प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
 
कातडीं - पूर्ण वाढ झालेल्या गाई, बैल, म्हशी, घोडे वगैरेंच्या कमावलेल्या कातड्यांनां बाजारांत पक्के चामडें असें म्हणतात.  वासरें, मेंढ्या, बकर्‍या, हरीण व दुसरी जंगली जनावरें यांच्या चामड्यांनां कोवळें चामडें म्हणतात.  व केंस असलेल्या शोभादायक चामड्यांना लोकरयुक्त कातडी म्हणतात.
    
लोकरयुक्त कातडी तसेच हरीण, काळवीट, बिब्यावाघ, वगैरे जनावरांची कातडी यांनां व्यापारी दृष्ट्या फार थोडें महत्व आहे.  कुत्रा, साप, पाल यांसारख्या लहान प्राण्यांच्या कातड्यांकडे तर हिंदुस्थानांतील लोकांचें पूर्ण दुर्लक्ष आहे.  कदाचित हवामान व खारवण्याची सदोष पद्धति ही अनास्थेची कारणें असावींत.

हिंदुस्थानांतील गुराढोरांची संख्या २२,००००००० पेक्षा कमी नसून दरवर्षी शेकडा ४० गुरें मरतात अथवा मारली जातांत.  १९०३-०४ साली संपणार्‍या वर्षांत सालीना सरासरी १२५ लक्ष कमावलेली कातडी व ३७० लक्ष बिनकमावलेली कातडी परदेशी गेली.  या आंकड्यांत हिंदुस्थानांत उपयोगांत आलेली कमावलेली कातडी व चामडी धरलेली नसून ज्यांची कातडी काढून घेतली जात नाहीत अशा मेलेल्या जनावरांचाहि वरील आंकड्यांत हिशोब नाही.

हिंदुस्थानांत तयार होणारा कातड्यांचा माल व त्याच वस्तूंचा परदेशी असलेला व्यापार हे सारख्याच महत्वाचे आहेत.  १९०६-०७ सालीं (पुनर्निर्गत माल वजा जातां) १५,९४,६६,३९२ रूपये किंमतीच्या मालाचा व्यापार झाला.

कमावलेली कातडी व चामडी यांचा व्यापार व कातड्यांचा माल तयार करण्याचा धंदा मुसुलमान अगर अंत्यज लोकांच्या हाती असून लोकसंख्येच्या मानानें हा समाज लहान आहे.  उत्तरहिंदुस्थानांत या समाजाला चर्मफराश म्हणतात.  कातड्यांचे हल्लाली व मुर्दाडी असे दोन प्रकार आहेत.  मारलेल्या जनावरांच्या कातड्यांनां हल्लाली व मेलेल्या जनावरांच्या कातड्यांनां मुर्दाडी असें म्हणतात.  चांभार लोक मेलेल्या जनावराची कातडी काढतात.  दुष्काळाच्या वेळी त्यांनां बराच फायदा होतो.  इतर वेळी पैशाच्या आशेनें हे लोक गुरांनां विष घालतात असेंहि म्हणतात.  परंतु निष्काळजीपणा, अवर्षण व गुरांचे रोग यांनी मरणार्‍या गुरांचें प्रमाण बरेंच मोठें आहे.  कातड्यांच्या व्यापारानें मरणार्‍या गुरांमुळें होणारी देशाची हानि मुळीच भरून निघत नाही.  उलट, जेव्हां जेव्हां कातड्यांचा माल परदेशी जास्त जास्त जातो, तेव्हा तेव्हां तें सार्वजनिक हानीचें व व्यापारी अवनतीचें चिन्ह आहे असें समजावें.  कातड्यांच्या व्यापारांत अवर्षण वगैरे कारणांनीं बराच फरक होत असतो.  औद्योगिक धाडसांत सर्वत्र दिसून येणारी भांडवल गोळा करण्याची अडचण या धंद्यांत तर दुप्पट भासते.  धार्मिक बंधनांनी या लोकांनां अगदी हलका दरजा आल्यामुळें हा धंदा करण्याची जबाबदारी एका लहान समाजावर पडते, या कारणामुळें या धंद्यांत चढाओढीचें तत्व लागू नसल्याकारणानेंहि या संबंधींच्या व्यापारांत बरेंच नुकसान होत आहे.

१९०६-०७ मध्यें हिंदुस्थानांतील रेलवेनें २५१७७८७ हंड्रे., कातडीं परदेशी गेली; त्यांपैकी बंगाल प्रांतांतून ३५७७९४ हं., संयुक्तप्रांतांतून ४६४३७६ हं., मद्रासप्रांतांतून ३६८१२७ हं., पंजाबप्रांतांतून २९६५७६ हं., मुंबईइलाख्यांतून १७१७४६ हं., म्हैसूरमधून ११७८६६ हं., राजपुताना व मध्यहिंदुस्थान ११८६१३ हं., मध्यप्रांत व वर्‍हाड १२२७७४ हं., निजामच्या राज्यांतून ८६१८३ हं., सिंधमधून ५४५५९ हं., व पूर्वबंगाल व असाममधून २३४८१० हं., कातडी परदेशी गेली.

हिंदुस्थानांत साधारणतः २५-३० हजार हं. (किं. १ ।। लक्ष) पेक्षां जास्त कच्ची जाड कातडी परदेशाहून येत नाहींत. (त्यांची १० ।। लाख रूपये किंमत असते.) १५ हजार हंड्रेडवेट वजनाचीं कच्ची कोंवळी कातडी व ६ ।। हजार हंड्रडवेट वजनाची कमावलेली जाड व कोंवळी कातडी असतात.

कच्चीं कातडी व चामडी यांची निर्गत :- १९०४-०५ साली कातड्यांची किंमत दर हंड्रेडवेटास ५५ रु. ७ आणे होती व चामड्यांची दर हंड्रेडवेटास ९० रु. ७ आणे १ पै. होती व १९०६-०७ साली ३९८०६२८१ कातडी व चामडी परदेशी गेलीं.  त्यांपैकी १२९१७२२७ कातडी व २६८८९०५४ चामडी होती.  

१९१९-२० साली ३६ कोट रुपयांची कातडी परदेशांत गेलीं.  त्याच्या मागील वर्षी १९ कोटींची गेली होती.  पण पुढील साली परदेशांतील बाजारमंदीमुळें निर्गत पुन्हां कमी झाली.  १९१९ च्या सप्टेंबरांत निर्गतकातड्यांतर १५ टक्के जकात बसविण्याचें बिल पुढें आलें;  पण ब्रिटिश साम्राज्यांत होणार्‍या निर्गतीवर मात्र १९ टक्केच जकात बसविली होती.

कमावलेली कातडी - समुद्रानें हिंदुस्थानांतून जाणार्‍या कमावलेल्या कातड्यांच्या अंतर्गत व्यापारांतील विशेष हा आहे कीं, कमावलेल्या चामड्यांचें मद्रास हें महत्वाचें ठिकाण असून तेथील बराच माल ब्रह्मदेशांत जातो.  ब्रह्मदेशाच्या खालोखाल मुंबईचा नंबर लागतो.  या व्यापाराचें मद्रास हें केंद्र आहे, असें परदेशांत जाणार्‍या मालाच्या आंकड्यांवरूनहि दिसतें.  परदेशीं जाणार्‍या मालापैकी शेंकडा ९१ कमावलेली कातडी व शेंकडा ७३ कमावलेली चामडी मद्रासहून गेली.  बाकी बराचसा माल मुंबईहून गेला.  मद्रासच्या कमावलेल्या चामड्यांनां आजपर्यंत संयुक्त संथानें हें महत्वाचें गिर्‍हाईक होतें. परंतु अलीकडे हिंदुस्थानच्या कमावलेल्या चामड्यांनां असलेली मागणी कमी होत असून बंगालच्या कच्च्या चामड्यांनां जास्त जास्त मागणी होत आहे.

हिंदुस्थानाबाहेरील देशांत नवीन शास्त्रीय शोधांच्या सहाय्याने कातडी कमावण्याच्या सरस व कमी खर्चाच्या पद्धती सुरू झाल्या आहेत.  यावरून असें दिसतें कीं, हिंदुस्थानच्या मालांत कालगतीप्रमाणें सुधारणा झाली पाहिजे, नाही तर हिंदुस्थानच्या कातड्यांच्या व्यापाराचा पूर्ण नाश होईल.  ज्याप्रमाणें हातमागावर काम करणारे कोष्टी गिरण्याची भरभराट थांबवूं शकणार नाहींत, त्याचप्रमाणें येथील कातडी कमावणारें लोक जर आपल्या जुन्या पद्धती सोडणार नाहीत, तर त्यांचा, कमी खर्चाच्या शास्त्रीय पद्धती उपयोगांत आणणार्‍यापुढें  टिकाव लागणार नाहीं.  हिंदुस्थानांतील कातडी कमावण्याची पद्धत इतकी असमाधानकारक होती व अजूनहि आहे कीं, ज्या देशांत येथील कमावलेली कातडी जात तेथें ती पुन्हां कमवावीं लागत असत.  इ.स. १९०४-०५ साली सरासरी २८५१७१७३ रुपये किंमतीचा माल परदेशी गेला. परंतु पांच वर्षांपूर्वीच याच्या जवळजवळ दुप्पट माल परदेशी जात असे.
हिंदुस्थानांत कातडी व ती कमावण्याची द्रव्यें विपुल असून स्वस्त आहेत.  या दोन गोष्टीमुळें कातडी कमावण्याचा धंदा पुरेसें भांडवल घालून आर्थिक तत्वांवर चालविला असता तर त्याची अधोगति झाली नसती, असें मुंबई व कानपूर येथील कारखान्यांच्या स्थितीकडे पाहिलें असतां दिसतें.  अलीकडे कमावलेल्या कातड्यांत बरीच सुधारणा झाली असून त्यांचा व्यापारहि वाढत आहे.  १९०६-०७ साली ४४५१२५४१ रुपये किंमतीची चामडी व कातडी परदेशी गेली.

बौद्ध, जैन व कांही प्रमाणांत हिंदूधर्मांतहि अहिंसातत्वांचे प्राबल्य असलें तरी कातडी व कातड्याचे जिन्नस यांच्या व्यापाराला त्यामुळें विशेष अडथळा आलेला दिसत नाही.  कातड्यांचा व चर्मांचा हल्लींपेक्षांहि पूर्वी जास्त उपयोग केला जात असे.  तिसर्‍या शतकांत लिहिलेला कातड्यावरील पत्रव्यवहार सापडल्याचें स्टाइन यानें लिहिलें आहे.  पुस्तकें बांधण्याकरिता व घोड्याचें खोगीर व इतर सामान करण्याकरितां पूर्वीहि कातड्यांचा उपयोग करीत कातड्याच्या पेट्या, बूट, वैद्यकीची  शस्त्रें ठेवण्याच्या पेट्या, फोटोग्राफीच्या क्यामेर्‍यास असलेले भाते, मोटा, पैसे ठेवण्याची पाकिटें, एंजिनें चालविण्याकरितां पट्टे, हातमोजे, अंगांत घालण्याचे कपडे इत्यादि अनेक कामी कातड्यांचा उपयोग केला जात असे.

कातड्यांचा माल तयार करण्यास पूर्वी शारीरिक श्रमाचीच जरूरी असे परंतु हल्ली कातडी कमावण्यापासून तों निरनिराळे जिन्नस तयार होईपर्यंत सर्व कामे यांत्रीक सहाय्यानेंच होतात.  यामुळें हा सर्व व्यापार परकीयांनीच बळकावला आहे.  पूर्वी कातडी कमावण्यास वनस्पतिजन्य द्रव्यें वापरीत असल्यामुळें बराच वेळ कमावण्यास लागे.  हल्ली त्वरित फलदायी रासायनिक पद्धतीचा शोध लागला असून खनिज क्षारांचा अथवा विजेचा उपयोग करण्याची प्रवृत्ति जोरानें वाढत आहे.  परंतु हिंदुस्थानांतील कातड्यांच्या धंद्यांत मात्र कालगतीबरोबर सुधारणा होत नाही.  उदाहरणार्थ, क्रोमपद्धतीनें म्हशीच्या कच्च्या कातड्यावरून ७ दिवसांत, गाईच्या  कातड्यापासून २४ तासांत, शेळ्या-मेंढ्यांच्या कातड्यापासून ६ ते ८ तासांत उंची प्रकारचें कमावलेलें कातडें तयार करतां येतें.  याच कामाला पूर्वी एक महिना किंवा केव्हां केव्हां १८ महिनेहि लागत असत.  पालाश- द्विक्रुमित मध्यें कातडी बुडविली असतां ती उच्च प्रतीची होतात.  रामट द्रव्यात योग्य कालपर्यंत कांतडी भिजत ठेवून नंतर एका मेजावर त्यांचा ढीग रचतात.  म्हणजे फाजील रांपट द्रव्य त्यातून झिरपतें व रापविण्याची ही क्रिया पूर्ण होत असते.  यानंतर ती कातडी  कित्येक वेळां पाण्यानें धुतात.  त्यानंतर ती बोरॅक्स व पाणी यांच्या द्रावणांत बुडवितात.  त्या योगानें त्यांतील उरलेल्या अम्लाचें बल कमी होतें व त्यानंतर धुवून त्यांना रंग देतात अगर चरबी लावतात.  क्रोमपद्धतीनें कमावलेली कातडी एकदां वाळलीं म्हणजे पुन्हां त्यांवर कसलाहि प्रयोग करतां येत नाहीं, म्हणून जो पाहिजेतो आकार त्यांस ताबडतोब द्यावा लागतो.  कातडी कमावण्याची नवीन पद्धति कठिण नसून खर्चाचीहि पण नाही.  या कारणामुळें परदेशी व्यापारी हिंदुस्थानांतील अर्धवट चामडी न घेतां खारवलेली कच्ची जाड व कोंवळी कातडीं विकत घेतात.  हल्ली शास्त्रीय पद्धतीनें कातडी याहीपेक्षां विशेष जलद कमाविली जातात.  अशा प्रकारच्या पद्धति हिंदुस्थानांतील कांही यूरोपियन कारखानदारांनी मात्र गेल्या वीस वर्षांच्या शोधांच्या अनुरोधानें आपल्या कारखान्यांत सुरू केल्या आहेत.

कमावलेल्या कातड्यांची आयात - एतद्देशीय कातडी कमावण्याची रीत जरी मागसलेली आहे तरी येथें कमावली जाणारी कांही कातडी परदेशाहून आलेल्या उत्तम कमावलेल्या कातड्यांच्या तोडीची असून कानपूरच्या कारखान्यांत तयार होणारे रोजच्या वापरण्याचे बूट व इतर सामान तर किंमतीच्या मानानें त्याच दर्जाच्या परदेशाहून आलेल्या मालाहून सरस असतें.

१९००-१९०१ मध्यें ५५५९११ रुपये किंमतीचा व इ.स. १९०६-०७ मध्यें ५०४४०४ रु. किंमतीचा माल येथें आला.  या रकमेंत बूट व शूखेरीजकरून खोगीर वगैरेच्या आयातमालाची किंमत मिळविली असतां १९०६-०७ सालीं ३२५८६८१ रुपयांचा माल परदेशाहून इकडे आला असें दिसतें.

एतद्देशीयकातडी कमावण्याचे कारखाने - इ.स. १८०३ मध्यें येथें कातडीं कमावण्याचे ४४ कारखाने होते व त्यांत ३८०४ लोक काम करीत असत.  पुढें हे कारखाने वाढले परंतु पुन्हां कमी होत होत १९०४-०५ साली लहान लहान कारखान्यांखेरीज ३५ कारखानेच राहिले.  यांपैकी बरेच मद्रासमध्यें असून कानपुरांत ६, कलकत्यांत ४, मुंबईत ३ व रापुतान्यांत १ असे होते.  सर्व हिंदुस्थानांत कानपूरचे कारखाने महत्वाचे असून तेथे उच्च प्रतीची कमावलेली कातडी तयार होतात.  कानपूरला उच्च प्रकारचे बूट, शू, खोगीर, कातड्यांच्या पेट्या, वगैरे जिन्नस तयार होतात.

कातडे कमावण्याच्या एतद्देशीयपद्धती - खाटीक, ढोर, धेड, महार वगैरे लोक मेलेल्या जनावरांच्या अंगावरील कातडे काढतात. नंतर त्यावरील कचरा, मळ, वगैरे निघून जाण्याकरितां दोन दिवस ती पाण्यांत भिजत ठेवतात.  नंतर एक प्रकारचा दगड असतो,  त्यावर ते ठेवून मोगरीनें बडवितात.  त्या योगानें कातड्यावर मांस, चरबी वगैरे द्रव्यें असल्यास तीं निघून जाऊन तें स्वच्छ होतें.  मग १० भाग चुना व ८० भाग पाणी यांच्या मिश्रणांत ते कातडे टाकून बारा किंवा पंधरा दिवस भिजत ठेवतात.  तें पूर्ण भिजून फुगलें म्हणजे त्यावरील केंस निघूं लागतात.  या मिश्रणांतून तें बाहेर काढल्यावर कोयत्यासारख्या बोंथट हत्यारानें त्यावरील केंस खरडून काढतात.  पुढें तें कबुतराच्या विष्ठेच्या पाण्यांत टाकलें म्हणजे चुन्याच्या योगानें त्यास आलेला फुगीरपणा नाहींसा होतो.  यानंतर तरवड किंवा बाभळीची साल यांच्या मिश्रणांत तें टाकावें.  त्याची रीत अशी : -

तरवडाची किंवा बाभळीची साल आणून ती ८ पट पाण्यांत एक रात्र भिजत घालावी.   म्हणजे सालीतील रंगाचा अंश त्या पाण्यांत उतरतो.  किंवा साल पाण्यांत घालून विस्तवावर उकळावी, म्हणजे तें पाणी उत्तम रंगदार होतें.  या पाण्यांत कातडें भिजत ठेविलें असतां तें कुजण्याची क्रिया बंद होते.  या मिश्रणांतून कातडें बाहेर काढल्यानंतर सुकवावें व सुकल्यावर पुनः तें स्वच्छ पाण्यांत टाकावें.  तें चांगलें भिजलें म्हणजे बाहेर काढून एका लांकडाच्या वाटोळ्या ठोकळ्यावर केंसाची बाजू खाली करून ठेवावें.  मग सुरीसारखें एक मुठीचें हत्यार असतें, त्यानें तें कातडें खरडून साफ व आपणास पाहिजे इतकें पातळ करून घ्यावें.  नंतर पुनः तें पाण्यांत टाकून गुळगुळीत वाटोळ्या दगडानें घोटावें, व मृदुत्व येण्याकरितां तूप व मेण एकत्र कढवून त्यावर सारवावें.

बाभळीची साल, तरवडाची साल, मायफळ, खैराची साल किंवा कात, हिरडा, ओक लांकडाची साल वगैरे जिनसा कातडी कमावण्याकडे उपयोगांत आणतात.  यांशिवाय बरीच द्रव्यें कातडी कमावण्याच्या उपयोगी पडतात.

येथें कमावलेल्या कातड्यांच्या मालाला एतद्देशीय मागणी बरीच असते.

कातडी कमावण्याच्या तीन रीती आहेत (१) साल अथवा दुसर्‍या वनस्पतिजन्य पदार्थांच्या काढ्याचा उपयोग करून, (२)  खनिज क्षारांचा उपयोग करून व (३) तेलाचा उपयोग करून.  जोड्यांचे तळवे, यंत्राचे पट्टे व अश्वसामग्री तयार करण्याकडे मुख्यतः कातड्याचा उपयोग होतो.  पुस्तकें बांधण्यास व बुटाच्या वरच्या भागाकरितां वांसरांची चामडी कमाविली जातात.  मेंढ्यापासून निरनिराळ्या प्रकारचीं कमावलेली चामडी होतात.  बकर्‍यांच्या कमावलेल्या चामड्यापासून हातमोजे करितात.  जे देश कमी सुधारलेले आहेत, तेथील जनावरांची कातडी सर्वांत जाड असतात. जनावरांची निगा ठेवल्यानें त्यांची कातडी पातळ होतात.  खच्ची केलेल्या जनावरांची कातडी सारख्या जाडीची असतात.  मेलेल्या जनावरांची कातडी हलक्या प्रतीची असून ती जर चांगल्या तर्‍हेनें कमावली गेली नाहींत तर त्यांपासून वापरणार्‍याच्या शरीरास अपाय होण्याचा संभव आहे.  कातड्यांच्या आंतल्या भागास मीठ लावलें असतां, अगर ती हरताळाच्या द्रावणांत भिजविली असतां टिकाऊ होतात.

पादत्राणांचा व्यापार - एतद्देशीय जोड्यांवर नकशी असून त्यांत कारागिरी दृष्टोत्पत्तीस येते.  या कारागिरीच्या कामासाठी खालील ठिकाणें प्रसिद्ध आहेत.  बंगाल्यांतील - कटक, पाटणा व सरण, संयुक्त प्रांतांतील-रामपूर, लखनौ, आग्रा, झांशी व सहराणपूर.  पंजाबांतील : - कोहट, रावळपिंडी, पेशावर, डेरा गाझिखान होशियारपूर मध्यप्रांतांतील चांदा, राजपुताना : - जयपूर व बिकानेर.  मुंबई इलाख - सुरत, अहमदाबाद, नगर पुणें, रत्‍नागिरी व हैदराबाद.  दक्षिण हिंदुस्थान : - रायचूर, सालेम, त्रिचनापल्ली, मद्रास व म्हैसूर.  यूरोपिअन पद्धतीच्या जोड्याकरितां कानपूर हें विशेष महत्वाचें आहे.  गेल्या दहा वर्षांत हिंदुस्थानांतून बूट बाहेर देशी जाऊं लागले आहेत.  १९०६-०७ साली ४६८४९१ रुपयांचा माल परदेशी गेला.  हा माल नाताळ, केप कॉलनी, मॉरिशस व ईजिप्‍त येथें जातो, व फार थोडा माल इंग्लंड व रशियालाहि जातो.

कारागिरीचामाल - पट्टे, बुधले, खोगीर वगैरे माल सर्व हिंदुस्थानभर तयार होतो.  कांही ठिकाणी तयार होणारा माल उच्च प्रतीचा व उत्कृष्ट कारागिरीचा असतो.  पेशावर, बन्नू, कोहट व क्वेट्टा येथें होणारे ''सरहद्दीवरील पट्टे'' प्रख्यात असून हिंदुस्थानच्या बर्‍याच भागांतून त्यांनां मागणी असते.  सांबरांच्या कांतड्याकरितां संयुक्तप्रांतांतील गोरखपूर व मध्यप्रांतांतील चांदा ही ठिकाणें प्रसिद्ध आहेत.  मद्रास इलाख्यांतील कर्नूळ जिल्ह्यांत चामड्याच्या चट्या विचित्र तर्‍हेनें रंगवितात.  राजपुताना व मुंबई इलाखा येथील कांही ठिकाणी पुस्तकें बांधण्याकरितां चामड्यावर ठसे उमटविणें व कोरींव काम करणें हीं कामें होतात.  अलवार व अहमदाबाद ही ठिकाणें या कामाकरितां फार प्रख्यात आहेत.  गेंड्यांच्या कातड्याच्या ढाली तयार करण्याचा धंदा गुजराथेंत बर्‍याच दिवसांपासून आहे.  परंतु ढालीचा उपयोग बंद झाल्यासारखा असल्यामुळें हा धंदा कितपत किफायतशीर असेल याबद्दल संशय वाटतो.

परदेशी कातडीं कमावण्याची कृति - हिच्या तीन पद्धती आहेत.  टॅनिक अम्लाचा त्यावर प्रयोग करून, खनिज मिठांचे सहाय्य घेऊन, तेल व चरबी लावून.  तिसर्‍या पद्धतीस शामॉय म्हणतात.  जड व हलकें असे कातड्यांत दोन प्रकार आहेत.  गोचर्म हें जड कातड्याच्या सदरांत पडतें.  गाईंची कातडी ब्रिटिश लोकांच्या घरांतील जिनसांनां उपयोगी पडतात.  जंगली गाई व सखल प्रदेशावरील गाई यांच्या कातड्यांत फरक असतो. पहिले जास्त मजबूत व जाड असतें.  मेंढ्या, बकरी, सील, देवमासे वगैरेंची कातडी हलक्या कातड्यांत जमा होतात.

कातडी कमावण्याची साधनें - टॅनिक अम्ल यांत प्रमुख द्रव्य होय.  कॅटेचोल व पायरोगालोल असे याचे दोन निरनिराळे वर्ग आहेत.  पायरोगालोल टॅनिकपासून फार सुरेख कातडें तयार होतें.  पण या दोहोंचें मिश्रण केलें तर सर्वोत्कृष्ट असाच परिणाम घडून येतो.  कातडी कमावण्याच्या प्रमुख साधानांचें वर्गीकरण पुढें दिल्याप्रमाणें : -

  पायरोगालोल  कॅटेचोल
  हिरडा  गँबिअर
  चेस्टनट लांकूड  हेम्लॉक
  दिवि - दिवि  क्वेब्राचो
  अलगरोबिला  मॅनग्रोव्ह (कच्छ)
  सुमाक  मिमोसा
  ओक  लार्च
  चेस्टनट ओक  कनैगर
  माजूफळ  बर्च
  विलो  कच्छी कात

कारखान्यांत जी गोचर्में येतात ती चार तऱ्हेंची असतात.  (१) कसाईखान्यांतून थेट आलेली;  हीं ओली व घाणीनें आणि रक्तानें माखलेली असतात; (२) ओली मिठाळलेली, (३) कोरडी मिठाळलेली व  (४) उन्हानें वाळलेली.  ही स्वच्छ व नरम करून चुन्यांत बुडवून ठेवितात.  कातडें चुन्यांत किती वेळ ठेवावयाचें तें ज्या कारणाकरितां कातडे पाहिजे त्यावर अवलंबून असतें.  नंतर कातडें चुन्यांतून काढून चाकूनें त्यावरील केंस काढतात.  यावेळी त्या कातड्याचे कमीजास्त महत्वाचे अनेक तुकडे पाडतात व ते निरनिराळे कमावतात.  केंस काढलेली कातडी अॅसिडमध्यें धुवून त्यांवरील चुना व घाण काढून टाकतात.  यापुढें कमावण्याची क्रिया सुरू होते.  या क्रियेंत तीन अवस्था असतात. (१) रंगाच्या हौदात  लोंबत ठेवून रंग देण्याची, (२) कातडी पुन्हां पुन्हां हौदांतून काढण्याघालण्याची व (३) पुढें चढविण्याची या त्या होत.   पुढें चढविण्याच्या कामीं टॅनिक अम्लीय द्रव्यांचा उपयोग करतात.  निरनिराळ्या प्रकारच्या कातड्यांनां निरनिराळी द्रव्यें वापरतात.  यानंतर २/३ दिवस कातडी निथळत  ठेवतात व ज्या जिनसांकरितां कातडें पाहिजे असेल त्याप्रमाणें कातड्यावर चढविलेला रंग कमीजास्त धुवून पुसून काढतात.

याप्रमाणें तयार केलेलीं कातडी तेल व चरबी यांत बुडविली म्हणजे ती मऊ व मजबूत होतात.  नंतर त्यांना खळ लावतात.  हलकीं (बकरी, सील वगैरेंची) कातडी कमावतांना विशेष काळजी घेतात.

कारखाने - कातडी कमावण्याचा धंदा फार पुरातन आहे.  ख्रि. पू. चार हजार वर्षे इतक्या मागें होऊन गेलेल्या फारोच्या थडग्यांतून चांगले चामड्याचे नमुने संशोधिले गेले आहेत.  त्यांवरून आज देखील या धंद्याच्या स्वरूपांत फारसा फरक झालेला दिसून येत नाहीं.  त्यावेळेप्रमाणे हल्ली सुद्धां झाडांच्या साली व फळें यांपासून कमावण्याकरितां लागणारी द्रव्यें तयार करतात.  गेल्या शतकाच्या उत्तरार्धांत फ्रान्स, आस्ट्रिया हंगारी आणि अमेरिका या देशांतून कातडी कमावणारी द्रव्यें तयार करण्याचे मोठमोठे कारखाने स्थापण्यांत आले.  ही नवीन वनस्पतिजन्य द्रव्यें वापरल्यानें कमावण्याची क्रिया फार जलद होऊन कातडें स्वस्त  व सुबक निघते.  हा धंदा सध्यां शास्त्रीय पद्धतीवर चालविण्यांत येतो.

ग्रेटब्रिटनमध्यें एका आठवड्यांत एक लाख पन्नास हजार कच्ची कातडी कमावली जातात.  या कच्च्या कातड्यांच्या संख्येपैकी सुमारें ५० हजारच ग्रेटब्रिटनमधील गुरांची असतात.

महायुद्धानंतर जगांतील निरनिराळ्या पेठांतून कच्ची कातडी भरपूर पडली होती व त्यामुळे काही काळ त्याचा भाव महायुद्धापूर्वीपेक्षांहि उतरला.  पण ती जमा करणें व वाहून नेणें याला बराच खर्च येत असल्यानें हजारों कातडी निरुपयोगी होऊन पडून राहिली.  तथापि आजचा भाव कमी नाही.  मजूरी व वाहतुकी यांचे दर कमी झाल्याखेरीज तो युद्धापूर्वीइतका होणारहि नाही.

कातडी कमावण्याचा दुसरा प्रकार म्हणजे तुरटी व मीठ किंवा खनिज मीठ यांच्या पाण्यांत भिजवून ठेवण्याचा.  लोकरीचे रंग या प्रकारानें बनवितात.  कमावण्याची आणखी एक पद्धत म्हणजे 'क्रोम' ही होय.  १८७८ च्या सुमारास डॉ. हीनझेर्लिगनें या पद्धतीला व्यापारी महत्व प्राप्‍त करून दिलें.  हलक्या कातड्यांवर हा प्रयोग बहुधा करण्यांत येतो. पण सध्यां जाड कातडीहि क्रोम बनवितात.  कांही वेळां खनिज व वनस्पतिजन्य द्रव्यें एकत्र करून कातडी कमावतात. त्यामुळें या दोन्ही प्रकारांतील गुण कातड्यांत येतो.

तिसरा प्रकार शामॉयिंग किंवा तेली कमाईचा.  कातड्याच्या धंद्यांत याला बरेंच महत्व आहे.  कातड्याचे तंतू तेलानें माखणें, व अल्डेहाईड टॅनिक करणें हा शामॉयचा प्रकार होय.
कातडी कमावल्यावर त्यांना रंग देण्यांत येतात.  रंग देतांना ज्या जिनसांनां कातडी लागणार त्यांवर रंगांचे प्रकार व प्रमाण अवलंबून असतें.  चकाकी आणण्यासाठी कातडी दाबून ठेऊन त्यांवरून कांचेचा रुळ फिरवितात.  हातमोजे, बुकबांधणी, पाकिटें यांची कातडीं निरनिराळ्या प्रकरांनी कमावतात.

गाई, म्हेशी, बैल, घोडे वगैरे पाळीव जनावरांखेरीज दुसर्‍या कित्येक प्राण्यांच्या कातड्यांचा व्यापार होतो.  नार्वे, स्वीडन, बाल्टिक समुद्र वगैरे उत्तर - प्रदेशांतून सलि नांवाच्या माशाची कांतडी येतात.  ती आकारानें बरीच मोठी असल्यामुळें त्याचा उपयोग कोच व गाड्या मढविण्याकडे करितात.  सफेत देवमाशाचें कांतडें ज्यास पार्पाईज हाईज म्हणतात त्याचे निरनिराळ्या प्रकारचे बूट बनवितात.  अजगर, साप, बेडूक, कांगारू वगैरे प्राण्यांची कातडी सुद्धां नानाप्रकारचे चित्रविचित्र व्यापारी - जिन्नस तयार करण्याकडे लावितात.  कृत्रिम कातडें किंवा कातड्याच्या रंगाचे कापड करण्यांत अमेरिकन लोकांनां चांगले यश मिळालें आहे.  तें कापड पुस्तकें बांधण्याकरितां तसेंच खुर्च्या, मेजे, घोड्याच्या गाड्या, कोंच वगैरे जिन्नस मढविण्याकडे लावितात.  पार्चमेंट किंवा चर्मपत्र, हें सफेत रंगाचे अर्धपारदर्शक कांतडे बकर्‍याच्या चामड्यांपासून विशिष्ट कृतीनें तयार करितात.  महत्वाचे लेख किंवा दस्तैवज लिहिण्याकडे याचा उपयोग होतो.  हे कातडे फार टिकाऊ असते.

कातड्यावर नक्षी किंवा दाणा उठविणें - घोड्याच्या खरार्‍याच्या आकाराचें एक हत्यार असतें.  त्या हत्यारानें आडवें, उभें, किंवा चोहोंकडून कांतडें घासतात.  म्हणजे त्यावर दाणा उमटतो. नक्षी उठविणें असल्यास निरनिराळ्या प्रकारचे खिळे, छाप वगैरे आसतात ते कातडें कमावल्यावर ओलसर असतानांच त्यावर दाबावे म्हणजे त्या छापावरील नक्षी कांतड्यावर उमटते.

कातड्यावर रंग देणे - काळा रंग देणं असल्यास कातडें कमावून तयार झाल्यावर हिराकसाचें पाण्यांत मिश्रण करून तें मिश्रण कुंचल्यानें लावावें व त्यावर काजळ व तेल मिश्र करून उत्तम काळा रंग चढतो.

लाल रंग : - लाखेचा आळिता करून त्याचा किंवा किरमिजी दाणा पाण्यांत मिळवून त्याचा रंग देतात.  त्याचप्रमाणे पाहिजे तो रंग पाण्यांत मिसळून कातड्यावर देतात व चकाकी येण्यास तो रंग तेलांत किंवा अंड्यांतील बलकांत खलून लावतात.  जास्त चकाकी पाहिजे असल्यास वार्निसाचा हात देतात.

(संदर्भग्रंथ - बेनेट - दि मॅन्युफॅक्चर ऑफ लेदर, ट्राटमन-लेदर ट्रेडस केमिस्ट्रा, लँब - लेदर ड्रेसिंग, वॅट- लेदर मॅन्युफॅक्चर.  प्रोक्टर-प्रिन्सिपल्स ऑफ लेदर मॅन्यु, फ्लेमिंग प्रॅक्टिकल टॅनिग, ब्रिटानिका, ब्रिटानिका, वॅट-कमर्शिअल प्रॉडक्टस ऑफ इंडिया, मार्टिन - टॅनिंग अॅंड वर्किंग इन लेदर, रिव्ह्यू ऑफ दि ट्रेड ऑफ इंडिया.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .