प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
        
कानडा उत्तर - मुंबई इलाखा.  दक्षिण भागांतील एक जिल्ह उ.अ. १३ ५३' ते १५ ५२' व पू.रे. ७४ ४' ते ७५ ५' व क्षेत्रफळ ३९४५ चौरस मैल.
    
उत्तरेस बेळगांव जिल्हा; पूर्वेस धारवाड जिल्हा व म्हैसूरचें संस्थान; दक्षिणेस मद्रास इलाख्यांतील दक्षिण कानडा जिल्हा.  पश्चिमेस अरबी समुद्र;  वायव्येस गोवें (पोर्तुगीजांचा मुलूख) प्रांत.  मुंबई इलाख्यांतील हा दक्षिणेकडील जिल्हा होय.  सुमारें २५०० ते ३००० फूट उंचीची सह्याद्रि पर्वताची ओळ या जिल्ह्यांतून उत्तरदक्षिण पसरलेली आहे.  व त्यामुळें या जिल्ह्याचे दोन भाग झाले आहेत.  एकाचें नांव बालाघाट असून त्याचें क्षेत्रफळ २६३९ चौरस मैल आहे.  दुसर्‍याचें नांव पायनघाट असे असून त्याचें क्षेत्रफळ १३०६ चौरस मैल आहे.  ७६ मैल लांबीच्या किनार्‍यांत पुष्कळ लहान लहान नद्या समुद्रास मिळाल्यामुळें समुद्राच्या भरतीचें पाणी त्या नद्यांतून या जिल्ह्यांत बरेंच दूरवर जातें.  किनारा पुष्कळ ठिकाणी रेताड आहे.  तथापि कांही ठिकाणी तो खडकाळ असलेलाहि आढळतो.  किनार्‍यावर व खाड्यांच्या कांठालगत नारळाच्या बागा असून त्याच्या थोडें आंत गेलें म्हणजे भातशेतीची सपाट व अरूंद अशी जमीन लागते.  किनार्‍यापासून आंत १५ मैलांपेक्षां जास्त सपाटीची जमीन लागत नाही.  किनार्‍यावरील नारळाच्या बागा व आंत डोंगरांतील बाराहि महिने असणारें हिरवें गार जंगल यांमुळें या जिल्ह्यांतील वनश्रीची शोभा फारच सुंदर आहे.  रेल्वेच्या अभावी या जिल्ह्यांतील बहुतेक सर्व भाग कोणी प्रवासी पहाण्यास जात नाहीत.
    
सह्याद्रि पर्वताच्या पठारावर दोन दिशेकडे वहाणार्‍या नद्या सापडतात.  कांही पश्चिमेकडे वहात जाऊन अरबी समुद्रास मिळतात व कांही पूर्वेकडे वहात जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात.  यांपैकी या जिल्ह्यांत वहाणार्‍या मुख्य नद्या म्हटल्या म्हणजे उत्तरेकडे काळी नदी मध्यभागांत गंगावली आणि ताद्री व दक्षिणेकडे शरावती या नद्या होत. शरावती नदी होनावरच्या पूर्वेस ३५ मैलांवर ८२५ फूट उंचीच्या कड्यावरून उडी घेते.  हा धबधबा गिरसप्पाचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे.  किनार्‍यावर पाणी चांगले असून पाणीपुरवठा भरपूर आहे.
    
ग्रनाइट आणि ट्रॅप हे मुख्य खडक या भागांत आढळतात.  ग्रनाइट डोंगराच्या पायथ्याशी लॅटॅराइट सांपडतो.  हा दगड इमारतीच्या कामास फार उपयोगी आहे.
या जिल्ह्यांत जंगल विपुल आहे.  सागवान, बांबू वगैरेंची जंगले आहेत.  कारवार, कुमठा, अकोला आणि होनावर या भागांत दारू (माडी) नारळाच्या झाडापासून काढतात.
    
या भागांत वन्य प्राणी देखील पुष्कळ आहेत.  किंबहुना संबंध मुंबई इलाख्यांत या बाबतींत याच्या तोडीचा दुसरा जिल्हा नाही असें म्हटलें तरी चालेल.  वाघ, चित्ते, अस्वलें. बिबट, हरणें वगैरे वन्य प्राणी या जिल्ह्यांत विपुल आहेत.
    
किनार्‍यावरील हवा जरी दमट आहे तरी ती निरोगी आहे.  परंतु जंगलांतील हवा अतिशय हिंवतापकारक असून विशेषतः पावसाळ्याच्या प्रारंभी दोन महिने व हिंवाळ्याच्या चार महिन्यांत हिंवतापाचा जोर या भागांत फार असतो.  हिंवाळ्यांत उष्णमान ५९० अंश व उन्हाळ्यांत ९१० अंशांपर्यंत असते.  पाऊस जास्त पडतो.  कारवार येथें सरासरी ११९ इंच पाऊस पडतो.
    
किनार्‍यावर पाऊस फार पडत असल्यामुळें व समुद्र त्यावेळी खवळत असल्यामुळें तेथें कधीं कधीं पूर येऊन पिकांचे नुकसान होतें.
    
इतिहास - ख्रिस्ती शकापूर्वी तिसर्‍या शतकांत अशोकानें बनवासी येथें बौद्ध धर्माचे प्रचारक पाठविले होते.  या भागांत पुष्कळ शिलालेख सापडले आहेत त्यांवरून हा भाग निरनिराळ्या काळी बनवासीचे कदंब, रट्ट, पश्चिमेकडील चालुक्य व यादव या राजांकडे होता असें दिसते.  जैन धर्माचें हें बरीच वर्षे अभेद्य स्थान होतें.  सोळाव्या शतकांत ज्यावेळी पोर्तुगीज लोकांनी आपली सत्ता किनार्‍यावर प्रस्थापित केली त्यावेळी हा भाग विजयानगर राज्यांत होता.  तेव्हां हा फार सधन व भरभराटींत असून दक्षिणेकडील मुसुलमान सुभेदारांच्या स्वार्‍यांस यानें पुष्कळ वर्षे जुमानलें नाही.  इ.स. १५६५ साली तालीकोटच्या लढाईंत विजयानगरचा समूळ नाश झाला व तें राज्य लयास गेलें.  त्यावेळी येथील विजयानगरचे मांडलिक संस्थानिक स्वतंत्र बनले.  मुसुलमानांनी पोर्तुगीजांच्या किनार्‍यावरील वसाहतीवर स्वार्‍या केल्या.  परंतु त्यांस विजय मिळाला नाही.  तरी या भागावर हळूहळू विजापूरकरांचा पगडा बसला.  इ.स.१६७५ च्या सुमारास मराठ्यांचा ताबा या भागावर होता.  परंतु औरंगझेबाचा मोर्चा या भागावर फिरला व विजापूर पादशाही इ.स. १६८६ सालीं नष्ट झाल्यावर हा भाग मोंगलाकडे आला, व सोंड आणि बेदनूरच्या राजांकडून औरंगझेबानें खंडणी वसूल केली. इ.स. १७०० नंतर मराठ्यांनी पुनःकानड्यावर आपला ताबा बसविला.  इ.स. १७६३ साली हैदरअल्लीनें बेदनूरवर हल्ला करून तेथें अपरिमित लूट मिळविली.  सोंड संस्थान व किनार्‍यावरील प्रदेशहि त्यानें जिंकले.  त्यामुळे हैदर व मराठे समोरासमोर आले. परंतु हैदरअल्लीनें कृष्णा नदीपर्यंत मुलुख काबीज केला.  ब्रिटिशांशी लढाई सुरू असतांना टिपूनें इ.स. १७८३ सालीं होनावर गमावलें.  श्रीरंगपट्टण येथें टिपूचा पराजय होऊन तो स्वतःमरण पावल्यावर ब्रिटिशांनी इ.स. १७९९ साली सोंड खालसा केलें.  सोंड संस्थानांत त्या वेळी घाटमाथ्यावरील कानड्याच्या प्रदेशाचा अंतर्भाव झाला होता.  वेळावेळी झालेल्या लढायांमुळें व लुटालुटीमुळें सर्व प्रदेश निर्जन व ओसाड झालेला होता.  हा प्रदेश व हैदराकडून जिंकलेला किनार्‍यावरील मुलूख मद्रास इलाख्यास इ.स. १७९९ साली जोडला इ.स. १८६१ पर्यंत हा भाग त्याच इलाख्यांत हाता.  परंतु त्या साली या भागाचा मुंबई इलाख्याशी फार संबंध येत असल्यामुळें हा भाग मुंबई इलाख्यांत सामील केला.   
    
बनवासी, गिरसप्पा आणि भटकळ येथील जुनी जैन देवळें पाहण्यासारखी आहेत.  बनवासी येथील देऊळ जखनाचार्यानें बांधलें असें म्हणतात.  या आवारांत एक सुटी शिला असून तीवर दुसर्‍या शतकांतील एक लेख आहे.  गिरसप्पाजवळ नगरबस्तिकेर येथें कांही जैन देवळें आहेत.  गोकर्ण येथील हिंदु देवालयें पंधराव्या शतकांतील आहेत.  भटकळ, बनवासी आणि गिरसाप्पा येथें बरेच शिलालेख सांपडले आहेत.
    
सुपा पेट्यांत उळवी येथें काही लिंगायत लेणीं असून लिंगासाधु बसवाची एक विहीर आहे.  लोकसंख्या (१९२१) ४०१७२७.  या जिल्ह्यांत ८ गांवें व १२८१ खेडी आहेत.
    
जिल्ह्याचें मुख्य ठिकाण कारवार असून कुमठा, भटकळ, होनावर आणि शिरसी ही प्रमुख गांव होत.  या जिल्ह्यांत शेकडा ५७ लोक कानडी भाषा बोलतात.
    
पूर्वी या भागांत पोर्तुगीज लोकांनी पुष्कळ लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली होती.  इ.स. १७८४ च्या सुमारास त्यावेळी ख्रिस्ती लोकांची सुमारे ८०००० वस्ती होती असें म्हणतात.  त्या वर्षी टिपू सुलतानानें ब्रिटिशांस कानड्यामधून हांकून लावलें व त्यानें राजकीय व धार्मिक दृष्ट्या विचार करून सर्व ख्रिस्ती लोकांस इस्लामी धर्माची दीक्षा देण्याचा निश्चय केला.  त्या वेळी या भागांतील सर्व ख्रिस्ती देवळांचा नाश करून ख्रिस्ती धर्माचें दश्य रूप या भागांत यत्किंचितहि ठेवलें नाही.  पंगु, स्त्रिया व मुलें यांखेरीज सर्वांस (सुमारें ६००००) बंदीवान करून त्यानें श्रीरंगपट्टणास नेलें.  येथें पुरूषांची सुंता केली.  अविवाहित तरूण मुलींस पुष्कळांनी रखेल्या म्हणून नेल्या व पुष्कळ विवाहित स्त्रियांचा फार छळ करण्यांत आला.  त्या वर्षी सुमारे १०००० माणसें टिपूनें केलेल्या छळामुळें प्राणांस मुकली असें म्हणतात.  
    
मुख्य पिकें - भात, नाचणी, मूग, उडीद इत्यादि. किनार्‍यावर नारळ, सुपारी यांच्या बागा आहेत.  विड्यांच्या पानांचेहि बरेच मळे आहेत.  गुरांची अवलाद हलक्या प्रतीची आहे.
    
या भागांत जंगल विपुल आहे.  एकंदर ३२६२ चौरस मैल जंगल असून त्यापैकी ५४८ चौरस मैल संरक्षित आहे.  या जंगलांत सापडणारी मुख्य झाडें खैर, हेद, शिरस, धावडा, काजु, मोह, फणस, उंडी, शिसव, अबनुस, जांभुळ नांदरूक, एरंड, नाणा, आंबा, चंदन, चिंच, साग, हिरडा, इत्यादि.  इ.स. १९०३-४ सालीं जंगलापासून ९ लाखांवर उत्पन्न झालें होतें. कुमठा व बनवासी येथें चंदनावर खोदकाम करणारे कारागीर आहेत.  अंकोला तालुक्यांत मिठागरें आहेत.  ख्रिस्ती शकाच्या पूर्वीपासून भटकळ आणि होनावर ही बंदरे लोकांस माहित आहेत.  पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत ही फार महत्वाची होती.  हल्ली कारवार, कुमठा, अंकोला, होनावर आणि भटकळ ही बंदरें प्रमुख आहेत.  या बंदररांतून इ.स. १९०३-४ साली एकंदर उलाढाल ६१ लाखांची झाली.  तेथून तांदुळ, इमारतीचें लांकूड, नारळ व मसाल्याचे जिन्नस बाहेर जातात.  सदर्न मराठा रेल्वे या जिल्ह्याच्या वायव्य भागांतून जाते.  येथें पावसाळा नियमित असल्याकारणानें कधीं दुष्काळ पडत नाही.  या जिल्ह्यांत आठ तालुके आहेत ते अंकोला, होनावर, कारवार, कुमठा, सिद्दापुर, शिरसी, हल्याळ आणि येल्लापुर हे होत.  जिल्हाधिकारी कलेक्टर आहे.
    
या जिल्ह्यांत सहा म्युनिसिपालिट्या आहेत.  त्यांची नांवे : कारवार, कुमठा, शिरसी, हल्याळ, होनावर आणि भटकळ यांशिवाय गोकर्ण व उळवी येथें हंगामी म्युनिसिपालिट्या आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .