प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य   
     
कान्स्टान्टिनोपल - तुर्कस्तान (यूरोप) मराठी बखरकारयाला कुस्तुंतुनिया व मुसुलमान लोक इस्तंबोल असें म्हणतात.  यूरोपांतील तुर्कस्तानाची हल्लींची ही राजधानी आहे.  हें शहर फार प्राचीन आहे.  बॉस्परस सामुद्रधुनीच्या अगदीं दक्षिणटोंकास हें वसलेलें आहे.  याच्या उत्तरेस गोल्डन हॉर्न (सुवर्णशृंग) नांवाची एक छोटी खाडी असून दक्षिणेस मार्मोराचा समुद्र आहे व मध्यें हें शहर वसलें आहे.  हें बंदर म्हणूनहि प्रख्यात आहे. एकंदर शहराचा आकारहि गव्याच्या शिंगाप्रमाणें आहे.  या गांवातून एक छोटी नदी वहात जाते.  रोमप्रमाणेंच या शहरांतहि टेंकाडें आहेत.  एकंदर सात टेंकड्यांवर हें वसलेलें असून पुढीलप्रमाणें प्रख्यात स्थळें त्या त्या टेकड्यांवर आहेत.  पहिल्या टेंकडीवर सेराग्लिओ (राजनानखाना), सेंट सोफिया, हिपोड्रोम; दुसरीवर कान्स्टन्टाईनचें थडगें व तुरी उस्मानिया मशीद; तिसरीवर युद्धखात्याची कचेरी, सेरास्केरिएट टॉवर व सुलतान सुलेमानची मशीद; चौथीवर दुसरा महंमद याची मशीद; पांचवीवर सेलीमची मशीद, सहावीवर टेकफर सराई व एगरी कपु; सातवीवर अवरेत ताश व सायतिअर.  हें शहर प्रथम पूर्व रोमनसाम्राज्याची राजधानी (स. ३३० ते १४५३), नंतर आटोमन साम्राज्याची राजधानी (१४५३ पासून १९२४ पर्यंत) म्हणून आज १० शें वर्षें प्रसिद्ध आहे.  अथेन्स, रोम व यरुशलेमप्रमाणें या शहराशीं रोमन कायदे, ग्रीक वाङगय व ख्रिती धर्म यांचा जुनापुराणा संबंध जडलेले आहे.  पहिला कान्स्टटाईन यानें रोम सोडून येथें आपली राजधानी करून मूळच्या बिझान्शिअम गांवास नवें रोम हे नांव दिलें (११ मे स. ३३०).  तो मेल्यानंतर याल हल्लीचें नांव मिळालें.  रोमन साम्राज्याची वाढ पूर्ण झाल्यावर व यापुढें साम्राज्यविस्तार न करतां आहे त्याचाच बचाव सुरक्षितपणें ठरल्यावर रोमसारखें अगदीं मध्यप्रदेशांत असलेलें शहर सोडून हें शहर राजधानी करणें भाग पडलें.  शिवाय या सुमारास रोमनसाम्राज्य प्रतिनिधिसभेच्या हातून जाऊन एका सम्राटाच्या (एका व्यक्तीच्या) हातांत गेल्यानें, त्याच्या आवडीनिवडीस स्थळ देणें जरूर झालें.  तसेंच इराणनें व रानटी लोकांनींहि यावेळीं उचल केली होती.  सारांश या कारणांमुळें रोमच्या ऐवजीं हें शहर रोमन साम्राज्याची राजधानी झालें.  आशिया  व यूरोप या दोहोंच्या सांध्यावर व भूमध्य आणि काळासमुद्र या दोहोंच्या नाक्यावर हें वसलेलें असल्यानें राजकीयदृष्ट्या व व्यापारीदृष्ट्या जगांतील एकंदर बंदरात याचें महत्व बरेंच वरच्या दर्जाचें झालें आहे.  आड्रिआटिक समुद्र ते इराणी आखात व डान्यूब ते भूमध्यसमुद्र या इतक्या भूप्रदेशावर याच्यामुळें दाब ठेवतां येतो.  शिवाय आसपास टेंकड्या असल्यानें खुद्द हें शहर लढाईंत व अडचणीच्या वेळींहि सोयीचें - एकाएकीं शत्रूच्या हातीं न पडणारें - असें आहे.  समुद्र व जमीन या दोहोंवरून शत्रु असंख्य सैन्यानिशी चाल करून आला तरी सुद्धां त्याला शहर सुखानें काबीज करतां येणार नाही.  शिवाय दार्दानेलिस व बॉस्परस या सामुद्रधुन्या बंद केल्या म्हणजे मार्मोराच्या समुद्रांत शत्रु अटकला जातो.  एकंदरीत हें ठिकाण राजधानी करण्यास नैसर्गिकदृष्ट्या फारच उत्तम आहे.  इ.स.५३० मध्यें हिंदुस्थानचें म्हणून म्हटलेलें एक वकीलमंडळ जस्टिनियन बादशहाकडे येथें गेलें होतें.  सर्व शहराभोंवतीं मजबूत तटबंदी आहे.  जनानखान्याच्या अक्रापोलिस नावाच्या जुन्या किल्ल्याखालीच मुख्य बाजारपेठ आहे.  जवळच एक दगडी विजयस्तंभ - स. २६९ मधील क्लाडिअसच्या जयाचा निदर्शक असा-अद्यापि उभा आहे.  शहराच्या तटबंदीस कान्स्टाआईननेच प्रारंभ केला होता.  त्यानंतर तींत निरनिराळ्या वेळीं (इ.स. ४१३, ४३९, ४४७,६२७, ८१३, ११८०) जास्त मजबुती होत गेली.  बाजाराच्या जवळ आलती मरमर या भागांत थिओडोसिस (पहिला) च्या वेळीं एरिअन लोकांचीं धार्मिक कृत्यें होत असत (४४७).  ५०८ मध्यें मोठे भूकंप होऊन शहराचे कांही भाग उध्वस्त झाले होते.  या शहरावर अवार (स. ६२७), सारासन (६७३-७७), बल्गेरियन (८१३-९१३), चवथें क्रुसेड (१२०३-४), व तुर्क (१४२२, १४५३) यांनी चढाई केली होती.  इ.स. १२०४ ते १२६१ पर्यंत लॅटिन रियासत येथें होती;  इ.स. १४५३ त आटोमन साम्राज्याची राजधानी येथें झाली.  तटबंदीमध्यें पुढील ठिकाणें पहाण्यासारखीं आहेत. (१) सुवर्णद्वार, येथेंच येदीकुलेह म्हणून एक छोटा किल्ला आहे.  थिओडोसिस (पहिला) याच्या वेळची ही वेस आहे. (२) सेलिव्हरिया वेस, या वेशींतून १२६१ मध्यें अलेक्झीअस आंत आला व त्यानें लॅटिन रियासतीचा शेवट लावला. (३) तोप कापुसी, इच्यांतून १४५३ त सुलतान महंमद आंत आला व शहर मुसुलमानांच्या हातीं गेलें. (४) पॉर्फिराजेनिटसचा  राजवाडा, हा बायझन्टाइन कारागिरीचा एक उत्तम नमुना आहे.  (५) इसाक व अनेमस यांचे घुमट. (६) फनारचा व लिओचा तट, येथें १२०३ मधील क्रुसेड(धर्म युद्ध घडलें. (७) हॉर्मिसडसचा राजवाडा आणि (८) संगमरवरी मनोरा.  शहराचे साधारणतः तीन मोठे भाग पडतात.  ते मार्मोराच्या समोरचा पठारावरचा पहिला, टेंकड्यावरील सध्याचा दुसरा व सुवर्णशृंगाच्या समोरचा मामवरील तिसरा, हे होत.  या तिन्ही भागांतून, पूर्व-पश्चिम असा एक मोठा 'मेसे' नांवाचा राजरस्ता गेलेला आहे.  या भागांतील प्रेक्षणीय स्थळें साधारणतः पुढीलप्रमाणें आहेत.  सेंट सोफियाचें चर्च हें सार्‍या पौरस्त्य देशांतील ख्रिस्ती देवस्थानांत महत्वाचें चर्च आहे. पादशहाच्या राजवाड्याची चाल्से नांवाची मुख्य वेस, मजलीसगृह, मिलिअन, जस्टिनियन, युडोक्सिआ राणी व कान्स्टन्टाईन यांचे पुतळे.  थिओडोसीस (१ ला), अर्काडिअस, मार्सिअन यांचे स्तंभ.  बादशहाचा राजवाडा मूळचा कान्स्टन्टार्इनने बांधलेला असून त्याच्या नंतरच्या राजांनीं त्यांत भर घातलेली आहे; मार्मोराच्या समुद्राकडे त्याचें तोंड आहे.  चालसे, डाफ्ने व पवित्र वाडा अशा तीन मोठमोठ्या भागांचा तो बनलेला आहे.  लाबर्ते व पास्पेटस या कारागिरांनीं वाड्याचा बराच भाग बांधला आहे.  वायव्येस असलेला जुना ब्लाचर्नेचा राजवाडा हल्लीं रिकामा पडलेला आहे.  असेच हेबदोमन व बलुक्ली हे दोन जुने राजवाडे पडक्या स्थितींत हल्ली उभे आहेत.  म्युनिसिपल कामांच्या सोईकरितां शहराच्या चौदा पेठा केल्या आहेत. एके काळीं ख्रिस्ती पूर्वसाम्राज्याचें हें मुख्य ठिकाण असल्यानें त्या धर्माची निदर्शक अशी स्थळें येथें बरीच आहेत.  या चर्चापैकीं पुष्कळ ख्रिस्ती देवळांच्या मुसुलमानांनी मशिदी बनविल्या असल्या तरी कारागिरीच्या व जुनेपणाच्या दृष्टीनें ती पहाण्यासारखींच आहेत, आणि या दृष्टीनेंच अद्यापिहि भाविक ख्रिस्ती लोक दुरून येथें त्यांच्या दर्शनास येतात.  अमीर अकर जमीसी ही या शहरांतील सर्वांत जुनी (५ वें शतक) इमारत आहे.  सेंट सोफिया हें चर्च तर बायझंटाईन कलेचें उत्कृष्ठ चित्र असून, सार्‍यां जगांतील नांवाजलेल्या इमारतींपैकीं एक इमारत आहे.  कलंदर जमीसी (६ वें शतक) सेंट इरेनी, इसा मशीद (स.८८६), बोद्रम जामी (१० वें शतक), झैरेक जमीसी, खोजा मुस्तफाजमिसी, किलीसे जमिसी, इ.हल्लींच्या मशिदी हीं पूर्वीचीं ख्रिस्ती देवालयें होतीं.  सोफियाच्या मशिदीचें वर्णन फोसाती, साल्झेनबर्ग व लेथाबी यांच्या ग्रंथांत सापडेल. इचा घुमट १०७ फूट व्यासाचा व ४६ फूट उंचीचा आहे.  अंतमैदान (चौक) म्हणून जें एक मोठें मैदान आहे तेथें या शहरांतील बहुतेक प्रमुख घरामोडी होत असतात.  येथें घोड्यांच्या शर्यती होतात, लष्करी खेळ, पातशहांचे मानसन्मान, लष्करी जयदर्शक समारंभ, अपराध्याना फांशी, शाहीद लोकांनां जाळणें वगैरे कृत्येंहि येथेंच होतात.  शहराला पाणीपुरवठा लांबच्या दोन ठिकाणच्या जलाशयांतून भरपूर होतो.  त्यासाठी शहरांत मोठमोठे खजिने आहेत. पश्चिमेकडील टेकड्यांमध्यें बंधारे घालून हे जलाशय केलेले आहेत.  कांही बंधारे तर बायझन्टाईन कारकीर्दीइतके जुने आहेत.  व्यापाराची पेठ म्हणून हें शहर प्रख्यात आहे.  त्यासाठी कृत्रिम बंदरें व गोद्या शहराच्या दक्षिणेस पूर्वीपासून आजपर्यंत अनेक राजांनी तयार केल्या आहेत.  खास पातशाही कामाकरता जे बंदर आहे त्याचे नांव बुकोलिअन आहे.  ख्रिस्ती राज्य जाऊन मुसुलमानीं अंमल आल्यानंतर शहराच्या स्वरूपांत बराच फरक पडला.  रस्ते अरूंद झाले, जुनी कला नाहींशी झाली, पुष्कळ देवालयें पाडलीं, राहिल्यापैकी पुष्कळांच्या मशिदी केल्या, प्रजा भाषा व पेहराव पौर्वात्य दिसू लागला.  जुन्या बायझटाईन राजवाड्यांच्या धर्तीवर सुलतानांचे प्रचंड राजवाडे बांधले गेले.  बाब-ई-हुमायूं (सैन्य वगैरे राहण्याची जागा), ओर्ता कपु (दरबारी दिवाणखाने) आणि बाह-ई-सदत (खासगी कचेर्‍या) वगैरे भाग राजवाड्यांचे केले आहेत.  जुन्या जनानखान्यांत महंमुद पैगंबराच्या कांही संस्मरणीय वस्तु आहेत.  पुढील मशीदींचें कलाकुसरीचें काम पहाण्यासारखें असून त्यांवर पौरस्त्य कलेची छाया आहे.  सुलतान महंमद याची मशीद, सेलीम, शहाजादा, सुलेमान व रुस्तुम पाशा या मशिदी, १६ व्या शतकांतील तुर्की कलाकौशल्य उच्चतेस पोहोंचलें होतें  त्या वेळच्या आहेत.  तसेंच बायेझिद, अहमद, नुरी, जामिसी व पातशहांची व राजघराण्यांची तुरबती-स्मशानभूमि-याहि पहाण्यालायक आहेत.  इस्तंबूलमध्यें अनेक उपनगरें असून तीं सुवर्णशृंगाच्या दोन्ही तीरांवर वसलेलीं असून स्कुटारी हें प्रख्यात गांव त्यांतच आहे.  स्तंबूल म्हणजे 'शहरांत' हा मूळ जर्मन शब्दाचा अपभ्रंश आहे.  गलत हा शहराचा भाग फार जुना आहे.  स. १२६५ च्या सुमारास लॅटिन राज्य उलथविण्याच्या कामीं मदत केल्याबद्दल हा भाग जिनोईज व्यापार्‍यांनां मिचेलनें दिला होता.  हे लोक १४५३ त तुर्कांनां शरण आले व हा भाग त्यांनीं त्यांनां दिला.  हल्ली हा भाग म्हणजे मुख्य व्यापाराचा - बँका, पोष्टें, आरभारी कचेर्‍या वगैरेचा - आहे.  पेरा या भागांत परकीय वकिलाती व यूरोपीय वसाहती आहेंत.  एकोणिसाव्या शतकापासून या शहरानें हळूहळू पाश्चात्य रहाणी पत्करण्यास प्रारंभ केला व त्यामुळें मूळचें पौरस्त्य वळण व छाया अदृश्य होऊ लागली.  रस्ते मोठे करण्यापासून तों पातशहाचे वाडे बांधण्यापर्यंत पाश्चात्य पद्धती स्वीकारण्यांत आली.  जर्मन देखरेखीखाली गोद्या व धक्के बांधले गेले.  येथील अजबखान्यांत फार प्राचीन प्रेतांच्या पेट्यांचा एक मोठा संग्रह आहे.  त्यावरून त्या काळच्या समाजाचा बराचसा इतिहास सापडतो.  कलाभवन, कलाशिक्षण, वैद्यकशाळा, अनाथगृह वगैरे बर्‍याच सरकारी संस्था आहेत.  अमेरिकन व फ्रेंच यांच्या देखरेखीखाली शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार करण्यास मूळ प्रारंभ झाला. मशिदीला जोडलेल्या जुन्या शाळा जाऊन शिक्षणमंत्र्यांच्या खास देखरेखींखालीं शाळा उघडल्या गेल्या.  परकीय धर्माच्याहि पाठशाळा येथें आहेत.  अबदुलहमीद (दुसरा) यानें या कामीं बरेंच लक्ष्य घातलें.  शहराचें हवापाणी आरोग्यकारक आहे.  परंतु उत्तरदक्षिणचे वारे सुटले म्हणजे हवा एकदम सर्द अगर गरम होते.  उन्हाळा अगर हिंवाळा फारसा कडक नाही.  रोगराई (तापाशिवाय) फार नसते. शहराच्या लोकसंख्येचा नक्की आकडा आढळत नाही.  अजमासे दहा लाखपर्यत वस्ती असावी. अनेक देशाचे, धर्मांचे, जातीचे, भाषाचे, पोषाखांचे असे लोक येथें आहेत. ''अनेक देशाचें शहर'' असें याला खरोखरच म्हणण्यांत येतें.  ठिकठिकाणीं पाण्याचे हौद आहेत.  तेथून पाणके किंवा नौकर लोक ज्याच्या त्याच्या घरी पाणी नेतात.  घरोघर नळ्या नाहींत.  राजकीय घडामोडींमुळें शहराच्या व्यापारास नेहमी धक्का बसतो.  मोठमोठे व्यापारी बहुतेक परकीय (आर्मेनियन व ग्रीक) लोक आहेत (मध्यंतरी परिकीयांनां व्यापाराची बंदी होती.) तुर्क अगदींच थोडे आहेत.  निर्गत व्यापार फार कमती आहे.  मिठाई, जाळीचें व कशिद्याचें कापड, लोंकर, कातडीं, शिंगें, घोड्यांचे केस, हाडें, चिंध्या, गंजलेलें लोखंड, स्त्रियांच्या हातमोजांनां लागणारें कातडें, कच्चा माल (रेशीम, लोकर औषधें, धान्य, गालिचे वगैरेंचा) यांचा निर्गत मालांत समावेश होतो.  साधारण हा व्यापार चार कोटींचा व आयात व्यापार सात कोटी रुपयांचा होतो.  निर्गतींत शेकडा चाळीसचा भाग इंग्लंडचा आहे.  पूर्वी आयात व्यापार सर्वांत जास्त अमेरिका, नंतर इंग्लंड व नंतर जर्मनी अशा अनुक्रमें असे.  हल्लीं जर्मनी आपला व्यापार वाढवूं लागला आहे.  राज्यव्यवस्थेसाठी शहराचे विभाग केले आहेत.  ते स्तंबोल, पेरा-गवत, बेशिकतास, स्कुटारी हे होत.  स्तंबोलचा जो गव्हर्नर तोच या चारी प्रांताचा मुख्याधिकारी असून तोच कोतवाली (पोलीस) खात्याचा मंत्री असतो.  त्याच्या हाताखाली चार गव्हर्नर्स असून, ते सुलतान नेमीत असे.  यांच्याशिवाय चार निरनिराळे सेनापती असतात, सैन्याचे चार तळ केलेले आहेत.  चारी म्युनिपालिट्यांचा अध्यक्ष सुलतानानें निवडलेला व गृहमंत्र्याला जबाबदार असे.  त्याच्या हाताखाली चोवीसजणांचें कार्यकारी मंडळ असे.  हे सभासद सुलतान अगर गृहमंत्री नेमी.  शहराच्या म्युनिसिपालिटीच्या कामासाठी चौदा पुरे केले आहेत.  या पुर्‍यांत अनेक मोहल्ले आहेत.  शहराबाहेरील खेड्यांचे व बेटांचे सहा विभाग असून त्यावरील अधिकारी स्वसंत्र आहेत.  जुन्या तहाप्रमाणें परकीय लोकांना येथें बरेच हक्क आहेत.  स्वतःच्या कोर्टापुढें व ज्यूरीपुढें चौकशी होते.  तुर्की कोर्टापुढे खटला चालल्यास आपल्या देशाच्या वकिलाचा एखादा प्रतिनिधी हजर ठेवणें, स्वतःच्या शाळा व दवाखानें स्थापणें, स्वतःचीं धार्मिक कृत्यें बिनभोभाट करणें आणि स्वतःचीं पोष्टें स्थापणें वगैरे हक्क त्यांनां आहेत.  कोण्याहि तुर्की पोलिसाला, परक्याच्या घरांत (त्या परकीय मनुष्याच्या देशच्या वकिलाच्या परवानगी शिवाय) शिरतां येत नाही.  देशानें ख्रिस्ती बाट्यांनां धार्मिक बाबतींत बरेंचसे स्वातंत्र दिलेलें आहे.
    
महायुद्धानंतर येथील महत्व थोडेसें कमी झालें.  हल्ली (१९२४) तुर्कस्तानची राजधानी येथून हलवून अंगोरा येथें नेली आहे.  हल्ली तुर्कस्तानांत सुलतानशाही नसून लोकसत्ताक राज्य स्थापिलें गेलें आहे.  पूर्वी तुर्कांचा सुलतान हाच त्यांचा खलीफ असे, आणि त्याची गादी येथेंच असे.  आतां त्या खलिफाचें तुर्कांनी उच्चाटण केलें असून त्याचे वाडेहि जप्‍त केले आहेत (ग्रोसव्हेनोर - कॉन्स्टांटिनोपल; गिबन.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .