प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
 
कात, काताचे प्रकार व तयारकरण्याची कृति :- काताच्या तीन जाती आहेत.  काळा कात, मुख्यतः औद्योगीक कामाकरितां उपयोग केला जातो, फिक्का कात हा विड्यांत खातात किंवा औषणांकरितां याचा उपयोग करतात, खैरसाल (बोर्नियो), कापराप्रमाणेंच हा कात लांकडांत सांपडतो.  कात तयार करण्याकरितां झाड तोडून नंतर त्यांतून हा पदार्थ काढतात.  त्यामुळें ही झाडें झपाट्यानें कमी होत आहेत.
    
काळा किंवा पेगु कात करण्याची कृति - कात तयार करण्याकरितां तीन मनुष्यें कामावर असतात, एक मनुष्य झाडें तोडून ती जनावरांकडून ओढीत भट्टीपर्यंत नेतो.  दुसरा त्या लांकडांचा गाभा काढून त्याचे तुकडे करतो व तिसरा भट्टीवर असतो.  लांकडांचे तुकडे ३ ते ४ गॅलन (म्हणजे सुमारें १५/१६ शेर ) पाणी असलेल्या मातीच्या भांड्यांत उकळून अर्धे पाणी उरल्यावर, २०/२५ भांड्यांतील पाणी एका लोकखंडी कढईंत ओतून, पाकाप्रमाणें घट्ट होईपर्यंत सर्व रस आटवतात, नंतर कढई भट्टीवरून उतरून लांकडी ढवळण्यानें कढईंतील द्रव्या थंड होईपर्यंत एकसारखें ढवळतात व थंड झाल्यावर एका विटाळ्यासारख्या लांकडी साचांत पानें घालून त्यावर तें ओतत.  हा आटवलेला रस रात्रभर अशा स्थितींत राहिला म्हणजे सकाळपर्यंत वाळून कात तयार होतो.  कधी कधी लांकडाचे तेच तुकडे पुन्हां एक वेळ उकळतात.  पण त्यांपासून फारसा कात निघत नाही.  भट्टीवरून कढई खाली उतरल्यावर कांही जण अर्धा तास किंवा तास भर तो ढवळतात.
    
बरेली काथगोदाम रेल्वेवरील बरेली जंक्शनपासून ६ मैलांवर असलेल्या इज्जतनगर स्टेशनाजवळ इंडियन वुड प्रॉडक्टस कंपनीचा काताचा कारखाना आहे.  त्यांत कात यंत्राच्या सहाय्यानें बनतो.  त्याचें वर्णन चित्रमयजगतच्या एप्रिल १९२३ च्या अंकांत आहे.  तेथें १०० टन लांकडापासून सुमारें १० टन चुरा व २ टन कात निघतो.  कारखान्यांत रोज ४० टन लांकूड खपतें.  या कारखान्याचें भांडवल सुमारें १२ लाख रूपये आहे.
    
हंगाम - जून महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत कात तयार करण्याचा हंगाम असतो.  पण विशेषतः दिसेंबर पासून मार्च महिन्यापर्यंत हें काम जोरांत चालते.  एक टन लांकडापासून २५० ते ३०० पौंड कात निघतो.
    
इतर प्रकार - कानडी मुलुख, धारवाड, खानदेश, सुरत, बडोदा, छोटा नागपूर, डेहराडून व गोंडा (अयोध्या) येथें काळा कात तयार करतात.  हा कात तयार करण्याची कृति वरील कृतीपेक्षां फारशी भिन्न नसते.  ह्या भागांत हा धंदा विशेष मोठ्या प्रमाणावर चालत नाही.  गुजराथेंत सबंध झाड न तोडतां झाडाच्या मोठमोठ्या फांद्या तोडतात व त्या लाकडाचे तुकडे करून ते पाण्यांत उकळून त्यांपासून कात काढतात.
    
या ठिकाणाहून बाजारांत विक्रीकरितां येणारा कात दिसण्यांत व आकारांत पेगू काताहून निराळ्या प्रकारचा असतो.  या काताच्या वड्या चौकोनी, चपट्या असतात किंवा त्याचे गोल गोळेहि करतात.  हा कात जरा लालसर असतो.
    
फिक्काकात - हें नांव उत्तर हिंदुस्थानांतील करड्या पैलूदार स्फटिकाकृति कातास लावतात.  खैराच्या निविष्ट काढ्यांत कांही फांद्या ठेवून तो थंड होऊं दिला असतां फांद्यावर काताचे स्फटिक जमतात व ते खरडून काढून त्याचे चौकोनी तुकडे तयार करतात.  उरलेलें पाणी फेंकून देतात किंवा त्याचा हलक्या प्रतीचा कात तयार करतात.  यासंबंधी नक्की माहिती उपलब्ध नाही.  एतद्देशीय लोक कात विड्यांत घालून खातात, विड्यांतील चुना व कात यांच्या मिश्रणानें तोंड रंगते.
    
खैरसाल किंवा कीरसाल कात - खैराच्या लाकडांत कधी कधी एक स्फटिकाकार पदार्थ सापडतो त्यासच खैरसाल म्हणतात.  जळाऊ लांकडे तोडीत असतांना हा पदार्थ आढळतो.  व लांकूडतोडे तो जमा करतात कारण तो औषधी असल्यामुळें त्याला बरीच किंमत येते.  कातांत नागलीचें पीठ किंवा खडूची भुकटी घालून भेसळीचा कातहि करतात.
    
कात तयार करण्याच्या कृतीत सुधारणा - कात तयार करण्याची एतद्देशीय रीत उधळेपणाची व नुकसानकारक असल्यामुळे तींत सुधारणा करण्याकरितां पुष्कळांनी प्रयोग करून पाहिजे, त्यांपैकी डाँ. नॉर्थ व हिंदुस्थानसरकारचे कृषिकर्मविषयक रसायनशास्त्रवेत्ते डॉ. लेथर हे दोन आहेत.  काळ्या म्हणले औद्योगिक कामाकरितां उपयोगांत येणार्‍या कातांत काळें ट्यानिन नांवाचें द्रव्य मुख्य असतें व खाण्याच्या म्हणजे फिक्क्या कातांत ''कातहसी'' नांवाचें द्रव्य मुख्य असतें.  कातिनचें काळ्या ट्यानिनमध्यें सहज रूपांतर होतें.  कातीन हें फक्त ऊन पाण्यांत द्रवतें, परंतु काळें ट्यानिन थंड पाण्यांतहि द्रवतें व या गोष्टींचा फायदा घेऊन एकाच कातांत असलेली ही दोन्ही द्रव्यें पृथककरण करून कातीनयुक्त कात निराळा विकावा असें डॉ. नॉर्थचें मत आहे.  काढा कढविण्याकरितां लोखंडी कढ्यांऐवजी तांब्याच्या कढ्या वापराव्या असेंहि त्याचें म्हणणें आहे.  वर पांढरा थर असलेल्या लांकडांत कातीन (कॅटेचिनचें) प्रमाण पुष्कळ सापडते.  अशा प्रकारचे लांकूड ब्रह्मदेशापेक्षा अयोध्या प्रांतांतच जास्त सापडते.  डॉ. लेथर यांनी या बाबतींत पुष्कळ शोध लाविले आहेत.  काताची बाजारांतील किंमत त्यांतील काळें ट्यानिन व कातीन यांच्या शेंकडा प्रमाणावर व बाह्य रंगावर अवलंबून असते कातडी कमावणार्‍यांच्या दृष्टीनें कातांत ''कातीन'' नसल्यास अधिक चांगले.

उत्तमरीतीनें लाकूड कापण्याची रीत - निरनिराळ्या पाण्यांचा परिणाम व लाकूड उकळण्यास लागणारा कालावधि यासंबंधानेंहि हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या रीतींत पुष्कळच सुधारणा होण्यासारखी आहे. हल्लीप्रमाणे लाकडाचे तुकडे करण्यापेक्षा सुताराच्या रंध्याने त्याचा ढलप्या काढल्या असतां ते अधिक फायदेशीर होईल.  असे केलें असतां "काळें टयानिन" व "कातीन" हीं दोन्ही द्रव्यें अधिक उत्पन्न होतील, पाण्याचें व लांकडाच्या वजनाचें प्रभाण कमी करतां येईल व लांकूड उकळण्यास लागणारा कालावधि बारा तासांवरून अर्ध्या तासावर आणतां येईल.  या सर्व गोष्टीमुळें हा धंदा फायदेशीर होईल इतकेंच नव्हे तर या कृतीप्रमाणें उत्पन्न होणारी द्रव्ये अधिक चांगली निघतील.  या पद्धतीप्रमाणें काम केल्यास हा धंदा व्यापारीदृष्ट्या केव्हांहि यशस्वीच होईल.  खैराशिवाय दुसर्‍याहि कित्येक झाडांपासून कात तयार करितात.
    
सुपारीचा कात - ताज्या सुपार्‍या (पोफळें) सोलून व किंचित दुखवून पाण्यांत घालून कढविल्या म्हणजे जो त्यांचा दाट व लाल द्रव होतो तो ज्यास्त आटविल्यावर घट्ट होतो, तो पानावर ओतून त्याच्या वड्या तयार करितात.  दक्षिण हिंदुस्थानांत कापी व चिकणी सुपारी करतात, त्या ठिकाणी हा कात तयार होतो.
    
आंवळीचा कात - आंवळीच्या झाडपापासूनहि कात करितात.  या झाडाच्या फळांत व लांकडांत ट्यानिन अॅसिड असतें.  आंवळीचा कात काळसर पांढर्‍या रंगाचा असतो.  
    
गँबिअर किंवा मलायी कात - या नांवाचा एक पिंवळा कात बाजारांत मिळतो.  मलायामधील गँबिअर नांवाच्या झाडाच्या पानांपासून वरच्याप्रमाणेंच हा काढतात.  या काताचें झाड डिकेमालीच्या जातीचें असून तें ओलसर जागी उगवतें.  खैरापेक्षां याची लागवड करणें सोपें व कमी खर्चाचें आहे.  या झाडाच्या पानांपासून कात तयार होतो.  याची निर्गत विलायतेंत फार होते.
    
निपज व व्यापार - काताची निपज हिंदुस्थानांत किती होते यासंबंधी विश्वसनीय आंकडे उपलब्ध नाहींत, कारण याचा व्यापार बहुतेक लहान लहान कारखानदार व व्यापारी यांच्या स्वाधीन आहे.  जंगलखात्यामार्फत खैरांच्या जंगलाचा मक्ता लिलांवानें किंवा मागणी अर्जानें देतात.  हा मक्ता साधारणपणें चार महिन्यांकरितां असतो.  साधारणपणें प्रत्येक कटाईंत ८० झाडांचा उपयोग करतात.  प्रत्येक कटाईची किंमत सुमारें २२५ रूपये असते.  तेव्हां प्रत्येक झाडाची किंमत २ रु.  १३ आ. ठरते.  प्रत्येक झाडापासून (२५ घनफूट लांकूड) अर्धा टन कात उत्पन्न होतो, म्हणजे प्रत्येक टनाची ५ रु. १० आ. किंमत ठरते.
    
ब्रह्मदेशांत १३०००० ते १५०००० हंड्रेडवेटांपर्यंत उत्पन्न, दक्षिण हिंदुस्थान १००० हं., मुंबई ५०० हं., बंगाल व सं. प्रान्त २००००० हं. हे वार्षिक निपजीचे आकडे परदेशीय किनार्‍यालगतच्या व अन्तर्गत व्यापारावरून काढले आहेत, त्यांत निश्चित आकड्याचा उपयोग केलेला नसल्यामुळे स्थानिक खर्च किती होतो याचा विचारच केलेला नाही.  याचा व्यापार स्थिर नाही हें खालील आंकड्यांवरून दिसून येईल.  परदेशी रवाना झालेल्या मालाचें कोष्टक :-

 सन  वजन हंड्रेडवेट   किंमत रू.
 १८९५-१९९६  १८३७२९   ३६९३१०६
 १८९९-१९००  ६२५६२   ९७१०४१
 १९०६-१९०७  ९७२६०   १५९२५६१
 १९१३-१९१४  ५८८५९   ६२१६२
 १९१५-१९१६   १४५५११   १६१३३३
 १९१७-१९१८  ४२१३३   ४४७५१
 १९१८-१९१९  ५८१२५   ७७१८९

वरील आंकड्यावरून व्यापारांत होत असलेला फरक दिसून येतो.  यांपैकी शेंकडा ९८ व्यापार ब्रह्मदेशांतूनच होतो.
    
सर्वांत जास्त माल ग्रेटब्रिटनमध्यें जातो.  त्याच्या खालोखाल इजिप्‍तमध्यें जात असून त्याचे खालोखाल फ्रान्स, जर्मनी किंवा हॉलंड येतें.
    
सामान्य उपयोग - काताचा उपयोग रंगविण्याकडे फार करितात.  कातड्याच्या कारखान्यांमध्यें त्याचा शेवटचा हात देण्याच्या कामी फार उपयोग होतो.  रेशमाला याचा उत्तम रंग बसतो.  याचा खाण्याकडे होणारा उपयोग सर्वांस माहीतच आहे.
    
कातांचे अंगी स्तंभकधर्म असल्यामुळें हगवणींत अथवा रक्तस्त्रांवांत त्याचा चांगला उपयोग होतो.  मुख्यतः लहान मुलांच्या हगवणीवर त्याचा अधिक चांगला उपयोग होतो.  त्याचें चूर्ण, अर्क अथवा काढा ह्यांचा नुसता अथवा दालचिनी वगैरे दुसर्‍या स्तंभक औषधांबरोबर उपयोग करितात.  घसा बसला असतां किंवा पार्‍यामुळें हिरड्या सुजून लाळ गळूं लागली असतां व रक्त येऊं लागलें असतां काताचा तुकडा तोंडांत धरून तो हळूहळू चघळीत राहिल्यास चांगला उपयोग होतो.  दांत किडल्यामुळें ठणकूं लागल्यास काताची पूड दांतांच्या खळग्यांत भरावी.  साध्या मलमांत कात मिसळून तें मलम व्रणांवर लावलें असतां ते बरे होतात (वॅट, भि. वि. पु. १८ पृ. २०१)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .