयार करवून त्यांनां फायदा करून घेतां येतो तसा मारवाडी वगैरे लोकांस करून घेतां येत नाही.  कारण पक्का माल पुरेसा तयार करण्याइतक्या गिरण्या हिंदुस्थानांत नाहींत.
    
देशावरील उभीं शेतें खरेदी करण्याची पद्धत रॅली ब्रदर्स वगैरेंनी अमलांत आणली होती.  ही तर्‍हाहि जवळजवळ सट्टयासारखी होती.  कारण अपेक्षेप्रमाणें माल उतरला तर ठीक, नाहीं तर नुकसान ठरलेलेंच.  अलीकडे हा प्रकार बंद झाला आहे.
    
(संदर्भग्रंथ - डी. वाच्छा यांनी १९१८ साली लंडनच्या 'रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स' पुढें वाचलेला निबंध, केसरी ११-१२-१९१७; आश्व.  श्रौ. सूत्र, इं.गॅ.३; सातव्या इंडस्ट्रिअल कॉन्फरन्सचा रिपोर्ट; रिव्ह्यू ऑफ ट्रेड इन् इंडिया; पुसा त्रैमासिक १९१८; प्रेस कम्युनिक ऑफ इंडियन गव्हर्मेंट ३ जुलै १९१८; ब्रिटानिकेंत ग्रेटब्रिटन व इतर देश यांतील कापडाच्या कारखान्यावरचे बरेचसे संदर्भग्रंथ आढळतील, दि इंडियन ईयर बुक व सरकारी कमर्शिअल स्टॅटिस्टिक्स यांत हिंदुस्थानांतील गिरण्यांची स्थिति दिग्दर्शित केलेली आहे.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .