प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
कान्हेरी - लेणीं.  संस्कृत कृष्णगिरी शब्दाचा हा अपभ्रंश आहे.  ठाणें शहराच्या पश्चिमेस सुमारें पांच मैलांच्या अंतरावर व मुंबईच्या उत्तरेस सुमारें २० मैलांच्या अंतरावर साष्टी बेटाच्या मध्यभागीं ही लेणी आहेत.  हीं उत्तर अक्षांश १९ १३' व पूर्व रेखांश ७२ ५९' यावर आहेत.  हीं लेणी शंभरावर आहेत.  जी.आय.पी. रेल्वेच्या भांडुप स्टेशनापासून किंवा बडोदा रेल्वेच्या बोरिवली स्टेशनापासून या स्थानीं जातां येतें.
    
बोरिवलीच्या रस्त्याच्या ज्या जागेपासून कान्हेरीची पायवाट फुटते त्या जागेपासून तुळशी तलावाच्या पात्रांत एक लेणें आहे.  येथें उन्हाळ्यांत मात्र पाणी नसतें.  तुळशीपासून वायव्येकडे कामन नांवाच्या डोंगराची जी ओळ आहे, तिची कान्हेरी ही शाखा आहे.
    
पश्चिमेकडील कड्याखालून दाट झाडीनें आच्छादिलेल्या एका ओढ्याच्या पात्रांतून झिजलेल्या खोदीव पायर्‍यांच्या जिन्यानें झुडपांनी आच्छादिलेल्या एका पटांगणामधून वर गेलें म्हणजे एक थोडा पुढें आलेला खडक लागतो.  त्याच्या पश्चिमेकडच्या बाजूस एक मोठें खोदीव लेणें आहे, त्याला 'चैत्य' म्हणजे देऊळ म्हणतात (नं. ३).  एका खोल व सरासरी पूर्वपश्चिम  जाणार्‍या अरुंद अशा घळीच्या तोंडाशीं हें लेणें आहे.  ह्या अरूंद घळीच्या दोन्ही बाजूंच्या खडकांत हीं लेणी खोदलेली आहेत.  घळींच्या उत्तरेकडच्या ठेंगण्या काठाकडे लेण्यांची एकच रांग खोदण्यापुरती जागा आहे.  परंतु दक्षिणेकडच्या उंच डोंगरांत लेण्यांच्या एकावर एक अशा तीन रांगा खोदलेल्या असून, एका मजल्यावरच्या रांगेकडून दुसर्‍या मजल्यावरील रांगेकडे जाण्याकरिता ओबडधोबड अरुंद पायर्‍यांचे मोठाले जिने खोदलेले आहेत.  उत्तरेकडच्या लेण्यांच्या रागांच्या पाठीमागें खडकाचे दोन उंचवटे असून त्यांत धातुगोप (दागोवा) किंवा 'स्तूप' यांचे अवशिष्ट अंश आढळतात.  ओबड धोबड खोदीव पायर्‍यांच्या जिन्यानें ह्या उंचवट्याकडे जातां येतें.  दक्षिणेकडील लेण्यांच्या वरच्या बाजूची चढण व सपाट पटांगण ह्यांवर पायर्‍या व पाण्याचीं टांकीं खोदलेलीं आहेत.  ह्या ठिकाणीं पूर्वी स्तूप धातुगोप अथवा चैत्यें (देवळें) होतीं.
    
कान्हेरी येथील कोणत्याहि लेण्यांत तें अशोक राजाच्या कालाइतकें जुनें असल्याची खातरी होण्यासारखीं चिन्हें आज दिसून येत नाहीत.  तथापि नंबर ५, ८, ९, ५८ व ५९ चीं लेणी साधीं असल्यामुळें ती अतिशयच जुनीं म्ह.इ.स.पू.१०० वर्षांपासून तों. इ.स. नंतर ५० वर्षापर्यंतच्या काळांतलीं असावींत असें दिसतें नाशिक येथील तिसर्‍या लेण्यांतील लेख नं. २६ यांत राजा द्वितीय गोतमीपुत्र (इ.स. १७७-१९६) याच्या कारकीर्दीत सह्य, विंध्य व मलय ह्या पर्वतांच्या पंक्तीस बसण्यासारखा प्रसिद्ध कान्हेरीचा डोंगर होता असें सांगितले आहे, त्यावरून पूर्वोक्त लेण्यांच्या जुनाट पणाविषयींच्या अनुमानास बळकटी येते.  कान्हेरी येथील पांचव्या लेण्यांत एक कोरींव लेख आहे; त्यावरून असें दिसून येतें की, वासिष्ठिपुत्र नामक राजाच्या कारकीर्दीइतक्या जुन्या (इ.स.१४००) काळीं येथील जुन्या लेण्यांकरितां टाकी केलेली होती.  येथल्या सुमारें पन्नास कोरीव लेखांचा अर्थ लाविलेला आहे.  त्यांपैकी दहा लेखांच्या लिपीच्या वळणावरून ते लेख ख्रिस्ती शतकापूर्वीचे असावे, असें दिसतें शातकर्णी वंशीय राजांच्या कारकीर्दीत (इ.स.पू. २०० ते इ.स.नं. ३५०) व विशेषतः दुसर्‍या यज्ञश्री गोतमीपुत्रा नामक राजाच्या कारकीर्दीत (व्हि.स्मिथच्या मतें इ.स. १७३-२०२) कान्हेरी येथील विहारांची फारच भरभराट होती असें दिसतें.  पन्नास कोरीव लेखांपैकी वीस कोरीव लेख या कारकीर्दीच्या सुमारास खोदलेले आहेत.  त्यांत राजे, त्यांचे प्रधान व शेटसावकार यांनी येथील जोग्यांच्या सोईकरितां लेणीं,  पाण्याची टांकी, जमिनी व रोकड पैका यांच्या देणग्या दिल्याचा उल्लेख आहे.  तिसर्‍या रांगेतली सगळीं व तिसर्‍या नंबरचें थोरलें चैत्य (देऊळ) हीं, ह्याच काळी कोरली गेली असावी.  इ.स. ४ थ्या शतकांत ३८ व्या लेण्यांतील खोदीव चित्रयुक्त दगडी स्तूप बांधिला असावा व पांचव्या शतकांत तिसर्‍या लेण्याजवळचा स्तूप बांधिला असावा.  पन्नासांपैकी दहा कोरीव लेख इ.स. च्या पांचव्या व सहाव्या शतकांतील आहेत.  यावरून ह्या दोन्हीं शतकांत नवीं लेणीं कोरण्याचा व जुन्या लेण्यांस नवीन कोरीव दागिन्यांनीं भूषविण्याचा क्रम चालू होता असें दिसतें.  हीं नवी लेणीं व नवीं भूषणे जुन्यांहून विशेष सुबक आहेत.  ही बौद्धधर्माच्या अर्वाचीन म्हणजे महायान पंथाच्या काळीं निर्माण झाली असावीं.  ज्याला दरबार भरण्याचें लेणें म्हणतात तें १० वें लेणें, पहिल्या रांगेच्या शेवटचीं इतर लेणीं, चैत्यांच्या (नं.३) पडवीच्या दोन शेवटांकडील गौतम बुद्धाचे दोन राक्षसी पुतळे आणि इतर अनेक लहान खोदीव चैत्यें ही याच काळची होत.
    
कान्हेरी येथील कोरीव लेखांपैकी नं. ५४ चा अर्थ थोडाफार लागलेला आहे.  यांपैकी ६६ व्या लेण्यांतील तीन लेख पल्हवी भाषेंत आहेत.  १० व्या लेण्यांतील एक व ७८ व्यांतील एक असे दोन लेख संस्कृत भाषेंत आहेत. बाकीचे सगळे लेख लेण्यांतील लेखांत ज्या प्रकारची प्राकृत (बाल) भाषा आढळते, तींत लिहिलेले आहेत.  सतराव्या लेण्यांतील लेखांची भाषा मात्र कांही विशेष प्रकारची प्राकृत भाषा आहे.  ८४ व्या लेखांत जो एक सुरेख लिपीनें कोरलेला लेख आहे त्याखेरीज बाकीच्यांची लिपी लेण्यांतील लेखांत आढळून येणार्‍या लिपीसारखीच आहे.  अक्षरांच्या वळणावरून यांतील दहा लेख वासिष्ठिपुत्र नामक राजाच्या वेळचे (इ.स.१३३-१६२), वीस लेख दुसर्‍या गौतमी पुत्र राजाच्या वेळचे इ.स. १७३-२०२, दहा इ.स.पांचव्या व सहाव्या शतकांतले, एक आठव्या शतकांतला, तीन नवव्या किंवा दहाव्या शतकांतलें व एक अकराव्या शतकांतला असावा, असें दिसतें.  येथें सापडलेलीं पुष्कळ नाणीं १५ व्या शतकांतली आहेत.  १० व्या व ७८ व्या लेण्यांतील तीन लेखांत राजांची नांवें व काल आहेत.  तिसर्‍या, ३६ व्या व ८१ व्या लेण्यांतल्या तीन लेखांत राजांची नांवे आहेत, परंतु काल नाहीं.  बाकीच्यचे काल अक्षरांच्या वळणावरून ठरविलेले आहेत.
    
हीं लेणी एकंदर १०२ आहेत.  त्या सर्वांत सुलभ रीतीनें जातां येतें.  येथें पांच लहान गुहा आहेत, त्यांत मात्र जाण्यास अडचण पडते.  सुमारें सत्तावीस लेणीं चांगली आहेत, छपन्न लहान आहेत आणि पंधरा अंशतः किंवा अगदीच मोडकळीस आलेली आहेत.  चैत्यें (देवळें) व दहाव्या नंबरचें दरबार भरण्याचें लेणें याखेरीज बाकीच्या सर्व लेण्यांत लोक रहात असत असें दिसून येतें.  पुष्कळ लेण्यांत भिंतीला लागून निजण्याकरितां सभोवार मंचक कोरलेले आहेत. प्रत्येक लेण्यांत शिरण्याची जी वाट आहे, तेथें दारांच्या चौकटी व झडपा बसविलेल्या होत्या व त्या बंद करण्याकरितां आडवे अडसर बाजूच्या दगडांत बसविलेले होते कांही खिडक्यांच्या जागा खोदल्या होत्या व कांहींना चौकटी बसवून झडपा लावल्या होत्या.  सगळ्या विहाराला पाण्याचा चांगला पुरवठा होता.  डोंगराच्या माथ्यावरील खडकांत पाण्याची कित्येक टांकी कोरलेली आहेत आणि बहुत करून प्रत्येक लेण्यांत एकेक टांके असून त्यांत लेण्यांच्या माथ्यावरून पाणी येण्याकरितां पन्हळ खोदलेला आहे.  लेण्यांच्या पूर्वेस एक भक्कम दगडी बांध होता तो हल्ली मोडलेला आहे.
    
(फर्ग्यूसन-बर्जेस-दि केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया; फर्ग्यूसन-हिस्टरी ऑफ इंडियन अॅंड ईस्टर्न आर्किटेक्चर मुं.गॅ.(ठाणें जिल्हा).  रा.ज.बा. मोडक यांनी गॅझेटियरवरून एक लेख तयार केला तो वि.विस्ताराच्या पु. ४७ अं. १ मध्यें प्रसिद्ध झाला आहे. )

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .