प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
कापूर, (१) नांवें. - बर्‍याच यूरोपियन भाषांतील व हिंदुस्थानांतील निरनिराळ्या देशभाषांतील कापराचीं नांवें जवळ जवळ सारखींच आहेत.  उदा. इंग्रजी कॅम्फर, संस्कृत कर्पूर, आरबी काफूर, मराठी कापूर वगैरे.
    
टर्पीन द्रव्यांच्या कीटोन व मद्यार्क (अल्कोहल) यांनां सर्वसाधारण नांव कापूर असें आहे.  कित्येक झाडांच्या तेलांत हे सांपडतात.  तेलाचें ऊर्ध्वपातन करून हे निराळे करतात.  यांचा रंग पांढरा असतो व यांस एक विशिष्ट प्रकारचा वास येतो.  हे पाण्यांत विरघळत नाहींत परंतु मद्यार्क व इथरमध्यें लवकर विरघळतात.  त्यांच्या अनेक जाती आहेत.
    
कापूर पांच दहा प्रकारच्या झाडांपासून निघतो.  हिंदुस्थानांत केळीच्या जातीचें एक झाड आहे.  त्यास कापूर केळ म्हणतात.  या झाडापासूनहि कापूर काढतात.  वैद्यकावरील संस्कृत लेखकांस पक्व  व अपक्व असे दोन प्रकारचे कापूर माहीत होते. पक्व म्हणजे उष्णतेच्या सहाय्यानें तयार केलेला, हा सिनामोमम कॅम्फोरा चिनी किंवा जपानी असावा.  अपक्व म्हणजे मूळचा, हा ड्रियोबॅलनॉप्स कॅम्फोरा असावा.  ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलें तर दुसरी जात प्रथम माहीत होती.  वरील दोन्ही जातींची झाडें हिंदुस्थानांत मूळची नव्हतीं; अथवा सध्यां देखील त्यांची विशेष प्रमाणावर लागवड होत नाही.  चिनी व अरबी व्यापार सुरू झाल्यावर वरील दोन्ही प्रकारचे कापूर हिंदुस्थानांत माहित झाले असावेत असा तर्क आहे.  लवंग व दुसर्‍या कित्येक पदार्थांच्या नांवांच्या इतिहासावरून असें दिसून येईल की, प्रचलित व्यापारी नांवे मूळच्या नांवापासून निघालेली आहेत असें नाही.  संस्कृत कर्पूर नांवावरून जावामधील कापूर हे नांव आलें असावें.
    
इतिहास - ऐने -ई-अकबरीमध्यें भीमसेनी कापराची झाडें म्हणून ज्यांचा उल्लेख केला आहे ती बहुधा सिनामोमम झेलॅनिकम असावींत.  यांच्या लाकडाला कापरासारखा वास येत असल्यामुळें यांनां कापराचें लाकूड हें नांव मिळालें असावें.  यावरूनच अबुलफजलला वाटलें असावें की, कापूर उत्पन्न होणारें हें हिंदुस्थानांतील एक झाड आहे.  याच्या विषयीं प्राचीन उल्लेख सिंदबादच्या दुसर्‍या सफरीत येतो.  त्याने झाडांनां खांचा करून कापूर काढण्याची रीत वर्णन केली आहे.
    
''गार्शिया डी ओर्टा'' यानें १६ व्या शतकांत जपानी कापूर व बोर्निया व सुमात्रामधील कापूर यांबद्दल माहिती दिली आहे.
    
जपानी कापूर (सिनामोमम कँफोरा) हें साधारण उंचीचें व नेहमीं हिरवें असणारें झाड असून चीन, जपान, कोचीन-चीन व फोर्मोसा वगैरे ठिकाणी होतें.  हिंदुस्थानांत कांही ठिकाणीं ह्या झाडाची लागवड सूरु असून योग्य ठिकाणीं हें झाड चांगलें वाढतें.  कलकत्ता व साहरणपूर येथील बागांत कापराचीं सुंदर झाडें आहेत.  हीं झाडें डेहराडूनमध्यें चांगली होत असून निलगिरी पर्वतांत ७००० फूट उंचीपर्यंतच्याहि प्रदेशांत ही झाडें चांगली वाढतात.
    
या झाडांपासून कापराचा बराच पुरवठा होतो.  फोर्मोसा बेटांत चांगल्या प्रतीचा पुष्कळ कापूर होतो.  हें बेट जपानच्या ताब्यांत गेल्यापासून कापराचा व्यापार सर्वस्वी जपानी सरकारच्याच ताब्यांत आहे.  १९०० सालीं जपानमध्यें १३४ टन, चीनमध्यें ९८ टन व फोर्मोसांत २६८० टन कापूर झाला.  असें म्हणतात की चीन देशाशीं झालेल्या कांही करारावरून चिंच्यू (फूकीएन) येथून परदेशास जाणार्‍या कापरावर जपानचें बरेंच वर्चस्व असतें.  याच ठिकाणाहून पूर्वी सिकोक (जपान) मधील टोस्टप्रांत व पूर्व फोर्मोसा यांच्याप्रमाणें हिंदुस्थान व यूरोप यांच्याशीं कापराचा व्यापार चालत असे.  
    
'बोर्निओ आणि सुमात्रामधील कापूराचें' (ड्रिओबालनॉप्स अॅरोमॉटिका) उंच झाड असून तें डच सुमात्रा बेटाचा वायव्य किनारा, उत्तर बोर्निओ व लेबुअनमध्यें होतें.
    
झाडाच्या लांकडांत ओबडधोबड स्फटिक तयार होतात. हा बेरसकॅम्फर (बेरस कापूर) असून हिंदुस्थानांत याला भीमसेनी अथवा बरस कापूर म्हणतात.  झाडाच्या मध्यभागीं व फांद्या फुटतात त्या ठिकाणीं हे स्फटिक सापडतात.  परंतु सालीच्या खाली सुद्धां कापूर सांपडतो.  कापूर तयार करण्याकरिता झाड तोडून त्याचे लहान लहान तुकडे करतात.  साधारण झाडापासून ११ पौंड कापूर निघतो.  जुन्या झाडांपासून सर्वांत जास्त निघतो.  मलाईलोक हा कापूर प्रेतात भरून ठेवितात व होमहवनादिकांसाठीं याचा नेहमीं उपयोग करतात.  यामुळें तेथें कापराला चांगली किंमत येते.  प्रथमतः जगाला ज्या कापराची माहिती झाली तो कापूर याच झाडापासून काढला असावा.
    
न्गाई कापूर ज्यापासून निघतो त्या 'ब्लूमिआ बालसामिफेरा' झाडाची बरीचं प्रसिद्धि आहे.
    
सर्व जगास कापराचा पुरवठा करण्याचा मक्ता जपाननें आपल्याकडे ठेवल्यामुळें अलीकडे कापराचा भाव फारच वाढला आहे.  ह्यामुळें अमेरिकेंत रासायनिकरीत्या बनावट कापूर तयार करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.  कापराचा भाव वाढल्यामुळें दुसराहि असा परिणाम झाला कीं, इतर देशांतील मळेवाल्यांचे लक्ष कापराच्या झाडांची लागवड करण्याकडे वेधलें आहे.  सिनामोमम कॅम्फोरा (जपानी कापूर) याच्या पानाच्या तेलापासूनहि कापूर तयार करतां येतो असें हूपर यानें  अॅग्रिकल्चरल लेजरमध्यें दिलेल्या प्रयोगांवरून दिसून येतें.  ५० पासून १०० वर्षांच्या झाडाच्या लांकडापासून व मुळापासून कापूर निघतो अशी समजूत होती.  त्यामुळें फक्त सरकारला काय तें अशा तर्‍हेचीं झाडें मोठ्या प्रमाणावर लावून त्यांचें उत्पन्न इतक्या वर्षांनीं घेणें शक्य होतें.  परंतु हिंदुस्थान, अलजीरिया, संयुक्त संस्थानें व कांही जर्मन वसाहती यांत केलेल्या प्रयोगांवरून असें दिसून आलें की, चहा, काफी व नीळ वगैरे मळे असणार्‍या लोकानां कापराचें दुय्यम पीक काढतां येईल.  परंतु पूर्वी जी याबद्दल आशा वाटत होती त्याप्रमाणें याचें पीक मात्र आलें नाही.  यूरोपमध्यें कापराचा अति महत्वाचा उपयोग म्हणजे सेल्युलाईड तयार करणें हा होय.
    
व्यापार - कापूर शुद्ध करण्याचा मुंबई व दिल्ली येथें एक मोठा धंदाच आहे असें म्हटले तरी चालेल.  शुद्ध करणारा ज्या किंमतीला अशुद्ध कापूर विकत घेतो, त्याच किंमतीला जवळ जवळ शुद्ध केलेलाहि तो विकतो.  परंतु बरेचसें पाणी कापरांत शोषलें जाऊन त्याचें वजन वाढतें यामुळें त्याला फायदा होतो.
    
कापराच्यासंबंधांत जपानी व्यापाराची वाढ ज्या मानानें होते त्याच मानानें संयुक्त राज्य, हांगकांग व स्ट्रेट सेटलमेंट येथील कापराची मागणी मंदावते.
    
जपानी कापूर व यूरोपियन कापूर यांच्या किंमतींची तुलना केली तर असें दिसून येईल कीं, जपानी कापराची किंमत जास्त आहे.  याचें कारण जपानहून शुद्ध कापराचीच आयात जास्त होते.  मुंबई व बंगाल येथून कापूर मुख्यत्वें करून बाहेर जातो.  साधारणतः नाताळ हें चांगलें गिर्‍हाईक आहे.  परंतु स. १९०४ पासून संयुक्त राज्यानें पहिला नंबर पटकाविला आहे.
    
कापराचें तेल - या नांवाचे अगदीं वेगळाले असे दोन पदार्थ आहेत.  एक बोर्निओमधील ओलिओरेझिन हें होय.  हे तेल लांकडांपासून ऊर्ध्वपातनक्रियेनें अथवा झाडाला नळ्या लावून काढतात; तेथील झाडें रसाचा दाब सहन करूं शकत नसल्यामुळें एकदम फुटतात अथवा त्यांना मोठ्या भेगा पडतात.  गील्ड मीस्टर व हॉफमन म्हणतात कीं, हें तेल बाजारांत मिळत नाहीं.
    
दुसरें फॉर्मोसा व जपानमधील कापराचें तेल होय.  हें पिंगट रंगाचें असून त्यांत कापराचा बराच अंश असतो.  या तेलाचें उष्णमान कमी झाल्याबरोबर कापूर तळाशीं बसतो.  तेल थंड केलें तर कापराचे स्फटिक बनतात.  ते काढल्यावर तेलाचा पिंवळा जर्द अथवा तपकिरी पिंवळा रंग होऊन त्यास उग्र वास येतो.  फोर्मोसा बेटांत हें तेल पूर्वी निरूपयोगी म्हणून टाकीत असत.  जपानमध्यें लाखेच्या व रंगाच्या कामांत याचा उपयोग करीत असून त्यापासून कापूर देखील काढतात.
    
बाजारांत दोन जातींचा कापूर विकावयास येतो व तो दोन भिन्न जातींच्या झाडांपासून उत्पन्न होतो.  एका जातीचीं झाडें बोर्निओ, सुमात्रा व लाब्युअन या बेटांत होतात व दुसर्‍या कापराचीं झाडें चीन व जपान देशांत होतात.फोर्मोंसा बेटांत या झाडाच्या मोठाल्या बागा आहेत.  या झाडांची लागवड इतर देशांत करण्याचे पुष्कळ प्रयत्‍न होत आहेत.  परंतु त्यांत फारसें यश आलेलें दिसत नाही.
    
चिनी कापूर पाण्यांत डाहाळ्या वगैरे उकळून ऊर्ध्वपातन क्रियेनें काढतात व बोर्निओमधील कापूर झाडांत स्फटिक रूपानें सांपडतो हें वर सांगितलेंच आहे.
    
गुणधर्म - शुद्ध  केलेला कापूर पांढरा व अर्धवट पारदर्शक असतो.  त्याची पूड लवकर होत नाही.  परंतु त्यांत मद्यार्काचा किंवा तेलाचा थेंब टाकल्याबरोबर तो वितळतो.  याची रूचि कडवट व तिखट असते.  कापूर ज्वालाग्राही असून त्याची ज्योत सतेज पण धुरकट असते.  हवेंत उघडा राहिल्यास तो लवकर नाहींसा होतो.  कापराचा वास उग्र असल्यामुळें कपडे व पुस्तकें ठेवण्याच्या कपाटांत व पेट्यांत व त्याचप्रमाणें मृतप्राणी व वनस्पती ठेवण्याच्या पेट्यांत कापूर घालतात.  कापराचे अनेक औषधी उपयोग आहेत. (फार्माको, इंडिका ३,२०० ऐनी-अकबरी; ब्रँडिस-इंडिअनट्रीज; व हॉफमन-व्हालटाईल ऑईल्स; वॅट; पदे)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .