प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

कांतकाम - कांतकाम याचा साधारण अर्थ, लांकूड किंवा धातू यास यंत्रावर चाढवून, फिरवून हत्यारानें त्याला निरनिराळे आकार देणें असा आहे.  कांतकामाचे जरूरीप्रमाणें पुष्कळ प्रकार आहेत.  त्याप्रमाणें त्यास लागणारी यंत्रें व हत्यारेंहि पुष्कळ प्रकारची आहेत.  लोखंडाचें कांतकाम व धातूचें कांतकाम असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत.  
    
लांकूड हें धातूपेक्षां फारच मऊ असतें.  त्यामुळें त्यावर काम करण्यास मेहनत कमी पडते व शक्तीहि कमी लागते.  निरनिराळ्या लाकडांच्या मऊपणामध्यें पुष्कळ फरक असतो.  तसेंच लांकडाचे दोरे (रेषा) हेहि निरनिराळे असतात. यामुळें सगळ्याच लांकडांवर सारखें कांतकाम होतें असे नाही.  कांहीवर चांगलें स्वच्छ तर कांहीवर खरबरीत होतें.  या दुसर्‍या जातीची लांकडे गुळगुळीत करावयाची असल्यास ती हातानें घांसून करावी लागतात.  जुन्या तर्‍हेच्या देशी कांतकामामध्यें, दोन लांकडांच्या ठोकळ्यांनां समांतर असें दोन लोखंडी टोंकदार खिळे बसविलेले असत.  त्यांमध्यें जे लांकूड कांतावयाचें असेल तें बसवीत.  या लाकडाला समांतर अशी जाड लोखंडाची किंवा टणक लांकडाची सळई असते. तिचा उपयोग कांतण्यासाठी उपयोगांत आणण्याच्या हत्याराला टेंका देण्याच्या कामी करीत.  लांकूड फिरविण्यासाठी एका वांकविलेल्या काठीला दोरी बांधून त्या दोरीचे एक दोन फेरे लाकडांवर घेत असत.  पण या युक्तीचा उपयोग फक्त लहान सहान कामें करण्याकडेच होतो.  लाकडाचें मोठें कांतकाम करावयाचें असल्यास एक मोठें चाक व एक किंवा दोन माणसें लागतात.  त्या चाकावरून कांतावयाच्या लांकडावर दोरी घेतलेली असते व तीमुळें लांकूड फिरतें.  बाकी काम वरीलप्रमाणेंच करावयाचें असतें.
    
आपल्याकडे होणारें सर्व देशी लांकडी काम या तर्‍हेनेंच होतें.  सर्व तर्‍हेची निरनिराळी रंगीत खेळणी, खुर्च्या, टेबलें, पलंग, कठडे वगैरेंनां लागणारें सामान इत्यादि सर्व या तर्‍हेनेंच होतें.  कारण यामध्यें चौकोनी लांकडाला निरनिराळे वाटोळे आकार द्यावयाचे असतात. हल्ली विलायतेंत लाकडाचें काम फारच पुढें गेलेलें आहे.  आरशांच्या फ्रेमीला लागणार्‍या नक्षीदार पट्टया, पातळ लांकडी बशा निरनिराळ्या जातीचे दांडे इतकेच काय, पण पुष्कळ वेळां लहान लहान लांकडी पुतळेसुद्धां तिकडे यंत्रानें कांतून करतात.
    
या कामासाठी निरनिराळी यंत्रें लागतात.  सर्वसाधारणपणें कांतकाम करण्यासाठी लागणार्‍या यंत्राला कांतयंत्र (लेथ) असें म्हणतात.  याच्या तर्‍हा पुष्कळ आहेत. कांहीमध्यें लांकूड फिरत असतें व हत्यार स्थिर असतें, तर कांहीमध्यें हत्यार फिरत असते पण लांकूड मात्र स्थिर असतें, कांहीमध्यें दोन्ही फिरत असतात.  फ्रेमीच्या पट्टया तयार करणार्‍या यंत्रांत एका लोखंडाच्या सळईवर बसविलेलें व ज्या तर्‍हेची पट्टवरची नक्षी असेल त्या तर्‍हेचें एक चाक फिरत असतें.  त्याला चांगली धार असते.  त्याच्या खालून लांकडी पट्टी जात असते.  चाक फिरत असतांना पट्टीला ठिकठिकाणी घांसून, ज्या ठिकाणी जो आकार पाहिजे असेल त्या ठिकाणीवरील घांसण्यानें पट्टीला आकार मिळतो.  एकाच चाकानें एकाच जातीचा आकार देतां येतो.  निरनिराळे आकार द्यावयाचे असल्यास निरनिराळी चाकें लावावी लागतात.
    
लांकडाच्या लहान लहान पातळ बशा वगैरे करण्याचें कातयंत्र निराळें असते.  तें थोड्या कामाच्या मुळींच उपयोगी नसून जेव्हां पुष्कळ काम करावयाचें असेल तेव्हांच त्याच्यापासून फायदा होतो.  लांकडाचे एकाच जातीचे दांडे करावयाचे असल्यास निराळेंच कांतयंत्र लागतें.  प्रथम नमुन्याचा एक लोखंडी दांडा करतात.  नंतर या यंत्राच्या मध्यभागी दांड्याच्या लांबीचा एक लांकडाचा तुकडा बसवितात.  दांडा कांतणारें हत्यार लांबीशी समांतर मागेंपुढें होत असतें.  याचें एक टोंक दांड्याला लागलेलें असतें व दुसरें टोक वरील लोखंडाच्या दांड्यावर टेंकलेलें असतें.  कातयंत्रांतील विशेष योजनेमुळें तें चालूं केलें म्हणजे ज्या तर्‍हेचा आकार लोखंडी दांड्याला दिलेला असतो त्याच तर्‍हेचा आकार हुबेहूब आकार लाकडी दांड्याला येतो.  अशा रीतीनें एकाच आकाराचे हवे तेवढे दांडे तयार करतां येतात.
    
पुतळे करण्याचें कातयंत्रहि ह्याच प्रकारचें असतें.  त्यांत ज्या तर्‍हेचे पुतळे करावयाचे असतील तसला एक पुतळा प्रथम लोखंडी किंवा इतर टणक धातूचा बनवावा लागतो.  मात्र या जातीचें कातयंत्र जास्त भानगडीचें असते.
    
लांकडाचें कांतकाम व धातूंचें (विशेषतः लोखंडाचें) कांतकाम यांत फारच फरक आहे.  धातूंचें काम चांगल्या यंत्राशिवाय चांगलें होत नाही.  ही कांतयंत्रें निरनिराळ्या प्रकारची असतात (१) अगदी साधें, (२) स्क्रू करणारे, (३) उभें (व्हर्टिकल), (४) सपाट (हॉरिझॉटल), (५) टरेट, (६) स्पेशल व (७) बोअरिंग इत्यादि.  मिलिंग यंत्रहि याच सदरांत येतें.  त्यांत फरक येवढाच कीं, साध्या कांतयंत्रावर जसें निरनिराळ्या प्रकारचें काम करितां येते तसें उभें, सपाट किंवा मिलिंगयंत्रांवर करितां येत नाही.  ही यंत्रें कांही विशेष कामाच्याच सोयीसाठी केलेली असतात.
    
साध्या कांतयंत्रामध्यें एका बिडाच्या चौकटीवर डाव्या बाजूला दोन आंवणा (बेअरिंग) मध्यें एक लोखंडी चाती (स्पिंडल) बसविलेली असते.  ही चाती बहुतकरून पोकळ असते.  चातीवर दोन आंवणांमध्यें गति कमीजास्त करणारा एक कोन बसविलेला असतो.  याला 'सिंगलगिअर हेडस्टाँक' असें म्हणतात.  याचा उपयोग फक्त पितळेसारख्या मऊ धातूंच्या कामी होतो.  डबल गिअर हेडस्टॉकमध्यें कोनापासून चाती सुटी करता येते.  तसेंच दांत्यांची चक्रें चातीवर चढविण्यासाठी कोनाच्या बाजूला, दुसर्‍या एका दांत्यांच्या चाकाची चाती बसविली असते.  जेव्हां मुख्य चातीची गति कमी करावयाची असते तेव्हां तिच्या दुसर्‍या बाजूचें मोठ्या दांत्याचे चक्र कोनांतील दांत्यांच्या लहान चक्रांत येऊन बसतें.  त्या वेळच्या दुसर्‍या एका योजनेमुळें मुख्य चातीची गती वाढवितां येते.  ज्यावेळेस मुख्य चाती व कोन बरोबरच चालावयाचे असतात त्या वेळेस ही दुसरी दांत्यांची चाती बाजूला करतां येते.
    
या गिअरहेडच्या चातीच्या पोकळीमध्यें एक बारीक टोंकाचा ''सेंटर'' (उर्फ टोंक ) तुकडा बरोबर मध्यांत बसविलेलें असून ते सतत फिरत असतें.  याच्या समोरच पण यंत्राच्या चौकटीवर बसविलेला व मागेंपुढें करितां येणारा एक लोखंडी ठोकळा असतो.  त्याला ''सेंटर स्टॉक'' किंवा सेंटरहेडस्टाक असें म्हणतात.  या ठोकळ्यांत दुसरा एक लोखंडी सेंटर (उर्फ टोंक) मधोमध बसविलेला असतो, तो मात्र स्थिर असतो.  चांगलें कांतकाम करावयाचें असल्यास हे दोन्ही सेंटर्स अगदी समोरासमोर असावे लागतात.  नाही तर असल्या टोकांत लावलेलें काम सरळ सुतांत येत नाही वाकडेतिकडें येतें, विशेषतः निमुळतें येते.  कांतयंत्रांतील चौकटीवर बसविलेली व मागेपुढें करितां  येणारी ''स्लाईड  रेस्ट'' ही या यंत्रांत एक अतिशय महत्वाची वस्तु आहे.  यंत्राच्या ज्या बाजूला माणूस उभा असतो तिकडे एका (यंत्राच्या लांबीइतक्या) दांड्याला दांते पाडलेले असतात.  त्या दांत्यांत फिरेल असें एक चक्र या ''स्लाईड रेस्ट'' मध्यें बसविलेलें असते.  हे चाक फिरविलें असतां ही रेस्ट मागेंपुढे होते.  या रेस्टवर काटकोनांत बसविलेला एक लांब स्क्रू असतो.  हा स्क्रू, म्हणजे दांत्याचा दांडा, मागें पुढें न होतां जाग्यावरच फिरतो.  ही रेस्ट त्याला फिरविणार्‍या दांड्यासुद्धां वाटोळी फिरावी अशीहि एक योजना तेथें केलेली असते.  याचा उपयोग निमुळतें काम करण्यासाठी होतो व केव्हां केव्हां स्क्रू करण्यासाठीहि होतो.  या रेस्टवर कांतण्याचें हत्यार बसवितात.  एका विशिष्ट योजनेमुळें रेस्टवर लावलेलें हत्यार आपल्या कामाप्रमाणें मागेंपुढे व उभेंआडवें नेतां येतें. नटांना किंवा स्क्रूंना आटे पाडावयाचे असल्यास स्लाईड रेस्टच्या मागल्या बाजूला दांत्यांची चाकें जोडण्याची व्यवस्था केलेली असते. नट अगर स्क्रू लहान, मोठे किंवा कमी, जास्त व डावे उजवे असतील त्याप्रमाणें ही चाकें बदलावीं लागतात.  अलीकडे नवीन जातीचीं कांतयंत्रें निघाली आहेत. त्यांमध्यें ही सर्व चाकें एकदमच बसविलेली असतात.  आटे जसे व जितके पाडावयाचे असतील त्याप्रमाणें चक्रावरचे एक दोन दांडे फिरवूनहि काम करतां येतें.  या योजनेला क्विक चेंज गियर म्हणतात. कांतयंत्रावर काम करण्यासाठी जो डाग लावावयाचा, तो त्यावर जसें काम करावयाचें असते त्याप्रमाणें पकडावा लागतो.  याला बांधी करणें असें म्हणतात.  हे बांधी करण्याचे प्रकार पुष्कळ आहेत.  अगदी साधा डाग (जाड किंवा बारीक गज) कांतावयाचा असल्यास त्याच्या दोन्ही टोंकांस त्याच्या मधोमध खुणा कराव्या लागतात.  त्या साध्या अणकुचीदार पंचनें (खिळ्यानें) करतात, पण या खुणा सेंटर ड्रीलनें पाडल्यास जास्त चांगल्या.  कारण पहिल्या तर्‍हेनें डाग यंत्रांत बरोबर मध्यें बसत नाही.  कांतकाम करीत असतांना हत्याराचा जोर लागून या खुणा थोड्या चळतात.  यामुळें काम थोडें निमुळतें होते.  ड्रीलनें खुणा पाडल्या असतां हत्याराचा जोर सर्व भागावर सारखा बसून डाग चळत नाही.
    
डाग फिरण्यासाठी (चातीशिवाय आणखी) कशानें तरी पकडावा लागतो.  त्या साधनाला पकड म्हणतात.  तिला एक बोल्ट असतो.  ती जो डाग करावयाचा असेल त्याच्या फिरत्या टोंकाला लावितात व बोल्टानें पिळून घट्ट बसवितात.  तिचा दांडा बहुतकरून वांकडा केलेला असतो.  डाग लहानमोठ्या व्यासाचा असेल त्याप्रमाणें लहानमोठ्या पकडी असाव्यात कांतयंत्राच्या चातीवर डावीकडे तिच्या बाहेरच्या बाजूस आटे पाडलेले असतात.  त्या आट्यांवर डाग पकडण्यासाठी निरनिराळ्या आकारांची चाकें असतात.  चाक त्या आट्यांवर बसविलें म्हणजे चातीबरोबर तेंहि फिरतें.  या चाकाला एक भोंक असतें.  त्या भोंकांत जो डाग कांतावयाचा असेल त्याचें एक टोंक जातें.  अशा रीतीनें चाक फिरावयास लागलें म्हणजे त्याच्याबरोबर पकड व त्यानें धरलेला डागहि फिरावयास लागतो.
    
या चाकांचे प्रकार बरेच आहेत पण त्यांत विशेष मुख्य म्हणजे सपाट चाक व सेंटर चाक हेच आहेत.  सपाट चाकाचा उपयोग फार असतो.  बहुतेक सर्व तर्‍हेची वाकडी तिकडी कामें याच्यावरच पकडतात.  हें चाक म्हणजे एक वाटोळा जाड बिडाचा पत्रा असतो.  याला पुष्कळशी भोंकें पाडलेली असतात. डाग लावतांना जमेल त्याप्रमाणें या निरनिराळ्या भोकांतून बोल्ट घालून किंवा दुसर्‍या तऱ्हेंने जशी योग्य दिसेल तशी बांधणी करून घेतां येते.  या चाकासारख्या आणखीहि डाग पकडण्याच्या दुसर्‍या योजना आहेत.  त्यांनां घट्ट पकडी (चक) असें म्हणतात.  या पकडीहि दोन चार प्रकारच्या आहेत.  त्यांची नांवें कुत्तापकड, घंटीपकड, शारपकड वगैरे.  यांपैकी कुत्तापकडीचा उपयोग सपाट चाकाइतका होतो.  तिच्यावरील चार पकडीत कुत्रा जसा आपल्या जबड्यांत पदार्थ पकडतो त्याप्रमाणेंच डाग या चक्रामध्यें पकडला जातो.  या चारहि पकडी वरखाली होत असतात.  यामुळे आपणास हव्या असलेल्या जागेवर डाग पकडतां येतो.  वाटोळे, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, वगैरे डाग पकडावयाचे असल्यास मध्यवर्ति म्हणून एक पकड आहे तिचा चांगला उपयोग होतो.  कारण तिच्यामध्यें डाग नीट चांगला पकडला म्हणजे एकदम मधोमधच येतो.  एकाच जातीचें पुष्कळ काम करावयाचें असल्यास याचा फारच उपयोग होतो. यामध्यें वेळ कमी लागून कामहि झपाट्यानें होतें.  घंटीपकड ही आंतून पोकळ घंटेच्या आकाराची असते.  हिला पुष्कळ भोंकें पाडलेली असतात.  त्यांनां आटे पाडून त्यांत लांब बोल्ट बसविलेले असतात.  या भोंकांमध्यें डाग घालून बोल्टांनी दाबून त्याला आपणासं लागेल तसा पकडतां येतो.  शारपकडीचा (ड्रीलचक) उपयोग भोंकें पाडण्यासाठी फार होतो.  ही लावावयाची असल्यास कांतयंत्राची सेंटरें काढून घेऊन त्या ठिकाणी ती बसवितात.  जर फिरत्या डागाला भोंक पाडावयाचें असेल तर डाग फिरता ठेवून स्थिर टोंकाच्या ठिकाणी ही बसवितात व त्यांत शार घालतात व मग चाती चालू करून डाग किंवा शार पुढें आणून भोंक पाडतात.
    
जेथें साधारण काम करावयाचें असतें त्या ठिकाणीं साधें कांतयंत्र चालतें.  बारीक कामाचें कातयंत्र भारी किंमतीचें असतें.  असल्या कातयंत्राचा उपयोग विलायतेंत किंवा अमेरिकेंत फार होतो.  असल्या यंत्राची चाकी पोकळ व मोठी असते यामुळें ती हालत नाहीं.  ज्या स्क्रूनें हत्यार डागावर पुढें मागें होतें त्या स्क्रूवर तो फिरविण्याच्या दांड्यापाशी एक वाटोळी चकती बसविलेली असते.  तिचे १२५ सारखे भाग पाडलेले असतात.  क्वचित २५० हि असतात.  हा स्क्रू फार चांगला असावा लागतो.  याचा पिंच (एक थ्रेड व एक ग्याप यांचें अंतर) १/८ किंवा १/१६ इंच असतो.  दांडा फिरवितांना स्क्रू जेव्हां एक भाग पुढें जातो तेव्हा हत्यार एक इंचाच्या एक हजारांश पुढें जातो यामुळें काम अगदी बरोबर करतां येतें.  इतकें बारीक काम करण्याकरितां लागणारें हत्यारहि अगदी धारेचें असावें लागते.  असलीं हत्यारें पोलादी असतात.  त्यांची धार म्हणण्यासारखी बोंथट होत नाही.  व कामहि फार झपाट्यानें होतें.  कांतयंत्रावर किती तर्‍हेनें काम करितां येतें हें सांगतांच येणार नाही.  तें काम करणार्‍यावर व त्याच्यापाशीं असलेल्या उपकरणांवर अवलंबून राहील.  जवळ जवळ असें म्हणण्यास हरकत नाहीं की बाकी सर्व यंत्रावरील (म्हणजे दात्यांचें यंत्र, भोंकें पाडण्याचें यंत्र, शेपिंग यंत्र इत्यादीवरील) होणारें बहुतेक काम कांतयंत्रावर करतां येतें व तें पुष्कळ वेळां जास्त चांगलें असतें.  एका हुशार कामकर्‍यानें या कामाचे जवळ जवळ शंभर सवाशें प्रकार आपल्या यंत्राच्या चित्रांत दाखविले आहेत.  त्यांत विशेषतः लांब दांडे कांतणे, नळकांडें तयार करणें, दट्टया, दट्टयाच्या कड्या वगैरे कांतणें, भोंकें पाडणे, चावीचे गाळे पाडणें, लहान लहान मिलिंगचें काम करणें इत्यादि प्रकार आहेत.  जेव्हां काम अगदी बरोबर असून अगदी गुळगुळीत व चकचकीत करावयाचें असतें त्यावेळचें घांसण्याचें कामहि कातयंत्रावर करतात. मोटारगाडीचा आंस, नळकांडे, पुष्कळ इंजिनांचे आंस वगैरे अगदी घासून बरोबर करावे लागतात.  कारण त्यामुळें घर्षणांत फुकट जाणारी पुष्कळ शक्ति वांचते. कोणत्याहि कारखान्यांत इतर यंत्रांपेक्षां ही कांतयंत्रेंच जास्त असतात.
    
खास पोलादी हत्यारें चांगली.   नुसत्या पोलादी पाण्याची पुष्कळ दिवस टिकत नाहीत.  त्यांची धार लवकर खराब होते.  पोलादाचें हत्यार फार टणक असतें.  याला पाणी देण्याचें कारण पडत नाही.  तसेंच त्याची धारहि बरेच दिवस खराब होत नाही. हत्यार चालत असतां तापून लाल झालें तरी त्याची धार लवत नाही किंवा बसत नाही.  या हत्यारामुळें जुन्या तर्‍हेनें काम करण्यास जो वेळ लागतो त्याच्या पाव हिश्शांत याने काम होतें व तेंहि चांगले होतें. काम लवकर व सफाईदार करणें असल्यास ही पोलादी हत्यारें अवश्य वापरली पाहिजेत.  हें पोलाद बहुतेक चौकोनी असतें. क्वचित वाटोळेंहि मिळूं शकतें.  जाड पोलाद वापरल्यास ज्या जातीचें हत्यार पाहिजे असेल त्या तर्‍हेचा आकार पहिल्यानें लोहाराकडून त्याला द्यावा लागतो.  हवा तो आकार दिल्यावर ते हत्यार कुरूंदाच्या सहाणेवर घांसून चांगलें धारेचें करून घ्यावें लागतें.  नेहमीं घासल्यामुळें हत्यारें अखूंड होतात.  यासाठी अलीकडे एक नवी तर्‍हा निघाली आहे.  पाव इंच किंवा तीन दोरे जाडीचे या जातीच्या पोलादाचे चौकोनी तुकडे मिळतात व त्यांनां पकडण्यासाठी पकडीहि असतात.  चौकोनी पोलादी तुकडा कुरूंदावर घांसून आपणांस हवा तसा आकार त्यास दिला म्हणजे तो या पकडीमध्यें पकडून काम केलें असतां तें फार चांगले होऊन पोलादहि कमी लागतें व हत्यारें घडविण्याचा सर्वच त्रास वांचतो.  परदेशी मालाच्या चढाओढीसाठी ही रीत प्रचारांत आणणें भाग आहे.  एखादें मोठें पाडावयाचें असल्यास शाराचा दांडा बोअरिंगबार म्हणून हत्यार असून तें दोन तर्‍हेचे असतें एकांत दांडा कातयंत्राच्या दोन टोकांत फिरत असतो व ज्या वस्तूचें भोंक मोठें करावयाचें असेल ती वस्तू चौकटीवर स्थीर असते.  दुसर्‍या प्रकारांत वस्तु फिरत असते.  पहिल्या जातीच्या शाराच्या दांड्याला मध्यें एक भोंक असतें.  त्यांत धार असलेला पोलादाचा तुकडा बसविलेला असतो.  दुसर्‍या जातीच्या शाराच्या दांड्याच्या टोंकाला पोलादी हत्याराचा तुकडा बसविण्याची व्यवस्था असते.
    
कातयंत्राचा टरेट यंत्र म्हणून एक प्रकार आहे.  जेव्हां एकाच कामाला पुष्कळ जातीची हत्यारें वापरावी लागतात व असल्या तर्‍हेचें पुष्कळ काम करावयाचें असतें तेव्हां हें यंत्र वापरतात.  याच्या हत्यारें पकडण्याच्या पकडीत व चाकांत सर्वत्र भोंकें पाडलेली असतात.  भोंकांमध्यें हत्यारें धरण्याची व्यवस्था असते.  यामुळें एकाच वेळेस त्यांत सहा प्रकारची हत्यारें भरतां येतात.  यामुळें एका हत्याराचें काम संपल्याबरोबर टरेट फिरवून दुसरें हत्यार ताबडतोब उपयोगांत आणतां येतें व वेळ वांचतो. केव्हां केव्हां काम केल्याबरोबर कोणीहि हात न लावतां आपोआप टरेट फिरून एका हत्याराच्या जागी दुसरें हत्यार येते.
    
भोंकें पाडण्याचें कांतयंत्र उभ्या आणि आडव्या दोन्ही जातीचें असतें.  त्यांवर पोकळ नळकांडें करणें, चाकें कांतणें वगैरे विशेष तर्‍हेचें काम होतें.  दात्यांच्या यंत्रावर (मिलिंगयंत्र) पुष्कळ निरनिराळें काम होतें.  दांतें पाडणें हें त्याचें एक मुख्य काम आहे, पण निरनिराळी हत्यारें लावून चावीचे गाळे पाडणे, दागिने घांसून काढणें इत्यादि पुष्कळच कामें या यंत्रावर करता येतात.  शेपिंग व प्लेनिंग या यंत्रांत कोणताहि दागिना घांसून काढण्याचें काम होतें, मात्र त्याची तर्‍हा निरनिराळी असते.  कातकामांत मुख्यतः तीनच धातू वापरतात.  त्या पितळ, पोलाद किंवा लोखंड आणि बीड ह्या होत.  पितळ फार मऊ असल्यानें काम करण्यास जवळ जवळ लांकडाइतकें सोपें जातें.  तें मऊ असल्यामुळें त्याच्या डागाला काततांना पुष्कळ वेग द्यावा लागतो.  कमी दिल्यास धातू कातली न जातां खड्डे पडावयास लागतात यावर चकाकीहि जलदी येतें.  लोखंड ही धातू पोलादापेक्षां कांहींशी मऊ आहे.  ह्या धातूचे काम करतानां कांतयंत्र डबल गिअरचें अगर कोनांच्या मोठ्या चाकाचें असावें लागतें.  याला बेताची गति पुरते.  काम करतवेळी याचे ढलपे न निघतां लांबचलांब तार निघत असते.  पोलाद निरनिराळ्या जातीचें असून लोखंड सारखे मऊ व बिडापेक्षां कडक असते.  यामुळें जसें पोलाद असेल त्याप्रमाणें गति व हत्यार असावें लागतें.  बीड कांतींत असतांना मात्र गति फार ठेऊन चालत नाही.  कारण तें घनवर्धनीय नाही.  यामुळें त्याची लांब तार न निघतां बारीक ढलपेच निघत असतात.  यामुळें बिडाच्या डागाच्या वेळी कातयंत्र हें डबल गिअरनेंच चालवावें लागतें.
    
यंत्रावर डाग लावतांना तो मध्यबिंदूंत बरोबर बसविणें हें फार जरूरीचें असतें.  जर तो तसा बसविला नाही तर काम निमुळतें होतें.  यासाठी डाग यंत्रावर पकडून त्यावर ताबडतोब हत्यार न लावितां प्रथम तो हळू हळू फिरवावा.  डाग फिरत असतांना हत्याराच्या बैठकीवर त्याला टेकेल पण दाबला जाणार नाहीं असा खडूचा तुकडा हातानें धरावा.  डाग फिरतांनां जेथें तो (मध्यबिंदूच्या) पुढें आलेला असेल त्या ठिकाणी त्याला खडू लागेल व अर्थातच त्याच्या दुसर्‍या बाजूला डाग आंत आल्यामुळें खडू लागणार नाही.  अशा रितीनें डाग वारंवार तपासून व तो मागेपुढे करून त्याला नीट मध्ययावर पकडावा व मग त्यावर हत्यार लावून काम सुरू करावें.  चांगले कामकरी (जिनगर) तर नुसत्या डोळ्यांनीहि (सततच्या संवयीमुळें) डाग मध्यबिंदूंत पकडतात.

हत्यारें लावण्याची (पाजविण्याची) तर्‍हाहि निरनिराळी आहे.  मऊ धातूंवर काम करतांना लागणारा हत्यारांचा आकार, कडक धातूंवर लावण्याच्या हत्यारांच्या आकारापेक्षां थोडा निराळा असतो.  तो हळूहळू अनुभवानें समजतो.  हत्यार लावतांना ते बरोबर मधोमध लावलें पाहिजे, म्हणजे त्याची आणि कातयंत्राच्या मध्यबिंदूंची पातळी समांतर (एक पातळींत) असली पाहिजे नाहींतर काम करतांना डाग हादरावयास लागतो, म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावें लागतें. कामाच्या वेळेस लागणारी हत्यारेंहि चांगली धारेची ठेवण्याची काळजी घ्यावी म्हणजे काम चांगलें होतें. (ले.व्ही.एच.मनोहर).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .