प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  
       
कानडा - अलास्का व न्यूफाउंडलंड खेरीज उत्तरअमेरिकेचा सर्व उत्तरार्थ कानडाच्या राज्यात मोडतो.  याची दक्षिणेकडील सरहद्द म्हणजे पॅसिफिक महासागर व वुंडस सरोवर यांच्या मधील ४९० अक्षांशाची समांतर रेषा होय व त्या रेषेनंतर सुपीरियर सरोवराच्या वायव्य बाजूला असलेली लहान सरोवराची व नद्यांची ओळ, व सेंट लॉरेन्स नदीच्या काठची ''ग्रेट लेक्स'' ही सरोवरें हीहि कानडाची दक्षिण सरहद्द नियंत्रित करितात.  पश्चिमसरहद्द म्हणजे दक्षिणेस पॅसिफिक महासागर किनार्‍यापासून माउंट सेंट इलियस पर्यंत काढलेली ओबाडधोबड रेषा व आर्क्टिक समुद्रापर्यंत १४१ ची रेखांश रेषा ही होय.
    
अटलांटिक व पॅसिफिक महासागरांवरील किनार्‍यावर पुष्कळ बेटें आहेत.  कानडामध्यें अतिशय सरोवरें आहेत. सर्वांत मोठी व पसरलेली सरोवरें हडसनबेच्या ५०० अथवा १००० मैलांत आहेत.  सेंट लॉरेन्सच्या जवळपास असलेली सरोवरें सर्वांत प्रख्यांत आहेत.  याशिवाय १०० मैलांपेक्षां जास्त लांबीची ९ सरोवरे व ५० मैल लांबीची ३५ सरोवरें आहेत.  येथील बहुतेक सरोवरांनां निर्गममार्ग आहे.  त्यामुळें सर्व सरोवरें स्वच्छ आहेत.
    
येथील नद्यांत सेंट लॉरेन्स नदी ऐतिहासिक व अर्थशास्त्र दृष्ट्या फार महत्वाची आहे.  सेंट लॉरेन्स व हडसनचा उपसागर यांच्यामध्यें पुष्कळ नद्या आहेत.  त्यांत व्हेल, बिग, ईस्ट, मेन, रूपर्ट, नाटावे, मूझ, अलबनी, सेव्हर्न, नेलसन व चर्चहिल ह्या मुख्य आहेत.  आलबर्टा व सास्काचेवान या उत्तरेकडील प्रांतांत अथाबास्का, पीस, सोव्ह व मॅकेंझी या मुख्य असून यांपैकी मॅकेंझी ही १००० मैलपर्यंत नाव्य आहे.  परंतु ज्या समुद्रांत फारसें दळणवळण नाहीं अशा समुद्राला ती मिळत असल्यामुळें तिचा व्हावा तसा उपयोग होत नाही.  वायव्येकडील नद्यांत यूकॉन मोठी असून ती पॅसिफिक महासागरास मिळते, व तिच्या प्रवाहापैकीं १८०० मैल भाग नाव्य आहे.  पॅसिफिक महासागरास मिळणार्‍या नद्यांत कोलंबिया ही सर्वांत मोठी आहे.  फ्रेझर नदी व्हॅन्कोव्हरजवळ समुद्राला मिळते.
    
सेंट लॉरेन्सखेरीज कानडांतील सर्व नद्या दळणवळणाच्या दृष्टीनें वर्षानुवर्ष कमी महत्वाच्या होत आहेत.  कारण जमीनीवर व पर्वतांवरून पॅसिफिक महासागरापर्यंत आगगाडी होत आहे.  कानडाच्या बहुतेक नद्यांच्या प्रवाहांत धबधबे असल्यामुळें विद्युच्छक्ति उत्पन्न करण्याच्या दृष्टीनें या नद्या फार महत्वाच्या आहेत व त्याप्रमाणें कानडांतील सर्व मोठीं शहरें या पाण्याच्या शक्तीचा उपयोग करीत आहेत.

हवा पाणी - निरनिराळ्या भागांत हवामान मिश्र आहे, म्हणून अमुक एक प्रकारची हवा कानडांत आहे असें सांगतां येत नाहीं.  समुद्राच्या जवळ वार्षिक पावसाचें सरासरी मान जास्त आहे व तें ४० पासून ५६ इंच आहे.  क्विबेक व उत्तर ओंटारियो येथें पाऊस २०-४० इंच आहे.  हिवाळ्यांत हिमवृष्टीहि बरीच होते.  उन्हाळ्यांत ६०० ते ६५० फा. उष्णता असते.  पलीकडे पश्चिमेस पाऊस कमी पडतो व हिमवृष्टीहि बरीच कमी होते.
    
क्विबेक, मॅनिटोबा, ओंटारियो या प्रांताचा सरहद्दी वाढविण्याचा कायदा १९११-१२ च्या बैठकींत पास झाला.  त्याप्रमाणें त्या त्या प्रांताची सरहद्द किती झाली याचें कोष्टक खालीं दिलें आहे.

  प्रांताचे नांव   क्षेत्रफळ चौ.मै.
  प्रिन्स एडवर्ड आयलंड    २१८४
  नोव्हास्कोशिया   २१४२८
  न्यूब्रन्सविक     २७९८५
  क्विबेक   ७०६८३४
  ऑटारियो   ४०७२६२
  मॅनीटोबा   २५१८३२
  ब्रिटिश कोलंबिया   ३५५८५५
  आल्बर्टा   २५५२८५
  रुस्कचें रान  २५१७००
  यूकॉन  २०७०७६
  नार्थवेस्ट टेरिटोरीज  १२४२२२४
  एकंदर  ३७२९६७५

कॅनडाची लोकसंख्या सन १९२१ मध्यें ८० लक्षांपासून ९० लक्षांपर्यंत असावी असा अदमास तज्ज्ञानीं काढलेला आहे.  १९११ मध्यें ७२०६६४३ इतकी लोकवस्ती होती.  लोकवस्तीची भराभर वाढ होण्याचें कारण, परराष्ट्रांतील लोक बरेच कानडांत येऊं लागले हें होय.  सन १९११ मध्यें ग्रेटब्रिटनमधून १२३०१३ व अमेरिकेंतून ६६६२० इतके लोक आले तर १९२१ मध्यें ७४२६२ ग्रेटब्रिटन मधून, ४८०५९ अमेरिकेंतून व इतर राष्ट्रांमधून २६१५६ इतके लोक आले.

कानडामध्यें बहुजनमान्य असा एकहि धर्म नाही.  येथील अमेरिकन इंडियन लोकसंख्या सुमारें १००००० आहे १९०६ मध्यें सुमारे २०००० चिनी व जपानी लोक होत.  १८८५ मध्यें कानडांत येणार्‍या चिनी लोकांवर कर बसविला व तो १९०३ मध्यें १०० पौं. करण्यांत आला.  १९०५ मध्यें असल्याच प्रकारची बंधने जपानी लोकांवर ठेवण्याचा ब्रिटिश कोलंबियानें प्रयत्‍न केला.  परंतु संयुक्त कायदे करणार्‍या सभेनें असला कायदा मान्य केला नाही.  हिंदी लोकांनां मताचा हक्क देण्याविरूद्ध कोलंबियानें चंग बांधला आहे.  जपानमधील बरेच लोक कानडांत वस्ती करण्याकरितां आलेले आहेत.  त्यासंबंधानें १९२३-२४ सालांत बरीच चर्चा झाली.  आपल्यापेक्षां कमी सुधारलेल्या लोकांनां कानडांत येऊं देऊं नये असें येथील लोकमत आहे.
    
संयुक्त सरकारनें काढलेल्या नोटा, सनद दिलेल्या पेढीच्या नोटा व सोनें चांदी व तांबें यांची नाणी हा येथील चलनी पैसा होय.  १९०६ पर्यंत नाणी इंग्लंडमध्यें पाडली जात होती.  परंतु १९०६ साली ओटावा येथें टांकसाळ उघडण्यांत आली.
    
इ.सन १९०६ मध्यें येथें ३४ सनद असलेल्या पेढ्या होत्या व त्यांच्या १५६५ शाखा होत्या.  १० वर्षांनी एकदां पेढीच्या कायद्याची तपासणी होते.  कानडांत ४ प्रकारच्या सेव्हिंग बँक्स आहेत.(१) पोस्ट ऑफिसची (२) सरकारी, (३) मांट्रेल व क्विबेक येथील खास पेढ्या (४) व सनदा असलेल्या पेढ्यांतील सेव्हिंग बँकेचें खातें.  सरकारी व्याजाचा दर शेंकडा ३ आहे.
    
संयुक्त सरकारचें उत्पन्न मुख्यतः जकात व कर यांपासून असून शिवाय खाणीचे परवाने, इमारतीच्या लांकडावरील कर व डांक वगैरेंपासून आहे.  येथील १९०५ चें उत्पन्न ७,११८६,०७३ होतें.  त्याच सालांतील कानडाचें कर्ज २६,६२,२४,१६७ होतें.  १९१९-२० सालचें अंदाजपत्रक पुढीलप्रमाणें होतें :- जमा-३४,९७,४६,३३४ डॉलर व खर्च ३०,३८,४३,९२९ डॉलर.
    
व्यापार -  १८६७ नंतर वायव्येकडील सुपीक जमिनीची मोकळीक, आगगाडीची सुरूवात व कालव्यांची सुधारणा या गोष्टीमुळें व्यापाराचे मार्ग, स्थिति व योजना बदलल्या आहेत.  पाण्याच्या शक्तीच्या उपयोगाची वाढ कानडाला फार महत्वाची होती.
    
१८७८ त 'नॅशनल पॉलिसी' नांवाच्या संरक्षक व्यापारी पद्धतीमुळें कारखान्यांची पुष्कळ भरभराट झाली.  अद्याप कानडांत संरक्षक व्यापारी पद्धतच चालूं आहे.  फक्त ग्रेटब्रिटन व ब्रिटिश वसाहतीतून येणार्‍या मालाला कांही सवलती दिल्या आहेत.  १९०७ मध्यें येथील जकात कर बसविण्यासारख्या आयात मालावर शेकडा २८ होती व एकंदर आयात मालावर शेंकडा १६ होती.  अंतर्व्यापार खुला आहे, व येथील बाजारचें महत्व वाढत आहे.  कानडासंबंधी व्यापारी तह करण्याचा अधिकार ग्रेटब्रिटनला आहे परंतु बहुतेक वेळां कानडाच्या अधिकार्‍यांची अनुमती ग्रेटब्रिटनला असला तह करण्याच्या वेळी मिळवावी लागते. कानडाचा बराचसा परदेशांशी असलेला व्यापार व युनायटेड स्टेटस यांच्याशी आहे.  युनायटेड स्टेटसमधून बहुतेक तयार आयात माल येतो.  व बराच कच्चाहि माल येतो.  शेतीचा माल हा निर्गत मालांत महत्वाचा आहे.  सोनें.  चांदी, तांबें व दुसरी खनिज द्रव्यें या देशांतून परदेशांत जातात.  अंतस्थ व्यापारांत वाढता भाव घेण्याच्या चढाओढीपेक्षां येथील कारखाने जास्त कांही करीत नाहींत.  उपयोगाकरितां लागणार्‍या तयार मालाचा कमीत कमी ५६ हिस्सा येथें तयार होतो.  १९२३ साली कानडामधून ९९४ दशलक्ष डालरांची निर्गत व ९१२ दशलक्ष डॉलरांची आयात झाली.  निर्गत मालाच्या बाबतींत साम्राज्यांत कानडाचा दुसरा नंबर लागतो.
    
दळणवळण - हॅलिफॅक्स, सिडने, सेंटजॉन, क्विबेक व मांट्रिल ही अॅटलांटिक महासागरावरील बंदरें आहेत व व्हँकोव्हर, एस्क्वीमाल्ट व व्हिकटोरिया ही पॅसिफिक महासागरावरील बंदरे आहेत.  ग्रेटब्रिटन व कानडा यांच्यामध्यें आगबोटीचे बरेच रस्ते आहेत.  फ्रान्सशीं प्रत्यक्ष दळणवळण आहे व जपान व आस्ट्रेलियाकडे नेमानें जहाजें जातात.
    
येथील आगगाड्यांच्या रस्त्यांचे मुख्य ४ विभाग आहेत.  (१) ग्रँट ट्रंक, (२) कॅनेडिअन पॅसिफिक, (३) कॅनेडिअन नार्दर्न व (४) इंटर कलोनियल.  आगगाडीच्या रचनेकरितां संयुक्त, प्रांतिक व स्थानिक सरकारांकडून सढळ हातानें मदत मिळते.
    
इ.स. १९२१ मध्यें कॅनडांतील सर्व आगगाड्यांचें केंद्रीकरण होऊन त्यांच्या कॅनेडियन पॅसिफिक व नॅशनल रेल्वेज अशा दोनच मोठ्या कंपन्या झाल्या.  १९१८ मध्यें ३८८७५ मैल रेल्वे चालू होती.  त्यांपैकी २०००० मैल रेल्वे सरकारच्या ताब्यांत होती.  सेंट लॉरेन्स नदीवर, तसेंच ओंटारियो, एरि, सेंट क्लेअर इत्यादि सरोवरांवर कालवे बांधून, माँट्रिल ते पोर्ट ऑर्थर इतक्या अंतरापर्यंत म्हणजे जवळ जवळ १२१४ मैलपर्यत जलमार्गानें दळणवळण चालू झालेलें आहे.
    
शिक्षण - ब्रिटिश नॉर्थ अमेरिकेच्या कायद्यान्वयें शिक्षणावरील अधिकार त्या त्या प्रांतांकडे ठेविला आहे.  सर्व प्रांतांत प्राथमिक शिक्षण फुकट व कांही प्रांतांत दुय्यम शिक्षणहि फुकट आहे.  यांचा खर्च स्थानिक करांतून व सरकारी मदतीतून भागतो.  दुय्यम प्रतीचें शिक्षण हायस्कुलांतून, कॉलेजच्या संस्थांतून दिलें जातें व या संस्था सर्व शहरांतून आहेत.  प्रत्येक प्रांतांत काही शिक्षकशिक्षणसंस्था आहेत.  उच्च शिक्षणाची सुद्धां पूर्ण व्यवस्था आहे.  संयुक्त सरकारनें चालविलेली शेतकीची विद्यालयें व प्रयोगाची शेतें शेतकर्‍यांना उत्तम शिक्षण व मदत देतात.
    
सन १९०१ मध्यें एकंदर लोकसंख्येपैकी शेकडा ७६ लोकांनां व पांच वर्षाच्या वरील वयाच्या लोकसंख्येपैकी शेंकडा ८६ लोकांनां लिहितां वाचतां येत होतें.  सर्व प्रांताची शिक्षणपद्धति उत्तम आहे.  येथें पुष्कळ वसतिगृहयुक्त शाळा असून देशाच्या सांपत्तिक भरभराटीबरोबर त्या वाढत आहेत.  येथें एकंदर २२ विश्वविद्यालयें व ४३ कॉलेजे आहेत.  बहुतेक मोठ्या शहरांत वाचनालयें आहेत पैकी टोराँटोच्या वाचनालयांत मोठा ग्रंथसंग्रह व उत्तम व्यवस्था आहे. विद्वान लोकांच्या व शास्त्रीय अशा संस्थांत १८८१ मध्यें स्थापन झालेली ''रॉयल सोसायटी ऑफ कॅनडा'' ही मुख्य आहे.  १९१७ साली सबंध कानडांत एकंदर १३७२ नियतकालिकें होती.  पैकी १३५ दैनिकें ४ आठवड्यांतून तीनदां निघणारीं, ४४ आठवड्यांतून दोनदां निघणारी, ९३६ साप्ताहिकें, २१३ मासिकें, २५ अर्धमासिकें, ४ द्वैमासिकें व ११ त्रैमासिकें होती.
    
रक्षण - आरमारी व लष्करी फौजेवरील अधिकार राजाला दिलेला आहे.  परंतु या फौजेवर संयुक्त सरकारचा ताबा असतो.  १९०५ पर्यंत हॅलिफक्स व इस्क्विमाल्ट हीं तटबंदीची बंदरें सार्वभौम सरकारकडून राखली जात होती; परंतु १९०५ पासून हा अधिकार कानडानें घेतला.  १८ व ६० यांच्या दरम्यानच्या वयाच्या प्रत्येक योग्य मनुष्याचें नांव लष्करांत घातलें जातें.  परंतु खडें सैन्य ४५००० आहे.  कानडाच्या बाहेर जाण्यास यांच्यावर जबरदस्ती करितां येत नाही.  व या कामाकरितां विशिष्ट लष्करभरती करावी लागते.
    
१९०४ च्या मिलिशिया अॅक्टप्रमाणें सर्व सैन्याचा मुख्य राजा हा असून त्याच्यातर्फे व्हाइसराय हा सैन्यावर सत्ता गाजवितो.  या सैन्याची व्यवस्था सैन्य व संरक्षण या खात्याच्या प्रधानाकडे सोंपविलेली आहे.  याशिवाय या प्रधानाच्या हाताखालीं एक असिस्टंट डेप्युटी, चार लष्करी अम्मलदार व एक इन्स्पेक्टर जरल असे पांच इसम असतात.  सैन्याचे अॅक्टिव्ह व रिझर्व असे दोन भाग आहेत.  किंग्स्टन येथें सैन्याला लष्करी शिक्षण देण्यासाठी एक लष्करी कॉलेज आहे.  आरमारी सैन्याची व्यवस्थ आरमारी खात्याच्या प्रधानाकडे आहे.  आरमारी सैन्याला शिक्षण देण्याकरितां एक रॉयल नेव्हल कॉलेज उघडलेलें आहे.

न्याय व गुन्हे - सर्व देशांतून न्याय उत्तम तर्‍हेनें दिला जातो.  डोमिनियनच्या पार्लमेंटाकडून न्यायाधीश नेमिले जातात.  कानडांतील वरिष्ठ कोर्टांतील निकालावर प्रिव्हि कौन्सिलच्या न्यायसभेकडे अपील करितां येतें.  
    
१९१६ साली २३९४२ लोकांवर आरोप ठेवण्यांत आले.  पैकी १९१६० आरोपीनां शिक्षा झाली.
    
शेती - कानडा हा देश मुख्यत्वेंकरून शेतीचा आहे.  एकंदर लोकसंख्येपैकी १९०७ मध्यें शेंकडा ५० लोक प्रत्यक्ष रीतीनें शेतींत गुंतलेले होते.  याशिवाय पुष्कळ लोक शेतीशी संबंध असलेल्या धंद्यांत गुंतलेले आहेत.  पुष्कळ प्रकारचा गहूं येथें होतो.
    
कानडांत १९१८ त २१,०३,१६,००० बुशील गहूं पिकला.  एकंदर गहूं पेरला जाणारी जमीन १९१८ त १,७३,५३,९०२ एकर होती.  यूरोपच्या बाजारांत कानडांतील कणिकेला बराच मान आहे.  १९१८ सालांत कानडांतून ३६,६३,४१,५६५ डॉलर किंमतीचा गहूं बाहेर देशांत गेला व कणिक ९,५८,९६,४९२ डालर किंमतीची बाहेर गेली.  गव्हाच्या खालोखाल ओट पिकतो.  १९१८ त ३,७६,४४,२९३ डॉलर किंमतीचा ओट बाहेर गेला.  याशिवाय जव, रायबक नांवाचा गहूं व वाटाणे येथें होतात.  चांगल्या गुरांची पैदास करण्याचा धंदाहि येथें बराच चालतो.  घोडे, मेंढ्या व डुकरें यांची बरीच निपज होते.
    
कानडाला दुधाचा व मधाचा देश असें म्हणण्यांत येतें. येथें दूध विपुल आहे व लोकांच्या खाण्यांत तें बरेंच येतें.  दूधदुभत्याच्या धंद्याची कानडांतील स्थिति नमुनेदार आहे व हा धंदा शेतकर्‍यांच्या परस्परसहकारी संस्थांकडून बहुतेक चालविला जातो.  कानडांत दूधदुभत्यांच्या कारखान्यांची पद्धत १८६४ मध्यें सुरू झाली.  व तेव्हांपासून हा धंदा झपाट्यानें वाढत आहे.  १८९१ मध्यें लोणी व मलई करण्याचे कारखाने कानडांत १७३३ होते.  ते १८९९ मध्यें ३६०९ झाले, व १९०८ मध्यें ४३५५ झाले.  ग्रेटब्रिटनमध्यें परदेशाहून येणार्‍या 'चीझ'च्या किंमतीपैकी शेंकडा ७२ किंमतीचे चीझ कानडाहून आलें.  १९०६ त २,४४,४३,१६९ डॉ.किंमतीचें २१,५८,३४,५४३ पौंड चीझ परदेशांत गेलें व १९१७ त ४,११,७१,००० डॉ.  किंमतीचें १९,४९,०४००० पौंड चीझ कारखान्यांतून तयार झालें.  प्रयोगी शेतें चालवून गुरें वाढविण्याच्या, दूधदुभत्याच्या व फळाच्या धंद्याला मदत करून डोमिनियनचें सरकार येथील शेतीला मदत करितें. सरकार दूधदुभत्याचें काम चालविण्याकरितां लागणारी धंदेविषयक व सामान्य माहिती पुरवितें.  याशिवाय लोणी व चीझ तयार करण्यास व परदेशांत पाठविण्यास लागणार्‍या उत्तम योजनांचा प्रसार करण्याकरितां नमुनेदार चीझचे व मलई काढण्याचे कारखाने निरनिराळ्या ठिकाणीं काढण्यांत आले आहेत.
    
चांगल्या प्रतीचें बीं उत्पन्न करण्यास व उपयोगांत आण्ण्यास उत्तेजन देण्याकरितां १९०० साली बीखातें स्थापण्यांत आलें.  प्रयोगशाळेंत बीजासंबंधी शास्त्रीय शोध केले जातात व त्यासंबंधी माहिती दिली जाते.
    
शेतकीचें उत्पन्न सन १९१८ मध्यें २,३८,००,००,००० इतकें डॉलर्स झाले.  मेंढ्यांच्या संख्येत मात्र बराच र्‍हास झालेला आढळून आला.  १८७१ मध्यें ३१,५५,५०९ इतकी मेंढ्यांची संख्या होती ती १९१७ साली २३,६९,३५८ इतकी भरली.  १९१९ मध्यें  ४३,५०,७०,००० डॉलर किंमतीचे घोडे, ३२,७८,१४,००० इतक्या किंमतीच्या दुभत्या गाई व ३८,१०,०७,००० डॉलरची इतर जनावरें कानडामध्यें होती.  जंगलखात्याचेंहि उत्पन्न फार आहे.  १९१७ मध्यें कानडामधील सागवानी लांकूड १९,००,००,००० डॉलरचें भरले.  जंगलखात्यांतील कच्च्या मालाचें उत्पन्न ५,६०,००,००० डॉलर व तयार मालाचें उत्पन्न १४,६३,३०,१९२ डॉलर सन १९१७ साली भरलें.  जंगलखात्याची व्यवस्था, ब्रिटिश कोलंबियामध्यें फारच पद्धतशीर व उत्कृष्ट आहे.  कानडांतील लंबर लांकडाचें उत्पन्न १९२१ त २२,२६,४८,७९० डॉलर झालें.  १९२२ साली जंगलखात्यांत ४००० वणवे पेटले व त्यामुळे  सागवानी लाकूड पार जळून गेले व कानडाला त्यामुळे फार नुकसान सोसावे लागले.  अशा प्रकारचे वणवे शक्य तितक्या जलद विझविण्यांत यावेत यासाठी विमानांतून वणवे विझविण्याची सोय करण्यांत आली आहे. सन १९१९ त कानडांत ९,१३,६२,९१३ डॉ. किंमतीचा कागद  व ४,८५,६२,०८८ डॉलर किंमतीचा लगदा तयार झाला.  जंगली जनावरें व त्यांतल्या त्यांत ज्यापासून फार उत्पन्न होतें अशी जनावरें संभाळण्याकरतां व ती चांगली धष्टपुष्ट  करुन त्याच्या पासून शक्य तितकें अधिक उत्पन्न काढून घेण्याकारतां कानडासरकारनें निरनिराळीं प्राणिगृहें बांधली आहेत.  १९१४ मध्यें ५५,६९,४७४ डॉलर किंमतीची लव व लोकर कानडामधून बाहेर गेली व १९१९ मध्यें १,३७३७,६२१ इतक्या किंमतीची फर बाहेर गेली;  म्हणजे पांच वर्षांच्या अवधींत जवळजवळ दुपटीचा फरक पडला.  यावरून या प्राणिगृहांचा किती उपयोग होत आहे हें दिसून येतें.  कानडांतील प्रत्येक प्रांताच्या सरकारनें आपापलें स्वतंत्र मासळी खातें (फिशरी) उघडलें आहे.  माशांची वृद्धि होण्यासाठी त्यांनी खटपट चालविली आहे.  कानडामध्यें, ट्राउट ऑयस्टर वगैरे निरनिराळ्या माशांची पूर्ण समृद्धि आहे.  
    
शेतकीशिक्षण - प्रत्येक प्रांताच्या सरकारी कारभारांत एक शेतकीखातें असतें. माहिती देणार्‍या दुसर्‍या प्रांतिक साधनांत शेतकर्‍यांची संस्था, दूधदुभत्याच्या व गुरें वाढविणार्‍या फिरत्या संस्था आहेत.  या निरनिराळ्या प्रांतांकडून चालविल्या जातात, अथवा त्यांना मदत दिली जाते.  या संस्थांच्या महत्वाच्या सभेच्या कामाचा अहवाल व भाषणें प्रांतिक सरकारांकडून प्रसिद्ध केलीं जातात व ज्यांनां ती पाहिजे असतात त्यांनां ती फुकट पाठविण्यांत येतात.  उच्च प्रतीचीं वार्षिक शेतकीप्रदर्शनें भरतात व त्या ठिकाणीं शेतकीच्या उत्पन्नाचें चढाओढीनें प्रदर्शन होतें.  साम्राज्य सरकार आळीपाळीनें ५०००० ची मदत स्थानिक प्रदर्शनांस करितें.
    
येथें अनेक महत्वाची शेतकीची विद्यालयें आहेत, त्यांत 'ओंटारियो' शेतकी विद्यालय मुख्य आहे.  बहुतेक प्रत्येक प्रांतात दूधदुभत्याच्या शाळा आहेत.
    
खनिज पदार्थ - १९१७ साली कानडांतील खनिज पदार्थांचें उत्पन्न - ७,९२,८६,२०२ डॉलर होतें,  ते १९२० साली २१,७७,७५,०८० इतकें भरले.  कानडामध्यें निकल व अॅसबेस्टास यांची समृद्धि असल्यामुळें या धातूंचा व्यापार कानडानें जगभर चालविला आहे.  १९२० मध्यें कोळसा, निकल, सोनें, सीमेंट, तांबे, रूपे व अॅसबेस्टास या मुख्य उत्पन्नाच्या बाबी होत्या.  ब्रिटिश साम्राज्यामध्यें कोळशाच्या उत्पन्नाच्या बाबतीत कानडाचा दुसरा नंबर लागतो.  १९२१ मध्यें ७,७०,००,००० डॉलर किंमतीचा कोळसा कानडांत तयार झाला.  १९२० मध्यें लोखंड ३६,५०,००,००० टन झालें यूकन, मॅनिटोबा, नोव्हास्कॉशिया, क्विबेक, उत्तर ओंटारियो इत्यादि ठिकाणी सोन्याच्या खाणीं आहेत.  १९२२ साली, ओंटारियोमधील गवताळ रानामध्यें असलेल्या सोन्याच्या खाणी खणण्याचें काम सुरू झालें असून त्या कामाला मदत करण्यासाठी लंडनमध्यें एक कंपनी स्थापन झाली आहे.  ब्रिटिश कोलंबियामध्यें स्लोकन तालुक्यांत, चांदीहि उपलब्ध होते.  कानडामध्यें तांबें सर्व ठिकाणी भरपूर सापडते.  १९१७ मध्यें ११,००,००,००० पौंड तांबें कानडामध्यें निघालें.
    
राज्यव्यवस्था - मुख्य अंमलबजावणीचा अधिकार साम्राज्याधिपतीला आहे.  त्याचप्रमाणें त्याचा लष्करावर व आरमारावर अधिकार आहे. गव्हर्नर जनरल हा साम्राज्यधिपतीचा प्रतिनिधि असतो व तो त्याचें काम करितो.  तो पांच वर्षेपर्यंत अधिकारारूढ असतो.  त्याचा अधिकार कडकपणें नियंत्रित केलेला आहे.  साम्राज्याच्या हिताशी विरोधी असणार्‍या कोणत्याहि बिलाला अनुमति देण्याचें नाकारण्याचा अधिकार त्याला आहे.  सीनेट हें आयुर्मर्यादेपावेतों अधिकारारूढ असणार्‍या सभासदांचे असतें व हे सभासद कौन्सिलच्या अनुमतीनें गव्हर्नरजनरल नेमतो.  प्रथम यांच्यांत ७२ सभासद होते.  क्विबेकहून २४ ओंटारियोहून २४ व समुद्रतीरावरील प्रांतांतून २४ असे ते होते.  पुढें जसजसे नवीन प्रांत जोडण्यांत आले तसतशी ह्या सभासदांची संख्या वाढत गेली.  हाऊस ऑफ कामन्समध्यें लोकांनी निवडलेले सभासद असतात.  सभासदांची संख्या प्रथम १९६ होती परंतु दशवार्षिक खानेसुमारीच्या वेळेला ती बदलते.  मूळ कायद्याप्रमाणें क्विबेकला ६५ सभासद पाठविण्याचा नेहमी हक्क आहे व इतर प्रांतांना क्विबेकमध्यें लोकसंख्येचें व सभासदांचे जें प्रमाण असेल त्या प्रमाणांत सभासद पाठविण्याचा अधिकार आहे.  १९०८ मध्यें हे सभासद २१८ होते.  ब्रिटिश नार्थअमेरिका कायद्यानें प्रत्येक प्रांताला त्याचें अधिकारक्षेत्र आंखून दिलें व राहिलेले अधिकार संयुक्त सरकारला देण्यांत आले होते.  प्रत्येक प्रांताला कायदे करण्याला बरेंच क्षेत्र आहे व हे कायदे प्रांतिक प्रतिनिधी सभा करते.
    
इतिहास - कानडाचा यूरोपियन लोकांशी म्हणण्यासारखा संबंध पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत आला नाही.  जॉन कॅबट हा ब्रिस्टलहून निघून कानडाच्या किनार्‍यावर १४९७ मध्यें आला.  लवकरच यूरोपांतून कोळी लोक न्यू फाउंडलंडच्या किनार्‍यावर व नंतर खुद्द अमेरिकेच्या किनार्‍यावर येऊं लागले.  फ्रान्सच्या पहिल्या फ्रान्सिसनें ''जाक्वेस कारटिअर'' याच्या आधिपत्याखाली एक टोळी पाठविली व ती सेंटलारेन्सच्या आखातांत १५३४ त शिरली.  पुढील ६० वर्षांत मासे धरण्याच्या व लोंकरीच्या धंद्याकडे लोकांचें लक्ष गेलें, परंतु वसाहत झाली नाही.  सतराव्या शतकाच्या आरंभी साम्युअल दि चाम्प्पेन नांवाच्या फ्रेंच मनुष्यास लोंकरीच्या व्यापारानिमित्त येथें पाठविलें.  त्यानें १६०३ मध्यें सेंट लारेन्सच्या वरच्या भागांत जलपर्यटन करून पहिली कायमची फ्रेंच वसाहत केली व ती हल्लीचा नोव्हास्कोशिया होय.  इ.स. १६०८ मध्यें त्यानें क्विबेकची वसाहत सुरू केली.  त्यानें आमरण कानडाची वसाहत या दृष्टीनें वाढ करण्यास व लोकंरीचा व मासे पकडण्याचा धंदा वाढविण्यास अविश्रांत मेहनत केली, व आंतील भाग शोधण्यांतहि त्यानें बरेच परिश्रम केले.  तो ह्युरन व ओंटारियो सरोवरापर्यत पोहोचला.  इंग्रज व फ्रेंच यांच्यामधील तीस वर्षांच्या युद्धांत (इ.स. १६१८-१६४८) व्हर्जिनियातील इंग्रजांनी फ्रेंच लोकांच्या वसाहती घेतल्या, परंतु १६३२ मध्यें झालेल्या तहान्वयें कानडा फ्रान्साला परत दिला.  याच सुमारास फ्रान्समध्यें ''दि कंपनी ऑफ वनहंड्रेड असोसिएटस'' नांवाची कंपनी निघाली.  तिला १६२९ पासून ५० वर्षेपर्यत व्यापाराचा पूर्ण कुल अधिकार देण्यांत यावयाचा होता व तिच्या प्रदेशांतील माल फ्रान्समध्यें कर न घेतां येऊं दिला जात असे.  मोबदला म्हणून नवीन फ्रान्समध्यें दरसाल ३०० वसाहतवाले न्यावे असें ठरले.  १६६३ पर्यंत या  कंपनीच्या ताब्यात नवीन फ्रान्स होता. परंतु या कंपनीनें व्यापाराच्या बाबतींत व वसाहतीच्या बाबतींत फार थोडें काम केल्यामुळें तिची सनद रद्द करण्यांत आली व नवीन फ्रान्स हा राज्याचा प्रांत झाला व गव्हर्नर वगैरे नेमून त्याची व्यवस्था फ्रान्सच्या प्रांताप्रमाणें करण्यांत आली.  १६६४ मध्यें '' कंपनी ऑफ दि वेस्ट इंडीज'' नांवाची कंपनी स्थापण्यांत आली.  कानडाच्या व आफ्रिकेच्या व्यापाराचा व वसाहतीचा तिला अधिकार दिला.  परंतु १६६५ मधील तिच्या कामाखेरीज तिच्याकडून कांही काम झालें नाही.  १६७४ मध्यें तिची सनद काढून घेण्यांत आली.  मध्यंतरी फ्रेंच शोधकांनी बरीच प्रगति करून नवीन देश शोधून काढिला.  १६८२ मध्यें मिसिसिपि नदीच्या कांठच्या प्रदेशांत वसाहत करून तिला लुसियाना असें नांव दिलें.  येथें आधिपत्याकरितां चर्च व राज्यकारभार पाहाणारे यांच्यांत बरीच चढाओढ होती.
    
इंग्रजांशी तंटा :- अमेरिकेंत मोठें साम्राज्य स्थापण्याच्या फ्रान्सच्या हेतूला मूर्त स्वरूप प्राप्‍त होत होतें.  यूरोपमध्यें ज्याप्रमाणें  इंग्रज व फ्रेंच यांच्यात रणकंदन सुरु होते, त्याप्रमाणे ते येथेंहि सुरू झालें.  फ्रेंच गव्हर्नर फांटिनॅक यानें नवीन इंग्लंडवर हल्ला करण्याचा बेत केला व सरहद्दीवरील लढायांस उत्तेजन दिलें.  त्याच्यावर इंग्रजांनी उलट स्वारी केली.  इ.स. १६९० मध्यें सर विल्यम किक्स यानें स्वारी करून हल्लींचा नोव्हास्कोशिया जिंकला व क्विबेक वर स्वारी केली.  परंतु त्याला अपयश् घ्यावें लागले.  १६९७ च्या रिसविकच्या तहामुळें हें भांडण थांबलें; परंतु ते पुन्हां इ.स. १७०१ मध्यें सुरू झालें. म्हणून ते अमेरिकेंतहि सुरू झालें.  त्यांत फ्रान्सचें बरेंच नुकसान झालें.  १७११ मध्यें क्विबेक घेण्याचा प्रयत्‍न इंग्रजांनी केला, परंतु तो फसला.  तरी पण त्यांनी नोव्हास्कोशिया घेतला.  १७१३ मध्यें झालेल्या तहान्वयें फ्रान्सनें हडसनबे, न्यू फाउंड लंड व नोव्हास्कोशिया यांच्यावरील आपला हक्क सोडला.  फ्रान्सच्या ताब्यांत सेंट लारेन्सच्या कांठचा प्रदेश व केप ब्रिटनचें बेट हीं होती.  तेथें त्यांनी लुईबर्गचा किल्ला बांधला व इंग्रजांनां तोंड देण्याची तयारी केली.  इसवी सन १७०१ मध्यें डेट्राईट वसवलें गेलें.  तें म्हणजे त्यांची वसाहत हल्लीच्या कॅनडियन वेस्टपर्यंत पोहोचलें मिसिसिपीच्या मुखाजवळ न्युआर्लिअन्सची वसाहत केली.  न्यू आर्लिअन्स व क्विबेक या वसाहती वसाहतीच्या रांगेनें फ्रान्सनें जोडल्या असत्या व इंग्रजांनां अॅटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील प्रदेशांतच कोंडून ठेविलें असतें तर नार्थ अमेरिका त्यांच्या ताब्यांत आली असती.  जेव्हां आस्ट्रियन गादीच्या तंट्याची लढाई सुरू झाली तेव्हा १७४४ मध्यें लुईबर्ग किल्ला इंग्रजांनी घेतला.  परंतु १७४८ च्या तहान्वयें तो परत करण्यांत आला.  इ.स. १७५६ मध्यें सात वर्षांची लढाई सुरू झाली.  फ्रान्सजवळ ब्रिटनला अमेरिकेंत तोंड देण्यापुरती सामुग्री नव्हती.  त्यामुळें १७५९ मध्यें क्विबेक इंग्रजांच्या ताब्यांत गेलें.  पुढच्या वर्षी कानडांतील फ्रेंच सैन्य इंग्रजांस शरण गेलें.  इ.स.१७६३ या पारिसच्या तहान्वयें सर्व नवीन फ्रान्स कायमचा इंग्रजांनां दिला गेला.
    
इ.स. १७६३ च्या तहानंतर कानडाचा राज्यकारभार राज्याच्या जाहीरनाम्यान्वयें करण्यांत येत होता.  १७७४ मध्यें साम्राज्याच्या प्रतिनिधिसभेनें पास केलेल्या क्विबेकच्या कायद्याप्रमाणें राज्यकारभार चालूं लागला.  या कायद्यान्वयें फ्रान्सच्या ताब्यांतील पश्चिमेकडील मुलूख कानडांत क्विबेक प्रांतास जोडला गेला, व ह्या प्रांताचा कारभार क्विबेकहून पहावयाचें ठरलें.  रोमन कॅथोलिक चर्चला कानडांतील अधिकार दिले.
    
इ.स. १७५५ मध्यें अमेरिकेंत राज्यक्रांतीचें युद्ध सुरू झालें, व त्याच्या पुढार्‍यांनी कानडालाहि आपल्या गोटांत घेण्याचे प्रयत्‍न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत.  अमेकिन राज्यक्रांतीमुळें कानडांत बराच फरक झाला, कारण जेथें यूरोपियन वसाहतवाले फार थोडे होते तेथें यूरोपियन लोक आणखी आले.  इ.स. १७९१ त ब्रिटिश पार्लमेंटमध्यें कान्स्टिट्यूशनल कायदा पास केला.  त्याप्रमाणें कानडाचे ओटावा नदीच्या रेषेनें दोन भाग करण्यांत आले.  त्यांनां वरचा व खालचा कानडा असें म्हणतात.  खालच्या म्ह.लोअर कानडांत पूर्वीचीच राज्यपद्धति चालू होती.  फक्त प्रतिनिधिपद्धत तेथें जास्त सुरू केली.  वरच्या म्हणजे अपर कानडांत ब्रिटिश पद्धतीवर राज्यकारभार चालतो.  १८१२ मध्यें युनायटेडस्टेटशी ब्रिटनचें युद्ध झालें, त्यावेळेस घेंटच्या तहान्वयें कानडाची राज्यपद्धात जशीच्या तशीच राहूं दिली.
    
सेंट लारेन्सवर फ्रेंच प्रजासत्ताक राज्यपद्धति सुरू करण्याच्या उद्देशानें लोअर कानडांतील फ्रेंच लोकांनी १८३७ त बंड केलें, त्याचप्रमाणें त्याच सालीं अपर कानडांतील लोकांनीहि बंड केलें.  १८३८ मध्यें डरहॅमच्या अर्लला कानडावर पाठविलें.  त्यानें असा रिपोर्ट लिहिला की कानडाचे हे दोन्ही भाग एक करून त्यास स्वराज्य द्यावें.  त्यामुळें त्याला परत बोलाविलें.  पुढें इ.स. १८४० मध्यें अपर व लोअर कानडा जोडणारा ''अॅक्ट ऑफ युनियन '' हा कायदा पास झाला.  प्रत्येक प्रांत एका पार्लमेंटमध्यें सारखे प्रतिनिधी पाठवीत असे.  या दोन प्रांतांच्या एकीकरणामुळें कारभार सुयंत्रित रीतीनें चालत नव्हता.  प्रत्येक प्रांताला एकमेकांचा हेवा वाटत असे.  इंग्लिश व फ्रेंच लोक सारखेच असल्यामुळें राज्यकारभार जवळ जवळ अशक्य झाला.  १८६४ मध्यें क्विबेकला एक परिषद भरली.  व तिनें एक योजना तयार केली व तीच थोड्याशा फेरफारानें साम्राज्याच्या पार्लमेंटमध्यें ''दि ब्रिटिश नॉर्थ अमेरिका अॅक्ट'' या नांवानें पास झाली.  इ.स. १८६७ च्या जुलईच्या पहिल्या तारखेस कानडाचें 'डोमिनियन' अस्तित्वांत आलें.  कानडांतील प्रांतांनां अमेरिकन यूनियनपेक्षां कमी अधिकार दिले व संयुक्त सरकारनें राहिलेले अधिकार आपल्याकडे ठेविले.  यावेळी कानडाच्या डोमिनियनचे ४ प्रांत होते ते ओंटारियो, क्विबेक, न्यूब्रन्सविक व नोव्हास्कोशिया होत.  या ४ प्रांतांकरितां चार लेफ्टनंट गव्हर्नर नेमण्यांत आले व ७० सभासद नेमण्यांत आले.  त्यांपैकी निम्मे  लिबरल व निम्मे कांझरव्हेटिव्ह होते.  मुख्य प्रधानाला के.सी.बी.हा किताब देण्यांत आला.
    
संयुक्ततेच्या पूर्णतेनंतर लवकरच नोव्हास्कोशियांत विभक्त होण्याची चळवळ सुरू झाली, व राणीकडे हाऊ यांच्याबरोबर शिष्टमंडळ पाठविण्यांत आलें परंतु त्याचा कांही फायदा होत नाही असें पाहून हाऊनें संयुक्त होण्याच्या वेळी नोव्हास्कोशियाशीं केलेल्या करारांत फेरफार करून घेतला व त्याचप्रमाणें संयुक्तसरकारनें हमी घेतलेल्या नोव्हास्कोशियाच्या कर्जाची रक्कम वाढविली, व १० वर्षेपर्यंत संयुक्त सरकारनें ८२६९८ डॉलर मदत देण्याचें ठरलें.  डोमेनियनच्या पहिल्या पार्लमेंट सभेनंतर १ महिन्यांतच रूपर्टसलँड व वायव्यप्रांत कानडास जोडण्यासंबंधी चळवळ सुरू झाली.  हे प्रांत ''हडसन बे कंपनीच्या'' ताब्यांत होते.  या कंपनीला आपला हक्क सोडून देण्यास सांगण्याकरितां एक शिष्टमंडळ विलायतेला गेले.  त्यांनी पुष्कळ वाटाघाट करून कंपनीला ३ लक्ष पौंड देऊन तिनें हक्क सोडावे असें ठरलें.  कंपनीनें आपल्याकडे कांही सुपीक जमीन ठेऊन घेतली.  १८६८ त साम्राज्याच्या पर्ल्मेंटमध्यें हा अधिकार बदलण्याचा कायदा पास झाला.  १८६९ मध्यें कनेडियन पार्लमेंटमध्ये हा कायदा मान्य केला.  ''रेड रिव्हर'' नांवाच्या वसाहतींत मध्यंतरी बंड झालें परंतु ते लवकरच मोडण्यांत आलें.  ''ब्रिटिश नार्थ अमेरिका'' या कायद्यान्वयें डोमिनियनमध्यें नवीन प्रांत घेण्याची सवड होती.  त्याप्रमाणे पहिल्यानें मानिटोबा जोडण्यांत आला, १८७१ मध्यें ब्रिटिश कोलंबिया जोडण्यांत आला.  १८७३ मध्यें प्रिन्स एडवर्ड बेट जोडण्यांत आलें व १८७८ सालीं न्यू फाऊंडलंड खेरीज उत्तर अमेरिकंतील सर्व ब्रिटिशांच्या ताब्यांतील मुलूख संयुक्त करण्यांत आला आहे असें जाहीर करण्यांत आलें.
    
ब्रिटिश कोलंबियाची सरहद्द आंखलेली नसल्यामुळें व युनायटेड स्टेटस व कानडा या दोघांच्याहि ताब्यांत असलेल्या नद्यांत नावा चालविण्याच्या अधिकाराबद्दलच्या तंट्यामुळें व दुसर्‍या कांही कारणांमुळें या दोन राष्ट्रांत वादाचें कारण उत्पन्न झालें.  इंग्लंडला मध्यस्थी करण्याविषयीं विनंती करण्यांत आली.  त्याप्रमाणें एक कमिशन बसवून या वादाचा निकाल समाधानकारक रीतीनें लावण्यांत आला.
    
इ.स. १८७२ साली डोमिनियनमध्यें दुसरी निवडणूक झाली, व तींत संयुक्ततेच्या विरूद्ध असलेल्या लोकांचा पराभव झाला.  या सभेंत ट्रान्स-कॉन्टिनेंटल आगगाडी संबंधाने लढा माजला व शेंवटी ही आगगाडी तयार करण्याची मुदत वाढविण्यांत आली.  त्यामुळें ब्रिटिश कोलंबियांत अस्वस्थता माजली, कारण त्यांनी १० वर्षांत ही आगगाडी तयार होईल या अटीवरच संयुक्ततेस अनुमति दिली होती.
    
अथशास्त्रीय 'राष्ट्रीय धोरण' - मॅकेंझीच्या राज्यकारभाराच्या अवधींत एकसारखी डोमिनियनच्या उत्पन्नांत तूट आली.  कानडांत सुरू असलेल्या कडक संरक्षक व्यापारीपद्धतीमुळें कानडांतील धंद्यांचा नाश झाला.  या स्थितींत सर जे मॅक्डोनल्ड यानें ''नॅशनल पॉलिसी'' नांवाची पद्धत सुरू करावी, असा ठराव आणला.  व त्यावेळी ठरलेली व्यापारी पद्धत थोड्या फेरफारानें लिबरल व कान्झर्व्हेटिव्ह या दोन्ही पक्षांच्या वेळी कायम राहिली.
    
कनेडीयन पॅसिफिक रेल्वेची पूर्तता :- इ.स. १८७८ मध्यें कान्झर्व्हेटिव्ह पक्ष अधिकारारूढा झाला व तो १८९६ पर्यंत होता.  दहा वर्षांत कॅनेडीयन पॅसिफिक रेल्वे तयार करण्यासंबंधी एका कंपनीला मक्ता दिला.  व तिला अडीच कोट डालर व अडीच कोट एकर जमीन देण्याचें ठरलें.  १८८१ मध्यें पार्लमेंटनें याला आपली अनुमति दिली.  या कंपनीनें पांच वर्षांतच पुष्कळ काम करून दाखविलें.
    
रायलचेंबंड : - सास्काचेवान येथील व तेथें देशांतर करून आलेल्या मिश्र अवलादीच्या लोकांनां वाटलें की येथें होत असलेल्या सुधारणेमुळें आपला बराच तोटा होईल.  या शिवाय त्यांच्या दुसर्‍या खर्‍या व काल्पनिक तक्रारी होत्या. त्यांनी युनायटेड -स्टेटसमध्यें पळून गेलेल्या रायलला बोलावलें व या लोकांचें धुरिणत्व त्याला मिळालें.  ओटावा येथील अधिकार्‍यानां प्रथम या बंडाचें महत्व वाटलें नाही, परंतु बंडवाल्या लोकांच्या ताब्यांत असलेली टेंकडी घेण्याकरितां पाठविलेले पोलीस मारले गेले तेव्हां लष्कराची योजना करण्यांत आली. बंडवाल्यांचा पराभव होऊन रायल याला कैद केलें.  १८८५ मध्यें याच्या वधाच्या प्रश्नानें राजकीय वातावरणांत बरीच खळबळ उडाली.  शेवटीं तो व त्याबरोबर कांही इंडियन सरदार फांशी दिले गेले.
    
इ.स. १८९६ पर्यंत कान्झरव्हेटिव्ह पक्ष अधिकारूढ होता व त्यानंतर उदारमतवादी पक्ष अधिकारूढ झाला.
    
विसाव्या शतकाच्या आरंभी कानडाची बरीच भरभराट झाली.  यूरोप व युनायटेड स्टेटस मधून बरेच लोक येथें येत व ते पश्चिमेकडील मुलुखांत रहात.  त्यामुळें या भागाची इतकी वाढ झाली कीं १९०५ मध्यें दोन नवीन प्रांत करावे लागले व ते आलबर्टा व सास्काचेवान होत.  कनेडियन पॅसिफिक रेल्वे वाढविण्यांत आली.  तिचा १२००० मैल रस्ता आहे.
    
युनायटेड स्टेटसशी असलेलें नातें :- ज्या अर्थी कानडा व युनायटेड स्टेटस यांमध्यें एका मोठ्या खंडाच्या व त्याच्या आसपासच्या समुद्राच्या अधिकाराची वाटणी झालेली आहे त्याअर्थी या दोन राष्ट्रांत वाद उत्पन्न व्हावा हें साहजिक आहे.  व तो मिटविण्याचे वेळोवळी प्रयत्‍न केले गेले.  मासे धरण्याच्या अधिकारासंबंधी तंटे होत.  १८८७ मध्यें या वादाचा निकाल लावण्याकरितां एक कमिशन बसलें.  परंतु त्या कमिशननें शिफारस केलेल्या ठरावास सेनेट सभेंत अनुमति मिळाली नाही.  १८८६ मध्यें पॅसिफिक महासागरावरील मासे धरण्याच्या अधिकारासंबंधी तंटा होऊन ब्रिटनला मध्यस्थी करावी लागली.  १८९७ मध्यें या वादाचा निकाल करण्याकरितां एक ''हाय कमिशन'' नेमण्याचें ग्रेटबिटनच्या व युनायटेड स्टेटसच्या सरकारांनी ठरविलें.  या कमिशनमध्यें कानडाच्या प्रधानमंडळांतील ३ सभासद व न्यूफाऊंडलंडचा प्रतिनिधी हे होते.  व या कमिशनची बैठक क्विबेक येथे झाली (१८९८) नंतर वाशिंवटन येथें दुसरी बैठक झाली.  अलास्काची चतुःसीमा.  अटलांटिक महासागरावरील व आंतील खाड्यांत मासे धरण्याचे अधिकार, परकीय मजुरांचा कायदा, बेहरिंग समुद्रांग समुद्रांत सील मासे धरण्याचा हक्क व कांही उत्पन्नांच्या बाबतींत मोबदल्याची व्यापार पद्धति या गोष्टी कमिशन पुढें विचाराकरितां होत्या.  अलास्काच्या चतुःसीमेच्या लढ्यावरून कमिशन बंद झालें.  इ.स. १९०३ मध्यें हा वादाचा प्रश्न सहा निःपक्षपाती न्यायाधीशांकडे द्यावा असें ठरलें.  त्यांपकी ३ ब्रिटिश व ३ अमेरिकन होते.  त्यांची बैठक लंउन येथें झाली, व त्यांनी केलेल्या रिपोर्टावरून पोर्टलंड चानल पर्यंत दक्षिणेस महासागराच्या आंत आलेल्या भागावरील मासे धरण्याचा कॅनडियन लोकांचा हक्क काढिला.
    
अर्वाचीन इतिहास - १९१० ते १९१३ पर्यंतच्या अवधींत अमेरिकेशीं व्यापार करण्यासंबंधीच्या व आरमारी धोरण ठरविण्याच्या प्रश्नांवर महत्वाची चर्चा चालूं होती.  १९११ मध्यें कानडाचा मुख्य प्रधान सर वुइलफ्रिड लारियर हा होता.  यानें अमेरिकेशीं व्यापारी तह कोणत्या अटींवर करावयाचा हें ठरविण्यासाठी मतदारांची मतें घेण्याचें ठरविलें पण याच सुमारास लोकांचें लक्ष्य कानडाचें आरमारी धोरण कसें ठेवलें पाहिजे या प्रश्नाकडे वेधल्यामुळें, लारियरचा पराभव होऊन त्याला प्रधानमंडळासकट राजिनामा देणें भाग पडलें.  त्यानंतर बोर्डन यानें १९११ च्या आक्टोंबरमध्ये आपलें नवीन मंत्रिमंडळ बनविलें.  नोव्हेंबर १५ ला कानडाचें पार्लमेंट उघडण्यांत आलें.  हा समारंभ कानडाचा गव्हर्नर जनरल डयूक ऑफ कॅनॉट याच्या हस्तें झाला.  १९१२ च्या नोव्हेंबरमधील पार्लमेंटच्या बैठकीमध्यें आरमारी धोरणासंबंधी प्रश्न उपस्थित होऊन, कानडाचें आरमारी धोरण ब्रिटिश साम्राज्याला मदत करण्याचें असावें तसें तात्पुरतें ठरविण्यांत आलें.
    
व्यापारी तहाचा प्रश्नः - या प्रश्नासंबंधी मूळ वाटाघाट १९१० साली होऊन अमेरिका व कानडा यांच्या दरम्यान व्यापारी तहासंबंधींच्या कांही अटी निश्चित झाल्या.  त्या अटी १९११ सालच्या पार्लमेंटांत कानडाचा फडणीस फील्डिंग यानें जाहीर केल्या.  या अटींमध्यें असें ठरलें होतें की, दोन्ही राष्ट्रांनी परस्परांच्या राष्ट्रांमध्यें येणार्‍या कांही वस्तूंवरील कर अजिबात नाहींसा करावा व कांही बाबतीत कमी करावा.  या अटी जाहीर करण्यांत आल्यावर त्यांच्या तर्फेनें भाषण करतांना अमेरिकेचा व कानडाचा पूर्वापार संबंध मैत्रीचा असून अमेरिकेशीं व्यापारी बाबतींत सख्य करणें अत्यंत जरूरीचें आहे असें प्रतिपादन करण्यांत आलें.  या तहानें ग्रेटब्रिटनच्या व्यापाराला धक्का पोहोंचण्याचा संभव आहे या आक्षेपालाहि समर्पक उत्तर देण्यांत आलें.  पण तेवढ्यानें या तहाच्या विरुद्ध असणार्‍या पक्षाचें समाधान झालें नाही.  प्रतिपक्षाचें म्हणणें असें होतें कीं, हा व्यापारी तह घडवून आणण्यांत अमेरिकेनें जो पुढाकार घेतला आहे त्यांत अमेरिकेचा कांही तरी डाव असावा.  कानडामधील कच्च्या मालावर अमेरिकेचा डोळा असून त्याचा पूर्ण फायदा घेऊन अमेरिका कानडाचा व्यापार बसवून टाकील असें या पक्षाचें म्हणणें होतें.  या प्रश्नावर बरेच दिवस कडाक्याचा वाद होदफ्न शेवटी दोन्ही पक्षांनीं तडजोडीचा ठराव मंजूर करून हें भांछण मिटविलें.  या तडजोडीच्या ठरावांतील अमेरिकेशी कानडाचा तह झाला तरी कानडाचें ग्रेटब्रिटनशीं हितसंबंध आहेत ते अगदीं कायम राखवयाचे, व कानडाचा आपल्या आर्थिक धोरणावर पूर्ण ताबा रहावयाचा, अशा अर्थाचीं दोन कलमें होती.
    
आरमारी धोरण :- व्यापारी तहासंबंधीच्या इतकाच महत्वाचा दुसरा प्रश्न कानडानें आपलें आरमारी धोरण कसें ठेवावें या प्रश्नांसंबंधी होता.  लॉरियरचें मत असें होतें कीं, कानडानें आपल्या स्वतःच्या खर्चानें आपले स्वतःचे आरमार तयार करावें, व त्याच्यावर आपली स्वतःची देखरेख ठेवावी.  पण बोर्डनचें म्हणणे याच्या उलट होतें.  अशा रीतीनें कानडानें स्वतःचें आरमार ठेवण्याचा निश्चय केल्यास कानडाला आरमारासाठी भयंकर खर्च सोसावा लागेल, व साम्राज्यांतील आरमाराशीं या आरमाराचा फारसा संबंध येणार नाही, असें त्याचे मत होतें.  याहि प्रश्नावर खडाजंगी वादविवाद झाला.  या प्रसंगी बोर्डननें भाषण केलें तें फारच महत्वाचें होतें.  या भाषणांत बोर्डननें असें प्रतिपादन केलें की साम्राजाच्या आरमारखात्याच्या देखरेखीखाली कानडानें आपल्या उपयोगासाठी तीन जहाजें बांधून घ्यावी व ती वाटेल त्यावेळी कानडाला साम्राज्यातील आरमारखात्यानें द्यावीत अशी व्यवस्था करण्यांत यावी, व साम्राज्याच्या आरमारखात्यामध्यें कानडातर्फे एक आरमारी अधिकारी असावा.  असा अधिकारी नेमण्याची साम्राज्य सरकारनें परवानगी दिली आहे असेंहि बोर्डननें सांगितले.  या भाषणावर लॉरियरनें बरीच टीका केली.  पण या प्रश्नाचा निर्णय लागण्याच्या पूर्वीच महायुद्धाला सुरूवात झाल्यामुळें या प्रश्नाला निराळेंच स्वरूप प्राप्‍त झालें.
    
महायुद्ध : - महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी कानडाजवळ सैन्य असें फारसें नव्हते.  फक्त ३००० च कायमचें सैन्य होतें, व तें देखील कानडामधील किल्ल्यांचें संरक्षण करण्याच्या निमित्तानें ठेवण्यांत आलें होतें.  महायुद्धाला सुरूवात होतांच कानडानें आपलें सैन्य उभारण्यास जारीनें सुरूवात केली.  १९१४ मध्यें कानडानें आपली ३३००० ची पहिली पलटण उभारून ती फ्रान्समध्यें लढाईसाठी धाडून दिली.  १९१५ च्या सप्टेंबरमध्यें दुसरी पलटण उभारली गेली.  आणखी दोन पलटणी पुढील वर्षांत उभारण्यांत आल्या.  कनेडेयिन घोडेस्वारांची पलटण तयार होऊन १९१५ त फ्रान्सच्या रणांगणावर चमकली.  १९१७  १८ मध्यें सक्तीच्या सैन्यभरतीचा कायदा मंजूर करण्यांत आला, व ८३३५५ रिक्रूट जमविण्यांत आले.  अशा रीतीनें महायुद्धासाठी कानडानें आपले ५९५४४१ सैन्य उभारले.  त्यांपैकी २१००९६ इतके लोक महायुद्धांत मारले गेले.  महायुद्धामध्यें कॅनेडियन सैन्यानें निरनिराळ्या लढायांमध्यें मर्दुमकी गाजविली.  कानडानें आपल्या सैन्यांतील जखमी लोकांच्या शुश्रूषेसाठी व मृतांच्या व्यवस्थेसाठी फ्रान्स, इंग्लंड इत्यादि राष्ट्रांमध्यें पुष्कळ धर्मार्थ दवाखाने काढले.
    
महायुद्धाच्या सुरूवातीस कानडाजवळ मोठीं लढाऊ जहाजें अशीं दोनच होती.  पण युद्धानंतर आणखी कांही छोटीं मोठी जहाजें बांधण्यांत आली.  पाणबुड्याहि बांधण्यांत आल्या.  महायुद्ध संपण्याच्या वेळी कानडाजवळ चांगली पांच जहाजें होतीं व आरमारी सैन्य अधिकारी वगैरे धरून ५००० होते.  १९१८ मध्यें कानडानें आपल्या बंदरांचें संरक्षण करण्याकरतां वैमानिक दळहि उभारलें.  विद्युत्तारायंत्राचीं स्टेशनें उघडली.
    
कानडाची महायुद्धांत दोस्तांनां अतिशय मदत झाली. या युद्धांत कानडांतील बायकांनीहि प्रामुख्यानें भाग घेतला होता.  इंग्लंड, फ्रान्स, इजिप्‍त, बेल्जम इत्यादि ठिकाणी सैनिकांनां मदत करण्यासाठी एकंदर २४०० कॅनेडियन बायका कानडामधून गेल्या.  त्यांपैकी ५५ ते ६० मरण पावल्या.  रोग्यांच्या व जखमी लोकांच्या शुश्रूषेंत देखील या बायकांची अतोनात मदत झाली.
    
महायुद्धांत दोस्त राष्ट्रांनां कानडाचें अतिशय सहाय्य झाल्यामुळें महायुद्धानंतर कानडाला उच्च प्रकारचा दर्जा प्राप्‍त झाला.  साम्राज्याच्या युद्धमंडळांत बोर्डनला जागा मिळाली होती.  त्याशिवाय शांततापरिषदेला हजर रहाण्याचा व तहावर सही करण्याचा मानहि कानडास मिळाला.  कानडातर्फें स्वतत्रं असा प्रतिनिधी अमेरिकेंत ठेवण्याचा व त्याचे अधिकार पूर्णपणें स्वतंत्र असण्याचा अधिकार कानडाला मिळाला.
    
महायुद्ध संपल्यानंतर जी कानडामध्यें निवडणूक झाली तींत कानडामधील लिबरल पक्षाचें प्राबल्य झालें.  तत्पूर्वी सुद्धां लिबरल पक्षानें आपलें अस्तित्व गाजविण्यास सुरूवात केलीच होती.  पण १९२१ च्या निवडणुकींत मात्र या पक्षाचे १२१ लोक निवडून आले व कॉन्झरव्हेटिव्ह पक्षाचे अवघे ५१ लोक निवडून आले.  अर्थातच लिबरल पक्षाचें मताधिक्य असल्यामुळें अमेरिकेशीं व्यापारी तह कायम करण्याचें काम अगदी सुलभ झालें.
    
महायुद्धासमाप्‍तीनंतर कानडानें आपलें आरमारी धोरण कसें ठेवावें यासंबंधीचा सल्ला देण्याकरतां लार्ड जेलीका यानें कानडाला भेट दिली व आरमारी खात्याची तपासणी करून आपला रिपोर्ट १९२१ साली सादर केला.  पण याहीपेक्षां अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स यानें १९१९ सालीं कानडाला भेट दिली ही होय.  त्याचें कानडातील लोकांनी अत्यंत उत्साहानें स्वागत केलें.  ओटावा येथील पॉर्लमेंटच्या नवीन इमारतीची कोनशिला त्याच्या हस्तें बसविण्यांत आली.
    
मद्यपानाचीबंदी - महायुद्ध सुरू होतांच कानडांतील निरनिराळ्या प्रांतांनी मद्यपानाच्या बंदीचा कायदा पास करून मद्यपानाला आळा घालण्याचा जारीनें प्रयत्‍न केला.  क्विबेकमध्यें १९१८ सालीं मद्यपानबंदीचें बिल पार्लमेंटपुढें येऊन तें मंजूर झालें.  पण इ.स. १९१९ मध्यें कांही हलक्या जातीची दारू वगैरे सोडून बाकीच्यावर निर्बंध घालण्याचें ठरलें.  कांही प्रांतांनी मद्यपानबंदी करण्याऐवजी मद्यपानावर सरकारी नियंत्रण असावें असें ठरविलें.  १९१९ च्या पार्लमेंटच्या बैठकींत कानडांतील कोणत्याहि प्रांताला जरूर वाटल्यास त्या प्रांतानें सर्व मतदारांचें मत घेऊन मद्याची आयात बंद करावी असें ठरलें.  त्याप्रमाणें मतें घेतां खालीलप्रमाणें निरनिराळ्या प्रांतांच्या बाबतींत निकाल लागला.

 प्रदेशाचें नाव   मद्यविक्रीला बंदी करा म्हणणारे  मद्यविक्रीला अनुसरणारे
 नोव्हास्कॉशिया  २३८७४  ८३४२२
 मॅनीटोबा  ५५०५६   ६८८३१
 आलबर्टा   ४४३२१  ६३०१२
 सस्काचेवान  ५५२५९  ८६९४९
 ओंटारियो   ३७३९३८  ५४०७३

कानडामध्यें दारूबंदीचे जे कायदे आहेत ते गरीबांनां अधिक जाचक होतात असें दिसून आलें आहे डॉक्टरांनी पैसे घेऊन श्रीमंतांनां दारु पिण्यासंबंधीचा दाखला देण्याचा सपाटा सुरू ठेवला होता व त्यामुळे श्रीमंतांनां दारू पिण्यास मिळत असे.  १९२० सालच्या दारुबंदीसंबंधीच्या आकड्याकडे लक्ष दिलें असतां डॉक्टरांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा दुरूपयोग केल्याचें दिसून येतें.  १९२३ च्या आकड्यावरून कानडामध्यें ९५०० लोक व्यसनी होते असें आढळून आलें आहे. त्यापैकी क्विबेक व कोलंबिया यामध्येंच ७३०० लोक होते.  १९२३ मध्यें अमेरिका व कानडा यांच्यामध्यें सरहद्दीवरील मुलुखांत दारूबंदीसंबंधानें कोणते उपाय योजण्यांत यावेत यासंबंधी विचार करण्याकरतां एक बैठक भरली.

    
इ.स. १९११ पासून १९२१ च्या दरम्यान कानडाचे दोन व्हॉईसरॉय झाले.  ते अनुक्रमें डयूक ऑफ कॅनॉट व डयूक ऑफ डेव्हनशायर होत. त्यानंतर लॉर्ड बिंग हे १९२१ पासून कानडाचे व्हॉईसरॉय झाले.
    
१९२२ च्या निवडणुकींत उदारमतवादी पक्षाची सरशी झाली.  हुजूरपक्षाचे हितसंबंध, कॅनेडियन-पॅसिफिक रेल्वेच्या योजनेंत निगडित झाले असल्यानें त्यांनां संरक्षक व्यापाराचें तत्व मान्य होतें.  पण उदारमतवादीपक्ष हा खुल्या व्यापाराला अनुकूल होता.  कानडामध्यें स्वतंत्र असा मजूर पक्षच अस्तित्वांत नाहीं.  १९२२ पूर्वी पूर्वकानडांतील व्यापारी वर्गाच्या ताब्यांतच राजकीय सत्ता केंद्रीभूत झाली होती. पण हल्ली पश्चिम कानडांतील व्यापारी वर्गाकडे ती सत्ता झुकूं लागली आहे असें दिसतें.  १९२२ च्या एप्रिल महिन्यांत नवीन संरक्षणखातें निर्माण करून त्याच्या देखरेखीखाली कानडामधील लष्करी, आरमारी, वैमानिक व इतर प्रकारचेंहि दळ ठेवण्यांत यावें अशा अर्थाचें एक बिल कानडाच्या पार्लमेंटमध्यें चर्चेकरतां आलें.
    
इ.स. १९२३ सालीं ब्रिटिश साम्राज्यांत कानडाला कोणतें स्थान आहे यासंबंधींची कानडाच्या पार्लमेंटमध्यें बरीच वाटाघाट झाली.  १९२२ च्या सप्टेंबरमध्यें ज्यावेळी आशियामायनरमध्यें लढाई होणार असा रंग दिसूं लागला होता त्यावेळी ब्रिटिश पार्लमेंटनें कानडाला या भावी युद्धांत मदत करण्याबद्दल विनंति केली होती.  त्यावेळी १९२३ च्या फेब्रुवारींत कॅनेडियन प्रधानानें ब्रिटिश पार्लमेंटला असें कळविलें होतें की, साम्राज्यविषयक हितसंबंध कायम ठेवणें जरूर असेल तर साम्राज्यांतील सर्व राष्ट्रांनां निरनिराळ्या साम्राज्यविषयक प्रश्नांत भाग घेण्याला पूर्ण मोकळीक असली पाहिजे.  १९२३ च्या एप्रिल महिन्यांत पॅसिफिक किनार्‍यावरील मासे धरण्याच्या धंद्याच्या संरक्षणासंबंधी कानडा व अमेरिका यामध्यें एक तह झाला.  हा तह फक्त कानडालाच लागू आहे की सर्व ब्रिटिश साम्राज्याला लागू आहे असा प्रश्न उपस्थित झाला.  अमेरिकेनें हा तह सर्व ब्रिटिशसाम्राज्याला बंधनकारक आहे असें सांगितलें.  अर्थातच कानडा व ब्रिटिशसाम्राज्य यांच्यामधील नातें कशा प्रकारचें आहे याबद्दल पुन्हां एकदां चर्चा सुरू झाली.  लासेन येथें जो यूरोपांतील सर्व राष्ट्रांचा तह झाला त्यांत ब्रिटिश साम्राज्यांतील प्रतिनिधीमध्यें कानडातर्फे कोणीहि प्रतिनिधी नव्हता.  पण तह झाल्यानंतर वसाहतमंत्र्यानें कानडाच्या प्रधानाला या तहाला संमति कळविण्याविषयी सांगितलें.  तेव्हा अशा तर्‍हेनें कानडाची संमति मिळविणें बरोबर आहे काय असा रोखठोक जबाब कानडाच्या प्रधानानें विचारला.  पण याला ब्रिटिश वसाहतमंत्र्याकडून समाधानकारक उत्तर मिळालें नाही. अद्यापिहि ब्रिटिश साम्राज्याचा व कानडाचा कशा प्रकारें संबंध असावा हें निश्चित झालेलें नाहीं.
    
कानडांतील बरेचसे रहिवासी अमेरिकेंत रहावयास जात असल्यामुळें कानडांतील लोकवस्तीचें मान कमी होत चालल्याचें दिसून आलें आहे व याला आळा घालण्याकरितां उपाय योजण्याचे कानडा सरकारनें बेत चालविले आहेत.  ओंटारियोमध्यें फ्रेंच व कॅथॉलिक लोक यांच्या विरूद्ध तेथील लोकमत असल्यानें हे लोक अमेरिकेंत रहाण्यास जाऊं लागले आहेत.  क्विबेकमध्येंहि हीच स्थिति आहे.  शिवाय अमेरिकन मतप्रसारकांनी अमेरिकेंत पोटखर्च फार थोडा येतो व मजुरी पुष्कळ मिळते अशा प्रकारच्या कंड्या पिकविण्यास सुरूवात केल्यामुळेंहि कानडांतून बरेचसे लोक अमेरिकेंत जाऊं लागले आहेत.  माँट्रील व इतर प्रांतांतील कारागीर, गवंडी इत्यादि लोक अमेरिकेंत पुष्कळ मजुरी मिळेल या आशेनें तिकडे जात आहेत.  याशिवाय १९११ साली मिन्नोइट पंथाचे १५०००० लोक अमेरिकेंत रहावयास गेले असून त्यांनी १ लक्ष एकर जमीन अमेरिकेंत खरेदी केली आहे.  हे लोक परदेशी जाण्याचें कारण कानडांत मुलावर जी शिक्षकाची सक्ति केली जाते ती होय.
    
इंग्रजी वाङ्‌मय - हें वसाहतींतील जीवनक्रमाच्या गुणदोषांनीं विशिष्ट असें आहे.  जीवनार्थ कलहामुळें विद्या व उच्च संस्कृति या दोन गोष्टींनां वसाहतींत अल्पावकाश असतो.  कितीहि स्वतंत्रता असली तरी कानडा देश वसाहत आहे व हीच वस्तुस्थिति तेथील राष्ट्रीय वाङ्‌मयाच्या निर्मितीच्या आड येणारी आहे.  इंग्रजी वाङ्‌मयाचा एक नवांकुर म्हणून कानडाचें वाङ्‌मय मानलें जात असलें तरी विषय व रचना या दोन्ही दृष्टींनी त्यास परोपजीवि म्हणतां येणार नाही.  तारूण्यातील उत्साह व स्वातंत्र्याचें तेज हे कानडाचे विशिष्ट गुणहि त्याच्या वाङ्‌मयांत सांपडतात.
    
ब्रिटिश अमलापासून पहिल्या कांही वर्षांत इतिहासज्ञाला उपयोगी पडणार्‍या कांही राजकीय चोपड्यांशिवाय तेथें फारशी प्रगति झाली नाहीं.  सर अलेक्झॅंर मॅकेन्झी, डेव्हिड टॉमसन, अलेक्झांडर हेन्री, व डॅनियल वुइल्यम्स हारमन हे कर्तृत्ववान लोक होते.  त्यांना ग्रंथकार होण्याची हाव नव्हती तथापि त्यांच्या मनोरंजक लेखांचा तद्देशीय वाङ्‌मयांत प्रामुख्यानें अन्तर्भाव होतो.
    
कॅनेडियन इतिहासामध्यें मोठें ऐतिहासिक कार्य करण्याची बुद्धिमत्ता नाही व ऐतिहासिक दृष्टीहि नाही.  अतिपरिचयामुळें त्यांनां वस्तूंचे खरें यथादर्शन होत नाही.  भावी इतिहासज्ञाकरितां त्यांच्या जवळ साहित्य मात्र विपुल आहे.  रॉबर्टख्राइस्टच्या 'हिस्टरी ऑफ लोअर कॅनडा १८४८-१८५४' या पुस्तकांत ब्रिटिश अंमलाचें वर्णन आहे.  वुइल्यम किंग्जफोर्ड यानें दहा विभागांत कॅनडाचा मूळापासून वृत्तांत देऊन १८४१ च्या यूनिअनची हकीकत दिली आहे.  'लास्ट फॉर्टी इयर्स' या पुस्तकांत जे.सी.डेंटनें किंग्जफोर्डचें कामच पुढें चालू केलें आहे.  टॉमस चँडलर, हॅलिबर्टन बाएमिश मुरडॉक व जेम्स हॅने यांनी समुद्राजवळच्या प्रांतांचा इतिहास लिहिला आहे.  अलेक्झॅंडर बेगनें पश्चिम कानडाचा वृत्तांत लिहिला आहे.  पार्लमेंटरी राज्यकारभारासंबंधी आलफीयस टॉडचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
    
चरित्रासंबंधी पाहिलें तर ती मुख्यतः राजकीय विषयालाच वाहिलेली दिसतात.  जोसेफ पोपकृत 'मेमॉयर्स ऑफ सरजान मॅकडोनाल्ड', सुऊरकृत 'फ्रॉन्टेनॅक', सरजॉन बोरिनॉटकृत 'लॉर्ड एल्जिन', डी.सी.स्कॉटकृत 'जॉन ग्रेव्हज सिमको', जे. डब्ल्य. लाँगलेकृत 'जोसेफ हौ' इत्यादि अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
    
कानडामध्यें श्रेष्ठ दर्जाचे कवी झाले नाहीत. तथापि लँपमन, कॅम्बेल, रॉबर्टस व कारमन यांची कविता चांगली आहे.  लँपमनच्या कृतीत महाकाव्याच्या गुणांपेक्षां कळकळ, पावित्र्य व उत्कटता इत्यादि व्यक्तिविषयक गुणच जास्त दिसून येतात.  कॅम्बेलमध्यें नाट्याबद्दल उत्साह दिसून येतो.  चतुर्दशपदी रचणें व भावनोद्दीपक स्फुट काव्य करणें हा रॉबर्टसचा विशेष होय.  कारमन हा पोवाडे रचीत असे; व त्याचा साधेपणा व भाषाशैली पाहून मॅथ्यू अरनोल्डसारखा टीकाकारहि खुष झाला होता.  चार्लस हेव्हीसेजचें एक नाटकहि तारीफ करण्यासारखें आहे.  ड्रमंडच्या साध्या व विनोदोत्पादक कृतीस चित्रकाव्य असे सार्थ नांव देतां येईल.
    
१८१२ च्या लढाईविषयीं लिहिलेली 'वाकोउस्टा' नांवाची जॉन रिचर्डसनची कादंबरी हीच पहिली व अस्सल कॅनेडियन नवलकथा होय.  कानडाच्या ऐतिहासिक प्रसंगावर त्यानें सुमारें सहा कादंबर्‍या लिहिल्या आहेत.  सुसान्ना मूडी व कॅथेराइन पारट्रेल यांनी नियतकालिकांमधून आपल्या नवलकथा प्रसिद्ध केल्या.  जेम्स डी मिल्ले यानें तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत.  त्यांपैकी 'हेलेनाज हाउस होल्ड' ही उत्तम आहे.  डी मिल्ले कृत 'ए स्ट्रेज मॅनस्क्रिप्ट फाउंड इन ए कॉपर सिलिंडर' यांत संपत्तीपेक्षां दारिद्र श्रेष्ठ दर्जाचे ठरविले आहे.  सर गिल्बर्ट पार्कर हा समकालीन कादंबरीकारांत पहिला मानला लात असे.  साराजिअॅनेट डंकन राल्फ कॉनॉर, अॅग्निस सीलॉट, फ्रेझर व सिटान वगैरे नवलकथाकार प्रसिद्ध आहेत.  'क्लॉकमेकर' 'दि ओल्ड जज्ज', ' दि अटॅची', 'नेचर अॅड ह्यूमननेचर', इत्यादी नवलकथा, टॉमस चँडलर हॅलिबर्टन यानें लिहिल्या असून 'माय अंकल टोबी' व 'पिकविक' ही पुस्तकें लिहिणार्‍याच्या बरोबरीचा विनोदी लेखक म्हणून तो प्रसिद्ध आहे.  त्याच्या ग्रंथांत वसाहतीतील जीवितक्रमाचें प्रतिबिंब पहावयास सापडते.  त्याला मनुष्यस्वभावाचें पूर्ण ज्ञान असून त्याची पात्रें सजीव भासतात.
    
फ्रेंच वाङ्‌मय - याचें विसाव्या शतकाच्या आरंभी वर्णन द्यावयाचें म्हणजे असें म्हणतां येईल की, तें मागील दोन पिढ्यांचें संपूर्ण कार्य आहे.  कॅनेडियन जीवितक्रमांतील कल्पनासृष्टीचें सर्व सामर्थ्य लौकिक कथेंत आहे व ती तर मूळ फ्रेंचांकडूनच त्यांना मिळाली त्या कथेचे सारसर्वस्व म्हणजे गाणी हींच होत.  जात्यभिमान हा फ्रेंच कॅनेडियन वाङ्‌मयाचा विशेष होय.  व तो त्यांच्या राजकारणांत अगदी बद्धमूल होऊन बसला आहे.  १८४५ त फ्रॅकोइग झेगिअर गारनेऊ कृत ' कानडाचा इतिहास' हें पुस्तक प्रसिद्ध झालें.  या पुस्तकांतील फाजील जात्याभिमानामुळें विश्वसनीय इतिहास म्हणून त्यास किंमत देतां येणार नाही.  ए.जेरिन लाजोइ या ग्रंथकाराचें 'जी अन रिव्हार्ड' हें पुस्तक एक गद्य लावणी म्हणून प्रसिद्ध आहे.  'लेस अॅनासएन्स कॅनेडिअन्स'  नांवाची ऐतिहासिक नवलकथा फिलिप डी गॅसपे यानें लिहिली आहे.  या कथेंत विषयांतर बरेंच असलें तरी सर्व कॅनेडियन जीवितक्रम त्यांत प्रतिबिंबित झाला आहे.  ऑक्टेव्ह फ्रेमॅझी हा एक राष्ट्रीय कवी असून त्याच्या काव्यांत उत्कट देशप्रीति दिसून येते.  अॅबे फरलंड हा एक उत्साही संपादक व इतिहासज्ञ होऊन गेला.  पहिला कॅनेडियन तत्वज्ञ म्हणजे इटायने पॅरेंट हा होय.  इबे कासग्रेन यानें 'पेलेरिनेज यूपेजं डी अॅव्हॅजेलाइन' 'माँटकाम एट लेव्हिस' वगैरे ग्रंथ लिहिले आहेत.  'हिस्टरी डेस कॅनेडियन्स लेव्हिस' हा विस्तृत ग्रंथ बेजामिन सूल्ट यानें लिहिला.  फ्रेंच कॅनेडियन लोकांनां वक्तृत्वाची फार आवड असून सर वुइलफ्रिड लाउरिअर याचें नांव या विषयासंबंधी प्रसिद्ध आहे.
    
चाउव्हेऊ, लुईफिसेट, अडॉल्फ, पायसन हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत.  परंतु कानडाबाहेर नांव मिळविलेला कवि म्हणजे लुइ फ्रेचेट हाच होय.  त्याच्या कृतींत उत्कट देशाभिमान व काव्यदृष्ट्या रसभंग करणारें वक्तृत्वाची असे गुणदोष आढळतात.  शब्दसंपत्ति, यमकनैपुण्य, कल्पनास्वातंत्र्य स्वभावगत भाषाशैली, स्वजनासंबंधी सूक्ष्मदृष्टि व तारूण्याची तेजस्विता इत्यादि गुण त्याच्या काव्यांत स्फुरित झाल्यामुळें त्याची जगांत महाकवि म्हणून कीर्ति झाली आहे.  कॅनेडियन नाटकें फारशी उपलब्ध नाहीत.  एफ.सी. मरचँडनें कांही चांगली नाटकें रचली आहेत.  त्यांच्या वाङ्‌मयांत कादंबर्‍याहि फारशा झालेल्या नाहींत.  'एल ओयूब्ली' नांवाची एक कादंबरी मॅडेनी कोनन हिनें लिहिली आहे.  डॉ. चोकेटचा 'लेसरिबॉर्ड' हा ग्रंथ एक नाटकी कथा म्हणून प्रसिद्ध असून त्यांत लेखकाची कलात्मक मुग्धता दिसून येते.
    
युद्धोत्तर वाङ्‌मय - इ.स.१९१० ते १९२१ च्या दरम्यानच्या कॅनेडियन वाङ्‌मयाचे स्थूलमानानें तीन भाग पडतात (१) युद्धपूर्व वाङ्‌मय (२) युद्धकालीन वाङ्‌मय, (३) व युद्धोत्तर वाङ्‌मय.  १९१०-१४ या कालांतील वाङ्‌मयांत मुख्यत्वेंकरून कानडाच्या त्यावेळच्या परिस्थितीचें प्रतिबिंब दृष्टीस पडतें.  या अवधींत कानडामध्यें पूर्णपणें राष्ट्रीय जागृति उत्पन्न झाली होती.  ज्ञानाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत कानडानें भाग घेण्यास सुरूवात केली होती.  राष्ट्र आशावादी बनत चाललें होतें.  अशा स्थितींत जे वाङ्‌मय उत्पन्न होणार तें या सर्व गुणांचें दर्शकच होणार यांत नवल नाही.  हीच स्थिति युद्धकालीन वाङ्‌मयाची व युद्धोत्तर वाङ्‌मयाची व्हावी हेंहि साहजिकच होय.  युद्धाकालीन प्रत्येक ग्रंथांत युद्धासंबंधीच्या परिस्थितीचें प्रतिबिंब दृष्टिगोचर होत होतें.  व युद्धोत्तर वाङ्‌मयांत, राष्ट्रीय पुनर्घटनेचें व नवीन नवीन विचारांचें प्रतिबिंब दिसून येत आहे.  
    
युद्धपूर्व वाङ्‌मयांत १९१०-१४ च्या अवधींत, डॉ. डॉटी व डॉ. शार्ट्ट यांनी संपादित केलेल्या कानडाच्या इतिहासग्रंथांची अमूल्य भर पडली.  या इतिहासग्रंथाचे २३ भाग असून त्यांमध्ये कानडाच्या इतिहासाची व आर्थिक प्रश्नांची पूर्ण चर्चा आढळून येते.  त्याच्या खालोखाल महत्वाचा ग्रंथ म्हणजे जॉर्ज राँग, व लँग्टन यांच्या देखरेखीखाली ३२ भागांत प्रकाशित झालेला ''क्रॉनिकल्स ऑफ कानडा'' हा ग्रंथ होय.  या ग्रंथाचा प्रत्येक भाग त्यावेळच्या नामांकित झालेल्या विद्वानांनी लिहिला आहे.  १९११ मध्यें ''मेकर्स ऑफ कॅनडा'' या मालेचा शेवटचा भाग 'इंडेक्स अॅड डिक्शनरी ऑफ कॅनेडियन हिस्टरी' हा बाहेर पडला.  
    
याशिवाय किरकोळ वाङ्‌मय पुष्कळच बाहेर पडलें.  प्रसिद्ध कॅनेडियन व्यक्तीची चरित्रें व आत्मवृत्ते बाहेर पडलीं.  ह्याशिवाय महत्वाची पुस्तकें म्हटली म्हणजे अॅथर्टनचें मॉट्रील (१५३५-१९१४), जॉन रॉस रॉबर्टसन - लँडमार्कस ऑफ टोरोंटो (१९१४), आलिव्हर - दि कॅनेडियन नॉर्थवेस्ट (१९१४), व अॅटी अॅंड ऑर्थर - डॉक्युमेंटस रिलेटिंग टु दि कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ कॅनडा हे होत.  प्रवासात्मक व वर्णनात्मक ग्रंथ म्हणजे कोल्मन दि कॅनेडियन रॉकीज (१९११), सेटन-आर्टिक प्रेअरीज (१९११), डी कँपबेल-कॅनेडियन लेकरीजन (१९१०), शेल्डन - विल्डरनेस ऑफ दि अपर युकॉन (१९११) हे होते.  राजकीय व अर्थशास्त्रविषयक महत्वाचे ग्रंथ म्हटले म्हणजे डॉवर्ट - दि किंगडम पेपर्स (१९१४), पीटर्सन-कॅनडियन एसेज अॅड अॅड्रेसेस (१९१५), फॉस्टर्स-कॅनेडियन अॅड्रेसेस, रॉबिन्सन कॅनडा अॅड कॅनेडियन डिफेन्स, इत्यादि होत.  काल्पनिक पद्यवाङ्‌मयांत नांव घेण्यासारखे ग्रंथ म्हणजे - वुइल्यम कँपबेल - साँग्ज ऑफ व्हास्टर, ब्रिटन मार्जोरी पिक्थाल- ड्रिफ्ट ऑफ फिनियन्स (१९१३), ड्रमंड - पोएटिकल वर्क्स.  स्ट्रिंजर - ओपन वॉटर (१९१४), काल्पनिक गद्य वाङ्‌मयांत महत्वाचे ग्रंथ म्हणजे - माँटगोमरी रॉबर्टस, डंकन, गॉर्डन इत्यादि विद्वान लेखकांचे ग्रंथ होत.  
    
युद्धकालीन वाङ्‌मयांत पुष्कळ ग्रंथ नांव घेण्यासारखे निर्माण झाले.  त्यांपैकी अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे, कर्नल वुइल्यम ए बिशपकृत '' वुइंगेड वॉरफेअर'' हा होय. याशिवाय जॉर्ज नॅस्मिथ - ऑन दि फ्रिज ऑफ दि ग्रेट फाइट (१९१७), करी - फ्रॉम दि सेंट लॉरेन्स टू दि इसेर (१९१७), बेल्स - फर्स्ट कॅनेडियन्स इन फ्रान्स हेहि महत्वाचे ग्रंथ आहेत.  युद्धसंबंधीची कानडाची काय कामगिरी आहे त्यासंबंधी विश्वसनीय बातमी देण्याची कामगिरी 'कॅनडा इन दि वर्ल्ड वॉर', या ६ भागी ग्रंथानें केली.  या शिवाय 'कॅनडा इन फ्लँडर्स, या पुस्तकमालेनेंहि चांगली कामगिरी बजावली.  याशिवाय युद्धाची माहिती असणारे पुष्कळ ग्रंथ निर्माण झाले.  
    
युद्धोत्तर वाङ्‌मयांत विशेष नांव घेण्याजोगे ग्रंथ म्हणजे रॉबर्ट फाल्कनेर - आयडियालिझम इन दि नॅशनल कॅरेक्टर (१९२०), जे एल मॉरीसन - ब्रिटिश सुप्रीमसी अॅड कॅनेडियन सेल्फगव्हर्नमेंट; मकेन्झी किंग - इंडस्ट्री ऍंड ह्यूमॅनिटी मॅकइव्हर - लेबर्स इन दि चेंजिग वर्ल्ड, गुडस -प्रॉडक्शन अॅड टँक्सेशन इन कानडा इत्यादि होत.  इतिहास व चरित्रग्रंथ यांतील प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे - मॅकलेनन - सल्कर्क्स वर्क इन कानडा (१९१६), रिस्ले - ओल्ड प्रॉव्हिन्स टेल्स (१९२०), प्रो. स्केल्टन - दि कॅनेडियन डोमिनियन (१९१९).  
    
हा वाङ्‌मयाचा प्रसार करण्यासाठी पुष्कळ संस्था कनडामध्यें प्रयत्‍न करीत होत्या.  त्यांत अत्यंत महत्वाच्या म्हटल्या म्हणजे डोमिनियन अर्चाइव्हज, दि रॉयल सोसायटी ऑफ कॅनडा, दि चँप्लेन सोसायटी इत्यादि संस्था होत.  याशिवाय युनिव्हर्सिटी मॅगेझाईन व कॅनेडियन हिस्टॉरिकल रिव्ह्यू या मासिकांनीहि बहुमोल मदत केली.  याशिवाय युद्धोत्तर वाङ्‌मयांत, वूले साँग्ज फ्रॉम यंग मॅन्स लँड(१९१७), जॉन मॅक्रे-इन फ्लँडर्स फील्डस, लाईड राबर्टस पोएम्स (१९१९), उंकनस्कॉटस - लँडी लेन अॅंड अदर पोएम्स, ट्राटर्स - कॅनेडियन ट्वायलाईट इत्यादि होत.  विनोदी लेखकांत स्टीफन्स लीकॉक याचें नांव सर्व युरोपांत प्रसिद्ध आहे.  
    
युद्धोत्तर फ्रेंच वाङ्‌मय - १९१०-१९२१ या सालांच्या अवधीत फ्रेंच कॅनेडियन ग्रंथकारांनीहि वाङ्‌मयांत पुष्कळच भर घातली.  या कामांत हेन्री बोरासा याच्या संपादकत्वाखाली चाललेल्या 'डेव्हायर' या मासिकानें बहुमोल कामगिरी केली.  याशिवाय लॉ रेव्हू मॉडर्ने लॉट्रिमेस्ट्रिले यांनी चांगली कामगिरी बजावली.  इस्टवार डू कॅनडा; कोर्स हिस्टोरे, व कोर्स हिस्टोयरे डु कॅनडा इत्यादि इतिहासावरील ग्रंथहि उत्कृष्ट निर्माण झाले.  'लौकिक कथा' संबंधीचेहि दोन तीन सुंदर असे ग्रंथ बाहेर पडले.  फ्रेंच कॅनेडियन नाटकें अद्यापि अव्वल दर्जाची बाहेर पडली नव्हती; पण कांही कांही नाटककारांच्या भाषेवरून नाट्यलेखनालाहि चांगलीच स्थिति येईल असें वाटण्याला जागा होती.
    
(संदर्भग्रंथ - स्टॅटिस्टिकल ईयरबुक ऑफ कॅनडा ऑफिशिअल हँडबुक ऑफ दि डोमिनियन ऑफ कॅनडा.  हॉप्किन्सकॅनडा (६ खंडांचा ज्ञानकोश) मॉर्गन-कॅनेडियन अॅन्युअल रजिस्टर रिव्ह्यु ऑफ हिस्टॉरिकल पब्लिकेशन्स रिलेटिंग टु कॅनडा (युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो).  अॅडाम्स - आउटलाइन हिस्टरी ऑफ कॅनेडियन लिटरेचर.  मॅकमुर्डी - हँडबुक ऑफ कॅनेडियन लिटरेचर.  'लिटरेचर ऑफ अमेरिकन हिस्टरी' या ग्रंथांत कानडाच्या इतिहासावरचे उत्तम संदर्भग्रंथ सापडतील.  स्टेटसमन्स ईयर बुकांत प्रादेशिक माहितीसंबंधी ग्रंथाची मोठी याद 'कॅनडा' या प्रकरणांत आहे तीहि उपयुक्त वाटेल.)
   

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .