प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
कान्ट इम्यान्युएल (१७०४-१८०४) - कनिग्सबर्ज या गांवी कान्टचा जन्म १७२४ च्या एप्रिल महिन्यांत झाला.  याच्या बापाचा कातड्याच्या वाद्या करण्याचा धंदा होता. त्याची घरची स्थिति फार गरीबीची होती, तरी पण तो मोठा बाणेदार मनुष्य होता; व त्याला आपल्या मतांचा मोठा अभिमान असे.  कान्टची आईहि फारच भाविक असे व कान्टच्या मनावर तिच्या भक्तिपंथी शिक्षणाचा फार ठसा उमटला होता.  कान्टचें सर्व शिक्षण या गांवांतच झालें.  हा आपल्या सोळाव्या वर्षी मॅट्रिक्युलेशन पास होऊन कॉलेजात गेला.  युनिव्हर्सिटीत त्यानें एकंदर सात वर्षे अभ्यास केला.  त्याच्या घरची गरीबी असल्यामुळें त्याचे मित्र त्याला थोडी फार पैशाची व इतर आवश्यक गोष्टींची मदत करीत असत आणि त्याच्या मोबदला कान्ट हा त्यांना शिकवीत असे.  परंतु त्याला हे सर्व दिवस मोठ्या कष्टानेंच काढावे लागले.  
    
१७४६ सालीं म्हणजे कान्टच्या २२ व्या वर्षी त्याचा बाप वारला आणि त्यामुळें त्याला आपलें शिक्षण सोडून पोटापाण्याच्या उद्योगाला लागावें लागलें.  त्याची मोठी महत्वाकांक्षा म्हणजे कॉनिग्सबर्ज विश्वविद्यालयांतील प्रोफेसरची जागा मिळविण्याची होती.  परंतु आतां त्याला आपले शिक्षण अर्धवट टाकून, एका सुखवस्तु कुटुंबांतील खासगी शिक्षकांचा धंदा पत्करावा लागला.  या रीतीनें त्यानें नऊ वर्षे काढलीं, व त्याच्या आयुष्यांतील हा कालच फक्त त्यानें कॉनिग्सबर्जच्या बाहेर घालविला.  या काळांत तो तीन चार कुटुंबांत राहिला.  १७५५ मध्यें त्याने एक तात्विक विषयावर स्वतंत्र ग्रंथ लिहून डॉक्टरची पदवी मिळविली व नंतर त्याला कॉनिग्सबर्ज विश्वविद्यालयांत बिनपगारी शिक्षकाची जागा मिळाली.  तेव्हांपासून मरेपर्यंत म्हणजे सुमारें सतत पन्नास वर्षे, त्यानें प्रोफेसरचें काम केलें.  बिनपगारी शिक्षक या नात्यानें त्यानें सुमारें पंधरा वर्षे काढल्यानंतर १७७० सालीं त्याची महत्वाकांक्षा पुरी झाली.  त्याला तत्वज्ञानाच्या प्रोफेसराची फार मोठ्या मानाची जागा मिळाली, व त्या जागेवर तो मरेपर्यंत होता.  दुसर्‍या युनिव्हर्सिटीमध्यें त्याला प्रोफेसरांच्या जागा देऊ केल्या होत्या, परंतु त्यानें आपली युनिव्हर्सिटी सोडली नाही.  व तेथील जागा कमी पगाराची असतांना तेथेंच राहणे त्याला बरें वाटले.
    
कान्टचें सर्व आयुष्य अध्ययन, अध्यापन आणि लेखन यामध्येंच गेले.  कान्ट संसारपाशांत पडला नाही.  प्रथमतः त्याची फार गरिबी होती; कुटुंबपोषण करण्यासारखी पैशाची स्थिति नव्हती.  यामुळें त्याने लग्न केलें नाहीं.  पुढें चांगली स्थिति आल्यावर त्याला लग्न करतां आलें असतें व एका बाईवर त्याचें मनहि गेलें होते;  परंतु त्या बाईनें दुसर्‍या एका गृहस्थाशी लग्न केल्यामुळें कान्टचा बेत तसाच राहिल.  पुढें आपले लग्नाचे दिवस निघून गेले, असें समजून कान्ट ब्रह्मचारी राहिला.
    
कान्टचे मुख्य व्यवसाय म्हटले म्हणजे एक लेखन व दुसरा अध्ययन.  हा फार मोठा तत्वज्ञानी होऊन गेला, अशी जरी त्याची कीर्ति आहे तरी तो मारूनमुटकून तत्वज्ञानी झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं.  कारण लहानपणापासून त्याचे आवडते विषय म्हणजे गणित व आधिभौतिक शास्त्रें हे होत.  अगदीं लहानपणापासून त्याला न्यूटनच्यां ग्रंथांचा फार नाद लागलेला होता.  तत्वज्ञानाकडे त्याचें लक्ष्य मागून गेलें व हाच शेवटीं त्याचा मुख्य विषय बनला.  पण कान्ट हा केव्हांहि घटपटाची खटपट करणारा तत्वज्ञानी बनला नाहीं.  त्याच्या अंगीं बहुश्रुतपणा व विषय वैचित्र्याची अभिरुचि शेवटपर्यंत कायम राहिली.  त्याचे ग्रंथ व लेख निरनिराळ्या विषयांवर आहेत.  तो मासिक पुस्तकांत प्रचलित विषयांवर लिहीत असे.  त्याच्या लेखांची भाषा दुर्बोध नसे.  त्याचे कांही कांही लेख तर फारच मनोरंजक व विनोदानें भरलेले आहेत.
    
इ.स. १७५५ मध्यें लिस्बन शहरी फार मोठा धरणीकंप झाला.  त्याबरोबर या विलक्षण सृष्टिमत्काराची माहिती देण्याकरतां कान्टनें 'धरणीकंप' या विषयावर एक उत्तम लेख लिहिला व त्यांत यासंबंधाची उपलब्ध माहिती व या चमत्काराची उपपत्ति याचें सुरस विवरण केलें.  १७६० च्या सुमारास स्वीडनबार्ज नांवाचा मनुष्य प्रसिद्धीस आला.  आपल्याला अतींद्रियज्ञान आहे व आपल्याला मेलेल्यांच्या आत्म्याशीं संभाषण करतां येतें असें तो म्हणे.  कान्टला या विषयासंबंधी माहिती मिळविण्याची इच्छा झाल्यामुळें त्यानें स्वीडनबार्जच्या ग्रंथावर सात पौंड खर्च केले व आपल्या स्नेह्यांच्या आग्रहावरून त्यानें यासंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिला.  या ग्रंथांत त्यानें शास्त्रीय तत्वांवर, अशा गोष्टीचें ज्ञान मानवी शक्तीच्या बाहेर आहे असें आपलें मत प्रतिपादन केलें.  जरी कान्ट कधीं प्रवास करीत नसे तरी त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म होती.  त्याने.  'सौंदर्य व भव्यता' या विषयावर १७६४ मध्यें एक उत्तम निबंध लिहिला.  तो भाषेच्या व मनोरंजकतेच्या दृष्टीनें त्याच्या उत्तम ग्रंथापैकीं एक आहे.  ईश्वरावर त्याचा भरंवसा होता.  परंतु कर्मकांडावर त्याचा मुळींच विश्वास नसे.  तो प्रार्थनामंदिरात प्रार्थनेला कधींहि जात नसे.  त्याच्या मताप्रमाणें मनुष्याची सर्व वागणूक हीच मुळीं प्रार्थना होय.  मनुष्यानें सर्व व्यवहारांत आपलें कर्तव्य बजावलें म्हणजे ईश्वराची खरी भक्ति झाली असें तो समजत असे.  कान्टच्या असल्या धर्ममतांमुळें व तीं मतें एका ग्रंथांत प्रतिपादन केल्याबद्दल कान्टवर जर्मन सरकारचा रोष झाला.  कान्टनें आपल्या वर्तनानें आपल्या मताचें समर्थन केलें.  परंतु सरकारच्या मर्जीखातर महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन या नात्यानें मी यापुढे या विषयावर लिहिणार नाहीं  व बोलणार नाही असें त्यानें लिहून दिलें.  कान्ट इ.स.१८०४ मध्यें मृत्यु पावला.
    
पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानापासून आपल्या तत्वज्ञानाचा फरक दाखविण्याकरतां कान्टनें आपल्या तत्वज्ञानाला 'परीक्षणात्मक तत्वज्ञान' असें नवीन नांव दिलें आहे व तें त्यानें तीन ग्रंथांत ग्रथित केलें आहे.  प्रथमतः त्यानें शुद्ध विवेकाचें परीक्षण' या नांवाचा ग्रंथ लिहिला.  हाच त्याच्या तत्वज्ञानाचा मूळ ग्रंथ होय.  यामध्यें कान्टनें आपल्या नव्या ज्ञानमीमांसेचें विवेचन केलें.  नंतर त्यानें 'सदसद्विवेकाचें' परीक्षण म्हणून दुसरा ग्रंथ लिहिला.  यांत त्याचे नीतिशास्त्रविषयक विचार आलेले आहेत.  शेवटी त्यानें 'भावनेचें परीक्षण' नांवाचा ग्रंथ लिहिला.  हा ग्रंथ कान्टच्या तत्वज्ञानरूपी कमानीचा जणूं कांही मधला चिराच आहे.  यामध्यें आपल्या पहिल्या दोन ग्रंथांतील विचारांचा मेळ घालून कान्टनें त्यांवर नवीन विचारांचा कळस चढविला आहे.
    
कान्टच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथांत (१) गणितशास्त्र कां व कसें शक्य आहे.  (२) सृष्टिशास्त्र कां व कसें शक्य आहे.  (३) तत्वज्ञान शक्य आहे कां ? व शक्य नसल्यास मानवी मनाची तत्वज्ञानविषयक स्वाभाविक प्रवृत्ति कां आहे (४) कोणत्या पायावर नवीन तत्वज्ञान बनवितां येईल.  या चार प्रश्नांची चार भागांत उत्तरें आलेलीं आहेत.
    
कान्टच्या नव्या तत्वज्ञानाचा उल्लेख त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाच्या शेवटी आला आहे व तेथें त्यानें या तत्वज्ञानाची रूपरेषा दिली आहे, तरी पण या तत्वज्ञानाचा शेवट त्याच्या या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथांत अज्ञेयवादांत होतो पण कान्ट येथेंच थांबत नाही.  आपल्या ज्ञानानें सूचित केलेले 'आत्मा', 'परमेश्वर' इत्यादि प्रश्न आपल्या बुद्धीला सुटले नाहींत तरी ते मानवी मनाच्या इतर शक्तींच्या आवाक्याबाहेरचे आहेत अशांतला भाग नाहीं.  असें कान्टचें म्हणणें आहे व हा मुद्दाच त्यानें आपल्या पुढील परीक्षणात्मक ग्रंथांत प्रमुखपणें पुढें आणला आहे.  त्याच्या दुसर्‍या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय सद्सद्विवेकशक्ति हा होय.  ''विवेकी मनुष्य म्हणून तूं हें केलें पाहिजेस, तुझे कर्तव्यकर्म म्हणून हें केले पाहिजेस; फलाशा ठेवून कर्म करतां कामा नये'' अशा तर्‍हेची ही आज्ञा असते.  अर्थात अशी आज्ञा पाळणें म्हणजे वासनांनां बाजूस सारून केवळ विवेकाची कास धरणे होय.  ही आज्ञाच सर्व नीतिनिर्बंधांचा मूळ पाया होय.  या बिनशर्त आज्ञेपासूनच नीतीचे सर्व नियम निघालेले आहेत.
    
'तूं अशा तर्‍हेनें वाग कीं तुझ्या वागण्याचें तत्व, तुझ्या इच्छेनें सार्वत्रिक नियम करता आल्यास तुझ्या विवेकाला तें तत्व आवडेल' असे या आज्ञेचें स्वरूप कान्टनें दिलें आहे.  याला त्यानें नैतिक कायदा म्हटलें आहे व सर्व नीतिनियम या कायद्यापासून निष्पन्न होतात असें कान्टनें दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे.
    
सारांश बुद्धीला ज्या गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे संवेदनात्मक ज्ञानदृष्ट्या सिद्ध करतां येत नाहीत त्या गोष्टी आपल्या नैतिक अनुभवानें सिद्ध करतां येतात व म्हणून तत्वज्ञान हें बौद्धिक अनुभवाच्या पायावर न उभारता - कारण तेथें अज्ञेयवाद व जडवाद आपल्याला निरूत्तर करतात - नैतिक अनुभवाच्या पायावर उभारावें असें कान्टच्या प्रतिपादनाचें सार आहे व यालाच तो आपलें नवें तत्वज्ञान म्हणतो.  मात्र आत्मा, परमेश्वर वगैरे अतींद्रिय गोष्टीचें ज्ञान झालें असें न म्हणतां याबद्दल आपली विवेकश्रद्धा उत्पन्न झाली असें तो म्हणतो.  अर्थात ही तडजोड कान्टनें जडवाद्यांचें व अज्ञेयवाद्याचें तोंड बंद करण्याकरितां सुचविली असावी असें दिसतें.
    
कान्टच्या तिसर्‍या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय जडाजड जगांत दिसून येणारें सौंदर्य, भव्यता, प्रयोजन व रचनाचातुर्य इत्यादि गोष्टीचें विवेचन करण्याचा आहे व या विवेचनावरून या जगाला कोणी तरी चिन्मय कर्ता आहे असें मानवी मनाला वाटावयाला लागतें.  तेव्हां ज्याप्रमाणें आपल्या नैतिक अनुभवावरून मनुष्यामध्यें परमेश्वराच्या अंस्तित्वाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते त्याप्रमाणेंच मनुष्याच्या सौंदर्यविषयक अनुभवावरून परमेश्वरविषयक भावना मनांत उत्पन्न होते असें कान्टनें या ग्रंथांत प्रतिपादन केलें आहे.
    
(संदर्भग्रंथ :- कान्टवरचें वाङ्‌मय अफाट आहे.  १८९६ पासून कान्टवरचे नवीन लेख व त्यावर लिहिलेल्या ग्रंथांचें परीक्षण प्रसिद्ध करणारें एक त्रैवार्षिक नियतकालिक हँबर्ग व बर्लिन येथें निघत असतें.  १८८७ च्या मागील कान्टवाङ्‌मय एरिक अॅडिकीजच्या फिलॉसॉफिकल रिव्ह्यूमध्यें सापडेल. १८९०-९४ या वर्षाकरितां आर.रीकेचा 'कान्ट बिब्लि ओग्राफी' पहा ब्रिटानिका व ए.रि.ए.मध्यें कान्टवर विस्तृत लेख आहेत.  मराठी वाचकांकरितां प्रो. भाटे यांनी 'तीन तत्वज्ञानी' (पुणे १९२१, जगद्धिोच्छु प्रेस) या छोट्या पुस्तकांत कान्टचें चरित्र व तत्वज्ञान विवेचिलें आहे.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .