प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
कानफाटे - हा शैव यतींचा एक पंथ आहे.  कानाचा खालचा भाग चिरून त्यांतून मोठीं कर्णभूषणें घालण्याच्या त्यांच्या पद्धतीवरुन त्यांना कानफाटे हें नांव पडलेलें आहे.  त्यांना गोरखपंथी, गोरखनाथी अगर दर्शनी अशींहि नावें आहेत.
    
हा पंथ केव्हां व कसा निर्माण झाला याची समाधानकारक उपपत्ति लागत नाही.  या पंथाचे अनुयायी गोरखनाथाच्या पूर्वी या पंथाचा उदय झाला असें मानतात.  गोरखनाथाचा गुरु मत्स्येन्द्रनाथ व मत्स्येन्द्रनाथाचा गुरु जो आदिनाथ त्या आदिनाथानें हा पंथ काढला असें यांच्या अनुयायाचें मत आहे.  पण कांही अनुयायी या पंथाचा उदय आदिनाथाच्याहि अगोदर झाला होता असें मानतात.  या पंथाच्या तत्वांची संगति लावून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचें महत्वाचें काम मात्र गोरखनाथानें केलें व आपल्या नांवानें एक स्वतंत्र उपपंथ स्थापन केला.  बंगाल प्रांताच्या रंगपूर जिल्ह्यामध्यें या पंथाची उपपत्ति निराळीच सांगण्यात येते ती अशीः-
    
कानफाटे हे पूर्वी शंकराचार्यांच्या अनुयायीवर्गातच मोडले जात असत.  पण पुढें कांही अनुयायांनीं मद्य सेवन करण्याचें सुरू केल्यामुळें अशा अनुयायांनां आचार्यांनीं आपल्या संप्रदायांतून हांकून लावलें.  अशा प्रकारचे बहिष्कृत अनुयायी म्हणजे हे कानफाटे होत.  तिबेटमध्यें प्रचलित असलेल्या दंतकथेवरून गोरखनाथ हा बुद्धधर्मीय मांत्रिक असून तयाचे अनुयायी हे राजांची व त्याच्या अधिकार्‍यांची मर्जी संपादन करण्यासाठी बौद्धधर्माचा त्याग करून शैवधर्मीय बनले असें दिसतें.  या निरनिराळ्या दंतकथांच्या मुळाशीं गेलें असतां असें दिसून येते कीं, उत्तर हिंदुस्थानांत बौद्धार्माचा प्रसार झालेला होता, त्याकाळी हा कानफाट्यांचा पंथ अस्तित्वांत असून बौद्धधर्माचा ज्यावेळी र्‍हास होऊन ब्राह्मण धर्माचा उदय होत होता त्या वेळी या पंथालाहि चांगले दिवस लाभले असावेत व गोरखनाथानें उपनिषदांतील तत्वांनां धरून आपल्या पंथाची तत्वें बनविली असावींत.    
    
या पंथाच्या तत्वज्ञानासंबंधी संपूर्ण व स्पष्ट अशी माहिती उपलब्ध नाही.  खुद्द या पंथांतील म्हणविणार्‍या लोकांनांहि आपल्या पंथाचीं तत्वें नीटपणें अवगत नाहींत.  या पंथामध्यें प्रमाणभूत असलेले ग्रंथ म्हणजे 'हटयोगप्रदीपिका,' 'गोरखनाथकी गोष्टी,' दिगंबरपंथाचा कवि बनारसीदास कृत 'गोरखनाथ का वचन व गोरखबोध' हे होत.  यांपैकी'हटयोगप्रदीपिका' व 'गोरखनाथका गोष्टी' या ग्रंथांवरून या पंथाच्या तत्वांवर कांहीच प्रकाश पडत नाहीं.  शिव हा परमदेव असून त्याच्यामध्यें मानवी आत्म्यानें योगमार्गानें लीन होऊन जाणें हेंच अंतिम मानवी ध्येय होय, एवढीच गोष्ट दोन ग्रंथांवरून समजते.  गोरखबोध या ग्रंथांवरून मात्र या पंथाच्या तत्वज्ञानाची स्थूलमानानें माहिती होते.  गोरखबोध म्हणजे मत्स्येंद्रनाथ व गोरखनाथ यांच्यामधील प्रश्नोत्तर संवादाचा संग्रह होय.  या ग्रंथ १४ व्या शतकांत झाला असें मानतात.  हा ग्रंथ हिंदींत असून या ग्रंथांत अवघीं ६० पद्यें आहेत.  ह्या ग्रंथाची भाषा संक्षिप्‍त व दुर्बोध असल्यामुळें हा ग्रंथ समजावयाला फार अवघड आहे.  पातंजल योग व उपनिषदांतर्गत योग यांशीं या पंथांतील योगपद्धातीचें पुष्कळच साम्य आढळून येतें.
    
या ग्रंथावरून या पंथांची जी तत्वें आढळून येतात ती अशीः- आत्मा हा नाभिचक्रांत वास करतो व तो शून्याश्रित असतो.  या आत्म्यामुळेंच मानवाला चैतन्य प्राप्‍त होतें.  मन, आत्मा व शून्य यांच्यावर अनुक्रमें चंद्र, सूर्य, व काल या तिघांचे वर्चस्व असतें.  शब्द हा रूपस्थित दिसतो, अंत:करण, नाभि, रूप व आकाश ही उत्पन्न होण्यापूर्वी मन हें शून्यांत लीन झालेलें होतें, आत्मा हा निराकार होता; चंद्र हा प्रकाश व पृथ्वी यांच्या दरम्यानच्या अंतरालांत होता व शब्द हा अनुत्पन्न स्थितींत होता.  या पंथाच्या मतें सहज, अनुभव, परम, व अतीत असे शून्याचे चार प्रकार आहेत.  निद्रावस्थेंत व मृत्यूनंतर प्राण हा शून्यांत विलीन होतो.  या विश्वांत एकंदर पांच तत्वें असून पूर्वावस्था प्राप्‍त होण्याची साधनें म्हणजे दहा द्वारें कोणतीं आहेत हे या ग्रंथांत सांगितले नाही.  या विश्वांतील जें परम तत्व त्याचें वर्णन 'ज्या ठिकाणी वाचा थांबते' अशा शब्दांनीं केलेलें आहे.
    
या ग्रंथांवरून पहाता या पंथाच्या अनुयायानें मठांतचे नेहमी राहिलें पाहिजे असा निंर्बंध नाही.  या ग्रंथांच्या दुसर्‍या श्लोकांवरून या पंथातील अनुयायाला सार्वजनिक ठिकाणीं, झाडाखालीं, अगर रस्त्यावर सुद्धां राहतां येत असे असें दिसतें.  या पंथांत अन्नग्रहणासंबंधानें विशेषसे निर्बंध नाहींत.  या पंथांतील योग्यांनां अवधूत हें नांव आहे ('अवधूत' पहा).  सारांश रामानंदाच्या वैष्णवसंप्रदायात व या पंथांत बरेंच साम्य आहे असें दिसून येतें.
    
कानफाटे लोक सर्व हिंदुस्थानभर पसरलेले आहेत.  सर्व ठिकाणच्या कानफाट्यांच्या चालीरीती बहुतेक सारख्या आहेत.  जातिविषयक निर्बंध यांच्यात मुळींच आढळून येत नाहींत.  गोमांस व डुकराचें मांस खेरीजकरून सर्व प्रकारचें मांस हे खातात. मद्य, अफू इत्यादि निषिद्ध वस्तूंचे हे सेवन करतात.  मृत मनुष्यांनां पुरण्याची यांच्यात चाल आढळून येते.  या पंथांतील प्रापंचिक लोक सावकारी, विणकाम, शेतकी, शिपाईगिरी इत्यादि धंदे करतात.  या लोकांची शूरत्वाबद्दल ख्याति आहे.  या पंथांतील कांही लोक मंत्र, तंत्र व चेटूक इत्यादींवर आपला उदरनिर्वाह करतात असें आढळून येतें.
    
विवाहाची चाल सरसहा रूढ असून विवाहविषयक निर्बंध यांच्यांत आढळत नाहींत.  यांच्यातील भिक्षेकरी हे कटिवस्त्र नेसून कपाळाला भस्म फासून व झोळी घेऊन भिक्षा मागतात.  यांच्या गळ्यांत एक लोंकरी दोरी असते, कानांत शिंगांची अगर कांचेची दर्शनें अगर मुद्रा घातलेल्या असतात.  ही दर्शनें यांच्या धर्माचें मुख्य लक्षण असून तीं मोठ्या विधिपूर्वक घालण्याची चाल आहे.
    
कच्छच्या रणामध्यें कानफाट्यांची पुष्कळ वस्ती आहे.  हे कानफाटे आपणाला गोरखनाथाचा शिष्य धर्मनाथ यांचे अनुयायी म्हणतात.  हे कानफाटे बहुतेक मठांत रहातात. या कच्छच्या रणांत अशा प्रकारचे पुष्कळ मठ आहेत, पण त्यांतल्या त्यांत धर्मनाथानें बांधलेला कच्छमधील धीनोधर मठ व काठेवाङ्‌मधील गोरखमठीचा मठ हे प्रख्यात आहेत.  या कानफाट्यांनां पूर्वीच्या रावराजांनीं पुष्कळच देणग्या दिल्या असल्यानें ते श्रीमंत व दानशूर आहेत.  कोणत्याहि भिक्षेकर्‍याला हे विन्मुख पाठवीत नाहींत.  धीनोधर येथील मठांत अतिथिगृहें, इतर लोकांनां रहाण्यासाठीं जागा, पीर, देवळें इत्यादि आहेत.  या पिरांनां येथील राजेलोक फार मान देतात.  या धीनोधर मठांतील योगी व पीर हे आजन्म ब्रह्मचारी रहातात.  पण इतर मठांतील बुवा अगर महंत हे गृहस्थाश्रमीहि असतात व संतति नसल्यास दत्तक घेण्याची चाल त्यांच्यात आढळतें.  धीनोधर मठांत दररोज 'धर्मनाथ' याची पूजा करण्यांत येते.
    
मुंबईमध्यें, व बेळगांवमध्यें जे कानफाटे दृष्टीस पडतात त्यांच्यामध्यें व कच्छच्या रणांतील कानफाट्यांमध्यें फरक एवढाच कीं, मुंबई व बेळगावांतील कानफाट्यांच्या हातांत भिक्षेच्या वेळीं एक त्रिशूळ असतो.  यांशिवाय मुंबईतील कानफाटे हातांत डौर (डमरू) हि बाळगतात व त्यावरून त्यांनां डौरी गोसावी असेंहि नांव पडलेलें आहे.  हे डौरीगोसावी राजरोस लग्न करून घेतात.  मृत मनुष्याला बसलेल्या स्थितींत पुरण्याची यांच्यात चाल आढळते.  उत्तरहिदुस्थानांत व पूर्वहिंदुस्थानांत रहाणारे कानफाटे हे पुजार्‍याचाहि धंदा करतात.  भैरवनाथाच्या देवालयाचें पुजारीपण यांच्याकडे असतें.  ग्रामदेवतांप्रीत्यर्थ प्राणिवध करण्याची चालहि यांच्यांत क्वचित आढळून येते.  गोरखपूर येथील कानफाटे लोक भैरवनाथशिवाय, बाला सुंदरी या देवीचीहि पूजा करतात.  काशींतील कानफाटे कालभैरवाच्या देवळाच्या आसपास रहातात.  त्यांच्यांत मृत मनुष्यांनां घरांतच पुरण्यांत येतें.  डोंगराळ प्रदेशांत रहाणारे कानफाटे हे मंत्रतंत्रावर उपजीविका करतात.  हे फार व्यसनी असतात.  याचेंहि मुख्य उपास्य धर्मनाथच आहे.
    
(संदर्भग्रंथः- क्रूक, जी.एस.लीओनार्ड-नोटस ऑन दि कानफाटा योगीज; मार्टिन-ईस्टर्न इंडिया;).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .