प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य
 
काठेवाड -  मुंबई.  हें आरबी समुद्रांतील गुजराथच्या पश्चिमेकडील द्वीपकल्प असून हें उ.अ. २० ४०' ते २३ ४५' व पू.रे. ६९ ५५' ते ७२ २०' यावर आहे. याची सर्वांत जास्त लांबी सरासरी २१५ मैल व रुंदी १६० मैल असून याचें क्षेत्रफळ अजमासें २३५०० चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) २५३८४९७ आहे.  काठेवाडचा बराच भाग अमदाबाद जिल्ह्यांत मोडत असून कांहीं गायकवाड, पोर्तुगीझ व पोलिटिकल एजंट यांच्या ताब्यांत आहे.  पोलिटिकल एजन्सींत १९३ संस्थानें आहेत.  काठेवाडचें प्राचीन नांव सौराष्ट्र; परंतु मराठ्यांनीं त्याला काठेवाड असें नांव दिलें.  कारण येथील काठी लोकांनीं त्यांना विशेष विरोध केला होता.  त्या नांवावरून त्यांनी सौराष्ट्राऐवजीं काठेवाड हें नांव ठेविलें आणि तेंच इंग्रजांनींहि पुढें कायम केलें.  मुसुलमानी अंमलात याला सोरठ म्हणत; आणि अद्यापिहि दक्षिणेकडील एक प्रांत याच नांवाचा आहे.  हल्लीं या द्वीपकल्पाचे एकंदर चार मोठे प्रांत आहेत.  ते झालवाड, हलर, गोहेलवाड व सोरट हे होत.  इंग्रजांचा पो. एजंट राजकोटास (एक संस्थान) रहतो.  एकंदर द्वीपकल्पाचें उत्पन्न सरासरी १॥ कोटीचें आहे.  पैकीं २ लक्ष ६० हजाराचें उत्पन्न व १३२० चौ. मैलांचा प्रदेश अहमदाबाद जिल्ह्यांतील (घोग्रा व धदुंका तालुक्यांचा) आहे.  ७ चौरस मैल प्रदेश व ३८ हजार उत्पन्नाचा प्रांत दीवच्या पोर्तुगीजांचा आहे.  तसेंच १३२० चौ. मै. चा व १ लक्ष उत्पन्नाचा मुलूख गायकवाडांच्या ताब्यांत असून बाकीचा २०८८० चौ. मैलांचा व १ कोटी ४८ लक्ष वसुलाचा मुलुख काठेवाड पोलिटिकल एजन्सीच्या ताब्यातील आहे.

काठेवाड द्वीपकल्प हें एकेकाळीं बेट असावें असा समज आहे.  काठेवाडच्या पूर्वेस त्याच्या व गुजराथच्या मध्यें असलेल्या मिठाच्या जमिनीमुळें खंबायतचें भूशीर व कच्छचें रण यांनां जोडणारा पाण्याचा प्रवाह पूर्वी या भागांत असावा असा तर्क आहे.  फार पूर्वी सिंधूनदी याच भागांतून खंबायतच्या आखातास जाऊन मिळत असावा असें म्हणतात; आणि यामुळेंच कच्छ (आनर्त) हा प्रांतहि पूर्वी सौराष्ट्राचाच एक भाग होता असें कांहींचें मत आहे.  काठेवाडच्या मध्यभागीं पठार असून येथूनच बहुतेक द्वीपकल्पांतील सर्व नद्यांचा उगम होतो.  याचा उत्तरेकडील पृष्ठभाग सपाट असून इतर ठिकाणीं अलेक, कमळ, वंसजाळी, दलकानिआ, शत्रुंजय, सनोसर वगैरे डोंगर आहेत.  गीर पर्वताची ओळ किनार्‍यापासून २० मैल उत्तरेस असून त्याला समांतर अशी आहे.  याशिवाय ओसाम, गिरनार, वरदा वगैरे इतर पर्वत व टेंकड्याहि आहेत.

येथील मुख्य नदी भादर ही असून ती मांडव टेंकड्यांत उगम पावते.  तिची एकंदर लांबी १२० मैल असून तिच्या दोन्ही कांठांवरील प्रदेश चांगला लागवडीचा आहे.  याच भागांतून दुसरी एक सुखा भादर नांवाची नदी निघून खंबायतच्या आखातास मिळते.  अजी, माचू, प्रख्यात सरस्वती, भोगवा आणि शेंत्रुजी या इतर नद्या असून शेवटच्या नदीच्या कांठी सुंदर सृष्टिसौंदर्य पहावयास मिळते.  हंसथळ, भावनगर, सुंद्राइ व धोलेरा या खार्‍या पाण्याच्या मुख्य खाड्या आहेत.

काठेवाडमध्यें बेट हें उत्तम बंदर असून त्याशिवाय ववानीआ, जोडीआ, बेडि, सलाया, धोलेरा, माधवपूर, वेरावळ, भावनगर, द्वारका, मूळद्वारका, दिव, पोरबंदर, धरबंदर, नविबंदर, मांगरोळ, जाफराबाद, गोघा वगैरे अनेक इतर बंदरेंहि आहेत.  प्राचीन काळापासून ग्रीक, रोमन, मुसुलमान वगैरे बाह्य लोक या बंदरीं व्यापाराकरितां येत, त्यामुळें या बेटाची त्यावेळीं फार ख्याति होती.  पिरम, चांच, शियळ, शंखोदर, नोर, करूंभर, दिव, हीं इतर बेटें आहेत.  येथें सरोवरें थोडीं असून त्यांपैकीं नाल व घेडस हीं मुख्य आहेत.

साबरमतीच्या मुखापासून वायव्येकडे ३५ मैल दूरवर जाणार्‍या दलदलीच्या पात्राला खंबायतचें रण म्हणतात.  याच्या खालील भागांत समुद्रांतील गाळ विपुल असून पावसाळ्यांत हें पात्र भरल्यावर नाल तळ्याचें व याचें पाणी एक होतें.  त्यामुळें इकडून अहमदाबादचें दळणवळण कांहीं दिवस बंद पडून कांहीं खेड्यांचीं तर बेटें बनतात.

दख्खनप्रमाणें या द्वीपकल्पांतहि बहुतेक सर्व ठिकाणीं बासाल्टचे थर आढळतात.  उत्तरेकडील पर्वतांतून युमिआ व लॅमेटा जातीचे थर आढळतात.  दक्षिण किनार्‍यावर व पूर्वेकडे मळीची जमीन बरींच आहे.  या द्वीपकल्पांत पाऊस साधारण पडतो.  गीर अरण्याखेरीज इतर ठिकाणीं झाडी पातळ आहे.  येथील इमारतीचें लांकूड मौल्यवान नाहीं.  दक्षिण किनार्‍यावर नारळांचीं झाडें लवकर वाढून मजबूत होतात.  रानखजूर बहुतेक सर्व भागांत होतो.  महुवा येथें उत्तम आंबे होतात.

सिंह, बिब्यावाघ, काळवीट, चित्ता, डुकर, कोल्हा, लांडगा व जंगली मांजर हे येथील मुख्य वन्यपशू आहेत.  सरपटणार्‍या प्राण्यांपैकीं साप, मगर व कांसव हे मुख्य आहेत.  सिंह हा फक्त गीर जंगलांतच व क्वचित गिरनार पर्वतावर आढळतो.

काठेवाडचें एकंदर हवामान साधारण ठीक आहे.  जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत दाट धुकें व पुष्कळ दंव पडतें.  एप्रिल ते जून उन्हाळा असून तेव्हां हवा फार चांगली असते.  सप्टेंबरपासून पुढें अडीच महिने हवा खराब असून ती त्यावेळीं कोणालाच मानवत नाहीं.  काठेवाडमध्यें सर्वांत जास्त पाऊस (४२ इंच) जुनागड येथें पडतो.  पावसाचे वारे जून ते आक्टोबरपर्यंत वहात असून खरा पाऊस जुलै ते सप्टेंबरमध्यें पडतो.

गेल्या शतकांत येथें बर्‍याच वेळां भूकंप झाला.  सन १८६४ एप्रील ता. २९ रोजी दुपारीं ११ वाजतां बहुतेक सर्व भागांत भूकंप झाला.  भूकंपाचे पूर्वी सुमारें ६ सेकंद एक तर्‍हेचा नाद होऊं लागल्यामुळें लोक फार घाबरून गले होते.  याशिवाय १८८१ व १८९८ सालींहि कांहीं कांहीं भागांतून पुन्हां भूकंप झाला.

इतिहास -  काठेवाडचा प्राचीन इतिहास फारसा उपलब्ध नाहीं.  जैन ग्रंथांतून प्राचीन माहिती थोडीफार मिळते.  पण ती पौराणिक धर्तीची होय.  श्रीकृष्ण इकडे येण्यापूर्वी येथें सर्व राक्षस होते.  परंतु एक रेवत नांवाचा सूर्यवंशीय राजा त्यावेळी येथें होता.  त्याची मुलगी रेवती ही बलरामास पुढें दिली.  प्रभासपट्टण येथेंच यादवांची शेवटची यादवी झाली.  श्रीकृष्ण ज्या ठिकाणीं निजधामास गेले ते ठिकाण हल्लींहि वेरावळ व पट्टण यांच्यामध्यें दाखवितात.  वेरावळ व पोरबंदर यांच्यामधील माधवपुर येथें रुक्मिणीहरण झाल्याचें सांगतात.  जैन लोक पालिठाणा व गिरनार डोंगरास फार पवित्र मानतात.  गिरनारवरील हिंदु देवळांपैकीं कांहीं गुप्‍त घराण्यांनीं बांधलीं आहेत.  काठेवाड त्या वेळीं फार सधन व बंदरें सोयीचीं यामुळें अनेक परकीय लोकांनीं त्याच्यावर पुष्कळदां स्वार्‍या केल्या.  या प्रांताचा अगदीं पहिला ऐतिहासिक उल्लेख चंद्रगुप्‍त मौर्याच्या वेळीं येतो.  त्यानें नर्मदेपर्यंत हिंदुस्थान जिंकून त्याचे चार भाग केले.  त्यांत पश्चिमेकडील भागांत सौराष्ट्र हें नांव येतें व त्याची राजधानी उज्जनी होती असा उल्लेख आढळतो (ख्रि.पू. ३२०).  त्याचा सुभेदार सेन पुष्यगुप्‍त होता.  हा चंद्रगुप्ताचा मेहुणा होता.  यानें जुनागडजवळ सुदर्शन नांवाचें एक मोठें सरोवर बांधून त्याचे शेतीसाठी कालवे काढले होते.  अशोक हा उज्जनीस या प्रांताचा (राजा होण्यापूर्वी) सुभेदार होता.  तो राजा झाल्यानंतर त्यानें जुनागडजवळ एक मोठ्या खडकावर आपल्या आज्ञा खोदल्या आहेत (जुनागड पहा).  शिकंदरच्या वेळीं (टॉलेमीचें मोनोग्लोसोन म्हणजे आजचें मंगरोळ होय) व अशोकाच्या वेळीं लोकांनां हा भाग माहीत होता.  'सौराष्ट्रेने' या नांवानें ग्रीक व रोमन लोक काठेवाडाला ओळखीत असत.  मौर्य, ग्रीक, क्षत्रप, गुप्‍त वलभी वगैरे राजांनीं येथे राज्य केलें अशी माहिती मिळते.  त्यावेळीं काठेवाडास सुराष्ट्र (सौराष्ट्र) असें नांव होतें.  मौर्याचें राज्य विस्कळीत झाल्यानंतर बाह्य शक लोकांनी येथें कांहीं शतकें राज्य केलें.  पुढें गुप्‍त घराण्यांतील प्रख्यात व अत्यंत शूर अशा चंद्रगुप्तानें (दुसरा) शकांपासून हा देश जिंकून घेऊन त्यांनां हांकलून दिलें (इ.स. ४००).  सौराष्ट्रची प्राचीन राजधानी वामनस्थळी (वनथली), नंतर प्रभासपट्टण व मग वेरावळ झाली.  हीं तिन्हीं गांवें जवळजवळ आहेत.  जुनागड हेंहि फार जुनें शहर आहे.  हें बौद्ध धर्माचें एक मोठें ठिकाण होतें.  येथेंच प्रख्यात अशोकाचा शिलालेख आहे.  पोरबंदर, श्रीनगर, धुमळी डोंगर, भेराईबंदर पेरमबेट, शिआळ (कोल्हा) बेट हीं सारी प्राचीन ठिकाणें आहेत.  दुसर्‍या ध्रुवसेनाच्या कारकीर्दीत (६३२-४०) चिनी प्रवाशी ह्युएनत्संग काठेवाडांत वाल येथें आला होता (६४०).  'येथील लोक श्रीमंत असून व्यापार करतात.  त्यांचा समुद्राच्या सानिध्यामुळें बराच फायदा होतो.  गुजराथ हा सौराष्ट्राचाच एक भाग असून त्याची सरहद्द मही नदी आहे व एकंदर प्रांताचा परीघ ६०० कोस आहे.'  असें त्यानें लिहिलें आहे.  बुद्ध लोकांचे मठहि त्याला काठेवाडांत आढळले.  काठेवाडांतच प्रसिद्ध सोमनाथाचें देऊळ आहे.  तें महंमुद गझनीकर यानें १०२५ च्या सुमारास लुटलें.  काठेवाड हें द्वीपकल्प असल्यानें व तो फार सुपीक प्रांत असल्यानें त्याच्यावर अनेक घराण्यांनीं अनेकवार राज्यें केली.  महंमुदानंतर मुसुलमानांच्या स्वार्‍या बर्‍याच वेळां काठेवाडावर झाल्या.  इ.स. ११९४ त त्यांनीं अनहिलवाडा राजधानीवर हल्ला केला होता.  पुढें १२९८ त त्यांनीं ती कायमची जिंकली.  मध्यंतरी लाखा फुलाणी यानें काठेवाड जिंकला होता (१३२०).  मुसुलमानी अंमलांत काठेवाड हा प्रांत गुजराथच्या सुभ्यांत समाविष्ठ होई व गुजराथच्या सुभेदाराचा अधिकार त्यावर चाले.  झाफरखान (१३२४) हा गुजराथचा पहिला मुसुलमान राजा होय.  १६ व्या शतकाच्या अखेरीस अकबरानें गुजराथ पादाक्रांत केला.  त्याच्या पूर्वी इ.स. १५०९ च्या सुमाराला पोर्तुगीझ लोकांपासून काठेवाडला थोडासा त्रास झाला होता.  १५३७ त बहादूरशाहाला कपटानें मारून त्यांनीं दिव बंदरांत वखारीच्या ठिकाणीं किल्ला बांधला.  तेव्हांपासून हा किल्ला व दीव बेट अद्यापि त्यांच्या ताब्यांत आहे.  इ.स. १७०५ मध्यें गुजराथेंत मराठ्यांचा शिरकाव होऊन कंठाजी कदम, बांडे व दमाजी गायकवाड यांच्या पुढारीपणाखालीं आपली सत्ता त्यांनीं तेथें कायमची स्थापित केली.  त्यावेळीं पेशव्याकरितां व स्वतःकरितां मुलुखगिरी (खंडणी) मिळविण्याकरितां उत्तर व पश्चिम गुजराथमध्यें गायकवाड हे आपली फौज पाठवीत असत.  तेव्हांपासून आतांपर्यंत कांहीं भाग वगळून बहुतेक काठेवाड गायकवाडांच्या आधिपत्याखालीं आहे.  १८०७-०८ पासून काठेवाडामधील लहान लहान सरदारांच्या यादवीचा शेवट झाला.  त्यावेळी इंग्रजांनीं गायकवाडच्या मुलुखगिरीपासून त्यांचें नुकसान होणार नाहीं अशी हमी घेतली व गायकवाडाला त्यांनीं भरावयाची खंडणी आपल्या (इंग्रजांच्या) मार्फतीनें भरावी असें दोन्ही पक्षांच्या संमतीनें ठरविलें.

काठेवाडामध्यें प्राचीन कालचे अवशेष बरेच आहेत.  ते दक्षिणेस व आग्नेयीस सांपडतात.  अशोकाच्या वेळचे लेख, बौद्धांचीं लेणीं व जैनाचीं देवळें हीं येथें आहेत.  मुंबई व अहमदाबाद येथें काठेवाडी लोक फार आढळतात.  इकडील कांहीं धाडशी मुसुलमान व्यापारी नाताळ व दक्षिण आफ्रिकेच्याहि सफरी करतात.  जुनागड, भावनगर, नवानगर, धंदुका, लिमडी, ध्रांगध्रा, वांकानेर, ध्रोळ, द्वारका, खंभालिया, जेतपुर, अमरेळी, पालिठाण, राजकोट, घोराजी, पोरबंदर, गोंडळ, मोरवी, महुवा, वेरावळ व वढवाण हीं मुख्य शहरें आहेत.  हीं बहुतेक लहान लहान संस्थानेंच आहेत.  येथें रजपूत, काठी, कुणबी, कोळी, ब्राह्मण, वाणी, लुहाणा, जाडेजा रजपूत, धेड, मेमन, खोजे व घानची जातीचे लोक आहेत.  सर्वांत मुख्य काठी लोक आहेत.  त्यांपैकीं वाणी, लुहाणा, मेमन व खोजे लोक व्यापार करतात व घानची लोक तेल काढतात.  एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ४१.५ लोकांची उपजीविका शेतीवर आहे.  येथील हवापाणी, पाऊस व जमिनीची जात चांगली असल्यामुळें शेतीला हा प्रदेश उत्तम आहे.  जमीन काळी व लाल अशा दोन प्रकारची आहे.  काळ्या जमिनींत कापूस होतो व लाल जमिनींत पाटाच्या पाण्यानें गहूं व सातू चांगला होतो.  भादर नदीच्या कांठीं उत्तम फळफळावळ, भाज्या व ऊंस होतो.  हळद व मूग यांचे उत्पन्न बहुतेक सर्व ठिकाणीं होतें.

अलीकडे कालव्याचे पाणी पुरविण्यांत बरीच सुधारणा झाली आहे.  नवीन बांधलेल्या तलावांपैकीं लालपुरी, अलानसागर, पनेली, चंपा व मोलदी हे मुख्य आहेत.

येथील निरनिराळे संस्थानिक आपआपल्या खर्चानें पुष्कळ सार्वजनिक कामें करतात.  इकडे प्रथमतः भावनगरकरांनीं स्वतःच्या खर्चानें आगगाडी सुरू केली.  नंतर आतां हळू हळू इतर संस्थानिकांनींहि छोटे छोटे फांटे काढले आहेत.  काठेवाडी घोडे प्रख्यात आहेत.  याशिवाय गाई, म्हशी, उंट, गाढव, मेंढ्या वगैरे इतर जनावरें येथें आहेत.

वांकानेर व पंचाल येथें इमारती लांकूड होतें व भावनगर, मोरवी, गोंडल व मानवदार येथें जळाऊ लांकूड मिळतें.  ताड व अंबा यांची लागवड भावनगर येथें मुद्दाम केली जाते.

काठेवाडांत खनिज पदार्थ (बहुतकरून लोखंड) व विशेषतः इमारती दगड पुष्कळ सांपडतात.  नवानगरच्या  आसपास चांगले मोती सांपडतात.  पांढरीं व तांबडी पोवळीं कोठें कोठें सांपडतात.  

ह्या द्वीपकल्पांतील लोक सधन आहेत.  पाण्याचा पुरवठा मुबलक असल्यामुळें येथील जमिनींचें उत्पन्न चांगलें येतें.  

मुंबई बंदारांतून परदेशी जाणार्‍या कापसापैकीं एकशष्ठांश कापूस काठेवाडांतून येतो.  सुती कापड, साखर, गूळ व कांहीं प्रकारचीं धान्यें बाहेरून काठेवाडांत जातात.  

कापडाचे कारखाने व इमारती लांकडाचा व्यापार इकडे बराच भरभराटीस आला आहे.  सोन्यारुप्याच्या कलाबतूचें विणकाम, सुगंधी तेलें व उटणीं, गुलाबाचें व इतर अत्तर आणि हस्तीदंती व चंदनी कोरींव काम येथें चांगले होतें.

सडका व रस्त्यांच्या कामांत अलीकडे फारच सुधारणा झाली आहे.  १८६५ सालीं काठेवाडांत एकहि पक्की चांगली सडक नव्हती.  अलीकडे बर्‍याच पक्क्या चांगल्या सडका झाल्या असून उत्तम पूलहि बांधलेले आहेत.  वढवाण ते जुनागड व भावनगर ते जोडिया असे मुख्य दोन हमरस्ते असून त्यांच्या शाखा सर्वत्र पसरल्या आहेत.

१८७२ त काठेवाडांमध्यें पहिली आगगाडीची सडक सुरू झाली.  १८८० पासून निरनिराळ्या संस्थानांच्या खर्चानें नवीन फांटे तयार केल्यामुळें हल्लीं इकडील दळणवळण बरेंच सुलभ झालें आहे.  काठेवाडांत इंग्रजांचीं व जुनागड संस्थानची टपालऑफिसें आहेत.  या भागांत मधून मधून दुष्काळ पडतात.

(मुं.ग्या.पु. ८; स्मिथ; डफ; सुरा. इति; तारिख-ई. सोरठ; वॉटसन; रासमालाः बेलकाठे. इति; अलबेरूणी; इंडि; क्राना; इंडि. अॅं. पु. १५; ज.रा.ए.सो. १८९०, १८९९ अर्कि. सर्व्हे.  वेस्ट इंडि. भा. २; बेली-गुज.इति.).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .