प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
कानपूर, जिल्हा-संयुक्त प्रांतांतील अलाहाबाद विभागाच्या उत्तरेकडील जिल्हा.  उत्तर अक्षांश २५ ५६' ते २६ ५८' आणि पूर्व रेखांश ७९ ३१' ते ८० ३४'.  क्षेत्रफळ २३८४ चौ.मै. चतुःसीमाः-इशान्येस गंगानदी, वायव्येस फरुकाबाद आणि इटावा; नैर्ऋत्येस यमुना नदी व आग्नेयेस फत्तेपूर.
    
कानूपर हा गंगा व यमुना ह्या दोन नद्यांमधील प्रदेश असून सांपत्तिक दृष्टीनें इतर जिल्ह्यात व ह्यात फारसा फरक नाहीं.  जमीन एकसारखी सपाट असून ठिकठिकाणीं लहान लहान ओढे व नद्या आहेत.  नैर्ऋत्येकडे थोडासा उतार असून सर्व नद्या ह्याच दिशेनें वाहतात.  नद्याची नावें इसान, पाडु, रिंद, सेन्गर हीं होत.
    
बहुतेक सर्व भागात कंकर सापडतो.  ढाक नांवाचें मोठें जंगल आहे.  चित्ता, रानडुकरें वगैरे जनावरें ह्या प्रदेशांत आहेत.  मासे विपुल असून येथील लोक मासे खातात.
    
हवा साधारण उष्ण आहे.  एप्रिल ते जुलैमध्यें पश्चिमेकडील वारे वाहतात.  सप्टेंबर आक्टोबर महिन्यांत पावसाळा असतो व नोव्हेंबर महिन्यांत हिवाळ्यास सुरूवात होते.  एकंदर जिल्ह्याचें हवामान प्रकृतीला मानवेल असें आहे.  पाऊसपाणी सरासरी ३३ इंच पडतो.
    
इतिहास - याचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाहींच म्हटलें तरी चालेल.  अकबर बादशहाच्या राज्यांत ह्या जिल्ह्याचें तीन विभाग पाडण्यांत आले होते.  ते कनोज सरकार, काल्पी सरकार व कोरा सरकार हे होत.  मोंगलांच्या कारकीर्दीनंतर हा जिल्हा फरूकाबादच्या बंगश नबाबाच्या हातीं गेला.  १७५४ सालीं मराठ्यांनी दुआबच्या खालचा प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला.  पानिपतच्या संग्रामानंतर फरुकाबादच्या नबाबास पुन्हां ह्या जिल्ह्यापैकीं काही भाग मिळाला.  पुढें फरुकाबादच्या नबाबांनीं इंग्लिशांच्या विरुद्ध सुराजउद्दौल्यास मदत केली.  पण त्यांत इंग्रजांचीच सरशी झाली (१७६५).  ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला कीं शहाअलम दुसरा ह्यास गंगा नदीचा दक्षिण प्रदेश व कानपूर जिल्ह्याचा बराचसा भाग मिळाला.  पण मराठ्यांनीं पुन्हां शहाअलम यास आपल्या बाजूस घेतलें.  पण अयोध्येच्या सैन्यानें मराठ्यांस हांकून लावलें व १७७३ सालीं बादशहास दिलेला प्रांत अयोध्येच्या नबाबास मिळाला.  सन १७७८ सालीं ब्रिटिशांनीं कांहीं सैन्य कानपूर येथें ठेवलें व इतर प्रांतांबरोबर हा सर्व जिल्हा ब्रिटिशांस मिळाला.
    
ता. ६ जून १८५७ रोजी काहीं शिपायांनी सरकारी खजिना लुटला, तुरुंगाचे दरवाजे खुले केले व सरकारी ऑफिसें जाळून टाकली.  तीन आठवडेपर्यंत इंग्रज शिपायांची एक तुकडी दम धरून होती पण तीस समोरासमोर मैदानांत यावें लागलें.  छावण्यांतून वांचलेले काही लोक नदींतून होडीनें अलाहाबादकडे जात असतां त्यांच्यावर गोळ्या झाडून पुरुषांस ठार करण्यांत आलें.  जनरल हॅवेलॉकनें १५ जुलैस आंग व पांडु नदी येथील लढाया जिंकून दुसर्‍या दिवशीं खुद्द कानपूर आपल्या ताब्यांत घेतलें.  ता. १९ जुलै रोजी विठूरचा व नानासाहेबांच्या वाड्यांचा विध्वंस करण्यात आला.  नोव्हेंबर महिन्यांत ग्वाल्हेर येथील बंडखोर शिपाई यमुना ओलांडून पैलतींरी आले व अयोध्येच्या बंडखोरांच्या मदतीनें त्यांनी कानपूर शहर घेतलें.  पण क्याम्पबेलनें दुसर्‍याच दिवशीं तें परत घेतलें.  १८५८ सालीं काल्पी घेईपर्यंत ह्या जिल्ह्यांत शांतता स्थापित झाली नव्हती.
    
ह्या जिल्ह्यांत ६ शहरांचा व १९६२ खेड्यांचा समावेश होतो.  १९२१ सालीं लोकसंख्या ११४८६६४ होती.  ह्या जिल्ह्यांत अकबरपूर, बिल्हपूर भाग्निपूर, कानपूर, देरापूर, नखल, शिवराजपूर, घाटमपूर ह्या आठ तहशिली आहेत.  कानपूर हें बरेंच मोठें शहर व जिल्ह्यांचें मुख्य ठिकाण आहे.
    
शेंकडा ९० लोक हिंदु आहेत.  शेंकडा ९९ लोक हिंदी भाषा बोलतात.  प्रचारांतील भाषा कनोजिआ.  ब्राम्हण, चांभार, अहीर, रजपूत, लोध, कुर्मी कोरी, बोरीआ इत्यादि जातीचें लोक आहेत.  शेकडा ६२ लोक शेतकीवर उपजीविका करितात.  एकंदर जमीन फार सुपीक आहे.  पांडु व रिंद नद्यांच्या कांठची जमीन व त्या भागांतील सर्व प्रदेशाची माती लालसर रंगाची आहे.  अगदीं उत्तरेस इसनच्या कांठीं हलक्या तर्‍हेची (भुरकट) जमीन आहे.  जमीनधार्‍याची पद्धत संयुक्त प्रांतांतील जिल्ह्यांप्रमाणेंच आहे.  यांत ४३३५ मीनदार्‍या असून ९५७ पातीदार्‍या आहेत.  हरभरा, जवारी, जव, गहूं, मका, तांदूळ, बाजरी इत्यादि धान्य येथें होतें.  कापूस, ऊंस, नीळ वगैरे मालहि निघतो.  जिल्ह्याच्या नैर्ॠत्य व ईशान्य भागांत पाटाचें पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.  मकनपूर येथें मोठी जत्रा भरते.
    
'लोअर गांजीस कॅनाल'चें पाणी कानपूर शाखा, इटावा शाखा आणि भोग्निपूर शाखा अशा तीन शाखांच्या द्वारें जिल्ह्यांत खेळविलें आहे.  विहिरीचें पाणी मोटेनें काढण्याची वहिवाट आहे.  येथील खनिज पदार्थ चुनखडी व रेन हे आहेत.
    
जिल्ह्याकरितां एक ऑफीसर असून त्याला मदतनीस म्हणून दोन 'इंडियन सिव्हिल सर्व्हिस' चे मेंबर व चार डेप्युटिकलेक्टर आहेत.  दर एक तहसिलीकरितां एक एक तहसीलदार आहे.  १८०१ पूर्वी कानपूर जिल्ह्यांत करुकाबाद व फत्तेपूर ह्या जिल्ह्यांचा समावेश होत असे.  ब्रिटिशसरकारच्या ताब्यांत हा जिल्हा गेला तेव्हां पहिल्या पहिल्यांदा थोड्या थोड्या वर्षांकरितां धारेबंदी करीत.  १८४० साली पहिली खरी धारेबंदी करण्यांत आली.  शेंकडा ४ लोकांनां लिहितां वाचतां येतें.  कानपूर येथें कॉलेज आहे.
    
तहशील - संयुक्त प्रांतांतील कानपूर जिल्ह्यांतील एक तहसील.  हींत ह्याच नांवाचा एक परगणा आहे.  त्यास पूर्वी जाजमऊ म्हणत असत.  या तहसिलीचें क्षेत्रफळ २७९ चौरस मैल आहे.  ह्या तहसिलींत २२६ खेडीं असून दोन शहरें आहेत, एक कानपूर व दुसरें बिठूर.  लोकसंख्या १९११ सालीं २९७३१७ होती.  १९०३-०४ सालीं सुमारें १४१ चौरस मैल जमीन शेतकीच्या उपयोगी आणली गेली होती.
    
शहर - कानपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण.  उत्तर अ. २६ २८' व पूर्व रे. ८० २१' हें गंगानदीच्या उजव्या तीरावर वसलेलें असून प्रयागाच्या गंगायमुनांच्या संगमापासून वर १२० मैल आहे.  औध-रोहिलखंड रेल्वे, ईस्ट-इंडियन, बेंगाल-नॉर्थ वेस्टर्न, बाँबे-बरोडा व जी आय. पी. या पांच आगगाड्यांचें हे जंक्शन आहे.  रेल्वेनें हें हावर्‍यापासून ६८४ मैल व मुंबईपासून ८३९ मैल आहे.  संयुक्त प्रांतांतील मोठ्या व भरभराटीच्या शहरांत या शहराचा तिसरा नंबर आहे.  १९२१ सालीं लोकसंख्या २१६४३६ होती.  यांचें पौराणिक नांव कर्णपुर असें असून कर्ण येथें राहात असे.  या स्थलीं कर्णतीर्थ म्हणून भागीरथीतीरीं एक तीर्थ आहे.  येथून ब्रह्मावर्त ६ कोस लांब आहे.  आठव्या शतकाच्या सुरवातीस कानपूर म्हणजे एक कन्हय्यापूर नांवाचें खेडें होतें.   इ.स. १७६४ साली बक्सार येथें जय मिळाल्यावर ब्रिटिशांनी १७७३ सालीं अयोध्येचा नबाब वजीर सुजाउद्यौल यांशी फैजाबाद येथें तह केला.   ह्या तहांत तहात ब्रिटिश सरकारनें नबाबाच्या राज्यांत कोठे तरी दोन ठिकाणी गोरें सैन्य ठेवावें असें ठरलें व त्याप्रमाणें फत्तेगड व कानपूर येथें दोन तुकड्या ठेवण्यांत आल्या.  पुढें १८०१ मध्यें नबाबानें हा जिल्हा ब्रिटिशांस दिला.  तेव्हांपासून कानपूर शहरांस सार्‍या उत्तर हिंदुस्थानांत मोठें महत्व आलें आहे.
    
१८५७ सालच्या बंडांत कानपूरचा बरास संबंध येतो.  व या बंडाची स्मारकें या शहरांत दिसतात.  कानपूर येथें नानासाहेबांनीं इंग्रज स्त्रीपुरुषांची कत्तल करविली, तीबद्दल 'स्मारक' येथें आहे.  पण ती 'कत्तल'च आज खोटी ठरत आहे.
    
१८७१ पासून कानपूर येथें म्युनिसिपालिटी आहे.  येथें बरीच वर्षे बाहेरून आणलेल्या मालावर जकात घेत नसत.  पण १८९२ पासून घेऊं लागले.  येथें विजेच्या ट्रामगाड्या आहेत.  सन १८६९ त येथें पहिली कापडाची गिरणी सुरू झाली.  ह्यानंतर येथें आणखी पुष्कळ गिरण्या अस्तित्वांत आल्या आहेत.  त्याचप्रमाणें चामड्याचे बूट व इतर सामान उत्तमोत्तम तयार करण्याचे सरकारी व खासगी कारखाने आहेत.  लोकरीचें कापड काढण्याच्या गिरण्या येथें आहेत.
    
येथील व्यापार फार मोठा आहे.  विटा व कौलें यांचे कारखाने विसाहून कमी नाहींत.  तीन आगपेट्यांचे, तीन ब्रशांचे व तीन रासायनिक कारखाने चालतात.  कापडाच्या गिरण्यांखेरीज दळण्याच्या, बर्फाच्या, लोखंडी कामाच्या, तेलाच्या, साखरेच्या, कातडी कमावण्याच्या, वगैरे प्रकारच्या पुष्कळ गिरण्या व कारखाने कानपुरांत आहेत.
    
कानपूर शहर हें संयुक्त प्रांतांतील व्यापाराचें सर्वात महत्वाचें ठाणे आहे.  सूत काढणें, विणणें, व जोडे वगैरे चामड्याचा माल तयार करणें हे येथील तीन मुख्य उद्योग धंदे होत.  त्याचप्रमाणें लोखंडी सामान, उंची कपडा, साखर इत्यादि इतर मालहि तयार होतो.  कच्चा माल, मीठ, सोरा, खनिज धातु वगैरे माल बाहेरून येथें येतो.  कानपूर हें रेल्वेचें स्टेशन असून मोठें जंक्शन आहे.  १७८३-८४ च्या दुष्काळांत उपासमारीनें बरेच लोक मृत्युमुखीं पडले.  त्याच्या नंतरचा १८०३-०४ दुष्काळहि वाईट गेला.  पण १८३७ च्या दुष्काळानें सर्वांवर मात केली.  या दुष्काळांत गांवेंच्या गांवें ओस पडलीं.
    
कानपूर येथें 'अपर इंन्डिया चेम्बर ऑफ कॉमर्म'ची स्थापना १८८९ सालीं करण्यांत आली.  युनायटेड प्राव्हिन्सेस चेंबर ऑफ कॉमर्स ही एक दुसरी व्यापारी संस्था आहे.
    
उच्च शिक्षणाकरतां येथें क्राइस्ट चर्च कॉलेज, शेतकी कॉलेज व हिंदुमुसुलमानांची हायस्कुलें आहेत.  मुलींच्याहि बर्‍याच शाळा आहेत.  हिंदी, उर्दू व इंग्रजी नियतकालिकें निघतात.  चांगली पांच सहा वाचनालयेंहि आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .